अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
12 Jun 2025 - 4:13 pm

२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं.

इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा.

कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते.

ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.

अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.

काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार.

त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं.

हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर.

अधिक अपडेट इथे करत राहू.

समाजजीवनमानतंत्रप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Jun 2025 - 6:44 am | प्रचेतस

गविशेठ विमान तंत्रज्ञ आहेत तरी तुम्ही म्हणताय त्या मुद्द्यात तथ्य आहे.

इनार्शिया ऊर्फ जडत्व याचा उल्लेख मी वर केला आहे. बाकी सर्व मांडणी प्रत्यक्ष तथ्ये आणि आकडे यांवर आधारित. विमान पूर्ण सहाशे फूट स्वबळावर जाऊन त्याक्षणी खाली येणे असे होत नसते. हे अंतर जमिनीपासून चारशे फूट आहे. (समुद्र सपाटीपासून सहाशे) उड्डाणाला लागलेली धावपट्टी जास्त असल्याने विमान कोसळले हा संबंध कुठून आला कळले नाही. धावपट्टी जितकी लागली ती सर्व मर्यादांच्या वरची होती. दोन्ही इंजिने चालू असताना लागते तितकी कमी न लागता एका इंजिनावर टेक ऑफ करावा तितकी ती लांबी आहे साधारण. दोन्ही इंजिने एका क्षणी बंद न पडता एकामागून एक पडणे हे अधिक तर्कशुद्ध आहे. एक इंजिन बंद पडले तर त्याचे इंधन कट ऑफ करणे (फ्लेम आऊट) अशी प्रोसेस केली जाते. एका जुन्या केस मधे ते इंजिन बंद न करता उरलेले चालू इंजिन बंद केले असा प्रकार देखील झाला आहे. आत्ताही तसेच झाले असे मात्र म्हणणे नाही.

माहितीपूर्ण प्रतिसाद
लिहिते रहा
वाचतोय
~मारवा.

माहितीपूर्ण प्रतिसाद
लिहिते रहा
वाचतोय
~मारवा

टेक ऑफ साठी लागलेली अधिकची लांबी ही दोन्ही इंजिने पूर्ण शक्तीने चालू नसणे, त्यातल्या त्यात एकाच इंजिनच्या ताकदीवर टेक ऑफ घेतला गेल्यास जितकी लागेल तिच्याशी कन्सिस्टन्ट आहे. याचा अर्थ लांब टेकऑफ डिस्टन्स हे "कारण" नव्हे. एक इंजिन अगोदर फेल झाल्याचा तो केवळ संकेत आहे.

आतापर्यंत कोणताही तर्क हा केवळ शक्यतेच्या प्रमाणात वर खाली सरकतो आहे. अमुकच घडले असा दावा करणे अर्थातच कोणालाच शक्य नाही. मी तर मुळीच करत नाहीये.

विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले.

यावर बोलायचे राहून गेले. टेक ऑफ नंतर आठ मिनिटे ऑल वेल असते तर विमानाने मिनिमम सेफ आल्टिट्यूड गाठली असती आणि बिन इंजिनाचे वळून पुन्हा उलट रन वे गाठण्याइतका वेळ पुढे त्याला लाभला असता (ग्लाईड करत करत). आठ मिनिटे भरपूर असतात. इथे टेक ऑफ होता होताच इंजिन पॉवर लॉस झाला आहे. इंजिने थांबताच त्या क्षणी विमान खाली जात नाही. थोडा वेळ अल्प अल्टिट्यूड गेन होते. मग खाली येते. वरच्या दिशेने फायर केलेल्या बंदुकीच्या गोळीचे उदाहरण घ्या. गोळी सुटते तेव्हाच तिची अवस्था पॉवर कट झालेल्या projectile ची असते. (साधारण इंजिन अचानक बंद पडलेले विमान. फक्त पंख नसतात इतकेच). चपखल नसले तरी समांतर उदाहरण. काहींना पटू शकेल.

यात काही खास वेगळा तर्क नाही. विमानाच्या बाबतीत असेच होते नेहमीच.

यावरून आठवले. आम्हाला उड्डाण प्रशिक्षणाच्या वेळी टेकऑफ होताच इंजिन फेल झाल्यास पुन्हा उतरणे हे शिकवले जाते. पण ते लहान ट्रेनी विमानावर. त्या विमानासाठी भरपूर रनवे शिल्लक असतो. टेक ऑफ होताच इंजिन लगेच बंद केले जाते आणि उर्वरित रनवे वर उतरणे अपेक्षित.

तेव्हाही इंजिन बंद केल्यावर विमान काही उंची गाठत राहते अणि मग खाली येते. न्यूटनचा नियम. Inertia.

बोईंग ७८७ सारख्या विमानाच्या बाबतीत हे शिक्षण कुचकामी, कारण त्याला असा रन वे उरलेला नसतो. प्रशिक्षणात रन वे वर लहान विमान परत उतरते. इथे त्याजागी हॉस्पिटल आणि हॉस्टेल असते. दुर्दैव.

टेक ऑफ नंतर इतक्या लगेच दोन्ही इंजिने फेल, या स्थितीसाठी कोणतीही चेकलिस्ट नाही. म्हणजे विमान वाचवण्यासाठी कोणतीही चेक लिस्ट नाही. ते शक्यच नाही. यापूर्वी टेक ऑफ नंतर दोन्ही इंजिने फेल असे फारच क्वचित झाले आहे आणि त्या त्या वेळी विमान तीन हजार फुटांहून वर पोचू शकल्याने त्याला पुन्हा लँड करायला अवसर मिळाला आहे. अहमदाबाद घटना याबाबतीत अद्वितीय आणि पहिलीच आहे. आता खूप मूलभूत बदल करावे लागतील. असेही होऊ शकते हे प्रथमच दिसले.

>>कोपायलटची खुर्ची निसटली, तो मागे पडला तेव्हा विमान वर घेण्याचा दांडकाही मागे ( म्हणजे विमान उतरवायला लागतो तसा) ओढला गेला व विमान वर गेले नाही. दुसऱ्या वैमानिकाने तो दांडा पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही>>>

- ...... १.तर विमानाचे नाक खाली का गेले नाही?
२. इथे एआइ काम करत असते तर ...... "आताच तर टेक ओफ होत आहे मग परत लगेच उतरवतोस कशाला? खरंच विमान उतरायचं आहे का? मग ते फिरवून घे" अशी आकाशवाणी झाली असती.

असे काही होणे माझ्यामते अजिबातच शक्य नाहीये. त्यामुळे हा तर्क माझ्या यादीत तरी समाविष्ट नाही.

विमान वर घेण्याचा दांडका, तो मागे ओढला जाणे (विमान उतरवायला लागतो तसा) हे सर्वच चुकीचे असल्याने त्यावर मत देता येत नाही. मी खुद्द हे सर्व वापरून लहान आकाराचे का होईना पण विमान उडवले असल्याने आणि त्याखेरीज एअरक्राफ्ट इंजिन / सिस्टीम (specific) हा विषय बोईंग विमान या निवडीसहीत उत्तीर्ण केल्याने असे काही नसते हे मी ठामपणे सांगू शकतो.

स्वधर्म's picture

20 Jun 2025 - 4:16 pm | स्वधर्म

खुलासा केल्याबद्दल धन्यवाद. पहिल्यांदाच मी म्हणालो होतो की हा एक व्हॉट्स अप फॉरवर्ड आहे. त्यामुळे त्याची विश्वासार्हता माहित नाही.

कंजूस's picture

20 Jun 2025 - 1:57 pm | कंजूस

अगदी अस्सल माहितीबद्दल धन्यवाद गवि.

तर तांत्रिक विषय हा इथे संपला आहे हे मी समजतो.
काही अगम्य अनपेक्षित गोष्टी घडलेल्या समोर येतील त्या बोइंग कंपनीलाही जाणून घ्यायच्या असतील. ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहेच.

