✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

ग
गवि यांनी
गुरुवार, 06/12/2025 - 16:13  ·  लेख
लेख
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं. इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा. कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते. ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे. अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात. काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार. त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं. हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर. अधिक अपडेट इथे करत राहू.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
43697 वाचन

💬 प्रतिसाद (188)

प्रतिक्रिया

अगदी अस्सल माहितीबद्दल

कंजूस
Fri, 06/20/2025 - 13:57 नवीन
अगदी अस्सल माहितीबद्दल धन्यवाद गवि. तर तांत्रिक विषय हा इथे संपला आहे हे मी समजतो. काही अगम्य अनपेक्षित गोष्टी घडलेल्या समोर येतील त्या बोइंग कंपनीलाही जाणून घ्यायच्या असतील. ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहेच. टाटा, बोइंग, एअर इंडिया,कर्मचारी सगळेच काळजीत आहेत.
  • Log in or register to post comments

गवि

सौंदाळा
Fri, 06/20/2025 - 17:58 नवीन
गवि अशा दुर्दैवी अपघातानंतर पुढची प्रोसेस काय असते आणि याचे स्टेकहोल्डर कोण असतात? एअर इंडीया अधिकारी, विमानाची देखभाल दुरुस्ती करणारी कंपनी, बोईंगचा अधिकारी वर्ग? या केसमधे इंजिनमधे बिघाड असण्याची शक्यता दिसत आहे, इंजिन कोणत्या कंपनीचे होते? - ती कंपनी पण यात असेल. जो दोषी असेल त्याच्यावर बाकीचे स्टेकहोल्डर कायदेशीर कारवाई करु शकतात का? ऑलरेडी प्रोग्रेसमधे असलेल्या ओर्डर्सचे काय होते? उदा. एअर इंडीयाने बोईंगला दिलेली विमानाची ऑर्डर, किंवा विमानाच्या देखभालीसाठी दिलेले कंत्राट, बोईंगने इंजिन मॅन्युफॅक्चररला दिलेली ऑर्डर. विमानाचा विमा असेलच पण देखभाल नीट झाली नाही असे सिध्द झाले तर तो क्लेम रिजेक्ट होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न मनात आले.
  • Log in or register to post comments

अजून काही मतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/22/2025 - 12:14 नवीन
आपण अनेकांनी उत्तम चर्चा या धाग्यावर केली आहे. आत्तापर्यंत ज्या शक्यता व्यक्त केल्या गेल्या त्यात काही खालील मुद्दे लक्षात येत आहे. १. दोन्ही इंजीनमधे बिघाड. २. दुषित इंधन ( कदाचित पुरवठ्यात बिघाड ) ३. फ्लॅपशिवाय टेकऑफ ( ही शक्यता कमी ) ४. पायलटने चु़कून फ्लॅप्स वर केले. टेक ऑफनंतरही लँडीग गेअर खालीच राहिले हे सामान्य नाही. सहाशे फूटवर जाऊनही ही क्रिया झालेली नाही. विमान अधिक उंचीवर राहिले असते आणि दोन्ही इंजीन्स बंद झाले असते तर, तर रॅट ( ram air turbine ) सुरु राहिले असते आणि विमान सुरक्षित उतरु शकले असते. अर्थात या सर्व जर तरच्या गोष्टी. काही तज्ञांचं म्हणने आहे की रॅट उघडले होते पण ते अधिक उंचावर नसल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. इंजीन बंद झाले तरच ते उघडते असेही वाचनात आले. म्हणजे इंजीन्सची आपली क्षमता गमावली असे वाटते. आत्तापर्यंत सगळे अंदाज लावून झाले आहेत. ब्लॅकबॉक्स अधिक इंज्यूर आहे, अमेरिकेत त्याचा डेटा रिकव्हरला गेला आहे, असे वाचनात आलेय खरे खोटे माहिती नाही. विमान अपघाताची चौकशी जवळ जवळ आठ एजन्सी करीत आहेत. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हाईस रेकॉर्ड तपासल्यानंतर सत्य बाहेर येईल. धावपट्टीवर अधिक वेळ घेतला त्यावर पूर्वीच्या प्रतिसादात लिहिले आहे. टेकॉफ दरम्यान वैमानिक त्यांच्या कृती इंजीनमधे बिघाड झाल्याचे निश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक गणित केलेला वेग 'व्हीवन' उच्चारतात. जर 'व्हीवन' मधे बिघाड झाला तर वैमानिक टेकऑफ रद्द करतात. 'आरटीओ' म्हणून ओळखले जाते. (रिजेक्टेड टेक ऑफ) पण तसे इथे काही वाटत नाही. आत्ता विमान उडाले आहे आणि सहाशेफूट उंचीवर गेले आणि ते खाली खाली येत गेले. 'व्हीवन' नंतर बिघाड झाला तर, वैमानिकास विमान उड्डान सुरु ठेवावे लागते आणि विमान उड्डान रद्द करायचे तर धावपट्टी शिल्लक नसते अशावेळी विमान उडवणे हाच पर्याय होता. विमान उडाल्यानंतर विमान उडवणे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या आत विमान खाली खाली येत गेले. दोन इंजीन असलेले विमान एका इंजीनवर सुरक्षीतपण उतरु शकले असते पण असे दिसते की एकापाठोपाठ इंजीन्स पडले असावेत सर्व पर्याय संपले. इंजीन्स पॉवर फेल झाली आणि यात मानवी चूक किती ते स्पष्ट होईल. विमान कमी उंचीवर होते 'मेमरी अ‍ॅक्शन्स'ला वेळ कमी होता. मेडे कॉलवरुन ते लक्षात येते तेव्हा वैमानिकास विमान स्थिती सुधारण्यास फार संधी नव्हती असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

