मित्रो!
मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे,
होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;)
आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे.
तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी.
माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;)
माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक
बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;)
मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको.
बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती,
बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा!
बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही,
कृपया मार्गदर्शन करा...
(विंग्रजी शब्दांबद्दल माफी)
प्रतिक्रिया
7 Dec 2021 - 9:53 pm | तर्कवादी
चांगल आहे .. पण रिक्षाचं परमिट काढणं त्याचं वेळचेवेळी (दरवर्षी ?) नुतनी़करण करणं ई गोष्टी आल्यात. शिवाय व्यावसायिक वाहनाचं पासिंगही दरवर्षी करावं लागतं.
अर्थात तो रिक्षा घेवून थोडंफार का होईना कमवत असल्याने त्याला हे परवडणारं आहे.
7 Dec 2021 - 11:17 pm | श्रीरंग_जोशी
पूर्वीही दुचाकी वगैरे कोणती घेऊ असे विचारल्यास ओळखीतले कुणी ना कुणी ऑटोरीक्षा घेण्यास गमतीने सुचवीत असे :-) .
या प्रतिसादामुळे एक जुनी आठवण निघाली. माझ्या काकांच्या घरी बजाज ऑटो कंपनीचे १९९० किंवा १९९१ सालचे कॅलेंडर पाहिले होते. प्रत्येक पानावर त्यांच्या विविध गाड्यांचे फोटो होते. एका फोटोत काळा-पिवळा रंग नसणारा ऑटोरीक्षा पण होता. बहुधा फिक्का जांभळा रंग होता. त्यात एक कुटूंब एका निसर्ग रम्य ठिकाणी (पलिकडे जलाशय वगैरे) ऑटोरीक्षा पार्क करुन पिकनिक करत आहे असे दृश्य होते.
8 Dec 2021 - 12:17 pm | चौथा कोनाडा
हो, कुटंबानी रिक्षा वापरावी असा प्रचार त्यावेळी केलाच होता, पण त्यांन इमेज डाऊन होते असा समज झाल्याने लोकांनी तसा स्वीकार केला नाही. (कुटूंबासाठी घेणारे आणि वापरणारे काही हुशार लोक होतेच)
असेच काहीसे टाटा नॅनोबाबत नंतर नंतर होत गेले आणि टाटांना नॅनो उत्पादन बंद करावे लागले.
8 Dec 2021 - 12:36 pm | जेम्स वांड
आर ई रिक्षा चे रिडिझाईन केले तर उत्तम असे फॅमिली मोबिलिटी सोल्युशन निघू शकेल का ??
ही गंमत बघा मेक्सिकोच्या भारतातील माजी राजदूत असणाऱ्या बाईंनी भारतात असताना आपलं वैयक्तिक वाहन म्हणून ऑटोरिक्षा ठेवली होती बघा, फिरंगी लोक काय पण मजेशीर करत असतात. मागे एक सिरीज बघितली होती, १५ अमेरिकन फिरंगी चित्रविचित्र रंगवलेल्या ऑटोरिक्षा घेऊन (बहुतेक) मुंबई ते कन्याकुमारी सुटले होते.
8 Dec 2021 - 10:43 pm | श्रीरंग_जोशी
मेक्सिकोच्या माजी राजदूत बाईंची रिक्षा भारी दिसत आहे.
मागे गूगलचे संस्थापक हैद्राबादला आले असता त्यांनी ऑटोरिक्षाने प्रवास केला व त्यांना हे वाहन फारच आवडलं. "इट्स सो इझी टू गेट इन अॅन्ड आउट ऑफ इट", असे काहीसे दोघांपैकी एकाचे उद्गार होते.
9 Dec 2021 - 2:32 am | अनन्त अवधुत
श्रीधर वेंबू पण ऑटोरिक्षा आपले नियमीत वाहन म्हणून वापरतात
9 Dec 2021 - 9:49 am | सुबोध खरे
रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण रिक्षाचे सस्पेन्शन धन्यवाद असते. रोज चालवायची तर पाठीची वाट लागते १०० % रिक्षावाल्याना पाठदुखीचा त्रास आहे.
तीनातील एक चाक नक्की खड्ड्यात जाते. याशिवाय ड्रायव्हरची उंची जास्त असेल तर धड रस्ता सुद्धा दिसत नाही.
जुन्या रिक्षाचा हेडलाईट हा केवळ पोलिसाला दाखवण्यापुरता असतो. रस्त्यातील खड्डा दिसेपर्यंत आपण खड्ड्यात गेलेले असतो.
रिक्षाचा वायपर हा सरकारी नोकरासारखा असतो त्याचे तेथे फक्त अस्तित्व असते, कामाच्या बाबतीत बोलूच नये.
बाकी स्वतःची सुरक्षितता पाहिली तरी रिक्षा हे वाहन असून नसल्यासारखे असते. कधीही उलटते. कुणी ठोकली तर आपला फोटो भिंतीवर लागण्याची शक्यता भरपूर.
लांब अंतर जायचे असेल तर टि र्रर्रर्रर्रर्रर्र आवाजाने कान किटतात आणि हादरे आणि धक्के यामुळे कंबर पोट पाठ सगळे हिंदकळून निघतात.
रिक्षाचा उपयोग म्हणजे बस किंवा रेल्वे स्थानकापासून घरा पर्यंत जाण्यासाठी स्वस्त वाहन यापलीकडे अधिक अपेक्षा करणे हेच चुकीचे ठरेल.
रिक्षावाल्यांबद्दल आणि त्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल जितके कमी बोलावे तितके चांगले.
9 Dec 2021 - 10:39 am | जेम्स वांड
हे तुमच्या आमच्यासाठी सत्यवचन आहेच डॉक्टर, पण मेक्सिकन राजदूत किंवा श्रीधर वेम्बु वगैरे हुच्च लोक कंपनीत शोरूममधून काढली तशीच ऑटो कस्टमाईज न करता वापरत असतील ह्यावर भरवसा बसत नाही, कुठं सस्पेंशनच बदल, कुठं सीट नवीन टाक, कुठं अरगोनॉमिक काहीतरी बदल कर असे करूनच ही मंडळी वापरणार असे दिसते आहे, एकंदरीत तुम्ही म्हणताय त्या डेली कम्युटींग पर्सनल व्हेईकलच्या स्वरूपात ऑटो समाजमान्य व्हायला अजून डिझाईन, प्रॉडक्शन, मार्केटिंग, स्पेयर्स अन आराम सगळ्याच बाबतीत भरपूर काम करावे लागणार इतके मात्र नक्की.
9 Jan 2022 - 9:11 am | खटपट्या
हो, आणि रिक्षाला दारं नसल्यामुळे, मुम्बै ठाण्यातली प्रदुषीत हवा खात प्रवास करावा लागतो,
पावसाळ्यात तर दारं नसल्यामुळे खुपच त्रास होतो.
लांबचा प्रवास तर रिक्षाने करुच शकत नाही.
मागे तीन प्रवासी बसतात पण ते छोट्या अंतरासाठी ठिक आहे. मोठ्या अंतरामध्ये मागे तीन प्रवासी घेउन प्रवास करणे निवळ्ळ अशक्य आहे...
9 Dec 2021 - 10:50 am | सुबोध खरे
घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, कुर्यात रासभ रोहणम
ऐकलं आहे का?
9 Dec 2021 - 11:21 am | जेम्स वांड
विस्कटून सांगा
9 Dec 2021 - 12:01 pm | सुबोध खरे
घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, कुर्यात रासभ रोहणम
येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत
म्हणजे काही जण घडे फोडून, काही जण पडदे फाडून, तर काही जण गाढवावर बसून
येन केन प्रकारेण ( कोणत्याही तर्हेने) लोक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात
9 Dec 2021 - 12:11 pm | जेम्स वांड
ऑटोच्या वाटेत ?
जालीय भाषेत रिक्षा फिरवणे उगाच रूढ झाला नसेल नाही का वाक्प्रचार मग ?
9 Dec 2021 - 12:14 pm | सुबोध खरे
१७ हजार कोटी संपत्ती असलेल्याने स्वतः रिक्षात बसून चालवणं हे पब्लिसिटी स्टण्ट नाही तर दुसरं काय आहे?
9 Dec 2021 - 12:43 pm | जेम्स वांड
आपण इथं आराम शोधत बसा अन इथं हे लोक रॅशनल रॅशनल करत ऑटो चालवणार, म्हणजे काय च्यायला.
9 Dec 2021 - 1:26 pm | सर टोबी
आता ज्येष्ठ उद्योजक म्हणून पुढील आयुष्य कंठावे आणि ओंकारेश्वरला संध्याकाळी चकाट्या पिटाव्यात असा विचार उद्योजक करीत असतील तर रिक्षाने प्रवास करणं हा प्रसिद्धीचा उपाय म्हणता येईल. पण ज्याचा कामाचा परिसरच काळबादेवी सारखा गर्दीचा असेल त्याच्यासाठी रिक्षाने जाणे हा जास्त हुषारीचा आणि इतरांसाठी आदर्शवत असा असेल.
9 Dec 2021 - 7:18 pm | सुबोध खरे
१७ हजार कोटी संपत्ती असलेल्या माणसाला काळबादेवी सारख्या परिसरात आपले कार्यालय असण्याची गरजच नाही. तेंव्हा तुमचा मुद्दा मुळातूनच गैरलागूआहे.
मुळात या सद्गृहस्थानी अमेरिकेतून तामिळनाडूमधील टेनकासी जिल्ह्यातील मातालमपराई या खेड्यात आपले कार्यालय काढले आहे. या खेड्याची लोकसंख्या २१४५ आहे (२०११ जनगणना) तेंव्हा काळबादेवी इ. व्यर्थ आहे. दुसरे कार्यालय रेणीगुंटा येथे आहे.
एखादे वेळेस त्यांनी इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या रिक्षाला पाठिंबा किंवा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा फोटो काढला असेल आणि प्रसार माध्यमांनी त्याला वेगळाच रंग दिला असेलही.
12 Dec 2021 - 7:46 pm | कंजूस
यूट्यूब प्रवासाचे विडिओ याबद्दल रेडिओ एफेम १०७ वर परेश शिंदे याची मुलाखत ऐकली. त्याचा मुंबई ते गोवा ( व्हाया कोल्हापूर) विडिओ
https://youtu.be/t2ayrvvK2TA
बाईक Mojo 300 , sponsored.
(( बाकी ठिकठिकाणी सबस्क्राईबर किती भेटताहेत. मजा आली. ))
((गाड्यांशी माझा काही संबंध नाही पण आवडले म्हणून शेअर.))
14 Dec 2021 - 1:15 pm | चौथा कोनाडा
एक नंबर कंजूस साहेब !
+१
17 Dec 2021 - 12:16 am | प्रसाद गोडबोले
उद्देश : ७० % कोम्युट + ३० % लाँग राईड्स
पावर : १५- ३० बहप
इंजिन : १२५ ते २५०
महत्वाचे : गाडीचे वजन कमी असायला हवे. आणि मेन्टेनन्सची जास्त किचकिच नसावी .
बजेट : १- २ लाख
गाडी मध्ये बोराट ने सांगितलेला "हा स्पेशल पार्ट" असल्यास बजेट वाढवता येईल ;)
शॉर्ट लिस्टेड : यमाहा MT15 , सुझुकी गिक्सर २५० पण ओपन फॉर सजेशन्स .
TVS HERO BAJAJ Mahindra ह्या स्वदेशी गाड्यांच्या ओव्हरॉल बिल्ड क्वालिटी बद्दल आणि इंजिन रिफाईन्मेन्ट बद्दल शंका आहे. हिरो ची नवी क्ष्पल्स खुप टेंप्टिंग आहे.
honda suzuki Yamaha , KTM वगैरे फॉरेन ब्रंन्ड ला प्रेफरन्स द्यावा असा विचार आहे. KTM २५० चा विचार होता पण बजेट वाढते अन कुठेतरी ३९० न घेतल्याची खंत लागते म्हणुन तो ओप्शन बाजुला ठेवला आहे . हस्कव्हर्ना विषयी माहीत नाही.
ओपन फॉर सजेशन्स !!
22 Dec 2021 - 11:40 pm | कपिलमुनी
हिरो एक्सपल्स घ्या
गाडी 110 च्या पुढे थोडी व्हायब्रेट होते पण 110 पेक्षा अधिक वेगाने चालवूच नये
23 Dec 2021 - 6:22 am | जेम्स वांड
कंबरड्याला बरी असतीय काय हो मुनिवर ? क्रूझर इतकी तर कम्फर्टेबल नसणार न ती.
23 Dec 2021 - 10:19 am | सुबोध खरे
मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ किमी चा रस्ता स्पष्ट दिसत नसेल किंवा रस्त्याला कुठे फाटे वळणे असतील तर ८० पेक्षा जास्त वेगाने चालवूच नये.
