उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
27 Mar 2017 - 11:04 am
गाभा: 

चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-b...)

माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.

मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

6 Apr 2017 - 11:49 pm | अभ्या..

जर प्राणी वाचक उल्लेख आक्षेपार्ह असतील तर पेंग्विन सेनेचा जप उडवला जावा ही विनंती.

गॅरी ट्रुमन's picture

7 Apr 2017 - 10:01 am | गॅरी ट्रुमन

(संपादित).....

काय वेळ आली आहे. साहित्य संपादकांचे प्रतिसादही संपादित करावे लागत आहेत!!

संपादक साहित्याचा आहे हो,
महापालिकेच्या उंदीरमार विभागात बसून ट्रम्प चुकलाच असल्या वांझोट्या चर्चेचा नाही.
.
जाऊ दे...ते साहित्य वगैरे तुमचा नाही विषय. तरीही फारच चिंता वगैरे वाटत असेल तर बेस्ट लक नेक्श्ट टैम. ;)

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Apr 2017 - 11:36 pm | हतोळकरांचा प्रसाद

काही माध्यमांनी तर बंदी उठवली अशी बातमीही दाखवली आहे. आणि कसं आहे बरं का कोणी आज मांजर असतं कोणी उद्या, त्यात माज करण्यासारखं असं काही नाही. आणि कौतुक करण्यासारखं तर अजिबात नाही. बाकी भाजप खेळवायचा प्रयत्न करतेय हे मान्य केले हेही नसे थोडके. थोडक्यात काय या प्रकरणात दम काहीच नव्हता, भाजपला खेळायची लहर आली होती एवढेच. म्हणजे शिवसेनेचा राग योग्य आहे तर!

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2017 - 11:53 pm | श्रीगुरुजी

शिव्यासेनेने स्वतःला खेळविण्याची स्वतःहून भाजपला संधी दिली. कायम मगरुरी व मूर्खपणा सुरु ठेवला की इतरांना काहीच प्रयत्न न करता संधी मिळते.

संदीप डांगे's picture

6 Apr 2017 - 11:02 am | संदीप डांगे

आय विश कि नुकतीच गोरक्षकांनी एकाची जी राजरोस हत्या केली त्याचाही आता अशीच हिरीरीने चर्चा, एवढा गिगाबायटी गूळ पाडून, एवढे शेकडो प्रतिसाद देऊन, परत परत तेच तेच लिहून, थयथयाट करून समाचार घेतल्या जाईल...

आय जस्ट विश.,

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2017 - 3:12 pm | श्रीगुरुजी

सुरू करा चर्चा. शुभस्य शीघ्रम्!

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Apr 2017 - 9:19 pm | हतोळकरांचा प्रसाद

मोदींनी यावर थेट भूमिका जाहीर केल्यावर अशा घटनांना चाप बसेल असं वाटलं होतं पण परत परत त्याच घटना घडत आहेत. पाठलाग करून पकडून देण्यापर्यंत ठीक आहे पण मारहाण हि निषेधार्ह्यच आहे.

पुंबा's picture

7 Apr 2017 - 11:50 am | पुंबा

पाठलाग करून पकडून देण्यापर्यंत ठीक आहे पण मारहाण हि निषेधार्ह्यच आहे.

हप्र, एखाद्या गावगुंडांच्या टोळक्याने केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तिला पाठलाग करून पकडून देणे (जर गुन्हेगार रंगेहाथ गुन्हा करताना पकडला गेला नसेल) ठीक आहे? पोलिसांना बातमी देणे एक वेळ समजू शकतो जेणेकरून पोलिस तपास करतील पण पाठलाग करून पकडून देणे? नक्की कायद्याचेच राज्य अपेक्षीत आहे ना तुम्हाला?

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Apr 2017 - 10:29 pm | हतोळकरांचा प्रसाद

पोलिसांची एकूणच अवस्था आपण सर्व जाणतोच, त्यामुळे त्याबद्दल बोलणेच नको. गोहत्याबंदी असताना ट्रक भरून गायीबैल घेऊन जाणे हि संशयास्पद हालचाल गृहीत धरली जाऊ शकते. नुसतं पोलिसांना कळवून त्या हत्या थांबतीलच याची खात्री दिली जाऊ शकते का? त्यापेक्षा समजा पाठलाग करून ट्रक अडवून जर समजा पोलिसांना बोलावले आणि त्याचा कायद्याने सोक्षमोक्ष लावला तर त्यात चुकीचे काय? कायद्याला मदतच आहे ती! मारहाण समर्थनीय नाहीच हे वर मांडलेच आहे.

आजिबात नाही. एखादा कायदा मोडला जात आहे हे केवळ त्या कायद्यासंबंधी दायित्व असलेल्या संस्थेला(इथे पोलिस) कळवणे एवढेच नागरिकाचे कर्तव्य आहे. पाठलाग करून पकडणे, कोण काय खातंय याची देखरेख करून त्याच्या घरावर हल्ला करणे इत्यादी प्रकार स्टेटलेस सोसायटीज मध्ये घडत असतील, भारत एक संविधानाने स्थापीत, कायद्याचे राज्य(rule of the law and not of men) आहे. इथे केवळ संवैधानिक व्यवस्थेलाच कायदे निर्माण करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, व त्यांचे अर्थान्वयन करणे हे अधिकार हवेत.

पोलिसांची एकूणच अवस्था आपण सर्व जाणतोच, त्यामुळे त्याबद्दल बोलणेच नको.

यासाठी पोलीस दलामध्ये सुधारणा घडवून आणायचा आग्रह धरणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे ना की स्वत: पोलीसांचे अधिकार आपल्या ताब्यात घेणे.
अखलाक हत्या, उना येथे झालेली दलितांना मारहाण आणि अलवार येथील नृशंस हत्या हे तीनही प्रकार सरकार या संस्थेचे राज्याचा(state) एजंट म्हणून आपले कर्तव्य निभावण्यात आलेले अपयश आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 10:45 pm | हतोळकरांचा प्रसाद

पाठलाग करून पकडणे

मी फक्त एवढ्याच गोष्टीला धरून बोललो आहे, त्यामुळे बाकीच्या वर लिहिलेल्या गोष्टी गैरलागू आहेत. म्हणजे थोडक्यात आपले म्हणणे आहे की एखाद्याच्या बाजूच्या घरात चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न चालू असेल (किंवा त्याला तसा संशय असेल तर)तर त्याने त्याला पकडण्याच्या ऐवजी फक्त पोलिसांना कळवून गप्प राहावे(परिस्थितीजन्य आणि थेट पुरावा गायब). मला हे पटत नाही, आणि तसे घडतही नाही. तसे पकडने हा कायदेशीर गुन्हा असेल तर व्हावी की कायदेशीर कारवाई, त्याबाबतीत कोणाचा आक्षेप आहे?

बाकी आग्रह धरावा म्हणजे नेमके काय करावे हे सांगितलेत तर समजेल नीट!

एखाद्याच्या बाजूच्या घरात चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न चालू असेल (किंवा त्याला तसा संशय असेल तर)

हप्र, ह्या केसमध्ये प्रस्तुत संशयिताला पकडणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे योग्य ठरते.
गोरक्षकांचं व्हिजिलांटिझम मला बरोबर वाटत नाही. असल्या कुठल्याही संघटनेला, मॉबला धरपकडीचे अधिकार नसावेत असे वाटते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

10 Apr 2017 - 10:11 pm | हतोळकरांचा प्रसाद

माझ्या पहिल्या प्रतिसादापासून मी माझे हेच म्हणणे स्पष्टपणे मांडले आहे. पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे योग्य ठरते, मग ते हे प्रकरण ते प्रकरण असं असू शकत नाही. मारहाण करणे वगैरे गुंडगिरी प्रकार कायद्याने गुन्हा आहेच. पोलिसांनी त्यावर योग्य ती कारवाई करावीच! ते गोरक्षक आहेत म्हणून त्यांना कायद्याने सूट दिलेली नाहीचाये!

पुंबा's picture

10 Apr 2017 - 10:45 pm | पुंबा

बरं..

करण्या योग्यच आहे व या हत्येला जबाबदार असणार्‍या सर्व दोषी लोकांना कायदेशीर शिक्षा ही व्हायलाच हवी.

पण,

मुळातच राजस्थान व इतर राज्यात गोहत्या, गांयीची अवैध तस्करी यांना कायदेशीररित्या बंदी असताना अशी तस्करी ही लोक करतातच का? शिवाय या अश्या गोष्टींनी आजकाल भुछत्रांप्रमाणे जिथे-तिथे उगवलेल्या तथाकथित गोरक्षकांच्या हातात आयते कोलित मिळते. मग त्यातूनच झालेल्या मारहाणीतून एकाद्याचा मृत्यु होतो व आजकाल भू छत्रांप्रमाणे जिथे-तिथे उगवलेल्या तथाकथित ढोंगी सेक्युलर लोकांना हे बेकायदेशीर कृत्य करणार्‍या लोकांचा पुळका येऊन अवार्ड वापसी सारख्या नौटंकी करायचा आयताच चांन्स मिळतो.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2017 - 11:07 pm | श्रीगुरुजी

माज उतरायला सुरुवात झालेली दिसते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Apr 2017 - 11:43 pm | हतोळकरांचा प्रसाद

मला वाटतं त्याचा मराठी अर्थ नक्कीच कळत असेल, नाही माध्यमांना आणि खासकरून सो कॉल्ड शिवसेनप्रेमी माध्यमांना कळला नाही म्हणून विचारलं! शिवाय लोकसभेतलं निवेदन बघून घ्या लगेहाथ, अर्थात फरक काही पडणार नाही म्हणा. हे भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार वगैरे काही नसून भाजप विरुद्ध शिवसेना आहे हे वर आलेलेच आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2017 - 11:59 pm | श्रीगुरुजी

भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार असंच होतं. ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नसून शिव्यासेनेचा आहे असे बरळून गायकवाडने विनाकारण त्यात पक्ष आणला.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Apr 2017 - 9:07 am | माईसाहेब कुरसूंदीकर

प्रकरण ताणून स्वतःचे हसे करून घ्ययची सवयच आहे शिवसेनेला.राज्याबाहेर दादागिरी चालणार नाही हे उद्धवने त्याच्या आमदार्,खासदारांना निक्षून सांगायला हवे. काल रविण्द्रने लोकसभेत केलेले भाषण ऐकले. "तू एयर इण्डियाका सी.एम.डी. है क्या ? तू बॅग उठानेवाला है ना ?" असे उद्धट्पणे रविंद्र म्हणाला. त्यावर तो कर्मचारी चिडला व त्याने 'तू नरेंद्र मोदी है क्या?' असे प्रत्युत्तर दिले. थोडक्यात सुरूवात खासदार साहेबांनीच केली होती असे दिसते.

मराठी_माणूस's picture

7 Apr 2017 - 10:17 am | मराठी_माणूस
माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Apr 2017 - 10:49 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"माझा स्वभाव विनम्र आहे" रविंद्र गायकवाड.
लेख 'हे' वाचत होते .वरील वाक्य वाचल्यावर हे जे हसत सुटले ते काही थांबायला तयार नाहीत. कामे आटपली की मग स्वतःहून वाचेन.

