नमस्कार मंडळी,
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवीन भाग काढत आहे. नवीन प्रतिसाद लिहायचे असतील तर ते या भागात लिहावेत आणि आधीच्या भागात लिहिलेल्या प्रतिसादांना उत्तर लिहायचे असेल तरच ते त्या भागात लिहावेत ही विनंती. या महिन्यात पहिल्या दोन भागात मिपा परंपरेला अनुसरून चांगली चर्चा झाली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार.
नितीशकुमार परत राजदबरोबर गेले तेव्हा मी त्यावेळेस चर्चेत मी म्हटले होते की समाजवादी नेते भांडण्यासाठी एकत्र येतात आणि एकत्र येण्यासाठी भांडतात. तसेच समाजवादी विचारांचे पक्ष किती वेळा एकत्र आले आणि किती वेळा तुटले याचा हिशेब ठेवणे कोणाही मर्त्य मानवाला शक्य होईल असे वाटत नाही. ते का हे या भागात इथे टाईमलाईनच्या मदतीने स्पष्ट करतो.
१९३० चे दशक: जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि आचार्य जीवतराम कृपलानी यांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९४९: जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी काँग्रेस सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९५१: आचार्य कृपलानींनी काँग्रेस सोडून स्वत:च्या किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केली.
१९५२: पहिल्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर प्रजा पक्ष एकत्र येऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना
१९५५: राममनोहर लोहियांनी प्रजा समाजवादी पक्ष सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९६४: कर्पुरी ठाकूर यांनी प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडून स्वत:च्या संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना केली. जॉर्ज फर्नांडिस यांचा पण संयुक्त समाजवादी पक्षात प्रवेश
१९६७ - चरणसिंग यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून भारतीय क्रांती दलाची स्थापना केली.
१९६९ - बिजू पटनाईक यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून उत्कल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षात फूट-- इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(आर) आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(ओ) पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९७२ - १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी एकत्र येऊन नव्या समाजवादी पक्षाची स्थापना
१९७४ - चरणसिंगांचा भारतीय क्रांतीदल, बिजू पटनाईकांचा उत्कल काँग्रेस, १९७२ मध्ये स्थापन झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला मिनू मसानी-पिलू मोदींचा स्वतंत्र पक्ष आणि १९७३ मध्ये भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला स्वत:चा पक्ष एकत्र येऊन भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना
१९७७ - जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा आणि नंदिनी सत्पथी काँग्रेसबाहेर पडून त्यांनी स्वत:चा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हा पक्ष स्थापन केला.१९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी, भारतीय लोकदल, काँग्रेस(ओ) आणि भारतीय जनसंघ यांनी भारतीय लोकदलाच्या हलधर या चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर या पक्षांचे जनता पक्ष या नव्या पक्षात विलीनीकरण.
१९७८ - शरद पवार, वायलार रवी, अंबिका सोनी आणि के.पी.उन्नीकृष्णन यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून काँग्रेस(समाजवादी) या पक्षाची स्थापना केली.
१९७९: चरणसिंग, राजनारायण इत्यादी नेत्यांनी जनता पक्ष सोडून जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला आणि जनता पक्षाचे सरकार पाडले. चरणसिंग औटघटकेचे पंतप्रधान झाले.
१९८०- लोकसभा निवडणुकांमध्ये धुव्वा उडल्यानंतर चरणसिंग जनता पक्ष(सेक्युलर) बाहेर पडले आणि स्वत:च्या भारतीय लोकदल पक्षाची पुनर्स्थापना केली. जगजीवन राम जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा काँग्रेस(जे) पक्ष स्थापन केला. जनता पक्षातून पूर्वाश्रमीचे जनसंघाचे नेते बाहेर पडून त्यांनी स्वत:च्या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
१९८०/१९८१: चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून देवीलाल यांच्या स्वत:च्या लोकदल(बी) पक्षाची स्थापना केली.
१९८७-- काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी जनमोर्चा या अराजकीय गटाची स्थापना केली. शरद पवार, अंबिका सोनी आणि वायलार रवी काँग्रेसमध्ये परतले. के.पी.उन्नीकृष्णन काँग्रेस(एस) बरोबर राहिले.
१९८८-- चरणसिंगांचा (त्यांच्या मृत्यूनंतर अजितसिंगांचा) लोकदल, देवीलालांचा लोकदल, काँग्रेस(एस), वि.प्र.सिंगांचा जनमोर्चा एकत्र येऊन जनता दलाची स्थापना.
१९८९- लोकसभा निवडणुकांनंतर जनता दलाचा गटनेता (म्हणजेच होणारा नवा पंतप्रधान) निवडायच्या वेळेस चंद्रशेखर आणि वि.प्र.सिंग हे दोन दावेदार होते. अरूण नेहरू आणि पत्रकार कुलदीप नय्यर यांना हाताशी धरून वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखर यांना मात द्यायचा डाव खेळला. बैठक सुरू होताच ताबडतोब इतरांना कोणालाही बोलायची संधी न देता वि.प्र.सिंगांनी देवीलालांचे नाव नेतेपदावर सुचविले. काही क्षणातच पुढील पंतप्रधान देवीलाल असतील अशा तारा वर्तमानपत्रांच्या ऑफिसात गेल्याही होत्या. पण देवीलालांनी आपले वय ७५ उलटून गेले असल्याने इतकी मोठी जबाबदारी आपल्याला नको असे म्हटले आणि नेतेपदासाठी वि.प्र.सिंगांचे नाव सुचविले. हे सगळे चंद्रशेखरांना अंधारात ठेऊन ठरवून केले गेले होते. त्यातून चंद्रशेखर दुखावले गेले आणि ते वि.प्र.सिंगांच्या शपथविधीलाही हजर नव्हते.
१९९०- चंद्रशेखर आणि देवीलाल जनता दलाबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:च्या समाजवादी जनता दल या पक्षाची स्थापना केली. चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले. राजस्थानात दिग्विजयसिंग (मध्यप्रदेशातील वाचाळवीर दिग्विजियसिंग वेगळे) या स्थानिक नेत्याने जनता दल सोडून स्वत:चा गट स्थापन करून भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि भैरोसिंग शेखावतांचे अल्पमतातले सरकार तारले.
१९९१-- चिमणभाई पटेल यांनी समाजवादी जनता दलातून बाहेर पडून स्वत:च्या जनता दल(गुजरात) पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने आपले सरकार तारले.
१९९२- अजितसिंग जनता दलाबाहेर आणि त्यांनी स्वत:चा जनता दल(अजित) हा पक्ष स्थापन केला. मुलायमसिंग यादव समाजवादी जनता दलाबाहेर पडून त्यांनी स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. चिमणभाई पटेल यांचा जनता द्ला(गुजरात) हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन.
१९९३-- जनता दल, समाजवादी जनता दल आणि जनता दल (अजित) यांची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका एकत्र लढवायची घोषणा. पण उत्तर प्रदेशात जोरदार पराभव झाल्यानंतर अजित सिंगांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९० मध्ये राजस्थानात भैरोसिंग शेखावतांचे सरकार तारणारे दिग्विजयसिंग काँग्रेसमध्ये गेले.
१९९४- जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि रबी रे यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. नंतर देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी पण समता पक्षात प्रवेश केला.
१९९६-- चंद्रशेखर यांनी पण समता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवली. पण निवडणुकांनंतर त्यांनी आपला समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) ची स्थापना केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी अजितसिंग काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला. निवडणुकांनंतर रामकृष्ण हेगडेंची जनता दलातून हकालपट्टी. त्यांनी स्वत:चा लोकशक्ती हा पक्ष स्थापन केला.
१९९७-- देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा हरियाणा लोकदल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे नाव १९९९ मध्ये बदलून इंडिअन नॅशनल लोकदल हे झाले. नवीन पटनाईक यांनी जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दल हा पक्ष स्थापन केला.
