ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ३)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
13 Aug 2022 - 10:47 am

नमस्कार मंडळी,

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवीन भाग काढत आहे. नवीन प्रतिसाद लिहायचे असतील तर ते या भागात लिहावेत आणि आधीच्या भागात लिहिलेल्या प्रतिसादांना उत्तर लिहायचे असेल तरच ते त्या भागात लिहावेत ही विनंती. या महिन्यात पहिल्या दोन भागात मिपा परंपरेला अनुसरून चांगली चर्चा झाली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार.

नितीशकुमार परत राजदबरोबर गेले तेव्हा मी त्यावेळेस चर्चेत मी म्हटले होते की समाजवादी नेते भांडण्यासाठी एकत्र येतात आणि एकत्र येण्यासाठी भांडतात. तसेच समाजवादी विचारांचे पक्ष किती वेळा एकत्र आले आणि किती वेळा तुटले याचा हिशेब ठेवणे कोणाही मर्त्य मानवाला शक्य होईल असे वाटत नाही. ते का हे या भागात इथे टाईमलाईनच्या मदतीने स्पष्ट करतो.

१९३० चे दशक: जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि आचार्य जीवतराम कृपलानी यांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९४९: जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी काँग्रेस सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९५१: आचार्य कृपलानींनी काँग्रेस सोडून स्वत:च्या किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केली.
१९५२: पहिल्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर प्रजा पक्ष एकत्र येऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना
१९५५: राममनोहर लोहियांनी प्रजा समाजवादी पक्ष सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९६४: कर्पुरी ठाकूर यांनी प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडून स्वत:च्या संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना केली. जॉर्ज फर्नांडिस यांचा पण संयुक्त समाजवादी पक्षात प्रवेश
१९६७ - चरणसिंग यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून भारतीय क्रांती दलाची स्थापना केली.
१९६९ - बिजू पटनाईक यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून उत्कल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षात फूट-- इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(आर) आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(ओ) पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९७२ - १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी एकत्र येऊन नव्या समाजवादी पक्षाची स्थापना
१९७४ - चरणसिंगांचा भारतीय क्रांतीदल, बिजू पटनाईकांचा उत्कल काँग्रेस, १९७२ मध्ये स्थापन झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला मिनू मसानी-पिलू मोदींचा स्वतंत्र पक्ष आणि १९७३ मध्ये भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला स्वत:चा पक्ष एकत्र येऊन भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना
१९७७ - जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा आणि नंदिनी सत्पथी काँग्रेसबाहेर पडून त्यांनी स्वत:चा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हा पक्ष स्थापन केला.१९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी, भारतीय लोकदल, काँग्रेस(ओ) आणि भारतीय जनसंघ यांनी भारतीय लोकदलाच्या हलधर या चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर या पक्षांचे जनता पक्ष या नव्या पक्षात विलीनीकरण.
१९७८ - शरद पवार, वायलार रवी, अंबिका सोनी आणि के.पी.उन्नीकृष्णन यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून काँग्रेस(समाजवादी) या पक्षाची स्थापना केली.
१९७९: चरणसिंग, राजनारायण इत्यादी नेत्यांनी जनता पक्ष सोडून जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला आणि जनता पक्षाचे सरकार पाडले. चरणसिंग औटघटकेचे पंतप्रधान झाले.
१९८०- लोकसभा निवडणुकांमध्ये धुव्वा उडल्यानंतर चरणसिंग जनता पक्ष(सेक्युलर) बाहेर पडले आणि स्वत:च्या भारतीय लोकदल पक्षाची पुनर्स्थापना केली. जगजीवन राम जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा काँग्रेस(जे) पक्ष स्थापन केला. जनता पक्षातून पूर्वाश्रमीचे जनसंघाचे नेते बाहेर पडून त्यांनी स्वत:च्या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
१९८०/१९८१: चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून देवीलाल यांच्या स्वत:च्या लोकदल(बी) पक्षाची स्थापना केली.
१९८७-- काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी जनमोर्चा या अराजकीय गटाची स्थापना केली. शरद पवार, अंबिका सोनी आणि वायलार रवी काँग्रेसमध्ये परतले. के.पी.उन्नीकृष्णन काँग्रेस(एस) बरोबर राहिले.
१९८८-- चरणसिंगांचा (त्यांच्या मृत्यूनंतर अजितसिंगांचा) लोकदल, देवीलालांचा लोकदल, काँग्रेस(एस), वि.प्र.सिंगांचा जनमोर्चा एकत्र येऊन जनता दलाची स्थापना.
१९८९- लोकसभा निवडणुकांनंतर जनता दलाचा गटनेता (म्हणजेच होणारा नवा पंतप्रधान) निवडायच्या वेळेस चंद्रशेखर आणि वि.प्र.सिंग हे दोन दावेदार होते. अरूण नेहरू आणि पत्रकार कुलदीप नय्यर यांना हाताशी धरून वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखर यांना मात द्यायचा डाव खेळला. बैठक सुरू होताच ताबडतोब इतरांना कोणालाही बोलायची संधी न देता वि.प्र.सिंगांनी देवीलालांचे नाव नेतेपदावर सुचविले. काही क्षणातच पुढील पंतप्रधान देवीलाल असतील अशा तारा वर्तमानपत्रांच्या ऑफिसात गेल्याही होत्या. पण देवीलालांनी आपले वय ७५ उलटून गेले असल्याने इतकी मोठी जबाबदारी आपल्याला नको असे म्हटले आणि नेतेपदासाठी वि.प्र.सिंगांचे नाव सुचविले. हे सगळे चंद्रशेखरांना अंधारात ठेऊन ठरवून केले गेले होते. त्यातून चंद्रशेखर दुखावले गेले आणि ते वि.प्र.सिंगांच्या शपथविधीलाही हजर नव्हते.
१९९०- चंद्रशेखर आणि देवीलाल जनता दलाबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:च्या समाजवादी जनता दल या पक्षाची स्थापना केली. चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले. राजस्थानात दिग्विजयसिंग (मध्यप्रदेशातील वाचाळवीर दिग्विजियसिंग वेगळे) या स्थानिक नेत्याने जनता दल सोडून स्वत:चा गट स्थापन करून भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि भैरोसिंग शेखावतांचे अल्पमतातले सरकार तारले.
१९९१-- चिमणभाई पटेल यांनी समाजवादी जनता दलातून बाहेर पडून स्वत:च्या जनता दल(गुजरात) पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने आपले सरकार तारले.
१९९२- अजितसिंग जनता दलाबाहेर आणि त्यांनी स्वत:चा जनता दल(अजित) हा पक्ष स्थापन केला. मुलायमसिंग यादव समाजवादी जनता दलाबाहेर पडून त्यांनी स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. चिमणभाई पटेल यांचा जनता द्ला(गुजरात) हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन.
१९९३-- जनता दल, समाजवादी जनता दल आणि जनता दल (अजित) यांची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका एकत्र लढवायची घोषणा. पण उत्तर प्रदेशात जोरदार पराभव झाल्यानंतर अजित सिंगांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९० मध्ये राजस्थानात भैरोसिंग शेखावतांचे सरकार तारणारे दिग्विजयसिंग काँग्रेसमध्ये गेले.
१९९४- जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि रबी रे यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. नंतर देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी पण समता पक्षात प्रवेश केला.
१९९६-- चंद्रशेखर यांनी पण समता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवली. पण निवडणुकांनंतर त्यांनी आपला समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) ची स्थापना केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी अजितसिंग काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला. निवडणुकांनंतर रामकृष्ण हेगडेंची जनता दलातून हकालपट्टी. त्यांनी स्वत:चा लोकशक्ती हा पक्ष स्थापन केला.
१९९७-- देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा हरियाणा लोकदल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे नाव १९९९ मध्ये बदलून इंडिअन नॅशनल लोकदल हे झाले. नवीन पटनाईक यांनी जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दल हा पक्ष स्थापन केला.
१९९९--- उरल्यासुरल्या जनता दलात जनता दल(धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल(संयुक्त) हे दोन तुकडे पडले. देवेगौडा आणि कुमारस्वामी जनता दल(धर्मनिरपेक्ष) मध्ये तर रामविलास पासवान जनता दल(संयुक्त) मध्ये सामील. समता पक्ष आणि लोकशक्ती हे दोन पक्षही जनता दल (संयुक्त) मध्ये विलीन. १९९९ मध्ये कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल (संयुक्त) हे दोन्ही गट होते. २००५-०६ च्या दरम्यान कर्नाटकातील जनता दल (संयुक्त) पक्ष अस्तंगत झाला.
२००२-- रामविलास पासवान यांनी जनता दल(संयुक्त) सोडून आपला लोकजनशक्ती हा पक्ष स्थापन केला.
२००६-- कर्नाटकात सिध्दरामय्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) मधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले. पुढे २०१३ मध्ये ते काँग्रेसकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
२०१४-- मोदीलाटेत सगळे पक्ष वाहून गेल्यानंतर परत एकदा जनता दलाचे पुनरूज्जिवन करायची घोषणा. पण ती प्रत्यक्षात आली नाही.
२०१७-- नितीशकुमारांनी परत एकदा भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर नाराज शरद यादवांचा अनामिक एक व्यक्ती असलेला स्वतंत्र गट.
२०२२-- नितीशकुमार यांनी परत लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली.

