Skip to main content

कोणती बाईक घ्यावी?

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 25/10/2016 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रो! मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे, होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;) आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे. तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी. माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;) माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;) मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको. बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती, बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा! बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही, कृपया मार्गदर्शन करा... (विंग्रजी शब्दांबद्दल माफी)

वाचने 87317
प्रतिक्रिया 270

प्रतिक्रिया

In reply to by जेम्स वांड

नाही याचे इंजिन १९९ सी सी ऑइल कूल्ड आहे करिझ्माचे २२३ सी सी चे एअर कूल्ड होंडा चे इंजिन होते.

In reply to by जेम्स वांड

हिमालयनला सुरुवातीला बर्‍याच तक्रारी होत्या, कमी दर्जाचे पार्ट्स, ऑइल लिकेज, पेट्रोल लिकेज, पेण्ट निघणे, नंतर हळूहळू त्यांनी त्या कमी केल्या. हिमालयन मात्र खूपच उंच असल्याने रायडरची उंची किमान पावणेसहा फूट हवी. बाकी ही आमची सध्याची a

In reply to by प्रचेतस

हिमालयन बघून खूप आवडत होती पण लडाख वारीत वरीला पास वर नवीन कोर्‍या हिमालयनने हिमालयातच चांगलाच दणका दिला. क्लासिक ३५० आणि ५०० जिथे आरामात चढत होत्या तिथे हिमालयनने मान टाकली तेव्हापासून ही बाईक डोक्यात गेली आहे.

In reply to by नि३सोलपुरकर

जुनी ३५० आहे, २०१२ मॉडेल, अजून एकदाही धोका दिलेला नाही गाडीनं, जबरी चालते हायवेला. पण ताकद असेल तरच एनफिल्ड घ्यावी, तो प्रेमाचा मामला असतो, म्हणतात ना शेर पाला हैं तब खर्च तो होगा ही.

In reply to by जेम्स वांड

अगदी. गर्लफ्रेंडसारखी काळजी घ्यावी लागते तिची तरच ती तुम्हाला साथ देते :)

In reply to by प्रचेतस

रोज पुसली का एक्सपीडिशनला धोका देत नाही ती, आपल्याकडे मोडीफिकेशनला काय नियम आहेत ? सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, स्ट्रक्चर, सेफ्टी, ओरिजिनल पेंट सोडून अस्थेटिक मोड्स चालतात का काहीसं, त्याची कॉपी मिळाली कुठं तर मजा येईल.

माझ्या मित्राने बाईक विकून टाकली आणि रिक्षा घेतली. तो पुर्णवेळ रिक्षावाला नाहिये मात्र ओला / उबेर ड्रायव्हर अ‍ॅप मोबाईलमधे ठेवतो. जिकडे जायचे तिकडचे भाडे घेऊन जातो , स्वत:च्या कामासाठी फुकटात प्रवास करतो आणि आणि वरुन पैसे पण कमावतो. खिशात कॅश कमी पडली की जवळपास एखादी चक्कर मारुन २००-४०० रुपये घेऊन येतो. चारचाकीपेक्षा कमी सुरक्षित पण बाईकपेक्षा जास्त सुरक्षित. शिवाय नो पार्कींग किंवा कोठेही उभ्या असलेल्या बाईक ट्राफि़कवाले पटकन उचलून नेतात. रिक्षाकडे सहसा दुर्लक्ष करतात असा त्याचा अनुभव.

In reply to by धर्मराजमुटके

चांगल आहे .. पण रिक्षाचं परमिट काढणं त्याचं वेळचेवेळी (दरवर्षी ?) नुतनी़करण करणं ई गोष्टी आल्यात. शिवाय व्यावसायिक वाहनाचं पासिंगही दरवर्षी करावं लागतं. अर्थात तो रिक्षा घेवून थोडंफार का होईना कमवत असल्याने त्याला हे परवडणारं आहे.

In reply to by धर्मराजमुटके

पूर्वीही दुचाकी वगैरे कोणती घेऊ असे विचारल्यास ओळखीतले कुणी ना कुणी ऑटोरीक्षा घेण्यास गमतीने सुचवीत असे :-) . या प्रतिसादामुळे एक जुनी आठवण निघाली. माझ्या काकांच्या घरी बजाज ऑटो कंपनीचे १९९० किंवा १९९१ सालचे कॅलेंडर पाहिले होते. प्रत्येक पानावर त्यांच्या विविध गाड्यांचे फोटो होते. एका फोटोत काळा-पिवळा रंग नसणारा ऑटोरीक्षा पण होता. बहुधा फिक्का जांभळा रंग होता. त्यात एक कुटूंब एका निसर्ग रम्य ठिकाणी (पलिकडे जलाशय वगैरे) ऑटोरीक्षा पार्क करुन पिकनिक करत आहे असे दृश्य होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

हो, कुटंबानी रिक्षा वापरावी असा प्रचार त्यावेळी केलाच होता, पण त्यांन इमेज डाऊन होते असा समज झाल्याने लोकांनी तसा स्वीकार केला नाही. (कुटूंबासाठी घेणारे आणि वापरणारे काही हुशार लोक होतेच) rtedfg4 असेच काहीसे टाटा नॅनोबाबत नंतर नंतर होत गेले आणि टाटांना नॅनो उत्पादन बंद करावे लागले.

In reply to by चौथा कोनाडा

आर ई रिक्षा चे रिडिझाईन केले तर उत्तम असे फॅमिली मोबिलिटी सोल्युशन निघू शकेल का ?? ही गंमत बघा मेक्सिकोच्या भारतातील माजी राजदूत असणाऱ्या बाईंनी भारतात असताना आपलं वैयक्तिक वाहन म्हणून ऑटोरिक्षा ठेवली होती बघा, फिरंगी लोक काय पण मजेशीर करत असतात. मागे एक सिरीज बघितली होती, १५ अमेरिकन फिरंगी चित्रविचित्र रंगवलेल्या ऑटोरिक्षा घेऊन (बहुतेक) मुंबई ते कन्याकुमारी सुटले होते.

In reply to by जेम्स वांड

मेक्सिकोच्या माजी राजदूत बाईंची रिक्षा भारी दिसत आहे. मागे गूगलचे संस्थापक हैद्राबादला आले असता त्यांनी ऑटोरिक्षाने प्रवास केला व त्यांना हे वाहन फारच आवडलं. "इट्स सो इझी टू गेट इन अ‍ॅन्ड आउट ऑफ इट", असे काहीसे दोघांपैकी एकाचे उद्गार होते.