उत्तम आढावा, सारांश, आणि

गवि
Sun, 06/22/2025 - 12:22 नवीन
उत्तम आढावा, सारांश, आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला तर तुमच्यापेक्षा सरच

प्रचेतस
Sun, 06/22/2025 - 12:36 नवीन
मला तर तुमच्यापेक्षा सरच विमानतज्ज्ञ आहेत असे आता वाटू लागले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

होय. त्यांनी कसून अभ्यास चालवला

गवि
Sun, 06/22/2025 - 12:38 नवीन
होय. त्यांनी कसून अभ्यास चालवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्यांना एखाद्या विमानात

प्रचेतस
Sun, 06/22/2025 - 12:44 नवीन
त्यांना एखाद्या विमानात पायलटच्या खुर्चीवर बसवले तर ते विमान देखील चालवू शकतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि गुरु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/22/2025 - 13:06 नवीन
मिपावर जे समृद्ध लेखक आणि जाणकार आहेत त्यात गवि गुरु यांचा वरचा क्रमाकं आहे. जेष्ठ जाणकार गवि विमान विषयातील जाणकार आहेत. विमानविषयक त्यांचे मिपावरील विविध धागे हे अधिक माहितीपूर्ण आणि रोचक आहेत, त्यांच्या विविध लेखांमुळे वाचण्याची लिहिण्याची आणि समजून घेण्याची उत्सुकता लागते. गविंच्या विविध लेख आणि प्रतिसादांनी मिपा समृद्ध झालेलं आहे. स्वतः त्यांनी विमानाचं प्रशिक्षण घेतलेले आहे आणि त्यांचा अभ्यास आहे, त्यामुळे ते मोठे आहेत. गविंविषयी बोलायचं म्हणजे आदराने कानाला हात लावून बोलावे लागते. हं, आता माणूस म्हटला की एवढं तेवढं चालायचंच. थोडी फार खोडी करावी लागते, चिमटे घ्यावे लागतात हे मिपा धोरणानुसार करावे लागते, त्यांनी केलेलं कौतुक हे विद्यार्थ्यांला प्रोत्साहान देणे असते. आभार गविशेठ. आम्ही जो डेटा इकडे आणतो ते युट्यूब, नॅशल जीऑग्राफ या वाहिन्यांवरील विमान विषयक विविध मालिका, गुगल, एक्सपर्टची मतं आणि ते सगळं ऐकून वाचून आपल्याला काय वाटतं ते आणि मतं. -दिलीप बिरुटे (गविंचा नम्र विद्यार्थी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माहितीपूर्ण प्रतिसाद!

मारवा
Sun, 06/22/2025 - 16:43 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद ! लिहिते रहा वाचतोय पु. ले.शु. ~मारवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चला आता तो रमेशकुमार कसा

कंजूस
Sun, 06/22/2025 - 15:31 नवीन
चला आता तो रमेशकुमार कसा वाचला ते शोधू. प्रचेतसदा यांनी शेवटी एक्सट्रा इनिंग्झ केली आहे.
  • Log in or register to post comments

अमेरिकेत का पाठवली नारिंगी पेटी ?

गामा पैलवान
Fri, 06/27/2025 - 22:23 नवीन
लोकहो, ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहेच. तो कशाला अमेरिकेत पाठवला आता ? जो काही विदा होता तो भारतातल्या भारतात वाचायची काय नेमकी अडचण होती? बोईंग आस्थापानास वाचवण्यासाठी कशावरून नारिंगीपेटीशी छेडाछेडी होणार नाही? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

गामा

सुक्या
Sat, 06/28/2025 - 01:31 नवीन
गामा सगळ्याच बाबतीत षडयंत्र असते या मानसिकतेतुन बाहेर या. हा डेटा म्हणजे काही कागदाची बंडले नाहीत की ते गहाळ होतील. त्या ब्लॅक बॉक्स मधला डेटा डाउनलोड केला गेला आहे. त्यावर एकापेक्षा जास्त संस्था काम करतील व रेपोर्ट बनवतील. तोवर धीर धरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

सहमत.

गवि
Sat, 06/28/2025 - 10:35 नवीन
सहमत. तसे तर मग भारतातच विश्लेषण केले तर एअर इंडियाला वाचवण्यासाठी... असेही म्हणता येईल. NTSB ही स्वतंत्र संस्था आहे. सरकारच्या छत्रीखाली नाही. पूर्वी त्यांनी विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे अनेक रिपोर्ट सादर केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मामला किती गंभीर मानवा ?