टाटा, बोइंग, एअर इंडिया,कर्मचारी सगळेच काळजीत आहेत.

सौंदाळा's picture

20 Jun 2025 - 5:58 pm | सौंदाळा

गवि
अशा दुर्दैवी अपघातानंतर पुढची प्रोसेस काय असते आणि याचे स्टेकहोल्डर कोण असतात?
एअर इंडीया अधिकारी, विमानाची देखभाल दुरुस्ती करणारी कंपनी, बोईंगचा अधिकारी वर्ग?
या केसमधे इंजिनमधे बिघाड असण्याची शक्यता दिसत आहे, इंजिन कोणत्या कंपनीचे होते? - ती कंपनी पण यात असेल.
जो दोषी असेल त्याच्यावर बाकीचे स्टेकहोल्डर कायदेशीर कारवाई करु शकतात का?
ऑलरेडी प्रोग्रेसमधे असलेल्या ओर्डर्सचे काय होते?
उदा. एअर इंडीयाने बोईंगला दिलेली विमानाची ऑर्डर, किंवा विमानाच्या देखभालीसाठी दिलेले कंत्राट, बोईंगने इंजिन मॅन्युफॅक्चररला दिलेली ऑर्डर.
विमानाचा विमा असेलच पण देखभाल नीट झाली नाही असे सिध्द झाले तर तो क्लेम रिजेक्ट होऊ शकतो का?
असे अनेक प्रश्न मनात आले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2025 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण अनेकांनी उत्तम चर्चा या धाग्यावर केली आहे. आत्तापर्यंत ज्या शक्यता व्यक्त केल्या गेल्या त्यात काही खालील मुद्दे लक्षात येत आहे. १. दोन्ही इंजीनमधे बिघाड. २. दुषित इंधन ( कदाचित पुरवठ्यात बिघाड ) ३. फ्लॅपशिवाय टेकऑफ ( ही शक्यता कमी ) ४. पायलटने चु़कून फ्लॅप्स वर केले. टेक ऑफनंतरही लँडीग गेअर खालीच राहिले हे सामान्य नाही. सहाशे फूटवर जाऊनही ही क्रिया झालेली नाही. विमान अधिक उंचीवर राहिले असते आणि दोन्ही इंजीन्स बंद झाले असते तर, तर रॅट ( ram air turbine ) सुरु राहिले असते आणि विमान सुरक्षित उतरु शकले असते. अर्थात या सर्व जर तरच्या गोष्टी. काही तज्ञांचं म्हणने आहे की रॅट उघडले होते पण ते अधिक उंचावर नसल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. इंजीन बंद झाले तरच ते उघडते असेही वाचनात आले. म्हणजे इंजीन्सची आपली क्षमता गमावली असे वाटते.

आत्तापर्यंत सगळे अंदाज लावून झाले आहेत. ब्लॅकबॉक्स अधिक इंज्यूर आहे, अमेरिकेत त्याचा डेटा रिकव्हरला गेला आहे, असे वाचनात आलेय खरे खोटे माहिती नाही. विमान अपघाताची चौकशी जवळ जवळ आठ एजन्सी करीत आहेत. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हाईस रेकॉर्ड तपासल्यानंतर सत्य बाहेर येईल.

धावपट्टीवर अधिक वेळ घेतला त्यावर पूर्वीच्या प्रतिसादात लिहिले आहे. टेकॉफ दरम्यान वैमानिक त्यांच्या कृती इंजीनमधे बिघाड झाल्याचे निश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक गणित केलेला वेग 'व्हीवन' उच्चारतात. जर 'व्हीवन' मधे बिघाड झाला तर वैमानिक टेकऑफ रद्द करतात. 'आरटीओ' म्हणून ओळखले जाते. (रिजेक्टेड टेक ऑफ) पण तसे इथे काही वाटत नाही.

आत्ता विमान उडाले आहे आणि सहाशेफूट उंचीवर गेले आणि ते खाली खाली येत गेले. 'व्हीवन' नंतर बिघाड झाला तर, वैमानिकास विमान उड्डान सुरु ठेवावे लागते आणि विमान उड्डान रद्द करायचे तर धावपट्टी शिल्लक नसते अशावेळी विमान उडवणे हाच पर्याय होता. विमान उडाल्यानंतर विमान उडवणे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या आत विमान खाली खाली येत गेले. दोन इंजीन असलेले विमान एका इंजीनवर सुरक्षीतपण उतरु शकले असते पण असे दिसते की एकापाठोपाठ इंजीन्स पडले असावेत सर्व पर्याय संपले. इंजीन्स पॉवर फेल झाली आणि यात मानवी चूक किती ते स्पष्ट होईल. विमान कमी उंचीवर होते 'मेमरी अ‍ॅक्शन्स'ला वेळ कमी होता. मेडे कॉलवरुन ते लक्षात येते तेव्हा वैमानिकास विमान स्थिती सुधारण्यास फार संधी नव्हती असे वाटते.

-दिलीप बिरुटे

उत्तम आढावा, सारांश, आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद.

प्रचेतस's picture

22 Jun 2025 - 12:36 pm | प्रचेतस

मला तर तुमच्यापेक्षा सरच विमानतज्ज्ञ आहेत असे आता वाटू लागले आहे.

होय. त्यांनी कसून अभ्यास चालवला आहे.

प्रचेतस's picture

22 Jun 2025 - 12:44 pm | प्रचेतस

त्यांना एखाद्या विमानात पायलटच्या खुर्चीवर बसवले तर ते विमान देखील चालवू शकतील असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2025 - 1:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर जे समृद्ध लेखक आणि जाणकार आहेत त्यात गवि गुरु यांचा वरचा क्रमाकं आहे. जेष्ठ जाणकार गवि विमान विषयातील जाणकार आहेत. विमानविषयक त्यांचे मिपावरील विविध धागे हे अधिक माहितीपूर्ण आणि रोचक आहेत, त्यांच्या विविध लेखांमुळे वाचण्याची लिहिण्याची आणि समजून घेण्याची उत्सुकता लागते. गविंच्या विविध लेख आणि प्रतिसादांनी मिपा समृद्ध झालेलं आहे. स्वतः त्यांनी विमानाचं प्रशिक्षण घेतलेले आहे आणि त्यांचा अभ्यास आहे, त्यामुळे ते मोठे आहेत. गविंविषयी बोलायचं म्हणजे आदराने कानाला हात लावून बोलावे लागते. हं, आता माणूस म्हटला की एवढं तेवढं चालायचंच. थोडी फार खोडी करावी लागते, चिमटे घ्यावे लागतात हे मिपा धोरणानुसार करावे लागते, त्यांनी केलेलं कौतुक हे विद्यार्थ्यांला प्रोत्साहान देणे असते. आभार गविशेठ.

आम्ही जो डेटा इकडे आणतो ते युट्यूब, नॅशल जीऑग्राफ या वाहिन्यांवरील विमान विषयक विविध मालिका, गुगल, एक्सपर्टची मतं आणि ते सगळं ऐकून वाचून आपल्याला काय वाटतं ते आणि मतं.

-दिलीप बिरुटे
(गविंचा नम्र विद्यार्थी )

मारवा's picture

22 Jun 2025 - 4:43 pm | मारवा

माहितीपूर्ण प्रतिसाद !
लिहिते रहा
वाचतोय
पु. ले.शु.

~मारवा

चला आता तो रमेशकुमार कसा वाचला ते शोधू.

प्रचेतसदा यांनी शेवटी एक्सट्रा इनिंग्झ केली आहे.

गामा पैलवान's picture

27 Jun 2025 - 10:23 pm | गामा पैलवान

लोकहो,

ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहेच.