In reply to by जेम्स वांड

श्रीधर वेंबू पण ऑटोरिक्षा आपले नियमीत वाहन म्हणून वापरतात

In reply to by अनन्त अवधुत

रिक्षा हाइप म्हणून ठीक आहे पण रिक्षाचे सस्पेन्शन धन्यवाद असते. रोज चालवायची तर पाठीची वाट लागते १०० % रिक्षावाल्याना पाठदुखीचा त्रास आहे. तीनातील एक चाक नक्की खड्ड्यात जाते. याशिवाय ड्रायव्हरची उंची जास्त असेल तर धड रस्ता सुद्धा दिसत नाही. जुन्या रिक्षाचा हेडलाईट हा केवळ पोलिसाला दाखवण्यापुरता असतो. रस्त्यातील खड्डा दिसेपर्यंत आपण खड्ड्यात गेलेले असतो. रिक्षाचा वायपर हा सरकारी नोकरासारखा असतो त्याचे तेथे फक्त अस्तित्व असते, कामाच्या बाबतीत बोलूच नये. बाकी स्वतःची सुरक्षितता पाहिली तरी रिक्षा हे वाहन असून नसल्यासारखे असते. कधीही उलटते. कुणी ठोकली तर आपला फोटो भिंतीवर लागण्याची शक्यता भरपूर. लांब अंतर जायचे असेल तर टि र्रर्रर्रर्रर्रर्र आवाजाने कान किटतात आणि हादरे आणि धक्के यामुळे कंबर पोट पाठ सगळे हिंदकळून निघतात. रिक्षाचा उपयोग म्हणजे बस किंवा रेल्वे स्थानकापासून घरा पर्यंत जाण्यासाठी स्वस्त वाहन यापलीकडे अधिक अपेक्षा करणे हेच चुकीचे ठरेल. रिक्षावाल्यांबद्दल आणि त्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल जितके कमी बोलावे तितके चांगले.

In reply to by सुबोध खरे

हे तुमच्या आमच्यासाठी सत्यवचन आहेच डॉक्टर, पण मेक्सिकन राजदूत किंवा श्रीधर वेम्बु वगैरे हुच्च लोक कंपनीत शोरूममधून काढली तशीच ऑटो कस्टमाईज न करता वापरत असतील ह्यावर भरवसा बसत नाही, कुठं सस्पेंशनच बदल, कुठं सीट नवीन टाक, कुठं अरगोनॉमिक काहीतरी बदल कर असे करूनच ही मंडळी वापरणार असे दिसते आहे, एकंदरीत तुम्ही म्हणताय त्या डेली कम्युटींग पर्सनल व्हेईकलच्या स्वरूपात ऑटो समाजमान्य व्हायला अजून डिझाईन, प्रॉडक्शन, मार्केटिंग, स्पेयर्स अन आराम सगळ्याच बाबतीत भरपूर काम करावे लागणार इतके मात्र नक्की.

In reply to by सुबोध खरे

हो, आणि रिक्षाला दारं नसल्यामुळे, मुम्बै ठाण्यातली प्रदुषीत हवा खात प्रवास करावा लागतो, पावसाळ्यात तर दारं नसल्यामुळे खुपच त्रास होतो. लांबचा प्रवास तर रिक्षाने करुच शकत नाही. मागे तीन प्रवासी बसतात पण ते छोट्या अंतरासाठी ठिक आहे. मोठ्या अंतरामध्ये मागे तीन प्रवासी घेउन प्रवास करणे निवळ्ळ अशक्य आहे...

घटं भिंद्यात, पटं छिन्द्यात, कुर्यात रासभ रोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत म्हणजे काही जण घडे फोडून, काही जण पडदे फाडून, तर काही जण गाढवावर बसून येन केन प्रकारेण ( कोणत्याही तर्हेने) लोक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात

In reply to by सुबोध खरे

१७ हजार कोटी संपत्ती असलेल्याने स्वतः रिक्षात बसून चालवणं हे पब्लिसिटी स्टण्ट नाही तर दुसरं काय आहे?

In reply to by सुबोध खरे

आता ज्येष्ठ उद्योजक म्हणून पुढील आयुष्य कंठावे आणि ओंकारेश्वरला संध्याकाळी चकाट्या पिटाव्यात असा विचार उद्योजक करीत असतील तर रिक्षाने प्रवास करणं हा प्रसिद्धीचा उपाय म्हणता येईल. पण ज्याचा कामाचा परिसरच काळबादेवी सारखा गर्दीचा असेल त्याच्यासाठी रिक्षाने जाणे हा जास्त हुषारीचा आणि इतरांसाठी आदर्शवत असा असेल.

In reply to by सर टोबी

१७ हजार कोटी संपत्ती असलेल्या माणसाला काळबादेवी सारख्या परिसरात आपले कार्यालय असण्याची गरजच नाही. तेंव्हा तुमचा मुद्दा मुळातूनच गैरलागूआहे. मुळात या सद्गृहस्थानी अमेरिकेतून तामिळनाडूमधील टेनकासी जिल्ह्यातील मातालमपराई या खेड्यात आपले कार्यालय काढले आहे. या खेड्याची लोकसंख्या २१४५ आहे (२०११ जनगणना) तेंव्हा काळबादेवी इ. व्यर्थ आहे. दुसरे कार्यालय रेणीगुंटा येथे आहे. एखादे वेळेस त्यांनी इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या रिक्षाला पाठिंबा किंवा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा फोटो काढला असेल आणि प्रसार माध्यमांनी त्याला वेगळाच रंग दिला असेलही.

यूट्यूब प्रवासाचे विडिओ याबद्दल रेडिओ एफेम १०७ वर परेश शिंदे याची मुलाखत ऐकली. त्याचा मुंबई ते गोवा ( व्हाया कोल्हापूर) विडिओ https://youtu.be/t2ayrvvK2TA बाईक Mojo 300 , sponsored. (( बाकी ठिकठिकाणी सबस्क्राईबर किती भेटताहेत. मजा आली. )) ((गाड्यांशी माझा काही संबंध नाही पण आवडले म्हणून शेअर.))

उद्देश : ७० % कोम्युट + ३० % लाँग राईड्स पावर : १५- ३० बहप इंजिन : १२५ ते २५० महत्वाचे : गाडीचे वजन कमी असायला हवे. आणि मेन्टेनन्सची जास्त किचकिच नसावी . बजेट : १- २ लाख गाडी मध्ये बोराट ने सांगितलेला "हा स्पेशल पार्ट" असल्यास बजेट वाढवता येईल ;) शॉर्ट लिस्टेड : यमाहा MT15 , सुझुकी गिक्सर २५० पण ओपन फॉर सजेशन्स . TVS HERO BAJAJ Mahindra ह्या स्वदेशी गाड्यांच्या ओव्हरॉल बिल्ड क्वालिटी बद्दल आणि इंजिन रिफाईन्मेन्ट बद्दल शंका आहे. हिरो ची नवी क्ष्पल्स खुप टेंप्टिंग आहे. honda suzuki Yamaha , KTM वगैरे फॉरेन ब्रंन्ड ला प्रेफरन्स द्यावा असा विचार आहे. KTM २५० चा विचार होता पण बजेट वाढते अन कुठेतरी ३९० न घेतल्याची खंत लागते म्हणुन तो ओप्शन बाजुला ठेवला आहे . हस्कव्हर्ना विषयी माहीत नाही. ओपन फॉर सजेशन्स !!

In reply to by प्रसाद गोडबोले

हिरो एक्सपल्स घ्या गाडी 110 च्या पुढे थोडी व्हायब्रेट होते पण 110 पेक्षा अधिक वेगाने चालवूच नये

In reply to by कपिलमुनी

कंबरड्याला बरी असतीय काय हो मुनिवर ? क्रूझर इतकी तर कम्फर्टेबल नसणार न ती.