प्रसाद_१९८२'s picture

7 Apr 2017 - 11:53 am | प्रसाद_१९८२

"माझा स्वभाव विनम्र आहे" रविंद्र गायकवाड.

---

"मैने सँडलसे पच्चीस बार मारा" असे म्हणनार्‍याचा स्वभाव विनम्र आहे, हे विधान किती हास्यास्पद आहे.

गॅरी ट्रुमन's picture

7 Apr 2017 - 12:17 pm | गॅरी ट्रुमन

प्रकरण ताणून स्वतःचे हसे करून घ्ययची सवयच आहे शिवसेनेला.

सहमत आहे.

थोडक्यात सुरूवात खासदार साहेबांनीच केली होती असे दिसते.

पण इथल्या पेंग्विनसेना समर्थकांना हे समजावणार कोण आणि कसे?

फक्त दिलगिरी वर काम भागणार नाही असे वाटते.
http://www.livemint.com/Politics/bSS2yhlxoh6woQeTgIvRtO/Ravindra-Gaikwad...

“Unless he tenders an unconditional apology to AI employees, and undertakes in writing to abide by the Chicago and Tokyo Conventions & Rules of the Air and follow all cabin safety and public behaviour norms, we must not let him on board,” says the letter.

“Ravindra Gaikwad is and will continue to be a risk to flight safety and flight operations and to Cabin Crew safety on board, and hence Government must think long and hard about letting him back on,” the letter added.

The association said it would be a “crying shame” if he is let off “without even a rap on the knuckles”. “For either the ministry or the Parliament to allow such a person to get away without even a rap on the knuckles or even forcing an apology to all Air- Indians and indeed all Indians, would be a crying shame. “It would also crush the morale of all employees and indeed all fair minded Indians. We do not wish to be flying such a person,” the association wrote in the letter.

गॅरी ट्रुमन's picture

7 Apr 2017 - 12:23 pm | गॅरी ट्रुमन

असेच करायला हवे., या असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना चाप बसलाच पाहिजे.

अगदि पदर खोचुन आणि मिशीला तुप लावुन एयर इंडियाची तळी उचलणार्यांची प्रतिक्रिया आता काय असेल बरे? शेवटी सेनेची "धमकी" कामाला आली कि काय? गायकवाडांनी फक्त संसदेची माफि मागितली, एयर इंडिया किंवा त्या सुकुमारची मागितलेली नाहि... ;)

अनुप ढेरे's picture

7 Apr 2017 - 6:46 pm | अनुप ढेरे

या सगळ्या प्रकारात गायकवांडांचं हसं न होता जय झाला असं वाटत असेल तर ह्याप्पी बड्डे!

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2017 - 7:06 pm | श्रीगुरुजी

१५ दिवस बंदी घालून इतकी मानहानी झाल्यानंतर आणि नंतर माफीनामा लिहून दिल्यानंतर बंदी उठविल्यावर आपलाच 'विजय' झाला असे सेना नेत्यांना वाटून आता मातोश्रीच्या बाहेर फटाके फुटत असतील. गायकवाड आता दिल्लीहून मुंबईला विमानाने आल्यानंतर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत होऊन मातोश्रीपर्यंत मिरवणूक निघेल.

या प्रकारात गायकवाड व सेनेची पुरती इज्जत निघाली. देशभर गायकवाड व सेनाविरोधात वातावरण निर्माण झाले व निदान १५ दिवस तरी राजकारण्यांना एअर इंडियाने शिंगावर घेतले हेही नसे थोडके. आता भविष्यात अशी दांडगाई करण्याची गायकवाडांची हिंमत होणार नाही.

आता भविष्यात अशी दांडगाई करण्याची गायकवाडांची हिंमत होणार नाही.

हेच म्हणतो! ती पोलीस केस संथ गतीने चालू राहील पण या प्रवासबंदीने चांगलाच धडा शिकवला आहे.

गॅरी ट्रुमन's picture

7 Apr 2017 - 8:23 pm | गॅरी ट्रुमन

१५ दिवस बंदी घालून इतकी मानहानी झाल्यानंतर आणि नंतर माफीनामा लिहून दिल्यानंतर बंदी उठविल्यावर आपलाच 'विजय' झाला असे सेना नेत्यांना वाटून आता मातोश्रीच्या बाहेर फटाके फुटत असतील. गायकवाड आता दिल्लीहून मुंबईला विमानाने आल्यानंतर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत होऊन मातोश्रीपर्यंत मिरवणूक निघेल.

याविषयी एकाच्या फेसबुक भिंतीवर वाचले--- "मुलगा वर्गात दांडगाई करतो, गुंडगिरी करतो म्हणून त्याला शिक्षकाने वर्गात यायला बंदी घातली. पण नंतर मुख्याध्यापकांनी सांगितल्यावर त्याला वर्गात परत यायला परवानगी दिली. त्यानंतर त्या मुलाने मोठा पराक्रम केला आणि जणू काही स्कॉलरशीपच मिळाली असे त्याच्या घरच्यांना वाटायला लागून ते त्याचा आनंद साजरा करायला लागले"!!

मला वाटते की एअर इंडियाने या घटनेमुळे आयुष्यभरासाठी बंदी घालणे समर्थनीय नव्हतेच.पण दुर्दैवाने एअर इंडियाने या प्रकरणी पाहिजे तितका खमकेपणा दाखवलेला नाही. अजून काही काळ म्हणजे ६ महिने/१ वर्ष वगैरे काळ तरी बंदी घालायला पाहिजे होती. आता मला ६ महिने/१ वर्ष हा बंदीचा काळ पुरेसा आहे असे वाटत आहे तर काहींना १५ दिवस बंदी पुरेशी आहे असे वाटत असेलच!!

येशूदासने गायलेले एक सुंदर गाणे आहे. त्या गाण्यात नायक आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची स्तुती करतानाच भगवंताचीही स्तुती करतो. त्या गाण्याचे बोल आहेत---"जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा"!! त्याच धर्तीवर असे म्हणावेसे वाटते की "ज्या पक्षाचे समर्थक असे **** असतील तर त्या पक्षाचे नेते आणि तो पक्ष किती **** असेल"!! या **** च्या जागी मी थर्डक्लास, उद्दाम, उद्धट, शिवराळ असे शब्द टाकले. त्याजागी इतर कोणतेही शब्द टाकता येतील :)

वरुण मोहिते's picture

7 Apr 2017 - 11:00 pm | वरुण मोहिते

इतके रसिक आहात हे माहिती नव्हतं .

सतिश गावडे's picture

7 Apr 2017 - 11:12 pm | सतिश गावडे

येशूदासने गायलेले एक सुंदर गाणे आहे. त्या गाण्यात नायक आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची स्तुती करतानाच भगवंताचीही स्तुती करतो. त्या गाण्याचे बोल आहेत---"जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा"!!

चित्रपटः सावन को आने दो. गाणं तुझे देखकर.रामायणातील राम अरुण गोविल या चित्रपटात हिरो होता. :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 12:05 am | हतोळकरांचा प्रसाद

काय बोलणार? मुद्दे सोडून आपल्या विरोधातील विचारधारेचा क्लास काढायची वेळ का येत असेल बरे? खेद वाटतो, अजाबात पटलं नाय!

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 8:50 am | गॅरी ट्रुमन

अजाबात पटलं नाय!

ओक्के. नको पटू दे.

मुद्दे सोडून आपल्या विरोधातील विचारधारेचा क्लास काढायची वेळ का येत असेल बरे?

तो पक्ष आणि विचारधारा? ख्खो ख्खो ख्खो ख्खो. ज्यांचा जन्म नुसती गुंडगिरी करण्यात केला त्यांची कसली डोंबलाची आली आहे विचारधारा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 10:07 am | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही इथे या विषयावर त्या पक्षाच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांचा क्लास काढलात, ते त्या पक्षाचे समर्थकच आहेत असे गृहीत धरून. त्यांच्या विचारधारेबद्दल मी बोलत आहे. कि इथे बोलणाऱ्या लोकांची काही विचारधारा असू शकते हेही तुम्हाला मान्य नाही (शिवसेनेची काही विचारधारा नाही ह्या तुमच्या वैयक्तिक मताचा मी आदर करतो)? माझा मुद्दा सरळ होता, मिपावरच्या आदरणीय आयडींनी असे एखाद्या पक्षाच्या समर्थकांना थर्डक्लास कशाला संबोधावे? असो, मी लहान तोंडी मोठा घास घेणे योग्य नाही. तुम्हाला योग्य वाटेल तसे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Apr 2017 - 10:21 pm | हतोळकरांचा प्रसाद

आणि नंतर माफीनामा लिहून दिल्यानंतर

तुम्हाला इंग्लिश वाचता आणि समजता येते असा माझा समाज आहे, तो गैरसमज असेल तर त्या पत्राचे भाषांतर लिहून देण्याइतकी इंग्रजी येणारे बरेच लोक असतील इथे.

निदान १५ दिवस तरी राजकारण्यांना एअर इंडियाने शिंगावर घेतले हेही नसे थोडके

हाहाहा...भल्या मोठ्या अपेक्षा फोल झाल्या की असे होते. ह्या असल्या मुजोर कंपन्या सामान्य लोकांना नेहमीच शिंगावर घेत असतात. कोणी आवाज उठवत नाही, इथे आवाज उठवला गेला नाही तर आवाज काढला गेला म्हणून तंतरली!

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2017 - 10:36 pm | श्रीगुरुजी

एअर इंडियाची तंतरली?

हहपुवा

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 12:02 am | हतोळकरांचा प्रसाद

हसून घ्या! पर्याय नाही हो, बंदी तर उठली आहेच. त्या शिवसेनाप्रेमी माध्यमाने काल शिवसेनेने विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर विमान कंपनी हवालदिल झाल्याची बातमी छापली होती. त्याची लिंक कुठे मिळाली तर देतो ;).

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 8:46 am | गॅरी ट्रुमन

काल शिवसेनेने विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर विमान कंपनी हवालदिल झाल्याची बातमी छापली होती.

व्वा मोठ्ठा पराक्रमच केला नाही त्या शिवसेनेने!!

खासदाराला उडण्यावर बंदी घातल्यामुळे एकही विमान उडू न देण्याची धमकी (आणि ती प्रत्यक्षात उतरवायची क्षमता) शिवसेनेच्या एकूणच वकुबाला साजेशी आहे. मी तर म्हणतो अशा प्रकारे प्रवाशांना वेठीस धरायला कोणी गेल्यास जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण करून ५-१०-५० लोकांना यमसदनी पाठवावे. एकदा अशी घटना कुठे घडल्यास हे सगळे राजकीय पक्षांमधले गुंड सुतासारखे सरळ येतील आणि भविष्यात कुठे असले प्रकार व्हायचे नाहीत.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 10:21 am | हतोळकरांचा प्रसाद

जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण करून ५-१०-५० लोकांना यमसदनी पाठवावे.

हाही मोठा पराक्रमच असेल नाही?

