Skip to main content

अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

लेखक गवि यांनी गुरुवार, 12/06/2025 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं. इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा. कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते. ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे. अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात. काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार. त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं. हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर. अधिक अपडेट इथे करत राहू.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44938
प्रतिक्रिया 188

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झालेले व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही. धूसर उभी दांडी हे नोज व्हील किंवा अन्य काही असू शकते. किंवा आर्टिफॅक्ट. ते खाली आले असे स्पष्ट दिसले किंवा ब्लॅक बॉक्समध्ये कळले तर पुढे बोलता येईल.

In reply to by गवि

"In the middle of the circle, you see kind of a protrusion on the belly of the aircraft... just underneath that you see a little grey dot... that little grey dot is the RAT.” A survivor in seat 11A, near an emergency exit, also reported hearing “a loud bang” and seeing lights flicker before the crash, consistent with RAT deployment https://www.cnbctv18.com/business/aviation/former-us-navy-pilot-now-poi…

हो. रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झाल्याचे अधिक स्पष्ट दिसणारा व्हिडिओ आता उपलब्ध आहे. गच्चीतून घेतलेल्या व्हिडिओची खराब कॉपी आतापर्यंत फिरत होती. त्याची मूळ प्रत आता बघायला मिळत असल्याने ते नक्कीच RAT असावे असे म्हणता येईल. शिवाय त्या क्लिपमध्ये आवाजही आहे. इतर क्लिप या क्लिपवरून पुन्हा रेकॉर्ड करण्यात आलेल्या असल्याने त्यात मूळ आवाज नव्हते. या नवीन मूळ क्लिप नुसार RAT चा "भ्रूम"सदृश आवाज ऐकू येतो आहे. हे रॅम एअर टरबाईन इंजिन फेल्युअर (सर्व इंजिने) किंवा इलेक्ट्रिक/ हायड्रॉलिक यंत्रणा बंद पडली की खाली येते. टेक ऑफ पर्यंत सर्व चांगले होते पण नंतर या तिन्हीपैकी एक यंत्रणा बंद पडली असे दिसते आहे. वर प्रा डॉ यांनी म्हटलेल्या तांत्रिक बिघडाच्या शक्यतेत यामुळे काहीशी भर पडली आहे. हे फेल्युअर कोणाच्या चुकीने झाले का हे ब्लॅक बॉक्समध्ये कळेलच.

आपण भारतीय लोक निवाडा देण्यात फार पुढे असतो(JUDGEMENTAL). एखाद्या विषयात आपल्याला ज्ञान आहे कि नाही, आपला त्या विषयाचा अभ्यास किती आहे, ज्ञान असले तरी आपल्याकडे पुरेशी माहीती आहे कि नाही हा विचार ना करता त्यावर आपले विशेष मत ठोकून द्यायचे. ऑपरेशन सिंदूर नि आता अहमदाबाद विमान अपघात यात हे प्रकर्षाने जाणवते आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदींनी लष्कर जिंकत असताना एकदम शस्त्रसंधी कशी केली. कारण मुळात हिम्मत नाही पासून बिहारच्या निवडणुकांवर डोळा आहे पर्यंत आता विमानात काही तरी घातपात किंवा सायबर हल्ला पासून तुर्की कंपनीच्या कर्म चार्याने घातपात केल्या पर्यंत सर्व तर्हेची षडयंत्र असल्याची गृहीतके मोठ्या हिरीरीने पुढे आणली जात आहेत. अर्थात शेवटी एखाद्याचे असे ठोकून दिलेले गृहीतक बरोबर येईल आणि तो मोठ्या विजयी मुद्रेने तुम्हाला सांगेल कि बघा मी पहिल्यांदाच म्हणत होतो. मग आपण उंदीर मारण्याच्या खात्यात असलो तरी चालेल कि आपल्याला विमान मुळात उडते का आणि कसे याची सुतराम माहिती नसली तरी चालेल. हि शक्यता गृहीत धरून. गवि साहेब तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले विश्लेषण चालू ठेवा. कारण आपल्या विश्लषणातून आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या अनेक लोकांना बरीच माहिती मिळू शकेल

In reply to by सुबोध खरे

>>>आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या... डॉक्टर साहेब, हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. हे म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाने आम्ही काय बॉ.. 'गरीब माणसं' अशा पद्धतीचं वाक्य वाटलं. चराचर सृष्टीचं ज्ञान असलेल्या माणसाने 'जुजबी' माहिती आहे असे म्हणने पटले नाही. आत्ता पर्यंत आपण जे जगाला सॉरी मिपाला जे ( दिव्य ) ज्ञान दिले आहे त्याला 'उपमा' नाही. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हे आपलं ध्येय आहे. महाभारतातला संजय आणि आपण दिव्यदृष्टी असलेली माणसं नुसता कटाक्ष टाकला की सगळे गुंतागुंतीचे विषय क्षणात मोकळे होऊन जातात. आपणास जुजबी माहिती असते असे कृपया म्हणू नये, माझा मुड ऑफ़ होतो.. :( -दिलीप बिरुटे ( डॉ.खरे साहेबाचा फॅन ) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर एखाद्या विषयात महारथ मिळवायची असेल तर त्यात किमान १० हजार तास घालवायला लागतात असे आम्हाला शिकवले आहे. मी दोन वर्षे विक्रांत या विमानवाहू जहाजावर मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होतोय यानंतर साडे चार वर्षे गोव्यातील नौदलाच्या हंस या तळाशी संलग्न रुग्णालयात "डॉक्टर" म्हणून काम करत होतो असे असले तरी प्रत्यक्ष विमानाचं संरचना आणि त्याचे कार्य याची माहिती फार तर जुजबीच राहील नव्हे का? अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास किंवा कोसला कादंबरीतील सौंदर्य स्थळे यात पी एच डी केलं असतं तर मला संपूर्ण ज्ञान आलं असतं. मग ड्रीम लायनारच कशाला मी फ ३५, चँगडू J २०, चेंगडू J ३६, सुखोई ५७ यांच्या एव्हियॉनिक्स आणि ल्युनबर्गर लेन्स वर विशेष टिप्पणी करू शकलो असतो. पाहू या आपल्या सारखा कोणी गाईड मिळाला तर अशाच एखाद्या विषयात AI चा वापर करून दोन चार महिन्यात पी एच डी मिळवता येईल का असा विचार चालू आहे ?