In reply to by कपिलमुनी

मोटर सायकल जर समोरचा पूर्ण १ किमी चा रस्ता स्पष्ट दिसत नसेल किंवा रस्त्याला कुठे फाटे वळणे असतील तर ८० पेक्षा जास्त वेगाने चालवूच नये. कारण अचानक ब्रेक मारायची वेळ आली तर मोटार सायकल नक्कीच घसरते आणि आपल्याला इजा होणारच. मग ती गंभीर आहे कि कमी हा वेगळा भाग आहे. हे आपल्या मोटार सायकलला डिस्क ब्रेक ए बी एस कितीही जाडा टायर असला तरीही. हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे. माझ्याकडे डॉमिनार आहे ज्यात पुढे मागे दोन्ही डिस्क ब्रेक, ए बी एस, दोन्ही जाडे टायर आहेत स्लिपर क्लच आहे परंतु अचानक एखादी वस्तू समोर आली तर मोटार सायकल घसरण्याची शक्यता असतेच मुळात ८० पेक्षा जास्त वेगाने भारतात चालवूच नये. रस्त्यात अचानक आलेला दगड, कुत्रा, मांजर अगदी उंदीर सारखा प्राणी सुद्धा आपल्याला धोक्यात टाकतो. कारण समोर एखादी गोष्ट आली तर नैसर्गिक उर्मीने आपला ब्रेक दाबला जातो आणि मोटार सायकल भरकटते. मोटार सायकल ६० च्या वर वेगाने चालवली तर आपण रस्त्याच्या आजूबाजूचे देखावे नीट पाहूच शकत नाही. आपण कायम सतत सावधान स्थितीत असतो आणि लक्ष केवळ रस्त्याकडे असते. केवळ एका जागेतून दुसऱ्या जागी जायचे असेल तर गोष्ट वेगळी अन्यथा ५० ५५ वेगाने सुरक्षित रित्या मोटार सायकल चालवली तर प्रवासाचा आनंद आपण जास्त लुटू शकता असे माझे अनुभवांती मत झालेले आहे.

In reply to by सुबोध खरे

+१०,००० % मोटरसायकलिंगचा आनंद हा ४०-५० किमी/ तास गतीने, आरामात चालवत आजूबाजूचे निसर्गसौंदर्य (किंवा कम्युटींग करत असाल तर ट्रॅफिक) पाहत पाहत घेण्याची चीज आहे, त्याशिवाय बायकिंगची मजा नाही, उगा बुंगबांग गाडी हाकण्यात पॉईंट नाही, मला तर झीट आली होती केटीएम पाहून, इग्निशनला चावी खोचून सुरू केलं का "रेडी टू रेस" अशी अक्षरे झळकतात डिजिटल टॅकोवर . हे पाहून मी कपाळावर हात मारून घेतला होता, एकतर केटीएमचा ग्राहकवर्ग असणारी तरुणाई, ते अडनीड्या वयातले अचाट समज, त्यात ढुंगणखाली असली पॉवरफुल गाडी आणि चावी लावली का टॅकोवर असला दिव्य मॅसेज, हे फारच अभद्र वाटते मला तरी. काहीतरी कायदा वापरून किंवा सरळ निर्देश देऊन केटीएम/बजाजला किमान चावी लावल्यावर असलं काहीतरी डिस्प्ले होणार नाही ह्याची दक्षता बाळगा हे सांगायला हवं.

In reply to by सुबोध खरे

+१०,००० % मोटरसायकलिंगचा आनंद हा ४०-५० किमी/ तास गतीने, आरामात चालवत आजूबाजूचे निसर्गसौंदर्य (किंवा कम्युटींग करत असाल तर ट्रॅफिक) पाहत पाहत घेण्याची चीज आहे, त्याशिवाय बायकिंगची मजा नाही, उगा बुंगबांग गाडी हाकण्यात पॉईंट नाही, मला तर झीट आली होती केटीएम पाहून, इग्निशनला चावी खोचून सुरू केलं का "रेडी टू रेस" अशी अक्षरे झळकतात डिजिटल टॅकोवर . हे पाहून मी कपाळावर हात मारून घेतला होता, एकतर केटीएमचा ग्राहकवर्ग असणारी तरुणाई, ते अडनीड्या वयातले अचाट समज, त्यात ढुंगणखाली असली पॉवरफुल गाडी आणि चावी लावली का टॅकोवर असला दिव्य मॅसेज, हे फारच अभद्र वाटते मला तरी. काहीतरी कायदा वापरून किंवा सरळ निर्देश देऊन केटीएम/बजाजला किमान चावी लावल्यावर असलं काहीतरी डिस्प्ले होणार नाही ह्याची दक्षता बाळगा हे सांगायला हवं.

In reply to by सुबोध खरे

सिझन बायकर वाटतात, तुमच्या मोटरसायकल मुशाफिरीवर लेख लिहा की डॉक्टर एखाद मस्त, आधी युनिकॉर्न अन आता डोमिनारवर कुठं कुठं भटकंती केली आहेत ते, किती किलोमीटर लोंगेस्ट राईड झाली आहे, सेफ राईड प्रॅक्टिसेस, प्रवासात आलेले अनुभव अन बघितलेली ठिकाणे इत्यादी तुमच्या खास शैलीत वाचायला आवडेल फार. संपादक मंडळ, प्रतिसाद द्विरुक्ती झालेली आहे तरीही कृपया एक प्रतिसाद उडवल्यास धागा परत तासात दिसेल, धन्यवाद.

In reply to by जेम्स वांड

मी सुरुवात सिल्व्हर प्लस या ५० सी सी च्या मोपेडपासून केली त्यानंतर हिरो होंडा, कायनेटिक होंडा, कायनेटिक फ्लाईट, होंडा युनिकॉर्न, होंडा ऍक्टिव्हा आणि आता डॉमिनार आहे. यात सिल्व्हर प्लेस ७५ ०००, हिरो होंडा १५०,०००, कायनेटिक होंडा ६५०००, होंडा युनिकॉर्न ७५००० आणि डॉमिनार १०,००० किमी इतक्या चालवल्या आहेत. कायनेटिक फ्लाईटआणि आता होंडा ऍक्टिव्हा बायकोची आहे त्या काही फार चालल्या नाहीत. छोटे छोटे किस्से बरेच आहेत. उदा. सिल्वर प्लस मागच्या बाजूने पर्वतीच्या टेकडीवर चढवली होती. किंवा कायनेटिक होंडा दुपारी ४ वाजता ए एफ एम सीट चालू केली ते एक क्षणही न थांबता पुणे मुंबई करून साडे सातच्या बातम्यांचे संगीत चालू असताना मुंबईत घरी पोचलो. लष्करात असल्याने जेथे जात असे तेथे आसपासच्या भागात भटकंती मात्र भरपूर केली आहे. उदा. ओखा, पाटणा, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर, लखनौ, जोधपूर, गोवा, कोची, चेन्नई येथे यथेच्छ भटकंती झाली आहे. पण सलग अशी एखादी लांब टूर केली नाही.त्यामुळे लिहिण्यासारखे किंवा लोकांना सल्ला देण्यासारखे काही नाही माझ्याकडे.

In reply to by सुबोध खरे

३,७५,००० किमी म्हणजे जवळपास पृथ्वी ते चंद्र इतकी गाडी चालवल्यावर आपण म्हणता आहात की माझ्याकडे द्यायला सल्ले नाहीत, सरजी पाय कुठं हो तुमचे ?