१९९९--- उरल्यासुरल्या जनता दलात जनता दल(धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल(संयुक्त) हे दोन तुकडे पडले. देवेगौडा आणि कुमारस्वामी जनता दल(धर्मनिरपेक्ष) मध्ये तर रामविलास पासवान जनता दल(संयुक्त) मध्ये सामील. समता पक्ष आणि लोकशक्ती हे दोन पक्षही जनता दल (संयुक्त) मध्ये विलीन. १९९९ मध्ये कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल (संयुक्त) हे दोन्ही गट होते. २००५-०६ च्या दरम्यान कर्नाटकातील जनता दल (संयुक्त) पक्ष अस्तंगत झाला.
२००२-- रामविलास पासवान यांनी जनता दल(संयुक्त) सोडून आपला लोकजनशक्ती हा पक्ष स्थापन केला.
२००६-- कर्नाटकात सिध्दरामय्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) मधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले. पुढे २०१३ मध्ये ते काँग्रेसकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
२०१४-- मोदीलाटेत सगळे पक्ष वाहून गेल्यानंतर परत एकदा जनता दलाचे पुनरूज्जिवन करायची घोषणा. पण ती प्रत्यक्षात आली नाही.
२०१७-- नितीशकुमारांनी परत एकदा भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर नाराज शरद यादवांचा अनामिक एक व्यक्ती असलेला स्वतंत्र गट.
२०२२-- नितीशकुमार यांनी परत लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली.
या सगळ्या ब्रम्हघोटाळ्यात कितीतरी मधल्या पायऱ्या मी विसरलो आहे हे नक्की. १९८०/८१ मध्ये कधीतरी देवीलालांनी चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून आपला लोकदल (बी) पक्ष स्थापन केला हे वर लिहिलेच आहे. १९८७ मध्ये चरणसिंगांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र अजितसिंग चरणसिंगांच्या लोकदल पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तो गट लोकदल(ए) नावाने ओळखला जाऊ लागला. मुलायमसिंग यादवही त्याच पक्षात होते. चरणसिंगांनंतर पक्षाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल असे मुलायमसिंगांना वाटत होते पण अजितसिंग हे चरणसिंगांचे पुत्र असल्याने ते अनेक वर्षे अमेरिकेतले आपले वास्तव्य आणि ग्रीनकार्ड सोडून आले आणि ते अध्यक्ष बनले. अजितसिंग आणि मुलायमसिंग यादव यांचे जमायचे नाही. त्यामुळे अजितसिंगांनी मुलायमसिंगांना पक्षातून बाहेर काढले होते. हे १९८७/८८ मध्ये कधीतरी झाले. ते नक्की कधी झाले हे मला माहित नाही. हेच सगळे लोक १९८८ मध्ये जनता दलात परत एकत्र आले होते.
१९८९ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानपदासाठी वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखरांना धोबीपछाड दिला हे वर लिहिलेच आहे. त्याचा सूड मग चंद्रशेखरांनी लगेच उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री नेमताना उगवला. अजितसिंग मुख्यमंत्री व्हावेत असे वि.प्र.सिंगांना वाटत होते तर चंद्रशेखरांचे उमेदवार होते मुलायमसिंग यादव. चंद्रशेखरांचा गट भारी पडला आणि उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. पुढे मार्च १९९० मध्ये बिहारमध्ये मुख्यमंत्री निवडायच्या वेळेस वि.प्र.सिंगांचे उमेदवार होते रामसुंदर दास तर त्यांना आव्हान दिले होते लालू यादवांनी. लालूंनी चंद्रशेखरांकडे मुख्यमंत्री व्हायला मदत मागितली तेव्हा चंद्रशेखरांनी स्वतःचा रघुनाथ झा हा उमेदवार उभा केला. तेव्हा नेतेपदासाठी आमदारांमध्ये निवडणुक झाली होती. त्या निवडणुकीत रघुनाथ झांनी रामसुंदर दासांची मते फोडून लालूंचा विजय निश्चित केला. भारतीय राजकारणातील दोन सगळ्यात घाणेरडे लोक- लालू आणि मुलायमसिंग यादव या राजकारणातून पुढे आले आहेत.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या पार्श्वभूमीवर परत नितीश आणि तेजस्वी/लालू फुटले तर अजिबात आश्चर्य वाटू नये.
प्रतिक्रिया
15 Aug 2022 - 12:07 pm | जेम्स वांड
गडकरींना ट्विट करून बघा सर, कदाचित आणतील असा नियम मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत एखाद नवीन कलम घालून
15 Aug 2022 - 9:17 pm | अर्जुन
मोटर वाहन कायद्यात नियम तर भरपूर आहेत. पण नियम पाळण्यापेक्षा नियम मोडण्यास प्राधान्य देणार्या जनतेमूळे त्यांचा काही उपयोग होणार नाही. त्यासाठी लोकांनीच जबाबदार व्हायला हवे. ऊदा.ड्रायवरने स्वःताचा, कूटूंबाचा विचार करुन नकार दिला पाहीजे.
15 Aug 2022 - 10:16 pm | जेम्स वांड
कैक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर तर हेल्मेट विरुद्ध बोंब ठोकणारे लोक पाहायला मिळतात अर्जुन सर, एकतर हेल्मेट सारख्या प्राणरक्षक प्रकारची सक्ती करावी लागणे हेच एक जय हिंद प्रकरण, त्यातही आकांडतांडव अन् जीवाचा आटापिटा करून हेल्मेट घालण्याचा नियमच नको म्हणून लोक ओरडताना बघितलेत एकेकाळी सोशल मीडिया वर, अर्थात अजूनही ओरडत असतील, फक्त मी बहुसंख्य सोशल मीडिया delete करून बरेच दिवस झालेत, त्यामुळे सुखी आहे म्हणायचं.
15 Aug 2022 - 10:30 pm | मदनबाण
कैक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर तर हेल्मेट विरुद्ध बोंब ठोकणारे लोक पाहायला मिळतात
हेल्मेटसक्ती
बघा मणोरंजण होते का ते ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister
16 Aug 2022 - 7:36 am | जेम्स वांड
अजी म्या इथं पण ब्रह्म पाहिले
17 Aug 2022 - 6:35 pm | मदनबाण
अरेच्च्या... हा धागा मी विसरलोच होतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar
16 Aug 2022 - 12:37 am | अर्जुन
हेल्मेट हे स्व:तच्या व आपल्या कुटंबाच्या भल्यासाठी वापरा. माझे आवाहन हे ज्यांची सारासार विवेक्बूद्धी शाबूत आहे त्यांचासाठी आहे. बोंब ठोकणारे लोकांना आपल्या कर्माची फळे भोगू द्या. .......................
15 Aug 2022 - 12:30 am | मदनबाण
मध्यंतरी चंद्रावर रॉकेट आदळल्याची बातमी माझ्या पाहण्यात आली होती, पण नंतर या घटनेचा मला विसर पडला. पण काल आचानक टाळक्यात चंद्र पेटला ! :))) युट्युबर या घटनेचे काही व्हिडियो आहेत, त्यातल्या त्यात उत्तम व्हिडियो शोधला. [ हा १००% सत्य आहे का ? हे मला तरी सांगता येत नाही, परंतु या व्हिडियो खाली ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या पाहता हा योग्य व्हिडियो असावा असे वाटते.