'यु-ट्युब'स्थित पत्रकार/तज्ञ/आजी/माजी पायलट ज्या बोइंगवरील माहितीपटाचा हवाला देत आहेत तो माहितीपट नेटफ्लिक्सवर पाहिला. सुरक्षा आणि दर्जा ह्याबाबत बोइंग ९०च्या दशकापर्यंत अग्रगण्य होती. If it's Boeing, I'm not going. असे म्हंटले जायचे. २०००च्या दशकापासुन एयरबसच्या विमानांचा खप वाढला आणि स्पर्धेत टिकण्यासाठी बोइंगचे धोरण मग फक्त नफा आणि लवकरात लवकर विमानांची डिलिवरी हे झाले. कंपनीचे मुख्यालय एव्हरेटमधुन शिकागोला हलवण्यात आले.व्यवस्थापनात सैन्याचे माजी अधिकारी आले, वॉल स्ट्रीटवर लक्ष आणि फक्त नफा.. हे धोरण ठरले. मग बोइंग-७३७ मॅक्सचे दोन मोठे अपघात झाले आणि सगळी ७३७-मॅ़क्सच्या उड्डाणांवर जगभर बंदी आली. ७८७-ड्रीमलायनरचा गेल्या १४ वर्षातला पहिला अपघात. पण दोन्ही इंजिन्स एकाच्वेळी अकार्यरत कशी काय झाली? हे अजूनही कोडे आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, एयर इंंडियातील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रसरकारने नेमलेली अशी सर्वांची मिळून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समिती पुढील तीन महिने या घटनेचा तपास करुन अहवाल सादर करणार आहे. तीन महिन्यानंतर अपघाताची कारणे समजतील असे वाटते. -दिलीप बिरुटे

पण आता ताक फुंकून पित आहेत. एअर इंडियाची बरीच विमाने आजारी झाली आहेत. तपासण्या ,तपासण्या आणि उशीर आणि नंतर सेवा रद्दच.

पण आता ताक फुंकून पित आहेत हे नैसर्गिक नव्हे का? अपघात विमानांच्या प्रणालीत काही चूक राहून गेली असेल त्यामुळे आहे कि वैमानिकाच्या चुकीमुळे आहे कि विमानाच्या नियतकालिक तपासणी आणि दुरुस्ती मध्ये आहे हे नक्की होईपर्यंत कोणताही धोका पत्करणे चूकच ठरेल. मोटार गाड्यांच्या ब्रेक किंवा इंजिन किंवा तत्सम गाड्यांमध्ये दोष आढळल्यास हजारो लाखो गाडयांना परत बोलावून ती प्रणाली बदलली जाते किंवा दुरुस्त केली जातेच. आपण वापरत असलेल्या मोबाईल मध्ये काही सॉफ्टवेअर मध्ये glich किंवा बग आल्यास सिक्युरिटी पॅच पाठवला जातोच कि.

सध्या तरी, दोन्ही इंजिने एकाच वेळी बंद कशी झाली (तीही टेक ऑफ व्यवस्थित झालेला असताना), हा एकच मुख्य प्रश्न आहे. ब्लॅक बॉक्समधून बहुधा उत्तर मिळेल. म्हणजे बंद पडली होती की नाही हे तर मिळेलच, पण नेमके का ?, याबद्दल काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्लूज मिळतील.

असं ऐकून आहे की.... कारच्या इंधन टाकीत साखर टाकली की चालू झालेली कार लगेच आचके देऊ लागते. म्हणजे काही घातपात झाला का आतल्या माणसांचे लक्ष नसताना .किंवा असं काही करताच येत नाही विमानाच्या इंधन टाकीत. सगळं बंदिस्त असते.

गविजींकडून आणखी अपडेटसच्या प्रतीक्षेत. हा धागा रोज वाचतोय.

आले होते. त्यात ए ए आय बी चा रिपोर्टचा हवाला देऊन असे सांगितले आहे की पायलटच्या सीटचा बोल्ट फेल झाल्यामुळे विमानाने टेक ऑफ घेताच त्याची खुर्ची मागे ओढली गेली व त्यामुळे थ्रस्ट लिव्हर पाहिजे त्याच्या ऊलट दिशेला म्हणजे मागे खेचली गेली. परिणामी थ्रस्ट गेला व विमान वर उडू शकले नाही. कोपायलटने ती लिव्हर पुढे करण्यासाठी ताकद लावली पण पायलटचे वजन व 'मेक्॑निकल फोर्स' मुळे काही होऊ शकले नाही. ए ए एफ बी एव्हिएशन अ‍ॅक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो इतर कुठेच असे काही वाचनात आले नाही, त्यामुळे कितपत विश्वासार्ह आहे ते माहित नाही.

एक इंजिन रनवे वरच अंशतः किंवा पूर्ण बंद झालं असावं. कारण लिफ्ट ऑफ (हवेत उचलले जाणे) यासाठी नेहमीपेक्षा अधिक अंतर लागले आहे. हे अंतर पूर्ण वजनासहित लागणाऱ्या अंतरापेक्षाही जास्त आहे. म्हणजे एकाच इंजिनावर टेक ऑफ झाला असावा. दुसरे इंजिन टेक ऑफ होताच बंद पडले आणि त्या उसळीच्या जडत्वावर विमान आणखी थोडे वर पोचून मग खाली आले. असे सध्या सर्वाधिक शक्य वाटू लागले आहे. दोन्ही इंजिने बंद पडल्यावर विमानाची चाके वर उचलणारी यंत्रणा देखील अर्थात बंद पडते. रॅम एअर टरबाईनमध्ये जेमतेम काही अत्यावश्यक उपकरणे आणि कंट्रोल चालू ठेवण्याइतकी पॉवर असते. चाके आत घेणे त्यात अंतर्भूत नसते.