तुम्ही पुस्तक लिहू शकता पुस्तक मोटरसायकलिंगवर !!


In reply to by सुबोध खरे

सुरुवात सिल्व्हर प्लस या ५० सी सी च्या मोपेडपासून केली त्यानंतर हिरो होंडा, कायनेटिक होंडा, कायनेटिक फ्लाईट, होंडा युनिकॉर्न, होंडा ऍक्टिव्हा आणि आता डॉमिनार आहे.
डॉक्टरसाहेब, जर्नी तर लैच भारी केलात तुम्ही. खरे म्हणाल तर क्रमाने उलटा प्रवास आहे. लोक किशोरवयात मोपेडपासून सुरुवात करुन तरुणपनी बाईक, मग संसारी स्कूटर मग ऑटोमॅटिक निवांत असे प्रवास करतात. सिल्व्हरप्लस मुळे भारी आठवणी आल्या. सिल्व्हरप्लस ६५ सीसी ची होती. (सोबत आलेली एक्स्प्लोरर मात्र ५० सीसी. ही एन्फिल्डच्या गाड्यांची इंजिने आहेत ह्यावर विस्वास बसणार नाही आजच्या ३५०, ५०० आणि ६५० रॉली माहीत असल्यांना पण जास्त सीसीच्या दमदार बाईक असलेल्या रॉयल एन्फिल्डच्या इतिहासात फक्त २२ सीसी ची मोफा पण आहे.) सिल्व्हरप्लस ही खरेतर जर्मन झुन्डाप ची झेड डी २० बाईक (साल १९७७). तेच इंजिन आणि डिझाईन वापरुन एन्फिल्ड ने सिल्वर प्लस आणली. इंजिनवर एका बाजुला झुंडाप लिहिलेले असायचे. हि इंजिने एंड्युरो बाईकसाठी फेमस. ह्या मोपेडमध्ये त्या काळात कुठल्याही बाईक किंवा मोपेडला नसलेले अ‍ॅलॉय (डायकास्ट) व्हील्स होते.(अ‍ॅलॉय व्हील सारखेच दिसणारे शीट मेटलच व्हेल त्याच काळात आलेल्या स्पोर्टिफ ह्या प्युजो च्या एका ५० सीसी मोपेड ला होते. बॅटरी स्टार्ट असणारी ती भारतातली कदाचित पहिली दुचाकी असावी. कारण पहिली बटणस्टार्ट म्हणवणारी कायनेटिक होंडा ही पण १९८४ ची आणि स्पोर्टिफ पण १९८४ ची. ) एन्फिल्डचे दुसरे मॉडेल एक्स्प्लोरर तर आजच्या काळात असलेली बाईकची सारी वैशिश्ट्ये घेउन होती. फायबरचे वायझर, सिंपल गिअर सिस्टिम, मागील चाकावरचे काऊल. टँकवर रंगीत ग्राफिक्स, अ‍ॅल्युमिनियम कास्ट इंजिने. लाईट आणि इंडिकेटर्साठी बटणांचे सोपे पॅनेल ह्या सोयी त्याकाळातच्या बर्‍याच गाड्यात नसायच्या.

In reply to by अभ्या..

सिल्व्हरप्लस ६५ सीसी ची होती. सिल्व्हरप्लस ५० सीसी चीच होती. सिल्व्हरप्लस व एक्स्प्लोअरर चे इंजिन एकच होते पण त्यांचे ट्युनिग वेगळे होते त्यामुळे एक्स्प्लोअररचे इंजिन ३.२ बी एच पी तर सिल्व्हर प्लसचे इंजिन २.६ बी एच पी शक्ती निर्माण करत असे

In reply to by अभ्या..

अभ्या भावा, तुला फक्त एक सलाम भाई !!

विद्युत दुचाकीचे समालोचन ... थेट मालकाच्याच तोंडून ... Ather 450X - रिव्ह्यू! 'शिरगावकर, अहो लिहा की रीव्ह्यू गाडीचा! आणखी किती आग्रह करायचा लोकांनी?'*, काल संध्याकाळी बावधनमध्ये गाडी चालवत असताना एक जण त्यांच्या गाडीवरून आडवे येऊन मला थांबवून भर रस्त्यात असं म्हणाल्याने मी आता रिव्ह्यू लिहायला घेतला! (*१००% सत्य घटना!) तर, एथर घेऊन सहा महिने झाले. त्या आधी सातेक वर्षे मी होंडा ऍक्टिवा वापरत होतो, त्याआधी प्लेझर आणि त्या आधीच्या इतिहासकाळात बजाजच्या स्कूटर्स. एकुणात, पुण्यात दुचाकी चालवण्याची माझी तीसेक वर्षांची प्रदीर्घ आणि दैदिप्यमान कारकीर्द आहे! अन मी स्कूटरवाला माणूस आहे, बाईक्सवाला नाही. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे माझा रिव्ह्यू हा अस्सल पुणेकर दुचाकीस्वाराचा रिव्ह्यू आहे कोण्या सोम्यागोम्याचा नाही हे समजावं म्हणून! तर नमनाला शंभर एमेल ऑईल सांडल्यावर आता रिव्ह्यू! बॉडी / डिझाईन गाडीचं डिझाईन आकार ही पटकन नजरेत भरणारी गोष्ट आहे. एदम मॉडर्न लुक असलेली स्पेस-एज डिझाईनची गाडी मला बघताक्षणी पुढे ..... https://www.facebook.com/prasad.shir/posts/10159664857026411 HNqwerBDH2

वरील सर्व चर्चा वाचली. त्यात काही कमेंटी बुलेट बद्दल आहेत. प्रेम असेल तरच बुलेट घ्यावी, माझे लहानपणापासून स्वप्न होते, म्हणून मी घेतली. जर व्यवहार बघून बुलेट घ्यायची असेल तर घेउ नका. कटकटी सर्वच गाड्याना असतात. हे आपल्या चालवण्यावर पण असते.

In reply to by खटपट्या

२०१४ पासून क्लासिक ३५० चा मालक, अनुपम फारच भारी बाईक घेतली हा माज पण नाही अन बुलेटचा त्रास पण नाही. गाडीने एकदाही धोका दिलेला नाही किंवा आऊट ऑफ द वे गेलेली नाही. रोजचे गाडी पुसणे स्वतः करतो. जनरली बुलेट्स रिफाईन होत आल्या आहेत, थंडरबर्ड एक्स सिरीज / हिमालयन पासून तर रॉयल एनफिल्डनं कात टाकली म्हणायला वाव आहे, गाडी निशे सेगमेंट उरलेली नाही कॉमन झाली आहे पण मस्त आहे माझी तरी

In reply to by जेम्स वांड

हेच म्हणतोय, उगाच पांढरा हत्ती म्हणणे बरोबर नाही. आजकाल बुलेटही एवढे काम काढत नाही. व्यवस्थीत चालवली तर गुणी बाइक आहे. मी २०१८ ला गन मेटल विथ ड्युअल डिस्क ब्रेक घेतली. आजपर्यंत जास्त खर्च आलेला नाही.

. अश्या स्वरूपात पाहायला आवडेल राव, टोटल लीगल (वजा एक्झॉस्ट) स्क्रॅम्बलर लुक !.