तो कशाला अमेरिकेत पाठवला आता ? जो काही विदा होता तो भारतातल्या भारतात वाचायची काय नेमकी अडचण होती? बोईंग आस्थापानास वाचवण्यासाठी कशावरून नारिंगीपेटीशी छेडाछेडी होणार नाही?

आ.न.,
-गा.पै.

सुक्या's picture

28 Jun 2025 - 1:31 am | सुक्या

गामा
सगळ्याच बाबतीत षडयंत्र असते या मानसिकतेतुन बाहेर या. हा डेटा म्हणजे काही कागदाची बंडले नाहीत की ते गहाळ होतील. त्या ब्लॅक बॉक्स मधला डेटा डाउनलोड केला गेला आहे. त्यावर एकापेक्षा जास्त संस्था काम करतील व रेपोर्ट बनवतील. तोवर धीर धरा.

गवि's picture

28 Jun 2025 - 10:35 am | गवि

सहमत.

तसे तर मग भारतातच विश्लेषण केले तर एअर इंडियाला वाचवण्यासाठी... असेही म्हणता येईल. NTSB ही स्वतंत्र संस्था आहे. सरकारच्या छत्रीखाली नाही. पूर्वी त्यांनी विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे अनेक रिपोर्ट सादर केले आहेत.

गामा पैलवान's picture

29 Jun 2025 - 12:15 am | गामा पैलवान

गवि,

के.व्ही.जे.राव यांनी १० वर्षांपूर्वी मोदींकडे नागरी उड्डाण संचालकांवर ( DGCA ) फौजदारी भरायची विनंती केली होती. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.asianage.com/mumbai/prosecute-dgca-officials-petition-276

सदर बाबतीत प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत होती, तरीही नाउ संचालकांनी एअर इंडिया कडे काणाडोळा केला.

उपरोक्त मामला गंभीर वाटतो का?

आजून एक दुवा : https://www.freepressjournal.in/analysis/ahmedabad-plane-crash-did-dgcas...

आ.न.,
-गा.पै.

गंभीर तर सर्वच आहे. म्हणून NTSB कडे गेल्यास अधिक चांगले ना? त्यांनी अनेक प्रकारच्या विमानांत तांत्रिक दोष असल्याचे देखील अनेक रिपोर्ट यापूर्वी दिले आहेत. अगदी बोईंगसुद्धा.

गामा पैलवान's picture

29 Jun 2025 - 9:38 pm | गामा पैलवान

गवि,

विदा काढण्यात नेमक्या काय अडचणी आहेत? विदा सुलभ प्रकारे का नोंदवला गेला नाही? विदा नोंदणीची मानके काय आहेत? नागरी उड्डयन संचालनालयाने काही मानके ठरवून दिलेली आहेत का? की आपलं नुसतं जे काही बोईंग देतंय त्यात समाधान मानतंय? काहीतरी चर्चा व्हायला हवी ना?

आता हेच बघा की, जी जीईची जोरयंत्रे ( = इंजिन्स ) आहेत ती जीई आस्थापनाकडून अचिरात दूरस्थ निरीक्षित ( = रियल टाईम्ड रिमोटली मॉनिटर्ड ) असतात. ही माहिती कुठल्याही चर्चेत आलेली दिसंत नाही. अपघातग्रस्त विमानाच्या जोरयंत्रांचा काही विदा जाहीर रीत्या उपलब्ध आहे का? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

बाकी, प्रत्येक गोष्ट अमेरिकेत पाठवायचीच कशाला? भारतात जुगाडूंची ( = हॅकर्सची ) काय कमी आहे? वरवर दिसतात ते प्रश्न उघड आहेत. पण आतवरही बरेच प्रश्न आहेत. ते जाहीर चर्चा करून वर खणून आणले पाहिजेत. एकटे मोदी पुरेसे नाहीत. याचसाठी साधकबाधक चर्चा हवीच.

आ.न.,
-गा.पै.

ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहे. बोइंगला केस स्टडीसाठी उपयोगी आहे.
मागे भोपाळ गॅस दुर्घटना झाल्यावर परदेशी संशोधक तिकडे अगोदर पोहोचले आणि विविध सांपल्स गोळा केली होती.

गा. पै. सर्वप्रथम तुमचे पुन्हा स्वागत. सर्व क्षेमकुशल असेल अशी इच्छा.

तुमच्या म्हणण्यात काहीच चुकीचे नाही. चर्चा व्हावीच. म्हणूनच तर हा धागा.

तुम्ही आधी म्हणालात की ब्लॅक बॉक्स अमेरिकेत कशाला पाठवला? त्यामागे बोईंगला वाचवण्याचा सुप्त उद्देश असावा अशी शंका तुम्हाला असावी. तेच भारतात विश्लेषण झाले असते तर एअर इंडियाला पाठीशी घातले जाईल असे कोणी म्हणू शकतो. त्यातल्यात्यात अमेरिकेत हे काम होते आहे आणि NTSB त्यात आहे हे तुलनेत अधिक बरे इतकेच म्हणणे आहे. मुळात भारताच्या बाहेर बॉक्स पाठवायला लागणे ही नामुष्की आहे हे मान्यच. आपण नेपाळच्या लेव्हलला येऊन बसलो आहोत एक प्रकारे.

तुम्ही आधी म्हणालात की ब्लॅक बॉक्स अमेरिकेत कशाला पाठवला? त्यामागे बोईंगला वाचवण्याचा सुप्त उद्देश असावा अशी शंका तुम्हाला असावी. तेच भारतात विश्लेषण झाले असते तर एअर इंडियाला पाठीशी घातले जाईल असे कोणी म्हणू शकतो.

कुणीही कशाला ? खुद्द गामा देखील असा प्रतिवाद करायला आले नसते याची काही शाश्वती देता येत नाही :)

सुक्या's picture

30 Jun 2025 - 9:40 am | सुक्या

गवि,
काहीतरी गल्लत आहे. ब्लॅक बॉक्स अमेरिकेत नाही तर भारतातच आहे असे मला वाटते. एक अठवड्यापुर्वी ब्लॅक बॉक्स आगीमुळे क्षतीग्रस्त झाला आहे म्हणुन तो अमेरिकेला पाठवला जाईल अशी बातमी होती. परंतु मागील १/२ दिवसाच्या बातम्या पाहील्या तर त्यावर भारतातच काम चालु आहे असे दिसते. AAIB व NTSB दोघेही त्याचा डेटा रिकवर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे वाचले होते. बोईंग अजुन ईन्वोल्व नाही असेच दिसत आहे.

वापो मधील ही बातमी व टाईम्स मधील ही बातमी ह्या बाबतीत ब्लॅक बॉक्स अमेरिकेत नाही तर भारतातच (दिल्ली) आहे ह्याची पुष्टी करतात.
वापो
https://www.washingtonpost.com/transportation/2025/06/26/air-india-crash...

टाईम्स
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/all-a-specul...

उत्तम अपडेट. धन्यवाद. उलट सुलट बातम्या येत होत्या काही दिवस.

गामा पैलवान's picture

30 Jun 2025 - 4:57 pm | गामा पैलवान

गवि,

आपण दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. सर्व क्षेमकुशल आहे.

तुम्ही वापरलेला तुलनेने हा शब्द महत्त्वाचा आहे. ती तुलना भारताच्या बाजूने झुको एव्हढीच इच्छा!

आ.न.,
-गा.पै.

स्वधर्म's picture

30 Jun 2025 - 2:30 pm | स्वधर्म

'एकटे मोदी पुरेसे नाहीत' म्हणजे काय? त्यांचा काही थेट संबंध आहे काय? आंम्हाला तरी हे तांत्रिक शोध स्वरूपाचे काम आहे असे वाटत होते पण तेही मोदी करू शकतात आणि फक्त त्यांना खूप कामे असल्याने आता वेळ नाही असे काहीसे आपले म्हणणे आहे किंवा कसे?