In reply to by गवि

टेकऑफ़ला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला हे त्या अपघाताचे कारण नाही होऊ शकत असे वाटते. विमान धावपट्टीवर धावते उड़ते तेव्हा हवेचा दाब विमानाचे वजन आणि वर उडण्यासाठीची स्थिती याचं धावपट्टीवर धावण्याचं अचूक कॅल्क्यूलेशन असतं तेव्हाच ते वर उड़ते. विमान धावपट्टीवर धावले योग्य क्षणी ६२५ फूट उंचीवर पोहोचते आणि १७४ नॉट्सचा कमाल वेग गाठते, याचा अर्थ या क्षणापर्यन्त दोन्ही इंजिन्स काम करीत आहेत आणि आत्ता ते वेगाने खाली उतरण्यास सुरुवात सुरुवात करते, इथे दोन्हीही इंजिन्सन काम करीत नाहीत विमानाचं नाक वर आहे पण विमान झेप घेत नाही. विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले. -दिलीप बिरूटे

In reply to by प्रचेतस

इनार्शिया ऊर्फ जडत्व याचा उल्लेख मी वर केला आहे. बाकी सर्व मांडणी प्रत्यक्ष तथ्ये आणि आकडे यांवर आधारित. विमान पूर्ण सहाशे फूट स्वबळावर जाऊन त्याक्षणी खाली येणे असे होत नसते. हे अंतर जमिनीपासून चारशे फूट आहे. (समुद्र सपाटीपासून सहाशे) उड्डाणाला लागलेली धावपट्टी जास्त असल्याने विमान कोसळले हा संबंध कुठून आला कळले नाही. धावपट्टी जितकी लागली ती सर्व मर्यादांच्या वरची होती. दोन्ही इंजिने चालू असताना लागते तितकी कमी न लागता एका इंजिनावर टेक ऑफ करावा तितकी ती लांबी आहे साधारण. दोन्ही इंजिने एका क्षणी बंद न पडता एकामागून एक पडणे हे अधिक तर्कशुद्ध आहे. एक इंजिन बंद पडले तर त्याचे इंधन कट ऑफ करणे (फ्लेम आऊट) अशी प्रोसेस केली जाते. एका जुन्या केस मधे ते इंजिन बंद न करता उरलेले चालू इंजिन बंद केले असा प्रकार देखील झाला आहे. आत्ताही तसेच झाले असे मात्र म्हणणे नाही.

In reply to by मारवा

टेक ऑफ साठी लागलेली अधिकची लांबी ही दोन्ही इंजिने पूर्ण शक्तीने चालू नसणे, त्यातल्या त्यात एकाच इंजिनच्या ताकदीवर टेक ऑफ घेतला गेल्यास जितकी लागेल तिच्याशी कन्सिस्टन्ट आहे. याचा अर्थ लांब टेकऑफ डिस्टन्स हे "कारण" नव्हे. एक इंजिन अगोदर फेल झाल्याचा तो केवळ संकेत आहे. आतापर्यंत कोणताही तर्क हा केवळ शक्यतेच्या प्रमाणात वर खाली सरकतो आहे. अमुकच घडले असा दावा करणे अर्थातच कोणालाच शक्य नाही. मी तर मुळीच करत नाहीये.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले.
यावर बोलायचे राहून गेले. टेक ऑफ नंतर आठ मिनिटे ऑल वेल असते तर विमानाने मिनिमम सेफ आल्टिट्यूड गाठली असती आणि बिन इंजिनाचे वळून पुन्हा उलट रन वे गाठण्याइतका वेळ पुढे त्याला लाभला असता (ग्लाईड करत करत). आठ मिनिटे भरपूर असतात. इथे टेक ऑफ होता होताच इंजिन पॉवर लॉस झाला आहे. इंजिने थांबताच त्या क्षणी विमान खाली जात नाही. थोडा वेळ अल्प अल्टिट्यूड गेन होते. मग खाली येते. वरच्या दिशेने फायर केलेल्या बंदुकीच्या गोळीचे उदाहरण घ्या. गोळी सुटते तेव्हाच तिची अवस्था पॉवर कट झालेल्या projectile ची असते. (साधारण इंजिन अचानक बंद पडलेले विमान. फक्त पंख नसतात इतकेच). चपखल नसले तरी समांतर उदाहरण. काहींना पटू शकेल. यात काही खास वेगळा तर्क नाही. विमानाच्या बाबतीत असेच होते नेहमीच.

In reply to by गवि

यावरून आठवले. आम्हाला उड्डाण प्रशिक्षणाच्या वेळी टेकऑफ होताच इंजिन फेल झाल्यास पुन्हा उतरणे हे शिकवले जाते. पण ते लहान ट्रेनी विमानावर. त्या विमानासाठी भरपूर रनवे शिल्लक असतो. टेक ऑफ होताच इंजिन लगेच बंद केले जाते आणि उर्वरित रनवे वर उतरणे अपेक्षित. तेव्हाही इंजिन बंद केल्यावर विमान काही उंची गाठत राहते अणि मग खाली येते. न्यूटनचा नियम. Inertia. बोईंग ७८७ सारख्या विमानाच्या बाबतीत हे शिक्षण कुचकामी, कारण त्याला असा रन वे उरलेला नसतो. प्रशिक्षणात रन वे वर लहान विमान परत उतरते. इथे त्याजागी हॉस्पिटल आणि हॉस्टेल असते. दुर्दैव. टेक ऑफ नंतर इतक्या लगेच दोन्ही इंजिने फेल, या स्थितीसाठी कोणतीही चेकलिस्ट नाही. म्हणजे विमान वाचवण्यासाठी कोणतीही चेक लिस्ट नाही. ते शक्यच नाही. यापूर्वी टेक ऑफ नंतर दोन्ही इंजिने फेल असे फारच क्वचित झाले आहे आणि त्या त्या वेळी विमान तीन हजार फुटांहून वर पोचू शकल्याने त्याला पुन्हा लँड करायला अवसर मिळाला आहे. अहमदाबाद घटना याबाबतीत अद्वितीय आणि पहिलीच आहे. आता खूप मूलभूत बदल करावे लागतील. असेही होऊ शकते हे प्रथमच दिसले.

>>कोपायलटची खुर्ची निसटली, तो मागे पडला तेव्हा विमान वर घेण्याचा दांडकाही मागे ( म्हणजे विमान उतरवायला लागतो तसा) ओढला गेला व विमान वर गेले नाही. दुसऱ्या वैमानिकाने तो दांडा पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही>>> - ...... १.तर विमानाचे नाक खाली का गेले नाही? २. इथे एआइ काम करत असते तर ...... "आताच तर टेक ओफ होत आहे मग परत लगेच उतरवतोस कशाला? खरंच विमान उतरायचं आहे का? मग ते फिरवून घे" अशी आकाशवाणी झाली असती.

In reply to by कंजूस

असे काही होणे माझ्यामते अजिबातच शक्य नाहीये. त्यामुळे हा तर्क माझ्या यादीत तरी समाविष्ट नाही. विमान वर घेण्याचा दांडका, तो मागे ओढला जाणे (विमान उतरवायला लागतो तसा) हे सर्वच चुकीचे असल्याने त्यावर मत देता येत नाही. मी खुद्द हे सर्व वापरून लहान आकाराचे का होईना पण विमान उडवले असल्याने आणि त्याखेरीज एअरक्राफ्ट इंजिन / सिस्टीम (specific) हा विषय बोईंग विमान या निवडीसहीत उत्तीर्ण केल्याने असे काही नसते हे मी ठामपणे सांगू शकतो.