चंद्रावर रॉकेट आदळले असे म्हणतात पण शास्त्रज्ञांना मात्र याचे गूढ सोडवता येत नाही असे दिसते ! या आघाताने २ विवरांचे निर्माण झाले आहे, आघात एका गोष्टीचा होऊन २ विवर कसे काय निर्माण झालेत ? हा गहन प्रश्न त्यांना अजुन तरी हाती असलेल्या प्रकाशचित्रांवरुन सोडवता आलेला नाही. [ ही प्रकाशचित्रे नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter ने घेतल्याचे समजते. ]
जानेवारी महिन्या एलॉन मस्कच्या स्पेस एक्स चे रॉकेट चंद्रावर आदळणार आहे अश्या स्वरुपाच्या बातम्या होत्या व तारिख देखील ४ मार्च अशी दिली गेली होती. परंतु स्पेस एक्स ने हात वर केले मग अमेरिकेने चीन चे २०१४ मधील Chang’e 5-T1 launch असल्याचा दावा केला, पण चीन ने देखील हात वर केला. मग नक्की कोणाचे आणि काय आदळले हे कळायला मार्ग नाही.
चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव नील आर्मस्ट्राँग आणि अपोलो मिशन्स यावर माहिती पाहण्याचा उध्योग सुरु केला, हे करताना मला एका चॅनलवर अपोलो ११ मुन लँडिंग रिअल टाईम सिम्युलेशनचा व्हिडियो पाहिला, जो मला फार आवडला.
आर्मस्ट्राँग वर अधिक शोध घेतल्यावर मला एक नविन माहिती मिळाली ती म्हणजे हा नंतर अॅमेझॉनच्या जंगलात शोध मोहिमेवर गेला होता ! चंद्रावर जाऊन परत येणारा माणुस डायरेक्ट अॅमेझॉनचे जंगल का गाठतो ? खालील व्हिडियोत त्याचे उत्तर मिळते का ते पहा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister
15 Aug 2022 - 1:49 pm | अर्जुन
मी नेटवर शोधल्यावर खालील माहीती मिळाली.
नील आर्मस्ट्राँग आणि त्याच्या अपोलो 11 च्या क्रूला एलियन स्पेसक्राफ्टचा सामना करावा लागला. हे अर्थातच नासा (नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) ने गुप्त ठेवले. आता नील आर्मस्ट्राँग स्वत: लोकांसमोर खरोखर काय घडले हे कबूल करत नाही . जरी एलियन आणि यूएफओला मीडिया स्पॉटलाइटमध्ये स्थान होते तरीही 1960 च्या दशकात अमेरिकन लोकांनी ते फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही.
अमेरिकन स्पेसशिपमध्ये चंद्रावर गेलेल्या आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिनच्या चंद्रावर उतरण्याच्या प्रक्षेपणाच्या वेळी, दोन मिनिटे व्यत्यय आला होता, ज्यामध्ये प्रतिमा आणि आवाज बंद झाले होते. नासाने दावा केला की, ही समस्या एका टेलिव्हिजनमूळे परिणाम झाला. कॅमेरे जे जास्त गरम झाले होते, त्यामुळे रिसेप्शनमध्ये व्यत्यय आला.
या अनपेक्षित समस्येने अगदी जाणकार दर्शकांनाही आश्चर्यचकित केले जे इतक्या खर्चिक प्रकल्पात, सर्वात आवश्यक यंत्रणापैकी एक कशीकाय नादुरुस्त होऊ शकते? ऐतिहासिक चंद्र लँडिंगच्या काही काळानंतर, क्रिस्टोफर क्राफ्ट, बेसचे संचालक ह्यूस्टन, यांनी जेव्हा त्याने नासा सोडले तेव्हा काही आश्चर्यकारक टिप्पण्या केल्या.
[खालील] संभाषणांमध्ये समाविष्ट असलेल्या या टिप्पण्यांमधील मजकूर शेकडो हौशी रेडिओ ऑपरेटरद्वारे, (ज्यांनी त्यांचे रेडिओ, अंतराळवीर प्रसारित करतात, त्याच फ्रिंकेंसीशी जोडले होते) पुष्टी केली गेली आहे ज्यां दोन मिनिटांच्या व्यत्ययादरम्यान - जे व्यत्यय वाटत होते तसे नव्हते, तर केप केनेडीसह नासा, आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन यांनी प्रतिमा आणि आवाज दोन्ही लपवले होते.या दाव्याला आधार आहे कारण एका क्षणी आर्मस्ट्राँगच्याचंद्रावर उतरण्याच्या प्रक्षेपणाच्या दरम्यान, आर्मस्ट्राँगने टेलिव्हिजनवर ऐकल्या जाणार्याफ्रिंकेंसीवर प्रसारित करणे थांबवले आणि केवळ मिशन कंट्रोलद्वारे ऐकू येणार्या त्याच्या वैद्यकीय फ्रिंकेंसीवरच संवाद साधला.
रिचर्ड वॉटसन आणि ASSK [P.O. बॉक्स 35 माउंट शास्ता CA. ९६०६७ (९१६)-९२६-२३१६); यांच्या पूस्तकात function at() { [native code] }अfunction at() { [native code] }अ1987; पृष्ठ 147-148] अपोलो 11 च्या वरील उल्लेखनीय संवादाची खालील नोंद आहे,
येथे अमेरिकन अंतराळवीर आणि नियंत्रण केंद्र यांच्यातील संवाद दिलेले आहेत:
आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन: त्या महाकाय गोष्टी आहेत. नाही, नाही, नाही - हा ऑप्टिकल भ्रम नाही. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही!
ह्यूस्टन (क्रिस्टोफर क्राफ्ट): काय... काय... काय? हे काय होत आहे? तुला काय झाले?
आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन:ते येथे पृष्ठभागाखाली आहेत.
ह्यूस्टन:तिथे काय आहे? (दबलेला आवाज) संवादाचे प्रक्षेपण थांबवले आहे; 'अपोलो 11' कॉलिंग
आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन:आम्ही काही अभ्यागत पाहिले. ते काही काळ इथे यंत्रणेचे निरीक्षण करत होते.
ह्यूस्टन:आपल्या शेवटच्या माहितीची पुनरावृत्ती करा!
आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन: मी म्हणतो की इतर स्पेसशिप्स होत्या. ते विवराच्या दुसऱ्या बाजूला रांगेत उभे आहेत!
ह्यूस्टन: पुनरावृत्ती करा, पुनरावृत्ती करा!
आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन: चला या फ्रिंकेंसीम्धे बदल करूया... 625 ते 5 मध्ये. [ कदाचीत आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन वाटले असावे की, आवाज नीट प्रक्षेपीत होत नाही].. ऑटोमॅटिक रिले कनेक्ट झाले आहे... माझे हात इतक्या वाईट रीतीने थरथर कापत आहेत की मी काहीही करू शकत नाही. त्याचे चित्रीकरण? देवा, जर या शापित कॅमेऱ्यांनी काही रेकोर्ड केले असेल तर - मग काय?
ह्यूस्टन:तुम्ही काही रेकोर्ड केले आहे का?
आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन: माझ्या हातात एकही केमेरा नव्हता. बशीचे [UFO]तीन शॉट्स किंवा ते जे काही होते ते केमेरा खराब करत होते
ह्यूस्टन:थांबा, ईथेच थांबा. तुम्ही तुमच्या मार्गावर आहात का? UFOs वर काय गडबड आहे?
आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन:ते इथे उतरले आहेत. ते तिथे आहेत आणि ते आम्हाला पहात आहेत.
ह्यूस्टन:आरसे, आरसे - आपण ते सेट केले आहेत?
आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन: होय, ते योग्य ठिकाणी आहेत. पण ज्यानी त्यांचे अवकाशयान बनवले आहे, ते नक्कीच उद्या येऊन त्या काढू शकतात ओवर अण्ड आउट.
15 Aug 2022 - 2:03 pm | मदनबाण
काही काळा पासुन अमेरिका युएफओ रिलेटेड माहितीवर उघडपणे बोलत आहे. [ काही काळा पूर्वी मी मिपावर युएस नेव्हीच्या पोर्टलचाच संदर्भ देऊन त्यांनीच रिलीज केलेले व्हिडियो दिल्याचे स्मरते ! तो धागा नक्की कोणता ? ते काही मला आता आठवत नाही. मुनी तुम्हाला तो धागा आठवला तर नक्की सांगा, तुम्ही त्यात बहुतेक इंडिया टिव्हीचा युएफो वरील व्हिडियो फार मोठा आकार करुन टाकला होतात बघा.]