गामा पैलवान
Sun, 06/29/2025 - 00:15 नवीन
गवि, के.व्ही.जे.राव यांनी १० वर्षांपूर्वी मोदींकडे नागरी उड्डाण संचालकांवर ( DGCA ) फौजदारी भरायची विनंती केली होती. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.asianage.com/mumbai/prosecute-dgca-officials-petition-276 सदर बाबतीत प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत होती, तरीही नाउ संचालकांनी एअर इंडिया कडे काणाडोळा केला. उपरोक्त मामला गंभीर वाटतो का? आजून एक दुवा : https://www.freepressjournal.in/analysis/ahmedabad-plane-crash-did-dgcas-historic-negligence-set-the-stage-for-this-tragedy आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गंभीर तर सर्वच आहे. म्हणून

गवि
Sun, 06/29/2025 - 12:11 नवीन
गंभीर तर सर्वच आहे. म्हणून NTSB कडे गेल्यास अधिक चांगले ना? त्यांनी अनेक प्रकारच्या विमानांत तांत्रिक दोष असल्याचे देखील अनेक रिपोर्ट यापूर्वी दिले आहेत. अगदी बोईंगसुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

विदा, जोरयंत्रे, चर्चा, वगैरे

गामा पैलवान
Sun, 06/29/2025 - 21:38 नवीन
गवि, विदा काढण्यात नेमक्या काय अडचणी आहेत? विदा सुलभ प्रकारे का नोंदवला गेला नाही? विदा नोंदणीची मानके काय आहेत? नागरी उड्डयन संचालनालयाने काही मानके ठरवून दिलेली आहेत का? की आपलं नुसतं जे काही बोईंग देतंय त्यात समाधान मानतंय? काहीतरी चर्चा व्हायला हवी ना? आता हेच बघा की, जी जीईची जोरयंत्रे ( = इंजिन्स ) आहेत ती जीई आस्थापनाकडून अचिरात दूरस्थ निरीक्षित ( = रियल टाईम्ड रिमोटली मॉनिटर्ड ) असतात. ही माहिती कुठल्याही चर्चेत आलेली दिसंत नाही. अपघातग्रस्त विमानाच्या जोरयंत्रांचा काही विदा जाहीर रीत्या उपलब्ध आहे का? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. बाकी, प्रत्येक गोष्ट अमेरिकेत पाठवायचीच कशाला? भारतात जुगाडूंची ( = हॅकर्सची ) काय कमी आहे? वरवर दिसतात ते प्रश्न उघड आहेत. पण आतवरही बरेच प्रश्न आहेत. ते जाहीर चर्चा करून वर खणून आणले पाहिजेत. एकटे मोदी पुरेसे नाहीत. याचसाठी साधकबाधक चर्चा हवीच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहे

कंजूस
Sun, 06/29/2025 - 23:07 नवीन
ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहे. बोइंगला केस स्टडीसाठी उपयोगी आहे. मागे भोपाळ गॅस दुर्घटना झाल्यावर परदेशी संशोधक तिकडे अगोदर पोहोचले आणि विविध सांपल्स गोळा केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

गा. पै. सर्वप्रथम तुमचे

गवि
Mon, 06/30/2025 - 08:46 नवीन
गा. पै. सर्वप्रथम तुमचे पुन्हा स्वागत. सर्व क्षेमकुशल असेल अशी इच्छा. तुमच्या म्हणण्यात काहीच चुकीचे नाही. चर्चा व्हावीच. म्हणूनच तर हा धागा. तुम्ही आधी म्हणालात की ब्लॅक बॉक्स अमेरिकेत कशाला पाठवला? त्यामागे बोईंगला वाचवण्याचा सुप्त उद्देश असावा अशी शंका तुम्हाला असावी. तेच भारतात विश्लेषण झाले असते तर एअर इंडियाला पाठीशी घातले जाईल असे कोणी म्हणू शकतो. त्यातल्यात्यात अमेरिकेत हे काम होते आहे आणि NTSB त्यात आहे हे तुलनेत अधिक बरे इतकेच म्हणणे आहे. मुळात भारताच्या बाहेर बॉक्स पाठवायला लागणे ही नामुष्की आहे हे मान्यच. आपण नेपाळच्या लेव्हलला येऊन बसलो आहोत एक प्रकारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तेच भारतात विश्लेषण झाले असते तर एअर इंडियाला पाठीशी घातले जाईल

धर्मराजमुटके
Mon, 06/30/2025 - 09:34 नवीन
तुम्ही आधी म्हणालात की ब्लॅक बॉक्स अमेरिकेत कशाला पाठवला? त्यामागे बोईंगला वाचवण्याचा सुप्त उद्देश असावा अशी शंका तुम्हाला असावी. तेच भारतात विश्लेषण झाले असते तर एअर इंडियाला पाठीशी घातले जाईल असे कोणी म्हणू शकतो.
कुणीही कशाला ? खुद्द गामा देखील असा प्रतिवाद करायला आले नसते याची काही शाश्वती देता येत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि,

सुक्या
Mon, 06/30/2025 - 09:40 नवीन
गवि, काहीतरी गल्लत आहे. ब्लॅक बॉक्स अमेरिकेत नाही तर भारतातच आहे असे मला वाटते. एक अठवड्यापुर्वी ब्लॅक बॉक्स आगीमुळे क्षतीग्रस्त झाला आहे म्हणुन तो अमेरिकेला पाठवला जाईल अशी बातमी होती. परंतु मागील १/२ दिवसाच्या बातम्या पाहील्या तर त्यावर भारतातच काम चालु आहे असे दिसते. AAIB व NTSB दोघेही त्याचा डेटा रिकवर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे वाचले होते. बोईंग अजुन ईन्वोल्व नाही असेच दिसत आहे. वापो मधील ही बातमी व टाईम्स मधील ही बातमी ह्या बाबतीत ब्लॅक बॉक्स अमेरिकेत नाही तर भारतातच (दिल्ली) आहे ह्याची पुष्टी करतात. वापो https://www.washingtonpost.com/transportation/2025/06/26/air-india-crash-black-boxes/ टाईम्स https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/all-a-speculation-black-box-of-crashed-ai-plane-not-sent-abroad-says-naidu-currently-with-aiib/articleshow/122044255.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

उत्तम अपडेट. धन्यवाद. उलट

गवि
Mon, 06/30/2025 - 10:08 नवीन
उत्तम अपडेट. धन्यवाद. उलट सुलट बातम्या येत होत्या काही दिवस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

तुलनेने महत्त्वाचा शब्द आहे ....