In reply to by गवि

खुलासा केल्याबद्दल धन्यवाद. पहिल्यांदाच मी म्हणालो होतो की हा एक व्हॉट्स अप फॉरवर्ड आहे. त्यामुळे त्याची विश्वासार्हता माहित नाही.

अगदी अस्सल माहितीबद्दल धन्यवाद गवि. तर तांत्रिक विषय हा इथे संपला आहे हे मी समजतो. काही अगम्य अनपेक्षित गोष्टी घडलेल्या समोर येतील त्या बोइंग कंपनीलाही जाणून घ्यायच्या असतील. ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहेच. टाटा, बोइंग, एअर इंडिया,कर्मचारी सगळेच काळजीत आहेत.

गवि अशा दुर्दैवी अपघातानंतर पुढची प्रोसेस काय असते आणि याचे स्टेकहोल्डर कोण असतात? एअर इंडीया अधिकारी, विमानाची देखभाल दुरुस्ती करणारी कंपनी, बोईंगचा अधिकारी वर्ग? या केसमधे इंजिनमधे बिघाड असण्याची शक्यता दिसत आहे, इंजिन कोणत्या कंपनीचे होते? - ती कंपनी पण यात असेल. जो दोषी असेल त्याच्यावर बाकीचे स्टेकहोल्डर कायदेशीर कारवाई करु शकतात का? ऑलरेडी प्रोग्रेसमधे असलेल्या ओर्डर्सचे काय होते? उदा. एअर इंडीयाने बोईंगला दिलेली विमानाची ऑर्डर, किंवा विमानाच्या देखभालीसाठी दिलेले कंत्राट, बोईंगने इंजिन मॅन्युफॅक्चररला दिलेली ऑर्डर. विमानाचा विमा असेलच पण देखभाल नीट झाली नाही असे सिध्द झाले तर तो क्लेम रिजेक्ट होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न मनात आले.

आपण अनेकांनी उत्तम चर्चा या धाग्यावर केली आहे. आत्तापर्यंत ज्या शक्यता व्यक्त केल्या गेल्या त्यात काही खालील मुद्दे लक्षात येत आहे. १. दोन्ही इंजीनमधे बिघाड. २. दुषित इंधन ( कदाचित पुरवठ्यात बिघाड ) ३. फ्लॅपशिवाय टेकऑफ ( ही शक्यता कमी ) ४. पायलटने चु़कून फ्लॅप्स वर केले. टेक ऑफनंतरही लँडीग गेअर खालीच राहिले हे सामान्य नाही. सहाशे फूटवर जाऊनही ही क्रिया झालेली नाही. विमान अधिक उंचीवर राहिले असते आणि दोन्ही इंजीन्स बंद झाले असते तर, तर रॅट ( ram air turbine ) सुरु राहिले असते आणि विमान सुरक्षित उतरु शकले असते. अर्थात या सर्व जर तरच्या गोष्टी. काही तज्ञांचं म्हणने आहे की रॅट उघडले होते पण ते अधिक उंचावर नसल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. इंजीन बंद झाले तरच ते उघडते असेही वाचनात आले. म्हणजे इंजीन्सची आपली क्षमता गमावली असे वाटते. आत्तापर्यंत सगळे अंदाज लावून झाले आहेत. ब्लॅकबॉक्स अधिक इंज्यूर आहे, अमेरिकेत त्याचा डेटा रिकव्हरला गेला आहे, असे वाचनात आलेय खरे खोटे माहिती नाही. विमान अपघाताची चौकशी जवळ जवळ आठ एजन्सी करीत आहेत. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हाईस रेकॉर्ड तपासल्यानंतर सत्य बाहेर येईल. धावपट्टीवर अधिक वेळ घेतला त्यावर पूर्वीच्या प्रतिसादात लिहिले आहे. टेकॉफ दरम्यान वैमानिक त्यांच्या कृती इंजीनमधे बिघाड झाल्याचे निश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक गणित केलेला वेग 'व्हीवन' उच्चारतात. जर 'व्हीवन' मधे बिघाड झाला तर वैमानिक टेकऑफ रद्द करतात. 'आरटीओ' म्हणून ओळखले जाते. (रिजेक्टेड टेक ऑफ) पण तसे इथे काही वाटत नाही. आत्ता विमान उडाले आहे आणि सहाशेफूट उंचीवर गेले आणि ते खाली खाली येत गेले. 'व्हीवन' नंतर बिघाड झाला तर, वैमानिकास विमान उड्डान सुरु ठेवावे लागते आणि विमान उड्डान रद्द करायचे तर धावपट्टी शिल्लक नसते अशावेळी विमान उडवणे हाच पर्याय होता. विमान उडाल्यानंतर विमान उडवणे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या आत विमान खाली खाली येत गेले. दोन इंजीन असलेले विमान एका इंजीनवर सुरक्षीतपण उतरु शकले असते पण असे दिसते की एकापाठोपाठ इंजीन्स पडले असावेत सर्व पर्याय संपले. इंजीन्स पॉवर फेल झाली आणि यात मानवी चूक किती ते स्पष्ट होईल. विमान कमी उंचीवर होते 'मेमरी अ‍ॅक्शन्स'ला वेळ कमी होता. मेडे कॉलवरुन ते लक्षात येते तेव्हा वैमानिकास विमान स्थिती सुधारण्यास फार संधी नव्हती असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

त्यांना एखाद्या विमानात पायलटच्या खुर्चीवर बसवले तर ते विमान देखील चालवू शकतील असे वाटते.