तर... मागच्या महिन्यात याच विषयावर Congressional Hearing झाली, त्याचे लाईव्ह प्रसारण देखील करण्यात आले होते. मला एक समजत नाही, इतके काळ या गोष्टींवर प्रचंड गुप्तता पाळणारे आता उघडपणे का बोलु लागले आहेत ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister
15 Aug 2022 - 2:11 pm | गामा पैलवान
मदनबाण,
तुम्ही दिलेलं चलचित्रं समलक्षण ( सिम्युलेशन ) आहे.
चंद्राची त्रिज्या सुमारे १७५० किमी. चित्रातली वस्तू चंद्राच्या त्रिज्येच्या सुमारे १/५० आकाराची दिसते. म्हणून तिचा व्यास सुमारे ३५ किमी होईल. इतकी मोठी वस्तू चंद्रापर्यंत नेणं शक्य नाही.
आ.न.,
-गा.पै.
15 Aug 2022 - 2:25 pm | मदनबाण
ओक्के. _/\_
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister
15 Aug 2022 - 8:56 am | आग्या१९९०
खूप चांगला निर्णय.
https://www.moneycontrol.com/news/business/economy/finance-ministry-plan...
15 Aug 2022 - 2:12 pm | गामा पैलवान
सहमत आहे. खरंच खूप चांगला निर्णय आहे.
-गा.पै.
15 Aug 2022 - 12:13 pm | मुक्त विहारि
‘ब्राह्मणांची पोरं…’ फडणवीस यांच्यावर टीका करताना कॉंग्रेस खासदाराची जीभ घसरली.
https://www.loksatta.com/nagpur/congress-mp-dhanorkar-criticizes-fadnavi...
कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. ब्राह्मण समाजावर टीका करताना शिवराळ भाषा वापरली.
15 Aug 2022 - 5:59 pm | चौकस२१२
बबरोबरच नाही का ते .. अहो मोदी नाही का ३.५% , शहा बी ३.५% आणि योगी तर आहेतच ३.५% , , मुर्मू पण ३.५% , कोविंद पण ३.५%
एवढाच काय शहजाद पुनावाला पण ३.५% मधले ( अहो नावात पूना आहे मग काय शंका घ्यायची नाही
सगळं भाजपचा डाव हाय संगी हे नुसतेच धर्मवादी नाहीत तर जातीवादी पण आहेत
आमच्या काँग्रेस ला मात्र हि लागण नाही बघा
कै मुकर्जी मात्र नाहीत ३.५%
ममता बॅनर्जी नाहीत ३.५%
खुद्द पंडित नेहरू नाहीत ३.५%
राहुल राजकुमार मात्र नाहीत ३.५% ( म्हणेनात एक ते स्वतःला जनेउ धारी कोण लक्ष देतो )
कै नरसिह राव पण नाहीत ३.५%
शंकर दयाळ शर्मा नाहीत ३.५%
सी राजगोपालाचारी नाहीत ३.५%
केरळ चे नंबुद्रिपाद नाहीत ३.५%
जयललिथा नाहीत ३.५%
गोविंद बल्लभ पंत नाहीत ३.५%
शैलाताई दोक्षित नाहीत ३.५%
हेमवती नंदन बहुंगूणा नाहीत ३.५%
नारायण दत्त तिवारी नाहीत ३.५%
अजोय कुमार मुकर्जी नाहीत ३.५%
या शिवाय साठे नागपूरचे इंदिरा परम भक्त ते तरी कुठे ३.%
समाजवादी ना ग गोरे नाहीत ३.५%
समाजवादी एस एम जोशी नाहीत ३.५%
समाजवादी मधू दंडवते नाहीत ३.५%
15 Aug 2022 - 12:16 pm | मुक्त विहारि
डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीचा छळ करणाऱ्या तरुणाला राजस्थानमधून अटक
https://www.loksatta.com/thane/a-young-man-who-molested-a-minor-girl-in-...
सोहेल सलामउद्दीन खान (१८) असे आरोपीचे नाव आहे. तो राजस्थान मधील चुरू जिल्ह्यामधील तारनगर गावचा रहिवासी आहे.
------
सोशल मिडिया वर वावरतांना, काळजी घेणेच उत्तम....
15 Aug 2022 - 1:24 pm | डँबिस००७
हिंदुंना छळण्याचे उत्तरदाईत्व राजस्थानच्या शांतीदुत समाजाने आपल्या डोक्यावर घेतल्याचे प्रकर्शाने जाणवत आहे. अर्थात त्यासाठी
तिथल्या राज्य सरकारचे नरमाईचे धोरणच कारणीभुत आहे, हे कोणीही सांगु शकेल. अश्या वागण्याने राजस्थान मधली आपली सत्ता हिंदुंच्या रोषामुळे जाईल ईतकी समजही राजस्थान मधल्या काँग्रेसच्या नेत्यांना नसावी ह्याचे आश्चर्य वाटते. हि समज नाही की हा मग्रुर पणा आहे. हिंदु समाजाची पर्वा न करण्याची ?
15 Aug 2022 - 1:49 pm | डँबिस००७
विश्व प्रख्यात लेखक "सलमान रश्दी"च अमेरिकेतील न्युयॉर्क मध्ये निधन झाले. त्यांची हत्त्या २४ वर्षाच्या हादि मतार नावाच्या अमेरिकन ( लेबॅनीज मुळ निवासी ) ने केली.
सलमान रश्दी ने सॅटॅनिक वर्सेस नावाचे वादग्र स्त पुस्तक १९८८ साली लिहिले जे पुढे बर्याच देशात बॅन झाले होते. २४ वर्षाच्या हादी मतारने हे पुस्तक वाचल्याची शक्यता ० % आहे तरी सुद्दा न वाचलेल्या पुस्तकाने हादी मतारच्या भावना दुखावल्या गेल्या व त्याने सलमान रश्दी चीं हत्या केली.
हत्येच्या वेळेला हादी मतारच्या बॅगेत बर्याच गोष्टी सापडल्यापण त्याने सलमान रश्दीचा खुन करण्यासाठी धारदार चाकुचा ऊपयोग केला कारण तोच मार्ग धर्म संमत आहे अस शांतीदुत समाजातील प्रस्थापीतांच म्हणण आहे.
https://indianexpress.com/article/explained/explained-global/salman-rush...
ह्या गदारोळात भारतातली एक बातमी जास्त मिडीयात आली नाही. नुपुर शर्माच्या हत्येच्या कट रचण्यासाठी उप्रदेशातील सहरणपुरहुन
महम्मद नदिम नावाच्या अतिरेक्याला उ प्र पोलिसांनी अटक केलेली आहे. तहरीके तालिबान व जैशे मोहम्मद नावाच्या दोन अतिरेकी
संघटनांशी संलग्न असलेल्या ह्या अतिरेक्याला वेगवेगळे ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेलेले होते. थोड्याच दिवसात तो पाकिस्तानला उच्च शिक्षणासाठी जाणार होता.
15 Aug 2022 - 1:57 pm | श्रीगुरुजी
अरेरे, सलमान रश्दींना श्रद्धांजली. _/\_
15 Aug 2022 - 2:17 pm | श्रीगुरुजी
सलमान रश्दींच्या मृत्युची बातमी कोठेही नाही. CNN वर सुद्धा नाही.
15 Aug 2022 - 2:33 pm | डँबिस००७
सलमान रश्दी ह्यांचा मृत्यु झालेला नसुन अजुनही ते मृत्युशी अजुन झगडत आहेत. काही भारतीय न्युज मध्ये त्यां चा मृत्यु झाला असे वाचनात आले असल्याने चुकुची माहीती गेलेली आहे.