कारण अचानक ब्रेक मारायची वेळ आली तर मोटार सायकल नक्कीच घसरते आणि आपल्याला इजा होणारच. मग ती गंभीर आहे कि कमी हा वेगळा भाग आहे.
हे आपल्या मोटार सायकलला डिस्क ब्रेक ए बी एस कितीही जाडा टायर असला तरीही. हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे. माझ्याकडे डॉमिनार आहे ज्यात पुढे मागे दोन्ही डिस्क ब्रेक, ए बी एस, दोन्ही जाडे टायर आहेत स्लिपर क्लच आहे परंतु अचानक एखादी वस्तू समोर आली तर मोटार सायकल घसरण्याची शक्यता असतेच
मुळात ८० पेक्षा जास्त वेगाने भारतात चालवूच नये. रस्त्यात अचानक आलेला दगड, कुत्रा, मांजर अगदी उंदीर सारखा प्राणी सुद्धा आपल्याला धोक्यात टाकतो. कारण समोर एखादी गोष्ट आली तर नैसर्गिक उर्मीने आपला ब्रेक दाबला जातो आणि मोटार सायकल भरकटते.
मोटार सायकल ६० च्या वर वेगाने चालवली तर आपण रस्त्याच्या आजूबाजूचे देखावे नीट पाहूच शकत नाही. आपण कायम सतत सावधान स्थितीत असतो आणि लक्ष केवळ रस्त्याकडे असते.
केवळ एका जागेतून दुसऱ्या जागी जायचे असेल तर गोष्ट वेगळी अन्यथा ५० ५५ वेगाने सुरक्षित रित्या मोटार सायकल चालवली तर प्रवासाचा आनंद आपण जास्त लुटू शकता असे माझे अनुभवांती मत झालेले आहे.
23 Dec 2021 - 10:45 am | जेम्स वांड
+१०,००० %
मोटरसायकलिंगचा आनंद हा ४०-५० किमी/ तास गतीने, आरामात चालवत आजूबाजूचे निसर्गसौंदर्य (किंवा कम्युटींग करत असाल तर ट्रॅफिक) पाहत पाहत घेण्याची चीज आहे, त्याशिवाय बायकिंगची मजा नाही, उगा बुंगबांग गाडी हाकण्यात पॉईंट नाही, मला तर झीट आली होती केटीएम पाहून, इग्निशनला चावी खोचून सुरू केलं का "रेडी टू रेस" अशी अक्षरे झळकतात डिजिटल टॅकोवर
हे पाहून मी कपाळावर हात मारून घेतला होता, एकतर केटीएमचा ग्राहकवर्ग असणारी तरुणाई, ते अडनीड्या वयातले अचाट समज, त्यात ढुंगणखाली असली पॉवरफुल गाडी आणि चावी लावली का टॅकोवर असला दिव्य मॅसेज, हे फारच अभद्र वाटते मला तरी. काहीतरी कायदा वापरून किंवा सरळ निर्देश देऊन केटीएम/बजाजला किमान चावी लावल्यावर असलं काहीतरी डिस्प्ले होणार नाही ह्याची दक्षता बाळगा हे सांगायला हवं.
23 Dec 2021 - 10:45 am | जेम्स वांड
+१०,००० %
मोटरसायकलिंगचा आनंद हा ४०-५० किमी/ तास गतीने, आरामात चालवत आजूबाजूचे निसर्गसौंदर्य (किंवा कम्युटींग करत असाल तर ट्रॅफिक) पाहत पाहत घेण्याची चीज आहे, त्याशिवाय बायकिंगची मजा नाही, उगा बुंगबांग गाडी हाकण्यात पॉईंट नाही, मला तर झीट आली होती केटीएम पाहून, इग्निशनला चावी खोचून सुरू केलं का "रेडी टू रेस" अशी अक्षरे झळकतात डिजिटल टॅकोवर
हे पाहून मी कपाळावर हात मारून घेतला होता, एकतर केटीएमचा ग्राहकवर्ग असणारी तरुणाई, ते अडनीड्या वयातले अचाट समज, त्यात ढुंगणखाली असली पॉवरफुल गाडी आणि चावी लावली का टॅकोवर असला दिव्य मॅसेज, हे फारच अभद्र वाटते मला तरी. काहीतरी कायदा वापरून किंवा सरळ निर्देश देऊन केटीएम/बजाजला किमान चावी लावल्यावर असलं काहीतरी डिस्प्ले होणार नाही ह्याची दक्षता बाळगा हे सांगायला हवं.
23 Dec 2021 - 10:48 am | जेम्स वांड
सिझन बायकर वाटतात, तुमच्या मोटरसायकल मुशाफिरीवर लेख लिहा की डॉक्टर एखाद मस्त, आधी युनिकॉर्न अन आता डोमिनारवर कुठं कुठं भटकंती केली आहेत ते, किती किलोमीटर लोंगेस्ट राईड झाली आहे, सेफ राईड प्रॅक्टिसेस, प्रवासात आलेले अनुभव अन बघितलेली ठिकाणे इत्यादी तुमच्या खास शैलीत वाचायला आवडेल फार.
संपादक मंडळ, प्रतिसाद द्विरुक्ती झालेली आहे तरीही कृपया एक प्रतिसाद उडवल्यास धागा परत तासात दिसेल, धन्यवाद.
23 Dec 2021 - 12:34 pm | सुबोध खरे
मी सुरुवात सिल्व्हर प्लस या ५० सी सी च्या मोपेडपासून केली त्यानंतर हिरो होंडा, कायनेटिक होंडा, कायनेटिक फ्लाईट, होंडा युनिकॉर्न, होंडा ऍक्टिव्हा आणि आता डॉमिनार आहे.
यात सिल्व्हर प्लेस ७५ ०००, हिरो होंडा १५०,०००, कायनेटिक होंडा ६५०००, होंडा युनिकॉर्न ७५००० आणि डॉमिनार १०,००० किमी इतक्या चालवल्या आहेत.
कायनेटिक फ्लाईटआणि आता होंडा ऍक्टिव्हा बायकोची आहे त्या काही फार चालल्या नाहीत.
छोटे छोटे किस्से बरेच आहेत. उदा. सिल्वर प्लस मागच्या बाजूने पर्वतीच्या टेकडीवर चढवली होती.
किंवा कायनेटिक होंडा दुपारी ४ वाजता ए एफ एम सीट चालू केली ते एक क्षणही न थांबता पुणे मुंबई करून साडे सातच्या बातम्यांचे संगीत चालू असताना मुंबईत घरी पोचलो.
लष्करात असल्याने जेथे जात असे तेथे आसपासच्या भागात भटकंती मात्र भरपूर केली आहे. उदा. ओखा, पाटणा, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर, लखनौ, जोधपूर, गोवा, कोची, चेन्नई येथे यथेच्छ भटकंती झाली आहे.
पण सलग अशी एखादी लांब टूर केली नाही.त्यामुळे लिहिण्यासारखे किंवा लोकांना सल्ला देण्यासारखे काही नाही माझ्याकडे.
23 Dec 2021 - 2:50 pm | जेम्स वांड
३,७५,००० किमी म्हणजे जवळपास पृथ्वी ते चंद्र इतकी गाडी चालवल्यावर आपण म्हणता आहात की माझ्याकडे द्यायला सल्ले नाहीत, सरजी पाय कुठं हो तुमचे ?
तुम्ही पुस्तक लिहू शकता पुस्तक मोटरसायकलिंगवर !!
23 Dec 2021 - 4:52 pm | अभ्या..
डॉक्टरसाहेब, जर्नी तर लैच भारी केलात तुम्ही. खरे म्हणाल तर क्रमाने उलटा प्रवास आहे. लोक किशोरवयात मोपेडपासून सुरुवात करुन तरुणपनी बाईक, मग संसारी स्कूटर मग ऑटोमॅटिक निवांत असे प्रवास करतात.
सिल्व्हरप्लस मुळे भारी आठवणी आल्या. सिल्व्हरप्लस ६५ सीसी ची होती. (सोबत आलेली एक्स्प्लोरर मात्र ५० सीसी. ही एन्फिल्डच्या गाड्यांची इंजिने आहेत ह्यावर विस्वास बसणार नाही आजच्या ३५०, ५०० आणि ६५० रॉली माहीत असल्यांना पण जास्त सीसीच्या दमदार बाईक असलेल्या रॉयल एन्फिल्डच्या इतिहासात फक्त २२ सीसी ची मोफा पण आहे.) सिल्व्हरप्लस ही खरेतर जर्मन झुन्डाप ची झेड डी २० बाईक (साल १९७७). तेच इंजिन आणि डिझाईन वापरुन एन्फिल्ड ने सिल्वर प्लस आणली. इंजिनवर एका बाजुला झुंडाप लिहिलेले असायचे. हि इंजिने एंड्युरो बाईकसाठी फेमस. ह्या मोपेडमध्ये त्या काळात कुठल्याही बाईक किंवा मोपेडला नसलेले अॅलॉय (डायकास्ट) व्हील्स होते.(अॅलॉय व्हील सारखेच दिसणारे शीट मेटलच व्हेल त्याच काळात आलेल्या स्पोर्टिफ ह्या प्युजो च्या एका ५० सीसी मोपेड ला होते. बॅटरी स्टार्ट असणारी ती भारतातली कदाचित पहिली दुचाकी असावी. कारण पहिली बटणस्टार्ट म्हणवणारी कायनेटिक होंडा ही पण १९८४ ची आणि स्पोर्टिफ पण १९८४ ची. ) एन्फिल्डचे दुसरे मॉडेल एक्स्प्लोरर तर आजच्या काळात असलेली बाईकची सारी वैशिश्ट्ये घेउन होती. फायबरचे वायझर, सिंपल गिअर सिस्टिम, मागील चाकावरचे काऊल. टँकवर रंगीत ग्राफिक्स, अॅल्युमिनियम कास्ट इंजिने. लाईट आणि इंडिकेटर्साठी बटणांचे सोपे पॅनेल ह्या सोयी त्याकाळातच्या बर्याच गाड्यात नसायच्या.
23 Dec 2021 - 7:46 pm | सुबोध खरे
सिल्व्हरप्लस ६५ सीसी ची होती.
सिल्व्हरप्लस ५० सीसी चीच होती.
सिल्व्हरप्लस व एक्स्प्लोअरर चे इंजिन एकच होते पण त्यांचे ट्युनिग वेगळे होते
त्यामुळे एक्स्प्लोअररचे इंजिन ३.२ बी एच पी तर सिल्व्हर प्लसचे इंजिन २.६ बी एच पी शक्ती निर्माण करत असे
23 Dec 2021 - 8:58 pm | तुषार काळभोर
काय अभ्या..स आहे!
23 Dec 2021 - 9:20 pm | जेम्स वांड
अभ्या भावा, तुला फक्त एक सलाम भाई !!
23 Dec 2021 - 2:48 pm | चौथा कोनाडा
विद्युत दुचाकीचे समालोचन ... थेट मालकाच्याच तोंडून ...
Ather 450X - रिव्ह्यू!
'शिरगावकर, अहो लिहा की रीव्ह्यू गाडीचा! आणखी किती आग्रह करायचा लोकांनी?'*, काल संध्याकाळी बावधनमध्ये गाडी चालवत असताना एक जण त्यांच्या गाडीवरून आडवे येऊन मला थांबवून भर रस्त्यात असं म्हणाल्याने मी आता रिव्ह्यू लिहायला घेतला! (*१००% सत्य घटना!)
तर, एथर घेऊन सहा महिने झाले. त्या आधी सातेक वर्षे मी होंडा ऍक्टिवा वापरत होतो, त्याआधी प्लेझर आणि त्या आधीच्या इतिहासकाळात बजाजच्या स्कूटर्स. एकुणात, पुण्यात दुचाकी चालवण्याची माझी तीसेक वर्षांची प्रदीर्घ आणि दैदिप्यमान कारकीर्द आहे! अन मी स्कूटरवाला माणूस आहे, बाईक्सवाला नाही. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे माझा रिव्ह्यू हा अस्सल पुणेकर दुचाकीस्वाराचा रिव्ह्यू आहे कोण्या सोम्यागोम्याचा नाही हे समजावं म्हणून!
तर नमनाला शंभर एमेल ऑईल सांडल्यावर आता रिव्ह्यू!
बॉडी / डिझाईन
गाडीचं डिझाईन आकार ही पटकन नजरेत भरणारी गोष्ट आहे. एदम मॉडर्न लुक असलेली स्पेस-एज डिझाईनची गाडी मला बघताक्षणी
पुढे .....
https://www.facebook.com/prasad.shir/posts/10159664857026411
25 Dec 2021 - 8:53 am | खटपट्या
वरील सर्व चर्चा वाचली.
त्यात काही कमेंटी बुलेट बद्दल आहेत.
प्रेम असेल तरच बुलेट घ्यावी, माझे लहानपणापासून स्वप्न होते, म्हणून मी घेतली.
जर व्यवहार बघून बुलेट घ्यायची असेल तर घेउ नका. कटकटी सर्वच गाड्याना असतात. हे आपल्या चालवण्यावर पण असते.