या सगळ्या ब्रम्हघोटाळ्यात कितीतरी मधल्या पायऱ्या मी विसरलो आहे हे नक्की. १९८०/८१ मध्ये कधीतरी देवीलालांनी चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून आपला लोकदल (बी) पक्ष स्थापन केला हे वर लिहिलेच आहे. १९८७ मध्ये चरणसिंगांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र अजितसिंग चरणसिंगांच्या लोकदल पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तो गट लोकदल(ए) नावाने ओळखला जाऊ लागला. मुलायमसिंग यादवही त्याच पक्षात होते. चरणसिंगांनंतर पक्षाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल असे मुलायमसिंगांना वाटत होते पण अजितसिंग हे चरणसिंगांचे पुत्र असल्याने ते अनेक वर्षे अमेरिकेतले आपले वास्तव्य आणि ग्रीनकार्ड सोडून आले आणि ते अध्यक्ष बनले. अजितसिंग आणि मुलायमसिंग यादव यांचे जमायचे नाही. त्यामुळे अजितसिंगांनी मुलायमसिंगांना पक्षातून बाहेर काढले होते. हे १९८७/८८ मध्ये कधीतरी झाले. ते नक्की कधी झाले हे मला माहित नाही. हेच सगळे लोक १९८८ मध्ये जनता दलात परत एकत्र आले होते.

