ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ३)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
13 Aug 2022 - 10:47 am

नमस्कार मंडळी,

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवीन भाग काढत आहे. नवीन प्रतिसाद लिहायचे असतील तर ते या भागात लिहावेत आणि आधीच्या भागात लिहिलेल्या प्रतिसादांना उत्तर लिहायचे असेल तरच ते त्या भागात लिहावेत ही विनंती. या महिन्यात पहिल्या दोन भागात मिपा परंपरेला अनुसरून चांगली चर्चा झाली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार.

नितीशकुमार परत राजदबरोबर गेले तेव्हा मी त्यावेळेस चर्चेत मी म्हटले होते की समाजवादी नेते भांडण्यासाठी एकत्र येतात आणि एकत्र येण्यासाठी भांडतात. तसेच समाजवादी विचारांचे पक्ष किती वेळा एकत्र आले आणि किती वेळा तुटले याचा हिशेब ठेवणे कोणाही मर्त्य मानवाला शक्य होईल असे वाटत नाही. ते का हे या भागात इथे टाईमलाईनच्या मदतीने स्पष्ट करतो.

१९३० चे दशक: जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि आचार्य जीवतराम कृपलानी यांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९४९: जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी काँग्रेस सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९५१: आचार्य कृपलानींनी काँग्रेस सोडून स्वत:च्या किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केली.
१९५२: पहिल्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर प्रजा पक्ष एकत्र येऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना
१९५५: राममनोहर लोहियांनी प्रजा समाजवादी पक्ष सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९६४: कर्पुरी ठाकूर यांनी प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडून स्वत:च्या संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना केली. जॉर्ज फर्नांडिस यांचा पण संयुक्त समाजवादी पक्षात प्रवेश
१९६७ - चरणसिंग यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून भारतीय क्रांती दलाची स्थापना केली.
१९६९ - बिजू पटनाईक यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून उत्कल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षात फूट-- इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(आर) आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(ओ) पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९७२ - १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी एकत्र येऊन नव्या समाजवादी पक्षाची स्थापना
१९७४ - चरणसिंगांचा भारतीय क्रांतीदल, बिजू पटनाईकांचा उत्कल काँग्रेस, १९७२ मध्ये स्थापन झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला मिनू मसानी-पिलू मोदींचा स्वतंत्र पक्ष आणि १९७३ मध्ये भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला स्वत:चा पक्ष एकत्र येऊन भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना
१९७७ - जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा आणि नंदिनी सत्पथी काँग्रेसबाहेर पडून त्यांनी स्वत:चा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हा पक्ष स्थापन केला.१९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी, भारतीय लोकदल, काँग्रेस(ओ) आणि भारतीय जनसंघ यांनी भारतीय लोकदलाच्या हलधर या चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर या पक्षांचे जनता पक्ष या नव्या पक्षात विलीनीकरण.
१९७८ - शरद पवार, वायलार रवी, अंबिका सोनी आणि के.पी.उन्नीकृष्णन यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून काँग्रेस(समाजवादी) या पक्षाची स्थापना केली.
१९७९: चरणसिंग, राजनारायण इत्यादी नेत्यांनी जनता पक्ष सोडून जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला आणि जनता पक्षाचे सरकार पाडले. चरणसिंग औटघटकेचे पंतप्रधान झाले.
१९८०- लोकसभा निवडणुकांमध्ये धुव्वा उडल्यानंतर चरणसिंग जनता पक्ष(सेक्युलर) बाहेर पडले आणि स्वत:च्या भारतीय लोकदल पक्षाची पुनर्स्थापना केली. जगजीवन राम जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा काँग्रेस(जे) पक्ष स्थापन केला. जनता पक्षातून पूर्वाश्रमीचे जनसंघाचे नेते बाहेर पडून त्यांनी स्वत:च्या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
१९८०/१९८१: चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून देवीलाल यांच्या स्वत:च्या लोकदल(बी) पक्षाची स्थापना केली.
१९८७-- काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी जनमोर्चा या अराजकीय गटाची स्थापना केली. शरद पवार, अंबिका सोनी आणि वायलार रवी काँग्रेसमध्ये परतले. के.पी.उन्नीकृष्णन काँग्रेस(एस) बरोबर राहिले.
१९८८-- चरणसिंगांचा (त्यांच्या मृत्यूनंतर अजितसिंगांचा) लोकदल, देवीलालांचा लोकदल, काँग्रेस(एस), वि.प्र.सिंगांचा जनमोर्चा एकत्र येऊन जनता दलाची स्थापना.
१९८९- लोकसभा निवडणुकांनंतर जनता दलाचा गटनेता (म्हणजेच होणारा नवा पंतप्रधान) निवडायच्या वेळेस चंद्रशेखर आणि वि.प्र.सिंग हे दोन दावेदार होते. अरूण नेहरू आणि पत्रकार कुलदीप नय्यर यांना हाताशी धरून वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखर यांना मात द्यायचा डाव खेळला. बैठक सुरू होताच ताबडतोब इतरांना कोणालाही बोलायची संधी न देता वि.प्र.सिंगांनी देवीलालांचे नाव नेतेपदावर सुचविले. काही क्षणातच पुढील पंतप्रधान देवीलाल असतील अशा तारा वर्तमानपत्रांच्या ऑफिसात गेल्याही होत्या. पण देवीलालांनी आपले वय ७५ उलटून गेले असल्याने इतकी मोठी जबाबदारी आपल्याला नको असे म्हटले आणि नेतेपदासाठी वि.प्र.सिंगांचे नाव सुचविले. हे सगळे चंद्रशेखरांना अंधारात ठेऊन ठरवून केले गेले होते. त्यातून चंद्रशेखर दुखावले गेले आणि ते वि.प्र.सिंगांच्या शपथविधीलाही हजर नव्हते.
१९९०- चंद्रशेखर आणि देवीलाल जनता दलाबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:च्या समाजवादी जनता दल या पक्षाची स्थापना केली. चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले. राजस्थानात दिग्विजयसिंग (मध्यप्रदेशातील वाचाळवीर दिग्विजियसिंग वेगळे) या स्थानिक नेत्याने जनता दल सोडून स्वत:चा गट स्थापन करून भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि भैरोसिंग शेखावतांचे अल्पमतातले सरकार तारले.
१९९१-- चिमणभाई पटेल यांनी समाजवादी जनता दलातून बाहेर पडून स्वत:च्या जनता दल(गुजरात) पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने आपले सरकार तारले.
१९९२- अजितसिंग जनता दलाबाहेर आणि त्यांनी स्वत:चा जनता दल(अजित) हा पक्ष स्थापन केला. मुलायमसिंग यादव समाजवादी जनता दलाबाहेर पडून त्यांनी स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. चिमणभाई पटेल यांचा जनता द्ला(गुजरात) हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन.
१९९३-- जनता दल, समाजवादी जनता दल आणि जनता दल (अजित) यांची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका एकत्र लढवायची घोषणा. पण उत्तर प्रदेशात जोरदार पराभव झाल्यानंतर अजित सिंगांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९० मध्ये राजस्थानात भैरोसिंग शेखावतांचे सरकार तारणारे दिग्विजयसिंग काँग्रेसमध्ये गेले.
१९९४- जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि रबी रे यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. नंतर देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी पण समता पक्षात प्रवेश केला.
१९९६-- चंद्रशेखर यांनी पण समता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवली. पण निवडणुकांनंतर त्यांनी आपला समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) ची स्थापना केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी अजितसिंग काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला. निवडणुकांनंतर रामकृष्ण हेगडेंची जनता दलातून हकालपट्टी. त्यांनी स्वत:चा लोकशक्ती हा पक्ष स्थापन केला.
१९९७-- देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा हरियाणा लोकदल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे नाव १९९९ मध्ये बदलून इंडिअन नॅशनल लोकदल हे झाले. नवीन पटनाईक यांनी जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दल हा पक्ष स्थापन केला.
१९९९--- उरल्यासुरल्या जनता दलात जनता दल(धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल(संयुक्त) हे दोन तुकडे पडले. देवेगौडा आणि कुमारस्वामी जनता दल(धर्मनिरपेक्ष) मध्ये तर रामविलास पासवान जनता दल(संयुक्त) मध्ये सामील. समता पक्ष आणि लोकशक्ती हे दोन पक्षही जनता दल (संयुक्त) मध्ये विलीन. १९९९ मध्ये कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल (संयुक्त) हे दोन्ही गट होते. २००५-०६ च्या दरम्यान कर्नाटकातील जनता दल (संयुक्त) पक्ष अस्तंगत झाला.
२००२-- रामविलास पासवान यांनी जनता दल(संयुक्त) सोडून आपला लोकजनशक्ती हा पक्ष स्थापन केला.
२००६-- कर्नाटकात सिध्दरामय्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) मधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले. पुढे २०१३ मध्ये ते काँग्रेसकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
२०१४-- मोदीलाटेत सगळे पक्ष वाहून गेल्यानंतर परत एकदा जनता दलाचे पुनरूज्जिवन करायची घोषणा. पण ती प्रत्यक्षात आली नाही.
२०१७-- नितीशकुमारांनी परत एकदा भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर नाराज शरद यादवांचा अनामिक एक व्यक्ती असलेला स्वतंत्र गट.
२०२२-- नितीशकुमार यांनी परत लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली.