गामा पैलवान's picture

2 Jul 2025 - 3:42 am | गामा पैलवान

स्वधर्म,

त्याचं काय आहे की तुम्हांस माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचं प्रकरण आठवंत असेल. माझ्या माहितीनुसार घडलेल्या घटना सांगतो.

तत्कालीन खासदारांनी व्यावसायिक वर्गाचं ( = बिझनेस क्लास ) तिकीट काढलं होतं. ऐन वेळेस एअर इंडियाने विमान बदललं व नव्या विमानात व्या.व. नव्हता. अशा प्रसंगी ग्राहकास सूचित करायचं सौजन्यही ए.इ.ने दाखवलं नाही. खासदार महाशयांनी झक मारीत सामान्य वर्गाने प्रवास केला ( मुंबई ते दिल्ली). प्रवासाच्या शेवटी त्यांनी तक्रार पुस्तिका मागितली. तीही जागेवर नव्हती. त्यामुळे त्यांनी विमानातून उतरावयास नकार दिला.

यावर ए.इ.चे काही कर्मचारी ( विमानातले नव्हे तर जमिनीवरचे ) पिसाळले. त्यांनी खासदार महोदयांची गचांडी धरून उचलबांगडी करायचा प्रयत्न केला. 'कौन समझता हय खुदको, मोदी क्या?' इत्यादि अपमानास्पद शब्द तर वापरलेच, शिवाय धक्काबुक्कीही केली. यावर प्रतिक्रिया म्हणून खासदारांनी एकदोन कानाखाली काढल्या.

या प्रकरणास वार्तामाध्यमांनी तिखटमीठ लावून केवळ खासदारांचा पंचवीस थोबाडीत मारल्याचा दावा नाट्यमयरीत्या पेश केला. यावर ए.इ. की हवाई उड्डयन खात्याने खासदार गायकवाडांवर उड्डाणबंदी घातली. ए.इ. च्या हलगर्जीपणावर कोणीच काही बोलंत नव्हतं.

यावर उपाय म्हणून मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली. ते सरकारी आस्थापन न राहता खाजगी बनलं. कर्णावतीच्या अपघातानंतर वाटतंय की तिथल्या लोकांचं अस्तुत्व ( = अटिट्यूड ) काही बदललेला दिसंत नाही. एकटे मोदी काय करणार, असा मथितार्थ आहे.

आ.न.,
-गा.पै.

>> ए.इ. च्या हलगर्जीपणावर कोणीच काही बोलंत नव्हतं.
यावर उपाय म्हणून मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली. ते सरकारी आस्थापन न राहता खाजगी बनलं.

अच्छा! तर हे मोदी यांनी एकट्याने निर्णय घेऊन केलं असं आपल्याला म्हणायचं आहे तर. त्याने खासदारांच्या मानपानात, सन्मानात फरक पडला असेल व मोदी यांनी *त्यासाठीच* हे सगळे केले असे आहे तर. बाकी देखभाल, सुरक्षा, दर्जा इ. चे काय झाले?

असले निर्णय घेताना शासनात काही पध्दत असावी, काही अभ्यास असावा, असा समज होता. एकटे मोदी पुरेसे असतील व खात्याच्या मंत्र्याचे, अनेक आएएस आधिकार्यांचे काहीच योगदान नसेल तर त्यांना नागरिकांच्या कराच्या पैशावर का पाळायचे? इ. इ. प्रश्न तयार होतात, पण असो.

अभ्या..'s picture

4 Jul 2025 - 11:28 pm | अभ्या..

https://www.misalpav.com/comment/932081#comment-932081
ओह्ह्हो, त्यावेळी झालेला इतका मिपावरचा गोंन्धळ पाहूनच मोदीकाकांनी एअरिंडीया ची मालकी बदलली बहुतेक.
.

गामा पैलवान's picture

30 Jun 2025 - 5:00 pm | गामा पैलवान

कपिलमुनी,

माहितीपूर्ण दुवा आहे. तन्निमित्त आभार!

ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकची व/वा अमेरिकेची जी हानी झाली तिचा बदला तर घेतला गेलेला नाहीये ....? माझी एक कॉन्स्पिरसी कुशंका.

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2025 - 5:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गा पै आलात. स्वागत. आपल्या 'कॉन्स्पिरसी कुशंका' कायम आवडतात.

लिहिते राहावे. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

गामा पैलवान's picture

2 Jul 2025 - 3:28 am | गामा पैलवान

धन्यवाद प्राडॉ! जमेल तशा शंकाकुशंका काढणेत येतील. :-)
आ.न.,
-गा.पै.

ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकची व/वा अमेरिकेची जी हानी झाली तिचा बदला तर घेतला गेलेला नाहीये ....? माझी एक कॉन्स्पिरसी कुशंका.

कोविड लशीचा काही संबंध ?

ह.घ्या. ;-)

भागो's picture

1 Jul 2025 - 12:26 pm | भागो

https://www.rediff.com/news/interview/ai-171-crash-human-error-verdict-k...
Human Error Verdict Keeps Dreamliner's Reputation Intact'

भागो,

दुव्याबद्दल धन्यवाद! अगदी माझ्या मनातल्या शंका सदर निनावी व्यक्तीने विचारल्या आहेत. तिच्या दोन ( इंग्रजी ) मुलाखती आहेत.

भाग १ : https://www.rediff.com/news/interview/ai-171-crash-this-isnt-how-a-crash...
भाग २ : https://www.rediff.com/news/interview/ai-171-crash-human-error-verdict-k...

उद्या यांचं भाषांतर वा सारांश टाकेन म्हणतो.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

4 Jul 2025 - 2:19 am | गामा पैलवान

नमस्कार लोकहो.

रेडिफ संकेतस्थळाच्या श्री. प्रसन्न झोरे यांनी एका निनावी विमानोड्डाण जाणकाराची मुलाखत घेतली. सदर जाणकार व्यक्ती स्वत: सक्रिय वैमानिक आहे. ( निनावी राहण्याचं कारण कळलं असेलंच.) मुलाखत दोन भागांत प्रकाशित झाली आहे. तिचे दुवे वर दिले आहेत. त्यांचा सारांश मांडतो :

----------- मुलाखत सुरू -----------

भाग ०१ :

१.१ विदा काढण्यात उशीर का ? : अपघात १२ जून २०२५ रोजी झालेला आहे. तर उड्डाणविदा मुद्रकातील ( = फ्लाईट डेटा रेकॉर्डर ) उड्डाणविदा पुनर्बिंबित ( = कॉपी ) करण्यासाठी २४ जून का उजाडला ? अन्वेषण चमू स्थापनाची अधिकृत सरकारी घोषणा का केली नाही ?

१.२ वार्ताप्रसृती : भारताच्या विमान अपघात अन्वेषण मंडळाच्या वार्ताप्रसृती ( = प्रेस रिलीज ) बुचकळ्यात टाकणारी आहेत. अन्वेषणााच्या रचनेत अनेक त्रुटी आहेत. अमेरिकी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळास झुकतं माप देण्यात येत आहे.

१.३ कार्यपद्धती : एकदा का अन्वेषण चमू स्थापन झाला की लगेच त्याने सारा पुरावा ताब्यात घ्यायला पाहिजे. चमू स्थापण्यास उशीर केला तर मध्यंतरीच्या काळांत पुरावे बाधित होऊ शकतात. भारतीय विअअम तर्फेअनेक चमू कार्यरत आहेत. त्यापैकी एक चमू सर्व पुरावा गोळा करून दिल्लीत आणणार आहे. ही अन्वेषणाची पद्धत नव्हे.