अर्थात त्यामुळे त्यांच्यावर हल्ला केलेल्याचा गुन्हा कमी होत नाही.
15 Aug 2022 - 2:42 pm | आग्या१९९०
खरंच कुठेच हि बातमी सापडली नाही. Don't Rush Die .
15 Aug 2022 - 5:02 pm | शाम भागवत
https://www.youtube.com/watch?v=yaHKLWbiqqI
15 Aug 2022 - 5:33 pm | चौकस२१२
सलमान रश्दीनवर हल्ला झाला हि बातमीच मुळी "फेक न्युज "असावी ... कोणत्या तरी भगव्या आतंकवाद्याने पसरवलेली असावी ...
प्रेमळ धर्माचे शोषितलोक अस काही करत (च) नाहीत ते फक्त गांधीगिरी करीत फिरत असतात .. कधी मुंबई कधी दिल्ली कधी बामियान ( अफगाणिस्तान ) मधली डागडुजी तर कधी न्यु यॉर्क इत्यादी
15 Aug 2022 - 7:08 pm | मुक्त विहारि
अमरावतीत भरचौकात गोळीबार, पण निशाणा चुकला, १३ वर्षीय विद्यार्थिनी थेट रुग्णालयात
https://maharashtratimes.com/maharashtra/amravati/amravati-firing-in-bab...
प्राप्त माहितीनुसार, शहरातील परफेक्ट चिकन सेंटरचा मालिक जुबेर खान आणि अहमद यांच्यामध्ये दुपारी वाद झाला होता. याप्रकरणात अहमदने धमकी दिली होती. दरम्यान, जुबेर खानने आपल्या दुकानात तीन तलवारी आणि पिस्तूल आणून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. अहमद काही लोकांना घेऊन जुबेर खानवर हल्ला करण्यासाठी निघाला होता. जुबेर खान आणि अहमद यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं. तेव्हा जुबेर खानने आपल्या जवळ असलेल्या पिस्तूल मधून तीन राऊंड फायर केले. त्यापैकी एक गोळी ही रस्त्याने जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीला लागली.
--------
शांत अमरावती, अशांत होत आहे का?
16 Aug 2022 - 9:23 pm | कपिलमुनी
भाजप सावरकरांना भारतरत्न का देत नसाबे ??
16 Aug 2022 - 9:26 pm | कपिलमुनी
राणेंची अधिकाऱ्याला मारहाण
पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे सत्ताधारी यात काय फरक आहे ?
एकच फरक - आता सगळीकडे आल इज वेल आहे..
बुरा मत देखो , बुरा मत सूनो.. बुरा मत बोलो
16 Aug 2022 - 9:49 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare
16 Aug 2022 - 10:01 pm | गामा पैलवान
क्लिंटन,
हा लसमृत्यू तर नाही? अचानक अवयव कसे बंद पडू शकतात? शंका घ्यायला वाव आहे.
आ.न.,
-गा.पै.
16 Aug 2022 - 10:14 pm | कपिलमुनी
16 Aug 2022 - 10:15 pm | कपिलमुनी
16 Aug 2022 - 10:47 pm | गामा पैलवान
येकच मारा लेकीन शॉल्लेट मारा. लैच्च आवड्या आपूनकू !
-गा.पै.
17 Aug 2022 - 4:50 am | निनाद
नास्तिक पेरियार पुतळ्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल स्टंट कोरिओग्राफर आणि हिंदू मुन्नानीच्या कला आणि संस्कृती शाखेचे तामिळनाडू अध्यक्ष कानल कन्नन यांना पुद्दुचेरी येथे अटक केली गेली. कानल कन्नन हे हिंदू मुन्नानी या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. हिंदूंचे हक्क परत मिळवण्याची मोहीम हिंदू मुन्नानी ही संघटना चालवत आहे.
श्रीरंगम मंदिराबाहेरील नास्तिक असलेल्या रामासामी पेरियार यांचा पुतळा बसवलेला आहे.
पेरियार त्यांनी तमिळ लोकांना "असंस्कृत" आणि तमिळ भाषेला "असंस्कृत लोकांची भाषा" असे म्हंटले होते. तरीही त्यांचा फार उदोउदो तामिळ्नाडू मध्ये केला जातो. रामासामी यांची ब्राह्मणविरोधी विचारसरणी होती. आणि त्यांचा ते द्वेष करत असत हे त्यांच्या भाषणातून लेखनातून सातत्याने दिसते.
इतकेच नाही तर पेरियार यांना तर भारतापासून स्वातंत्र्य हवे होते. रामासामी पेरियार यांनी प्रस्तावित द्रविडनाडूचा नकाशा ब्रिटिशांना पाठवला होता.
पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावरही रामासामी पेरियार यांनी भारतीय राष्ट्रध्वज जाळण्याची धमकी दिली होती. भारताचा नकाशा जाळून टाकण्याची आज्ञा आपल्या अनुयायांना केली होती.
पुढे ते हिंदू द्वेषी बनले. आणि त्यांनी १९५५ मध्ये रामाचे चित्र त्यांच्या सभेमध्येच जाळले. जाळण्याच्या सार्वजनिक कृत्याबद्दल रामासामी यांना अटक करण्यात आली होती. रामासामी पेरियार उघडपणे हिंदूंना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करत असत.
एम. करुणानिधी आताच्या स्टालिन या मुख्यमंत्र्यांचे वडील यांनी या विचारसरणीला मोठा पाठिंबा दिला होता. आज स्टालिन पण त्याच मार्गाने जात आहेत.
अशा या पेरियारचा पुतळा श्रीरंगम मंदिराबाहेर बसवला गेला आहे. त्याला हिंदू मुन्नानी ही संघटना विरोध करत आहे. स्टालिन शासनाने केवळ टीका केल्याबद्दल कानल कन्नन यांना अटक करून आपण हिंदू विरोधी असल्याचा पुरावाच दिला आहे.
17 Aug 2022 - 6:18 am | जेम्स वांड
होय, ब्राह्मण समाजाचे तामिळाडूमधील अस्तित्व ह्यामुळे नगण्य आहे, पूनल म्हणजे जानवे तोडण्याचा सामूहिक कार्यक्रम, ब्राह्मण समाजाने स्वतःला डीसएनफ्रांचाईज (मराठी शब्द माहिती नाही) वगैरे आत्यंतिक द्वेषमूलक कार्यक्रम हे लोक घेत असत कायमच.
हा उल्लेख मात्र चमत्कारिक अन् सुरस वाटावा इतका नवीन आहे , हे कधी कसे वाचनात आले नाही कळत नाहीये. जमल्यास ह्याचा विदा देणे, वाचनास सोपे पडेल.
#####
तसेही संख्याबळ नसणाऱ्या ब्राह्मण समाजाची फार काही किंमत नसेल हे ह्या लोकांनी ओळखले होते, ते एक असो. पण पेरियार जितके हिंदुद्वेषी होते असे म्हणले अन् वाचले जाते तितकं टोकाला एकंदरीत तमिळ जनता गेलेली दिसत नाही , नायानार अन् अलवार ह्या अनुक्रमे शैव अन् वैष्णव संतांची आजही भक्तिभावे जोपासना होते, मीनाक्षी अम्मन मंदिर, मदुराई किंवा तंजावरचे सुप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर (लोक त्याला प्रेमाने पेरिया कोविल - मोठे मंदिर असे म्हणतात) ह्याचा अभिमान असतो त्या लोकांना.