या सगळ्या ब्रम्हघोटाळ्यात कितीतरी मधल्या पायऱ्या मी विसरलो आहे हे नक्की. १९८०/८१ मध्ये कधीतरी देवीलालांनी चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून आपला लोकदल (बी) पक्ष स्थापन केला हे वर लिहिलेच आहे. १९८७ मध्ये चरणसिंगांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र अजितसिंग चरणसिंगांच्या लोकदल पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तो गट लोकदल(ए) नावाने ओळखला जाऊ लागला. मुलायमसिंग यादवही त्याच पक्षात होते. चरणसिंगांनंतर पक्षाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल असे मुलायमसिंगांना वाटत होते पण अजितसिंग हे चरणसिंगांचे पुत्र असल्याने ते अनेक वर्षे अमेरिकेतले आपले वास्तव्य आणि ग्रीनकार्ड सोडून आले आणि ते अध्यक्ष बनले. अजितसिंग आणि मुलायमसिंग यादव यांचे जमायचे नाही. त्यामुळे अजितसिंगांनी मुलायमसिंगांना पक्षातून बाहेर काढले होते. हे १९८७/८८ मध्ये कधीतरी झाले. ते नक्की कधी झाले हे मला माहित नाही. हेच सगळे लोक १९८८ मध्ये जनता दलात परत एकत्र आले होते.

१९८९ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानपदासाठी वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखरांना धोबीपछाड दिला हे वर लिहिलेच आहे. त्याचा सूड मग चंद्रशेखरांनी लगेच उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री नेमताना उगवला. अजितसिंग मुख्यमंत्री व्हावेत असे वि.प्र.सिंगांना वाटत होते तर चंद्रशेखरांचे उमेदवार होते मुलायमसिंग यादव. चंद्रशेखरांचा गट भारी पडला आणि उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. पुढे मार्च १९९० मध्ये बिहारमध्ये मुख्यमंत्री निवडायच्या वेळेस वि.प्र.सिंगांचे उमेदवार होते रामसुंदर दास तर त्यांना आव्हान दिले होते लालू यादवांनी. लालूंनी चंद्रशेखरांकडे मुख्यमंत्री व्हायला मदत मागितली तेव्हा चंद्रशेखरांनी स्वतःचा रघुनाथ झा हा उमेदवार उभा केला. तेव्हा नेतेपदासाठी आमदारांमध्ये निवडणुक झाली होती. त्या निवडणुकीत रघुनाथ झांनी रामसुंदर दासांची मते फोडून लालूंचा विजय निश्चित केला. भारतीय राजकारणातील दोन सगळ्यात घाणेरडे लोक- लालू आणि मुलायमसिंग यादव या राजकारणातून पुढे आले आहेत.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या पार्श्वभूमीवर परत नितीश आणि तेजस्वी/लालू फुटले तर अजिबात आश्चर्य वाटू नये.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 6:49 pm | श्रीगुरुजी

पण पुण्याची आयटी हब ही ओळख बनविण्यात कलमाडींच्या प्रयत्नांचा हातभार लागलेला आहेच, एकार्थाने आज असलेली पुण्याची सुबत्ता तशी घडविण्यात त्यांचा हात आहेच.

काहीतरीच काय.

जेम्स वांड's picture

1 Sep 2022 - 8:08 pm | जेम्स वांड

मग एक अख्खी इंडस्ट्री पुण्यात स्थिरावते, तिला साजेसे infrastructure विकसित होते, प्रोपर "राजीव गांधी आयटी पार्क" स्थापन होतो, पुण्यात जगातील झाडून नामी आयटी कंपन्यांना यावे वाटते, त्या इथून बिझनेस करतात, हा विकास "systematic" असून एखाद्या गावाचा असा विकास होणे ह्याला स्थानिक राजकीय इच्छाशक्ती लागतेच, इतके आपणांस मंजूर असले तर , ती राजकीय इच्छाशक्ती पुण्यात कोण होती ते तुम्ही सविस्तर मांडा, राजकीय इच्छाशक्ती शिवाय जर असा एखाद सेक्टर विकसित झाला आहे असे आपले मत असल्यास त्याला पूरक काहीतरी सांगा....

अशी विनंती करतो.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 9:39 pm | श्रीगुरुजी

१) मुळात हिंजवडी हा पुण्याचा भाग नसून मुळशी तालुक्यातील गाव आहे व त्या गावात ग्रामपंचायत आहे. त्यामुळे कलमाडींचा संबंध नाही.