शिवसेनेने विमानतळ बंद पाडण्याचं समर्थन दिसलं का माझ्या वाक्यात कुठे ? असलेल्या सत्तेच्या जोरावर फक्त संबंधित पक्ष शिवसेना आहे म्हणून भाजपने केलेली ही खेळी आहे हे आले आहेच वर! मग याला संसदेतून, डिप्लोमॅटिक मार्गाने दाद मिळत नसल्यावर शिवसेनेने त्यांचा "वकुब" वापरला तर ती शिवसेनेची खेळी आहे. त्यावर जी काय कायदेशीर कारवाई (सध्यातरी उपलब्ध असलेल्या भारतीय संविधानानुसार, डायरचं बघता येईल नंतर कधीतरी चुकूनमाकून हुकूमशाही आलीच तर) करण्याचा मार्ग आहेच की उपलब्ध.

बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत.

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 10:43 am | गॅरी ट्रुमन

बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत.

माझी काहीही हरकत नाही तसे करायला. निदान मिपावर तरी ज्याला इच्छा असेल त्याने धागा जरूर काढावा. फक्त प्रॉब्लेम इतकाच की हा प्रकार बंगालमधल्या खासदारानी केला आहे आणि मिपा हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे त्याला शिवसेना खासदाराने केलेल्या गोंधळाइतका टी.आर.पी मिळणे फारच कठिण. एकूणच असे सगळे प्रकार करणारे खासदार, तो परिचारक आणि अजून जो कोणी असेल तो सगळे एका माळेचे मणी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 11:06 am | हतोळकरांचा प्रसाद

छेहो, मिपावरच्या चर्चेबद्दल बोलत नाहीये मी. माध्यमांनी एका अरेरावीतुन सुरु झालेल्या भांडणाला असा काही रंग दिला आणि खासदार महाशय म्हणजे जणू या देशातील सर्वात धोकादायक व्यक्ती असा गोंधळ घातला. वरून हि संधी समजून एअर विमान कंपन्यांच्या आडून बंदीचा जो फार्स खेळला गेला त्याबद्दल बोलतोय. टीआरपी हि मराठीमुळे नाही तर टीआरपी हि शिवसेनेबद्दलच्या पूर्वग्रहदूषित भूमिकेमुळे मिळाली. गेली कित्येक वर्षे शिवसेना मनसे च्या विरोधात तथ्यविरहित मते मांडून देशातील इतर भागातील लोकांना चुकीची माहिती पुरवण्याचे काम हि मंडळी सातत्याने करत आहेत, तोच प्रकार यावेळेलाही घडला. या माध्यमांच्या आणि विमान कंपनीच्या भूमिकेबद्दल मी बोलत आहे.

प्रसाद_१९८२'s picture

12 Apr 2017 - 4:08 pm | प्रसाद_१९८२

बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत.
.
.
.
<<
.
.
मला वाटते तृणमूलच्या खासदाराने झालेल्या प्रकारानंतर कोणत्याही टिव्ही कॅमेर्‍यासमोर येऊन "मैने पच्चीस बार उसको सँडलसे मार्‍या" अश्या फुशारक्या मारलेल्या बातम्या कोणत्याही न्युज चॅनेलवर पाहिल्या नाहीत.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Apr 2017 - 4:47 pm | हतोळकरांचा प्रसाद

हो बरोबर आहे. थोडक्यात काय तर काय केले हे कधीच महत्वाचे नव्हते, काय बोलले हेच महत्वाचे होते!

प्रसाद_१९८२'s picture

12 Apr 2017 - 6:06 pm | प्रसाद_१९८२

विमानात फक्त गोंधळ घालणे आणि
सरकारी विमान कंपनीच्या एका कर्मचार्‍याला मारहाण करुन त्याच्या खुनाचा प्रयन्त करणे ह्या दोन्ही घटनांत काहिच फरक वाटत नाही का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Apr 2017 - 11:18 pm | हतोळकरांचा प्रसाद

खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार कोर्ट कि तुम्ही? टोकाचा आकस कधीही वाईटच!

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2017 - 11:37 pm | श्रीगुरुजी

गायकवाडने कर्मचाऱ्याला विमानाच्या शिडीवरुन ढकलून द्यायचा प्रयत्न केला हे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. या गुन्ह्याला खून करण्याचा प्रयत्न करणे असेच म्हणतात.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Apr 2017 - 2:48 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला हव्या त्या प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितलं असेल, हवाईसुंदरीने सांगितलेले चालणार नाही बहुतेक!

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2017 - 3:12 pm | श्रीगुरुजी

तुमच्या त्या हवाईसुंदरीनेच ते सांगितलं आहे हो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Apr 2017 - 3:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

ओके म्हणजे अजून तिथेच गडबड आहे तर! परत प्रतिसाद वाचा वर जाऊन हि विनंती!

रविंद्र गायकवाड यांच्यावर दिल्ली पोलीसांनी कलम ३०७, ३०८ खाली गुन्हयाची नोंद केली आहे, आणि ही दोन्ही कलमे Attempt of murder साठी वापरली जातात. ह्या दोन्ही कलमांखाली दिल्ली पोलीसांनी गायकवाड यांना बुक केल्यावर त्यांची गुर्मी एका फटक्यात उतरली व झाल्याप्रकारावर संसदेत माफी मागून, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना "तुम्ही माझ्या आई प्रमाणे आहात" वगैरे म्हणत गायकवाड यांनी ही दोन्ही कलमे मागे घ्यावीत म्हणून सुमित्रा महाजन यांना मध्यस्थी करण्याचीविनंती केली.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Apr 2017 - 2:53 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही म्हणाल तसं! पोलीसानी ३०७ लावला म्हणजे ते दोषी असा तुम्हाला समज करून घ्यायचा असेल तर त्याला माझा नाईलाज आहे.

अभ्या..'s picture

13 Apr 2017 - 2:53 pm | अभ्या..

अरे वा, म्हनजे लोकसभा अध्यक्षांना विनंती केलि तर किंवा त्यांनी मध्यस्थी केली तर खुनाचे कलम काढतात पोलिस?
इंटरेस्टिंग

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2017 - 3:17 pm | श्रीगुरुजी

लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केलेली नाही आणि खुनाचे कलम काढले गेलेले नाही. एकदा पोलिसांच्या फिर्याद पुस्तकात गुन्ह्याची नोंद झाली की न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणतेही कलम काढता येत नाही. वाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युनंतर पालघरच्या एका महाविद्यालयीन तरूणीने बंदविरूद्ध प्रतिक्रिया दिली होती व तिच्या एका मैत्रिणीने त्या प्रतिक्रियेला लाईक केले होते. नंतर शिवसैनिकांच्या दबावामुळे पोलिसांनी काहीतरी कलमे लावून त्या दोघींना अटक केली होती. त्याविरूद्ध प्रचंड आरडाओरडा झाला. वाचाळवीर काटजूंनी त्याविरूद्ध न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर न्यायाधीशांनी पोलिसांना परखड शब्दात सुनावून ती कलमे काढून टाकायला लावली होती.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2017 - 2:54 pm | श्रीगुरुजी

हसून घ्या! पर्याय नाही हो, बंदी तर उठली आहेच. त्या शिवसेनाप्रेमी माध्यमाने काल शिवसेनेने विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर विमान कंपनी हवालदिल झाल्याची बातमी छापली होती. त्याची लिंक कुठे मिळाली तर देतो ;).

हीच ती बातमी दिसतेय.

याच्यात खालीलप्रमाणे लिहिलं आहे (वैधानिक इशारा- वाचताना मोठ्याने हसू नये. आजूबाजूच्या लोकांचा गैरसमज होईल.)

गैरवर्तन करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला ‘शिवसेना स्टाइल’ने धडा शिकवणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली प्रवासबंदी आज उठवण्यात आली. त्या बंदीच्या विरोधात शिवसेना खासदारांनीं गुरुवारी लोकसभेत रणकंदन केले होते. इतकेच नव्हे तर, गायकवाड यांच्यावरील प्रवासबंदी उठवली नाही तर मुंबईतून एकाही विमानाचे उड्डाण होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेने दिला होता. त्यानंतर विमान कंपन्यांची चांगलीच टरकली होती आणि केंद्र सरकारही बॅकफूटवर गेले होते.

मुंबई विमानतळावरून विमाने उडू न देण्याच्या शिवसेनेच्या पोकळ धमकीला कोणीही घाबरले नव्हते. शिवसेनेच्या धमक्या म्हणजे सादळलेला, भिजलेला, फुसका फटाका ज्याची वात सुद्धा जळत नाही. विमान कंपन्या हवालदिल होण्याचा प्रश्नच नव्हता. १५ दिवस बंदी सुरू होती. शिवसेनेच्या फुसक्या बारांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. विमानतळावर पोलिसांबरोबर अर्धसैनिक दल सुद्धा संरक्षणासाठी असते. तिथे कोणी राडा करायला गेले असते तर त्यांच्याकडून योग्य तो प्रसाद मिळाला असता. मातोश्रीत वातानुकुलीत खोलीत बसून वाईन किंवा बीअरचे घुटके घेत यॅव करू, त्यॅव करू अशा धमक्या द्यायला अक्कल लागत नाही, कारण खरोखरच राडा करण्याची वेळ आली तर राडा करायला जाणारे दुसरेच असतात. त्यांच्यावरच लाठ्या खाण्याची, तुरूंगात जायची किंवा खटल्याला सामोरे जायची वेळ येते. मातोश्रीत आरामात राहून स्वतःच स्वतःची मुलाखत घेऊन स्वतःच्यात वृत्तपत्रात स्वतःच छापून स्वतःचेच कौतुक करणारे किंवा भुवया उंचावून गरागरा डोळे फिरवत एअर इंडियाच्या सीएमडीची औकात विचारणारे रॉडी राऊत कधी रस्त्यावर उतरून आंदोलनात किंवा राड्यात सहभागी झाल्याचे अगदी 'सामना'त सुद्धा छापून आलेले नाही. विमाने उडू न देण्याची धमकी प्रत्यक्षात आणण्याचा शिवसेनेच्या पार्श्वभागात खरोखरच दम असता तर त्यांनी १५ दिवस इतकी मानहानी सहन करून बेअब्रू करून घेतली नसती.

गायकवाडांचे तिकिट एअर इंडिया व इतर कंपन्यांनी ७-८ वेळा रद्द केले, १५ दिवस त्यांना विमानप्रवास करता आला नाही, शेवटी रेल्वेने जावे लागले, १५ दिवस लपून रहावे लागले. अगदी २ दिवसांपूर्वी संसदेत सुद्धा त्यांना माध्यमांपासून लपूनछपून जावे लागले. शेवटी माफीपत्र लिहून दिल्यावर व परत असे करणार नाही असे लिहून दिल्यानंतरच माफी मिळाली. तोवर त्यांची व पक्षाची देशभर पुरती नाचक्की व बेअब्रू झाली होती. या निमित्ताने शिवसेनेची व त्यांच्या नेत्यांची लायकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर चघळली गेली आणि त्यांची पुरती शोभा झाली. एकीकडे महाराष्ट्रात भाजपसमोर शिवसेनेची सातत्याने अवहेलना सुरू असताना या प्रकरणामुळे त्यांची पुरती मानहानी झाली.