25 Dec 2021 - 9:03 am | जेम्स वांड
२०१४ पासून क्लासिक ३५० चा मालक, अनुपम फारच भारी बाईक घेतली हा माज पण नाही अन बुलेटचा त्रास पण नाही. गाडीने एकदाही धोका दिलेला नाही किंवा आऊट ऑफ द वे गेलेली नाही. रोजचे गाडी पुसणे स्वतः करतो. जनरली बुलेट्स रिफाईन होत आल्या आहेत, थंडरबर्ड एक्स सिरीज / हिमालयन पासून तर रॉयल एनफिल्डनं कात टाकली म्हणायला वाव आहे, गाडी निशे सेगमेंट उरलेली नाही कॉमन झाली आहे पण मस्त आहे माझी तरी
27 Dec 2021 - 3:58 am | खटपट्या
हेच म्हणतोय, उगाच पांढरा हत्ती म्हणणे बरोबर नाही. आजकाल बुलेटही एवढे काम काढत नाही. व्यवस्थीत चालवली तर गुणी बाइक आहे. मी २०१८ ला गन मेटल विथ ड्युअल डिस्क ब्रेक घेतली. आजपर्यंत जास्त खर्च आलेला नाही.
3 Jan 2022 - 9:26 pm | जेम्स वांड
अश्या स्वरूपात पाहायला आवडेल राव, टोटल लीगल (वजा एक्झॉस्ट) स्क्रॅम्बलर लुक !.
9 Jan 2022 - 9:16 am | खटपट्या
थोडे दिवस कळ काढा
एस जी ६५० येतेय. गाडी बघुन खुष व्हाल. बरेच दिवसांनी मिसळपाववर येत असल्याने फोटो कसा टाकायचा ते विसरलो. तरी खाली लिंक देतोय.
या वर्षीच्या अखेरीस येइल असे वाटतेय.
किंमतही ३ लाखाच्या आसपास आहे असे ऐक्ले आहे. बघुया
https://ridermagazine.com/2021/11/29/royal-enfield-sg650-concept-first-l...
12 Apr 2022 - 12:53 pm | चेतन सुभाष गुगळे
एस जी ६५० बद्द्ल अनेक जण आस लावून बसले आहेत पण बहुदा ती लिमिटेड एडिशन असेल आणि लगेचच बंद होऊन जाईल अशी शक्यता आहे. मागेल त्याला मिळेलच अशी खात्री निदाना आता तरी देता येत नाहीये.
19 Jan 2022 - 7:23 pm | शाम भागवत
Yamaha Aerox 155 या स्कूटर बद्दल कोणाला काही माहीत आहे का? महाग असली तरी मोठ्या चाकांमुळे व१२३ किलो वजनामुळे व कमी उंचीमुळे लो स्पीडलाही ती खूप स्टेबल असेल असं प्रथमदर्शनी तरी वाटत आहे.
19 Jan 2022 - 8:02 pm | सुबोध खरे
हि स्थिर असेल यात शंका नाही
परंतु हि धड स्कुटर नाही ( कारण पायाशी सामान ठेवताच येणार नाही) आणि व्हील बेस लांब आहे १३५० मिमी ( यामाहा R १५ मोटारसायकलचा व्हील बेस आहे १३२५ मिमी)
धड मोटारसायकल नाही कारण चाके लहान आहेत उंची लहान आहे. त्यामुळे उंच पुरुषांना बसणे कठीण आहे. स्त्रियांसाठी हि ठीक आहे परंतु पुढे पटकन काही ठेवावे अशी जागाच नाही. अर्थात सीटच्या खाली भरपूर जागा आहे परंतु भाजी सारख्या बारीक बारीक गोष्टी ठेवण्यासाठी सारखे उठून सीट उघडणे भरपूर कटकटीचे होते.
व्हील बेस लांब असल्याने स्थिरता चांगली मिळेल परंतु शहरात इतर स्कुटरसारखी पटकन वळणार नाही.
याशिवाय १५० सीसी असल्याने याचे मायलेज कमी मिळेल ३५-४० असेल आणि पेट्रोलची टाकी फक्त ५.५ लिटर असल्याने तुम्हाला वारंवार पेट्रोल पंपावर जावे लागेल तेंव्हा घराच्या जवळ पेट्रोल पंप असेल तर ठीक आहे. ( मोटार सायकलची टाकी १०-१२ लिटर असते)
शिवाय किंमत दीड लाखाच्या वर जात असल्याने हि कितपत यशस्वी ठरेल हि शंकाच आहे. पण स्टाईल म्हणून उत्तम असेल
कारण या किमतीच्या आसपास कितीतरी उत्तम मोटारसायकल मिळू शकतील
19 Jan 2022 - 9:00 pm | धर्मराजमुटके
स्कूटर ची किंमत २ लाख अधिक टॅक्सेस इतकी दिसतेय. एव्हढी महाग स्कुटर घेणे कितपत योग्य आहे माहित नाही.
व्यक्तीश: मला बजाज एम ८० आणि हिरो होंडाची स्ट्रीट मोपेड जास्त आवडल्या होत्या. दोन्हीची चाके मोटरसायकलच्या चाकापेक्षा छोटी मात्र स्कुटर च्या चाकापेक्षा कितीतरी मोठी होती. या दोन्ही कंपन्यांनी या मॉडेल्सच्या सुधारीत आवृत्त्या आणायला हव्या होत्या. स्कुटरच्या सस्पेंशन आणि चाकांवर काम करायला अजून भरपूर वाव आहे मात्र त्यात कोणी लक्ष घालीत नाही. आता बाजारात नवीन आलेल्या बॅटरी वर चालणार्या स्कुटर्स चे सस्पेंशन अगदीच तकलादू दिसतात. स्कुटर दोन वर्षे जुनी झाली की सस्पेंशन मुळे वापरायला नकोशी वाटते.
20 Jan 2022 - 9:06 am | शाम भागवत
डॉक्टरांशी सहमत.
24 Jan 2022 - 8:18 pm | धर्मराजमुटके
ही बातमी
भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक (Indias First Electric Cruiser Bike) कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अगदी हार्ले डेविडसनसारखी (Harley Davidson) दिसते. वीजेवर चालणारी ही बाईक सिंगल चार्जवर १८० ते २२० किमी ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा खुद्द कंपनीनं केला आहे. बाईकमध्ये ४ हजार वॉटची मोटर बसवण्यात आली आहे. कंपनीनं ही बाईक एकूण तीन रंगात उपलब्ध केली आहे. यात Garnet Red, Deep Blue आणि Jet Black या रंगांचा समावेश आहे. बाईकची किंमत १.६८ लाखांपासून सुरू होते. या बाईकसोबतच कंपनीनं कोमाकी वेनिस (Komali Venice) देखील लॉन्च केली आहे.
25 Jan 2022 - 10:29 am | सुबोध खरे
कोणतेही इलेक्ट्रिक वाहन घेतले( चार चाकी किंवा दुचाकी) तरी त्याचा पल्ला जितका महत्त्वाचा आहे त्यापेक्षा त्याची बॅटरी किती वेळात चार्ज होते ते महत्त्वाचे आहे. कारण आपण ३०० किमी चा पल्ला घेतला तर लांब जाताना आपण पहिला थांबा २०० किमी घ्या किंवा २५० किमी बॅटरी चार्ज होण्यासाठी आज ८ तास लागतात. म्हणजेच आपल्याला रात्रभर ती चार्ज करावी लागते.
तसेच दुचाकी चा पल्ला २०० च्या आसपास सांगत असले तरी शहरातील ट्रॅफिकमध्ये तो १००-१२० च्या वर जात नाही आणि त्याची बॅटरी चार्ज होण्यासाठी सुद्धा आज ८ तास लागतात.
विजेवर चालणारी वाहने घेताना आजही माणसे साशंक एवढ्यासाठी आहेत कि एखाद्या ठिकाणी आपला चार्ज संपला तर तेथे चार्जिंग ची सुविधा सहज उपलब्ध नाही आणि ती असली तरी निदान ३-४ तास अडकावे लागेल.
पेट्रोलचे/डिझेलचे वाहन रस्त्यात बंद पडले तर दुसऱ्या वाहनातून पेट्रोल आणून भरले कि गाडी लगेचच चालू होते
बॅटरीचा जर ३५-४० % चार्ज जर अर्ध्या तासात कोणत्याही ५ अँपियर च्या सॉकेट मधून करता येईल तेंव्हा विजेची वाहने जास्त लोकप्रिय होतील आणि पेट्रोल/डिझेलच्या वाहनांचा सशक्त पर्याय म्हणून पुढे येतील.
8 Feb 2022 - 5:06 pm | विजुभाऊ
मुंबईत भरत दाभोलकर ऑटोरिक्शा चालवत फिरतात
https://www.team-bhp.com/forum/attachments/modifications-accessories/175...
13 Feb 2022 - 8:53 am | खटपट्या
शहरात गाडी ६० च्या वर आणि समोर १ किलोमीटर रस्ता दिसल्याशिवाय ८० च्या वर जाउ नये हे वरील मुद्दे पटले.
आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही. मुळात शहरात एवढ्या वेगाने गाडी चालवण्यास जागा कुठे मिळते?
किंवा ते गाडी चालवताना वेगाचा काटा बघत नसावेत.
14 Feb 2022 - 9:54 am | सुबोध खरे
गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही.
माझ्या कडे डॉमिनार आहे जी ४०० सीसी ची ४० हॉर्स पॉवरची मोटारसायकल असून त्यात दोन्ही डिस्क ब्रेक्स ए बी एस सह आहेत.
पूर्व द्रुत महामार्गावर मुलुंड ते विक्रोळी सुद्धा मला ८०-९० ने चालवायला भीती वाटेल इतकी रहदारी असते.
आणि हा मार्ग म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातील वेगाने चालवायला सर्वात चांगला मार्ग असावा.
असे असताना एखादा म्हणत असेल कि ८०-९० च्या खाली चालवत नाही तर
एक तर तो खोटे बोलतो आहे
किंवा
जीवावर उदार होऊनच( स्वतःच्या आणि इतरांच्या) चालवतो असे म्हणावे लागेल
9 Apr 2022 - 9:54 am | चेतन सुभाष गुगळे
अगदीच शब्दशः अर्थ घेतला तर असं वाक्य बोलणारा रेसिंग ट्रॅकवर जरी गाडी चालवत असेल तरी त्याचं बोलणं हे खोटंच ठरणार कारण कुठलीही गाडी कितीही वेगाने चालविली तरी सुरुवात शून्यापासूनच करावी लागणार आणि वळण किंवा इतर अडथळ्यांकरिताही वेग पन्नासच्या खाली आणावाच लागणार; पण जर का याचा अर्थ असा घेतला की चालक शक्य असेल त्या प्रत्येक वेळी आणि शक्य तितक्या लवकर ८० / ९० च्या वेगाने वाहन चालवित आहे तर ते अगदीच खोटेही नसणार. सप्टेंबर १९९७ ते फेब्रुवारी २०११ या काळात माझ्याकडे जुनी उजव्या पायात गिअर लिव्हर असलेली बुलेट ३५० सीसी ही बाईक होती. ती मी सेक्टर २५ च्या ज्ञानप्रबोधिनी शाळेपासून ते आकुर्डीच्या फोर्स मोटर्स (तेव्हाची बजाज टेम्पो लि.) पर्यंत चालवित असे. या तीन किमी च्या अंतरापैकी पहिल्या १.५ किमी बरेच चौक, वेडीवाकडी वळणे आणि सिग्नल व इतर अनेक अडथळे पार करुन मी निगडीच्या मुख्य चौकात पोचायचो तोवर मी ० ते ४० किमी च्याच रेंजमध्ये वेग पकडू शकायचो पण निगडी चौक ते फोर्स मोटर्सचे प्रवेशद्वार या दीड किमीच्या सरळ पट्ट्यात मात्र ८० किमी चा वेग सहज घ्यायचो. ही २००१ पर्यंतची हकीगत आहे. त्यानंतर डिस्क ब्रेक / एबीएस / सीबीएस असलेली आणि प्रचंड पिक अप असलेली वाहने बाजारात आली आहेत अर्थात मी ती चालविली नाही पण इतर अनेकांना मी सहज तीन चार किमीच्या पट्ट्यात अनेकदा १०० पर्यंतचा वेग लीलया घेताना आणि पुन्हा तितक्याच चटकन ब्रेकिंग करुन तो तात्काळ शून्यावर आणतानाही पाहिलेय.
माझ्या तरुणपणी अशी वाहने नव्हती आणि आता या वयात या वाहनांवर मला हे जमू शकणार नाही पण म्हणूनच जर एखाद्याकडे हे कौशल्य असेल तर ते मी मोकळ्या मनाने मान्य करील. तो खोटे बोलतोय किंवा लोकांच्या /+ स्वतःच्या जीवाशी खेळतोय असा आरोप करणार नाही. उच्च तंत्रज्ञान + कौशल्य + सराव + प्रचंड शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती यांच्या साहाय्याने आज पंचवीस ते पस्तीस या वयोगटात असणारे अनेक जण हे पूर्ण सुरक्षितता पाळून करताना दिसतात.