२) हिंजवडी आयटी पार्क १९९८ मध्ये सुरू झाली. त्या काळात देशात वाजपेयींचे व राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार होते. १९९८-९९ या काळात विठ्ठल तुपे खासदार होते तर १९९९-२००४ या काळात भाजपचे प्रदीप रावत खासदार होते. कलमाडी १९९७-९९ या काळात कॉंग्रेसमध्ये नव्हते. या काळात तत्कालीन माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रमोद महाजनांनी अनेकदा हिंजवडीस येऊन संगणक क्षेत्र वाढण्यास मदत केली होती.

तात्पर्य - ही पार्क सुरू होण्याशी, तेथे कंपन्या येऊन संगणक क्षेत्राची वाढ होण्याशी कलमाडींचा शष्प संबंध नाही.

शाम भागवत's picture

1 Sep 2022 - 6:19 pm | शाम भागवत

कलमाडी पवारांचे जुने मित्र. त्या दोघांनी ब-याच गोष्टी एकत्रतीत रित्या केलेल्या आहेत. पवारांविरोधात अनेक महत्वाच्या गोष्टी कलमाडींकडून भाजपाला कळू शकतात. पुष्कळ वेळेस धागेदोरे न मिळाल्याने काही करता येत नाही. पण थोडेफार धागेदोरे मिळाल्यावर तपासाची दिशा ठरवता येऊ शकते.
शेवटी एक डिस्क्लेमर:
हे एका सामान्य माणसाचे तर्क आहेत.
असो.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 8:32 pm | श्रीगुरुजी

कलमाडी आणि पवार एकमेकांच्या विरोधात जाऊन २५+ वर्षे झाली. कलमाडी १९९६ नंतर पवारांच्या विरोधात जाऊन कॉंग्रेसमधून बाहेर पडले होते. पवारांना १९९९ मध्ये कॉंग्रेसमधून काढल्यानंतर कलमाडी कॉंग्रेसमध्ये परत आले. परंतु पवारांनी कलमाडींना कधीच माफ केले नव्हते. २००९ मध्ये तर अजित पवारांनी पुण्यातून कलमाडींना पाडण्याचा जोरदार प्रयत्न केला होता.

त्यामुळे कलमाडींना पवारांच्या काही खाजगी गोष्टी माहिती असतील तर त्या २५+ वर्षांपूर्वीच्या असणार. त्या सर्व गोष्टी आणि नंतरच्याही गोष्टी मोदी-शहांना माहिती नसणे शक्य नाही.

मुळात मोदी-शहांना पवारांविरूद्ध काही कायदेशीर कारवाई करायचीच नाही. अन्यथा त्यांनी मागील ८ वर्षात तसे केले असते.

शाम भागवत's picture

1 Sep 2022 - 8:49 pm | शाम भागवत

मोदी शहा कोणत्याही छोटासा धागा मोकळा सोडत नाहीत. किंवा क्षु ल्लक म्हणून सोडून देत नाहीत, असे माझे मत आहे. पण तुमचे आकलन वेगळे असू शकते.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 9:41 pm | श्रीगुरुजी

पण पवार हा त्यांना कोणत्याही परिस्थितीत धोका नसल्याने व पवार हा भाजपचा महाराष्ट्रात पर्यायी सपोर्ट असल्याने पवारांच्या गोष्टी माहिती असूनही मोदी-शहांनी काहीही कारवाई आजतागायत केलेली नाही.

शाम भागवत's picture

1 Sep 2022 - 10:11 pm | शाम भागवत

मी काही वर्षे, निदान अडीच वर्षे थांबायला तयार आहे. मोदींना दिलेले वचन पवार यांनी मोडले असल्यास, मोदीसारखा माणूस स्वत: नामानिराळा राहून त्याची परतफेड केल्याशिवाय राहील असे वाटत नाही. तसेच मोदीं-शहांचा निर्णय असूनही फडणवीस यांनी त्याबद्दल एक चकार शब्द न उच्चारता सर्व अपश्रेय स्वतःकडे घेतल्याने भाजपात फडणवीसांचे वजन खूपच वाढलेले आहे असे माझे मत आहे.

जे तुम्हाला खुळचट, भोळसट वगैरे वाटू शकते. ;)))

सहमत. पवारांवर कारवाई होणार नाही कारण आता ती वेळ निघून गेली आहे. पवार (मोदी, शहा आणी तुम्ही आम्ही देखील) दिवसेंदिवस जवान होत जाणार नाहिये. (काहींना पावसात भिजल्यावर तसं वाटतं हा भाग वेगळा !) पवारांवर कारवाई केली तर त्यांचे वय आणि त्यांची एकंदरीत प्रतिष्ठा पहाता ते प्रकरण मोदी शहांच्या विरोधातच जाईल. शिवाय राष्ट्रवादी पक्ष कोणाचाही दुश्मन नाहिये. तो केडर बेस पक्ष नसून प्रत्येक जिल्ह्यातील तगड्या व्यावसायिकांचे सिंडीकेट आहे. उद्या पवारांनंतर राष्ट्रवादी नावाने म्हणा किंवा आणखी कोणत्या नावाने म्हणा पण यातील बर्‍याच सरदारांची मनसबदारी टिकून राहणार आहे.
शिवाय मोदी, शहांना प्रत्येक गोष्ट माहित असायला आणि त्याचा हिशेब वेळचेवेळी चुकता करायला ते काही चित्रगुप्त नाहीत. असले तरी एक हुशार हिशेबनीस काही हिशेब नेहमीच अक्कलखाती टाकत असतात.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 10:31 pm | श्रीगुरुजी

पवार कायमच अश्या स्वरूपात राहिले की उर्वरीत सर्व पक्षांना त्यांची मदत हवी वाटते. त्यामुळे कॉंग्रेस, भाजप, सेना, मनसे यांनी वेळोवेळी पवारांची मदत घेतली. परंतु त्यांना हातचे राखून देताना ज्या बाजूला सर्वाधिक फायदा त्याच बाजूला पवार आपले वजन टाकतात. राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीत पूर्ण वापर करून नंतर पवारांनी त्यांना लाथाडले. कॉंग्रेस, सेना, भाजप अश्यांनाही संधी साधून लाथाडले.

१९९० नंतर कोणत्याही एका पक्षाला महाराष्ट्रात बहुमत मिळाले नसल्याने अत्यंत लवचिक असणाऱ्या पवारांना नेहमीच प्रचंड मागणी असते व त्यामुळेच पवारांचे फावले आहे. तस्मात् कोणताही सत्ताधारी पक्ष पवारांना दुखवू शकत नाही कारण भविष्यात पवारांची मदत लागणार असते.

पवारांवर कोणताही पक्ष कधीही कोणतीही कायदेशीर कारवाई करणे अशक्य आहे. जे मोदी-शहा सव्वाआठ वर्षात करू शकले नाही ते इतर पक्ष किंवा प्रत्यक्ष मोदी-शहा भविष्यात करणे शक्य नाही.