असे असूनसुद्धा 'जितं मया'च्या थाटात आनंदोत्सव साजरा करणे घोट्यात मेंदू असणार्‍या शिवसेनेलाच शोभून दिसते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 8:07 pm | हतोळकरांचा प्रसाद

आपल्याला हव्या त्या बातम्यांचे संदर्भ बरोबर, नको त्याचे काहीतरी लांबलचक विश्लेषण, असो.

खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा प्रयत्न केला हि धादांत खोटी बातमी संदर्भासाठी आणि निंदेच्या स्वसोयीसाठी वापरताना विश्लेषण होत नाही. तिकीट बुक झाले असते तरी मला विमानतळावर कोण ओळ्खतंय, त्यामुळे एकदा तिकीट बुक झाले की मी जाईनच असं गृहीत धरून खासदारांनी असले प्रयत्न केले असतील नाही?

बाकी १५ दिवस फुटकळ बंदी काय लादली तर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांचा मेंदू कुठे असेल हे न विचारलेलेच बरे! शिवसेनेची अब्रू चव्हाट्यावर चघळली गेली म्हणे असल्या प्रकरणांनी, हहपुवा! पण काय करणार आता, इतकी डोईफोड करूनही, एवढा चिखल फेकुनही हवा तो रिझल्ट मिळाला नाही ना, मग काय काढा दुसऱ्याच्या मेंदूची लेवल, पकवा खयाली पुलाव!

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2017 - 8:20 pm | श्रीगुरुजी

खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा प्रयत्न केला हि धादांत खोटी बातमी संदर्भासाठी आणि निंदेच्या स्वसोयीसाठी वापरताना विश्लेषण होत नाही.

धादांत खोटी बातमी?

बाकी १५ दिवस फुटकळ बंदी काय लादली तर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांचा मेंदू कुठे असेल हे न विचारलेलेच बरे! शिवसेनेची अब्रू चव्हाट्यावर चघळली गेली म्हणे असल्या प्रकरणांनी, हहपुवा! पण काय करणार आता, इतकी डोईफोड करूनही, एवढा चिखल फेकुनही हवा तो रिझल्ट मिळाला नाही ना, मग काय काढा दुसऱ्याच्या मेंदूची लेवल, पकवा खयाली पुलाव!

हवा तो रिझल्ट मिळालाच की. १ दिवस बंदी लावली असती तरी त्याचे स्वागतच होते. जितके जास्त दिवस बंदी लावली गेली तो बोनसच होता. मग्रुरीला, मूर्खपणाला आणि फुशारक्यांना योग्य ते उत्तर मिळालेले आहे. १५ दिवस लपून राहून, अनेकवेळा तिकीट रद्द होऊन, सर्वत्र मानहानी होऊन आणि शेवटी माफीपत्र लिहून दिल्यानंतरच माफी मिळाल्यानंतरसुद्धा सुद्धा अब्रूला अजिबात धक्का लागलेला नाही, उलट प्रतिष्ठेत भरघोस वाढ झाली आहे असे वाटत असेल तर धन्य आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 11:05 pm | हतोळकरांचा प्रसाद

अर्थातच धादांत खोटी बातमी! पुरावे असतील तर द्या तुमच्याकडे काही. संसद सदस्याने जबाबदारीवर हे संसदेत सांगितले आहे की असे कुठलेही बुकिंग त्यांनी केले नाही. म्हणजे काय तर कोणीतरी त्यांच्या नावाने किडे करायचे आणि अंध विरोधक लगेच ढोल घेऊन तयार! त्यांनी बुकिंग केले असते तरी विमानतळावर त्यांना बोर्ड केले गेले नसते हे लहान लेकरालादेखील कळले असते.

शेवटी माफीपत्र लिहून दिल्यानंतरच

याचा काही पुरावा असेल तर द्या, नाहीतर परत हि धादांत खोटी बातमी आहे हे सिद्ध होईल.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2017 - 11:36 pm | श्रीगुरुजी

>>> संसद सदस्याने जबाबदारीवर हे संसदेत सांगितले आहे की असे कुठलेही बुकिंग त्यांनी केले नाही.

"मी विनम्र स्वभावाचा आहे" असे फार्सिकल विधानही त्यांनी संसदेत केले होते, जे ऐकल्यावर नेहमी चेहऱ्यावर संतप्त भाव असणारे उधोजी सुद्धा खो खो हसत जमिनीवर गडबडा लोळले होते.

>>> याचा काही पुरावा असेल तर द्या, नाहीतर परत हि धादांत खोटी बातमी आहे हे सिद्ध होईल.

पत्राची प्रत आधीच दिलेली आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Apr 2017 - 7:30 am | हतोळकरांचा प्रसाद

मी विनम्र स्वभावाचा आहे......

मुळात हे वरचं सगळं स्टेटमेंट जास्त फार्सीकल आहे. म्हणजे एखाद्याच्या उद्घाटपणाला उत्तर दिले तर तो माणूस विनम्र असू शकत नाही? स्वतःच्या मतदारसंघातील खासदारांबद्दल माहिती नासणाऱ्यांनी उगाच माहिती नसताना जेनेरिक स्टेटमेंट्स टाकणं जास्त फार्सीकल आहे.

पत्राची प्रत आधीच दिलेली आहे.

ओके म्हणजे भाषांतर हवे का हा त्यावरचा प्रश्न सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आला. परत विचारतो, तुम्हाला वरील पत्राचे मराठी भाषांतर समजले का? नसेल तर कोणीतरी देईलच करून. त्यात कुठे माफी हा शब्द आहे ते दाखवून देणे. धादांत खोट्या बातम्या स्वसोयीसाठी वापरण्याआधी खात्री करून घ्यावी.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2017 - 8:24 am | श्रीगुरुजी

मुळात हे वरचं सगळं स्टेटमेंट जास्त फार्सीकल आहे. म्हणजे एखाद्याच्या उद्घाटपणाला उत्तर दिले तर तो माणूस विनम्र असू शकत नाही? स्वतःच्या मतदारसंघातील खासदारांबद्दल माहिती नासणाऱ्यांनी उगाच माहिती नसताना जेनेरिक स्टेटमेंट्स टाकणं जास्त फार्सीकल आहे.

मी त्याला फक्त धक्का दिला, मोदींविरूद्ध बोलला म्हणून मी संतापलो, मी बुकिंग केलेच नव्हते इ. विधाने तर जास्त फार्सिकल आहेत. एखाद्याच्या कथित उद्धटपणाला उत्तर म्हणून चपलेने मारणे, माझ्याविरूद्ध आधीच अनेक केसेस आहेत . . . होऊ देत अजून एक केस, परत अशी वेळ आली तर हेच करीन इ. गोष्टी करणारा आणि बोलणारा माणूस विनम्र??????? शिवसेनेची विनम्रतेची व्याख्या जगावेगळी दिसतेय.

ओके म्हणजे भाषांतर हवे का हा त्यावरचा प्रश्न सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आला. परत विचारतो, तुम्हाला वरील पत्राचे मराठी भाषांतर समजले का? नसेल तर कोणीतरी देईलच करून. त्यात कुठे माफी हा शब्द आहे ते दाखवून देणे. धादांत खोट्या बातम्या स्वसोयीसाठी वापरण्याआधी खात्री करून घ्यावी.

टाका भाषांतर म्हणजे तुम्ही स्वतः करीत असलेला शब्दांचा खेळ स्वतःच्याच लक्षात येईल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Apr 2017 - 2:50 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला परत विनंती आहे, माफी या अर्थाचा (आणि तोही एअर इंडियाची माफी) शब्द दाखवून द्या! लेटरची सुरवातच "जे झालं त्याचा खेद वाटतो आणि असं घडेल किंवा घडावं असा कोणाचाच हेतू नसावा" अशी आहे. आणि त्यापुढेही त्यासंदर्भातच लिहिलेले आहे.

माफीनामा हा शब्द स्वतःचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वापरायचा असेल तर खुशीने वापरा, पण जे धादांत खोटे ते खोटेच!

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2017 - 7:58 pm | श्रीगुरुजी

भाषांतराची वाट पहात आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Apr 2017 - 10:40 pm | हतोळकरांचा प्रसाद

इंग्रजी कळत नाही हे मान्य आहे तर! टाकतो भाषांतर, त्यात काय वेळ लागतो. पण प्रश्न असा पडला आहे की, जर कळत नाही भाषा तर मग तो माफीनामा आहे कसे ठरवले? आणि मग भाषांतर टाकल्यावर कळेल याची काय शाश्वती? उगाच वेड घेऊन पेडगावला जायचे ठरले असेल तर, भाषांतरावरवरही येईलच एखादं विश्लेषण.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2017 - 2:33 pm | श्रीगुरुजी

भाषांतर टाकताय ना?

हतोळकरांचा प्रसाद's picture

10 Apr 2017 - 9:56 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही इंग्रजी कळत नाही एवढं कन्फर्म करा की टाकतोच भाषांतर! शिवाय इंग्रजी कळत नाही तर मग तो माफीनामा आहे हे कसं ताडलं यामागचं गुपितही सांगून टाका जमलं तर!

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2017 - 2:22 pm | श्रीगुरुजी

गायकवाडचा इंग्लिशमध्ये लिहिलेला माफीनामा समजलेला नाही याचीच ही कबुली दिसतेय (अर्थात इंग्लिशमध्ये लिहिलेल्या माफीनाम्यात काय लिहिलंय ते गायकवाडला सुद्धा समजलं नसणारच. त्याने ते पत्र नुसतं वाचून दाखविलं.). म्हणून तर भाषांतर टाकायला खळखळ करताय.

हतोळकरांचा प्रसाद's picture

11 Apr 2017 - 8:49 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला कळाला आहे ना अर्थ मग माफी या अर्थाचा शब्द (आणि तेही एअर इंडियाला उद्देशून) दाखवून द्या की! नसेल कळला तर तसे सांगा लगेच टाकतो भाषांतर, कशाला खळखळ करताय?

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2017 - 2:24 pm | श्रीगुरुजी

गायकवाडने स्वतःच्याच तोंडाने लोकसभेत माफी मागितली आहे. भाषांतर तुम्हाला समजलेले नाही ते दिसतेच आहे. म्हणून तर इथे भाषांतर टाकायला खळखळ सुरू आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Apr 2017 - 3:32 pm | हतोळकरांचा प्रसाद

विषयांतर करू नका, वरचे सगळे प्रतिसाद परत वाचा आणि स्पष्टपणाने सांगा कि कुठे एअरइंडियाची माफी मागितली आहे. तुम्ही पत्राचा संदर्भ दिलात, मला कळत नाही विचारत आहात तर दाखवा ना माफी शब्द. आता संसदेत संसदेची कुठे प्रतिमा हनन झाली असेल तर त्याबद्दल मागितलेल्या माफीचा संदर्भ इथे कशाला देत आहात? कुठे माफी मागितली याला संसदेत असं उत्तर न देता तुम्ही वरच्या पत्राचा संदर्भ दिलात. मग माफी शब्द दाखवायला एवढी खळखळ का करत आहात? तात्पुरतं मला इंग्रजी येत नाही हे गृहीत धरलंत तरी माझी काहीच हरकत नाही.