In reply to by जेम्स वांड

थोडे दिवस कळ काढा एस जी ६५० येतेय. गाडी बघुन खुष व्हाल. बरेच दिवसांनी मिसळपाववर येत असल्याने फोटो कसा टाकायचा ते विसरलो. तरी खाली लिंक देतोय. या वर्षीच्या अखेरीस येइल असे वाटतेय. किंमतही ३ लाखाच्या आसपास आहे असे ऐक्ले आहे. बघुया https://ridermagazine.com/2021/11/29/royal-enfield-sg650-concept-first-…

In reply to by खटपट्या

एस जी ६५० बद्द्ल अनेक जण आस लावून बसले आहेत पण बहुदा ती लिमिटेड एडिशन असेल आणि लगेचच बंद होऊन जाईल अशी शक्यता आहे. मागेल त्याला मिळेल अशी खात्री निदाना आता तरी देता येत नाहीये.

Yamaha Aerox 155 या स्कूटर बद्दल कोणाला काही माहीत आहे का? महाग असली तरी मोठ्या चाकांमुळे व१२३ किलो वजनामुळे व कमी उंचीमुळे लो स्पीडलाही ती खूप स्टेबल असेल असं प्रथमदर्शनी तरी वाटत आहे.

In reply to by शाम भागवत

हि स्थिर असेल यात शंका नाही परंतु हि धड स्कुटर नाही ( कारण पायाशी सामान ठेवताच येणार नाही) आणि व्हील बेस लांब आहे १३५० मिमी ( यामाहा R १५ मोटारसायकलचा व्हील बेस आहे १३२५ मिमी) धड मोटारसायकल नाही कारण चाके लहान आहेत उंची लहान आहे. त्यामुळे उंच पुरुषांना बसणे कठीण आहे. स्त्रियांसाठी हि ठीक आहे परंतु पुढे पटकन काही ठेवावे अशी जागाच नाही. अर्थात सीटच्या खाली भरपूर जागा आहे परंतु भाजी सारख्या बारीक बारीक गोष्टी ठेवण्यासाठी सारखे उठून सीट उघडणे भरपूर कटकटीचे होते. व्हील बेस लांब असल्याने स्थिरता चांगली मिळेल परंतु शहरात इतर स्कुटरसारखी पटकन वळणार नाही. याशिवाय १५० सीसी असल्याने याचे मायलेज कमी मिळेल ३५-४० असेल आणि पेट्रोलची टाकी फक्त ५.५ लिटर असल्याने तुम्हाला वारंवार पेट्रोल पंपावर जावे लागेल तेंव्हा घराच्या जवळ पेट्रोल पंप असेल तर ठीक आहे. ( मोटार सायकलची टाकी १०-१२ लिटर असते) शिवाय किंमत दीड लाखाच्या वर जात असल्याने हि कितपत यशस्वी ठरेल हि शंकाच आहे. पण स्टाईल म्हणून उत्तम असेल कारण या किमतीच्या आसपास कितीतरी उत्तम मोटारसायकल मिळू शकतील

In reply to by सुबोध खरे

स्कूटर ची किंमत २ लाख अधिक टॅक्सेस इतकी दिसतेय. एव्हढी महाग स्कुटर घेणे कितपत योग्य आहे माहित नाही. व्यक्तीश: मला बजाज एम ८० आणि हिरो होंडाची स्ट्रीट मोपेड जास्त आवडल्या होत्या. दोन्हीची चाके मोटरसायकलच्या चाकापेक्षा छोटी मात्र स्कुटर च्या चाकापेक्षा कितीतरी मोठी होती. या दोन्ही कंपन्यांनी या मॉडेल्सच्या सुधारीत आवृत्त्या आणायला हव्या होत्या. स्कुटरच्या सस्पेंशन आणि चाकांवर काम करायला अजून भरपूर वाव आहे मात्र त्यात कोणी लक्ष घालीत नाही. आता बाजारात नवीन आलेल्या बॅटरी वर चालणार्‍या स्कुटर्स चे सस्पेंशन अगदीच तकलादू दिसतात. स्कुटर दोन वर्षे जुनी झाली की सस्पेंशन मुळे वापरायला नकोशी वाटते.

ही बातमी भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक (Indias First Electric Cruiser Bike) कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अगदी हार्ले डेविडसनसारखी (Harley Davidson) दिसते. वीजेवर चालणारी ही बाईक सिंगल चार्जवर १८० ते २२० किमी ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा खुद्द कंपनीनं केला आहे. बाईकमध्ये ४ हजार वॉटची मोटर बसवण्यात आली आहे. कंपनीनं ही बाईक एकूण तीन रंगात उपलब्ध केली आहे. यात Garnet Red, Deep Blue आणि Jet Black या रंगांचा समावेश आहे. बाईकची किंमत १.६८ लाखांपासून सुरू होते. या बाईकसोबतच कंपनीनं कोमाकी वेनिस (Komali Venice) देखील लॉन्च केली आहे.

In reply to by धर्मराजमुटके

कोणतेही इलेक्ट्रिक वाहन घेतले( चार चाकी किंवा दुचाकी) तरी त्याचा पल्ला जितका महत्त्वाचा आहे त्यापेक्षा त्याची बॅटरी किती वेळात चार्ज होते ते महत्त्वाचे आहे. कारण आपण ३०० किमी चा पल्ला घेतला तर लांब जाताना आपण पहिला थांबा २०० किमी घ्या किंवा २५० किमी बॅटरी चार्ज होण्यासाठी आज ८ तास लागतात. म्हणजेच आपल्याला रात्रभर ती चार्ज करावी लागते. तसेच दुचाकी चा पल्ला २०० च्या आसपास सांगत असले तरी शहरातील ट्रॅफिकमध्ये तो १००-१२० च्या वर जात नाही आणि त्याची बॅटरी चार्ज होण्यासाठी सुद्धा आज ८ तास लागतात. विजेवर चालणारी वाहने घेताना आजही माणसे साशंक एवढ्यासाठी आहेत कि एखाद्या ठिकाणी आपला चार्ज संपला तर तेथे चार्जिंग ची सुविधा सहज उपलब्ध नाही आणि ती असली तरी निदान ३-४ तास अडकावे लागेल. पेट्रोलचे/डिझेलचे वाहन रस्त्यात बंद पडले तर दुसऱ्या वाहनातून पेट्रोल आणून भरले कि गाडी लगेचच चालू होते बॅटरीचा जर ३५-४० % चार्ज जर अर्ध्या तासात कोणत्याही ५ अँपियर च्या सॉकेट मधून करता येईल तेंव्हा विजेची वाहने जास्त लोकप्रिय होतील आणि पेट्रोल/डिझेलच्या वाहनांचा सशक्त पर्याय म्हणून पुढे येतील.

शहरात गाडी ६० च्या वर आणि समोर १ किलोमीटर रस्ता दिसल्याशिवाय ८० च्या वर जाउ नये हे वरील मुद्दे पटले. आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही. मुळात शहरात एवढ्या वेगाने गाडी चालवण्यास जागा कुठे मिळते? किंवा ते गाडी चालवताना वेगाचा काटा बघत नसावेत.

गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही. माझ्या कडे डॉमिनार आहे जी ४०० सीसी ची ४० हॉर्स पॉवरची मोटारसायकल असून त्यात दोन्ही डिस्क ब्रेक्स ए बी एस सह आहेत. पूर्व द्रुत महामार्गावर मुलुंड ते विक्रोळी सुद्धा मला ८०-९० ने चालवायला भीती वाटेल इतकी रहदारी असते. आणि हा मार्ग म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातील वेगाने चालवायला सर्वात चांगला मार्ग असावा. असे असताना एखादा म्हणत असेल कि ८०-९० च्या खाली चालवत नाही तर एक तर तो खोटे बोलतो आहे किंवा जीवावर उदार होऊनच( स्वतःच्या आणि इतरांच्या) चालवतो असे म्हणावे लागेल

In reply to by सुबोध खरे

असे असताना एखादा म्हणत असेल कि ८०-९० च्या खाली चालवत नाही तर एक तर तो खोटे बोलतो आहे किंवा जीवावर उदार होऊनच( स्वतःच्या आणि इतरांच्या) चालवतो असे म्हणावे लागेल
अगदीच शब्दशः अर्थ घेतला तर असं वाक्य बोलणारा रेसिंग ट्रॅकवर जरी गाडी चालवत असेल तरी त्याचं बोलणं हे खोटंच ठरणार कारण कुठलीही गाडी कितीही वेगाने चालविली तरी सुरुवात शून्यापासूनच करावी लागणार आणि वळण किंवा इतर अडथळ्यांकरिताही वेग पन्नासच्या खाली आणावाच लागणार; पण जर का याचा अर्थ असा घेतला की चालक शक्य असेल त्या प्रत्येक वेळी आणि शक्य तितक्या लवकर ८० / ९० च्या वेगाने वाहन चालवित आहे तर ते अगदीच खोटेही नसणार. सप्टेंबर १९९७ ते फेब्रुवारी २०११ या काळात माझ्याकडे जुनी उजव्या पायात गिअर लिव्हर असलेली बुलेट ३५० सीसी ही बाईक होती. ती मी सेक्टर २५ च्या ज्ञानप्रबोधिनी शाळेपासून ते आकुर्डीच्या फोर्स मोटर्स (तेव्हाची बजाज टेम्पो लि.) पर्यंत चालवित असे. या तीन किमी च्या अंतरापैकी पहिल्या १.५ किमी बरेच चौक, वेडीवाकडी वळणे आणि सिग्नल व इतर अनेक अडथळे पार करुन मी निगडीच्या मुख्य चौकात पोचायचो तोवर मी ० ते ४० किमी च्याच रेंजमध्ये वेग पकडू शकायचो पण निगडी चौक ते फोर्स मोटर्सचे प्रवेशद्वार या दीड किमीच्या सरळ पट्ट्यात मात्र ८० किमी चा वेग सहज घ्यायचो. ही २००१ पर्यंतची हकीगत आहे. त्यानंतर डिस्क ब्रेक / एबीएस / सीबीएस असलेली आणि प्रचंड पिक अप असलेली वाहने बाजारात आली आहेत अर्थात मी ती चालविली नाही पण इतर अनेकांना मी सहज तीन चार किमीच्या पट्ट्यात अनेकदा १०० पर्यंतचा वेग लीलया घेताना आणि पुन्हा तितक्याच चटकन ब्रेकिंग करुन तो तात्काळ शून्यावर आणतानाही पाहिलेय. माझ्या तरुणपणी अशी वाहने नव्हती आणि आता या वयात या वाहनांवर मला हे जमू शकणार नाही पण म्हणूनच जर एखाद्याकडे हे कौशल्य असेल तर ते मी मोकळ्या मनाने मान्य करील. तो खोटे बोलतोय किंवा लोकांच्या /+ स्वतःच्या जीवाशी खेळतोय असा आरोप करणार नाही. उच्च तंत्रज्ञान + कौशल्य + सराव + प्रचंड शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती यांच्या साहाय्याने आज पंचवीस ते पस्तीस या वयोगटात असणारे अनेक जण हे पूर्ण सुरक्षितता पाळून करताना दिसतात.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या

खाली

चालवत नाही. याचा सरळ अर्थ सुद्धा काढून पहा. वाच्यार्थ व्यंगार्थ मी बोलतच नाही. १०० चा वेग घेण्यासाठी डॉमिनर सारख्या शक्तिशाली मोटार सायकलला ८ सेकंद लागतात तर बुलेट ३५० ला २५. ७३ सेकंद लागतात. ९० च्या स्पीडला दीड किमी चे अंतर सुद्धा एक मिनिटात पार होईल. महाराष्ट्राच्या किती शहरात किती ठिकाणी दीड किमी चा सरळ वाहतूक नसलेला पट्टा मिळेल? तीन ते चार किमी तर सोडुनच द्या. आणि हे मी स्वानुभवाने सांगतोय जेथे माझ्याकडे ४० हॉर्सपॉवरची डॉमिनार सारखी ए बी एस आणि स्लिपरक्लच असलेली जाड टायरची मोटार सायकल आहे. त्यामुळे असे बोलणे हे शुद्ध दर्पोक्तीच आहे किंवा सरळ सरळ खोटे बोलणे आहे.