सुबोध खरे's picture

2 Sep 2022 - 12:34 pm | सुबोध खरे

पवारांच्या गोष्टी माहिती असूनही मोदी-शहांनी काहीही कारवाई आजतागायत केलेली नाही.

गुरुजी

श्री पवार हे विरोधक आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्यांना लफड्यात अडकवलं तर ममता, केजरीवाल, के सी आर यांचा एक प्रतिस्पर्धी कमी होतो.

याशिवाय श्रीमती सोनिया गांधी आणि श्री शरद पवार यांच्यातून विस्तव जात नाही. कारण श्रीमती सोनिया या खुनशी प्रवृत्तीच्या असून त्या कधीही कोणालाही माफ करत नाहीत हा इतिहास आहे.

आपापसात लाथाळ्या करण्यामधून एक उमेदवार कमी करून देश पातळीवर आपली डोकेदुखी वाढविण्या इतके श्री मोदी आणि श्री शाह मूर्ख नाहीत असे माझे मत आहे.

त्यामुळे श्री शरद पवारांना आपले गुरु म्हणण्यापासून बारामतीस जाऊन त्यांना नमस्कार करण्याइतके श्री मोदी धूर्त आहेत.

हस्तादपि न दातव्यं गृहादपी न दीयते
परोपकरणार्थाय वचने किम दरिद्रता?

हे अर्थात बऱ्याच भाजप विरोधी लोकांना मान्य होणार नाही. पण चालायचंच.

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2022 - 1:01 pm | श्रीगुरुजी

मुळात पवार हे कधीच मोदींचा किंवा ममता, केजरीवाल वगैरेंचा प्रतिस्पर्धी नव्हते व नाहीत. माध्यमांनी कितीही उचलून धरले तरी पवार राष्ट्रीय राजकारणात, दिल्लीत एक किरकोळ नेता समजले जातात कारण त्यांचा पक्ष महाराष्ट्रात सुद्धा एक किरकोळ पक्ष आहे.

परंतु महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला १९९० नंतर बहुमत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व प्राप्त झाले आहे कारण राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाबरोबर युती करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात इतर सर्व पक्षांना राष्ट्रवादीची मदत हवी असते व पवारांच्या लवचिक भूमिकेमुळे पवार आपल्याला पाठिंबा देतील असे सर्वांना वाटत राहते.

आणि म्हणूनच कोणीही पवारांना दुखवित नाहीत व त्यास मोदी अपवाद नाहीत.

अन्यथा त्यांनी मागील ८ वर्षात तसे केले असते.

याबाबत मी माझे मत सविस्तरपणे स्पष्ट केलेले आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 10:11 pm | श्रीगुरुजी

पण सुरेश कलमाडी या राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी काँग्रेस नेत्याला घेण्याने भाजपला फायदा होणार नाहीच.

बरोबर आहे. पण पाचपुते, हर्षवर्धन पाटील, कालिदास कोळंबकर, भीमराव केराम, किसन कथोरे, मधुकर पिचड अश्यांना घेऊन तरी काय फायदा होता?

पण सुरेश कलमाडी या राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी काँग्रेस नेत्याला घेण्याने भाजपला फायदा होणार नाहीच.

बरोबर आहे. पक्षाचे कार्यकर्ते वाढवायचे सोडून बहूतेक भापप (भारतीय पतितपावन पक्ष) ने बहुतेक नेतेच वाढवायचे ठरवले आहे. तसेही आता तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन सतरंज्या उचलायची सोय झाली आहे.

वैयक्तिक कॅराव्हॅन पर्यटनाला परवानगी.

केरळ आणि गुजरातपाठोपाठ आता महाराष्ट्रातही कॅराव्हॅनना परवानगी देण्यास सुरूवात करण्यात आल्याने अशा प्रकारचे पर्यटन वाढीस लागण्यास मदत होणार आहे.

अशी विश्लेषणत्मक बातमी आज लोकसत्ता वर वाचली. पर्यटन प्रेमिंसाठी खुशखबर ठरेल असा निर्णय उशिराने का होईना पण महाराष्ट्र सरकारने घेतल्याबद्दल राज्यसरकारचे अभिनंदन!

ह्यातून पर्यटनवाढी बरोबरच व्यवसाय/रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील.

सुरिया's picture

20 Aug 2022 - 3:22 pm | सुरिया

मूळ बातमी वाचताना एक डोक्यात आले, परवानगी आत्ता मिळाली म्हणजे स्वदेश पिक्चर मध्ये शारुख भाव चालवतात ती व्हॅन आरटीओ चे दृष्टीने इल्लिगल होती.

हो. आता कॅराव्हॅन्सची अधिकृतपणे नोंदणी सुरु झाली असून त्यांच्या पार्किंग साठीचे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचे काम (खाजगी तत्वावर) सुरु झाले आहे.
व्यवसाय रोचक आहे, नवीन असताना त्या व्यवसायात उतरल्यास चांगले यश मिळू शकेल असा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात अधिक माहिती मिळाल्याशिवाय निष्कर्ष काढणे थोडे घाईचे होईल!

बॉलिवूड मधले हिरो हिरविनी वापरतात त्या वानिटी व्हॅन जवळपास कॅराव्हान सारख्याच असतात ना? बेड, टॉयलेट, इतर घरातल्या सर्व सुखसोयी त्यात असतात, त्या व्हॅन्स ना आरटीओ कसले वाहन म्हणून परमिशन देत होत्या?
कदाचित कॅम्पिंग करायला परमिशन नव्याने मिळाली असावी. वाहन modified Bus म्हणून किंवा चासिस वर बांधणी म्हणून रजिस्टर होत असावी.

मदनबाण's picture

20 Aug 2022 - 6:17 pm | मदनबाण

Bilkis Bano case: “दोषींची सुटका रद्द करा, हे फार लाजिरवाणं”, तब्बल सहा हजारजणांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी
बलात्कारी कोणत्याही धर्माचा /जातीचा /पंथाचा असो त्याला असे मोकाट सोडणे हे अयोग्यच आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2022 - 7:18 pm | श्रीगुरुजी

बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱ्यांची शिक्षा माफ करून त्यांना मोकळे सोडणे हे अत्यंत संतापजनक आहे. न्यायालयाने यांना परत आत टाकले पाहिजे.

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 8:05 pm | जेम्स वांड

मागे हमीद अन्सारी संबंधी चर्चा सुरू असताना कोणीतरी USCIRF वगैरे दाखला देऊन USCIRF ने बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यक्रमात अन्सारी गेल्याचे अन् त्यामुळे अन्सारी कसे वाईट आहे हे सुचवले होते, तेच आता लागू होईल का ?

बिल्कीस बानोच्या बलात्कारी लोकांवर गोध्र्याचे विद्यमान भाजप आमदार सी के राऊलजी म्हणतात की ते बलात्कारी चांगले संस्कार असणारी ब्राह्मण माणसे आहेत

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 8:10 pm | जेम्स वांड

बलात्कारी नुसते मोकळे सोडले असते तरी वेगळं होतं, वर उल्लेख केलेले राऊलजी हे आमदार स्वतःच त्यांना एकमताने सोडणाऱ्या पॅनल मध्ये दोन सदस्यांपैकी एक होते.