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2017 - 7:50 pm | श्रीगुरुजी

वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच लिहिलं आहे की

"शिवाय लोकसभेतलं निवेदन बघून घ्या लगेहाथ, अर्थात फरक काही पडणार नाही म्हणा. हे भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार वगैरे काही नसून भाजप विरुद्ध शिवसेना आहे हे वर आलेलेच आहे."

गायकवाडने लोकसभेतच माफी मागितली आहे. भाषांतर टाकायला एवढी खळखळ का?

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2017 - 7:54 pm | श्रीगुरुजी

दुसरं म्हणजे जेव्हा एका वार्ताहराने गायकवाडला विचारलं की केलेल्या कृत्याचा तुम्हाला पश्चापात होतो का, तेव्हा गायकवाडने अत्यंत गुर्मीत उत्तर दिलं होतं की "पश्चाताप? काहेका पश्चाताप?". त्यानंतर विमानप्रवासबंदी करून गायकवाडच्या ** आवळल्या गेल्यावर तो भानावर आला व नंतर लोकसभेत माफी मागून वर लेखी निवेदन पण दिलं.

ते जाऊ देत. भाषांतर कधी टाकताय?

संदीप डांगे's picture

13 Apr 2017 - 1:34 pm | संदीप डांगे

गायकवाडच्या ** आवळल्या गेल्यावर तो भानावर आला

>> हीच काय ती सुसंस्कृत भाषा जी नसली तर मिपा हे सुसंस्कृत लोकांचे संस्थळ आहे असा समज रसातळाला जाईल असे इथे कढ काढले जातात?

ह्या धाग्याकडे वाचक लक्ष देत नसतील, संपादकही देणार नाहीत असे वाटते... चालुद्या...!

अभ्या..'s picture

13 Apr 2017 - 2:12 pm | अभ्या..

काय उपयोग नाही.
सगळ्यात बेस्ट आयडीया. तीन धागे काढून द्यावेत. एक शिवसेनेला शिव्या, दुसरा केजरीवालना शिव्या आणि जमलेच तर मोदीकाकांना सूचना.
रोज घाला म्हणाव रतीब. ना रहेगा संपादन, ना रहेगा विरोधी मत, ना होगी चर्चा

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2017 - 2:20 pm | श्रीगुरुजी

फक्त ३ धाग्यांनी काय होणार? भाजपला शिव्या द्यायला पण एक धागा पाहिजे. गेलाबाजार शेतकर्‍यांविषयी पण एक वेगळा धागा हवा.

गेलाबाजार शेतकर्‍यांविषयी पण एक वेगळा धागा हवा.

नै नै. आता शेतकरी "भिक नको पण कुत्रे आवर" ह्या मनस्थितीला आले आहेत. राहु द्या ते.

इथे साफसफाई झालेली दिसते.

संदिप डांगेंनी स्वत: विषयी सांगितलेली माहिती (आणि / किंवा महती) "त्यांच्या स्वतःच्या तोंडातून शेणाचे गोळेच बाहेर पडतात.." अशा अर्थाचा प्रतिसाद उडण्याचे कारण नव्हते.

असो.. माझा मूळ आक्षेप गुरूजींच्या प्रतिसादाला आहे, गुरूजींनी अशी भाषा वापरून शेण स्पेशलिस्ट सदस्यांची बरोबरी करू नये, असे सुचवतो.

संदीप डांगे's picture

14 Apr 2017 - 1:25 am | संदीप डांगे

प्रशासनाचे मित्र, सवंगडी असल्याचा गैरफायदा दिसत आहे.

मित्र म्हणून असले ट्रोल्स चालवून घ्यायची प्रशासनाची मजबुरी समजू शकतो,

मिपाप्रशासं इतक्या हलक्या दर्जाचे असेल असे वाटले नव्हते.

पण प्रत्यय आलाच....शेवटी. कितीही तक्रारी करा ट्रोलिंग च्या,
मिपाप्रशासनाच्या मित्रांना इथे पूर्ण संरक्षण आहे हो.......

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 9:57 am | गॅरी ट्रुमन

एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अश्वनी लोहानी यांची आमच्यापुढे औकात काय असा निर्लज्ज प्रश्न शिवसेनेने विचारला.

त्यांची औकात काय? बरोबर आहे त्यांनी कधी गुंडगिरी केली नाही, मवालीपणा केला नाही, खंडण्या गोळा केल्या नाहीत की सत्तेची मस्ती कधी दाखवली नाही. तर त्यांनी काय केले? तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटालर्जिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या चार इंजिनिअरींग पदव्या (त्यातील काही ए.एम.आय.ई मधून) मिळवल्या. राजस्थानात रेवडी येथे जुन्या स्टीम इंजिन लोकोशेडला हेरीटेज लोकोशेड म्हणून नावलौकिक मिळवून दिला, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये असताना मध्य प्रदेशातील हेरिटेज वास्तूंचे संवर्धन आणि जतन केले, २००२-०३ मध्ये गाळात गेलेल्या इंडिअन टुरिझम डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनला जुना नावलौकिक प्राप्त करून दिला, मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन मंत्रालयात सचिवपदी असताना मध्य प्रदेशला देशातील पर्यटनासाठी त्या वर्षाचे देशातील 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' असे पारितोषिक मिळाले. गाळात गेलेल्या संस्थांचा 'टर्न-अराऊंड' करून दिल्याचा त्यांचा नावलौकिक लक्षात घेता मोदी सरकारने त्यांची गाळात गेलेल्या एअर इंडियाचा 'टर्न-अराऊंड' करायला नियुक्ती एअर इंडियामध्ये केली. याविषयी अधिक इथे.

अर्थात पेंग्विनसेनेच्या समर्थकांना हे सगळे समजेल असे वाटत नाही आणि असल्या गुडघ्यातल्या पक्षाच्या समर्थकांना हे समजेल अशी अपेक्षाही नाही.

जर का असले गुंड प्रवृत्तीचे हलकट लोक आणि त्यांचे समर्थक एखाद्यावर टिका करत असतील तर तो माणूस नक्कीच चांगला असणार यात शंका नाही.

वरुण मोहिते's picture

8 Apr 2017 - 10:48 am | वरुण मोहिते

संपला का काही लोकांचा नाहीतर सात्विक संताप असा एक वेगळा विभाग मिपा वर काढावा हे मिपा प्रशासनाला सुचवतो ह्या ठिकाणी .

शार्दुल_हातोळकर's picture

8 Apr 2017 - 1:24 pm | शार्दुल_हातोळकर

"एकांगी मतप्रदर्शन" असा विभाग असेल मिपावर तरी चालेल :)

प्रसाद_१९८२'s picture

8 Apr 2017 - 11:08 am | प्रसाद_१९८२

जर का असले गुंड प्रवृत्तीचे हलकट लोक आणि त्यांचे समर्थक एखाद्यावर टिका करत असतील तर तो माणूस नक्कीच चांगला असणार यात शंका नाही.

==

सहमत !

अनेक ठिकाणी नाक घासून माफी मागितल्यानंतर ह्या चप्पलमार खासदाराची विमानप्रवास बंदी मागे घेतली एअर इंडीयाने. कॅमेर्‍या समोर २५ वेळा चप्पलने मारले असे म्हणनारा खासदार, कलम ३०८ चा गुन्हा दाखल झाल्यावर आपण त्या कर्मचार्‍याला फक्त ढकलले असे घुमजाव करतो आणि ह्या पक्षाचे समर्थक अश्या खासदाराची विमान प्रवास बंदी हटवली म्हणून आनंदोत्सव साजरा करतायत.

बाकी ह्या प्रकारामुळे रविंद्र गायकवाड ह्यांना भारतीय मिडियाने "चप्पलमार सांसद", "जुतामार सांसद" व "सँडलमार सांसद" ह्या तीन सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले, ह्या बद्दल शिवसेना व त्यांच्या समर्थकांचे हार्दिक अभिनंदन. :))

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 11:15 am | हतोळकरांचा प्रसाद

अनेक ठिकाणी नाक घासून माफी मागितल्यानंतर ह्या चप्पलमार खासदाराची विमानप्रवास बंदी मागे घेतली एअर इंडीयाने.

याचा काही संदर्भ असेल तर द्याल का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 11:21 am | हतोळकरांचा प्रसाद

यांची आमच्यापुढे औकात काय असा निर्लज्ज प्रश्न शिवसेनेने विचारला.

या बातमीत संदर्भ दिलेली पूर्ण पत्रकार परिषद पहिली, तुम्ही म्हणता तसा उल्लेख सापडला नाही. दुसरा कुठला संदर्भ असला तर द्याल का प्लिज?

शिवसेनेने असे वक्त्यव्य सीएमडी बाबत असे वक्त्यव्य केले असेल तर ते निषेधर्ह्यच आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 12:25 pm | गॅरी ट्रुमन

भरपूर लिंका आहेत. यापैकी कुठलीही लिंक बघा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 1:01 pm | हतोळकरांचा प्रसाद

गुगल करणे मला जमत असल्यामुळे हे मी अर्थातच केलेले आहे. वरील लिंक मध्ये आलेल्या बातम्यांपैकी वरच्या दोन तीन बातम्या सोडल्या तर खालच्या बातम्या नक्कीच या प्रकरणाशी निगडित नाहीत. वरच्या ज्या आहेत त्यात ज्या पत्रकारपरिषदेचा हवाला देऊन हि बातमी देण्यात येत आहे तो पूर्ण विडिओ पहिला, वरील वाक्य आढळले नाही. माझ्याकडून अनावधानाने वाक्य ऐकायचे राहून गेले असल्यास तुम्ही विडिओ पाहून सांगितल्यास चालेल.

मी आधीच म्हटले आहे, असे वाक्य आले असल्यास ते निषेधार्ह्य आहेच, पण ते वाक्य म्हटले आहे का हेही तितकेच महत्वाचे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 1:59 pm | गॅरी ट्रुमन

पण ते वाक्य म्हटले आहे का हेही तितकेच महत्वाचे आहे.

आतापर्यंत वेगवेगळ्या वेबसाईटवर याच बातम्या येत आहेत. तसेच आपण असे काही बोललो नव्हतो असे संजय राऊतांकडून खंडनही आलेले नाही. कालपरवाच स्वतः रविंद्र गायकवाडांनी त्यांनी ७ वेळा एअर इंडियाचे तिकिट काढायचा प्रयत्न केल्याच्या मिडियामध्ये आलेल्या बातम्या खोट्या होत्या असे म्हटले . तशाप्रकारचे काहीही स्पष्टीकरणही संजय राऊतांकडून आलेले नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 2:24 pm | हतोळकरांचा प्रसाद

तसे खंडन होईपर्यंत वाट बघायची गरज नसावीच बहुतेक? तिकीट बुक करण्याच्या बातमीचा पण असाच मुद्दा घाईघाईने सिद्ध करण्यासाठी वापर केला गेला आहेच वर.

असो, माध्यमांवर अंधपणाने मलातरी विश्वास ठेवावा वाटत नाही. बातमीची खात्री नको का करायला?