१९८९ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानपदासाठी वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखरांना धोबीपछाड दिला हे वर लिहिलेच आहे. त्याचा सूड मग चंद्रशेखरांनी लगेच उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री नेमताना उगवला. अजितसिंग मुख्यमंत्री व्हावेत असे वि.प्र.सिंगांना वाटत होते तर चंद्रशेखरांचे उमेदवार होते मुलायमसिंग यादव. चंद्रशेखरांचा गट भारी पडला आणि उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. पुढे मार्च १९९० मध्ये बिहारमध्ये मुख्यमंत्री निवडायच्या वेळेस वि.प्र.सिंगांचे उमेदवार होते रामसुंदर दास तर त्यांना आव्हान दिले होते लालू यादवांनी. लालूंनी चंद्रशेखरांकडे मुख्यमंत्री व्हायला मदत मागितली तेव्हा चंद्रशेखरांनी स्वतःचा रघुनाथ झा हा उमेदवार उभा केला. तेव्हा नेतेपदासाठी आमदारांमध्ये निवडणुक झाली होती. त्या निवडणुकीत रघुनाथ झांनी रामसुंदर दासांची मते फोडून लालूंचा विजय निश्चित केला. भारतीय राजकारणातील दोन सगळ्यात घाणेरडे लोक- लालू आणि मुलायमसिंग यादव या राजकारणातून पुढे आले आहेत.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या पार्श्वभूमीवर परत नितीश आणि तेजस्वी/लालू फुटले तर अजिबात आश्चर्य वाटू नये.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

17 Aug 2022 - 6:10 pm | शाम भागवत

काही तरी गोंधळ आहे हे नक्कीच.

आनन्दा's picture

17 Aug 2022 - 6:17 pm | आनन्दा

अकाउंट हॅक वगैरे?

असे कारण देऊन सुटायला वाव आहे.

डँबिस००७'s picture

17 Aug 2022 - 6:32 pm | डँबिस००७

मुळात केंद्र सरकारने रोहिंग्याया मुसलमान शरणार्थी लोकांना आसरा द्यायचा निर्णय केलेला नसेल तर मात्र
काही लोकांच्या जल्लोषावर विरजण पडेल !!

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 6:47 pm | जेम्स वांड

करणाऱ्या पार्टी बदलतील,

जिकडे अगोदर श्राद्धाचे वडे खीर केली होती तिकडे पार्टी होईल पंच पक्वान्न युक्त

अन् ज्यांनी पार्टी ची तयारी केली होती ते सगळे वडे खीर करून खाणार आहेत

जल्लोष सेम पार्टी अलग lol

सुखी's picture

17 Aug 2022 - 10:12 pm | सुखी

:D भारी लिहिलंय

मदनबाण's picture

17 Aug 2022 - 6:35 pm | मदनबाण

India's Defence Attaché Gets Unescorted Access to US' Pentagon in Move Showing Trust and Cooperation
फार मोठा निर्णय आणि घटना ! याच बरोबर पुतीन यांनी त्यांच्या मित्र / सहकारी राष्ट्रांना त्यांचे मोस्ट अ‍ॅडव्हान्स वेपन्स ऑफर करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही निर्णयातुन आपण कसा लाभ घेऊ शकतो ते पाहणे रोचक ठरणार आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar

राघव's picture

17 Aug 2022 - 10:20 pm | राघव

होय.. ही बातमी रोचक आहे. नवीन पद्धतीचे शीतयुद्ध म्हणता येईल काय? ;-)

नवीन पद्धतीचे शीतयुद्ध म्हणता येईल काय? ;-)
हा.हा.हा... होय की ! दोन बोक्यांच्या भांडणात आपण माकड बनुन खवा खावा. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Cover

श्रीगुरुजी's picture

17 Aug 2022 - 7:08 pm | श्रीगुरुजी

मंत्री किंवा अश्या बऱ्याच लोकांचे ट्विटर खाते चालवायला कोणतरी नेमलेला असतो. प्रत्येक ट्विट मंत्र्याने स्वत:ने केलेले नसते किंवा तो आपल्या ट्विटरखाते चालकाने तयार केलेले ट्विट आधी वाचून नंतरच त्यावर मान्यतेची मोहर उठवून त्यानंतरघ ते प्रसिद्ध होते, असे नसते. हरदीपसिंह पुरींच्या ट्विटरखाते चालकाने काहीतरी गोंधळ केलेला दिसतोय.

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 7:31 pm | जेम्स वांड

काही चांगलं घडलं का आदरणीय साहेबांमुळे अन् काही वाईट झालं का आहेच बेजबाबदार कार्यकर्ते

असे काहीसे विधान वाटले हे.

खाते चालवायला कोणतरी नेमलेला असतो.

हे ठीकच आहे

प्रत्येक ट्विट मंत्र्याने स्वत:ने केलेले नसते किंवा तो आपल्या ट्विटरखाते चालकाने तयार केलेले ट्विट आधी वाचून नंतरच त्यावर मान्यतेची मोहर उठवून त्यानंतरघ ते प्रसिद्ध होते, असे नसते.