17 Aug 2022 - 3:02 pm | जेम्स वांड
इथं भारतात जन्मलेल्या काय म्हणतात ते हां "शांतीदूत लोकांचे" लोकांचे प्रताप आम्ही दाताच्या कण्या अन् बोटाच्या हाडांचे चूर्ण होईस्तोवर टाईप करून लोकांना सांगणार अन् दुसरीकडे हे परके उपरे शांतीदूत दिल्लीत राहणार, सरकारी आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला मिळणाऱ्या फ्लॅट मध्ये राहणार, ते पण केंद्र सरकार ने पुरवलेल्या, अन् तिथे राहताना त्यांना (कोणाकडून बरं ?) त्रास होऊ नये म्हणून दिल्ली पोलीस प्रोटेक्शन देणारे हां. पुढच्या वेळी रिटर्न मध्ये रोहिंग्या सेस पण भरू, हाकानाका.
अरे हो कसे म्हणायचे असते अश्यावेळी ?
हिंदू हित पाहणारे फक्त भाजप अन् त्यांचे मित्रपक्षच आहेत अशी आता माझी खात्री झालेली आहे
17 Aug 2022 - 3:23 pm | क्लिंटन
असे प्रकार अधिक प्रमाणात व्हायला लागले तर २००४ मध्ये वाजपेयींविषयी पक्षाच्या पारंपारीक समर्थकांमध्ये नाराजी होती तशीच नाराजी मोदींविषयीही पसरेल हे नक्की. अर्थात मोदींनी ३७० वगैरे कोर अजेंड्यातील मुद्दे मार्गी लावले आहेत ती जमेची बाजू असल्याने वाजपेयींपेक्षा तो नाराजीचा वाढीचा वेग कमी असेल हा अंदाज पण असेच
आणखी निर्णय घेतले गेले तर ती नाराजी पसरेलच. वाजपेयींविषयी नाराजी पसरायला सुरवात झाली काश्मीरमधील २००० सालच्या सीजफायरपासून. तसाच हा नाराजीची सुरवात करणारा निर्णय दिसतो.
२००४ मध्ये वाजपेयींविषयी नाराजी असूनही उजव्या बाजूला दुसरा पर्याय नाही म्हणून अनेक मतदार त्यांचे समर्थन करत होते. तसेच काहीसे मोदींविषयी होऊ शकेल.
म्हणूनच राजकीय दृष्ट्या मध्याच्या उजवीकडे आणखी एक पक्ष हवा असे नेहमी वाटते. नाहीतर दुसरा पर्याय नाही म्हणून काही झाले तरी लोक आपल्यामागेच येणार या आत्मविश्वासातून असे घातक निर्णय घेतले जाऊ शकतात. अगदी मला पाहिजे ते मिळणे शक्य नाही- मला पाहिजे ते म्हणजे राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्याही उजवे म्हणजेच जनसंघ आणि स्वतंत्र पक्षाचे मिश्रण. पण निदान मध्याच्या उजवीकडे आणखी एक पर्याय असायलाच हवा असे नेहमी वाटते.
17 Aug 2022 - 6:20 pm | जेम्स वांड
तूर्तास पण ही बातमी आधी एक कॅबिनेट मंत्री ट्विट करतोय अन् गृहमंत्रालय तिचं खंडन करते आहे असे सावळ्या गोंधळाचे चित्र उभे राहिले आहे.
वाजपेयी यांच्याविरुद्ध काश्मीर शस्त्रसंधी हा एक विरोधाचा मुद्दा होता. ह्यावेळी तसला काही स्कोप नाही. कारण एकूणच मोदी सरकारचे त्या फ्रंट वर काम समाधानकारक आहे.
तुमची अपेक्षा पण एक माफक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय करदाता भारतीय ठेवेल अश्याच आहेत, अन् कौतुकास्पद बाब म्हणजे त्या अपेक्षा मांडायची तुमची भाषा संयत, व्हॉट अबाऊटरी नसलेली असल्यामुळे आवडलीच, ते एक असो.
मोदी सरकारला धोका असला तर तो पारंपरिक समर्थकांकडून जास्त असेल असे ह्या ठिकाणी मला वाटते, का ? ते मांडायचे झाल्यास पहिले म्हणजे जे लोक मोदींना मत देणार नाहीत ते कधीच देणार नाहीयेत, मग मोदींनी कितीही पासबंदा मुस्लिम समाजाशी लगट करण्याचा प्रयत्न केला तरी,
दुसरे म्हणजे जे त्यांना मत देतात त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा, मला कायम वाटते की मोदी सरकार हे घटनेने आखून दिलेल्या चौकटीत राहून होता होईल तितके काम करायचा प्रयत्न करते पण जे "समर्थक" मी म्हणतोय, त्यांच्या पेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत, ह्या अपेक्षा मध्याची उजवी बाजू कधीची ओलांडून आता अति उजव्या छटा स्पर्श करू लागल्या आहेत.
मोदींनी मुसलमानांचा नि:पात करावा, त्यांना "वठणीवर" आणावे अशी ईच्छा असणारे समर्थक जास्त दिसतात एकंदरीत, सरकारची तशी काही ईच्छा दिसत नाही, किंवा हिंदूंना झुकते माप देणारी पण खास कामे ह्या सरकारने केलेली नाहीत असेही खालीच एक प्रतिसाद म्हणतो (बहुतेक वामन देशमुखांचा)
अश्या परिस्थितीत मोदी पाहिजे तितके कट्टर नाहीत ह्या मुद्द्यावर पण लोक त्यांच्यावर नाराज होऊ शकतात, ह्या बाबतीत योगी आदित्यनाथ ह्यांची स्पर्धा असेल मोदींना कारण कट्टर हिंदुत्ववादी इमेज त्यांनी अजूनही जोपासली आहे उत्तम.
अर्थात हे माझे काही आडाखे आहेत, ते बरोबरच असतील असे नाही, पण एकंदरीत असे वाटते खरे मला तरी.
17 Aug 2022 - 9:04 pm | जेम्स वांड
वरील कॉमेंट मधील माझीच विधानं आहेत दोन्ही, अन् आत्ताच हाताच्या कांकणाला आरसा कश्याला म्हणावं अशी बातमी सापडली, अमेरिकेत न्यू जर्सी मध्ये तिरंगा यात्रा काढली अनिवासी भारतीय मंडळींनी, त्यात आकर्षण काय तर "बाबा का बुलडोझर" फ्लेक्स लावून पूर्ण यात्रेत फिरवला गेलेला जेसीबी ! , अति उजव्या अपेक्षा जरी नाही तरी राजकारणाकडे लोकांच्या असलेल्या लाऊड अपेक्षांची वानगी म्हणून ही बातमी नक्कीच पाहता येईल
वृत्तांत खालीलप्रमाणे...
अमेरिकेत तिरंगा रॅली मध्ये बाबा का बुलडोझर
18 Aug 2022 - 10:34 am | वामन देशमुख
याबद्धल पूर्वीही अनेक ठिकाणी मी माझे मत मांडले आहे. इथेही लिहितो.
मोदींनी मुसलमानांचा नि:पात करावा अशी माझी भूमिका कधीही नव्हती.
---
१. हिंदूंची प्रसिद्ध मंदिरे सरकारे ताब्यात ठेवतात. त्यातले "उत्पन्न" इतरत्र खर्च करतात. हा हिंदूंवर अन्याय आहे. श्रद्धेची प्रताडना आहे.
२. भारतातील शिक्षणक्रमात अहिंदू आक्रमकांना सम्राट म्हणून पिढ्यानपिढ्या गौरविले जाते, हा हिंदूंवर अन्याय आहे. सत्याशी प्रतारणा आहे.
३. शिक्षण हक्क कायद्याद्वारे, भारतात हिंदू शिक्षणसंस्थाचालकांना एकतर्फी अन्यायाचा सामना करावा लागतो. हा हिंदूंवर अन्याय आहे. समतेची कुचंबणा आहे.
४. हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग शेकडो वर्षांपासून या पृथ्वीवरून कमी-कमी होत आहे.हा हिंदूंवर अन्याय आहे. मानवतेचा अवमान आहे.