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 7:23 pm | गॅरी ट्रुमन

या व्हिडीओमध्ये २ मिनिटे १५ सेकंद ते २ मिनिटे २०-२२ सेकंदादरम्यान संजय राऊत म्हणत आहेत की एअर इंडियाच्या सी.एम.डी ने सोशल मिडियावर खासदार गायकवाडांचा अपमान केला. त्यावर संजय राऊत "औकात" काढत आहेत. एअर इंडियाच्या सी.एम.डी ने नक्की कोणता व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केला आहे तो इथे दिल्यास अधिक चर्चा करता येईल. शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता त्यांच्या मान-अपमान यांच्या व्याख्या सामान्य जनतेच्या व्याख्यांप्रमाणे असतील असे वाटत नाही. म्हणजे कोणालाही विमान अडवून ठेवायचा, मारहाण करायचा अधिकार नाही मग भले तो खासदार का असेना असे म्हटले तरी शिवसेनावाले त्याला अपमान समजतील इतपत खात्री शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड बघता वाटते.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2017 - 8:11 pm | श्रीगुरुजी

बाळासाहेबांच्या निधनानंतर एका मुलीने मुंबईत बंद पाळण्याची गरज काय अशा अर्थाचे चेपुवर पोस्ट लिहिले होते. त्या पोस्टला तिच्या मैत्रिणीने लाईक केले होते. त्या दोन वाक्यांवरून सेनेच्या गुंडांनी त्या दोघींविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करायला लावली व तिच्या काकांच्या नर्सिंग होमची नासधूस केली. या मूर्खपणाच्या कृत्याबद्दल न्यायाधीशांना पोलिसांविरूद्ध कडक ताशेरे ओढून ती फिर्याद रद्द करायला लावली. त्या दोघी महाविद्यालयीन मुली या गुंडगिरीमुळे इतक्या घाबरल्या की त्यांनी मुंबई सोडून गुजरातमध्ये स्थलांतर केले. असल्या पोस्ट ज्यांना स्वतःचा अपमान वाटतो त्या लोकांच्या मानापमानाच्या कल्पना किती क्षुद्र असतील याची कल्पना येते.

दुसरं म्हणजे एअर इंडियाच्या सी.एम.डी. कडे सोशल मिडियावर जाऊन गायकवाडांचा अपमान वगैरे करण्यासाठी फालतू रिकामा वेळ असेल का आणि गायकवाड हा माणूस त्यांच्या खिजगणतीत तरी असेल का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 10:56 pm | हतोळकरांचा प्रसाद

धन्यवाद! अपेक्षेप्रमाणेच हवे तसे वाक्य तोडून गोंधळ घालण्यात आलेला आहे. आता ही खोडच झाली आहे माध्यमांची म्हणा. आणि त्याचा वापर करणारे समर्थक मग त्याचा हवा तसा वापर करतात.

"कौन है ये एअरइंडिया, कौन है सीएमडी, क्या इनकी औकात है जो सदन चल रहा है और एक संसद के बरे मी अपमानास्पद पोस्ट सोशल मीडिया पे डाल रहे है" असे ते वाक्य आहे. आता "जर" राऊत म्हणतात तशी कुठली पोस्ट जर सीएमडींनी टाकली असेल तर ती काय टाकली आहे, खरच आक्षेपार्ह्य आहे का त्यात काही वगैरे जाणून घेण्याची अजिबात गरज वाटत नाही. लगेच सीएमडींना सहानुभूती, त्यांचा बायोडेटा आणि शिवसेनेला शिव्या. वरील वाक्य "कौन है सीएमडी जो सांसद पे बंदी लगा रहा है" असे म्हटल्याच्या थाटात ते नाचवयाचे. पूर्वग्रहादोषापेक्षा काय वेगळे म्हणावे याला?

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2017 - 11:26 pm | श्रीगुरुजी

>>> आता "जर" राऊत म्हणतात तशी कुठली पोस्ट जर सीएमडींनी टाकली असेल तर ती काय टाकली आहे, खरच आक्षेपार्ह्य आहे का त्यात काही वगैरे जाणून घेण्याची अजिबात गरज वाटत नाही. लगेच सीएमडींना सहानुभूती, त्यांचा बायोडेटा आणि शिवसेनेला शिव्या

राऊत म्हणतोय याचा अर्थ ते खोटंच असणार. नसेल तर "योग्य" वेळी (म्हणजे कधीच नाही) राऊत ते उघड करेलच.

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Apr 2017 - 7:34 am | हतोळकरांचा प्रसाद

परत एक फार्सीकल आणि पूर्वग्रहदोषीत विधान! इतर वेळेस हव्या त्या लिंका शोधाता येतात, पण नको असल्या कि राऊतांनी उघड करायची वाट बघावी लागते.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2017 - 8:26 am | श्रीगुरुजी

भुवया ताणून डोळे गरागरा फिरवीत संतापजनक बरळणारा राऊन हा स्वतःच एक मोठा फार्स आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Apr 2017 - 2:52 pm | हतोळकरांचा प्रसाद

राऊत कसे आहेत याबद्दल एक वेगळा धागा होऊ शकेल. कदाचित त्या धाग्यावर मी तुमच्या बाजूच असेल. सध्यातरी हे विषयांतर आहे.

गॅरी ट्रुमन's picture

9 Apr 2017 - 11:00 am | गॅरी ट्रुमन

"जर" राऊत म्हणतात तशी कुठली पोस्ट जर सीएमडींनी टाकली असेल तर ती काय टाकली आहे, खरच आक्षेपार्ह्य आहे का त्यात काही वगैरे जाणून घेण्याची अजिबात गरज वाटत नाही. लगेच सीएमडींना सहानुभूती, त्यांचा बायोडेटा आणि शिवसेनेला शिव्या.

याचे कारण शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड. जर परीसरात कुठली गुंडगिरीची घटना घडली तर पहिला संशय त्याच भागातील अट्टल गुंडावरच येतो. त्याचप्रमाणे जर कुठेही दहशतवादाशी संबंधित घटना घडली तर पहिला संशय पाकिस्तानवरच येतो. तसेच काही कारणाने तणाव निर्माण झाल्यास परिसरातल्या गुंडांना ते भविष्यात कासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नयेत म्हणून तडीपारही केले जाते. ही अगदी कायद्याला मान्य आहे अशीच प्रक्रीया आहे. त्यामुळे मारहाण वगैरे काही घटना घडल्यास ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट आहे त्यांच्यावरच त्यात त्यांचा काहीही संबंध नाही हे सिध्द करायची जबाबदारी येते. आता याला पूर्वग्रहदूषितपणा म्हणत असाल तर खुषाल म्हणा. आय डोन्ट गीव्ह अ डॅम!!

या चर्चेत मला मांडायचे होते ते सगळे मुद्दे मांडून झाले आहेत. आता यापुढे या चर्चेला माझ्याकडून पूर्णविराम. यापुढे या चर्चेतील प्रतिसादही मी उघडून बघणार नाही.

धन्यवाद.

किसन शिंदे's picture

8 Apr 2017 - 11:22 am | किसन शिंदे

एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अश्वनी लोहानी यांची आमच्यापुढे औकात काय असा निर्लज्ज प्रश्न शिवसेनेने विचारला.

त्यांची औकात काय? बरोबर आहे त्यांनी कधी गुंडगिरी केली नाही, मवालीपणा केला नाही, खंडण्या गोळा केल्या नाहीत की सत्तेची मस्ती कधी दाखवली नाही. तर त्यांनी काय केले? तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटालर्जिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या चार इंजिनिअरींग पदव्या (त्यातील काही ए.एम.आय.ई मधून) मिळवल्या. राजस्थानात रेवडी येथे जुन्या स्टीम इंजिन लोकोशेडला हेरीटेज लोकोशेड म्हणून नावलौकिक मिळवून दिला, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये असताना मध्य प्रदेशातील हेरिटेज वास्तूंचे संवर्धन आणि जतन केले, २००२-०३ मध्ये गाळात गेलेल्या इंडिअन टुरिझम डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनला जुना नावलौकिक प्राप्त करून दिला, मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन मंत्रालयात सचिवपदी असताना मध्य प्रदेशला देशातील पर्यटनासाठी त्या वर्षाचे देशातील 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' असे पारितोषिक मिळाले. गाळात गेलेल्या संस्थांचा 'टर्न-अराऊंड' करून दिल्याचा त्यांचा नावलौकिक लक्षात घेता मोदी सरकारने त्यांची गाळात गेलेल्या एअर इंडियाचा 'टर्न-अराऊंड' करायला नियुक्ती एअर इंडियामध्ये केली.

हा परिच्छेद सगळीकडे फिरतोय व्हॉट्सअपवरून. =))

अजून काय पाहिजे क्लिंटन भौ, आता तरी धीराने घ्या !! :)

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 12:10 pm | गॅरी ट्रुमन

हा परिच्छेद सगळीकडे फिरतोय व्हॉट्सअपवरून. =))

अरे एवढ्यात फिरायलाही लागला? दोन-अडीचच तास झाले आहेत हे लिहून!! म्हणजे आपले मिपा वाचून काही जण व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश फॉरवर्ड करतात असे दिसते. मागे एकदा मीच लिहिलेला कुठलातरी प्रतिसाद एका फेसबुकच्या ग्रुपवर वाचला होता. आणि एकदा आमच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कोणीतरी फॉरवर्डही केला होता :)

शार्दुल_हातोळकर's picture

8 Apr 2017 - 12:23 pm | शार्दुल_हातोळकर

कालच पाहिला होता हा मेसेज

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 12:31 pm | गॅरी ट्रुमन

इथे स्क्रिनशॉट पेस्ट करता का जरा?

शिवसेनेने त्यांची औकात काढल्यानंतर माझ्यासारख्या अनेकांनी रेडिफ किंवा अन्य कुठली ती लिंक बघून या स्वरूपाचे मुद्दे लिहिले असणे सहज शक्य आहे. पण तुम्ही म्हणत आहात की "कालच पाहिला होता हा मेसेज" यातून मी तो मेसेज इथे पेस्ट केला आहे असे ध्वनित होत आहे.

किसन शिंदे's picture

8 Apr 2017 - 1:02 pm | किसन शिंदे

माफ करा. इथे थोडीशी गल्लत झाली माझी. तुमच्या प्रतिसादाची वेळ आणि तारीख मी पाहिली नव्हती, ती तुमच्या प्रतिसादानंतर पाहिली. मला वाटलं तुम्ही दिलेला प्रतिसादच व्हॉट्सअपवर फिरतोय सगळीकडे. पण तो थोडा वेगळा आहे. अगदी असाच्या असाच नाही, पण वाक्य हीच, पण थोडी फार आलटून पालटून टाकलेली, संपूर्ण आशयही असाच. तो मॅसेज आमच्या ऑफिसच्या ग्रुपवर एकाने काल दुपारी टाकला होता.

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 1:39 pm | गॅरी ट्रुमन

इथे थोडीशी गल्लत झाली माझी.