ते बलात्कारी बाहेर आल्यावर त्यांचे ओवाळून हार तुरे घालून स्वागत झालं,

हे ही कमी वाटलं, म्हणलं बुआ असेल नातलगांच्या प्रेमाचा भाग

तर जेल मधून निघाल्यावर ह्या बलात्कारी वीर धर्मप्रेमी लोकांचा स्थानिक विश्व हिंदू परिषद कार्यालयात उत्तम सत्कार झाला

डँबिस००७'s picture

20 Aug 2022 - 9:02 pm | डँबिस००७

बीबीसी ची गीता पांडे कशी न्युज रिपोर्ट करते ते पहा.
"The attack on Bilkis Bano and her family was one of the most horrific crimes during the riots, which began after 60 Hindu pilgrims died in a fire on a passenger train in Godhra town.

मिडीया लोकांशी कशी खेळते.....
गोध्रा मध्ये पॅसेंजर ट्रेनला लागलेल्या आगीत ६० लोक मेले त्यानंतर बिल्किस बानोवर झालेला बलात्कार हा सर्वात मोठा भयंकर गुन्हा झाला!

ट्रेन मधल्या ६० लोकांना जाळुन मारले तो गुन्हा कसा सफाईने लपवुन बिल्किस बानो वरच्या गुन्ह्याला मोठा ठरवण्याच काम केलेल आहे. ह्या पत्रकाराला गोध्रा केस कोर्टाचा निर्णय आलेला असुन कित्येक लोकांना शिक्षा सुनावलेली आहे हेच लपवलेल आहे.

https://www.thehindu.com/news/national/other-states/live-updates-verdict...

खरे तर कमीत कमी "which began after 60 Hindu pilgrims died in a fire on a passenger train in Godhra town. " ही सांगत / लिहीत आहेत हीच मोठी गोष्ट आहे. बरेचदा तशी गोध्रा घटना झाल्याचे बरेच जण लपवतात, आणि ती दंगल अशीच चालु झाली असे भासवतात.

डँबिस००७'s picture

20 Aug 2022 - 9:04 pm | डँबिस००७

बिल्किस बानो वरच्या गुन्ह्याला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. पण खरी परिस्थिती लपवल्या बद्दल आहे.

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 9:25 pm | जेम्स वांड

हा प्रतिसाद (मी तुम्हाला पूर्ण ओळखत नाही वैयक्तिक तरीही) जर ग्राह्य धरला तरीही अतिशय अस्थानी अन् असंवेदनशील वाटतोय असे खेदाने नमूद करावे वाटते.

झाकिया जाफरीने आपला नवरा गमावला, पण तिचा नवरा एहसान जाफरी पण बरोबर माणूस नव्हता असे मानले तरी नंतर झकीया तिस्ता सेटलवाड ने इमोशनल exploit केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तिची केस रद्द केली.

झहीरा शेखने बेस्ट बेकरी केसमध्ये साक्ष इतकी फिरवली की कोर्टाने तिला सरळ वाटेला लावले.

बिल्कीसची केस तशी नव्हती, पार कोर्ट ते राज्य सरकार स्थापित SIT ने बिल्कीस बानो रेप झाल्याचे मान्य केले होते, इथे लिहिणे उचित आहे का नाही माहिती नाही (नृशंस डिस्क्लेमर) पण तिचा बलात्कार झाला तेव्हा ती पाच महिने गर्भवती होती, ह्या नरपशुंनी तरीही तिला लचके तोडत अर्धमेले केले, इतकेच नाही तर तिच्या ३ वर्षाच्या मोठ्या लेकराला आपटून आपटून मारले.

यत्र नार्यस्तू पुजयंते का काहीसे म्हणतात एक संस्कृत सुभाषितात, एका स्त्रीच्या विटंबनेची शिक्षा म्हणून आज ज्याच्या जन्माचा उत्सव आम्ही हिंदू साजरा करतो त्या तत्कालीन द्रष्टा राजकारणी अन् लोकोत्तर अवतारी पुरुष असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने एक अख्खे भारत वर्षातील सर्वात शक्तिशाली असणारे कुरुकुल अक्षरशः धुळीत मिसळून टाकले होते.

त्यामुळे, कळकळीची विनंती आहे की असे अस्थानी प्रतिसाद इथे टाळावेत, बाकी आपली मर्जी, वकूब, मगदूर ह्यांची उंची अन् खोली आपापल्या पाशी

सादर जय श्रीराम.

श्री जेम्स वांड, तुमचा प्रतिसाद रोचक आहे. पुढील प्रतिसाद माझ्या माहितीवर आधारीत आहे. कृपया काही चुकीचे सापडल्यास सांगावे.
--------------------------------
जरी त्या आरोपींनी गुन्हा केला असला तरी त्यांना शिक्षा (जन्मठेप = १४ वर्ष) झाली, त्यांनी सुरवातीपासुन १५ वर्षे तुरुंगात शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्यांना बाहेर येण्यास काहीच हरकत नसावी.
शेवटी प्रत्येक माणसाला शिक्षा पुर्ण झाल्यानंतर दुसरी संधी मिळायला हवी.

--------------------------------

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 10:18 pm | जेम्स वांड

तिच्या बलात्काराची कंडीशन पाहता, हा गुन्हा रेयररेस्ट ऑफ द रेयर समजायला हरकत नसावी (reference - निर्भया केस, पॉइंटर - थंड डोके, अतिशय क्रूर पद्धत अन् मानवतेला काळीमा फासला जाईल असे वागणे)

अश्या केसेस मध्ये सहसा मृत्युदंड होतो आणि तो लेट झाल्यास जनमत पण तापते, इथे मृत्यदंड दूर झाला ठीक आहे कोर्टाचा मान म्हणून सोडून देऊ, पण गुन्ह्याची नृशंस पार्श्वभूमी पाहता नाही मृत्युदंड तर किमान लाईफ विथ आर आय विदाउट पेरोल फॅसिलिटी मागायला हरकत नव्हती काही स्टेट पब्लिक प्रोसिक्युटर.

आणि पूर्ववैमन्यातून वगैरे खूप घसरडा प्रतिवाद आहे, कारण

१. पूर्ववैमन्यातून असता गुन्हा तर हे नरपशू कारागृहातून बाहेर आल्यावर त्यांचा विश्व हिंदू परिषदेने कार्यालयात बोलवून त्यांचा सत्कार कश्याला करावा ? का बुआ तुम्ही तुमची खुन्नस काढल्याबद्दल हे घ्या हारतुरे ?

२. ते बिचारे संस्कारी ब्राह्मण आहेत असे राऊळजी ह्यांनी म्हणणे कश्याला आले असते जर गुन्हा पूर्ववैनस्यातून घडलेला असल्यास, पदसिद्ध भाजप आमदाराने इतके लाचार अन् फालतू विधान का करावे ?