9 Apr 2022 - 10:08 am | सुबोध खरे
आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही.
याचा सरळ अर्थ सुद्धा काढून पहा.
वाच्यार्थ व्यंगार्थ मी बोलतच नाही.
१०० चा वेग घेण्यासाठी डॉमिनर सारख्या शक्तिशाली मोटार सायकलला ८ सेकंद लागतात तर बुलेट ३५० ला २५. ७३ सेकंद लागतात.
९० च्या स्पीडला दीड किमी चे अंतर सुद्धा एक मिनिटात पार होईल.
महाराष्ट्राच्या किती शहरात किती ठिकाणी दीड किमी चा सरळ वाहतूक नसलेला पट्टा मिळेल?
तीन ते चार किमी तर सोडुनच द्या.
आणि हे मी स्वानुभवाने सांगतोय जेथे माझ्याकडे ४० हॉर्सपॉवरची डॉमिनार सारखी ए बी एस आणि स्लिपरक्लच असलेली जाड टायरची मोटार सायकल आहे.
त्यामुळे असे बोलणे हे शुद्ध दर्पोक्तीच आहे किंवा सरळ सरळ खोटे बोलणे आहे.
10 Apr 2022 - 8:25 pm | चेतन सुभाष गुगळे
डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या
हे जाड टायर प्रकरण हाताळायला आणि वळवायला फार अवघड आहे. मी गेले सहा महिने केवळ बाइक्स रिसर्च करीत आहे.
चार प्रकारच्या बाईक्स आहेत -
कम्यूटर / क्लासिक - अपराईट पोझिशन - यात चालक सरळ ताठ बसतो
क्रूझर / लाँग राईड पोझिशन - यात चालक थोडा मागे रेलून बसतो.
स्पोर्ट - यात चालक पुढे झुकून बसतो.
ऑफ रोड / मोटो क्रॉस - इथे चालक लिटरली फूट रेस्टवर अनेकदा उभा राहून
अपराईट पोझिशन असलेली बुलेट सारखी बाईक ही चटकन वेग घेणे आणि पुन्हा कमी करणे याकरिता बनविलेली नाही. तरीही याच प्रकारात बनविलेली असून देखील येझडी रोडस्टर बाईक मात्र चालक अशा पद्धतीने चालवू शकतो पण बुलेट नाही. अर्थात रॉयल एन्फिल्डचीच इंटरसेप्टर मात्र हे लीलया करु शकते पण तिलाही पुन्हा टॉप स्पीड १७० किमी असला तरी तो फार काळ घेता येत नाही कारण स्पोक व्हील्स आणि ट्यूब + टायर
क्रूझर / लाँग राईड पोझिशन बाईकला देखील हे शक्य नाही - उदा. मेटेऑर.
ऑफ रोड / मोटो क्रॉस मध्ये उत्तम पिकअप मिळेल पण टॉप स्पीड फार घेणे शक्य नाही कारण स्पोक व्हील्स आणि ट्यूब + टायर
आता उरतो एकच प्रकार - स्पोर्ट बाईक - यात चालक पुढे झुकतो आणि या वाहनात उत्तम पिक अप आणि टॉप स्पीड देखील आहे. यामाहाची आर सिरीज् याबाबत आदर्श म्हणता येईल अशी आहे. याच प्रकारात इतर बाईक्सदेखील ( उदा - टीवीएस अपाचे, बजाज पल्सर, इत्यादी) आहेत. अॅलॉय व्हील + ट्यूबलेस टायर्समुळे १७० किमीचा टॉप स्पीड गाठता येतो. आपण ही वाहने चालवून पाहिली आहेत काय?
केवळ डॉमिनोर आणि बुलेट यांना समोर ठेवून निष्कर्ष काढता येणार नाही. मूळात ती दोन्ही वाहने याकरिता अपात्रच आहेत.
मी पिंपरी-चिंचवड हद्दीत राहतो आणि तिथले अनेक असे पट्टे सांगू शकतो. (जसे की, भक्ती शक्ती ते कासारवाडी - ११ किमी यात मधोमध असलेली हायस्पीड लेन त्याचप्रमाणे रावेत औंध रस्त्यावर देखील असलेले अनेक फ्लाय ओवर्स आणि मधल्या लेन्स, याशिवाय देहूरोड कात्रज बाह्यवळण रस्त्यावर सलग तीन ते चार किमी मोकळा व कमी वाहतूकीचा पट्टा किमान चार वेळा आपल्याला मिळू शकतो.) पण मूळात हा दीड किमीचा स्पॅन बुलेट सारख्या आळशी बाईक्सला गरजेचा आहे. यामाहा बाईकर्स याच्या निम्म्याहून कमी अंतरात ८० किमीचा वेग गाठतात आणि पुन्हा चटकन शून्यावर येतात.
यूट्यूबवर असंख्य व्हिडीओज् विश्लेषणासह आहेत. त्यात हायवेज् प्रमाणेच सिटी ट्राफिकचेही व्हिडीओज् आहेत.
रावेत ते तळेगाव या पट्ट्यात वॅगनार प्रवासाचा जीपीएस व्हिडीओ आपण येथे पाहू शकता. जीपीएस स्पीड कोपर्यात दिसेल.
https://www.youtube.com/watch?v=a5Gzu8kzERE
वाहनाने किती वेळा ८० व ९० चा वेग ओलांडला आहे ते दिसून येईल. तेही स्वतःचा / इतरांचा जीव धोक्यात न घालता. बहुतेक रस्त्यांवर दुभाजक आणि चौकात उड्डाणपूल वगैरेमुळे हे साध्य होते.
10 Apr 2022 - 8:47 pm | चेतन सुभाष गुगळे
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील. किमान तिप्पट ते सहापट किंवा अनेकदा त्याहूनही अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील?
संदर्भाकरिता काही बाईक्सच्या ऑन रोड किंमती - (अंदाजे / जवळपास - व्हेरिअंट कलर व शहरानुसार किरकोळ फरक पडू शकतो)
बजाज सीटी १०० - रुपये ऐंशी हजार
होन्डा शाईन - रुपये पंच्चाण्णव हजार
हीरो एक्स्ट्रीम - रुपये एक लाख पासष्ट हजार
यामाहा एफ झेड २५ - रुपये पावणे दोन लाख
यामाहा आर १५ - रुपये एक लाख ऐंशी हजार
बजाज पल्सर आरएस २०० - रुपये दोन लाख
येझडी रोडस्टर - रुपये अडीच लाख
बजाज डॉमिनॉर - रुपये पावणे तीन लाख
केटीएम ड्यूक ३९० - रुपये साडे तीन लाख
रॉयल एन्फिल्ड इंटरसेप्टर - रुपये पावणे चार लाख
यापेक्षा अधिक किंमतीचीही अनेक वाहने आहेत आणि बरेच जण ती चालवित असतात जसे की कावासाकी वर्सिस, यामाहा एमटी ०१.
यातली अनेक वाहने माझ्या वयाला व व्यक्तिमत्वाला न जुळणारी असल्याने मी चालविलेली नाहीत पण तेवीस बाईकर्सचा एक गट (वय वर्षे २५ ते ३५) माझ्या संपर्कात असल्याने मी त्यांच्या सोबत बोलल्यावरच या धाग्यावर प्रतिसाद दिले आहेत.
तुम्ही ठरवलेला निष्कर्ष मात्र कदाचित तुमच्या एकट्याच्या अनुभवावर आधारित आहे.
11 Apr 2022 - 1:42 pm | सुबोध खरे
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील
बहुसंख्य लोक याच गाड्या चालवतात.
उगाच जास्त शक्तीच्या महाग मोटार सायकल घेऊन पेट्रोल जाळण्यात फार कुणाला रस नसतो.
गाड्याच्या विक्रीचे आकडे पाहिले असतेत तर तुम्हाला ते लक्षात आले असतेच.
मोठ्या गाड्यांमध्ये जास्त लोक बुलेटच चालवत्तात कारण त्याची कल्ट व्हॅल्यू
12 Apr 2022 - 12:37 am | चेतन सुभाष गुगळे
बाईकिंगचा छंद असणारे आपण पाहिलेच नाहीत का? हजारो रुपये लिटर किंमतीची दारु पिणारे जसे लोक आहेत तसेच लाखो रुपये किंमतीच्या बाईक्स विकत घेणारेही अनेक जण आहेत.
त्या आकड्यांवरुन निष्कर्ष काढायचा कसा? ज्यांना १००-१५० सीसीची वाहने हवीत उदरनिर्वाहाकरिता फिरावे लागते यास्तव ते ती विकत घेतातच आणि ती वाहने ठराविकच असल्याने त्यांचा खप जास्त दिसतो - उदा. स्प्लेंडर / बजाज प्लॅटिना इत्यादी. म्हणजे १०० तले ५० स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना किंवा तत्सम बाईक्स घेणार.
१५०+ सीसीमध्ये पुढे फार मोठे वैविध्य आहे. १०० तल्या उरलेल्या ५० ना फार निवडीला फार मोठा वाव आहे. त्या पन्नासांपैकी प्रत्येकी दोघांनी जरी एक मॉडेल घेतले तरी अशा दर दोघांमागे एक अशी २५ एक मॉडेल्स सहज बाजारात आहेत.
मग जर एखाद्याला असे दिसले की (हे केवळ उदाहरणाकरिता लिहित आहे) १०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० सीसीच्या, १५ गाड्या १२५ सीसीच्या आणि १० गाड्या १५० सीसीच्या खपल्या. आणि मग उरलेल्या पन्नासांमध्ये मग २५० सीसीच्या दोन साडे तीनशे सीसीच्या दहा (अर्थातच बुलेट) आणि उरलेल्या सर्व मॉडेल्सच्या प्रत्येकी फक्त एक किंवा दोनच खपल्या तर असे वाटेल की १५० सीसीच्या आतील दोन तीन मॉडेल्सची मेजॉरिटी आहे पण १५० सीसी वरील २५ मॉडेल्सचा एकत्रित खप हादेखील जर १५० सीसीच्या आतील तीन मॉडेल्सच्या खपाच्या जवळपास जाणारा असेल तर मग काय म्हणता येईल?
माझ्या घराशेजारी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. कुंपण भिंतीबाहेर ज्या शेकडो बाईक्स उभ्या आहेत त्या पाहिल्या तर मला तरी जास्त सीसीच्या वाहनांची (एकच एक मॉडेल नव्हे) संख्या निम्म्याहून अधिक दिसते. रोज पाहतो आहे. एखाद्या निम्न आर्थिक वर्गातील कामगारांच्या कारखान्यातील वाहनतळावर हे चित्र नक्कीच वेगळे असेल पण पुन्हा सॉफ्टवेअर किंवा इतर मल्टीनॅशल कंपन्यांच्या पार्किंगमध्ये मात्र महागड्या बाईक्सच जास्त दिसतील. तळवडे, हिंजवडी, मगरपट्टा सिटी, प्राधिकरण येथील कॉलेज, कंपन्या, मॉल, सिनेमाथेटर, बिझिनेस कॉम्प्लेक्स अशा अनेक वाहनतळांवर मी कोणती वाहने जास्त दिसतात याचे बारकाईने निरीक्षण केले आहे. स्कूटर यातून वगळा व फक्त मोटरसायकल ची संख्या पाहा.
लोक महागड्या व मोठ्या अश्वशक्तीच्या बाईक्सची लक्षणीय प्रमाणात खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. परफॉर्मन्स शिवाय ही पसंती मिळणे नाही. फक्त शो बाजी करिता काही थोडे करतातही पण ते अगदी अल्प इतर जण मात्र त्या बाईक्सच्या वैशिष्ट्यांचा पुरेपुर उपयोग करतात असे दिसते.
12 Apr 2022 - 10:52 am | सुबोध खरे
१०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० सीसीच्या, १५ गाड्या १२५ सीसीच्या आणि १० गाड्या १५० सीसीच्या खपल्या.
हि आकडेवारी चे सु गु यांच्या डायरीतील दिसते
वस्तुस्थिती फार फार वेगळी आहे पाहिजे तर जालावर शोधून पहा.
एक दुवा देतो आहे तोही वाचून पहा. ८९ % च्या वर १५० सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या गाड्याच विकल्या जात आहेत असे दिसेल.
https://theicct.org/sites/default/files/publications/2W-sales-India-wp-F...
https://www.autocarindia.com/bike-news/best-selling-bikes-in-india-janua...