१.४ अपारदर्शी अन्वेषण रचना : भारतीय विमान अपघात अन्वेषण मंडळाचे सरसंचालक ( = डायरेक्टर जनरल ऑफ एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ) करणार आहेत. ते भारतीय सैनिकी वायुदलाचे निवृत्त अभियंते आहेत. मात्र त्यांना व्यावसायिक बोईंग ७८७ च्या जटिल यंत्रणांची माहिती नाही. विमानाचा खास अभियंता व तसेच सदर विमानप्रकारचे निर्देशित वैमानिक कुठे आहेत ? असे वैशिष्ट्यकर्मी ( = टाईप रेटेड ) जाणकार या चमूत आहेत का ? असले तर त्यांच्या नावांची घोषणा का नाही ? हे प्रकरण इतकं अपारदर्शी का ?

१.५ अमेरिकी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाची नेमकी भूमिका : सदर अन्वेषणात अमेरिकी रावासुम भाग घेणार आहे, असं सरसंचालक म्हणतात. नियामनुसार रावासुम केवळ निरीक्षक आहे व गरज पडल्यास तांत्रिक जाणकारी द्यायला पाहिजे. परंतु अन्वेषणाची रचना मुळी अशीये की. रावासुम जणू तांत्रिक प्रमुखच आहे. आपल्याकडे भारताचे वैशिष्ट्यमंडित जाणकार ( = टाईप रेटेड एक्स्पर्ट्स ) नाहीत का ?

१.६ अन्वेषण क्षमता : विदा खोदण्यासाठी आपण पूर्वी नारिंगी पेट्या ( = ब्लॅक बॉक्सेस ) अमेरिकेत बोईंग कडे पाठवायचो. आता मात्र आपल्याकडे सुसज्ज प्रयोगशाळा आहे. त्यामुळे तुलनेने जलद निकाल अपेक्षित आहे. तो नाही मिळाला तर लोकं नाना शंकाकुशंका काढणार. नियमानुसार भारतीय विअअम ने ३० दिवसांत प्राथमिक अहवाल ( = प्रीलिमिनरी रिपोर्ट ) सादर केला पाहिजे. मात्र पूर्वीपासून मंडळाने हे समयलक्ष्य ( = डेडलाईन ) पाळलेलं नाहीये.

१.७ सरसंचालक शांत का ? : प्रसारमाध्यमांतून विअअम चे सरसंचालक श्री. युगंधर अन्वेषणप्रमुख असल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. तर मग ते पुढे येऊन अन्वेषणाची स्थिती का विशद करीत नाहीत ? ते असे गप्पगप्प का ?

भाग ०२ :

२.१ अन्वेषणाची सचोटी : वैशिट्यमंडित अभियंते वा तसे वैमानिक अन्वेषण समितीत नसल्याने अन्वेषणाची सचोटी ( = इंटेग्रिटी ) धोक्यात आलेली आहे.

२.२ नारिंगी पेट्या कुणीकडे ? : बातम्यांनुसार नारिंगी पेट्या नागरी उड्डयन सरसंचालकांच्या ताब्यात आहेत. पण विदा उकरून काढायची सोय त्यांच्याकडे नाही. ती विअअम च्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहे. शिवाय सदर बातमीत 'टक्कर प्रतिबंधक उपगट' ( = क्रॅश प्रिव्हेन्शन मॉड्यूल ) असा उल्लेख आहे. मात्र सदर नावाची कोणतीही यंत्रणा विमानात नसते. मग अशा अर्धवट बातम्या माध्यमांना दिल्या कोणी ? तांत्रिक ज्ञान नसलेल्या नोकरशहांनी दिलेल्या दिसतात. अशांना इतक्या संवेदनशील पदापासून दूर ठेवलेलं बरं नाही का ?

२.३ पारदर्शित्व व विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी : शासनाने पहिल्याप्रथम एक अधिकृत आदेश काढला पाहिजे. ज्यात अन्वेषणचमूची औपचारिक नियुक्ती केलेली असेल. चमूच्या सदस्यांची नावे उघड करायला पाहिजेत. चमूतले अभियंता व वैमानिक वैशिष्ट्याधारितच हवेत. चमूत एक वैद्यकीय अधिकारीही हवा.

२.४ न्यायालयीन चौकशी : जनतेच्या दिलाशासाठी या अपघाताची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी जाहीर व्हायला हवीच.

२.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता असावी. काही जणांनी विमानातनं डबर ( = डेब्री ) पडतांनाही पाहिलेलं असू शकतं. अशांसाठी खुली दवंडी पिटून जाहीर आवाहन ( = पब्लिक अपील ) का केलं गेलं नाही ? हा अतिशय संशयास्पद मुद्दा आहे. शासन अपघाताविषयी खरोखरंच गंभीर आहे का ? भीषण विमान अपघातानंतर अनेक देश असं आवाहन करतात.

२.६ मूळकारण : अपघाताचं मूळ कारण मानवी चुकीकडे मुद्दाम झुकवलं तर जात नाहीये ? तांत्रिक व रचनात्मक अपेशे ( = टेक्निकल अँड डिझाईन फेल्युअर्स ) यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हेतूपूर्वक खेळी केली जातेय का ? मानवी चूक केवळ वैमानिकाचीच नसते. ती देखभाल, अभियंते, इंधन भरणारे, इत्यादि मध्ये असू शकते. मात्र तिच्यापायी तांत्रिक व रचनात्मक त्रुटींकडे दुर्लक्ष व्हायला नको, बरोबर ?

----------- मुलाखत समाप्त -----------

माझ्या मते २.५ हा साक्षीदारांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा अपघात घडल्यावर मला ताबडतोब ब्येल्मर ( Bijlmer ) अपघाताची आठवण झाली. हे गाव अॅमस्टरडॅममचे उपनगर आहे. येथल्या निवासी संकुलावर एल-अल या इस्रायली विमान आस्थापनाचं मालवाहू बोईंग ७४७ कोसळलं होतं. साल १९९२. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/El_Al_Flight_1862

या अपघातातील महत्त्वाचं डबर म्हणजे पंख व त्याखालील जोरयंत्र एका तलावात पडतांना काही लोकांनी बघितलं होतं. जाहीर आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला. पुढे याच अवशेषांच्या सहाय्याने अपघाताचं मूळ कारण शोधता आलं. त्यानुसार जोरयंत्र पंखापासून अचानकपणे विलग होऊन तुटून पडलं. पडतांना सोबत पंखाचा एक भागही ओरबाडून घेतला. विमान वेगात असतांना पुरेशी उचल ( = लिफ्ट ) होती, पण उतरण्यासाठी वेग कमी केल्यावर ही उचल झटकन शून्यावर आली व विमान अनियंत्रित होऊन कोसळलं.

सांगायचा मुद्दा असाय की, लोकांना जाहीर आवाहन करून त्यांच्याकडून झपाट्याने साक्षी नोंदवायला हव्यात. पण त्या आघाडीवर या घडीस तरी सामसूम दिसते आहे.

वाचकांनी विचार करून अधिकाधिक प्रश्न विचारावेत हा माझ्या या संदेशामागे हेतू आहे.

आपला नम्र,
-गामा पैलवान


२.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता असावी. काही जणांनी विमानातनं डबर ( = डेब्री ) पडतांनाही पाहिलेलं असू शकतं. अशांसाठी खुली दवंडी पिटून जाहीर आवाहन ( = पब्लिक अपील ) का केलं गेलं नाही ? हा अतिशय संशयास्पद मुद्दा आहे. शासन अपघाताविषयी खरोखरंच गंभीर आहे का ? भीषण विमान अपघातानंतर अनेक देश असं आवाहन करतात.


हे म्हणजे इतिहासात नापास झालेल्याला लोक सेवा आयोगाच्या परीक्षेला बसविण्यासारखे आहे. यातून काही माहिती हाती लागेल की नाही ते माहित नाही पण तुमच्या सारख्या शंकासुराचे आयतेच फावेल.