In reply to by प्रचेतस

मिपावर जे समृद्ध लेखक आणि जाणकार आहेत त्यात गवि गुरु यांचा वरचा क्रमाकं आहे. जेष्ठ जाणकार गवि विमान विषयातील जाणकार आहेत. विमानविषयक त्यांचे मिपावरील विविध धागे हे अधिक माहितीपूर्ण आणि रोचक आहेत, त्यांच्या विविध लेखांमुळे वाचण्याची लिहिण्याची आणि समजून घेण्याची उत्सुकता लागते. गविंच्या विविध लेख आणि प्रतिसादांनी मिपा समृद्ध झालेलं आहे. स्वतः त्यांनी विमानाचं प्रशिक्षण घेतलेले आहे आणि त्यांचा अभ्यास आहे, त्यामुळे ते मोठे आहेत. गविंविषयी बोलायचं म्हणजे आदराने कानाला हात लावून बोलावे लागते. हं, आता माणूस म्हटला की एवढं तेवढं चालायचंच. थोडी फार खोडी करावी लागते, चिमटे घ्यावे लागतात हे मिपा धोरणानुसार करावे लागते, त्यांनी केलेलं कौतुक हे विद्यार्थ्यांला प्रोत्साहान देणे असते. आभार गविशेठ. आम्ही जो डेटा इकडे आणतो ते युट्यूब, नॅशल जीऑग्राफ या वाहिन्यांवरील विमान विषयक विविध मालिका, गुगल, एक्सपर्टची मतं आणि ते सगळं ऐकून वाचून आपल्याला काय वाटतं ते आणि मतं. -दिलीप बिरुटे (गविंचा नम्र विद्यार्थी )

लोकहो, ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहेच. तो कशाला अमेरिकेत पाठवला आता ? जो काही विदा होता तो भारतातल्या भारतात वाचायची काय नेमकी अडचण होती? बोईंग आस्थापानास वाचवण्यासाठी कशावरून नारिंगीपेटीशी छेडाछेडी होणार नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा सगळ्याच बाबतीत षडयंत्र असते या मानसिकतेतुन बाहेर या. हा डेटा म्हणजे काही कागदाची बंडले नाहीत की ते गहाळ होतील. त्या ब्लॅक बॉक्स मधला डेटा डाउनलोड केला गेला आहे. त्यावर एकापेक्षा जास्त संस्था काम करतील व रेपोर्ट बनवतील. तोवर धीर धरा.

In reply to by सुक्या

सहमत. तसे तर मग भारतातच विश्लेषण केले तर एअर इंडियाला वाचवण्यासाठी... असेही म्हणता येईल. NTSB ही स्वतंत्र संस्था आहे. सरकारच्या छत्रीखाली नाही. पूर्वी त्यांनी विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे अनेक रिपोर्ट सादर केले आहेत.

In reply to by गवि

गवि, के.व्ही.जे.राव यांनी १० वर्षांपूर्वी मोदींकडे नागरी उड्डाण संचालकांवर ( DGCA ) फौजदारी भरायची विनंती केली होती. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.asianage.com/mumbai/prosecute-dgca-officials-petition-276 सदर बाबतीत प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत होती, तरीही नाउ संचालकांनी एअर इंडिया कडे काणाडोळा केला. उपरोक्त मामला गंभीर वाटतो का? आजून एक दुवा : https://www.freepressjournal.in/analysis/ahmedabad-plane-crash-did-dgca… आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गंभीर तर सर्वच आहे. म्हणून NTSB कडे गेल्यास अधिक चांगले ना? त्यांनी अनेक प्रकारच्या विमानांत तांत्रिक दोष असल्याचे देखील अनेक रिपोर्ट यापूर्वी दिले आहेत. अगदी बोईंगसुद्धा.

In reply to by गवि

गवि, विदा काढण्यात नेमक्या काय अडचणी आहेत? विदा सुलभ प्रकारे का नोंदवला गेला नाही? विदा नोंदणीची मानके काय आहेत? नागरी उड्डयन संचालनालयाने काही मानके ठरवून दिलेली आहेत का? की आपलं नुसतं जे काही बोईंग देतंय त्यात समाधान मानतंय? काहीतरी चर्चा व्हायला हवी ना? आता हेच बघा की, जी जीईची जोरयंत्रे ( = इंजिन्स ) आहेत ती जीई आस्थापनाकडून अचिरात दूरस्थ निरीक्षित ( = रियल टाईम्ड रिमोटली मॉनिटर्ड ) असतात. ही माहिती कुठल्याही चर्चेत आलेली दिसंत नाही. अपघातग्रस्त विमानाच्या जोरयंत्रांचा काही विदा जाहीर रीत्या उपलब्ध आहे का? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. बाकी, प्रत्येक गोष्ट अमेरिकेत पाठवायचीच कशाला? भारतात जुगाडूंची ( = हॅकर्सची ) काय कमी आहे? वरवर दिसतात ते प्रश्न उघड आहेत. पण आतवरही बरेच प्रश्न आहेत. ते जाहीर चर्चा करून वर खणून आणले पाहिजेत. एकटे मोदी पुरेसे नाहीत. याचसाठी साधकबाधक चर्चा हवीच. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहे. बोइंगला केस स्टडीसाठी उपयोगी आहे. मागे भोपाळ गॅस दुर्घटना झाल्यावर परदेशी संशोधक तिकडे अगोदर पोहोचले आणि विविध सांपल्स गोळा केली होती.

In reply to by गामा पैलवान

गा. पै. सर्वप्रथम तुमचे पुन्हा स्वागत. सर्व क्षेमकुशल असेल अशी इच्छा. तुमच्या म्हणण्यात काहीच चुकीचे नाही. चर्चा व्हावीच. म्हणूनच तर हा धागा. तुम्ही आधी म्हणालात की ब्लॅक बॉक्स अमेरिकेत कशाला पाठवला? त्यामागे बोईंगला वाचवण्याचा सुप्त उद्देश असावा अशी शंका तुम्हाला असावी. तेच भारतात विश्लेषण झाले असते तर एअर इंडियाला पाठीशी घातले जाईल असे कोणी म्हणू शकतो. त्यातल्यात्यात अमेरिकेत हे काम होते आहे आणि NTSB त्यात आहे हे तुलनेत अधिक बरे इतकेच म्हणणे आहे. मुळात भारताच्या बाहेर बॉक्स पाठवायला लागणे ही नामुष्की आहे हे मान्यच. आपण नेपाळच्या लेव्हलला येऊन बसलो आहोत एक प्रकारे.