गामा पैलवान
Mon, 06/30/2025 - 16:57 नवीन
गवि, आपण दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. सर्व क्षेमकुशल आहे. तुम्ही वापरलेला तुलनेने हा शब्द महत्त्वाचा आहे. ती तुलना भारताच्या बाजूने झुको एव्हढीच इच्छा! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एकटे मोदी पुरेसे नाहीत.

स्वधर्म
Mon, 06/30/2025 - 14:30 नवीन
'एकटे मोदी पुरेसे नाहीत' म्हणजे काय? त्यांचा काही थेट संबंध आहे काय? आंम्हाला तरी हे तांत्रिक शोध स्वरूपाचे काम आहे असे वाटत होते पण तेही मोदी करू शकतात आणि फक्त त्यांना खूप कामे असल्याने आता वेळ नाही असे काहीसे आपले म्हणणे आहे किंवा कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

एकटे मोदी म्हणजे काय ....

गामा पैलवान
Wed, 07/02/2025 - 03:42 नवीन
स्वधर्म, त्याचं काय आहे की तुम्हांस माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचं प्रकरण आठवंत असेल. माझ्या माहितीनुसार घडलेल्या घटना सांगतो. तत्कालीन खासदारांनी व्यावसायिक वर्गाचं ( = बिझनेस क्लास ) तिकीट काढलं होतं. ऐन वेळेस एअर इंडियाने विमान बदललं व नव्या विमानात व्या.व. नव्हता. अशा प्रसंगी ग्राहकास सूचित करायचं सौजन्यही ए.इ.ने दाखवलं नाही. खासदार महाशयांनी झक मारीत सामान्य वर्गाने प्रवास केला ( मुंबई ते दिल्ली). प्रवासाच्या शेवटी त्यांनी तक्रार पुस्तिका मागितली. तीही जागेवर नव्हती. त्यामुळे त्यांनी विमानातून उतरावयास नकार दिला. यावर ए.इ.चे काही कर्मचारी ( विमानातले नव्हे तर जमिनीवरचे ) पिसाळले. त्यांनी खासदार महोदयांची गचांडी धरून उचलबांगडी करायचा प्रयत्न केला. 'कौन समझता हय खुदको, मोदी क्या?' इत्यादि अपमानास्पद शब्द तर वापरलेच, शिवाय धक्काबुक्कीही केली. यावर प्रतिक्रिया म्हणून खासदारांनी एकदोन कानाखाली काढल्या. या प्रकरणास वार्तामाध्यमांनी तिखटमीठ लावून केवळ खासदारांचा पंचवीस थोबाडीत मारल्याचा दावा नाट्यमयरीत्या पेश केला. यावर ए.इ. की हवाई उड्डयन खात्याने खासदार गायकवाडांवर उड्डाणबंदी घातली. ए.इ. च्या हलगर्जीपणावर कोणीच काही बोलंत नव्हतं. यावर उपाय म्हणून मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली. ते सरकारी आस्थापन न राहता खाजगी बनलं. कर्णावतीच्या अपघातानंतर वाटतंय की तिथल्या लोकांचं अस्तुत्व ( = अटिट्यूड ) काही बदललेला दिसंत नाही. एकटे मोदी काय करणार, असा मथितार्थ आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली?

स्वधर्म
Fri, 07/04/2025 - 16:28 नवीन
>> ए.इ. च्या हलगर्जीपणावर कोणीच काही बोलंत नव्हतं. यावर उपाय म्हणून मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली. ते सरकारी आस्थापन न राहता खाजगी बनलं. अच्छा! तर हे मोदी यांनी एकट्याने निर्णय घेऊन केलं असं आपल्याला म्हणायचं आहे तर. त्याने खासदारांच्या मानपानात, सन्मानात फरक पडला असेल व मोदी यांनी *त्यासाठीच* हे सगळे केले असे आहे तर. बाकी देखभाल, सुरक्षा, दर्जा इ. चे काय झाले? असले निर्णय घेताना शासनात काही पध्दत असावी, काही अभ्यास असावा, असा समज होता. एकटे मोदी पुरेसे असतील व खात्याच्या मंत्र्याचे, अनेक आएएस आधिकार्यांचे काहीच योगदान नसेल तर त्यांना नागरिकांच्या कराच्या पैशावर का पाळायचे? इ. इ. प्रश्न तयार होतात, पण असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

https://www.misalpav.com

अभ्या..
Fri, 07/04/2025 - 23:28 नवीन
https://www.misalpav.com/comment/932081#comment-932081 ओह्ह्हो, त्यावेळी झालेला इतका मिपावरचा गोंन्धळ पाहूनच मोदीकाकांनी एअरिंडीया ची मालकी बदलली बहुतेक. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

एअर इंडिया दुर्घटनेमागे मोठ्या कटाची शक्यता?