अवांतर : वैयक्तीक होते म्हणून माफ करा पण तुम्ही घरगुती व्यवहारांमधे देखील असाच दृष्टिकोण बाळगता काय ?

गामा पैलवान's picture

4 Jul 2025 - 6:01 pm | गामा पैलवान

धर्मराजमुटके,

१.

हे म्हणजे इतिहासात नापास झालेल्याला लोक सेवा आयोगाच्या परीक्षेला बसविण्यासारखे आहे

हे उदाहरण कसं लागू पडतं ते कळलं नाही.

२.

यातून काही माहिती हाती लागेल की नाही ते माहित नाही पण तुमच्या सारख्या शंकासुराचे आयतेच फावेल.

ब्येल्मर अपघाताचं मूळ कारण जनतेने दिलेल्या प्रतिसादामुळेच उघडकीस येऊ शकलं. बाकी, माझ्यासारख्या शंकसुरांचं फावायला हवंच. यालाच शासनावर दबाव टाकणे म्हणतात.

३.

अवांतर : वैयक्तीक होते म्हणून माफ करा पण तुम्ही घरगुती व्यवहारांमधे देखील असाच दृष्टिकोण बाळगता काय ?

आजीबात नाही. कारण की माझ्या घरगुती व्यवहारांत दोन-अडीचशे सोडा, एकही निरपराध मनुष्य दगावंत नाही.

आपला नम्र,
-गामा पैलवान

वाचलेला प्रवासी रमेशकुमार कसा बाहेर पडला कुणीच सांगत नाही.
विमान इमारतीच्या गच्चीवर पडलंय मग हा चालत कसा गेला बाहेर? ११ए सीट तर पुढे असते.

लोकहो,

या अपघाताचं अन्वेषण बऱ्यापैकी पूर्ण झाल्याच्या बातम्या ( वा अफवा ) काही उच्चपदस्थ व/वा जाणकारांच्या वर्तुळांत फिरताहेत. मी वाचलेल्या वार्तांनुसार दोन शक्यता प्रबळ दिसतात.

१. वैमानिकाची चूक : या उपपत्तीनुसार ( = थियरी ) एक जोरयंत्र बंद पडलं व एक चालू होतं. वैमानिकांनी चुकून चालू असलेलं यंत्र बंद केलं. त्यांच्या पडद्यावर जे बंद पडलेलं दाखवलं जात होतं, ते नेमकं चालू असलेलं होतं. ही गफलत देखभाल केंद्राकडून झालेली असू शकते. संदर्भ ( इंग्रजी दुवा ) : https://www.youtube.com/watch?v=q_3tzn50dYM

२. मुद्दाम घडवलेला घातपात : या उपपत्तीनुसार संगणक व इतर प्रसंस्थांच्या ज्या कूटाज्ञा ( = कोडींग ) असतात त्यांच्यात कोणीतरी एक विषाणू सोडला. वा सक्रिय केला. त्या विषाणूने वैमानिकांचं न ऐकता स्वत:हून दोन्ही जोरयंत्रे बंद केली. संदर्भ : https://www.youtube.com/watch?v=QGixhVwA6DA

मी या दोन्ही उपपत्तींबद्दलचं माझं मत राखून ठेवतो आहे. अधिकृत शासकीय भाष्याची वाट पाहेन म्हणतो.

आ.न.,
-गा.पै.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

7 Jul 2025 - 2:34 pm | हणमंतअण्णा शंकर...

विजय रुपाणी (गुजरातचे माजी मुख्यमंत्री) या प्लेन मधून प्रवास करत होते.

(हे एक फॅक्चुअल स्टेटमेंट आहे)

कारण बोईंगमधला बिघाड नसून एंजिनाचं ईंधनच बंद करणारं बटण फिरवलं होतं. आणि त्यातली चर्चा ब्लॅक बॉक्समधून कळली.
" तू इंधन बंद का केलंस?"
" मी नाही केलं."
.........
मग ती दोन्ही बटणं फिरवण्यात आली तरी तेवढा वेळच नव्हता आणि विमान खाली आदळलं.
आता बहुतेक ट्रकचा दुसरा ड्रायवर मागच्या बाकड्यावर झोपतो तसं विमानाच्या कोपायलटला मागे झोपवणार.

कपिलमुनी's picture

12 Jul 2025 - 8:05 am | कपिलमुनी

इंजिनला होणारा इंधन पुरवठा बंद झाल्यावर हा प्रश्न एका पायलटने दुसऱ्याला विचारला.

दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा स्वतंत्र चालू बंद करावा लागतो. असा सहज बटण फिरवला आणि बंद केले होत नाही.. आणि एकाच वेळी दोन्ही इंधन पुरवठा बटण द्वारे बंद झाला हे सिद्ध जाले नाहीये

कपिलमुनी's picture

12 Jul 2025 - 8:03 am | कपिलमुनी
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2025 - 8:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल...आभार.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2025 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात (वृत्तपत्र दुवा) नमूद करण्यात आले आहे.

चला आमचा अंदाज अभ्यास नसतानाही, व्हीडीयोज, गूगल आणि इतर साधने यावरुन बरोबर आला.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

12 Jul 2025 - 8:41 am | आग्या१९९०

इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन पुरवठा खंडीत होण्याचा फरक फक्त एक सेकंदाचा होता. पुढील १० सेकंदात दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा पूर्ववत झाला होता.

किंचित बदल. दहा सेकंदांत पुरवठा पूर्ववत झाला नव्हता तर साधारण दहा सेकंदांत फ्युएल कट ऑफ स्विच एकामागून एक दोन्ही इंजिन्ससाठी पुन्हा ऑन केली गेली. क्रॅश होण्याच्या वेळेपर्यंत एक इंजिन हळूहळू सुरू होत आले होते पण अद्याप पुरेसा थ्रस्ट उत्पन्न करू शकले नव्हते.

भागो's picture

12 Jul 2025 - 11:53 am | भागो

मी हे इंग्लिश मध्ये लिहितो आहे/उधृत करत आहे.क्षमस्व
N THE 1980s a new generation of high-speed computers will appear with switching devices in the electronic components which are so small they are approaching the molecular microworld in size. Old computers were subject to “hard errors”—a malfunction of a part, like a circuit burning out or a broken wire, which had to be replaced before the computer could work properly. But the new computers are subject to a qualitatively different kind of malfunction called “soft errors” in which a tiny switch fails during only one operation—the next time it works fine again. Engineers cannot repair computers for this kind of malfunction because nothing is actually broken.

Could the God that plays dice trigger a nuclear holocaust by a random error in a military computer?
Can quantum indeterminacy affect our lives?
The answer is yes—as the example of the soft errors in computers shows.

Atomic events which are completely unpredictable deeply influence our lives—we are in the hands of the God that plays dice.

सहज बटण फिरवलं आणि बंद केले होत नाही.. Two step switch असतातात प्रत्येक एंजिनासाठी.
हेच इतर पायलटसनी सांगितलं मग कुणी बंद केलं?
........
अशा विविध शक्यता इकडे वर्तवणाऱ्यांचे कौतूक.

भागो's picture

12 Jul 2025 - 3:43 pm | भागो

हेल्लो
मी हार्ड स्विचेस बद्दल बोलत नाहीये. ज्याना electronics आणि कवान्टम टनेलिंग ची कल्पना आहे त्यांना बरोबर समजेल.

गामा पैलवान's picture

12 Jul 2025 - 10:30 pm | गामा पैलवान

भागो,

माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही वर्णिलेले दोष जालप्रक्षेपणात ( = नेटवर्क ट्रान्समिशन ) उद्भवू शकतात. म्हणून त्यांत विचलनसुधार प्रणाली ( = एरर करेक्शन अल्गोरिदम ) राबवली जाते.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

12 Jul 2025 - 10:27 pm | गामा पैलवान

लोकहो,

वर दिलेला अहवाल वाचल्यावर एक प्रश्न उरतोच : ऐन उड्डाणसमयी इंधन बंद कोणी केलं?