३. पूर्ववैमन्यातून नसल्यास तर शुद्ध हलकट पणा establish होतोय की राव. अजून काय बोलायचं त्यावर !

ओके मग आपण आता legal terms वर बोलूया

नक्कीच आपण कायदेशीर गोष्टीवर बोलुया. मी मुळ निकालाची प्रत शोधत आहे, पण अजुन मिळाली नाही. जन्मठेपेबद्दल बरीच वेगवेगळी माहीती जालावर आहे. त्यामुळे जोपर्यंत मुळ निकाल मिळत नाही तोपर्यंत नक्की शिक्षा किती वर्षांची हे कळणार नाही.

अश्या केसेस मध्ये सहसा मृत्युदंड होतो आणि तो लेट झाल्यास जनमत पण तापते, इथे मृत्यदंड दूर झाला ठीक आहे कोर्टाचा मान म्हणून सोडून देऊ, पण गुन्ह्याची नृशंस पार्श्वभूमी पाहता नाही मृत्युदंड तर किमान लाईफ विथ आर आय विदाउट पेरोल फॅसिलिटी मागायला हरकत नव्हती काही स्टेट पब्लिक प्रोसिक्युटर.

मुळ निकाल आणि त्यावेळीची पार्श्वभुमी आठवत नाही. त्या वेळी तो निकाल बरोबरच आणि दोन्ही बाजुंना (कमीत कमी अन्यायग्रस्त यांना) पसंत असेल असे समजुन चालतो.

आणि पूर्ववैमन्यातून वगैरे खूप घसरडा प्रतिवाद आहे, कारण
१. पूर्ववैमन्यातून असता गुन्हा तर हे नरपशू कारागृहातून बाहेर आल्यावर त्यांचा विश्व हिंदू परिषदेने कार्यालयात बोलवून त्यांचा सत्कार कश्याला करावा ? का बुआ तुम्ही तुमची खुन्नस काढल्याबद्दल हे घ्या हारतुरे ?
२. ते बिचारे संस्कारी ब्राह्मण आहेत असे राऊळजी ह्यांनी म्हणणे कश्याला आले असते जर गुन्हा पूर्ववैनस्यातून घडलेला असल्यास, पदसिद्ध भाजप आमदाराने इतके लाचार अन् फालतू विधान का करावे ?
३. पूर्ववैमन्यातून नसल्यास तर शुद्ध हलकट पणा establish होतोय की राव. अजून काय बोलायचं त्यावर !

तुम्हाला काय प्रतिसाद अपेक्षित आहे ह्यावर ?

जेम्स वांड's picture

21 Aug 2022 - 3:27 am | जेम्स वांड

१. ठीक आहे शोधुया मग ऑर्डर कॉपी

२.

त्या वेळी तो निकाल बरोबरच आणि दोन्ही बाजुंना (कमीत कमी अन्यायग्रस्त यांना) पसंत असेल असे समजुन चालतो

मला नाही वाटत कोर्ट कोणाच्या पसंती अन् नापसंतीने निर्णय किंवा निवाडा देतं, एकंदरीत legal process ही दोन्ही बाजूंनी वाद प्रतिवाद करून जे कलम लागू होईल/ होणार नाही त्यावर उहापोह करायचा असून कोर्टाने उपलब्ध साक्षी पुरावे फिर्यादी पक्षाने मांडलेल्या कलमात बसते का नाही इतके पाहून निर्णय/ आरोपी पक्षाचे म्हणणे ऐकून - निर्णय देणे असते. असे पसंत नापसंत सगळ्यांची जमेस धरणार नाही कोर्ट, कायद्यात काय बसते, अन् फिर्यादी/ आरोपी पक्ष त्या अनुषंगाने काय प्लीड करतात ह्यावर आधारित निवाडा कोर्ट देते. असे मला तरी वाटते.

३. काहीच नाही, तुम्ही एक शक्यता वर्तवली, ती लॉजिक वर टिकत नाही असे मला वाटले म्हणून त्याची कारणमीमांसा मी मांडली की बुआ पूर्ववैमनस्यातून हे घडल्याचे का वाटत नाही मला (उपलब्ध डाटा मधून), पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून माझं एक लॉजिकल , इल - लॉजिकल argument समजून, तुम्ही काय प्रतिसाद द्यायचा हे तुम्ही ठरवणार, मी काय सांगू ?

Trump's picture

21 Aug 2022 - 11:09 am | Trump

धन्यवाद श्री वांड

मला नाही वाटत कोर्ट कोणाच्या पसंती अन् नापसंतीने निर्णय किंवा निवाडा देतं, एकंदरीत legal process ही दोन्ही बाजूंनी वाद प्रतिवाद करून जे कलम लागू होईल/ होणार नाही त्यावर उहापोह करायचा असून कोर्टाने उपलब्ध साक्षी पुरावे फिर्यादी पक्षाने मांडलेल्या कलमात बसते का नाही इतके पाहून निर्णय/ आरोपी पक्षाचे म्हणणे ऐकून - निर्णय देणे असते. असे पसंत नापसंत सगळ्यांची जमेस धरणार नाही कोर्ट, कायद्यात काय बसते, अन् फिर्यादी/ आरोपी पक्ष त्या अनुषंगाने काय प्लीड करतात ह्यावर आधारित निवाडा कोर्ट देते. असे मला तरी वाटते.

पसंतीचा याचा अर्थ, तो त्यांच्या दृष्टीने पुरेसा असा होता. तो ह्याला उद्देशुन होता. नाहीतर त्यांनी वरच्या न्यायालयात दाद किंवा पुनर्विचार याचिका दाखल केली असती.
सध्या तरी न्यायालयाचा तो निर्णय पुरेसा होता असे मला गृहीत धरावे वाटते.

अश्या केसेस मध्ये सहसा मृत्युदंड होतो आणि तो लेट झाल्यास जनमत पण तापते, इथे मृत्यदंड दूर झाला ठीक आहे कोर्टाचा मान म्हणून सोडून देऊ, पण गुन्ह्याची नृशंस पार्श्वभूमी पाहता नाही मृत्युदंड तर किमान लाईफ विथ आर आय विदाउट पेरोल फॅसिलिटी मागायला हरकत नव्हती काही स्टेट पब्लिक प्रोसिक्युटर.

---------------------

३. काहीच नाही, तुम्ही एक शक्यता वर्तवली, ती लॉजिक वर टिकत नाही असे मला वाटले म्हणून त्याची कारणमीमांसा मी मांडली की बुआ पूर्ववैमनस्यातून हे घडल्याचे का वाटत नाही मला (उपलब्ध डाटा मधून), पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून माझं एक लॉजिकल , इल - लॉजिकल argument समजून, तुम्ही काय प्रतिसाद द्यायचा हे तुम्ही ठरवणार, मी काय सांगू ?