कपिलमुनी
Mon, 06/30/2025 - 11:10 नवीन
एअर इंडिया दुर्घटनेमागे मोठ्या कटाची शक्यता? केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचं सूचक वक्तव्य
  • Log in or register to post comments

सिंदूरी नामुष्कीचा बदला ....?

गामा पैलवान
Mon, 06/30/2025 - 17:00 नवीन
कपिलमुनी, माहितीपूर्ण दुवा आहे. तन्निमित्त आभार! ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकची व/वा अमेरिकेची जी हानी झाली तिचा बदला तर घेतला गेलेला नाहीये ....? माझी एक कॉन्स्पिरसी कुशंका. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/30/2025 - 17:18 नवीन
गा पै आलात. स्वागत. आपल्या 'कॉन्स्पिरसी कुशंका' कायम आवडतात. लिहिते राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

धन्यवाद

गामा पैलवान
Wed, 07/02/2025 - 03:28 नवीन
धन्यवाद प्राडॉ! जमेल तशा शंकाकुशंका काढणेत येतील. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकची व

गवि
Tue, 07/01/2025 - 13:57 नवीन
ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकची व/वा अमेरिकेची जी हानी झाली तिचा बदला तर घेतला गेलेला नाहीये ....? माझी एक कॉन्स्पिरसी कुशंका.
कोविड लशीचा काही संबंध ? ह.घ्या. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

https://www.rediff.com/news

भागो
Tue, 07/01/2025 - 12:26 नवीन
https://www.rediff.com/news/interview/ai-171-crash-human-error-verdict-keeps-dreamliners-reputation-intact/20250630.htm Human Error Verdict Keeps Dreamliner's Reputation Intact'
  • Log in or register to post comments

अगदी मनातल्या शंका विचारल्या आहेत

गामा पैलवान
Wed, 07/02/2025 - 03:27 नवीन
भागो, दुव्याबद्दल धन्यवाद! अगदी माझ्या मनातल्या शंका सदर निनावी व्यक्तीने विचारल्या आहेत. तिच्या दोन ( इंग्रजी ) मुलाखती आहेत. भाग १ : https://www.rediff.com/news/interview/ai-171-crash-this-isnt-how-a-crash-probe-should-work/20250627.htm भाग २ : https://www.rediff.com/news/interview/ai-171-crash-human-error-verdict-keeps-dreamliners-reputation-intact/20250630.htm उद्या यांचं भाषांतर वा सारांश टाकेन म्हणतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