हा गणनदोष ( = सॉफ्टवेअर बग ) होता की घातपाती विषाणू ?

आ.न.,
-गा.पै.

इंधन कट ऑफ व्हॉल्व सारखी अत्यंत क्रिटिकल यंत्रणा आपोआप कार्यरत होत नसते. किंवा चुकून जाता तिजवर जाता हात पडला किंवा मोबाईल पडला आणि झाला कट ऑफ, असे होत नाही. त्यासाठी स्प्रिंग लोडेड सिस्टीम असते. आधी नॉब बाहेर खेचून मग त्या अवस्थेत खाली वळवला / किंवा वर वळवला आणि जागी पोचल्यावर खटका सोडला कीच हे नॉब चालू बंद होतात. शिवाय तरीही त्यावर काही पडू नये म्हणून त्याच्या दोन्ही बाजूंना एक एक कमानाकृती अडसर असतो. हे सर्व पार करून काही जादूने ते कट ऑफ झाले तरी दोन्ही वेगवेगळे करावे लागतात. एकत्र करणे अवघड.

आता इतक्या सगळ्या गोष्टी बायपास होऊन फ्युएल शट ऑफ कसा घडला हे खरेच अनाकलनीय आहे.

बरे, ते व्हॉल्व आधीपासून बंदच होते म्हणावे तर तसेही नाही. टेक ऑफ होताच ते ऑन चे ऑफ झाले. एक सेकंदाचा फरक तूर्त सोडून द्यावा. कारण इनपुट रिफ्रेश रेट प्रत्येक उपकरणाचा वेगळा असतो (स्टेटस रेकॉर्ड करण्याची वारंवारिता).

यातून नक्कीच कोणतातरी वीक पॉईंट बाहेर येणार. नॉब मधल्याच कुठल्या पोझिशनवर अडकून राहू शकले आणि मग धक्क्याने ते खाली सटकले असे काही होणे तत्वत: सिद्ध झाले तर बोईंगला फटका आहे.

कपिलमुनी's picture

12 Jul 2025 - 11:08 pm | कपिलमुनी

RAT सिस्टिम चालू झाली होती.. म्हणजे काहीतरी तारिक बिघाड होता.. पायलट ने एकाच वेळी दोन्ही स्विच manually बंद करणे अशक्य वाटते

शाम भागवत's picture

13 Jul 2025 - 10:06 am | शाम भागवत

१७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन एव्हीएशन रेग्युलेटरीने सगळ्या जगाला उद्देशून एक सूचनावजा संदेश प्रसारित केला होता की, ड्रीम लाायनर ७८७ चा फ्युएल स्वीच हा स्वताहून बंद होऊ शकतो.

शाम भागवत's picture

13 Jul 2025 - 10:08 am | शाम भागवत
कंजूस's picture

13 Jul 2025 - 5:01 pm | कंजूस

हंम.

आता बोला. दोन सरावलेले वैमानिक इंधन बंद करण्याची चूक करणार नाहीत. शिवाय ते विमान या अगोदर पारीस दिल्ली अहमदाबाद असं उडत आलं होतं. अहमदाबादला काय त्यातला एक दारू ढोसून आला असेल? म्हणजे बोइंग कंपनीच्या विमानांची विश्वसनीयता संपली आहे असं म्हणावे लागेल. विमाने परत करा आणि पैसे मागा.

स्वधर्म's picture

14 Jul 2025 - 2:53 pm | स्वधर्म

बोईंग कंपनीने ही अ‍ॅडव्हायसरी जारी केली व त्यानंतर अनेक कंपन्यांनी हे स्वीचेस बदलून घेतले. या विशिष्ट विमानाचे हे स्वीचेस बदलून घेतले होते किंवा कसे, याचा तपशील अहवालात आहे का?
त्यांनी वैमानिकांच्या संभाषणातील ती विशिष्ट दोन वाक्येच का जाहीर केली? संपूर्ण संभाषण सर्वांसाठी का उपलब्ध करून दिले नाही?

तसेचः
विमानात बिघाड - बोईंग व जीई यांचेसाठी गैरसोईचा
देखभाल समस्या - एअर इंडीयासाठी गैरसोईची
घातपात - सरकार व इतर सुरक्षा संस्थांसाठी गैरसोईचा
वैमानिकांची चूक - सर्वांसाठी सोईची. शिवाय ते बाजू मांडायला हजर नाहीत.

त्यामुळे अहवाल वैमानिकांचीच चूक असावी याकडे झुकतोय का असे वाटते? अहवालाच्या दर्जावर अनेक जण प्रश्न विचारत आहेत.

गामा पैलवान's picture

14 Jul 2025 - 2:14 am | गामा पैलवान

लोकहो,

गेले काही दिवस केरळात अनंतपूर-तिरू येथे ब्रिटीश शाही नौदलाचं एक एफ-३५बी हे विमान अडकून पडलं होतं. अधिक माहिती : https://www.loksatta.com/explained/uk-f-35b-lightning-jet-stranded-keral...

तर वदंतेनुसार हे विमान भारताच्या किनाऱ्याजवळ आल्यावर भारतीय वायुदलाने त्यास तिरू-अनंतपूर येथे सक्तीने उतरावयास भाग पाडलं. उतरल्यावर भारतीय जुगाडूंनी ते कूटप्रक्रियेद्वारे अप्रवेश्य ( = इनअॅक्सेसिबल बाय हॅकिंग ) केलं. त्याच्या अमेरिकी निर्मात्यांना आव्हान दिलं की हे विमान पुनर्योजनशील बनवून घेऊन जा म्हणून.

यावर उत्तर म्हणून बोईंग आस्थापनास गळ घालून भारताचं प्रवासी विमान मुद्दामून पाडलं. ड्रीमलायनरच्या देखभालीत असंख्य त्रुटी आहेत. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात अशी परिस्थिती आहे. बोईंग विमानाच्या असंख्य यंत्रणांना जे मार्दव्य ( = सॉफ्टवेअर ) व वर्मव्य ( = फर्मवेअर ) लागतं त्यावर आवृत्तीनियंत्रण ( = व्हर्शन कंट्रोल ) यथातथाच आहे. आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल घडवून आणले यांचा हिशोब लागणे अवघड. अशा वेळेस विषाणू घुसवून ऐन वेळेस सक्रिय करता येतो.

माझ्या मते सदर प्रकरणाचा हा उपसंहार ( = क्लोजर ) आहे.

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

14 Jul 2025 - 11:17 am | कपिलमुनी

एवढ्या उच्च प्रतीचा गांजा कुठे मिळाला ?

आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल घडवून आणले यांचा हिशोब लागणे अवघड.
आमच्या बथ्थड कंपणीत पण सॉफ्ट्वेयर वर्जन कंत्रोल आहे. कोणी ध चा म केला की जगाला कळते. बोईंग मधे ते अजुनही नाही हे ऐकुन मला माझ्या बथ्थड कंपणीचा अभिमान वाटला ..

बाकी धागा जरा सिरियस आहे म्हणुन जास्त पाचकळ विनोद करत नाही.

सुक्या,

बोईंगमधील गुणवत्तानियंत्रणाचे धिंडवडे इथे काढले आहेत ( इंग्रजी चलचित्र ) : https://www.youtube.com/watch?v=pz5rX6Whj4o

सदर चलचित्रात २ मिनिटांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन वेस्ट याने कबुली दिली आहे की, वर्षानुवर्षे आम्ही कामं ठीक करण्यापेक्षा काम पूर्ण दाखवायला ( विमान पटापट बाहेर काढायला ) अधिक प्राधान्य दिलं.