In reply to by सुबोध खरे

१०० चा वेग घेण्यासाठी डॉमिनर सारख्या शक्तिशाली मोटार सायकलला ८ सेकंद लागतात तर बुलेट ३५० ला २५. ७३ सेकंद लागतात.
डॉमिनॉर आणि बुलेट सोडून द्या
आणि हे मी स्वानुभवाने सांगतोय जेथे माझ्याकडे ४० हॉर्सपॉवरची डॉमिनार सारखी ए बी एस आणि स्लिपरक्लच असलेली जाड टायरची मोटार सायकल आहे.
हे जाड टायर प्रकरण हाताळायला आणि वळवायला फार अवघड आहे. मी गेले सहा महिने केवळ बाइक्स रिसर्च करीत आहे. चार प्रकारच्या बाईक्स आहेत - कम्यूटर / क्लासिक - अपराईट पोझिशन - यात चालक सरळ ताठ बसतो क्रूझर / लाँग राईड पोझिशन - यात चालक थोडा मागे रेलून बसतो. स्पोर्ट - यात चालक पुढे झुकून बसतो. ऑफ रोड / मोटो क्रॉस - इथे चालक लिटरली फूट रेस्टवर अनेकदा उभा राहून अपराईट पोझिशन असलेली बुलेट सारखी बाईक ही चटकन वेग घेणे आणि पुन्हा कमी करणे याकरिता बनविलेली नाही. तरीही याच प्रकारात बनविलेली असून देखील येझडी रोडस्टर बाईक मात्र चालक अशा पद्धतीने चालवू शकतो पण बुलेट नाही. अर्थात रॉयल एन्फिल्डचीच इंटरसेप्टर मात्र हे लीलया करु शकते पण तिलाही पुन्हा टॉप स्पीड १७० किमी असला तरी तो फार काळ घेता येत नाही कारण स्पोक व्हील्स आणि ट्यूब + टायर क्रूझर / लाँग राईड पोझिशन बाईकला देखील हे शक्य नाही - उदा. मेटेऑर. ऑफ रोड / मोटो क्रॉस मध्ये उत्तम पिकअप मिळेल पण टॉप स्पीड फार घेणे शक्य नाही कारण स्पोक व्हील्स आणि ट्यूब + टायर आता उरतो एकच प्रकार - स्पोर्ट बाईक - यात चालक पुढे झुकतो आणि या वाहनात उत्तम पिक अप आणि टॉप स्पीड देखील आहे. यामाहाची आर सिरीज् याबाबत आदर्श म्हणता येईल अशी आहे. याच प्रकारात इतर बाईक्सदेखील ( उदा - टीवीएस अपाचे, बजाज पल्सर, इत्यादी) आहेत. अ‍ॅलॉय व्हील + ट्यूबलेस टायर्समुळे १७० किमीचा टॉप स्पीड गाठता येतो. आपण ही वाहने चालवून पाहिली आहेत काय? केवळ डॉमिनोर आणि बुलेट यांना समोर ठेवून निष्कर्ष काढता येणार नाही. मूळात ती दोन्ही वाहने याकरिता अपात्रच आहेत.
महाराष्ट्राच्या किती शहरात किती ठिकाणी दीड किमी चा सरळ वाहतूक नसलेला पट्टा मिळेल?
मी पिंपरी-चिंचवड हद्दीत राहतो आणि तिथले अनेक असे पट्टे सांगू शकतो. (जसे की, भक्ती शक्ती ते कासारवाडी - ११ किमी यात मधोमध असलेली हायस्पीड लेन त्याचप्रमाणे रावेत औंध रस्त्यावर देखील असलेले अनेक फ्लाय ओवर्स आणि मधल्या लेन्स, याशिवाय देहूरोड कात्रज बाह्यवळण रस्त्यावर सलग तीन ते चार किमी मोकळा व कमी वाहतूकीचा पट्टा किमान चार वेळा आपल्याला मिळू शकतो.) पण मूळात हा दीड किमीचा स्पॅन बुलेट सारख्या आळशी बाईक्सला गरजेचा आहे. यामाहा बाईकर्स याच्या निम्म्याहून कमी अंतरात ८० किमीचा वेग गाठतात आणि पुन्हा चटकन शून्यावर येतात. यूट्यूबवर असंख्य व्हिडीओज् विश्लेषणासह आहेत. त्यात हायवेज् प्रमाणेच सिटी ट्राफिकचेही व्हिडीओज् आहेत. रावेत ते तळेगाव या पट्ट्यात वॅगनार प्रवासाचा जीपीएस व्हिडीओ आपण येथे पाहू शकता. जीपीएस स्पीड कोपर्‍यात दिसेल. https://www.youtube.com/watch?v=a5Gzu8kzERE वाहनाने किती वेळा ८० व ९० चा वेग ओलांडला आहे ते दिसून येईल. तेही स्वतःचा / इतरांचा जीव धोक्यात न घालता. बहुतेक रस्त्यांवर दुभाजक आणि चौकात उड्डाणपूल वगैरेमुळे हे साध्य होते.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील. किमान तिप्पट ते सहापट किंवा अनेकदा त्याहूनही अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील? संदर्भाकरिता काही बाईक्सच्या ऑन रोड किंमती - (अंदाजे / जवळपास - व्हेरिअंट कलर व शहरानुसार किरकोळ फरक पडू शकतो) बजाज सीटी १०० - रुपये ऐंशी हजार होन्डा शाईन - रुपये पंच्चाण्णव हजार हीरो एक्स्ट्रीम - रुपये एक लाख पासष्ट हजार यामाहा एफ झेड २५ - रुपये पावणे दोन लाख यामाहा आर १५ - रुपये एक लाख ऐंशी हजार बजाज पल्सर आरएस २०० - रुपये दोन लाख येझडी रोडस्टर - रुपये अडीच लाख बजाज डॉमिनॉर - रुपये पावणे तीन लाख केटीएम ड्यूक ३९० - रुपये साडे तीन लाख रॉयल एन्फिल्ड इंटरसेप्टर - रुपये पावणे चार लाख यापेक्षा अधिक किंमतीचीही अनेक वाहने आहेत आणि बरेच जण ती चालवित असतात जसे की कावासाकी वर्सिस, यामाहा एमटी ०१. यातली अनेक वाहने माझ्या वयाला व व्यक्तिमत्वाला न जुळणारी असल्याने मी चालविलेली नाहीत पण तेवीस बाईकर्सचा एक गट (वय वर्षे २५ ते ३५) माझ्या संपर्कात असल्याने मी त्यांच्या सोबत बोलल्यावरच या धाग्यावर प्रतिसाद दिले आहेत. तुम्ही ठरवलेला निष्कर्ष मात्र कदाचित तुमच्या एकट्याच्या अनुभवावर आधारित आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील बहुसंख्य लोक याच गाड्या चालवतात. उगाच जास्त शक्तीच्या महाग मोटार सायकल घेऊन पेट्रोल जाळण्यात फार कुणाला रस नसतो. गाड्याच्या विक्रीचे आकडे पाहिले असतेत तर तुम्हाला ते लक्षात आले असतेच. मोठ्या गाड्यांमध्ये जास्त लोक बुलेटच चालवत्तात कारण त्याची कल्ट व्हॅल्यू

In reply to by सुबोध खरे

उगाच जास्त शक्तीच्या महाग मोटार सायकल घेऊन पेट्रोल जाळण्यात फार कुणाला रस नसतो.
बाईकिंगचा छंद असणारे आपण पाहिलेच नाहीत का? हजारो रुपये लिटर किंमतीची दारु पिणारे जसे लोक आहेत तसेच लाखो रुपये किंमतीच्या बाईक्स विकत घेणारेही अनेक जण आहेत.
गाड्याच्या विक्रीचे आकडे पाहिले असतेत तर तुम्हाला ते लक्षात आले असतेच.
त्या आकड्यांवरुन निष्कर्ष काढायचा कसा? ज्यांना १००-१५० सीसीची वाहने हवीत उदरनिर्वाहाकरिता फिरावे लागते यास्तव ते ती विकत घेतातच आणि ती वाहने ठराविकच असल्याने त्यांचा खप जास्त दिसतो - उदा. स्प्लेंडर / बजाज प्लॅटिना इत्यादी. म्हणजे १०० तले ५० स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना किंवा तत्सम बाईक्स घेणार. १५०+ सीसीमध्ये पुढे फार मोठे वैविध्य आहे. १०० तल्या उरलेल्या ५० ना फार निवडीला फार मोठा वाव आहे. त्या पन्नासांपैकी प्रत्येकी दोघांनी जरी एक मॉडेल घेतले तरी अशा दर दोघांमागे एक अशी २५ एक मॉडेल्स सहज बाजारात आहेत. मग जर एखाद्याला असे दिसले की (हे केवळ उदाहरणाकरिता लिहित आहे) १०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० सीसीच्या, १५ गाड्या १२५ सीसीच्या आणि १० गाड्या १५० सीसीच्या खपल्या. आणि मग उरलेल्या पन्नासांमध्ये मग २५० सीसीच्या दोन साडे तीनशे सीसीच्या दहा (अर्थातच बुलेट) आणि उरलेल्या सर्व मॉडेल्सच्या प्रत्येकी फक्त एक किंवा दोनच खपल्या तर असे वाटेल की १५० सीसीच्या आतील दोन तीन मॉडेल्सची मेजॉरिटी आहे पण १५० सीसी वरील २५ मॉडेल्सचा एकत्रित खप हादेखील जर १५० सीसीच्या आतील तीन मॉडेल्सच्या खपाच्या जवळपास जाणारा असेल तर मग काय म्हणता येईल? माझ्या घराशेजारी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. कुंपण भिंतीबाहेर ज्या शेकडो बाईक्स उभ्या आहेत त्या पाहिल्या तर मला तरी जास्त सीसीच्या वाहनांची (एकच एक मॉडेल नव्हे) संख्या निम्म्याहून अधिक दिसते. रोज पाहतो आहे. एखाद्या निम्न आर्थिक वर्गातील कामगारांच्या कारखान्यातील वाहनतळावर हे चित्र नक्कीच वेगळे असेल पण पुन्हा सॉफ्टवेअर किंवा इतर मल्टीनॅशल कंपन्यांच्या पार्किंगमध्ये मात्र महागड्या बाईक्सच जास्त दिसतील. तळवडे, हिंजवडी, मगरपट्टा सिटी, प्राधिकरण येथील कॉलेज, कंपन्या, मॉल, सिनेमाथेटर, बिझिनेस कॉम्प्लेक्स अशा अनेक वाहनतळांवर मी कोणती वाहने जास्त दिसतात याचे बारकाईने निरीक्षण केले आहे. स्कूटर यातून वगळा व फक्त मोटरसायकल ची संख्या पाहा. लोक महागड्या व मोठ्या अश्वशक्तीच्या बाईक्सची लक्षणीय प्रमाणात खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. परफॉर्मन्स शिवाय ही पसंती मिळणे नाही. फक्त शो बाजी करिता काही थोडे करतातही पण ते अगदी अल्प इतर जण मात्र त्या बाईक्सच्या वैशिष्ट्यांचा पुरेपुर उपयोग करतात असे दिसते.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