हा टोटल मूर्खपणा वाटतो, जर मंत्री असे इतक्या casual माणसांना ट्विटर खाते चालवायला देत असतील तर त्यापेक्षा ट्विटर वापरणे बंद करून टाकावे, फायदे कमी तोटे जास्त आहेत त्याचे असे म्हणायला पूर्ण वाव आहे.

दुसरे म्हणजे ही प्रोसेस अशीच असते हे तुम्ही ठाम कसे सांगू शकता आहात ?? ती तशी नसली तर ट्विटर सोडा ते वापरणाऱ्या एका केंद्रीय मंत्रालय आणि मंत्री महोदयांवर आपण ढिसाळपणाचा गंभीर आरोप करता आहात ह्याची आपणास जाणीव नक्कीच असेल ना ?

श्रीगुरुजी's picture

17 Aug 2022 - 8:14 pm | श्रीगुरुजी

ट्विटरखाते चालकाने चुकीचे ट्विट करण्याचे प्रसंग अनेकदा आलेत. गतवर्षी शाहू महाराज जयंतीदिनी फडणवीसांच्या ट्विटर खात्यावर "थोर समाजसेवक शाहू महाराजांना अभिवादन" असे काहीतरी ट्विट होते. ते वाचल्यावर अनेकांनी टीकेची झोड उठविली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज असा उल्लेख न केल्याने फडणवीसांवर खूप टीका झाल्याने त्यांनी काहीतरी सारवासारव करून ट्विट डीलिट केले होते.

राहुल गांधींनी सुद्धा
चुकीचे ट्विट डीलिट केले होते.

हे पहा
अमित शहांचे चुकीचे ट्विट.

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 8:43 pm | जेम्स वांड


Twitter वापरणे सरकारने बंद करून टाकावे

>

बाहेरील जगाशी अनौपचारिक संबंध असण्यापुरते पीएमओ, परराष्ट्र मंत्रालय, रक्षा मंत्रालय असे account असावेत बाकी ते ट्विट करून घरासमोरच्या पोल वर बत्ती लावून घेतली अन् ट्विट करून रेल्वे मध्ये सीट वर पोरासाठी दूध मागवले वगैरे झगमगाट कामांसाठी Twitter वापरूच नये मग, इतके मूर्ख ट्विटर ऑपरेटर असल्यास अन् हुशार ट्विटर हॅण्डलर्सची वानवा असल्यास

क्लिंटन's picture

17 Aug 2022 - 8:54 pm | क्लिंटन

समजा असा गोंधळ घातला असेल तर मग ते ट्विट डिलीट केले जायला हवे. अनेक तास झाल्यावरही ते ट्विट अजूनही पुरी साहेबांच्या ट्विटरवर आहे. सोशल मीडियावर काही मिनिटांचा उशीरही बराच फरक घडवू शकतो पण अजूनही अनेक तासांनंतरही त्यावर काहीही action घेतलेली दिसत नाही.

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 8:08 pm | जेम्स वांड

फडणवीसांना नवीन पद देवेंद्र फडणवीस ह्यांची नेमणूक भाजपने केंद्रीय संसदीय समितीवर केली आहे, आजवर तरी महाराष्ट्र भाजपला ब्राह्मणांची गरज नाही असे मला वाटत असे, पण आता तर केंद्रातील नेतृत्वाचा कल पण कळला म्हणायचं !

हल्लीच सात ऑगस्टच्या दिल्ली भेटीत फडणवीस जितके वेळी ओबीसी ओबीसी बोलले आहेत त्याहून एकदा जास्त मला वाटतं फक्त बाबू बिंदेश्वरी प्रसाद मंडल ह्यांनी मंडल आयोगाच्या अहवालात म्हणले असेल

पुढे पुढे बघायचं आता भाजप संसदीय समिती केंद्र स्तरावर किती उत्तम निर्णय घेते ते.

श्रीगुरुजी's picture

17 Aug 2022 - 8:26 pm | श्रीगुरुजी

मला वाटते मोदी-शहा आता चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांच्या बाबतीत cutting down to the size हे धोरण अंमलात आणायला सुरूवात केलेली दिसते. आधी फडणवीसांना मुख्यमंत्री केले नाही, नंतर त्यांची इच्छा नसताना सक्तीने उपमुख्यमंत्रीपद हे खालचे स्थान स्वीकारायला लावून who is the boss हे दाखवून दिले. नंतर फडणवीसांचे विश्वासू चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार यांना तुलनेने खूप कमी महत्त्वाची खाती दिली. ज्यांना फडणवीसांनी अडगळीत टाकले होते त्या बावनकुळेंना आधी आमदार व चंद्रकांत पाटीलांच्या जागी राज्याध्यक्ष पद दिले.

हे करताना महाराष्ट्रात ब्राह्मण हवेत की नकोत या गोष्टीचा संबंध मला तरी दिसत नाही.

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 8:38 pm | जेम्स वांड

प्रतिसाद तार्किक वाटतोय तुमचा,

असे असल्यास नक्कीच आनंद वाटेल, पण मोदी शहा आजवर फडणवीसांच्या ओंजळी ने पाणी पितानाच दिसले आहेत किंवा तसे optic होते म्हणता येईल, पण एकंदरीत जर मोदी शहांनी ही निती अवलंबली असेल तर बरेच म्हणायचे, पार गायकवाड समितीचा अहवाल मान्य करण्यापर्यंत मजल मारली होती फडणवीसांनी.