ठिक आहे. तरीही तुम्हीही इथे स्क्रिनशॉट टाकाच असे म्हणतो. मुद्दे एकच असणे सहज शक्य आहे कारण संदर्भ एकच असेल आणि लोहानींनी आय.टी.डी.सी, मध्य प्रदेश टी.डी.सी इत्यादी त्याच ४-६ संस्थांमध्ये काम केले असेल तर त्याचा उल्लेख एकच संदर्भ वापरल्यावर येणे सहज शक्य आहे. आणि त्यामुळे वाक्येही आलटून पालटून टाकलेली वाटू शकतात. याचा अर्थ मी तो प्रतिसाद कॉपी करून इथे लिहिला आहे असे अजिबात नाही. मी माझ्या प्रतिसादात रेडिफच्या त्या लेखाचा संदर्भही दिला होता. तो संदर्भही व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणार्‍या त्या लेखात दिला असेल की नाही शंकाच आहे. बहुसंख्य व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसमध्ये संदर्भ वगैरे दिले जात नाहीत.

मी मिपावर आजपर्यंत कधीही इतर कोणाची आयडीया संदर्भ न देता माझी म्हणून खपविलेली नाही. दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ दे. मी शैक्षणिक वर्तुळात वावरत असल्यामुळे प्लेजिअ‍ॅरिझम हा गुन्हा आहे हे मला माहित आहे आणि मी प्लेजिअ‍ॅरीझम केले आहे असे कोणाला वाटायला नको. आणि स्क्रिनशॉट टाकता येणे शक्य नसल्यास तो प्रतिसाद व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असल्याच्या संदर्भातले सगळे प्रतिसाद काढून टाकावेत ही संपादकांना विनंती.

शार्दुल_हातोळकर's picture

8 Apr 2017 - 2:05 pm | शार्दुल_हातोळकर

मी जे कॉपी पेस्ट बद्दल लिहिले आहे, ते whatsapp वरील मेसेजच्या आशयासंदर्भात आहे. आणि त्यातही केवळ अधिकाऱ्याचीच भलामण केल्याचा संदर्भ होता.

तुम्ही कॉपी पेस्ट करुन टाकल्याचे आम्ही कुठेही म्हटलेले नाही. "हा" मेसेज म्हणजे अशा आशयाचा मेसेज असे मला म्हणायचे होते.

दुसरे म्हणजे तुम्ही जे प्रतिसाद वगळण्याची संपादकांना विनंती करत आहात, त्या न्यायाने या धाग्यावरील आक्षेपार्ह गलिच्छ भाषा वापरलेले आणि वैयक्तिक हल्ले असलेले भरमसाट प्रतिसाद उडवावे लागतील. जे मी सुरुवातीपासुन नमुद केले आहे.

शार्दुल_हातोळकर's picture

8 Apr 2017 - 1:04 pm | शार्दुल_हातोळकर

इथे स्क्रिनशॉट देण्याची पद्धत मला पाहावी लागेल.

विकिपेडिया च्या पानावरील मजकुराचे सरळ साधे भाषांतर आहे ते. लिंक खालीलप्रमाणे आहे. कोणीतरी तिथुन कॉपी पेस्ट करुन मेसेज टाकला आहे हे काल पाहताक्षणीच लक्षात आले, कारण मी लगेच गुगल वर सर्च केले होते.

https://en.m.wikipedia.org/wiki/Ashwani_Lohani

अत्रे's picture

8 Apr 2017 - 12:40 pm | अत्रे

क्लिंटन भौ

अवांतर प्रश्न - ट्रुमन यांचे दुसरे नाव क्लिंटन आहे का?

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 12:46 pm | गॅरी ट्रुमन

अवांतर प्रश्न - ट्रुमन यांचे दुसरे नाव क्लिंटन आहे का?

नाही. क्लिंटन यांचे दुसरे नाव ट्रुमन आहे :)

मी पूर्वाश्रमीचा क्लिंटन आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी हिलरी क्लिंटन निवडणुक लढविणार हे थोडेफार स्पष्ट झाल्यावर २०१५ मध्येच मी हा नवा आय.डी घेतला. कारण माझा हिलरींना विरोध होता आणि "क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा" वगैरे मुद्दे येऊ नयेत म्हणून नवा आय.डी घेतला :)

क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा" वगैरे मुद्दे येऊ नयेत

हा हा हा :) फारच विचारपूर्वक आय-डी निवडला.

शार्दुल_हातोळकर's picture

8 Apr 2017 - 11:57 am | शार्दुल_हातोळकर

संबंधित अधिकाऱ्याने मागील सुमारे पावणेदोन वर्षांत एअर इंडियाची सेवा, स्थिती, प्रतिमा, विश्वासार्हता आणि शिस्त सुधारण्यासाठी नक्की काय प्रयत्न केले आणि त्याचा नक्की रिझल्ट काय हे पण विस्तृतपणे सांगा.

माणसाचे कर्तृत्व केवळ शिक्षण आणि पदव्यांवर ठरत नसते, तर त्याने त्या शिक्षणाचे आणि पदव्यांचे त्याच्या कामात कशा प्रकारे उपयोजन केले आहे यावर ठरते.

एखाद्याच्या केवळ पदव्या भरमसाट आणि रिझल्ट फारसा नसेल तर काहीही उपयोग नाही.

शिवाय कॉर्पोरेटमधे पावणेदोन वर्षे हा काही कमी कालावधी नाही.

प्रसाद_१९८२'s picture

8 Apr 2017 - 12:29 pm | प्रसाद_१९८२

ठिक आहे,

पण एअर इंडियाच्या चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अश्वनी लोहानी यांना, आमच्यापुढे(शिवसेना नेते), अश्वनी लोहानी यांची औकात काय? असा प्रश्न निर्लज्जपणे विचारणार्‍या शिवसेना नेत्यांचे गुंडगीरी, तोडफोड व खंडणी गोळा करण्याव्यतिरिक्त सामाजिक, राजकिय जीवनात त्यांचे कर्तुत्व काय आहे? निदान त्या अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या चीफ मॅनेजिंग डायरेक्टर हे पद सांभळण्यापुर्वी, गॅरी ट्रुमन यांनी इथे लिहिल्याप्रमाणे काहितरी भरीव काम तरी केले आहे.

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 12:38 pm | गॅरी ट्रुमन

त्याहूनही महत्वाचे म्हणजे कोणाचीही औकात काढणार्‍याला कोणत्या कारणावरून औकात काढली हा प्रश्न विचारायला हवा. सभ्य समाजात तरी ठोस कारण असल्याशिवाय अशी कोणाची औकात काढत नाहीत. तेव्हा अशी औकात काढली जात असेल तर संबंधितांनी त्यामागे काहीतरी अभ्यास, कारणमिमांसा केली असेलच. ती मांडायची जबाबदारी त्यांचीच. ती गोष्ट खरी असेल तर आपण सगळेच त्यांची औकात काढू. हा.का.ना.का.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 1:04 pm | हतोळकरांचा प्रसाद

सभ्य समाजात तरी ठोस कारण असल्याशिवाय अशी कोणाची औकात काढत नाहीत.

साधारणपणे असंच कोणाचा क्लासही (तीही औकातच असावी) काढला जाऊ नये हा मुद्दा होता.

गॅरी ट्रुमन's picture

8 Apr 2017 - 1:55 pm | गॅरी ट्रुमन

साधारणपणे असंच कोणाचा क्लासही (तीही औकातच असावी) काढला जाऊ नये हा मुद्दा होता.

ठिक आहे.

मी शाळेत असताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात राहायला होतो. तेव्हापासून शिवसेना म्हणजे गुंडगिरी हे समीकरण अगदी पक्के बघितलेले आहे. त्यामुळेच असा क्लास काढला. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Apr 2017 - 2:30 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही दिलगिरी व्यक्त करावी म्हणून अजिबात मत व्यक्त केले नाही. मला तुमच्याबद्दल आदर आहेच. पण आधीच राजकारण घाण अशी प्रतिमा, वरून एकमेकांच्या वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्या काढण्याने मूळ मुद्दा बाजूला राहून वैयक्तिक चर्चा सुरु होते. त्यात परत अशा चर्चा उडवूनच लावा म्हणणारेही आहेतच. त्यामुळे गैरसमज नसावा.

तुम्ही विशिष्ट राजकीय पक्षावर टीका करुन केवळ अधिकाऱ्याची भलामण केलीत, म्हणुन मला ती असंतुलित चर्चा वाटली.

तुमच्याकडुन वर विचारलेल्या माझ्या प्रश्नाला बगल न देता थेट उत्तराची अपेक्षा आहे.

अवांतर - मा. सुरेश प्रभुंनी रेल्वेमधे ज्या सुधारणांची सुरुवात केली आहे, त्याचे थेट जनतेने कौतुक केले आहे. तस्मात एअर इंडियाचे मागील पावणेदोन वर्षांत काही दिसत नाही.

एअर इंडियाची वाटचाल जो कोणी इथे अ‍ॅनालाईझ करणार असेल त्याने किमान गेल्या १० ते १५ वर्षांची वाटचाल अभ्यासावी ही नम्र विनंती.

"एअर इंडियाचे पद्धतशीर खच्चीकरण झाले" हे अनेकदा वाचले आहे, ते नक्की कसे.. हे कळाले तर ज्ञानात भरपूर भर पडेल

वरुण मोहिते's picture

9 Apr 2017 - 1:05 am | वरुण मोहिते

नका . सांगतो प्रफुल्ल पटेल आणि किंगफिशर हा संबंध आहे . ह्या साठी मार्केट मध्ये भाव पाडण्यात आले .मग विलीनीकरण झालं . इंडियन एरलाईन्स आणि एअर इंडिया च . कामगार संघटना मजबूत ठेवायच्या होत्या ह्या कारणाने कित्येकदा आवाज उठवून पण एअर इंडिया ची सेवा बदलली नाही .
गौतम अदानी आणि प्रफुल्ल पटेल हा संबंध होता . ह्यासाठीच कल्याण नजीक जागा घेतली . मग पनवेल . मग रेंगाळत ठेवणे . असो

गामा पैलवान's picture

9 Apr 2017 - 1:06 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

जितक्या हिरीरीने तुम्ही माज उतरायला सुरुवात झालेली दिसते असं म्हणताय, तितक्याच उत्साहाने जरा गायकवाडांची मूळ तक्रार पण शोधून डकवता का? माध्यमांत कुठेच सापडत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय. माध्यमांना फक्त भांडण पेटतं ठेवण्यातच रस आहे. पण तुम्ही सामोपचाराची भूमिका घेत असता. म्हणून तुम्हाला विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Apr 2017 - 2:54 pm | हतोळकरांचा प्रसाद

वर त्यांना त्या सीएमडीची पोस्ट शोधण्याचीही एक विनंती केली आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2017 - 8:00 pm | श्रीगुरुजी

राऊत म्हणतोय ती सीएमडीची पोस्ट का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Apr 2017 - 10:46 pm | हतोळकरांचा प्रसाद

हो.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2017 - 11:18 pm | श्रीगुरुजी

राऊत म्हणतोय म्हणजे थापच असणार. राऊतला गांभीर्याने घ्यायची गरज नाही. फालतू बरळणे हा राऊतचा जुना छंद आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

10 Apr 2017 - 9:59 pm | हतोळकरांचा प्रसाद

हे तुमचं वैयक्तिम मत आहे! माहितीचा काही स्रोत मिळाला तर चर्चा पुढे सरकेल, थापा काय बरेच लोक मारतात.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2017 - 10:53 pm | श्रीगुरुजी

"सामना" नामक तुफान विनोदी प्रकाशन वाचले तर सर्व उत्तरे मिळतील.