In reply to by गवि

तुम्ही आधी म्हणालात की ब्लॅक बॉक्स अमेरिकेत कशाला पाठवला? त्यामागे बोईंगला वाचवण्याचा सुप्त उद्देश असावा अशी शंका तुम्हाला असावी. तेच भारतात विश्लेषण झाले असते तर एअर इंडियाला पाठीशी घातले जाईल असे कोणी म्हणू शकतो.
कुणीही कशाला ? खुद्द गामा देखील असा प्रतिवाद करायला आले नसते याची काही शाश्वती देता येत नाही :)

In reply to by गवि

गवि, काहीतरी गल्लत आहे. ब्लॅक बॉक्स अमेरिकेत नाही तर भारतातच आहे असे मला वाटते. एक अठवड्यापुर्वी ब्लॅक बॉक्स आगीमुळे क्षतीग्रस्त झाला आहे म्हणुन तो अमेरिकेला पाठवला जाईल अशी बातमी होती. परंतु मागील १/२ दिवसाच्या बातम्या पाहील्या तर त्यावर भारतातच काम चालु आहे असे दिसते. AAIB व NTSB दोघेही त्याचा डेटा रिकवर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे वाचले होते. बोईंग अजुन ईन्वोल्व नाही असेच दिसत आहे. वापो मधील ही बातमी व टाईम्स मधील ही बातमी ह्या बाबतीत ब्लॅक बॉक्स अमेरिकेत नाही तर भारतातच (दिल्ली) आहे ह्याची पुष्टी करतात. वापो https://www.washingtonpost.com/transportation/2025/06/26/air-india-cras… टाईम्स https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/all-a-specu…

In reply to by गवि

गवि, आपण दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. सर्व क्षेमकुशल आहे. तुम्ही वापरलेला तुलनेने हा शब्द महत्त्वाचा आहे. ती तुलना भारताच्या बाजूने झुको एव्हढीच इच्छा! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

'एकटे मोदी पुरेसे नाहीत' म्हणजे काय? त्यांचा काही थेट संबंध आहे काय? आंम्हाला तरी हे तांत्रिक शोध स्वरूपाचे काम आहे असे वाटत होते पण तेही मोदी करू शकतात आणि फक्त त्यांना खूप कामे असल्याने आता वेळ नाही असे काहीसे आपले म्हणणे आहे किंवा कसे?

In reply to by स्वधर्म

स्वधर्म, त्याचं काय आहे की तुम्हांस माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचं प्रकरण आठवंत असेल. माझ्या माहितीनुसार घडलेल्या घटना सांगतो. तत्कालीन खासदारांनी व्यावसायिक वर्गाचं ( = बिझनेस क्लास ) तिकीट काढलं होतं. ऐन वेळेस एअर इंडियाने विमान बदललं व नव्या विमानात व्या.व. नव्हता. अशा प्रसंगी ग्राहकास सूचित करायचं सौजन्यही ए.इ.ने दाखवलं नाही. खासदार महाशयांनी झक मारीत सामान्य वर्गाने प्रवास केला ( मुंबई ते दिल्ली). प्रवासाच्या शेवटी त्यांनी तक्रार पुस्तिका मागितली. तीही जागेवर नव्हती. त्यामुळे त्यांनी विमानातून उतरावयास नकार दिला. यावर ए.इ.चे काही कर्मचारी ( विमानातले नव्हे तर जमिनीवरचे ) पिसाळले. त्यांनी खासदार महोदयांची गचांडी धरून उचलबांगडी करायचा प्रयत्न केला. 'कौन समझता हय खुदको, मोदी क्या?' इत्यादि अपमानास्पद शब्द तर वापरलेच, शिवाय धक्काबुक्कीही केली. यावर प्रतिक्रिया म्हणून खासदारांनी एकदोन कानाखाली काढल्या. या प्रकरणास वार्तामाध्यमांनी तिखटमीठ लावून केवळ खासदारांचा पंचवीस थोबाडीत मारल्याचा दावा नाट्यमयरीत्या पेश केला. यावर ए.इ. की हवाई उड्डयन खात्याने खासदार गायकवाडांवर उड्डाणबंदी घातली. ए.इ. च्या हलगर्जीपणावर कोणीच काही बोलंत नव्हतं. यावर उपाय म्हणून मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली. ते सरकारी आस्थापन न राहता खाजगी बनलं. कर्णावतीच्या अपघातानंतर वाटतंय की तिथल्या लोकांचं अस्तुत्व ( = अटिट्यूड ) काही बदललेला दिसंत नाही. एकटे मोदी काय करणार, असा मथितार्थ आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

>> ए.इ. च्या हलगर्जीपणावर कोणीच काही बोलंत नव्हतं. यावर उपाय म्हणून मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली. ते सरकारी आस्थापन न राहता खाजगी बनलं. अच्छा! तर हे मोदी यांनी एकट्याने निर्णय घेऊन केलं असं आपल्याला म्हणायचं आहे तर. त्याने खासदारांच्या मानपानात, सन्मानात फरक पडला असेल व मोदी यांनी *त्यासाठीच* हे सगळे केले असे आहे तर. बाकी देखभाल, सुरक्षा, दर्जा इ. चे काय झाले? असले निर्णय घेताना शासनात काही पध्दत असावी, काही अभ्यास असावा, असा समज होता. एकटे मोदी पुरेसे असतील व खात्याच्या मंत्र्याचे, अनेक आएएस आधिकार्यांचे काहीच योगदान नसेल तर त्यांना नागरिकांच्या कराच्या पैशावर का पाळायचे? इ. इ. प्रश्न तयार होतात, पण असो.

In reply to by स्वधर्म

https://www.misalpav.com/comment/932081#comment-932081 ओह्ह्हो, त्यावेळी झालेला इतका मिपावरचा गोंन्धळ पाहूनच मोदीकाकांनी एअरिंडीया ची मालकी बदलली बहुतेक. .

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी, माहितीपूर्ण दुवा आहे. तन्निमित्त आभार! ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकची व/वा अमेरिकेची जी हानी झाली तिचा बदला तर घेतला गेलेला नाहीये ....? माझी एक कॉन्स्पिरसी कुशंका. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा पै आलात. स्वागत. आपल्या 'कॉन्स्पिरसी कुशंका' कायम आवडतात. लिहिते राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद प्राडॉ! जमेल तशा शंकाकुशंका काढणेत येतील. :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकची व/वा अमेरिकेची जी हानी झाली तिचा बदला तर घेतला गेलेला नाहीये ....? माझी एक कॉन्स्पिरसी कुशंका.
कोविड लशीचा काही संबंध ? ह.घ्या. ;-)