बाकी काळाच्या पोतडीत काय सुरस अन् चमत्कारिक सरप्राइज भरलेली असतील ते कालांतराने कळेलच.

काही काही बाबतीत आपण चूक असावे असेच वाटते, असो !.

श्रीगुरुजी's picture

17 Aug 2022 - 9:11 pm | श्रीगुरुजी

पण मोदी शहा आजवर फडणवीसांच्या ओंजळी ने पाणी पितानाच दिसले आहेत

तसेच होते. त्यांना मोदी-शहांनी महाराष्ट्रात मुक्तहस्त दिला होता व त्याचा फडणवीसांनी पुरेपूर गैरवापर करून सत्ता घालविली. पण निदान आता उशिरा का होईना, पण मोदी-शहा भानावर आलेले दिसतात. विशेषतः बिहारमध्ये नितीशकुमारांनी युती तोडल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले असावे की स्थानिक प्रादेशिक पक्षांना अवास्तव महत्त्व दिल्याने आपलेच नुकसान होते.

पार गायकवाड समितीचा अहवाल मान्य करण्यापर्यंत मजल मारली होती फडणवीसांनी.

मान्य कसला? तो आयोग व त्यांचे सर्वेक्षण हे ठरवून केलेले नाटक होते. अहवालात काय लिहायचे, काय निष्कर्ष काढायचे, कोणत्या शिफारशी करायच्या, अहवाल कधी प्रसिद्ध करायचा हे आधी ठरवून आयोग नेमला होता.

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 9:17 pm | जेम्स वांड

धीर धरेन म्हणतो थोडा

पण मोदी-शहा भानावर आलेले दिसतात.

हे विधान म्हणण्याच्या अगोदर !

आजकाल कसलाच भरवसा नाही

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 6:16 am | जेम्स वांड

भाजपच्या हैदराबाद कार्यकारिणी सभेत जुलै महिन्यात मोदीजी पासमंदा मुस्लिम लोकांना आपलेसे करा म्हणतात

इतकेच नाही तर भाजपची विविध युनिट्स पासमंदा रिचआऊट कार्यक्रम सुरू करतात आणि भाजपचा ओबीसी मोर्चा म्हणतो की पासमंदा मुस्लिमांना जामिया हमदर्द, जामीया मिलिया इस्लामिया, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी इत्यादी मध्ये ५०% आरक्षण द्या ही संबंधित बातमी . हे तूर्तास मुस्लिम अल्पसंख्याक विद्यापीठांपुरते आहे तितकं नशीब, पण २०२४ जाहीरनाम्यात पासमंदा मुसलमानांचा उल्लेख असेल अशीही शक्यता वर्तवली जाते आहे.

जेम्स वांड's picture

18 Aug 2022 - 9:17 am | जेम्स वांड

कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसल्यामुळे काय होते ते.

आम्ही युपीएससी करताना अक्षरशः मेस मधून आलेले डबे पण ठेवत नसू असा पेपर आता संपादकीय लिहितोय

आणि विषय काय ? तर

"Rohingya housing row how India's ad hoc refugee policy is exposed again"

मदनबाण's picture

18 Aug 2022 - 10:46 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Cover

आग्या१९९०'s picture

18 Aug 2022 - 10:55 am | आग्या१९९०

बुडा ना शेंडा व्हिडिओचा रतीब टाकून काय मिळतं कोणास ठावूक?

मदनबाण's picture

18 Aug 2022 - 7:20 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Cover

कपिलमुनी's picture

18 Aug 2022 - 8:47 pm | कपिलमुनी

भाजप चे मंत्री हेच टाकतात तेव्हा त्याला गंभीर गटार म्हणत नाही बरे ??

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2022 - 11:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यात नागरिकांतर्फेही एक याचिका दाखल झाली आहे, नागरिक मतदारांचे म्हणनेसुद्धा ऐकावे असे याचिकेत म्हटले आहे. ही याचिका २२ ऑगष्टला सुनावणीला येत आहे. 'भारतीय लोकशाहीची मूलभूत रचना व मतदारांनी केलेल्या मतदानाचा सन्मान करण्याची जबाबदारी पाळतांना राजकीय पक्ष दिसत नाही. एका पक्षातून दुस-या पक्षात उड्या मारणे व पैशांच्या लोभापासाठी राजकीय नेत्यांनी सत्ताकांक्षी बनणे यातून नागरिकांसाठी दु:खद वातावरण होते. दहाव्या परिशिष्टातील उणिवा व पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी संदर्भात सातत्याने स्वतःला फायदेशीर ठरतील असे अन्वयार्थ राजकीय नेते काढतांना दिसतात मतदारांची होणारी फसवणूक टाळावी या उद्देशाने ' मतदारांचे म्हणने ऐकून घ्यावे या उद्देशाने याचिकाकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.

लोकशाहीच्या मजबूतीसाठी एक उत्तम निर्णय होणे अपेक्षित आहे. मदमस्त सत्तेच्या मगरुरीत आणि धुंदीत वागणा-यांना हल्लीचे सत्तेचे महत्वकांक्षीय धोरण म्हणून नव्हे, पण सत्तेचा माज असणा-यांना प्रत्येक पक्षासाठी एक धडा आवश्यक आहे, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

19 Aug 2022 - 11:46 am | सुबोध खरे

या याचिकेची विस्तृत माहिती कुठे उपलब्ध होईल का?