N. इतरही असंख्य बाबींद्वारे हिंदूंवर अन्याय होत आहे.
हा अन्याय दूर व्हावा अशी वाजवी अपेक्षा बाळगण्यात, "मुसलमानांचा नि:पात करावा, त्यांना "वठणीवर" आणावे" असे काही आहे का? दुरान्वयाने तसे ध्वनित होते का? अशी अपेक्षाच बाळगणे चूक आहे का?
जगातील सर्वात शक्तिशाली सरकारांपैकी एक, प्रचंड बहुमतातील सरकार हाती असताना, जगातील सर्वात जास्त राजकीय कार्यकर्त्यांचे पाठबळ असताना, जगातील सर्वात मोठे सामाजिक संघटन पाठीशी असताना, सर्वाधिक जनतेचा पाठिंबा असताना, वरील अपेक्षा मोदी पूर्ण करू करत नसतील, त्या दिशेने काही tangible प्रयत्न करत नसतील तरीही त्यांच्यावर टीका होऊ नये?
---
वरीलपैकी कोणताही मुद्दा घ्या. उदा. प्रसिद्ध हिंदू मंदिरे सरकारी ताब्यातून मुक्त करणे. २०१४ ते २०२२ या आठ वर्षांत हे काम मोदी का करू शकले नाहीत? त्यांना कोण रोखले होते? रोखणारे मोदींपेक्षा अधिक शक्तिशाली होते का?
---
तेही राहू द्या. हिंदूंवरील अन्याय दूर व्हावा ही केवळ सामान्य हिंदू लोकांची अपेक्षा आहे असे नाही. संघाची देखील ती अपेक्षा आहे. पांचजन्य, ऑर्गनाइझर, विवेक इ. प्रकाशनांमधून वरीलसारख्या अपेक्षा मांडणारे लेख / बातम्या प्रकाशित होतात.
असे लेख जाहीरपणे प्रकाशित करण्याची गरजच काय आहे? हिंदुत्ववादाचे आवाहन करून निवडून आलेले, प्रचंड बहुमतातील सरकार तुमचे आहे. अश्या परिस्थितीत -
१. पांचजन्य मधून लेख प्रकाशित करून मागण्या करत बसणे, रडगाणे गात बसणे
२. आपल्याच प्रयत्नातून निवडून आलेल्या सरकारला सांगून ती मागणी करून घेणे
या दोन पर्यायांपैकी पैकी जास्त लॉजिकल काय आहे? अक्कल असलेल्या कोणत्याहीची व्यक्तीने कोणता पर्याय निवडला असता? संघ कोणता पर्याय निवडतो? काँग्रेसने कोणता पर्याय निवडला असता?
---
सामान्य जनतेच्या अपेक्षांकडे पूर्ण दुर्लक्ष करा - हरकत नाही. स्वतःच्या मातृसंस्थेच्या अपेक्षांच्या तरी विचार करा. प्रामाणिक नसा, किमान लॉजिकल तरी रहा.
"Who Killed Karkare? The Real Face of Terrorism in India" नामक पुस्तकात संघावर खोटेनाटे आरोप करणारा, इतरही काही तशीच पुस्तके लिहिणारा, एकेकाळचा सरकारी अधिकारी असलेला लेखक अजूनही मोकाट फिरतोय. आईबहिणीवर शिव्या दिल्यावर, किरकोळ माणूसही पेटून उठतो. संघ तर मोदींची मातृसंस्था आहे. तिला शिव्या देणाऱ्याला मोदींनी असेच सोडून दिले? आठ वर्षांत काहीच वाकडे करू शकले नाहीत, उरलेल्या दोन वर्षांत काय करणार?
---
हिन्दू लोक आपापल्या परीने नवस बोलतात, देवाला काही अमुक गोष्ट अर्पण करतात त्याची २००९ साली थ्री इडियट्स सिनेमामध्ये "सौ रुपये में आजकल ट्रॅफिक हवालदार भी मानते नहीं हैं, भगवान क्या ख़ाक मानने वाले थे!" असे म्हणून अक्षम्य चेष्टा केली गेली होती.
ठीक आहे, तेंव्हा मोदी पंप्र नव्हते, ममो पंप्र होते.
२०२० साली मोदी पंप्र होऊन सहा वर्षे उलटली होती. तेंव्हा अक्षय कुमारचा लक्ष्मी हा सिनेमा हा जणू केवळ हिंदू धर्माची अक्षम्य चेष्टा करण्यासाठीच बनवलेला असा वाटणारा प्रदर्शित झाला.
असा सिनेमा मोदींच्या शासनातील सेन्सर बोर्डाने का प्रदर्शित होऊ दिला?
मुळात हिंदू श्रद्धेची असहनीय खिल्ली उडवणारे इतरही असंख्य सिनेमे, कथा, कादंबऱ्या, चित्रे, ट्विट्स, ब्लॉग्स व्हिडिओज, सोमी पोस्ट्स, जाहिराती, बातम्या... वारंवार का प्रकाशित होतात? ते थांबवण्याची, अश्यांना जरब बसवण्याची जबाबदारी कोणाची? मोदींची की सामान्य जनतेची?
---
संघप्रणित लोक (of course, including मोदी) स्वतःच्याच समाजाच्या वाजवी + तार्किक + न्याय्य अपेक्षा पूर्ण करण्यास खरोखरच सक्षम आहेत का? त्या मागण्यांबद्धल किमान संवेदनशील तरी आहेत का?
18 Aug 2022 - 10:47 am | जेम्स वांड
पहिले शांत होऊन एक ग्लास पाणी प्या पाहू तुम्ही....
हा तर आता ऐका,
बहुतेक तुम्ही स्वल्पविराम मिस केलेला दिसतोय
"मुसलमानांना वठणीवर" आणण्याची मागणी तुम्हाला वैयक्तिक attribute केलेली नाही, तर बहुसंख्य दिसून येणाऱ्या अती उजव्या समर्थकांना केली आहे.
तुमच्या प्रतिसादाचा फक्त
इतकाच भाग मी घेतलेला आहे (तुमच्या बाबतीत) जमेस. तुमच्याशी घटकाभर तोंडओळख नसताना तुम्हाला अती उजव्या किंवा अती डाव्या गटात लोटणे, आयुष्यातील इतर कुठलेतरी फ्रस्ट्रेशन तुमच्यावर काढणे, तुम्हाला उद्धटपणे बोलून दुरुत्तरे देणे हा माझा हेतू नाही आणि नसेल ह्याची खात्री बाळगा.
त्यामुळे तुमचा प्रतिसादही फार चूक आहे असे मी म्हणत नाही तर तो तुमचा दृष्टिकोन आहे इतकेच मी म्हणतो.
भले ते देऊ कासेची लंगोटी मानतो बुआ मी, त्यामुळे अझ्युम आयडेंटिटी घेऊन इंटरनेटवर द्वेषमूलक, एकांगी, अहंगंड पूर्ण प्रतिसाद देऊन आपल्या मनाचे सडके कोपरे असे चार चौघात रीते करणे माझा पिंड पण नाही आणि संस्कार पण.
त्यामुळे चील माडी.
18 Aug 2022 - 11:13 am | वामन देशमुख
नाही नाही हो वांड राव! मी हा प्रतिसाद केवळ तुम्हाला उद्देशून किंवा तुमचा प्रतिवाद करण्याच्या दृष्टीने लिहिला नाही. तसे ध्वनित झाले असल्यास क्षमस्व.
मी मोदींच्या (आणि भाजप, संघ एकूणच हिंदू लोक्स यांच्या) कार्यशैलीवर मत मांडले आहे.
---
हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.
हा माझा स्टॅंडर्ड डिस्क्लेमर टाकायचा राहिला होता, आता कंसिडर करावा.
---
संदर्भ समजला नाही, म्हणून आदरासहीत पास.