In reply to by भागो

भागो, दुव्याबद्दल धन्यवाद! अगदी माझ्या मनातल्या शंका सदर निनावी व्यक्तीने विचारल्या आहेत. तिच्या दोन ( इंग्रजी ) मुलाखती आहेत. भाग १ : https://www.rediff.com/news/interview/ai-171-crash-this-isnt-how-a-cras… भाग २ : https://www.rediff.com/news/interview/ai-171-crash-human-error-verdict-… उद्या यांचं भाषांतर वा सारांश टाकेन म्हणतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नमस्कार लोकहो. रेडिफ संकेतस्थळाच्या श्री. प्रसन्न झोरे यांनी एका निनावी विमानोड्डाण जाणकाराची मुलाखत घेतली. सदर जाणकार व्यक्ती स्वत: सक्रिय वैमानिक आहे. ( निनावी राहण्याचं कारण कळलं असेलंच.) मुलाखत दोन भागांत प्रकाशित झाली आहे. तिचे दुवे वर दिले आहेत. त्यांचा सारांश मांडतो : ----------- मुलाखत सुरू ----------- भाग ०१ : १.१ विदा काढण्यात उशीर का ? : अपघात १२ जून २०२५ रोजी झालेला आहे. तर उड्डाणविदा मुद्रकातील ( = फ्लाईट डेटा रेकॉर्डर ) उड्डाणविदा पुनर्बिंबित ( = कॉपी ) करण्यासाठी २४ जून का उजाडला ? अन्वेषण चमू स्थापनाची अधिकृत सरकारी घोषणा का केली नाही ? १.२ वार्ताप्रसृती : भारताच्या विमान अपघात अन्वेषण मंडळाच्या वार्ताप्रसृती ( = प्रेस रिलीज ) बुचकळ्यात टाकणारी आहेत. अन्वेषणााच्या रचनेत अनेक त्रुटी आहेत. अमेरिकी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळास झुकतं माप देण्यात येत आहे. १.३ कार्यपद्धती : एकदा का अन्वेषण चमू स्थापन झाला की लगेच त्याने सारा पुरावा ताब्यात घ्यायला पाहिजे. चमू स्थापण्यास उशीर केला तर मध्यंतरीच्या काळांत पुरावे बाधित होऊ शकतात. भारतीय विअअम तर्फेअनेक चमू कार्यरत आहेत. त्यापैकी एक चमू सर्व पुरावा गोळा करून दिल्लीत आणणार आहे. ही अन्वेषणाची पद्धत नव्हे. १.४ अपारदर्शी अन्वेषण रचना : भारतीय विमान अपघात अन्वेषण मंडळाचे सरसंचालक ( = डायरेक्टर जनरल ऑफ एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ) करणार आहेत. ते भारतीय सैनिकी वायुदलाचे निवृत्त अभियंते आहेत. मात्र त्यांना व्यावसायिक बोईंग ७८७ च्या जटिल यंत्रणांची माहिती नाही. विमानाचा खास अभियंता व तसेच सदर विमानप्रकारचे निर्देशित वैमानिक कुठे आहेत ? असे वैशिष्ट्यकर्मी ( = टाईप रेटेड ) जाणकार या चमूत आहेत का ? असले तर त्यांच्या नावांची घोषणा का नाही ? हे प्रकरण इतकं अपारदर्शी का ? १.५ अमेरिकी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाची नेमकी भूमिका : सदर अन्वेषणात अमेरिकी रावासुम भाग घेणार आहे, असं सरसंचालक म्हणतात. नियामनुसार रावासुम केवळ निरीक्षक आहे व गरज पडल्यास तांत्रिक जाणकारी द्यायला पाहिजे. परंतु अन्वेषणाची रचना मुळी अशीये की. रावासुम जणू तांत्रिक प्रमुखच आहे. आपल्याकडे भारताचे वैशिष्ट्यमंडित जाणकार ( = टाईप रेटेड एक्स्पर्ट्स ) नाहीत का ? १.६ अन्वेषण क्षमता : विदा खोदण्यासाठी आपण पूर्वी नारिंगी पेट्या ( = ब्लॅक बॉक्सेस ) अमेरिकेत बोईंग कडे पाठवायचो. आता मात्र आपल्याकडे सुसज्ज प्रयोगशाळा आहे. त्यामुळे तुलनेने जलद निकाल अपेक्षित आहे. तो नाही मिळाला तर लोकं नाना शंकाकुशंका काढणार. नियमानुसार भारतीय विअअम ने ३० दिवसांत प्राथमिक अहवाल ( = प्रीलिमिनरी रिपोर्ट ) सादर केला पाहिजे. मात्र पूर्वीपासून मंडळाने हे समयलक्ष्य ( = डेडलाईन ) पाळलेलं नाहीये. १.७ सरसंचालक शांत का ? : प्रसारमाध्यमांतून विअअम चे सरसंचालक श्री. युगंधर अन्वेषणप्रमुख असल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. तर मग ते पुढे येऊन अन्वेषणाची स्थिती का विशद करीत नाहीत ? ते असे गप्पगप्प का ? भाग ०२ : २.१ अन्वेषणाची सचोटी : वैशिट्यमंडित अभियंते वा तसे वैमानिक अन्वेषण समितीत नसल्याने अन्वेषणाची सचोटी ( = इंटेग्रिटी ) धोक्यात आलेली आहे. २.२ नारिंगी पेट्या कुणीकडे ? : बातम्यांनुसार नारिंगी पेट्या नागरी उड्डयन सरसंचालकांच्या ताब्यात आहेत. पण विदा उकरून काढायची सोय त्यांच्याकडे नाही. ती विअअम च्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहे. शिवाय सदर बातमीत 'टक्कर प्रतिबंधक उपगट' ( = क्रॅश प्रिव्हेन्शन मॉड्यूल ) असा उल्लेख आहे. मात्र सदर नावाची कोणतीही यंत्रणा विमानात नसते. मग अशा अर्धवट बातम्या माध्यमांना दिल्या कोणी ? तांत्रिक ज्ञान नसलेल्या नोकरशहांनी दिलेल्या दिसतात. अशांना इतक्या संवेदनशील पदापासून दूर ठेवलेलं बरं नाही का ? २.३ पारदर्शित्व व विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी : शासनाने पहिल्याप्रथम एक अधिकृत आदेश काढला पाहिजे. ज्यात अन्वेषणचमूची औपचारिक नियुक्ती केलेली असेल. चमूच्या सदस्यांची नावे उघड करायला पाहिजेत. चमूतले अभियंता व वैमानिक वैशिष्ट्याधारितच हवेत. चमूत एक वैद्यकीय अधिकारीही हवा. २.४ न्यायालयीन चौकशी : जनतेच्या दिलाशासाठी या अपघाताची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी जाहीर व्हायला हवीच. २.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता असावी. काही जणांनी विमानातनं डबर ( = डेब्री ) पडतांनाही पाहिलेलं असू शकतं. अशांसाठी खुली दवंडी पिटून जाहीर आवाहन ( = पब्लिक अपील ) का केलं गेलं नाही ? हा अतिशय संशयास्पद मुद्दा आहे. शासन अपघाताविषयी खरोखरंच गंभीर आहे का ? भीषण विमान अपघातानंतर अनेक देश असं आवाहन करतात. २.६ मूळकारण : अपघाताचं मूळ कारण मानवी चुकीकडे मुद्दाम झुकवलं तर जात नाहीये ? तांत्रिक व रचनात्मक अपेशे ( = टेक्निकल अँड डिझाईन फेल्युअर्स ) यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हेतूपूर्वक खेळी केली जातेय का ? मानवी चूक केवळ वैमानिकाचीच नसते. ती देखभाल, अभियंते, इंधन भरणारे, इत्यादि मध्ये असू शकते. मात्र तिच्यापायी तांत्रिक व रचनात्मक त्रुटींकडे दुर्लक्ष व्हायला नको, बरोबर ? ----------- मुलाखत समाप्त ----------- माझ्या मते २.५ हा साक्षीदारांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा अपघात घडल्यावर मला ताबडतोब ब्येल्मर ( Bijlmer ) अपघाताची आठवण झाली. हे गाव अॅमस्टरडॅममचे उपनगर आहे. येथल्या निवासी संकुलावर एल-अल या इस्रायली विमान आस्थापनाचं मालवाहू बोईंग ७४७ कोसळलं होतं. साल १९९२. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/El_Al_Flight_1862 या अपघातातील महत्त्वाचं डबर म्हणजे पंख व त्याखालील जोरयंत्र एका तलावात पडतांना काही लोकांनी बघितलं होतं. जाहीर आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला. पुढे याच अवशेषांच्या सहाय्याने अपघाताचं मूळ कारण शोधता आलं. त्यानुसार जोरयंत्र पंखापासून अचानकपणे विलग होऊन तुटून पडलं. पडतांना सोबत पंखाचा एक भागही ओरबाडून घेतला. विमान वेगात असतांना पुरेशी उचल ( = लिफ्ट ) होती, पण उतरण्यासाठी वेग कमी केल्यावर ही उचल झटकन शून्यावर आली व विमान अनियंत्रित होऊन कोसळलं. सांगायचा मुद्दा असाय की, लोकांना जाहीर आवाहन करून त्यांच्याकडून झपाट्याने साक्षी नोंदवायला हव्यात. पण त्या आघाडीवर या घडीस तरी सामसूम दिसते आहे. वाचकांनी विचार करून अधिकाधिक प्रश्न विचारावेत हा माझ्या या संदेशामागे हेतू आहे. आपला नम्र, -गामा पैलवान