मुळात जुनी शिवसेना आणि नवी शिवसेना यांच्या पक्षांतर बंदी कायदा, सदनाचे अध्यक्ष यांची कार्यकक्षा, राज्यपालांचे अधिकार याबाबत अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात अजून प्रलंबित आहेत.

त्यात अधिक काही भर पडेल का?

कि सर्वोच्च न्यायालयाच्याच भाषेत आणखी एक (Publicity Interest Litigation) सवंग लोकप्रियतेसाठी याचिका आहे?

कपिलमुनी's picture

19 Aug 2022 - 6:34 pm | कपिलमुनी

हे विश्वंभर चौधरी हा काही काम न करणारा कटकट्या गृहस्थ आहे..
उगा विचारवंतांचा आव आणून पोट भरणे एवढाच उद्योग आहे. याला गल्लीत सुद्धा कोणी विचारत नाही

आग्या१९९०'s picture

19 Aug 2022 - 8:04 pm | आग्या१९९०

एकदा मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून दिल्यावर कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पुन्हा मतदारांचे म्हणणे कशाला पुन्हा? वेडाच आहे.

श्रीगुरुजी's picture

19 Aug 2022 - 9:41 pm | श्रीगुरुजी

राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने प्रतिज्ञापत्रावर लिहून निवडणूक आयोगाला किंवा न्यायालयाला दिली पाहिजे. आश्वासने पूर्ण न केल्यास संबंधितांना कडक शिक्षा व्हावी.

कडबोळी सरकारमध्ये प्रत्येकाची आश्वासने वेगळी असल्यास शक्य होईल का अशी आश्वासने पाळणे?

श्रीगुरुजी's picture

19 Aug 2022 - 10:07 pm | श्रीगुरुजी

सरकार करण्याआधी असे सरकार स्थापन करणार असे प्रचारात आश्वासन दिले होते का?

आग्या१९९०'s picture

19 Aug 2022 - 10:47 pm | आग्या१९९०

कोणता पक्ष असे आश्वासन देईल? अपक्ष कसे आश्वासन देऊ शकतील?

श्रीगुरुजी's picture

19 Aug 2022 - 11:27 pm | श्रीगुरुजी

कोणताही उमेदवार प्रचारात जे आश्वासन देईल ते मुद्रांकावर लेखी स्वरूपात दिले पाहिजे.

कोणताही उमेदवार प्रचारात जे आश्वासन देईल ते मुद्रांकावर लेखी स्वरूपात दिले पाहिजे.

काही फायदा नाही. तो मुद्रा़ंक बहुतेक तेलगी ने छापलेला असेल.

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 12:44 pm | जेम्स वांड

दहीहंडी आणि गोविंदा उत्सवाचे राजकीय फायदे उपटण्यासाठी वापर करणे ऐकले होते, गोविंदा पथके अन् दहीहंडी उत्सवात मी सिने स्टार्स आणण्याची स्पर्धा वगैरे पण ऐकले होते

आता म्हणे गोविंदा पथकाचे सभासद असणाऱ्या पोरांना सरळ सरळ ५% आरक्षण सरकारी नोकरीत द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला आहे.

सरळ सरळ मूर्खपणा वाटतोय हा

कारण,

१. गोविंदा/ दहीहंडी पथकांना साहसी खेळ म्हणून मान्यता द्यायचा निर्णय आधी घेतला आहे तर ५% वेगळं आरक्षण कश्याला ! ? मग व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, भालाफेक, अथलेटिक्स वगैरे खेळणाऱ्या क्रीडापटूंना काय वेगळे ? जर खेळ म्हणून जाहीर केले आहे तर पोलीसभर्ती ते एमपीएससी गट अ ब क परीक्षांत जो स्पोर्ट्स कोटा असतो त्यातूनच निवडा, व्हॉलीबॉल ते गोविंदा पथक सगळ्या खेळांना लेव्हल फिल्ड होईल ते.

२. राजकीय खेळी म्हणूनही हा पोप्युलिस्ट निर्णय घेतला म्हणावे तर एकनाथ - देवेंद्र सरकारने BMC निवडणुका पलीकडे विचार केला नाहीये का ? असा प्रश्न पडतोय, कारण ग्रामीण भागातील कैक होतकरू मुले सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात, त्यातली ८०% गंभीर नाहीत हे जरी मान्य केले तरी २०% हा आकडा कमी नाही अन् गोविंदांच्या पायी किंवा असल्या राजकीय तुष्टीकरण करण्याच्या नादात इतर वर्ग (मतदार वर्ग, जातीय उल्लेख नाही ह्याची तडक नोंद घ्यावी) दुखावणार मग परत त्यांना थंड करायला काहीतरी पोप्यूलिस्ट निर्णय.