जरी तो गुन्हा पुर्ववैमनस्यातुन केला असेल / नसेल त्यामुळे फारसा काही फरक पडत नाही. पण माझ्या समजुतीनुसार दंगलीमध्ये पटापट खुन / हत्या / लुटालूट करायची असतात. बलात्कार करुन कोणी ते उघडपणे मिरवणार नाही. त्यामुळे नुसते दंगलीचे कारण वाटत नाही. पुर्ववैमनस्य किंवा / आणि कमालीचा द्वेष अशी अतिरिक्त कारणे असु शकतात.

तुम्ही काय प्रतिसाद द्यायचा हे तुम्ही ठरवणार, मी काय सांगू ?

तुम्ही वरती कायदेशीर गोष्टीवर बोलुया असे लिहित आहात आणि खाली पुन्हा असंबधित प्रश्न विचारत आहात. त्यामुळे तुमची अपेक्षा जाणुन घ्यायचा प्रयत्न केला.

डँबिस००७'s picture

21 Aug 2022 - 12:17 pm | डँबिस००७

मला नाही वाटत कोर्ट कोणाच्या पसंती अन् नापसंतीने निर्णय किंवा निवाडा देतं, एकंदरीत legal process ही दोन्ही बाजूंनी वाद प्रतिवाद करून जे कलम लागू होईल/ होणार नाही त्यावर उहापोह .............

" Every saint has a past, and every sinner has a future."

प्रसिद्द लेखक ऑस्कर वाईल्ड चे वरील वाक्याचा संदर्भ देत सुप्रिम कोर्टाच्या खंड पिठाने ४ वर्षांच्या चिमुरडीचा रेप व निघृण खुन करणार्या मोहम्मद फिरोजच्या फाशीच्या शिक्षेला बदलुन कारावासाची शिक्षा दिली.

महम्मद फिरोज नावाच्या माणसाने आपल्या मित्राच्याच ४ वर्षांच्या मुलीच अपहरण करुन तिचा बला त्कार केला व नंतर तिचा खुन केला. हायकोर्टात हा गुन्हा सिद्ध झाला आणी महम्मद फिरोजला फाशीची शिक्षा सुनावली. पुढे सुप्रिम कोर्टात खंड पिठाने सुनावणीच्या दरम्यान " Every saint has a past, and every sinner has a future." कोट करत फाशीची शिक्षा रद्द केली व कारावासाची शिक्षा सुनावली.

चार वर्षांच्या चिमुरडीचा बलात्कारी खून करणाऱ्या फिरोजच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर करताना सर्वोच्च न्यायालयाने ऑस्कर वाइल्डचा हवाला दिला होता, तेव्हा म्हटले होते, “संत आणि पापी यांच्यात फरक एवढाच आहे की प्रत्येक संताचा भूतकाळ असतो आणि प्रत्येक पाप्याचा भूतकाळ असतो. एक भविष्य," याने सोशल मीडियावर बरेच लक्ष वेधले.
मंगळवारी, सुप्रीम कोर्टाने 4 वर्षीय पीडितेच्या आईची फिरोजच्या फाशीच्या शिक्षेमध्ये बदल करण्याच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची याचिका फेटाळून लावली, असे लाइव्ह लॉने वृत्त दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याशी संबंधित सर्व घटकांकडे योग्य लक्ष दिल्यानंतर फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केल्याचे सांगितले. "भारतीय स्ट्रीट शक्ती" या महिला हक्क संघटनेने दाखल केलेल्या याच प्रकरणात आणखी एक पुनर्विलोकन याचिका फेटाळली
पीडितेच्या आईने अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांच्यामार्फत दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत असा दावा केला होता की, “मोहम्मद फिरोजने फसव्या पद्धतीने अपहरण केलेल्या, क्रूरपणे बलात्कार केलेल्या आणि निर्घृणपणे हत्या केलेल्या माझ्या लहान मुलीचेही भविष्य होते.” या याचिकेत असा दावाही करण्यात आला होता की, शिक्षेचे धोरण गुन्ह्याच्या स्वरूपाला साजेसे आणि दुष्कर्म करणाऱ्याचे उदाहरण बनवण्याच्या उद्देशाने आणि जे अजूनही निर्दोष आहेत त्यांना चेतावणी देणारे असले पाहिजे याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. .

https://www.timesnownews.com/mirror-now/in-focus/every-sinner-has-a-futu...

https://www.deccanherald.com/national/sc-dismisses-review-plea-against-v...

पुर्वी अश्याच एका केस मध्ये हिंदु माणसाला एका मुस्लिम मुलीच्या रेप व हत्त्ये बद्दल दिलेली फाशीची शिक्षाच कायम ठेवली होती. याचा अर्थ सुप्रिम कोर्ट खुप विचारांती कोणाला काय शिक्षा द्यायची हे ठरवते. त्यासाठी ऑस्कर वाईल्डच्या वाक्याचा आधार देताना सु को काहीही वाटत नाही.

जन्मठेप = १४ वर्ष)|>>>>हे चूक आहे, त्यांना मरेपर्यंत शिक्षा झाली होती

धन्यवाद.
कृपया मुळ निकालाची प्रत द्या.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2022 - 9:21 pm | श्रीगुरुजी

सुशीलकुमार शिंदे ऑक्टोबर २००४ ते जानेवारी २००६ या काळात आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. त्या काळात त्यांच्या सहीने खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कॉंग्रेस कार्यकर्त्याची शिक्षा माफ करून त्याला सोडल्याने खूप आरडाओरडा झाला होता. खुनातीर बळीच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागून तो निर्णय रद्द करायला लावून त्या खुन्याला परत तुरूंगात जायला लावले होते. त्या निकालपत्रात न्यायाधीशांनी तत्कालीन कॉंग्रेसचे राज्य सरकार व राज्यपाल सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कडक ताशेरे ओढले होते.

बिल्कीस बानो प्रकरणात सुद्धा नातेवाईक न्यायालयात गेल्यास शिक्षामाफी रद्द होईल आणि व्हायलाच पाहिजे.

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 9:27 pm | जेम्स वांड

दंडवत तुमच्या अभ्यासाला !

कसले अचूक अन् legally valid citation शोधलेत आपण! मानले बुआ आज आपल्याला मी तरी.

तो निर्णय न्यायालयाने रद्द केला की राज्यपालांनी मागे घेतला?
जर न्यायालयाने रद्द केला असेल तर ते नक्कीच राज्यापालांच्या विशेषाधिकारांचे उल्लघंन आहे.

डँबिस००७'s picture

20 Aug 2022 - 9:22 pm | डँबिस००७

Bilkis Bano: The pain of seeing my rapists go free

बीबीसी , गीता पांडे

https://www.bbc.com/news/world-asia-india-62574247

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 9:33 pm | जेम्स वांड

टोटल हुकली अन् चुकली हे जरी मानले तरी बिल्कीस बानो ह्या बाईचं शील लुटणारे अन् तिचे ३ वर्षीय पोर ठेचून मारणारे लोक बाहेर आल्यावर "ती उत्तम संस्कार असलेली ब्राह्मण माणसे आहेत" हे विधान किंवा त्यांचे स्थानिक विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात झालेले स्वागत अन् हार तुरे आपणांस न्याय्य वाटतात का ?