मीच बरोबर हा दुराग्रह धरल्यामुळे तुमचे मत परिवर्तन होणे शक्य नाही म्हणू मी वितंडवाद घालणं सोडून दिलेलं आहे
16 Apr 2022 - 1:03 pm | चेतन सुभाष गुगळे
देशभरात मारुतीच्या कमी शक्तीच्या व जास्त इंधन कार्यक्षमतेच्या वाहनांचा खप अधिक आहे. पण म्हणून कोरेगाव पार्कात आणि दिल्लीतल्या न्यू फ्रेण्ड्स कॉलनीत तीच वाहने दिसतील काय?
शहरातील लोकांची क्रयशक्ति राहणीमान आवड यांचाही फरक पडतोच.
२००८ मध्ये मी एका व्यावसायिकाला भेटायला त्याच्या घरी दिल्लीतल्या न्यू फ्रेण्ड्स कॉलनीत गेलो असता तिथे बहुतेक बंगल्यांच्या पार्किंग मध्ये मला ग्रँण्ड व्हिटारा हे वाहन दिसत होते. संपूर्ण देशात त्या वेळी हे कमी विकले जाणारे वाहन तिथे मेजॉरिटीत होते.
16 Apr 2022 - 1:15 pm | सुबोध खरे
मी पेडर रोड ला गेलो होतो तिथे फक्त बी एम डब्ल्यू आणि मर्सिडीझ होत्या
म्हणजे
मुम्बईचे सगळे लोक बी एम डब्ल्यू आणि मर्सिडीझ च चालवतात
हा हा हा हा हा हा
मीच हुशार आहे
मी हुशारच आहे
मी हुशार आहेच
16 Apr 2022 - 1:31 pm | चेतन सुभाष गुगळे
आणि तुम्ही फुंकर मारुन बुलेट स्वारांना उडविणारे सुपर ह्यूमन आहात.
11 Apr 2022 - 11:14 pm | धर्मराजमुटके
मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील. किमान तिप्पट ते सहापट किंवा अनेकदा त्याहूनही अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील?
बाईक कोणती घ्यावी याबाबत माझे मत अगोदरच एका प्रतिसादात मांडून झाले आहे. त्यामुळे चर्चा करत नाही मात्र तुमच्या वरील वाक्याचे उत्तर तुम्हाला प्रतिप्रश्न विचारून देण्याचा प्रयत्न करतो.
१०-२० हजाराच्या मोबाईलमधे फोन करणे / फोन घेणे, व्हाटसअप फेसबुक इमेल इ. सगळ्या सुविधा मिळत असताना लोक लाखभराचे आयफोन का घेतात ?
मला वाटते की उपयुक्तता जरी साधारणपणे सारखी असली तरी माझ्याकडे महागडी वस्तू आहे हे दुसर्याला दाखविणे माणसाला आवडत असावे किंवा मी गर्दीत इतरांपेक्षा वेगळा उठून दिसावा असे वाटत असावे हेच महागडी वस्तू विकत घेण्यामागचे लॉजीक असावे.
12 Apr 2022 - 12:18 am | चेतन सुभाष गुगळे
महागडी वस्तू फक्त इतरांना दाखविण्याकरिता? अतिरिक्त उपयुक्तता किंवा इतर वैशिष्ट्ये नसतानाही... सिरीयसली? आयफोन फक्त इतरांना दाखविण्याकरिता असतो?
माझ्याकडे कोणत्या ब्रँडचा मोबाईल आहे हे माझ्याव्यतिरिक्त फक्त माझ्या कुटुंबातील सदस्यांनाच ठाऊक आहे जरी मी रोज अनेक लोकांना भेटतो तरी बहुतेकदा त्यांच्यासमोर माझा मोबाईल माझ्या खिशात असतओ. कॉल / गुगल पे वगैरेकरिता खिशातून काढला तरी कव्हरमुळे मॉडेल इतरांना कळणे अशक्यच. माझी गरज पाहून मी तो निवडलाय. इतरांना दाखवून मला काय मिळणार? म्हणजे मी आयफोन वापरत असलो तर ते इतरांना समजल्यावर माझा ग्राहकवर्ग वाढून माझ्या मिळकतीत वाढ होईल काय?
मला तर याउलट वाटते. साधारण २००२ - २००६ दरम्यानची हकीगत आहे. मी एका उपाहारगृहात नियमितपणे जात असे. चव चांगली होती यात वादच नाही पण २००५-०६ दरम्यान पदार्थांचे दर फारच वाढू लागले. तशात एक दिवस मी हॉटेल मालकाला आत शिरताना पाहिले. गडद निळ्या मेटॅलिक रंगाची स्कोडाची साधारण सोळा लाख रुपये किंमतीची नवी कोरी गाडी त्याने घेतली होती. मालकाच्या चैनीकरिता आपण अतिरिक्त किंमत का मोजावी असा विचार करुन मी त्या उपाहारगृहात जाणेच सोडून दिले.
12 Apr 2022 - 5:39 pm | चौथा कोनाडा
रोचक आणि नोंद घेण्याजोगे. +१
11 Apr 2022 - 1:55 pm | सुबोध खरे
एवढा मोठा प्रतिसाद देण्याचे कारण समजले नाही.
मी स्वतः यामाहा R १५, FZ -S , APACHE १८०, पल्सार २०० NS, होंडा H NESS, JAWA आणि बेनेली TNT ३००, HONDA CBR 250 चालवून पाहिल्या आहेत.
यापैकी यामाहा R १५, APACHE १८०, पल्सार २०० NS या गाड्या बऱ्यापैकी अंतर चालवून पहिलेल्या
आणि या गाड्या चालवताना पुढे झुकून बसल्याने मनगटावर भरपूर ताण येतो म्हणून त्या रद्द केल्या.
डॉमिनारची सीट सुद्धा थोडी स्पोर्टी आहे( जे मला आवडत नाही- युनिकॉर्न सारखी आरामदायक गाडी दुसरी नाही हेच माझे मत कायम आहे. त्यानंतर होंडा H NESS,)
मी सुरुवातीला BMW ३१० R/ TVS Apache RR310 साठी थांबलो होतो परंतु त्या येण्याची लक्षणे दिसेनात म्हणून मुलासाठी डॉमिनार घेऊन टाकली.
एवढं सगळं असूनही तुमचा जर असं म्हणणं असेल कि ८०-९० च्या वेगाने शहरात सहज मोटार सायकल चालवता येते
किंवा
आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही. यात काही गैर नाही.
तर तुमचा दुराग्रह तुम्हाला लखलाभ होवो.
मी तुमच्याशी वितंडवाद घालू इच्छित नाही
11 Apr 2022 - 4:45 pm | चेतन सुभाष गुगळे
अनेक व्हिडीओज् उपलब्ध असताना, एकाची लिंकदेखील दिलेली असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन आपल्याला जमत नाही म्हणजे कोणालाच जमणार नाही असं स्वतःला सूपरह्यूमन टाईप समजणं ह्याला दुराग्रह म्हणतात.
11 Apr 2022 - 6:13 pm | सुबोध खरे
बरं बुवा
तुमचंच खरं
11 Apr 2022 - 11:00 pm | चेतन सुभाष गुगळे
तुमच्या / माझ्या किंवा इतर कोणाच्या नसतात. मला जे जमत नाही ते इतरांना जमतंय हे मला दिसत असताना मी तरी निदान ते मोकळ्या मनाने मान्य करतो.
11 Apr 2022 - 11:27 pm | कपिलमुनी
चेतन सुभाष गुगळे लिहिते झाले याचा आनंद झाला आहे, त्यांनी केवळ प्रतिसादात्मक न लिहिता बाई़क बद्दल स्वतंत्र धागा काढावा ही विनंती
12 Apr 2022 - 12:07 am | चेतन सुभाष गुगळे
प्रतिसादांनाच इतकं ट्रोलिंग चाललंय, धागा काढला तर काय होईल? नकोच ते.
12 Apr 2022 - 10:14 am | कपिलमुनी
विरूद्ध मतांना ट्रोलींग म्हणने योग्य नाही
डॉ.खरे हे त्यांच्या मतांबद्दल परखड असतील पण ट्रोल नाहीत हे खात्रीने सांगतो
12 Apr 2022 - 10:27 am | चेतन सुभाष गुगळे
मला देखील आधी असंच वाटायचं पण माणूस कधी बदलेल त्याचा काही नेम नाही.
ही विधाने निकोप संभाषणाचा भाग मानता येणार नाहीत.
12 Apr 2022 - 11:14 am | सुबोध खरे
मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग, पूर्व मूक्त मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि अशा अनेक मार्गांवर फक्त चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. त्यामुळे बरेचदा असे होते की जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो.
आपण ऐकीव माहिती वर काहींच्या काही प्रतिसाद लिहिता कोणती दोन स्थळे आहेत जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. हे सांगता येईल का?
त्यांनी डॉमिनॉर केवळ काही सेकंदात ९५ किमी वेगाने चालविली पण मी मात्र १० मिनीटांनंतरही ताशी ७० किमी पेक्षा अधिक वेग गाठू शकलो नाही.
डॉमिनार सहाव्या गिअर मध्ये ऍक्सिलरेटर सोडून दिला तरी ५३ वेगाने जात राहते. ऍक्सिलरेटर जरा~ सा पिळला तरी हि गाडी ७० जाते.
हि आपली स्थिती आहे
रेनेगेड या गाडीचे उत्पादन बंद झाले आहे आणि त्याचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. एकंदर या गाडीची स्थिती डामाडौलच आहे.
ज्या गाडीची स्थिती अशी आहे तिच्याबद्दल काहीही माहिती नसताना सेकंड हॅन्ड विकत घ्यायला चालला होतात. आणि येथे मात्र मीच शहाणा म्हणून वाटेल ती आकडेवारी खपवताय आणि परत दुसऱ्याला ट्रॉल म्हणून संभावना करताय?
उत्तम आहे.
12 Apr 2022 - 12:19 pm | चेतन सुभाष गुगळे
ही जी माहिती मी इथे मांडली होती होती ती एका रेनेगेडे मालकानेच दिलेली होती असे सांगितले आणि त्या माहितीच्या फर्स्ट हँड कन्फर्मेशन माझ्याकडे नसल्याने त्या माहितीच्या सत्यतेबाबत ठामपणे आग्रह धरला नव्हता उलट तुम्ही दिलेल्या माहितीला सहमती दर्शविली होती. तेव्हा पुन्हा ही चर्चा व्यर्थ आहे.
भक्ती - शक्ती ते रावेत या रस्त्यावर मी व माझे स्नेही (पोलिस खात्यात कार्यरत) अशी आम्ही दोघांनी जाताना व येताना डॉमिनार आलटून पालटून चालविली. जाताना त्यांनी केवळ काही सेकंदात ९५ किमी वेग गाठला होता आणि मला येताना १० मिनीटांनंतरही ७० किमीच गाठता आला. ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं की मी डिस्क ब्रेकच्या भरोशावर फारसा विसंबून राहत नाही. पुरेसं अंतर राखतो. माझ्या स्नेह्यांनी मात्र डिस्क ब्रेकच्या भरोशावर इतर वाहनांच्या अगदी किसिंग डिस्ट्न्स इतके जवळ जात बिनधास्त वाहन चालविले.
सहाव्या गिअरमध्ये जर रस्त्याची वेगवेगळी पातळी विचारात घेतली तर हे विधान सरसकट वस्तुनिष्ठ ठरत नाही. उलट सहाव्यातून पुन्हा पाचव्यात आणि चौथ्यात आणावी लागते. जे मला करावे लागले.
माझ्या आधीच्या प्रतिसादातील वाक्ये कोट करुन तुम्ही पुन्हा माझाच मुद्दा अधोरेखित करताय - ८० / ९० पर्यंत वाहन लीलया नेणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. जसं या केसमध्ये मला नाही जमलं पण माझ्या स्नेह्यांनी करुन दाखवलं. आणि हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पिलीयन सीटवर बसून पाहिलं, अनुभवलं.
विकत घ्यायला चाललो होतो हे विधान वस्तुनिष्ठ नाही. विचार चालू होता पण अंतिम निर्णय घेतलेला नव्हता. त्या निर्णयाच्या आधी अभ्यास व्हावा म्हणूनच इथे प्रतिसाद मांडला होता. पुरेसा विचार केल्याशिवाय मी काहीही खरेदी करीत नाही.
हे असे शब्द वापरणे यालाच ट्रोलिंग म्हणतात. ज्या गोष्टी मी स्वतःला जमत नाही हे मान्य करुनही स्वतः डोळ्यांनी इतरांना करताना पाहिलंय आणि मगच लिहितोय की हे शक्य आहे तर तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवत आहात आणि कारण काय तर तुम्हाला स्वतःला ते जमले नाही आणि म्हणूनच इतरांनाही जमणार नाही ही तुमची खात्री. यूट्यूब व्हिडीओ पाहा, मी लिंक दिलेला पाहा म्हणतोय तर तिकडेही दुर्लक्ष करायचं आणि सत्य नाकारायचं याला काय अर्थ आहे.