हे यांत्रिकीय घटकांच्या गुणवत्तेसंबंधी ( = मेकॅनिकल कंपोनंट्स क्वालिटी ) आहे. मार्दव्य व वर्मव्य ( = सॉफ्टवेअर व फर्मवेअर ) यांत यांत्रिक घटकांपेक्षा अधिक त्रुटी सापडतात, असा जगांत सार्वत्रिक अनुभव आहे.

ऐन उड्डाणात विमान वर चढवतांना अलास्का एअरलाईन्सच्या विमानाचा दरवाजा उडून गेला होता. जर बोईंग यांत्रिक घटकांविषयी इतकं बेफिकीर आहे, तर वर्मव्याविषयी किती गंभीर असेल? बोईंग मार्दव्य व वर्मव्याच्या आवृत्ती नियंत्रणाच्या नोंदी ( = व्हर्शन कंट्रोल लॉग्ज ) भारतीय अन्वेषकांना देणार का ?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

14 Jul 2025 - 8:13 pm | गामा पैलवान

मुनीवर,

बोईंगने प्रवाशांच्या सुरक्षेऐवजी नफ्यास प्राधान्य दिलं आहे. ७३७-मॅक्स च्या अपघातांतनं ही बाब पुरेशी स्पष्ट झाली आहे. शिवाय बोईंगमध्ये अनेक आर्थिक घोटाळेही झालेले आहेत. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://nlpc.org/corporate-integrity-project/boeing-a-legacy-of-corrupti...

बोईंगची संथ घसरण कशी घडून आली यावर इंग्रजी लेख : https://www.msnbc.com/opinion/msnbc-opinion/boeing-senate-hearings-capit...

महत्त्वाचे परिच्छेद :

The idea was that the airline manufacturers knew far more about their business than the government, and they would never want to make shoddy planes for fear of reputational damage. So, the argument went, these companies should effectively be allowed to regulate themselves. By the time the 737 Max disasters came around, much of Boeing’s regulatory oversight was being undertaken ‘within a company unit inside Boeing’.

The FAA still managed to predict the problems with the MCAS, estimating that the system could cause as many as 15 crashes over 30 years . But they did nothing. In his book on the debacle, “Flying Blind,” Bloomberg reporter Peter Robinson cites a Boeing manager who stated that ‘people will have to die before Boeing will change things.’

हे भयावह आहे. पैशांसाठी कुठल्याही थरास जाणारी लोकं आहेत ही. यांच्यावर विसंबून आपण विमानात बसायचं का ?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

15 Jul 2025 - 12:11 am | गामा पैलवान

स्वधर्म,

त्यांनी वैमानिकांच्या संभाषणातील ती विशिष्ट दोन वाक्येच का जाहीर केली? संपूर्ण संभाषण सर्वांसाठी का उपलब्ध करून दिले नाही?

मी ऐकलंय की 'It's locked in' असं कोणीतरी वैमानिक म्हणाला. पूर्ण संभाषण असं असावं :

"Why did you switched off the fuel?"
"I did not do that. It's locked in."

हे लॉक्ड इन नेमकं काय आहे ? हे संगणकाने केलं होतं का ? तर मग नरारूढ्य ( = मॅन्युअल ओव्हरराईड ) का दिलेलं नव्हतं ? असे प्रश्न उपस्थित होतात.

आ.न.,
-गा.पै.

गवि's picture

15 Jul 2025 - 3:28 am | गवि

मी ऐकलंय की 'It's locked in' असं कोणीतरी वैमानिक म्हणाला.

कुठे ऐकले?

या संदर्भात जर कोणी ते शब्द वापरले असतील तर ते अशा खटक्यांच्या विशिष्ट रचनेशी संबंधित आहेत. वर अन्यत्र वर्णन केले आहे स्प्रिंग लोडेड नॉब बाहेर ओढून स्थिती बदलून परत आत अडकून ती पोझिशन लॉक होणे. बाह्य धक्क्यांनी ही बटणे दाबली जाऊ नयेत यासाठी केलेली रचना.

गामा पैलवान's picture

15 Jul 2025 - 1:54 am | गामा पैलवान

लोकहो,

बोईंगच्या घसरत्या गुणवत्तेविषयी पीटर रॉबिनसन या पत्रकाराने फ्लाईंग ब्लाईंड नामे इंग्रजी पुस्तक लिहिलं आहे. त्याचा अल्प परिचय :
https://i.postimg.cc/50Gbw37S/boeing-woes.jpg

पुस्तक मिळवून वाचायचा बेत आहे.

आ.न.,
-गा.पै.

फ्लेमआउट आणि रीस्टर्ट फेल्युअर
असे काही झाले असावे का?

लोकहो,

एक अत्यंत गंभीर तथ्य उजेडांत आलं आहे.

गेल्या पाच वर्षांत भारतातील ६५ विमानांचे जोरे ऐन उड्डाणात किंवा हवेत असताना बंद पडले. याचा अर्थ दर महिन्याला किमान एक विमान जोऱ्या बंद पडतो. सर्व प्रकरणांमध्ये, वैमानिक एकाच जोऱ्यावर जवळच्या विमानतळावर विमान उतरवू शकले. हा प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे.

संबंधित बातमी : https://divyamarathi.bhaskar.com/national/news/65-aircraft-engines-faile...

या बातम्या जाहीर का होत नाहीत ? प्रत्येक आपत्कौल ( = May Day Call ) जाहीर केलाच पाहिजे, असा नियम व्हायला हवा. तसंच प्रत्येक आपत्कौलावर जाहीर चर्चाही व्हायला हवी.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

16 Jul 2025 - 1:10 pm | गामा पैलवान

लोकहो,

मजकुरी भयपट बघायचाय ? इथे इंग्रजी मजकूर पीडीएफ आहे : https://drive.google.com/file/d/1jg758YHWz66CmaKo1R5Kgqiz6SZTQVDb/

सदर पीडीएफ Flying Blind या पुस्तकाचा सारांश आहे. त्याच्या पीडीएफ पान क्रमांक ८२ पासून अखेरच्या पान क्रमांक १६७ पर्यंत प्रश्नोत्तरे आहेत. घ्या एकेक वाचायला. अक्षर मोठं असल्याने पटकन वाचून होतील.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

16 Jul 2025 - 7:16 pm | गामा पैलवान

गवि,

कुठे ऐकले?

ते लॉक्ड इन नसून आऊट आहे. चुकीबद्दल क्षमस्व.

ते या इथे ऐकलं : https://www.youtube.com/watch?v=QGixhVwA6DA

सदर संभाषण ११ मिनिटे ४० सेकंदांनी आहे.


Likely Captain : "Engine is not responding. Confirm settings."
Another voice : "All set. Nothing is changing",
Same voice : "It's not us. It's locked out."

याची विश्वासार्हता काय ते माहीत नाही. म्हणून 'ऐकलंय' म्हणजे 'ऐकीव माहिती' असं म्हणालो.

आ.न.,
-गा.पै.

खरंतर या अहवालामध्ये तुटक माहिती टाकून सर्वांना संभ्रमात टाकायचं काम केलंय.
अजून बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत.
गविंना एक शंका. रॅम बाहेर यायला विद्युत पॉवर कमी पडायला हवीय. पण ईंजिन बंद केल्यावर त्याचं आरपीएम कमी व्हायलाच बराच वेळ लागेल आणि तेवढ्या वेळासाठी ते नक्कीच विद्युत पॉवर आरामात देईल. या अपघातात रॅम बाहेर यायला वेळच लागला नाहीये. नक्की रॅम लगेचच बाहेर यावा अशी रचना असते कां ?

बराच वेळ लागणार नाही. काही सेकंदाचा फरक असेल पॉवर कट होण्यात. अहवालात मोघम माहिती आहे. अंतर, उंची आकडे देऊन स्पष्ट लिहिलेले नाही.