असल्यास चर्चा इथंच थांबवता येईल.

"ती उत्तम संस्कार असलेली ब्राह्मण माणसे आहेत" हे विधान किंवा त्यांचे स्थानिक विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात झालेले स्वागत अन् हार तुरे आपणांस न्याय्य वाटतात का ?

नक्कीच नाही. हे नक्कीच हिंदु धर्माला बदनाम करणारे आहे.

रावण देखील दशग्रंथी ब्राह्मणच होता, परंतु त्यामुळे त्याची दुष्कृत्ये योग्य ठरवली गेली नव्हती. त्यामुळे "ती उत्तम संस्कार असलेली ब्राह्मण माणसे आहेत" हे विधानच मुळात चुकीचे आहे, उत्तम संस्काराचे होते तर मग बलात्कार कोणत्या संस्कारामुळे केला गेला ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2

रावण आणि हे गुन्हेगार जन्माने ब्राह्मण होते, कर्माने नव्हे.

जेम्स वांड's picture

21 Aug 2022 - 11:39 am | जेम्स वांड

शाळेच्या दाखल्यावर जात जन्मधिष्टित लिहिली जाते का तो रकाना रिकामा सोडून नंतर कामाचे क्षेत्र पाहून भरला जातो ?

सध्यातरी जन्माप्रमाणे लिहीले जाते. पण तीच तरी अडचण आहे. हिंदु धर्माच्या पुनरउध्द्दार करण्याला खुप मोठी धोंड होउन बसला आहे.

Trump's picture

20 Aug 2022 - 9:58 pm | Trump

Her attackers were her neighbours in the village, men she had seen almost daily while growing up. They tore off her clothes and several of them raped her, ignoring her pleas for mercy.

Her cousin, who had delivered a baby two days earlier while they were on the run, was raped and murdered and her newborn was killed.
https://www.bbc.com/news/world-asia-india-62574247

हा बहुतेक पुर्ववैमनस्याचा भाग असावा आणि दंगलीच्या आड जुना हिशेब चुकता केला असण्याचा एक अंदाज.

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 10:19 pm | जेम्स वांड

ह्याला वरतीच उत्तर दिले आहे इथे वेगळे लिहीत नाही. आभार.

वामन देशमुख's picture

21 Aug 2022 - 12:14 am | वामन देशमुख

या चर्चेवरून गिरिजा टिक्कू आठवली.

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://hindi.asian...

जेम्स वांड's picture

21 Aug 2022 - 3:34 am | जेम्स वांड

दोन्ही केसेस मध्ये प्रचंड समानता असू शकेल अतिशय नृशंस असल्याबद्दल गुन्हा. तूर्तास आपली चर्चा बिल्कीस बानो बलात्कार ह्या विषयावर सुरू असल्यामुळे त्यावर आपले बहुमूल्य मत वाचायला आवडेल इतके आवर्जून नोंदवतो.

काश्मीर, काश्मिरी पंडित, काश्मिरी हिंदू/ शीख समाजावर अत्याचार हे विषय समयोचित धागा येईपर्यंत मी तरी राखीव ठेवतो, उगाच धागा अन् विषय भरकटवण्याचे पाप नको माथी, कसे ?

मी काय म्हणतो वामनराव, दुर्मिळ गुन्हे अन् तदानुशांगिक शिक्षा ह्यावर एक सामायिक धागा काढा तुम्ही, तिथे सगळ्या केसेस एक बाय एक घेऊ चर्चेला, तूर्तास "ताज्या घडामोडीत" असलेली केस उर्फ बिल्कीस केस इथं घेऊ चर्चेला, ठीक आहे ?

डँबिस००७'s picture

21 Aug 2022 - 4:22 pm | डँबिस००७

दिल्लीच्या उप मुख्यमंत्री मनिष सिसोदीया साठी Look Out Notice जारी करण्यात आलेली आहे. देश तर सोडाच दिल्ली सोडुन जाता येणार नाही. दारुवरच्या कराच्या कलेक्शन च्या संदर्भात आरोप लावण्यात आलेले आहेत. दारु संबंधी नवी निती दिल्ली सरकारने २०२१ ला लागु केलेली होती. त्या निती अंतर्गत दारुसाठी अनेक नविन दुकाने उघडण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली. यामूळे दिल्ली सरकारला २१०० कोटीचे उत्पन्न मिळणार होते पण प्रत्यक्षात मिळले फक्त १,१०० कोटी रू.

मनिष सिसोदीयाच्या घरावर, कार्यालयावर अनेक जवळच्या लोकांवर ED ची धाड पडल्यावर मनिष सिसोदीयाला कळुन चूकलेले आहे की आता जेल चुकत नाही.
त्यानंतर तातडीने केलेल्या वार्ताहर परिषदेत
दिल्लीच्या शाळेचे गुणगान करण्यात आले. जग प्रसिद्ध न्यूयॉर्क टाईम्स मध्ये दिल्लीच्या शाळेच्या मॉडेल बद्दल छापुन आलेल्याचे दाखले मनिष सिसोदीयाने पत्रकार परिषदेत दाखवले. त्याच परिषदेत कतार मधल्या अल जझिरा च्या न्युज पेपर मध्ये आलेला लेखही दाखवला गेला.पण त्यात एक गोची झाली. दिल्लीच्या शाळेच्या मॉडेल बद्दलचा लेख न्यूयॉर्क टाईम्स मध्ये छापुन येण्या आधिच अल जझिराच्या न्युज पेपर " साभार न्यूयॉर्क टाईम्स" च्या तळ टिपे सकट छापुन आला. त्यामुळे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आले की हा एक प्रसिद्धीचा स्टंट होता. त्यापुढची गोची म्हणजे दिल्ली सरकारने चालवलेल्या शाळेबद्दलच्या लेखात फोटो एका खाजगी शाळेचा दिला होता आणि चाणाक्ष लोकांच्या नजरेतुन ते सुटले नाही.
https://youtu.be/ArDrDXntB28
https://youtu.be/Ave_m6CQHTQ
दिल्ली सरकारचे अनेक मंंत्री वेगवेगळ्या आरोपा खाली जेल मध्ये बंद आहेत. मुमं केजरीवालने चालाखीने स्वःताकडे एकही खाते न ठेवून भ्रष्टाचाराच्या आरोपापासुन स्वःताला वाचवलेले आहे. एकीकडे अण्णा आंदोलनापासुन एकत्र आलेल्या महत्वाच्या साथीदारांना आपल्या पक्षातुन बाहेरचा रस्ता दाखवला होता ( कुमार विश्वास, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आशूतोष ) आणि आता मंत्रीमंडाळातील अनेक मंत्री जेल मध्ये आहेत.