मला ३० किग्रॅचा एलपीजी सिलिंडर उचलता येत नाही म्हणून माझ्यापेक्षा कमी उंचीची आणि वजनाची मीराबाई चानू अडीचशे किग्रॅ वजन लीलया उचलते ही बाब अमान्य करायची का? सराव, सातत्य, तंत्र आणि कौशल्य या बाबी काहींना इतरांपेक्षा अधिक क्षमतेच्या बनवितात यावर निदान मी तरी विश्वास ठेवतो.
12 Apr 2022 - 12:28 pm | सुबोध खरे
तुम्ही ट्रोल म्हणा नाही तर वाटेल ते म्हणा. मला शष्प फरक पडत नाही.
जितके वेडेवाकडे समर्थन तुम्ही कराल तितके तुमचे पितळ उघडे पडत चालले आहे
आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ खोटे आहे हे सिद्ध झाले असताना तुम्ही परत पडलो तरी नाक वर म्हणून सांगताय.
असो
धन्यवाद
12 Apr 2022 - 12:38 pm | चेतन सुभाष गुगळे
हे कधी झाले?
यालाच ट्रोलिंग म्हणतात. माझ्या तुम्हाला उद्देशून लिहिलेल्या एकाही प्रतिसादात असे शब्द नाहीयेत.
15 Apr 2022 - 10:30 am | सुबोध खरे
आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ खोटे आहे हे सिद्ध झाले
१०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० सीसीच्या, १५ गाड्या १२५ सीसीच्या आणि १० गाड्या १५० सीसीच्या खपल्या.आणि मग उरलेल्या पन्नासांमध्ये मग २५० सीसीच्या दोन साडे तीनशे सीसीच्या दहा (अर्थातच बुलेट) आणि उरलेल्या सर्व मॉडेल्सच्या प्रत्येकी फक्त एक किंवा दोनच खपल्या तर असे वाटेल की १५० सीसीच्या आतील दोन तीन मॉडेल्सची मेजॉरिटी आहे पण १५० सीसी वरील २५ मॉडेल्सचा एकत्रित खप हादेखील जर १५० सीसीच्या आतील तीन मॉडेल्सच्या खपाच्या जवळपास जाणारा असेल तर मग काय म्हणता येईल?
हि शुद्ध थापेबाजी आहे. याची एक तरी आकडे वारी तुम्हाला देता येईल का?
15 Apr 2022 - 10:32 am | सुबोध खरे
कोणती दोन स्थळे आहेत जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. हे सांगता येईल का?
याचे उत्तर अजून मिळालेले नाही
15 Apr 2022 - 12:52 pm | चेतन सुभाष गुगळे
ही माहिती फर्स्ट हॅण्ड नसल्याने तिच्या सत्यतेविषयी कुठलीही खात्री मी ठामपणे व्यक्त केलीच नव्हती. उलट तुमच्या स्पष्टीकरणानंतर मी तुमच्याशी या माहितीवरुन कुठेही पुन्हा आग्रह धरलेला दिसणार नाही. मी स्वतः मुंबईत राहतच नाही आणि २००९ नंतर मी तिथे कधीच दुचाकी वरुन प्रवास केलेला नाहीये.
https://www.misalpav.com/comment/1137315#comment-1137315
इथे माझा मूळ प्रतिसाद आहेच की - ही माहिती मला मुंबईतील एका रेनेगेडे मालकानेच दिली. या कारणानेच तो ती फक्त शिर्डीला जायला वापरतो असे त्याने सांगितले.
आणि याचमुळे तो त्याची रेनेगेडे विकतोय. तुमच्या सततच्या प्रतिसादांना उत्तर म्हणून मी शेवटी त्या रेनेगेडे मालकाचा फोन नं. पुन्हा शोधून त्याला संपर्क केला असता त्याने ही दोन ठिकाणे सांगितली आहेत जिथून त्यास कारने १५ ते २० मिनीटांत जाता येते पण रेनेगेडे प्रवासाकरिता दीड तासांहूनही अधिक काळ घेते.
अनिकेत बिल्डिंग नंबर 15, G.M. Link Road, Jay Ambe Nagar, Indian Oil Nagar, Chembur West, Mumbai, Maharashtra 400089
हे त्याचे निवासस्थान
आणि
Bhaucha Dhakka, Princess Dock, Mumbai Port Trust, Mazgaon, Mumbai, Maharashtra
इथे त्याचे कार्यालय
आणि हा त्याचा कारने जाण्याचा रस्ता
https://goo.gl/maps/5RxgMGQhztqex67AA
मी पुणेकर असल्याने आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात मुंबईत पन्नास पेक्षाही कमी वेळाच आणि त्यातही दुचाकी घेऊन फक्त एकदाच आल्याने या माहितीची सत्यासत्यता तपासू शकत नाही. तुम्ही मुंबईकर असल्याने हे सत्य की असत्य हे निश्चित सांगू शकाल.
मुख्य म्हणजे ही माहिती मला स्वतःला तपासायची गरजच कधीही नव्हती आणि नाही. मी दुचाकी घेतली तरी मुंबईत कशाला चालवेन? डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमधले काही दिवस सोडले तर इतर वेळी मुंबईला येण्याचेही मी टाळतो. या कालावधीत देखील प्रचंड घाम निघत असल्याने एसी कारलाच प्राधान्य असते तेव्हा मुंबईत दुचाकी चालवायला किती वेळ लागतो हा मुद्दा माझ्याकरिता फारच गौण. केवळ अशा प्रकारे वेळ जास्त लागल्याने अतिवेगवान दुचाकी मालक त्यांची दुचाकी स्वस्तात विकत असतील तर पुण्या ऐवजी मुंबईतून जुनी दुचाकी खरेदी करायचा (व त्यायोगे काही हजारांची अतिरिक्त बचत करण्याचा) माझा विचार आहे असे मी मूळ प्रतिसादात लिहिले होते.
https://www.misalpav.com/comment/1136624#comment-1136624
त्यानंतरच्या तुमच्या https://www.misalpav.com/comment/1137118#comment-1137118 या प्रतिसादाचा मी कुठेही प्रतिवाद केलेला नव्हता.
15 Apr 2022 - 7:34 pm | सुबोध खरे
काय राव उगाच दुसऱ्याच्या नावाने बिलं फाडताय?
कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवताय?
का उगाच आपली थाप समर्थन करण्यासाठी पूर्व मुक्त मार्गावर मुद्दाम अशी स्थळे शोधून काढलीत?
सतरा किमी ला दीड तासांहून अधिक वेळ?
१० किमी ताशी? रेनेगेड ने ? अहो बैलगाडी बरी.
मुद्दाम मी मोटारसायकल ( हिला पूर्व मुक्त मार्गावर परवानगी नाही) वर हे संध्याकाळी साडे सहा ला अंतर कापण्यासाठी गुगल मॅपवर पाहिले ते ३७ मिनिटे दाखवत आहे.
आणि कारला पूर्व मुक्त मार्गाने २१ मिनिटे दाखवत आहे.
३७ मिनिटे कुठे आणि दीड तासापेक्षा जास्त वेळ कुठे?
थापा मारायला कुठेतरी काहीतरी मर्यादा असावी कि नाही
15 Apr 2022 - 7:45 pm | चेतन सुभाष गुगळे
मला काय करायचे आहे थाप मारुन? ज्याला वाहन विकायचं आहे त्याने हे कारण सांगितलं. मला तर त्या रस्त्यावर दुचाकी चालवायला परवानगी नाही हे देखील त्याच्याशी बोलल्यावरच कळलं होतं.
15 Apr 2022 - 8:15 pm | चेतन सुभाष गुगळे
16 Apr 2022 - 9:08 am | वामन देशमुख
चित्रे दिसत नाहीयेत.
16 Apr 2022 - 11:49 am | चेतन सुभाष गुगळे
https://photos.app.goo.gl/TUHe6STQLbcdmErd7
https://photos.app.goo.gl/y61kY7wr5s3c1jzVA
यावर क्लिक केल्यावर दिसतात का नक्की कळवा.
16 Apr 2022 - 12:35 pm | वामन देशमुख
दिसले
15 Apr 2022 - 8:22 pm | चेतन सुभाष गुगळे
आपल्या जागेवर बसून इतरांचं कथन असत्य ठरवणं सोपं असतं, पण केवळ बाईक विकण्याकरिता इतकं खोटं कोणी बोलेल असं मला वाटत नाही. म्हणून मी जरा त्याच्या कार्यालयीन वेळेच्या हिशेबाने गुगल मॅप सेट केला आणि त्याच्या बोलण्यात निदान मला तरी तथ्य आढळलं. दुचाकी प्रवासाचा जो अंदाजे वेळ दाखविला आहे त्यातही ही दुचाकी रेनेगेडे वजनदार, तसेच जास्त व्हीलबेसची असल्याने हाताळणीस अवघड आहे ही बाब जमेस धरून गुगल मॅप्सची अप्पर टाईम लिमिट पाहिली तर त्याच्यावर विश्वास ठेवायला मला तरी काही अडचण वाटत नाही.
रेनेगेडेचे उत्पादन झाले आहे आणि त्याचे सुटे भाग मिळतील की नाही वगैरे मुद्दे हा वेगळा विषय आहे पण जी बाईक पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाही तीच बाईक मुंबईत पस्तीस ते पंचेचाळीस हजारादरम्यान कशी काय मिळू शकते या प्रश्नाचे हे उत्तर म्हणून त्याने दिलेले कारण अगदीच चूकीचे वाटत नाहीये.
16 Apr 2022 - 10:25 am | सुबोध खरे
कशाला उगाच मानभावीपणा करताय?
दुसऱ्याच्या नावाने बिलं फाडण्यापेक्षा आपली चूक झाली हे स्वच्छ मनाने मान्य केलं असतं तर एवढी मान खाली घालण्याची स्थिती आलीच नसती.
गुगल मॅप कार्यालयीन वेळ इ सगळं जरी म्हणालात तरी मुंबईत मोटारसायकलचा सरासरी वेग १० येत नाही. १७ किमी ला दीड तास लागेल हे केवळ ट्राफिक जॅमच झाला तरच शक्य आहे.
आणि वर दिलेल्या रस्त्यावर तसे फारच क्वचित होते कारण जो रस्ता चेंबूर पासून भाऊंचा धक्का येथे जातो त्यावर अनेक लांबच्या लांब फ्लाय ओव्हर आहेत.
त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या किंवा मुंबई पाहिलेल्या माणसाला आपला म्हणणं साफ खोटं आहे हे लगेच लक्षात येतं.
एक म्हण आहे - एक खोटं लपवायला सात वेळा खोटं बोलावं लागतं.
आणि (जुनी / सेकंड हॅण्ड)बाईक ची किंमत ३५ ते ४५ हजार काही मुंबईच्या वाहतुकीमुळे नाही.
तर रेनेगेड हि कंपनी बंद पडल्यामुळे आणि त्याचे सुटे भाग उपलब्ध नसल्यामुळे आहे
उगाच भंपकपणा कशाला करताय?
डॉमिनार किंवा बुलेट तुम्हाला या किमतीला मिळेल का?
जी बाईक पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाही तीच बाईक मुंबईत पस्तीस ते पंचेचाळीस हजारादरम्यान कशी काय मिळू शकते
कशाला फुक्या मारताय?
मुंबईतील सगळे रेनेगेड वाले पुण्यात येऊन नाहि का आपली बाईक विकणार?
उगाच काहींच्या काही? लोक काय इतके मूर्ख आहेत का?
16 Apr 2022 - 11:24 am | चेतन सुभाष गुगळे
मिलिटरी ग्रीन कलरची एक रेनेगेडे ओएलएक्स वर विक्रीला ठेवलेली आहे. मालक कोणी समीर खान म्हणून आहेत. त्यांच्याशी संपर्क करुन खात्री करुन घ्या.
मला खोटं ठरवायचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे का?
हा अधिकार जर आपणापाशी असेल तर नक्कीच आपण सर्टिफाईड ट्रोल असल्याबद्दल माझी आता अगदी खात्री पटली आहे.
16 Apr 2022 - 12:00 pm | सुबोध खरे
मिलिटरी ग्रीन कलरची एक रेनेगेडे ओएलएक्स वर विक्रीला ठेवलेली आहे.
या वाक्याचा खालील वाक्याशी काही संबंध आहे का?
जी बाईक पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाही तीच बाईक मुंबईत पस्तीस ते पंचेचाळीस हजारादरम्यान कशी काय मिळू शकते.
त्या समीर खानला सांगा कि तुमची बाईक मी पुण्यात लाखाच्या वर विकून देतो मला २० हजार रुपये द्या..
इथे फुकट टाईमपास करण्या पेक्षा चार पैसेही मिळतील तुम्हाला
कशाला इतक्या फुक्या मारत बसलाय?
आणि एवढी लाज काढूनही शेवटचा प्रतिसाद माझाच असला पाहिजे हा तुमचा अट्टाहासच असला तर होऊनच जाऊ द्या
16 Apr 2022 - 12:34 pm | चेतन सुभाष गुगळे
याचा खालचा वाक्याशी संबंध नव्हताच इतकंही तुम्हाला कळलं नसेल यावर माझा विश्वास नाही. त्याचा खालच्या नसून वरच्या वाक्याशी संबंध होता आणि आहे.