17 Aug 2022 - 5:15 pm | वामन देशमुख
भाजप आणि त्यांचे नेते हे सर्वात मोठे हिंदुद्रोही, धर्मद्रोही आणि हिंदूविश्वासघातकी आहेत.
हे स्वतःला हिंदुत्ववादी दाखवतात पण प्रत्यक्षात हिंदूंसाठी काहीही (repeat काहीही) करत नाहीत.
वाजपेयींची दहा वर्षे आणि मोदींची मागची आठ वर्षे या अठरा वर्षांच्या काळात भाजपने हिंदूंचा फायदा होईल असे एकतरी काम केले आहे का? किंवा हिंदूंचे नुकसान टळेल असे एकतरी काम केले आहे का? माझ्या माहितीत तरी नाही. कुणाला माहित असेल तर सांगावे. कलम ३७० वगैरे ठीक आहे, त्यात सर्वधर्मीय भारतीयांचा फायदा किंवा नुकसान जे आहे ते आहे. हिंदूंचं काय आहे?
स्वतःच्या राष्ट्रीय प्रवक्त्या महिलेचे जे रक्षण करू शकत नाहीत ते सामान्य हिंदूंसाठी काय करणार? काहीही नाही.
काँग्रेसने हिंदूंचा विश्वासघात कधीही केला नाही. कारण त्यांनी हिंदूंना कसलीही खोटी आशा दाखविली नाही. "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि त्या दिशेने त्यांनी अनेक बाबी केल्या. उदा. बहुधा २००५ साली हिंदूंविरुद्ध, मुस्लिमांना प्रचंड संरक्षण देणारा जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.
काँग्रेस स्वतःला प्रो-मुस्लिम प्रॉजेक्ट करते आणि प्रत्यक्षातही प्रो-मुस्लिमच असते.
भाजप स्वतःला प्रो-हिंदू प्रॉजेक्ट करते पण प्रत्यक्षात मात्र प्रो-मुस्लिम असते.
अश्या परिस्थिती हिंदुत्ववादी हिंदू मतदारांनी काय निवडावे? भाजप की काँग्रेस? ही इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे.
anyways, हिंदूंसाठी करण्यासारखे काही उरलेले आहे का? शे पन्नास वर्षांत नाहीतरी ते नष्टच होणार आहेत. काय करायचे आहे काही करून?
---
हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
---
प्रतिसाद विस्कळीत असेलही पण आशय प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ आहे.
17 Aug 2022 - 5:25 pm | श्रीगुरुजी
खोटी बातमी आहे.
हे वाचा.
"With respect to news reports in certain sections of media regarding Rohingya illegal foreigners, it is clarified that Ministry of Home Affairs (MHA) has not given any directions to provide EWS flats to Rohingya illegal migrants at Bakkarwala in New Delhi," the Centre clarified on Wednesday.
In a series of tweets, the Centre clarified it has not given any direction to shift the Rohingya refugees to a new location. The Union home ministry further directed the Delhi government to keep the Rohingya refugees at detention centre till their deportation.
"Illegal foreigners are to be kept in detention centres till their deportation as per law. The Government of Delhi has not declared the present location as a detention centre. They have been directed to do the same immediately," the Union home ministry added.
https://www.indiatoday.in/india/story/home-ministry-directs-delhi-govt-r...
17 Aug 2022 - 5:35 pm | जेम्स वांड
कारण मी दिलेले फोटोज् नीट बघितले तर ते एखाद्या spoof किंवा parody खात्याने केलेले tweets नसून केंद्र सरकारच्या कॅबिनेट रँक मंत्र्याने केलेले आहेत.
आता हरदीप पुरी खोटे म्हणावेत का गृहमंत्रालय ? असं त्रांगड अलग लागलं डोक्यामागे. का आधी निर्णय घेतला, मग अशी बोंब उठली अन् वामनराव देशमुखांचे प्रतिसाद उद्वेग वगैरे बघून गृहमंत्रालयाने तो फिरवला असे काही कळेना झाले आहे.
कृषी कायदे निर्णय कोलांटी प्रकार ताजा असल्यामुळे तूर्तास hold आमचा, सरकारकडून काय ते क्लिअर आलं का बघू.
17 Aug 2022 - 5:36 pm | क्लिंटन
बरोबर आहे. पण जर केंद्रीय मंत्री आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ते ट्विट करत असेल तर मग ती बातमी खोटी आहे ही शंका कोणाला येणार आणि यावी तरी कशाला? हरदीपसिंग पुरींनी पुढील ट्विट केले आहे:
हे ट्विट मी त्यांच्या ट्विटर खात्यावरून घेऊन एम्बेड केले आहे- स्क्रीनशॉट नाही. त्यामुळे ते त्यांच्याच खात्यावरून आले आहे याविषयी शंका नसावी.
हरदीपसिंग पुरींनी नक्की कोणाच्या परवानगीने हे ट्विट केले होते? सरकारने तसा निर्णय घेतला होता की यांनी परस्पर आपल्या अधिकारात ते ट्विट केले? हरदीपसिंग पुरी हे निवृत्त आय.एफ.एस अधिकारी आहेत. १९८७ च्या श्रीलंका कराराच्या वेळेस भारत सरकारकडून जी अधिकार्यांची टीम त्या कराराच्या बोलण्यांमध्ये होती त्यात ते होते. त्यावेळेसही त्यांनी परराष्ट्रमंत्रालयाने मान्यता न दिलेली एखादी गोष्ट कबूल करून ठेवली होती की काय? केंद्रीय मंत्री इतका बेजबाबदार कसा असू शकतो?
17 Aug 2022 - 6:01 pm | क्लिंटन
खरं तर या प्रकारासाठी हरदीपसिंग पुरींना मंत्रीमंडळातून हाकलायला हवं. तसेही ते निवृत्त आय.एफ.एस अधिकारी आहेत आणि त्यांना कसलाही जनाधार नाही. त्यांना मंत्रीमंडळातून काढले तरी मते जातील वगैरे भिती असायचे कारण नसावे. समजा एका शीखाला मंत्रीमंडळातून काढले हे चित्र उभे राहू द्यायचे नसेल तर जसे हरदीपसिंग पुरी हे निवृत्त आय.एफ.एस अधिकारी शोधून मंत्रीमंडळात आणले त्याप्रमाणे अन्य कोणी निवृत्त शीख आय.ए.एस/आय.पी.एस/आय.एफ.एस अधिकारी शोधून त्याला मंत्रीमंडळात घेणे फार कठीण नसावे. तसेही मंत्रीमंडळातील पंजाबमधील दुसरे मंत्री सोमप्रकाश सुध्दा माजी आय.ए.एस अधिकारीच आहेत.
17 Aug 2022 - 8:13 pm | जेम्स वांड
ह्या वेंधळेपणाला फक्त तुम्ही आम्ही फसलो असे नाही तर चक्क रा स्व संघ पण फसलेला दिसतोय मजबूत
म्हणजेच हा निर्णय आधी घेतला आणि मग फिरवला म्हणायला फुल स्कोप आहे, नाहीतर संघ कश्याला पुरींना इतकं गंभीरपणे घेतोय !
17 Aug 2022 - 5:30 pm | शाम भागवत
असं काही झालेलं नसावं.
रोहिंग्यांना बेकायदेशीर परदेशी मानलं जातंय असं दिसतंय.
17 Aug 2022 - 5:43 pm | जेम्स वांड
पुरी साहेबांनी ती ट्विट का केली असतील ? कारण प्रधानमंत्री अन् गृहमंत्री विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेऊ शकणार नाहीत ते, किंबहुना भाजपचे जे सेंट्रल कमांड मॉडेल आहे त्यानुसार इतका क्रिटिकल निर्णय घेण्याची त्यांना परवानगी नाही, ते ही त्या खात्याचे मंत्री वगैरे नसताना ते....