त्यामुळे गोविंदांना खास सवलती देऊ नयेत सरकारी नोकरी अन् स्पर्धा परीक्षांत असे माझे स्पष्ट मत आहे, साहसिक खेळ दर्जा दिलाय, त्याची सर्टिफिकेट तयार करून मिळवा थर लावून आणि उपलब्ध स्पोर्ट्स कोट्यातून आणि मिळवा नोकऱ्या इतकं स्पष्ट असलं पाहिजे सरकारने असे मनापासून वाटते

क्लिंटन's picture

20 Aug 2022 - 12:59 pm | क्लिंटन

ही बातमी देताना सगळ्या चॅनेलवाल्यांनी गल्लत केली आहे असे वाटते. राज्य सरकारी नोकरीत खेळाडूंना ५% आरक्षण असते त्यातून नोकरी मिळायला गोविंदा पात्र ठरतील असा निर्णय आहे असे वाटते. पण चॅनेलवाल्यांनी गोविंदांना ५% आरक्षण अशी बातमी देऊन टाकलेली दिसते. तसे नसावे. राज्य सरकार प्रो कब्बडीप्रमाणे प्रो दहीहंडी स्पर्धा भरवणार असून त्यात सहभागी होणार्‍या गोविंदांनाच त्या कोट्यातून नोकरी मिळेल असे दिसते.

अर्थात हा मूर्खपणाचा निर्णय आहे हे वेगळे सांगायलाच नको. मग प्रो लेझीम, प्रो ढोलताशे, प्रो अमुक, प्रो तमुक या स्पर्धा आयोजित करूनही त्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार्‍यांना खेळाडूंना असलेल्या ५% कोट्यातून का नोकरी मिळू शकणार नाही हा प्रश्न उभा राहणारच.

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 1:18 pm | जेम्स वांड

याशिवाय 18 वर्षांवरील कॉलेजमध्ये जाणाऱ्या गोविंदांना ग्रेस मार्कही मिळू शकतात. तसंच थर लावण्याचा सराव करायचा असल्यास गोविंदांना कॉलेजच्या वेळेतूनही जायची परवानगी मिळू शकणार आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2022 - 3:32 pm | श्रीगुरुजी

आता एक अत्यंत कार्यक्षम नेता सत्तेत असल्याने असे अनेक सवंग निर्णय सहन करावे लागणार. विशेषतः राखीव जागा हा या अत्यंत कार्यक्षम नेत्याचा आवडता छंद असल्याने गोविंदापाठोपाठ मराठा, धनगर, मुस्लिम अश्यांनाही राखीव जागा जाहीर होतील. कलमाडी, अजित पवार, धनंजय मुंडे, भुजबळ अश्यांचे पायघड्या घालून भाजपत स्वागत केले जाईल. त्यांना सर्व प्रकरणात क्लीन चिट मिळेल. आता इतर पक्षांचे, भ्रष्टाचाऱ्यांचे, गुन्हेगारांचे अच्छे दिन व भाजपमधील निष्ठावंतांचे बुरे दिन सुरू झाले आहेत.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2022 - 3:34 pm | श्रीगुरुजी

या नेत्याला म्हणे २०२४ मध्ये पुण्यातून लोकसभेसाठी उमेदवारी देणार आहेत. असे झाले तर मी यावेळी मत देण्यापासून अलिप्त राहण्याऐवजी पुण्यातील कॉंग्रेस उमेदवाराला मत देणार.

अमर विश्वास's picture

20 Aug 2022 - 10:13 pm | अमर विश्वास

पूर्ण माहिती न घेता पूर्वग्रहदूषित कमेंट्स

स्पोर्ट्स कोटा आधीपासून आहेच ... दहीहंडीला ऍडव्हेंचर स्पोर्ट्स चा दर्जा दिला आहे इतकच

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 1:48 pm | श्रीगुरुजी

कलमाडी, अजित पवार, धनंजय मुंडे, भुजबळ अश्यांचे पायघड्या घालून भाजपत स्वागत केले जाईल.

कलमाडी गंगेत डुबकी मारणार?

भाजपची हळु हळु शिसारी यायला लागली आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 3:31 pm | श्रीगुरुजी

इतर राज्यात हा घाणेरडा प्रकार तुलनेने बराच कमी आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र रस्त्यावर पडलेला विष्ठेचा प्रत्येक गोळा उचलून आणून देवघरात ठेवला जात आहे. पूर्वी राणे, पद्मसिंह पाटील वगैरे उचलून आणले. नंतर पुण्यातला लँड माफिया दीपक मानकर आणला. नंतर कृपाशंकरला आणलं. नुकतंच संजय राठोड, अब्दुल सत्तार अशांना पावन करून घेतलं. आणि आता कलमाडीला आणणार असं दिसायला लागलंय.

फडणवीस व चंद्रकांत पाटील ही जोडगोळी महाराष्ट्रात भाजप संपविणार हे भाकीत मी ३-४ वर्षांपासून करतोय. त्याच दिशेने घोडदौड सुरू आहे.

शाम भागवत's picture

1 Sep 2022 - 6:14 pm | शाम भागवत

फडणवीस वाईट्टच.
:)

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2022 - 6:47 pm | श्रीगुरुजी

फारच सौम्य शब्द आहे.

शाम भागवत's picture

1 Sep 2022 - 7:00 pm | शाम भागवत

:)

जेम्स वांड's picture

1 Sep 2022 - 8:03 pm | जेम्स वांड

एकतर तुम्ही लीन आहात किंवा तसे भासवताय, तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, पण श्रीगुरुजी (माझे त्यांच्याशी कैक विषयांवर वैचारिक मतभेद असूनही) अतिशय आग्रही प्रतिपादन करतात अन् हाती काहीतरी तर्क घेऊन करतात असा अनुभव पण आहे, राजकारणाचा शालीन भाग आम्ही तरी आमच्या परीने जिवंत ठेवतोय, गुरुजी, क्लिंटन इत्यादींशी चर्चेला म्हणून मजा असते.