इथे तुम्ही मला ज्या माहितीकरिता खोटं ठरवलं होतं ती माहिती देणार्याचा संदर्भ दिला होता.
तुम्हाला फक्त वाद घालायचा आहे असे दिसत आहे...................
16 Apr 2022 - 12:38 pm | सुबोध खरे
मला खोटं ठरवायचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे का?
मी तर आपल्याला पाहिलेही नाही.
आपणच भंपक अचाट आणि अफाट विधाने करताय आणि स्वतःला तोंडघशी पाडून घेताय तर मी कशाला अधिक काही करू?
५० टक्क्याच्यावर गाड्या १५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्याअसतात.
माझ्या घराशेजारी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. कुंपण भिंतीबाहेर ज्या शेकडो बाईक्स उभ्या आहेत त्या पाहिल्या तर मला तरी जास्त सीसीच्या वाहनांची (एकच एक मॉडेल नव्हे) संख्या निम्म्याहून अधिक दिसते
मुंबईत मोटार सायकलचा वेग गर्दीच्या वेळेस ताशी १० पेक्षा कमी असतो.
मुंबईत ३५-४० हजाराला विकली जाणारी गाडी पुण्यात लाखाच्या वर विकली जाते.
आणि तुम्ही दिलेल्या फोटो मध्ये कार ला २६ मिनिटे दाखवलंय (typically २२ ते ४० minutes) आणि त्याच्याच बाजूला मोटार सायकलला ४५ मिनिटे दाखवलंय आणि (typically ३५ minutes ते १ तास १० मिनिटे)
म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक असतं तेंव्हा कारला ४० मिनिटे लागतात तेंव्हा मोटारसायकलला ७० मिनिटे
दीड तासाच्या वर नव्हे
आणि हे आपणच दिलेले फोटो आहेत.
16 Apr 2022 - 12:57 pm | चेतन सुभाष गुगळे
गुगल मॅपने कुठल्या मोटरसायकलला किती वेळ असे कुठे लिहिले आहे? रेनेगेडेसारखी लांबलचक व क्रूझर बाईक शहरात फिरवायला समीर खानला किती वेळ लागतो हे त्याने सांगितलं आणि म्हणून बाईक विकतोय असं म्हंटलं तर मी त्याला थापेबाज म्हणायचं का? तो म्हणेल तुला विकत घ्यायची तर घे नाहीतर सोडून दे.
16 Apr 2022 - 1:02 pm | सुबोध खरे
हा हा हा हा हा हा
मीच हुशार आहे
मी हुशारच आहे
मी हुशार आहेच
16 Apr 2022 - 1:09 pm | चेतन सुभाष गुगळे
आणि तुम्ही ट्रोल आहात.
16 Apr 2022 - 1:13 pm | सुबोध खरे
ळॉळ ळॉळ
15 Apr 2022 - 1:02 pm | चेतन सुभाष गुगळे
थापा मारुन मला व्यक्तिगत काय फायदा आहे?
आकडेवारी शोधायला जायची देखील मला काय गरज आहे? मी काही या क्षेत्रात डेटा अॅनालिसीस वगैरे करीत नाही. पिंपरी चिंचवड नवनगर परिसरात पेठ क्रमांक २५ मध्ये राहणारा एक सामान्य नागरिक म्हणून मला आजुबाजूला जी वाहने दिसतात त्यावरुन मी हे विधान केले आहे. माझ्या जवळच्या परिसरात वीसहून अधिक महाविद्यालये आहेत. पंचविशीच्या तरुणांची पसंत असलेली वाहनेच इथे जास्त प्रमाणात दिसतात. मी जेव्हा पदपथावरुन पायी फिरत दीड दोन किमी दूर असलेल्या पिंपरीचिंचवड अभियांत्रिकी किंवा डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयापाशी जातो तेव्हा रस्त्याच्या कडेला पार्किंगमध्ये जी वाहने दिसतात त्याविषयी इथे लिहिले आहे.
अहमदनगर वगैरे ठिकाणी मला टीवीएस मॅक्स ची वाहने जास्त दिसतात. इतर काही ग्रामीण भागात तर अजुनदेखील राजदूत मोटरसायकल्स दिसतात. २०१२ ते २०१४ या कालावधीत मी धुळे येथी वास्तव्य केले तेव्हा मला टीवीएस एक्सेल मोपेड जास्त प्रमाणात दिसायच्या. ज्या माझ्या सध्याच्या निवासी भागात फारच क्वचित दिसतात.
मार्च मध्ये मी ४३१ किमी प्रवास केला तेव्हा संपूर्ण प्रवासात माझ्याखेरीज इतर कोणाकडेही सीडी डॉन ही बाईक दिसली नाही. कधीकाळी पब्लिक का नया ट्रान्स्पोर्ट अशी टॅगलाईन लावून विकली जाणारी ही बाईक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसत असे.
तुम्हाला दिसणारं चित्र वेगळं असू शकेल ते तुम्ही इथे मांडलं तर त्याला मी थापेबाजी नाही म्हणणार.
15 Apr 2022 - 8:11 pm | सुबोध खरे
थापा मारुन मला व्यक्तिगत काय फायदा आहे?
मीच हुशार दाखवता येते ना?
कुठल्याही पार्किंगच्या जागेत पहिले तर ५० % मोटारसायकल १५० सीसी च्या वर दिसणार नाहीत भारताच्या कुठल्याही शहरात.
मला एक तरी शहर दाखवा जेथे (यात पिंपरी चिंचवड सुद्धा येते) सगळी तरूण पोरं १५० सी सी च्या वर गाड्या चालवत आहेत?
इतक्या बुलेटसुद्धा नाहीत तर बाकीच्या गाड्या सोडूनच द्या.
कशाला उगाच पुड्या सोडताय?
आणि परत मी काहीच दावा केला नाही असे पदर झाडणे.
नुसते गोल गोल भोंगळ प्रतिसाद आणि त्यातील थापेबाजी उघड केली म्हणून मला ट्रॉल म्हणताय?
बढिया है !
15 Apr 2022 - 8:40 pm | चेतन सुभाष गुगळे
तुम्हाला संपूर्ण भारतांच समग्र ज्ञान असल्यावर आता मी तरी यापुढे काय लिहिणार? पिंपरीचिंचवड शहरात मी चाळीसहून अधिक वर्षे वास्तव्य केले आणि ज्या नवनगर भागाचा उल्लेख केला आहे तिथली महाविद्यालये माझ्या निवासाची दोन किमी परिसरात आहेत. जिथली वाहतूक आणि वाहनतळे मी नेहमी फिरताना माझ्या डोळ्यांनी पाहतो त्या बाबतदेखील माझ्या पेक्षा जास्त अधिकारवाणीने आणि ठामपणे तुम्हीच लिहिणार असाल तर आता माझी खात्री पटली आहे की तुम्ही व्यक्त केलेल्या मतांव्यतिरिक्त इतर सर्व मते ही असत्यच असणार.
यापुढे कुठल्याही विधानाची सत्यासत्यता तपासण्याकरिता मी आधी ते तुमच्यासमोरच मांडेन आणि तुम्ही अॅप्रूव्ह केलं तरंच ते सत्य आणि वास्तवाला धरुन असे समजेन.
16 Apr 2022 - 10:14 am | सुबोध खरे
कशाला उगाच मानभावीपणा करताय?
16 Apr 2022 - 11:36 am | चेतन सुभाष गुगळे
मुंबईच्या रहदारीचंही ज्ञान तुमच्याकडेच आणि पिंपरी चिंचवडच्या वाहनसंख्येचंही ज्ञान तुमच्याकडेच. मुंबईत रेनेगेडेला प्रवासाकरिता जास्त वेळ लागतोय हेही तुम्हाला मान्य नाही आणि पिंपरी चिंचवडचे तरूण बाईकर्स शहरात देखील सहजपणे ८० / ९० चा वेग पकडू शकतात हेदेखील तुम्हाला पटत नाही.
मी जे स्वतःचे अनुभव मांडले तेही तुम्हाला खोटे वाटले. जे मी इतरांना करताना स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंय असं लिहिलंय त्यावरही तुम्ही अविश्वास दाखवलात. ओएलएक्स वरच्या सेलरने जे मला सांंगितलं ते विधानेही तुम्ही पुन्हा माझ्याच स्वरचित थापा आहेत असं ठामपणे सांगितलंत.
मग आता सर्वच मते तुमचीच मान्य करायची म्हंटली तरी तुम्ही पुन्हा याला मानभावीपणा म्हणणार. मग मी काय करायचं? मी कुठला प्रतिसाद इथे मांडायचा हे देखील तुम्हीच मला सूचवा. तोच जसाच्या तसा कॉपी पेस्ट करुन माझ्या सदस्यनामाने पोस्ट करतो.
मला माझा ऑल टाईम फेवरिट सिनेमा विजय पुन्हा एकदा आठवला. त्यात अनुपम खेरने रंगवलेलं एक पात्र आहे. त्याला कोणाचंच वागणं पटत नाही कोणावरच त्याचा विश्वास बसत नाही. सारं काही आपल्या मर्जीप्रमाणेच व्हावं असं त्याला वाटतं. एक दिवशी त्याचा जुना व्यावसायिक संंबंधित सईद जाफरी बरोबर देखील त्याचे जोरदार खटके उडतात तेव्हा सईद जाफरी त्याला सुनावतो - खुद को खुदा समझने की कोशिश मत कर.
16 Apr 2022 - 11:55 am | सुबोध खरे
पिंपरी चिंचवडचे तरूण बाईकर्स शहरात देखील सहजपणे ८० / ९० चा वेग पकडू शकतात
आणि
मूळ वाक्य आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही.
याच्यात काही फरक आहे का?
कशाला या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय?
16 Apr 2022 - 12:44 pm | चेतन सुभाष गुगळे
मूळ वाक्य एक तर माझं नाही आणि त्याबद्दल मी जो अगदी सुरुवातीलाच प्रतिसाद दिला आहे.
https://www.misalpav.com/comment/1137663#comment-1137663
त्यात मी स्पष्टपणे लिहिलं आहे. -
आणि शब्दशः अर्थच घ्यायचा तर केवळ इतरांच्याच विधानाचा का? तुमच्याही विधानाचा घेऊयात की.
https://www.misalpav.com/comment/1137120#comment-1137120 या प्रतिसादात तुम्ही लिहिलंय
आता तुम्ही फुंकर मारुन एखाद्या व्यक्तिला उडवून दाखवा आणि मग त्या व्यक्तिलाच पुन्हा बुलेटही चालवायला लावा
हे जमत नसेल तर माझ्यावर असत्य विधाने मांडल्याचा आरोप करताना तुम्हालाच लाज वाटायला हवी.
12 Apr 2022 - 11:29 am | वामन देशमुख
हेच म्हणतो.
चेसुगु, बाइक्स वर एक चांगला माहितीपूर्ण धागा येऊ द्याच.
बाइकांवर माझेही मनःपूर्वक प्रेम आहे, बाइकिंगमधून मस्त कळसबिंदु प्राप्त होतो! त्यातले अजून बारकावे समजून घ्यायला मदत होईल.
---
भिन्न मताच्या आणि अनुभवाच्या आदरासहित प्रस्तुत चर्चेबद्धल माझे मत आणि अनुभव -
वेगवेगळ्या बाइक्स चालण्याची पद्धत आणि हेतू वेगवेगळे असतात.
योग्य बाइकवर सुरक्षितपणे वेगाची शंभरी गाठणे व ती पुरेश्या दीर्घकाळ टिकवून ठेवणे अवघड नाही.
12 Apr 2022 - 12:34 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद. पण मी ऑ.१९९७ - फे.२०११ या कालावधीत बुलेट ३५० चालविली मग दहा वर्षांहून अधिक काळ बाईकला अजिबात हात लावला नाहीये आणि त्यानंतर आता थेट दिवाळी २०२१ पासून होण्डा सीबी ३५० हायनेस, येझदी रोडस्टर, रेनेगेडे, डॉमिनॉर ४०० या बाईक्स फक्त टेस्ट राईड पुरत्याच चालविल्यात. डिस्क ब्रेकची सवय नाही त्यामुळे त्याच्यावर विसंबून राह्यचं धाडस होत नाही. त्यामुळेच अगदीच चिटकून बाईक न चालविता जरा जास्तच अंतर राखल्याने येझदीच्या टेस्ट राईडला (चिंचवड - भक्ती शक्ती - चिंचवड या १० किमी च्या टप्प्यात) ९२ पेक्षा जास्त वेग घेता आला नाही. इतर राईडर्सनी याच टप्प्यात ११०+ वेग जमविला होता.
इतर अनेक बाईक्सचा फक्त वेबसाईट व यूट्यूब व्हीडीओज् पाहून अभ्यास चालू आहे.