१०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० सीसीच्या, १५ गाड्या १२५ सीसीच्या आणि १० गाड्या १५० सीसीच्या खपल्या. हि आकडेवारी चे सु गु यांच्या डायरीतील दिसते वस्तुस्थिती फार फार वेगळी आहे पाहिजे तर जालावर शोधून पहा. एक दुवा देतो आहे तोही वाचून पहा. ८९ % च्या वर १५० सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या गाड्याच विकल्या जात आहेत असे दिसेल. https://theicct.org/sites/default/files/publications/2W-sales-India-wp-… https://www.autocarindia.com/bike-news/best-selling-bikes-in-india-janu… मीच बरोबर हा दुराग्रह धरल्यामुळे तुमचे मत परिवर्तन होणे शक्य नाही म्हणू मी वितंडवाद घालणं सोडून दिलेलं आहे

In reply to by सुबोध खरे

देशभरात मारुतीच्या कमी शक्तीच्या व जास्त इंधन कार्यक्षमतेच्या वाहनांचा खप अधिक आहे. पण म्हणून कोरेगाव पार्कात आणि दिल्लीतल्या न्यू फ्रेण्ड्स कॉलनीत तीच वाहने दिसतील काय? शहरातील लोकांची क्रयशक्ति राहणीमान आवड यांचाही फरक पडतोच. २००८ मध्ये मी एका व्यावसायिकाला भेटायला त्याच्या घरी दिल्लीतल्या न्यू फ्रेण्ड्स कॉलनीत गेलो असता तिथे बहुतेक बंगल्यांच्या पार्किंग मध्ये मला ग्रँण्ड व्हिटारा हे वाहन दिसत होते. संपूर्ण देशात त्या वेळी हे कमी विकले जाणारे वाहन तिथे मेजॉरिटीत होते.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मी पेडर रोड ला गेलो होतो तिथे फक्त बी एम डब्ल्यू आणि मर्सिडीझ होत्या म्हणजे मुम्बईचे सगळे लोक बी एम डब्ल्यू आणि मर्सिडीझ च चालवतात हा हा हा हा हा हा मीच हुशार आहे मी हुशारच आहे मी हुशार आहेच

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मूळात ८० / ९० चा वेग ओलांडता येतच नसेल तर सगळेच १०० ते १५० सीसी दरम्यानच्याच बाईक्स चालवतील. किमान तिप्पट ते सहापट किंवा अनेकदा त्याहूनही अधिक किंमत देऊन चालक महागडी वाहने का विकत घेतील? बाईक कोणती घ्यावी याबाबत माझे मत अगोदरच एका प्रतिसादात मांडून झाले आहे. त्यामुळे चर्चा करत नाही मात्र तुमच्या वरील वाक्याचे उत्तर तुम्हाला प्रतिप्रश्न विचारून देण्याचा प्रयत्न करतो. १०-२० हजाराच्या मोबाईलमधे फोन करणे / फोन घेणे, व्हाटसअप फेसबुक इमेल इ. सगळ्या सुविधा मिळत असताना लोक लाखभराचे आयफोन का घेतात ? मला वाटते की उपयुक्तता जरी साधारणपणे सारखी असली तरी माझ्याकडे महागडी वस्तू आहे हे दुसर्‍याला दाखविणे माणसाला आवडत असावे किंवा मी गर्दीत इतरांपेक्षा वेगळा उठून दिसावा असे वाटत असावे हेच महागडी वस्तू विकत घेण्यामागचे लॉजीक असावे.

In reply to by धर्मराजमुटके

महागडी वस्तू फक्त इतरांना दाखविण्याकरिता? अतिरिक्त उपयुक्तता किंवा इतर वैशिष्ट्ये नसतानाही... सिरीयसली? आयफोन फक्त इतरांना दाखविण्याकरिता असतो? माझ्याकडे कोणत्या ब्रँडचा मोबाईल आहे हे माझ्याव्यतिरिक्त फक्त माझ्या कुटुंबातील सदस्यांनाच ठाऊक आहे जरी मी रोज अनेक लोकांना भेटतो तरी बहुतेकदा त्यांच्यासमोर माझा मोबाईल माझ्या खिशात असतओ. कॉल / गुगल पे वगैरेकरिता खिशातून काढला तरी कव्हरमुळे मॉडेल इतरांना कळणे अशक्यच. माझी गरज पाहून मी तो निवडलाय. इतरांना दाखवून मला काय मिळणार? म्हणजे मी आयफोन वापरत असलो तर ते इतरांना समजल्यावर माझा ग्राहकवर्ग वाढून माझ्या मिळकतीत वाढ होईल काय? मला तर याउलट वाटते. साधारण २००२ - २००६ दरम्यानची हकीगत आहे. मी एका उपाहारगृहात नियमितपणे जात असे. चव चांगली होती यात वादच नाही पण २००५-०६ दरम्यान पदार्थांचे दर फारच वाढू लागले. तशात एक दिवस मी हॉटेल मालकाला आत शिरताना पाहिले. गडद निळ्या मेटॅलिक रंगाची स्कोडाची साधारण सोळा लाख रुपये किंमतीची नवी कोरी गाडी त्याने घेतली होती. मालकाच्या चैनीकरिता आपण अतिरिक्त किंमत का मोजावी असा विचार करुन मी त्या उपाहारगृहात जाणेच सोडून दिले.