सारांश

गामा पैलवान
Fri, 07/04/2025 - 02:19 नवीन
नमस्कार लोकहो. रेडिफ संकेतस्थळाच्या श्री. प्रसन्न झोरे यांनी एका निनावी विमानोड्डाण जाणकाराची मुलाखत घेतली. सदर जाणकार व्यक्ती स्वत: सक्रिय वैमानिक आहे. ( निनावी राहण्याचं कारण कळलं असेलंच.) मुलाखत दोन भागांत प्रकाशित झाली आहे. तिचे दुवे वर दिले आहेत. त्यांचा सारांश मांडतो : ----------- मुलाखत सुरू ----------- भाग ०१ : १.१ विदा काढण्यात उशीर का ? : अपघात १२ जून २०२५ रोजी झालेला आहे. तर उड्डाणविदा मुद्रकातील ( = फ्लाईट डेटा रेकॉर्डर ) उड्डाणविदा पुनर्बिंबित ( = कॉपी ) करण्यासाठी २४ जून का उजाडला ? अन्वेषण चमू स्थापनाची अधिकृत सरकारी घोषणा का केली नाही ? १.२ वार्ताप्रसृती : भारताच्या विमान अपघात अन्वेषण मंडळाच्या वार्ताप्रसृती ( = प्रेस रिलीज ) बुचकळ्यात टाकणारी आहेत. अन्वेषणााच्या रचनेत अनेक त्रुटी आहेत. अमेरिकी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळास झुकतं माप देण्यात येत आहे. १.३ कार्यपद्धती : एकदा का अन्वेषण चमू स्थापन झाला की लगेच त्याने सारा पुरावा ताब्यात घ्यायला पाहिजे. चमू स्थापण्यास उशीर केला तर मध्यंतरीच्या काळांत पुरावे बाधित होऊ शकतात. भारतीय विअअम तर्फेअनेक चमू कार्यरत आहेत. त्यापैकी एक चमू सर्व पुरावा गोळा करून दिल्लीत आणणार आहे. ही अन्वेषणाची पद्धत नव्हे. १.४ अपारदर्शी अन्वेषण रचना : भारतीय विमान अपघात अन्वेषण मंडळाचे सरसंचालक ( = डायरेक्टर जनरल ऑफ एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ) करणार आहेत. ते भारतीय सैनिकी वायुदलाचे निवृत्त अभियंते आहेत. मात्र त्यांना व्यावसायिक बोईंग ७८७ च्या जटिल यंत्रणांची माहिती नाही. विमानाचा खास अभियंता व तसेच सदर विमानप्रकारचे निर्देशित वैमानिक कुठे आहेत ? असे वैशिष्ट्यकर्मी ( = टाईप रेटेड ) जाणकार या चमूत आहेत का ? असले तर त्यांच्या नावांची घोषणा का नाही ? हे प्रकरण इतकं अपारदर्शी का ? १.५ अमेरिकी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाची नेमकी भूमिका : सदर अन्वेषणात अमेरिकी रावासुम भाग घेणार आहे, असं सरसंचालक म्हणतात. नियामनुसार रावासुम केवळ निरीक्षक आहे व गरज पडल्यास तांत्रिक जाणकारी द्यायला पाहिजे. परंतु अन्वेषणाची रचना मुळी अशीये की. रावासुम जणू तांत्रिक प्रमुखच आहे. आपल्याकडे भारताचे वैशिष्ट्यमंडित जाणकार ( = टाईप रेटेड एक्स्पर्ट्स ) नाहीत का ? १.६ अन्वेषण क्षमता : विदा खोदण्यासाठी आपण पूर्वी नारिंगी पेट्या ( = ब्लॅक बॉक्सेस ) अमेरिकेत बोईंग कडे पाठवायचो. आता मात्र आपल्याकडे सुसज्ज प्रयोगशाळा आहे. त्यामुळे तुलनेने जलद निकाल अपेक्षित आहे. तो नाही मिळाला तर लोकं नाना शंकाकुशंका काढणार. नियमानुसार भारतीय विअअम ने ३० दिवसांत प्राथमिक अहवाल ( = प्रीलिमिनरी रिपोर्ट ) सादर केला पाहिजे. मात्र पूर्वीपासून मंडळाने हे समयलक्ष्य ( = डेडलाईन ) पाळलेलं नाहीये. १.७ सरसंचालक शांत का ? : प्रसारमाध्यमांतून विअअम चे सरसंचालक श्री. युगंधर अन्वेषणप्रमुख असल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. तर मग ते पुढे येऊन अन्वेषणाची स्थिती का विशद करीत नाहीत ? ते असे गप्पगप्प का ? भाग ०२ : २.१ अन्वेषणाची सचोटी : वैशिट्यमंडित अभियंते वा तसे वैमानिक अन्वेषण समितीत नसल्याने अन्वेषणाची सचोटी ( = इंटेग्रिटी ) धोक्यात आलेली आहे. २.२ नारिंगी पेट्या कुणीकडे ? : बातम्यांनुसार नारिंगी पेट्या नागरी उड्डयन सरसंचालकांच्या ताब्यात आहेत. पण विदा उकरून काढायची सोय त्यांच्याकडे नाही. ती विअअम च्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहे. शिवाय सदर बातमीत 'टक्कर प्रतिबंधक उपगट' ( = क्रॅश प्रिव्हेन्शन मॉड्यूल ) असा उल्लेख आहे. मात्र सदर नावाची कोणतीही यंत्रणा विमानात नसते. मग अशा अर्धवट बातम्या माध्यमांना दिल्या कोणी ? तांत्रिक ज्ञान नसलेल्या नोकरशहांनी दिलेल्या दिसतात. अशांना इतक्या संवेदनशील पदापासून दूर ठेवलेलं बरं नाही का ? २.३ पारदर्शित्व व विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी : शासनाने पहिल्याप्रथम एक अधिकृत आदेश काढला पाहिजे. ज्यात अन्वेषणचमूची औपचारिक नियुक्ती केलेली असेल. चमूच्या सदस्यांची नावे उघड करायला पाहिजेत. चमूतले अभियंता व वैमानिक वैशिष्ट्याधारितच हवेत. चमूत एक वैद्यकीय अधिकारीही हवा. २.४ न्यायालयीन चौकशी : जनतेच्या दिलाशासाठी या अपघाताची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी जाहीर व्हायला हवीच. २.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता असावी. काही जणांनी विमानातनं डबर ( = डेब्री ) पडतांनाही पाहिलेलं असू शकतं. अशांसाठी खुली दवंडी पिटून जाहीर आवाहन ( = पब्लिक अपील ) का केलं गेलं नाही ? हा अतिशय संशयास्पद मुद्दा आहे. शासन अपघाताविषयी खरोखरंच गंभीर आहे का ? भीषण विमान अपघातानंतर अनेक देश असं आवाहन करतात. २.६ मूळकारण : अपघाताचं मूळ कारण मानवी चुकीकडे मुद्दाम झुकवलं तर जात नाहीये ? तांत्रिक व रचनात्मक अपेशे ( = टेक्निकल अँड डिझाईन फेल्युअर्स ) यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हेतूपूर्वक खेळी केली जातेय का ? मानवी चूक केवळ वैमानिकाचीच नसते. ती देखभाल, अभियंते, इंधन भरणारे, इत्यादि मध्ये असू शकते. मात्र तिच्यापायी तांत्रिक व रचनात्मक त्रुटींकडे दुर्लक्ष व्हायला नको, बरोबर ? ----------- मुलाखत समाप्त ----------- माझ्या मते २.५ हा साक्षीदारांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा अपघात घडल्यावर मला ताबडतोब ब्येल्मर ( Bijlmer ) अपघाताची आठवण झाली. हे गाव अॅमस्टरडॅममचे उपनगर आहे. येथल्या निवासी संकुलावर एल-अल या इस्रायली विमान आस्थापनाचं मालवाहू बोईंग ७४७ कोसळलं होतं. साल १९९२. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/El_Al_Flight_1862 या अपघातातील महत्त्वाचं डबर म्हणजे पंख व त्याखालील जोरयंत्र एका तलावात पडतांना काही लोकांनी बघितलं होतं. जाहीर आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला. पुढे याच अवशेषांच्या सहाय्याने अपघाताचं मूळ कारण शोधता आलं. त्यानुसार जोरयंत्र पंखापासून अचानकपणे विलग होऊन तुटून पडलं. पडतांना सोबत पंखाचा एक भागही ओरबाडून घेतला. विमान वेगात असतांना पुरेशी उचल ( = लिफ्ट ) होती, पण उतरण्यासाठी वेग कमी केल्यावर ही उचल झटकन शून्यावर आली व विमान अनियंत्रित होऊन कोसळलं. सांगायचा मुद्दा असाय की, लोकांना जाहीर आवाहन करून त्यांच्याकडून झपाट्याने साक्षी नोंदवायला हव्यात. पण त्या आघाडीवर या घडीस तरी सामसूम दिसते आहे. वाचकांनी विचार करून अधिकाधिक प्रश्न विचारावेत हा माझ्या या संदेशामागे हेतू आहे. आपला नम्र, -गामा पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