गेल्या महिन्यात तर्कवादींनी रिटायर्ड केलेली त्यांची पंधरा वर्षे जुनी सीडी डॉन एकाच दिवसात चारशे एकतीस किमी चालविली आणि असं वाटलं की जरा अधिक शक्तीची बाईक असती तर एकूण प्रवासाचा वेळ तीन चार तासांनी कमी झाला असता.
तेव्हा एखादी जास्त शक्तीची बाईक घ्यावी असा विचार चालू आहे पण इतरांप्रमाणे मला चालवायला जमेल का? ही शंका असल्याने अंतिम निर्णय होत नाहीये. नव्या बाईकला अडीच लाख खर्च करणे थोडे अवघड वाटतेय. त्यापेक्षा ६० / ७० हजार खर्चून गाजराची पुंगी वाजवावी का असा एक विचार आहे.
12 Apr 2022 - 12:38 pm | प्रचेतस
आता १५० सीसीच्या वरील सर्वच बाईक्स डिस्क ब्रेक विथ abs येतात त्यामुळे बिनधास्त घ्या, abs मुळे बाईक न घसरता जागच्या जागी उभी राहते.
12 Apr 2022 - 12:48 pm | चेतन सुभाष गुगळे
ते ठाऊक आहे पण मला सवय* नाही ना? इतर चालक जसे पुढच्या वाहनाच्या अगदी जवळ गेल्यावर ब्रेक मारतात तसे करायला मला प्रचंड भीती वाटते. मी आपला पन्नास फूट अलीकडीच ब्रेक मारतो (खरे तर तेही क्वचितच, बहुतेकदा थ्रोटलच कमी करतो त्यामुळे ब्रेकिंग फारसे करतच नाही) आणि पिक स्पीड लवकर गाठू शकत नाही. त्यामुळे जास्त ताकदीची बाईक घेतल्यावरही तीची संपूर्ण ताकद वापरली जाईल का? हा प्रश्न पडला आहे.
*मधल्या काळात मी जवळपास १ लाख किमी अंतर प्रवास आणि त्यातही एक वर्षे रोज निगडी-शिरूर--निगडी असा रोजचा १६० किमी प्रवास एल एम एल सिलेक्ट टू या स्कुटरवर (१९९८ मॉडेल) केला आहे. या वाहनाचे ब्रेक अतिशय साधे आहेत आणि त्यांच्या भरोशावर किसिंग डिस्टन्स मेंटेन करुन वाहन चालविणे शक्य नाही. त्यामुळेच मला आता अचानक एबीएस डिस्क ब्रेक याची सवय स्वतःला लावताच येत नाहीये.
13 Apr 2022 - 12:38 pm | चौथा कोनाडा
सहमत. ज्या लोकांना अडथळ्याच्या आधी काही मिटर ब्रेक वापरण्याची सवय असते त्यांना डिस्क ब्रेकचे कचाकच दाबणे त्यामुळे पुढे तोल जाणे हे अडचणीचेच.
मी ही त्यातलाच एक. डिस्क ब्रेकची दुचाकी अधूनमधून चालवत असल्याने त्या ब्रेकिंगची सवय व्ह्यायला वेळ लागतो !
13 Apr 2022 - 7:11 pm | सुबोध खरे
हात कापला तर ती चूक धारदार सुरीची नसून वापरणार्यांची आहे.
डिस्क ब्रेक हे ड्रम ब्रेक पेक्षा जास्त परिणामकारक असतात म्हणूनच एकाच गाडीचे डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक व्हर्जन पण असते आणि अर्थात डिस्क ब्रेक साठी जास्त पैसे मोजावे लागतात.
ए बी एस हि त्याच्या पुढची पायरी आहे ( antilock braking system) मुळे जीव वाचतात हि वस्तुस्थिती आहे.
https://www.cartoq.com/abs-saves-lives-5-times-motorcycle-abs-saved-thei...
डिस्क ब्रेक कचाकच लावणारे चूक आहेत म्हणून ते खापर डिस्क ब्रेकवर फोडणे हीच मूलभूत चूक आहे.
14 Apr 2022 - 11:07 pm | चेतन सुभाष गुगळे
हे खापर कोणी फोडलंय?
15 Apr 2022 - 10:42 am | सुबोध खरे
याचं कारण असं की मी डिस्क ब्रेकच्या भरोशावर फारसा विसंबून राहत नाही
डिस्क ब्रेकची सवय नाही त्यामुळे त्याच्यावर विसंबून राह्यचं धाडस होत नाही.
इतर चालक जसे पुढच्या वाहनाच्या अगदी जवळ गेल्यावर ब्रेक मारतात तसे करायला मला प्रचंड भीती वाटते. मी आपला पन्नास फूट अलीकडीच ब्रेक मारतो
पुण्यात पन्नास फूट अगोदर ब्रेक लावला तर तुमच्या आणि पुढच्याच्या मध्ये ७-८ वाहने तरी घुसतील आणि तुम्हाला दोन्ही पाय बाजूला ठेवूनच स्कुटर चालवायला लागेल
एल एम एल सिलेक्ट टू या स्कुटरवर (१९९८ मॉडेल) केला आहे. या वाहनाचे ब्रेक अतिशय साधे आहेत आणि त्यांच्या भरोशावर किसिंग डिस्टन्स मेंटेन करुन वाहन चालविणे शक्य नाही. त्यामुळेच मला आता अचानक एबीएस डिस्क ब्रेक याची सवय स्वतःला लावताच येत नाहीये.
हि सर्व आपलीच विधाने आहेत ना?
मग उगाच कचाकच हा शब्द नाही म्हणून छिद्रान्वेषी पण कशाला करताय?
आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला झेपत तर नाही परंतु मीच हुशार
15 Apr 2022 - 12:28 pm | चेतन सुभाष गुगळे
स्वतःला सवय नाही हे मी मान्य केलं तर मी आधुनिक तंत्रज्ञानावर खापर फोडल्याचं कसं सिद्ध होतं?
मला सवय नाही कारण असे वाहन अजून मी खरेदीच केलेले नाही. इतरांचं वाहन ट्रायल / टेस्ट राईड करिता चालवताना मला जपूनच चालवावं लागणार.
स्वतः खरेदी करुन चालवेल तेव्हा कदाचित वेगळी परिस्थिती असू शकेल.
15 Apr 2022 - 7:22 am | कंजूस
प्रवचनं देत moto ride
(अवांतर )
16 Apr 2022 - 11:41 am | sunil kachure
मुंबई पुण्यात वाहन चला ग्रीन सिग्नल होण्याची पण वाट बघत नाहीत.अगदी उतावीळ झालेले असतात.
त्या मुळे सर्व गाड्यांचा 0 ते 30 पर्यंत जो pickup असतो.तो खूप कमी करून 1km per hour ह्या हिशोबात च ठेवावा.
खूप बेशिस्त पण वाढला आहे.
16 Apr 2022 - 7:44 pm | धर्मराजमुटके
सुबोध खरे आणि चेतन खरे साहेबांच्या जुगलबंदीत मुळ विषय काय हेच विसरायला झाले :) मग पुन्हा लेखाचे शीर्षक वाचले.
16 Apr 2022 - 7:50 pm | चेतन सुभाष गुगळे
नाही हो खरे ते एकटेच (त्यांच्यामते जगात एकटेच) मी मात्र चेतन सुभाष गुगळे. चेतन खरे नव्हे.
4 Jan 2023 - 12:17 pm | चेतन सुभाष गुगळे
क्लासिक लिजेंड्स ची येझदी रोडस्टर ही ३३४ सीसीची बाईक घेतली आहे. बाईक सोबत २४ महिने / २४००० किमी अशी वॉरंटी आहे. त्याचप्रमाणे मी एक्स्टेंडेट वॉरंटी घेतली असल्याने आता एकूण वॉरंटी ही ४८ महिने / ५०००० किमी आहे.
सात महिन्यांमध्ये बाईक चार हजार किमी चालवून झाली आहे. कालावधी आणि अंतर फारसे नसल्याने उत्पादक कंपनी, बाईक आणि वितरक व त्यांची सेवा दुरुस्ती इत्यादींबद्दल इतक्यातच कोणताही अभिप्राय देणे मला उचित वाटत नाही.
वाठार तर्फ वडगाव (कोल्हापूर) ते रावेत (पिंचिं - पुणे) हा प्रवास तीन तासांत सलग पूर्ण केला. सरासरी वेग ताशी ऐंशी किमी इतका राहिला. यात धोकादायक आणि खोटे असे काहीच नाही हे यावेळी कॅप्चर केलेल्या व्हिडीओ क्लिप्समधून सहज सिद्ध होईल.
https://www.youtube.com/@velocityverified309/videos
4 Jan 2023 - 12:49 pm | चौथा कोनाडा
ग्रेट! +१
आपली आणि आपल्या बाईकची कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे ! या प्रवासावर वेगळा धागा काढावा ही विनंती.
4 Jan 2023 - 2:20 pm | चेतन सुभाष गुगळे
पण स्वतंत्र धागा काढावा इतका काही हा प्रवास उल्लेखनीय नव्हता. तेव्हा पुन्हा कधीतरी...
6 Jan 2023 - 12:52 pm | चौथा कोनाडा
ठीक आहे.
तुमचा "कोल्हापूर-पुणे, ३ तासात" हा येझदी रोडस्टर बाईक वरून हा व्हिडिओ यू ट्यूब वर नुकताच पाहिला,.... भारी आहे !
7 Jan 2023 - 5:41 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
4 Jan 2023 - 7:23 pm | सुबोध खरे
डिस्क ब्रेक आणि ए बी एस वाली गाडी चालवून आता कसं वाटतंय ते सांगा.
एल एम एल आणि येझदी रोडस्टर मधला फरक किती जास्त आहे हे आता तुम्हाला जाणवले असावे.
अचानक दगड / खड्डा/ माणूस आलेला असता पटकन ब्रेक मारल्यावर गाडी घसरत नाही कि तशी भीती वाटत नाही हे आता आपल्याला जाणवले असावे.
येझदी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायक गाडी आहे आणि रस्त्यावर स्थिर राहते.
अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
4 Jan 2023 - 10:45 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
हा फरक अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. पण चटकन या तंत्रज्ञानावर भरोसा ठेवत केवळ चाचणीच्या पाच दहा किमी अंतरात वाहनाचा वेग जास्त ठेवायची हिंमत होत नव्हती. आता सराव झाल्यावर ऐंशी - नव्वद चा वेग सहज पकडता येतो आणि त्यावर सलग वाहन चालविता देखील येते आहे.
अर्थात एक महत्त्वाचा जाणवलेला फरक आणि ज्यांना ठाऊक नसेल त्यांच्या करिता सावधगिरी म्हणून हा माझा अनुभव -
पार्किंगमध्ये गाडी लावताना मी इंजिन कधीच सुरू ठेवत नाही. ते जे काही दहा पंधरा मीटर अंतर वाहन मागे पुढे / डावी - उजवीकडे करायचे असेल ते वाहनावर न बसता वाहनाच्या डाव्या बाजूने ते धरत हाताने ढकलूनच करतो. अशा वेळी अनेकदा पुढचा ब्रेक मारावा लागतो कारण तो उजव्या हातात असतो. मागचा ब्रेक पायाने वापरायचा असल्याने तो वापरता येत नाही. हे जेव्हा मी माझ्या जुन्या बुलेट किंवा एलएमएल स्कूटर बाबत करायचो तेव्हा काहीच अडचण यायची नाही. येझदी रोडस्टर सोबत हे करताना चुकून जरी पुढचा ब्रेक जास्त जोरात दाबला गेला तर गाडी घसरुन पडायची शक्यता असते कारण डिस्क ब्रेक हा चटकन लागतो (शिवाय पार्किंगमध्ये सिरॅमिकची फरशी आहे) आणि वाहन हाताने ढकलताना आपण लावलेल्या बलामुळे वाहनाचा जो काही पाच दहाचा वेग असतो तो त्वरीत शून्यावर येतो कारण या वेगाला डिस्क ब्रेक जरी काम करीत असले तरी एबीएस बंद असते त्यामुळे वाहन कमी वेगात असताना पुढचा ब्रेक लिवर दाबू नये तर त्याला दोन बोटांनी केवळ अलगद स्पर्श करावा.
29 Jan 2024 - 11:01 pm | चेतन सुभाष गुगळे
https://youtu.be/XBVEbS1pnxw
Counter Steering Technique Details in Marathi काउंटर स्टीअरिंग तंत्रज्ञान मराठीत सविस्तर
Counter Steering Technique Details in Marathi
Hope understanding this technique will help in improving driving skills and minimising the chances of accidents.
काउंटर स्टीअरिंग तंत्र मराठीत सविस्तर
हे तंत्र समजून घेणे वाहन चालविण्यातील कौशल्य सुधारण्यास आणि त्यायोगे अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदतीच ठरेल अशी आशा आहे