२.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता असावी. काही जणांनी विमानातनं डबर ( = डेब्री ) पडतांनाही पाहिलेलं असू शकतं. अशांसाठी खुली दवंडी पिटून जाहीर आवाहन ( = पब्लिक अपील ) का केलं गेलं नाही ? हा अतिशय संशयास्पद मुद्दा आहे. शासन अपघाताविषयी खरोखरंच गंभीर आहे का ? भीषण विमान अपघातानंतर अनेक देश असं आवाहन करतात.
हे म्हणजे इतिहासात नापास झालेल्याला लोक सेवा आयोगाच्या परीक्षेला बसविण्यासारखे आहे. यातून काही माहिती हाती लागेल की नाही ते माहित नाही पण तुमच्या सारख्या शंकासुराचे आयतेच फावेल. अवांतर : वैयक्तीक होते म्हणून माफ करा पण तुम्ही घरगुती व्यवहारांमधे देखील असाच दृष्टिकोण बाळगता काय ?

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके, १.
हे म्हणजे इतिहासात नापास झालेल्याला लोक सेवा आयोगाच्या परीक्षेला बसविण्यासारखे आहे
हे उदाहरण कसं लागू पडतं ते कळलं नाही. २.
यातून काही माहिती हाती लागेल की नाही ते माहित नाही पण तुमच्या सारख्या शंकासुराचे आयतेच फावेल.
ब्येल्मर अपघाताचं मूळ कारण जनतेने दिलेल्या प्रतिसादामुळेच उघडकीस येऊ शकलं. बाकी, माझ्यासारख्या शंकसुरांचं फावायला हवंच. यालाच शासनावर दबाव टाकणे म्हणतात. ३.
अवांतर : वैयक्तीक होते म्हणून माफ करा पण तुम्ही घरगुती व्यवहारांमधे देखील असाच दृष्टिकोण बाळगता काय ?
आजीबात नाही. कारण की माझ्या घरगुती व्यवहारांत दोन-अडीचशे सोडा, एकही निरपराध मनुष्य दगावंत नाही. आपला नम्र, -गामा पैलवान

वाचलेला प्रवासी रमेशकुमार कसा बाहेर पडला कुणीच सांगत नाही. विमान इमारतीच्या गच्चीवर पडलंय मग हा चालत कसा गेला बाहेर? ११ए सीट तर पुढे असते.

लोकहो, या अपघाताचं अन्वेषण बऱ्यापैकी पूर्ण झाल्याच्या बातम्या ( वा अफवा ) काही उच्चपदस्थ व/वा जाणकारांच्या वर्तुळांत फिरताहेत. मी वाचलेल्या वार्तांनुसार दोन शक्यता प्रबळ दिसतात. १. वैमानिकाची चूक : या उपपत्तीनुसार ( = थियरी ) एक जोरयंत्र बंद पडलं व एक चालू होतं. वैमानिकांनी चुकून चालू असलेलं यंत्र बंद केलं. त्यांच्या पडद्यावर जे बंद पडलेलं दाखवलं जात होतं, ते नेमकं चालू असलेलं होतं. ही गफलत देखभाल केंद्राकडून झालेली असू शकते. संदर्भ ( इंग्रजी दुवा ) : https://www.youtube.com/watch?v=q_3tzn50dYM २. मुद्दाम घडवलेला घातपात : या उपपत्तीनुसार संगणक व इतर प्रसंस्थांच्या ज्या कूटाज्ञा ( = कोडींग ) असतात त्यांच्यात कोणीतरी एक विषाणू सोडला. वा सक्रिय केला. त्या विषाणूने वैमानिकांचं न ऐकता स्वत:हून दोन्ही जोरयंत्रे बंद केली. संदर्भ : https://www.youtube.com/watch?v=QGixhVwA6DA मी या दोन्ही उपपत्तींबद्दलचं माझं मत राखून ठेवतो आहे. अधिकृत शासकीय भाष्याची वाट पाहेन म्हणतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विजय रुपाणी (गुजरातचे माजी मुख्यमंत्री) या प्लेन मधून प्रवास करत होते. (हे एक फॅक्चुअल स्टेटमेंट आहे)