हतोळकरांचा प्रसाद's picture

10 Apr 2017 - 10:55 pm | हतोळकरांचा प्रसाद

मी सामना वाचत नाही, महाराष्ट्रात भरपूर विनोदी लेखक असल्याने विनोदी लेखनाची वानवा नाही!

राजाभाऊ's picture

9 Apr 2017 - 8:28 pm | राजाभाऊ

पैलवान, त्याचं काय आहे काहिंना मुळात हि समस्या का उद्भवली हे समजुन घेण्यात किंवा त्या समस्येचं निवारण करण्यात काडीचाहि इंटरेस्ट नसतो किंवा त्याचं आकलन करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते. कस्टमर सर्विस इज ए रुटकॉज ऑफ धिस इशु बट नो वन इज अ‍ॅड्मिटिंग धिस बिग एलिफंट इन दि रुम. सेनेने कधीतरी शेपटावर पाय दिलेला असल्याने संधी मिळेल तेंव्हा स्कोर सेटल करायला हे पुढे असतात; त्यांची बाजुहि समजुन घ्या... ;)

तर मुळात "कस्टमर सर्विस" हा प्रकार एयर इंडिया किंवा बहुतांश सरकारी कंपन्यांच्या खिजगणतीतहि नाहि/नसतो. गायकवाडांची तक्रार एखाद्या शहाण्या, मच्युअर्ड माणसाने ऐकुन घेतली असती तर त्यांना तिथेच शांत करता आलं असतं. प्रकरण पुढे चिघळलं, यात चुक कोणाची? सुकुमारची आहेच पण काहि अंशी एयर इंडियाची देखील आहे. आताचे नविन सिएम्डी लोहानी कर्तबगार आहेत असं ऐकुन आहे. गायकवाडांवर बंदि घालण्या व्यतिरीक्त अशा प्रकारचे इशुज भविष्यात होऊ नयेत न्हणुन यांनी काय पावलं उचललेली आहेत? अंतर्गत चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे का? सुकुमार किंवा सगळ्या कस्टमर फेसिंग कर्मचार्यांना योग्य ट्रेनिंग देण्याची व्यवस्था केली आहे का? विमान व्यवसाय अत्यंत डायनॅमिक आहे; वारंवार होणारे बदल ग्राहकाला ताबडतोब पोचले जावे, त्याची पर्यायी व्यवस्था गैरसोय न होता करण्यात यावी - या साठी कंपनी बांधील आहे अशी मेटॅलिटी/धोरणं राबवली जाणार आहेत का?

या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील अशी अशा करुया...

मराठी_माणूस's picture

10 Apr 2017 - 10:33 am | मराठी_माणूस

सगळे आरोप एकतर्फी होत आहे . त्या अधिकार्‍याने जी मुक्ताफळे उधळली आहेत त्याचे काय (http://www.loksatta.com/desh-videsh-news/air-india-bal-thackeray-shiv-se...)

सेवा त्रुटीचे अजुन एक उदाहरण
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/choked-toilet...
प्रवाशांचे काय हाल झाले असतील कल्पना करवत नाही.

प्रसाद_१९८२'s picture

10 Apr 2017 - 11:22 am | प्रसाद_१९८२

या वरच्या लोकसत्ताच्या लिंक मधून, खाली दिलेली, ठळक वाक्य वाचून तर मी हसून हसून मेलो. :))

<<
‘‘मी प्राध्यापक आहे. माझा स्वभाव विनम्र आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कारात वाढलेला मी कडवा शिवसैनिक आहे.. पण माझ्याविरुद्ध कुभांड रचले गेले. मुद्दाम त्रास दिला गेला. जसे महात्मा गांधींचे सामान रेल्वेतून ब्रिटिशांनी फेकून दिले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (अमेरिकेने) व्हिसाबंदी घातली होती तशी दडपशाही चालू आहे..’’
<<

या चप्पलमार खासदारांने स्वत:ची तुलना चक्क महात्मा गांधींबरोबर केलेय. इतिहासाच्या आजवर वाचलेल्या कोणत्याही पुस्तकात 'दक्षिण अफ्रिकेत, महात्मा गांधी यांना ट्रेनमधून खाली उतरवल्यानंतर, महात्मा गांधी यांनी, त्यांना ट्रेन मधून खाली उतरवणार्‍या ब्रिटीश अधिकार्‍याचे थोबाड २५ वेळा पायातील सँडल/चप्पल यांनी फोडलेले अजिबात वाचले नाही.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2017 - 2:48 pm | श्रीगुरुजी

चामडी वाचविण्यासाठी गायकवाड निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखा सातत्याने खोटे बोलतोय.

लोकसत्तातील बातमीत तो सांगतोय की " दिल्लीत पोचल्यानंतर मी तक्रार नोंदवही मागितली. पण ती दिली गेली नाही.". पण https://www.youtube.com/watch?v=ssZlfXZC8_8 या चित्रफितीत तो स्वतःच्या तोंडाने सांगतोय की मी हवाईसुंदरीला तक्रारवही मागितल्यावर तिने ती आणून दिली आणि मी त्यात तक्रार लिहून दिली.

लोकसत्तातील बातमीत तो सांगतोय की त्याच्या या गैरवर्तणुकीने माझा संयम संपला आणि मीही त्याला ढकलून दिले.. पण घटना घडली त्याच दिवशी त्याने कॅमेर्‍यासमोर मोठ्या अभिमानाने सांगितले होते की मी कर्मचार्‍याला २५ वेळा चपलेने मारले.

लोकसभेत तो सांगतोय की मी विनम्र स्वभावाचा आहे. पण घटना घडल्याच्या दिवसापासून सातत्याने त्याची मग्रुरी आणि माज शब्दाशब्दातून दिसतोय.

लोकसभेत गायकवाड सांगतोय की "माझ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (भारतीय दंडविधानामधील ३०८ कलम) दाखल केलाय. विमानात चढताना शस्त्रे घेऊन जाता येत नाहीत. माझ्याकडे काहीही नव्हते. तर मग मी खुनाचा प्रयत्न कसा काय करू शकतो?". विमानातून ढकलून द्यायला शस्त्राची गरज नसते हे उधोजींना व राऊतला सुद्धा कळेल. मग इतरांना समजणार नाही का? आणि सँडलसुद्धा शस्त्र म्हणून वापरता येतेच की.

स्वतःला प्राध्यापक म्हणवणारा आणि सखासदारकीची शपथ घेताना खरे बोलेन अशी शपथ घेणारा हा माणूस धादांत खोटे बोलत आहे.

गामा पैलवान's picture

10 Apr 2017 - 6:46 pm | गामा पैलवान

बरोबरे श्रीगुरुजी! चामडी वाचवण्यासाठीच गायकवाड पोलिसांना आणण्याचा हट्ट धरून बसले होते. पण सुकुमारने पोलिसांना न बोलावता गायकवाडांचा माज परस्पर उतरवायचा प्रयत्न केला.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2017 - 10:45 pm | श्रीगुरुजी

वरील प्रतिसाद वाचला तर राऊत आणि उधोजी सुद्धा खो खो हसत सुटतील.

गामा पैलवान's picture

11 Apr 2017 - 12:18 am | गामा पैलवान

प्रसारमाध्यमांनी कितीही काड्या घातल्या तरी प्रकरण हास्यास्पद होत चाललंय एकंदरीत !
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2017 - 2:18 pm | श्रीगुरुजी

गायकवाड, राऊत, उधोजी आणि शिवसेनेच्या फुशारक्या व वर्तन कायमच हास्यास्पद राहिले आहे.

गामा पैलवान's picture

11 Apr 2017 - 4:59 pm | गामा पैलवान

अहो गुरुजी, तुम्ही देखील हसंत बसायचं होतं नं! कशाला उगीच इतका वाद घातलात!
आ.न.,
-गा.पै.

मोदक's picture

13 Apr 2017 - 12:59 pm | मोदक

बाकी सगळं जाऊदे... नेते साहेबांच्या भाषणाला मागून ज्याने कोणी मराठीत प्रॉम्प्टिंग केले आहे ते ऐकून मजा आली... =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Apr 2017 - 3:17 pm | हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी,
(कडेलोट झाला म्हणून खाली प्रतिसाद देत आहे)

ते जाऊ देत. भाषांतर कधी टाकताय?

हे तुम्ही व्हाइल लूपमध्ये लिहिलंत तरी माझी काही हरकत नाही. वरचे सगळे प्रतिसाद वाचलेत तर माफीनामा वगैरे किती फोल आहे ते कळेल (अर्थात कळून घ्यायचे असेल तर). माफी शब्द दाखवायचा राहूनच गेला आहे, पण असो! त्यातच आनंद आहे ना, मग ठिकाय!

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2017 - 3:27 pm | श्रीगुरुजी

तुम्ही आधी भाषांतर द्या हो. ते न देता कसे दावे करता?

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Apr 2017 - 9:03 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुमच्या आधीच्या प्रतिसादातून माफी मागितली (जणू काही विमान कंपनीची आणि उद्दाम कर्मचाऱ्यांची) हा दावा फोल ठरलाच आहे. पण तरीही तुमचा हट्टच चालू आहे म्हणून हे भाषांतर. आतातरी स्वतःचा फोल दावा सोडून माफी (आणि तीही विमान कंपनीची) शब्द दाखवाला जाईल हि (व्यर्थ) अपेक्षा.

"हे पत्र मी अमुक अमुक दिवशी अमुक अमुक विमानात अमुक अमुक सीटवर झालेल्या दुर्दैवी प्रकारणाबद्दल खेद व्यक्त करण्यासाठी लिहीत आहे.

परिस्थिती ज्या थराला पोहोचली त्या थराला ती पोहोचावी असा कोणाचाही हेतू असणं शक्य नव्हतं. अर्थात चालू असलेली कायदेशीर चौकशी खरे काय घडले त्याचा क्रम, जबाबदारी आणि सत्य बाहेर काढेलच, पण तोपर्यंत हि घडलेली घटना भविष्यात परत घडेलच अशा पद्धतीने पाहिली जाऊ नये.

माझ्यावर लादण्यात आलेल्या उड्डाणनबंदीमुळे माझ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडताना अडचणी येत असून त्याचा कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे मी विनंती करतो की ही बंदी उठवली जावी आणि चालू असलेल्या कायदेशीर चौकशीला घडलेल्या प्रसंगाची जबाबदारी ठरवु द्यावी."

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2017 - 10:26 pm | श्रीगुरुजी

हे स्वतःच्या मनाने स्वतःला सोयिस्कर असा अर्थ काढून केलेले भाषांतर असून स्वतःला सोयिस्कर निष्कर्ष काढलेला आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2017 - 5:44 pm | श्रीगुरुजी

गायकवाडने युनायटेड एअरलाइन्सने प्रवास केला तर खरी मजा येईल. दोघात शेवटी कोण सरस ठरेल ते बघणे रोचक ठरेल.