२.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता

धर्मराजमुटके
Fri, 07/04/2025 - 08:47 नवीन
२.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता असावी. काही जणांनी विमानातनं डबर ( = डेब्री ) पडतांनाही पाहिलेलं असू शकतं. अशांसाठी खुली दवंडी पिटून जाहीर आवाहन ( = पब्लिक अपील ) का केलं गेलं नाही ? हा अतिशय संशयास्पद मुद्दा आहे. शासन अपघाताविषयी खरोखरंच गंभीर आहे का ? भीषण विमान अपघातानंतर अनेक देश असं आवाहन करतात.
हे म्हणजे इतिहासात नापास झालेल्याला लोक सेवा आयोगाच्या परीक्षेला बसविण्यासारखे आहे. यातून काही माहिती हाती लागेल की नाही ते माहित नाही पण तुमच्या सारख्या शंकासुराचे आयतेच फावेल. अवांतर : वैयक्तीक होते म्हणून माफ करा पण तुम्ही घरगुती व्यवहारांमधे देखील असाच दृष्टिकोण बाळगता काय ?
  • Log in or register to post comments

धर्मराजमुटके यांना प्रतिसाद

गामा पैलवान
Fri, 07/04/2025 - 18:01 नवीन
धर्मराजमुटके, १.
हे म्हणजे इतिहासात नापास झालेल्याला लोक सेवा आयोगाच्या परीक्षेला बसविण्यासारखे आहे
हे उदाहरण कसं लागू पडतं ते कळलं नाही. २.
यातून काही माहिती हाती लागेल की नाही ते माहित नाही पण तुमच्या सारख्या शंकासुराचे आयतेच फावेल.
ब्येल्मर अपघाताचं मूळ कारण जनतेने दिलेल्या प्रतिसादामुळेच उघडकीस येऊ शकलं. बाकी, माझ्यासारख्या शंकसुरांचं फावायला हवंच. यालाच शासनावर दबाव टाकणे म्हणतात. ३.
अवांतर : वैयक्तीक होते म्हणून माफ करा पण तुम्ही घरगुती व्यवहारांमधे देखील असाच दृष्टिकोण बाळगता काय ?
आजीबात नाही. कारण की माझ्या घरगुती व्यवहारांत दोन-अडीचशे सोडा, एकही निरपराध मनुष्य दगावंत नाही. आपला नम्र, -गामा पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

वाचलेला प्रवासी रमेशकुमार कसा

कंजूस
Fri, 07/04/2025 - 13:51 नवीन
वाचलेला प्रवासी रमेशकुमार कसा बाहेर पडला कुणीच सांगत नाही. विमान इमारतीच्या गच्चीवर पडलंय मग हा चालत कसा गेला बाहेर? ११ए सीट तर पुढे असते.
  • Log in or register to post comments

फुटलेल्या बातमीनुसार अन्वेषण पूर्ण झालं आहे

गामा पैलवान
Mon, 07/07/2025 - 02:18 नवीन
लोकहो, या अपघाताचं अन्वेषण बऱ्यापैकी पूर्ण झाल्याच्या बातम्या ( वा अफवा ) काही उच्चपदस्थ व/वा जाणकारांच्या वर्तुळांत फिरताहेत. मी वाचलेल्या वार्तांनुसार दोन शक्यता प्रबळ दिसतात. १. वैमानिकाची चूक : या उपपत्तीनुसार ( = थियरी ) एक जोरयंत्र बंद पडलं व एक चालू होतं. वैमानिकांनी चुकून चालू असलेलं यंत्र बंद केलं. त्यांच्या पडद्यावर जे बंद पडलेलं दाखवलं जात होतं, ते नेमकं चालू असलेलं होतं. ही गफलत देखभाल केंद्राकडून झालेली असू शकते. संदर्भ ( इंग्रजी दुवा ) : https://www.youtube.com/watch?v=q_3tzn50dYM २. मुद्दाम घडवलेला घातपात : या उपपत्तीनुसार संगणक व इतर प्रसंस्थांच्या ज्या कूटाज्ञा ( = कोडींग ) असतात त्यांच्यात कोणीतरी एक विषाणू सोडला. वा सक्रिय केला. त्या विषाणूने वैमानिकांचं न ऐकता स्वत:हून दोन्ही जोरयंत्रे बंद केली. संदर्भ : https://www.youtube.com/watch?v=QGixhVwA6DA मी या दोन्ही उपपत्तींबद्दलचं माझं मत राखून ठेवतो आहे. अधिकृत शासकीय भाष्याची वाट पाहेन म्हणतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