आज निःसंदिग्ध स्पष्ट करतो की तुमचं फडणवीस साहेबांवर प्रेम/ विश्वास/ भरवसा असण्याशी मला कवडीचा प्रॉब्लेम नव्हता/ नाही/ नसेल, पण हे जे तुम्ही एकोळी स्मायली किंवा आहेतच फडणवीस वाईट्ट वगैरे बोलता आहात ते लटकेच वाटते, असे प्रामाणिकपणे सांगतो, त्याचाही मला त्रास नाही पण प्रतिसाद लांबण उगाच वाढत जाते अन् इतर माहितीपूर्ण किंवा नवीन मुद्द्यांचे प्रतिसाद दबतात.

आपण अतिशय शालीन अन् संयत लिहिता, ह्याबाबत आपले खरेच कौतुक आहेच, पण त्या शैलीला वापरून जमल्यास काहीतरी लॉजिकल तुम्हाला वाटते तसे मांडल्यास जरा नेहले पर देहला वैचारिक वाद तरी वाचता येईल, इतकी मनीषा एक सह-मिपाकर म्हणून व्यक्त करतोय, कृपया राग मानू नका. ही नम्र विनंती म्हणून ट्रीट करा.

बाकी आपण सुज्ञ आहात, शेवटी सोशल मीडिया वर सगळे लोक "मेरे मूर्गे की एक ही टांग, भांगडा नचवाऊ या कॅब्रे" स्वातंत्र्य घेऊनच वावरतात, काय करायचं ही ज्याची त्याची ईच्छा.

अगाऊ क्षमाप्रार्ती
- वांडो

शाम भागवत's picture

1 Sep 2022 - 8:29 pm | शाम भागवत

माझा पास.

मटा बातमीतील शेवटचा परिच्छेद :
एक काळ होता जेव्हा कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी हे समीकरण होते. पुणे महापालिका कलमाडी गटाच्या ताब्यात होती. एवढंच काय तेव्हा पुण्यात निर्णय देखील कलमाडी हाऊसमधूनच व्हायचा. कर्वेरोडला लागून असलेलं दोन मजली कलमाडी हाऊस म्हणजे सत्तेचं केंद्रच होतं. कार्यकर्ते तिथं जमायचे. कलमाडी विमानतळावर यायचे तेव्हा त्यांच्या स्वागताला जणू जत्रा भरायची. कलमाडी आपल्या केबिनमध्ये झुलत्या खुर्चीत बसून सूत्र हलवायचे. तिथूनच पदांचे वाटप व्हायचे, असा तो काळ. कलमाडींचा पुणे फेस्टिव्हल म्हणजे डोळे दीपवणारा अनुभव असायचा. हेमा मालिनीपासून अमरीश पुरींपर्यंत ते गुरुदास मानपासून जगजितसिंग पर्यंत सगळे तिथं यायचे.
हे १००% खरं.
पण दहा वर्षे अज्ञातवासात राहिल्यानंतर त्यांची राजकीय किंमत कितीशी आहे? पाचसहा वर्षांपासून त्यांचं नावही ऐकलं नव्हतं. २०११ मध्ये राष्ट्रकुल युवा स्पर्धा आयोजनात घोटाळा झाल्याच्या गुन्ह्यात कलमाडी अडकले आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपली. काँग्रेसने त्यांना सात वर्षांसाठी निलंबित केले, पण त्यानंतर चार वर्षे होऊनही काँग्रेसने कलमाडी यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.

अजित पवारांना सोबत घेणं हा मोठा जुगार असला तरी त्यातून अपेक्षित फायदा खूप मोठा होता. पण सुरेश कलमाडी या राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी काँग्रेस नेत्याला घेण्याने भाजपला फायदा होणार नाहीच.

दुसरं, भाजपचे नेते पुणे फेस्टिवलला उपस्थिती लावणार आहेत. हेमा मालिनी सुरुवातीपासून भाजपाशी जवळ असल्या तरी कलमाडी काँग्रेसमध्ये वजनदार व्यक्तिमत्त्व असतानाही त्या पुणे फेस्टिवल मध्ये सहभागी होत असत. पुणे फेस्टिवल हा राजकीय कार्यक्रमाच्या पलीकडे एक प्रतिष्ठित आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे. सर्वपक्षीय नेते त्यात दरवर्षी सहभागी होत आले आहेत. त्यामुळे मटाच्या बातमीला तूर्तास किंमत नाही.

जेम्स वांड's picture

1 Sep 2022 - 5:56 pm | जेम्स वांड

पण पुण्याची आयटी हब ही ओळख बनविण्यात कलमाडींच्या प्रयत्नांचा हातभार लागलेला आहेच, एकार्थाने आज असलेली पुण्याची सुबत्ता तशी घडविण्यात त्यांचा हात आहेच.

त्याशिवाय, आत्ता मात्र त्यांचा राजकारणात काय उपयोग असेल ते माहिती नाही, पण कलमाडी संपल्यागत नाहीत तर संपलेले आहेत राजकारणातून म्हणता येईल.

बाकी कलमाडी ह्यांच्यावर तुका पैलवानांशी पण आमचं बाडीस