विजय रुपाणी

हणमंतअण्णा शंक…
Mon, 07/07/2025 - 14:34 नवीन
विजय रुपाणी (गुजरातचे माजी मुख्यमंत्री) या प्लेन मधून प्रवास करत होते. (हे एक फॅक्चुअल स्टेटमेंट आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

https://www.moneycontrol.com

आग्या१९९०
Wed, 07/09/2025 - 14:54 नवीन
https://www.moneycontrol.com/news/india/fuel-switch-led-to-air-india-crash-what-does-it-mean-how-it-can-impact-engines-13248245.html
  • Log in or register to post comments

कारण बोईंगमधला बिघाड नसून

कंजूस
Sat, 07/12/2025 - 07:04 नवीन
कारण बोईंगमधला बिघाड नसून एंजिनाचं ईंधनच बंद करणारं बटण फिरवलं होतं. आणि त्यातली चर्चा ब्लॅक बॉक्समधून कळली. " तू इंधन बंद का केलंस?" " मी नाही केलं." ......... मग ती दोन्ही बटणं फिरवण्यात आली तरी तेवढा वेळच नव्हता आणि विमान खाली आदळलं. आता बहुतेक ट्रकचा दुसरा ड्रायवर मागच्या बाकड्यावर झोपतो तसं विमानाच्या कोपायलटला मागे झोपवणार.
  • Log in or register to post comments

चुकीचा अर्थ

कपिलमुनी
Sat, 07/12/2025 - 08:05 नवीन
इंजिनला होणारा इंधन पुरवठा बंद झाल्यावर हा प्रश्न एका पायलटने दुसऱ्याला विचारला. दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा स्वतंत्र चालू बंद करावा लागतो. असा सहज बटण फिरवला आणि बंद केले होत नाही.. आणि एकाच वेळी दोन्ही इंधन पुरवठा बटण द्वारे बंद झाला हे सिद्ध जाले नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अहवाल

कपिलमुनी
Sat, 07/12/2025 - 08:03 नवीन
अहवाल
  • Log in or register to post comments

धन्स

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/12/2025 - 08:40 नवीन
दुव्याबद्दल...आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अहवाल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/12/2025 - 08:25 नवीन
एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात (वृत्तपत्र दुवा) नमूद करण्यात आले आहे. चला आमचा अंदाज अभ्यास नसतानाही, व्हीडीयोज, गूगल आणि इतर साधने यावरुन बरोबर आला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन

आग्या१९९०
Sat, 07/12/2025 - 08:41 नवीन
इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन पुरवठा खंडीत होण्याचा फरक फक्त एक सेकंदाचा होता. पुढील १० सेकंदात दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा पूर्ववत झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किंचित बदल. दहा सेकंदांत

गवि
Sun, 07/13/2025 - 17:17 नवीन
किंचित बदल. दहा सेकंदांत पुरवठा पूर्ववत झाला नव्हता तर साधारण दहा सेकंदांत फ्युएल कट ऑफ स्विच एकामागून एक दोन्ही इंजिन्ससाठी पुन्हा ऑन केली गेली. क्रॅश होण्याच्या वेळेपर्यंत एक इंजिन हळूहळू सुरू होत आले होते पण अद्याप पुरेसा थ्रस्ट उत्पन्न करू शकले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

God that plays dice.

भागो
Sat, 07/12/2025 - 11:53 नवीन
मी हे इंग्लिश मध्ये लिहितो आहे/उधृत करत आहे.क्षमस्व N THE 1980s a new generation of high-speed computers will appear with switching devices in the electronic components which are so small they are approaching the molecular microworld in size. Old computers were subject to “hard errors”—a malfunction of a part, like a circuit burning out or a broken wire, which had to be replaced before the computer could work properly. But the new computers are subject to a qualitatively different kind of malfunction called “soft errors” in which a tiny switch fails during only one operation—the next time it works fine again. Engineers cannot repair computers for this kind of malfunction because nothing is actually broken. Could the God that plays dice trigger a nuclear holocaust by a random error in a military computer? Can quantum indeterminacy affect our lives? The answer is yes—as the example of the soft errors in computers shows. Atomic events which are completely unpredictable deeply influence our lives—we are in the hands of the God that plays dice.
  • Log in or register to post comments

सहज बटण फिरवलं आणि बंद केले

कंजूस
Sat, 07/12/2025 - 12:05 नवीन
सहज बटण फिरवलं आणि बंद केले होत नाही.. Two step switch असतातात प्रत्येक एंजिनासाठी. हेच इतर पायलटसनी सांगितलं मग कुणी बंद केलं? ........ अशा विविध शक्यता इकडे वर्तवणाऱ्यांचे कौतूक.
  • Log in or register to post comments

हेल्लो

भागो
Sat, 07/12/2025 - 15:43 नवीन
हेल्लो मी हार्ड स्विचेस बद्दल बोलत नाहीये. ज्याना electronics आणि कवान्टम टनेलिंग ची कल्पना आहे त्यांना बरोबर समजेल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा