Skip to main content

कोणती बाईक घ्यावी?

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 25/10/2016 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रो! मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे, होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;) आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे. तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी. माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;) माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;) मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको. बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती, बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा! बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही, कृपया मार्गदर्शन करा... (विंग्रजी शब्दांबद्दल माफी)

वाचने 87317
प्रतिक्रिया 270

प्रतिक्रिया

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मी एका उपाहारगृहात नियमितपणे जात असे. चव चांगली होती यात वादच नाही पण २००५-०६ दरम्यान पदार्थांचे दर फारच वाढू लागले. तशात एक दिवस मी हॉटेल मालकाला आत शिरताना पाहिले. गडद निळ्या मेटॅलिक रंगाची स्कोडाची साधारण सोळा लाख रुपये किंमतीची नवी कोरी गाडी त्याने घेतली होती. मालकाच्या चैनीकरिता आपण अतिरिक्त किंमत का मोजावी असा विचार करुन मी त्या उपाहारगृहात जाणेच सोडून दिले.
रोचक आणि नोंद घेण्याजोगे. +१

In reply to by चेतन सुभाष गुगळे

एवढा मोठा प्रतिसाद देण्याचे कारण समजले नाही. मी स्वतः यामाहा R १५, FZ -S , APACHE १८०, पल्सार २०० NS, होंडा H NESS, JAWA आणि बेनेली TNT ३००, HONDA CBR 250 चालवून पाहिल्या आहेत. यापैकी यामाहा R १५, APACHE १८०, पल्सार २०० NS या गाड्या बऱ्यापैकी अंतर चालवून पहिलेल्या आणि या गाड्या चालवताना पुढे झुकून बसल्याने मनगटावर भरपूर ताण येतो म्हणून त्या रद्द केल्या. डॉमिनारची सीट सुद्धा थोडी स्पोर्टी आहे( जे मला आवडत नाही- युनिकॉर्न सारखी आरामदायक गाडी दुसरी नाही हेच माझे मत कायम आहे. त्यानंतर होंडा H NESS,) मी सुरुवातीला BMW ३१० R/ TVS Apache RR310 साठी थांबलो होतो परंतु त्या येण्याची लक्षणे दिसेनात म्हणून मुलासाठी डॉमिनार घेऊन टाकली. एवढं सगळं असूनही तुमचा जर असं म्हणणं असेल कि ८०-९० च्या वेगाने शहरात सहज मोटार सायकल चालवता येते किंवा आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही. यात काही गैर नाही. तर तुमचा दुराग्रह तुम्हाला लखलाभ होवो. मी तुमच्याशी वितंडवाद घालू इच्छित नाही

एवढं सगळं असूनही तुमचा जर असं म्हणणं असेल कि ८०-९० च्या वेगाने शहरात सहज मोटार सायकल चालवता येते
तर तुमचा दुराग्रह तुम्हाला लखलाभ होवो.
अनेक व्हिडीओज् उपलब्ध असताना, एकाची लिंकदेखील दिलेली असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन आपल्याला जमत नाही म्हणजे कोणालाच जमणार नाही असं स्वतःला सूपरह्यूमन टाईप समजणं ह्याला दुराग्रह म्हणतात.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या / माझ्या किंवा इतर कोणाच्या नसतात. मला जे जमत नाही ते इतरांना जमतंय हे मला दिसत असताना मी तरी निदान ते मोकळ्या मनाने मान्य करतो.

चेतन सुभाष गुगळे लिहिते झाले याचा आनंद झाला आहे, त्यांनी केवळ प्रतिसादात्मक न लिहिता बाई़क बद्दल स्वतंत्र धागा काढावा ही विनंती

In reply to by चेतन सुभाष गुगळे

विरूद्ध मतांना ट्रोलींग म्हणने योग्य नाही डॉ.खरे हे त्यांच्या मतांबद्दल परखड असतील पण ट्रोल नाहीत हे खात्रीने सांगतो

In reply to by कपिलमुनी

डॉ.खरे हे त्यांच्या मतांबद्दल परखड असतील पण ट्रोल नाहीत हे खात्रीने सांगतो
मला देखील आधी असंच वाटायचं पण माणूस कधी बदलेल त्याचा काही नेम नाही.
तर तुमचा दुराग्रह तुम्हाला लखलाभ होवो.
मी तुमच्याशी वितंडवाद घालू इच्छित नाही
बरं बुवा तुमचंच खरं
ही विधाने निकोप संभाषणाचा भाग मानता येणार नाहीत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग, पूर्व मूक्त मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि अशा अनेक मार्गांवर फक्त चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. त्यामुळे बरेचदा असे होते की जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. आपण ऐकीव माहिती वर काहींच्या काही प्रतिसाद लिहिता कोणती दोन स्थळे आहेत जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. हे सांगता येईल का? त्यांनी डॉमिनॉर केवळ काही सेकंदात ९५ किमी वेगाने चालविली पण मी मात्र १० मिनीटांनंतरही ताशी ७० किमी पेक्षा अधिक वेग गाठू शकलो नाही. डॉमिनार सहाव्या गिअर मध्ये ऍक्सिलरेटर सोडून दिला तरी ५३ वेगाने जात राहते. ऍक्सिलरेटर जरा~ सा पिळला तरी हि गाडी ७० जाते. हि आपली स्थिती आहे रेनेगेड या गाडीचे उत्पादन बंद झाले आहे आणि त्याचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. एकंदर या गाडीची स्थिती डामाडौलच आहे. ज्या गाडीची स्थिती अशी आहे तिच्याबद्दल काहीही माहिती नसताना सेकंड हॅन्ड विकत घ्यायला चालला होतात. आणि येथे मात्र मीच शहाणा म्हणून वाटेल ती आकडेवारी खपवताय आणि परत दुसऱ्याला ट्रॉल म्हणून संभावना करताय? उत्तम आहे.

In reply to by सुबोध खरे

मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग, पूर्व मूक्त मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि अशा अनेक मार्गांवर फक्त चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. त्यामुळे बरेचदा असे होते की जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. आपण ऐकीव माहिती वर काहींच्या काही प्रतिसाद लिहिता कोणती दोन स्थळे आहेत जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. हे सांगता येईल का?
ही जी माहिती मी इथे मांडली होती होती ती एका रेनेगेडे मालकानेच दिलेली होती असे सांगितले आणि त्या माहितीच्या फर्स्ट हँड कन्फर्मेशन माझ्याकडे नसल्याने त्या माहितीच्या सत्यतेबाबत ठामपणे आग्रह धरला नव्हता उलट तुम्ही दिलेल्या माहितीला सहमती दर्शविली होती. तेव्हा पुन्हा ही चर्चा व्यर्थ आहे.
त्यांनी डॉमिनॉर केवळ काही सेकंदात ९५ किमी वेगाने चालविली पण मी मात्र १० मिनीटांनंतरही ताशी ७० किमी पेक्षा अधिक वेग गाठू शकलो नाही.
भक्ती - शक्ती ते रावेत या रस्त्यावर मी व माझे स्नेही (पोलिस खात्यात कार्यरत) अशी आम्ही दोघांनी जाताना व येताना डॉमिनार आलटून पालटून चालविली. जाताना त्यांनी केवळ काही सेकंदात ९५ किमी वेग गाठला होता आणि मला येताना १० मिनीटांनंतरही ७० किमीच गाठता आला. ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं की मी डिस्क ब्रेकच्या भरोशावर फारसा विसंबून राहत नाही. पुरेसं अंतर राखतो. माझ्या स्नेह्यांनी मात्र डिस्क ब्रेकच्या भरोशावर इतर वाहनांच्या अगदी किसिंग डिस्ट्न्स इतके जवळ जात बिनधास्त वाहन चालविले.
डॉमिनार सहाव्या गिअर मध्ये ऍक्सिलरेटर सोडून दिला तरी ५३ वेगाने जात राहते. ऍक्सिलरेटर जरा~ सा पिळला तरी हि गाडी ७० जाते.
सहाव्या गिअरमध्ये जर रस्त्याची वेगवेगळी पातळी विचारात घेतली तर हे विधान सरसकट वस्तुनिष्ठ ठरत नाही. उलट सहाव्यातून पुन्हा पाचव्यात आणि चौथ्यात आणावी लागते. जे मला करावे लागले. माझ्या आधीच्या प्रतिसादातील वाक्ये कोट करुन तुम्ही पुन्हा माझाच मुद्दा अधोरेखित करताय - ८० / ९० पर्यंत वाहन लीलया नेणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. जसं या केसमध्ये मला नाही जमलं पण माझ्या स्नेह्यांनी करुन दाखवलं. आणि हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पिलीयन सीटवर बसून पाहिलं, अनुभवलं.
रेनेगेड या गाडीचे उत्पादन बंद झाले आहे आणि त्याचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. एकंदर या गाडीची स्थिती डामाडौलच आहे. ज्या गाडीची स्थिती अशी आहे तिच्याबद्दल काहीही माहिती नसताना सेकंड हॅन्ड विकत घ्यायला चालला होतात.
विकत घ्यायला चाललो होतो हे विधान वस्तुनिष्ठ नाही. विचार चालू होता पण अंतिम निर्णय घेतलेला नव्हता. त्या निर्णयाच्या आधी अभ्यास व्हावा म्हणूनच इथे प्रतिसाद मांडला होता. पुरेसा विचार केल्याशिवाय मी काहीही खरेदी करीत नाही.
आणि येथे मात्र मीच शहाणा म्हणून वाटेल ती आकडेवारी खपवताय आणि परत दुसऱ्याला ट्रॉल म्हणून संभावना करताय?
हे असे शब्द वापरणे यालाच ट्रोलिंग म्हणतात. ज्या गोष्टी मी स्वतःला जमत नाही हे मान्य करुनही स्वतः डोळ्यांनी इतरांना करताना पाहिलंय आणि मगच लिहितोय की हे शक्य आहे तर तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवत आहात आणि कारण काय तर तुम्हाला स्वतःला ते जमले नाही आणि म्हणूनच इतरांनाही जमणार नाही ही तुमची खात्री. यूट्यूब व्हिडीओ पाहा, मी लिंक दिलेला पाहा म्हणतोय तर तिकडेही दुर्लक्ष करायचं आणि सत्य नाकारायचं याला काय अर्थ आहे. मला ३० किग्रॅचा एलपीजी सिलिंडर उचलता येत नाही म्हणून माझ्यापेक्षा कमी उंचीची आणि वजनाची मीराबाई चानू अडीचशे किग्रॅ वजन लीलया उचलते ही बाब अमान्य करायची का? सराव, सातत्य, तंत्र आणि कौशल्य या बाबी काहींना इतरांपेक्षा अधिक क्षमतेच्या बनवितात यावर निदान मी तरी विश्वास ठेवतो.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तुम्ही ट्रोल म्हणा नाही तर वाटेल ते म्हणा. मला शष्प फरक पडत नाही. जितके वेडेवाकडे समर्थन तुम्ही कराल तितके तुमचे पितळ उघडे पडत चालले आहे आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ खोटे आहे हे सिद्ध झाले असताना तुम्ही परत पडलो तरी नाक वर म्हणून सांगताय. असो धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ खोटे आहे हे सिद्ध झाले
हे कधी झाले?
मला शष्प फरक पडत नाही.
वेडेवाकडे समर्थन तुम्ही कराल तितके
तुमचे पितळ उघडे
पडत चालले आहे
परत पडलो तरी नाक वर म्हणून सांगताय.
यालाच ट्रोलिंग म्हणतात. माझ्या तुम्हाला उद्देशून लिहिलेल्या एकाही प्रतिसादात असे शब्द नाहीयेत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आकडेवारी ने तुमचे म्हणणे साफ खोटे आहे हे सिद्ध झाले १०० बाईक्स पैकी २५ गाड्या १०० सीसीच्या, १५ गाड्या १२५ सीसीच्या आणि १० गाड्या १५० सीसीच्या खपल्या.आणि मग उरलेल्या पन्नासांमध्ये मग २५० सीसीच्या दोन साडे तीनशे सीसीच्या दहा (अर्थातच बुलेट) आणि उरलेल्या सर्व मॉडेल्सच्या प्रत्येकी फक्त एक किंवा दोनच खपल्या तर असे वाटेल की १५० सीसीच्या आतील दोन तीन मॉडेल्सची मेजॉरिटी आहे पण १५० सीसी वरील २५ मॉडेल्सचा एकत्रित खप हादेखील जर १५० सीसीच्या आतील तीन मॉडेल्सच्या खपाच्या जवळपास जाणारा असेल तर मग काय म्हणता येईल? हि शुद्ध थापेबाजी आहे. याची एक तरी आकडे वारी तुम्हाला देता येईल का?

In reply to by सुबोध खरे

कोणती दोन स्थळे आहेत जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. हे सांगता येईल का? याचे उत्तर अजून मिळालेले नाही

In reply to by सुबोध खरे

कोणती दोन स्थळे आहेत जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. हे सांगता येईल का? याचे उत्तर अजून मिळालेले नाही
ही माहिती फर्स्ट हॅण्ड नसल्याने तिच्या सत्यतेविषयी कुठलीही खात्री मी ठामपणे व्यक्त केलीच नव्हती. उलट तुमच्या स्पष्टीकरणानंतर मी तुमच्याशी या माहितीवरुन कुठेही पुन्हा आग्रह धरलेला दिसणार नाही. मी स्वतः मुंबईत राहतच नाही आणि २००९ नंतर मी तिथे कधीच दुचाकी वरुन प्रवास केलेला नाहीये. https://www.misalpav.com/comment/1137315#comment-1137315 इथे माझा मूळ प्रतिसाद आहेच की - ही माहिती मला मुंबईतील एका रेनेगेडे मालकानेच दिली. या कारणानेच तो ती फक्त शिर्डीला जायला वापरतो असे त्याने सांगितले. आणि याचमुळे तो त्याची रेनेगेडे विकतोय. तुमच्या सततच्या प्रतिसादांना उत्तर म्हणून मी शेवटी त्या रेनेगेडे मालकाचा फोन नं. पुन्हा शोधून त्याला संपर्क केला असता त्याने ही दोन ठिकाणे सांगितली आहेत जिथून त्यास कारने १५ ते २० मिनीटांत जाता येते पण रेनेगेडे प्रवासाकरिता दीड तासांहूनही अधिक काळ घेते. अनिकेत बिल्डिंग नंबर 15, G.M. Link Road, Jay Ambe Nagar, Indian Oil Nagar, Chembur West, Mumbai, Maharashtra 400089 हे त्याचे निवासस्थान आणि Bhaucha Dhakka, Princess Dock, Mumbai Port Trust, Mazgaon, Mumbai, Maharashtra इथे त्याचे कार्यालय आणि हा त्याचा कारने जाण्याचा रस्ता https://goo.gl/maps/5RxgMGQhztqex67AA मी पुणेकर असल्याने आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात मुंबईत पन्नास पेक्षाही कमी वेळाच आणि त्यातही दुचाकी घेऊन फक्त एकदाच आल्याने या माहितीची सत्यासत्यता तपासू शकत नाही. तुम्ही मुंबईकर असल्याने हे सत्य की असत्य हे निश्चित सांगू शकाल. मुख्य म्हणजे ही माहिती मला स्वतःला तपासायची गरजच कधीही नव्हती आणि नाही. मी दुचाकी घेतली तरी मुंबईत कशाला चालवेन? डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमधले काही दिवस सोडले तर इतर वेळी मुंबईला येण्याचेही मी टाळतो. या कालावधीत देखील प्रचंड घाम निघत असल्याने एसी कारलाच प्राधान्य असते तेव्हा मुंबईत दुचाकी चालवायला किती वेळ लागतो हा मुद्दा माझ्याकरिता फारच गौण. केवळ अशा प्रकारे वेळ जास्त लागल्याने अतिवेगवान दुचाकी मालक त्यांची दुचाकी स्वस्तात विकत असतील तर पुण्या ऐवजी मुंबईतून जुनी दुचाकी खरेदी करायचा (व त्यायोगे काही हजारांची अतिरिक्त बचत करण्याचा) माझा विचार आहे असे मी मूळ प्रतिसादात लिहिले होते. https://www.misalpav.com/comment/1136624#comment-1136624 त्यानंतरच्या तुमच्या https://www.misalpav.com/comment/1137118#comment-1137118 या प्रतिसादाचा मी कुठेही प्रतिवाद केलेला नव्हता.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

काय राव उगाच दुसऱ्याच्या नावाने बिलं फाडताय? कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवताय? का उगाच आपली थाप समर्थन करण्यासाठी पूर्व मुक्त मार्गावर मुद्दाम अशी स्थळे शोधून काढलीत? सतरा किमी ला दीड तासांहून अधिक वेळ? १० किमी ताशी? रेनेगेड ने ? अहो बैलगाडी बरी. मुद्दाम मी मोटारसायकल ( हिला पूर्व मुक्त मार्गावर परवानगी नाही) वर हे संध्याकाळी साडे सहा ला अंतर कापण्यासाठी गुगल मॅपवर पाहिले ते ३७ मिनिटे दाखवत आहे. आणि कारला पूर्व मुक्त मार्गाने २१ मिनिटे दाखवत आहे. ३७ मिनिटे कुठे आणि दीड तासापेक्षा जास्त वेळ कुठे? थापा मारायला कुठेतरी काहीतरी मर्यादा असावी कि नाही

In reply to by सुबोध खरे

मला काय करायचे आहे थाप मारुन? ज्याला वाहन विकायचं आहे त्याने हे कारण सांगितलं. मला तर त्या रस्त्यावर दुचाकी चालवायला परवानगी नाही हे देखील त्याच्याशी बोलल्यावरच कळलं होतं.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

(No subject)
चित्रे दिसत नाहीयेत.

In reply to by सुबोध खरे

आपल्या जागेवर बसून इतरांचं कथन असत्य ठरवणं सोपं असतं, पण केवळ बाईक विकण्याकरिता इतकं खोटं कोणी बोलेल असं मला वाटत नाही. म्हणून मी जरा त्याच्या कार्यालयीन वेळेच्या हिशेबाने गुगल मॅप सेट केला आणि त्याच्या बोलण्यात निदान मला तरी तथ्य आढळलं. दुचाकी प्रवासाचा जो अंदाजे वेळ दाखविला आहे त्यातही ही दुचाकी रेनेगेडे वजनदार, तसेच जास्त व्हीलबेसची असल्याने हाताळणीस अवघड आहे ही बाब जमेस धरून गुगल मॅप्सची अप्पर टाईम लिमिट पाहिली तर त्याच्यावर विश्वास ठेवायला मला तरी काही अडचण वाटत नाही. रेनेगेडेचे उत्पादन झाले आहे आणि त्याचे सुटे भाग मिळतील की नाही वगैरे मुद्दे हा वेगळा विषय आहे पण जी बाईक पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाही तीच बाईक मुंबईत पस्तीस ते पंचेचाळीस हजारादरम्यान कशी काय मिळू शकते या प्रश्नाचे हे उत्तर म्हणून त्याने दिलेले कारण अगदीच चूकीचे वाटत नाहीये.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

कशाला उगाच मानभावीपणा करताय? दुसऱ्याच्या नावाने बिलं फाडण्यापेक्षा आपली चूक झाली हे स्वच्छ मनाने मान्य केलं असतं तर एवढी मान खाली घालण्याची स्थिती आलीच नसती. गुगल मॅप कार्यालयीन वेळ इ सगळं जरी म्हणालात तरी मुंबईत मोटारसायकलचा सरासरी वेग १० येत नाही. १७ किमी ला दीड तास लागेल हे केवळ ट्राफिक जॅमच झाला तरच शक्य आहे. आणि वर दिलेल्या रस्त्यावर तसे फारच क्वचित होते कारण जो रस्ता चेंबूर पासून भाऊंचा धक्का येथे जातो त्यावर अनेक लांबच्या लांब फ्लाय ओव्हर आहेत. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या किंवा मुंबई पाहिलेल्या माणसाला आपला म्हणणं साफ खोटं आहे हे लगेच लक्षात येतं. एक म्हण आहे - एक खोटं लपवायला सात वेळा खोटं बोलावं लागतं. आणि (जुनी / सेकंड हॅण्ड)बाईक ची किंमत ३५ ते ४५ हजार काही मुंबईच्या वाहतुकीमुळे नाही. तर रेनेगेड हि कंपनी बंद पडल्यामुळे आणि त्याचे सुटे भाग उपलब्ध नसल्यामुळे आहे उगाच भंपकपणा कशाला करताय? डॉमिनार किंवा बुलेट तुम्हाला या किमतीला मिळेल का? जी बाईक पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाही तीच बाईक मुंबईत पस्तीस ते पंचेचाळीस हजारादरम्यान कशी काय मिळू शकते कशाला फुक्या मारताय? मुंबईतील सगळे रेनेगेड वाले पुण्यात येऊन नाहि का आपली बाईक विकणार? उगाच काहींच्या काही? लोक काय इतके मूर्ख आहेत का?

In reply to by सुबोध खरे

दुसऱ्याच्या नावाने बिलं फाडण्यापेक्षा आपली चूक झाली हे स्वच्छ मनाने मान्य केलं असतं तर एवढी मान खाली घालण्याची स्थिती आलीच नसती.
मिलिटरी ग्रीन कलरची एक रेनेगेडे ओएलएक्स वर विक्रीला ठेवलेली आहे. मालक कोणी समीर खान म्हणून आहेत. त्यांच्याशी संपर्क करुन खात्री करुन घ्या.
त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या किंवा मुंबई पाहिलेल्या माणसाला आपला म्हणणं साफ खोटं आहे हे लगेच लक्षात येतं. एक म्हण आहे - एक खोटं लपवायला सात वेळा खोटं बोलावं लागतं.
कशाला फुक्या मारताय?
लोक काय इतके मूर्ख आहेत का?
मला खोटं ठरवायचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे का? हा अधिकार जर आपणापाशी असेल तर नक्कीच आपण सर्टिफाईड ट्रोल असल्याबद्दल माझी आता अगदी खात्री पटली आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मिलिटरी ग्रीन कलरची एक रेनेगेडे ओएलएक्स वर विक्रीला ठेवलेली आहे. या वाक्याचा खालील वाक्याशी काही संबंध आहे का?

जी बाईक

पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाही

तीच बाईक

मुंबईत पस्तीस ते पंचेचाळीस हजारादरम्यान कशी काय मिळू शकते. त्या समीर खानला सांगा कि तुमची बाईक मी पुण्यात लाखाच्या वर विकून देतो मला २० हजार रुपये द्या.. इथे फुकट टाईमपास करण्या पेक्षा चार पैसेही मिळतील तुम्हाला कशाला इतक्या फुक्या मारत बसलाय? आणि एवढी लाज काढूनही शेवटचा प्रतिसाद माझाच असला पाहिजे हा तुमचा अट्टाहासच असला तर होऊनच जाऊ द्या

In reply to by सुबोध खरे

मिलिटरी ग्रीन कलरची एक रेनेगेडे ओएलएक्स वर विक्रीला ठेवलेली आहे. या वाक्याचा खालील वाक्याशी काही संबंध आहे का? जी बाईक पुण्यात (जुनी / सेकंड हॅण्ड) एक लाखापेक्षा कमी किंमतीत मिळत नाही
याचा खालचा वाक्याशी संबंध नव्हताच इतकंही तुम्हाला कळलं नसेल यावर माझा विश्वास नाही. त्याचा खालच्या नसून वरच्या वाक्याशी संबंध होता आणि आहे.
दुसऱ्याच्या नावाने बिलं फाडण्यापेक्षा आपली चूक झाली हे स्वच्छ मनाने मान्य केलं असतं तर एवढी मान खाली घालण्याची स्थिती आलीच नसती. गुगल मॅप कार्यालयीन वेळ इ सगळं जरी म्हणालात तरी मुंबईत मोटारसायकलचा सरासरी वेग १० येत नाही. १७ किमी ला दीड तास लागेल हे केवळ ट्राफिक जॅमच झाला तरच शक्य आहे.
इथे तुम्ही मला ज्या माहितीकरिता खोटं ठरवलं होतं ती माहिती देणार्‍याचा संदर्भ दिला होता. तुम्हाला फक्त वाद घालायचा आहे असे दिसत आहे...................

In reply to by सुबोध खरे

मला खोटं ठरवायचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे का? मी तर आपल्याला पाहिलेही नाही. आपणच

भंपक अचाट आणि अफाट विधाने करताय आणि स्वतःला तोंडघशी पाडून घेताय

तर मी कशाला अधिक काही करू? ५० टक्क्याच्यावर गाड्या १५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्याअसतात. माझ्या घराशेजारी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. कुंपण भिंतीबाहेर ज्या शेकडो बाईक्स उभ्या आहेत त्या पाहिल्या तर मला तरी जास्त सीसीच्या वाहनांची (एकच एक मॉडेल नव्हे) संख्या निम्म्याहून अधिक दिसते मुंबईत मोटार सायकलचा वेग गर्दीच्या वेळेस ताशी १० पेक्षा कमी असतो. मुंबईत ३५-४० हजाराला विकली जाणारी गाडी पुण्यात लाखाच्या वर विकली जाते. आणि तुम्ही दिलेल्या फोटो मध्ये कार ला २६ मिनिटे दाखवलंय (typically २२ ते ४० minutes) आणि त्याच्याच बाजूला मोटार सायकलला ४५ मिनिटे दाखवलंय आणि (typically ३५ minutes ते १ तास १० मिनिटे) म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक असतं तेंव्हा कारला ४० मिनिटे लागतात तेंव्हा मोटारसायकलला ७० मिनिटे दीड तासाच्या वर नव्हे आणि हे आपणच दिलेले फोटो आहेत.

In reply to by सुबोध खरे

म्हणजे जेंव्हा भरपूर ट्राफिक असतं तेंव्हा कारला ४० मिनिटे लागतात तेंव्हा मोटारसायकलला ७० मिनिटे दीड तासाच्या वर नव्हे आणि हे आपणच दिलेले फोटो आहेत.
गुगल मॅपने कुठल्या मोटरसायकलला किती वेळ असे कुठे लिहिले आहे? रेनेगेडेसारखी लांबलचक व क्रूझर बाईक शहरात फिरवायला समीर खानला किती वेळ लागतो हे त्याने सांगितलं आणि म्हणून बाईक विकतोय असं म्हंटलं तर मी त्याला थापेबाज म्हणायचं का? तो म्हणेल तुला विकत घ्यायची तर घे नाहीतर सोडून दे.

In reply to by सुबोध खरे

थापा मारुन मला व्यक्तिगत काय फायदा आहे? आकडेवारी शोधायला जायची देखील मला काय गरज आहे? मी काही या क्षेत्रात डेटा अ‍ॅनालिसीस वगैरे करीत नाही. पिंपरी चिंचवड नवनगर परिसरात पेठ क्रमांक २५ मध्ये राहणारा एक सामान्य नागरिक म्हणून मला आजुबाजूला जी वाहने दिसतात त्यावरुन मी हे विधान केले आहे. माझ्या जवळच्या परिसरात वीसहून अधिक महाविद्यालये आहेत. पंचविशीच्या तरुणांची पसंत असलेली वाहनेच इथे जास्त प्रमाणात दिसतात. मी जेव्हा पदपथावरुन पायी फिरत दीड दोन किमी दूर असलेल्या पिंपरीचिंचवड अभियांत्रिकी किंवा डॉ. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयापाशी जातो तेव्हा रस्त्याच्या कडेला पार्किंगमध्ये जी वाहने दिसतात त्याविषयी इथे लिहिले आहे. अहमदनगर वगैरे ठिकाणी मला टीवीएस मॅक्स ची वाहने जास्त दिसतात. इतर काही ग्रामीण भागात तर अजुनदेखील राजदूत मोटरसायकल्स दिसतात. २०१२ ते २०१४ या कालावधीत मी धुळे येथी वास्तव्य केले तेव्हा मला टीवीएस एक्सेल मोपेड जास्त प्रमाणात दिसायच्या. ज्या माझ्या सध्याच्या निवासी भागात फारच क्वचित दिसतात. मार्च मध्ये मी ४३१ किमी प्रवास केला तेव्हा संपूर्ण प्रवासात माझ्याखेरीज इतर कोणाकडेही सीडी डॉन ही बाईक दिसली नाही. कधीकाळी पब्लिक का नया ट्रान्स्पोर्ट अशी टॅगलाईन लावून विकली जाणारी ही बाईक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसत असे. तुम्हाला दिसणारं चित्र वेगळं असू शकेल ते तुम्ही इथे मांडलं तर त्याला मी थापेबाजी नाही म्हणणार.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

थापा मारुन मला व्यक्तिगत काय फायदा आहे? मीच हुशार दाखवता येते ना? कुठल्याही पार्किंगच्या जागेत पहिले तर ५० % मोटारसायकल १५० सीसी च्या वर दिसणार नाहीत भारताच्या कुठल्याही शहरात. मला एक तरी शहर दाखवा जेथे (यात पिंपरी चिंचवड सुद्धा येते) सगळी तरूण पोरं १५० सी सी च्या वर गाड्या चालवत आहेत? इतक्या बुलेटसुद्धा नाहीत तर बाकीच्या गाड्या सोडूनच द्या. कशाला उगाच पुड्या सोडताय? आणि परत मी काहीच दावा केला नाही असे पदर झाडणे. नुसते गोल गोल भोंगळ प्रतिसाद आणि त्यातील थापेबाजी उघड केली म्हणून मला ट्रॉल म्हणताय? बढिया है !

In reply to by सुबोध खरे

कुठल्याही पार्किंगच्या जागेत पहिले तर ५० % मोटारसायकल १५० सीसी च्या वर दिसणार नाहीत भारताच्या कुठल्याही शहरात. मला एक तरी शहर दाखवा जेथे (यात पिंपरी चिंचवड सुद्धा येते) सगळी तरूण पोरं १५० सी सी च्या वर गाड्या चालवत आहेत? इतक्या बुलेटसुद्धा नाहीत तर बाकीच्या गाड्या सोडूनच द्या.
तुम्हाला संपूर्ण भारतांच समग्र ज्ञान असल्यावर आता मी तरी यापुढे काय लिहिणार? पिंपरीचिंचवड शहरात मी चाळीसहून अधिक वर्षे वास्तव्य केले आणि ज्या नवनगर भागाचा उल्लेख केला आहे तिथली महाविद्यालये माझ्या निवासाची दोन किमी परिसरात आहेत. जिथली वाहतूक आणि वाहनतळे मी नेहमी फिरताना माझ्या डोळ्यांनी पाहतो त्या बाबतदेखील माझ्या पेक्षा जास्त अधिकारवाणीने आणि ठामपणे तुम्हीच लिहिणार असाल तर आता माझी खात्री पटली आहे की तुम्ही व्यक्त केलेल्या मतांव्यतिरिक्त इतर सर्व मते ही असत्यच असणार. यापुढे कुठल्याही विधानाची सत्यासत्यता तपासण्याकरिता मी आधी ते तुमच्यासमोरच मांडेन आणि तुम्ही अ‍ॅप्रूव्ह केलं तरंच ते सत्य आणि वास्तवाला धरुन असे समजेन.

In reply to by सुबोध खरे

मुंबईच्या रहदारीचंही ज्ञान तुमच्याकडेच आणि पिंपरी चिंचवडच्या वाहनसंख्येचंही ज्ञान तुमच्याकडेच. मुंबईत रेनेगेडेला प्रवासाकरिता जास्त वेळ लागतोय हेही तुम्हाला मान्य नाही आणि पिंपरी चिंचवडचे तरूण बाईकर्स शहरात देखील सहजपणे ८० / ९० चा वेग पकडू शकतात हेदेखील तुम्हाला पटत नाही. मी जे स्वतःचे अनुभव मांडले तेही तुम्हाला खोटे वाटले. जे मी इतरांना करताना स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंय असं लिहिलंय त्यावरही तुम्ही अविश्वास दाखवलात. ओएलएक्स वरच्या सेलरने जे मला सांंगितलं ते विधानेही तुम्ही पुन्हा माझ्याच स्वरचित थापा आहेत असं ठामपणे सांगितलंत. मग आता सर्वच मते तुमचीच मान्य करायची म्हंटली तरी तुम्ही पुन्हा याला मानभावीपणा म्हणणार. मग मी काय करायचं? मी कुठला प्रतिसाद इथे मांडायचा हे देखील तुम्हीच मला सूचवा. तोच जसाच्या तसा कॉपी पेस्ट करुन माझ्या सदस्यनामाने पोस्ट करतो. मला माझा ऑल टाईम फेवरिट सिनेमा विजय पुन्हा एकदा आठवला. त्यात अनुपम खेरने रंगवलेलं एक पात्र आहे. त्याला कोणाचंच वागणं पटत नाही कोणावरच त्याचा विश्वास बसत नाही. सारं काही आपल्या मर्जीप्रमाणेच व्हावं असं त्याला वाटतं. एक दिवशी त्याचा जुना व्यावसायिक संंबंधित सईद जाफरी बरोबर देखील त्याचे जोरदार खटके उडतात तेव्हा सईद जाफरी त्याला सुनावतो - खुद को खुदा समझने की कोशिश मत कर.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

पिंपरी चिंचवडचे तरूण बाईकर्स शहरात देखील सहजपणे ८० / ९० चा वेग पकडू शकतात आणि मूळ वाक्य आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही. याच्यात काही फरक आहे का? कशाला या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय?

In reply to by सुबोध खरे

मूळ वाक्य आज काल लोक सहज बोलुन जातात कि मी गाडी ८० ते ९० च्या खाली चालवत नाही. याच्यात काही फरक आहे का? कशाला या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय?
मूळ वाक्य एक तर माझं नाही आणि त्याबद्दल मी जो अगदी सुरुवातीलाच प्रतिसाद दिला आहे. https://www.misalpav.com/comment/1137663#comment-1137663 त्यात मी स्पष्टपणे लिहिलं आहे. -
अगदीच शब्दशः अर्थ घेतला तर असं वाक्य बोलणारा रेसिंग ट्रॅकवर जरी गाडी चालवत असेल तरी त्याचं बोलणं हे खोटंच ठरणार कारण कुठलीही गाडी कितीही वेगाने चालविली तरी सुरुवात शून्यापासूनच करावी लागणार आणि वळण किंवा इतर अडथळ्यांकरिताही वेग पन्नासच्या खाली आणावाच लागणार; पण जर का याचा अर्थ असा घेतला की चालक शक्य असेल त्या प्रत्येक वेळी आणि शक्य तितक्या लवकर ८० / ९० च्या वेगाने वाहन चालवित आहे तर ते अगदीच खोटेही नसणार.
आणि शब्दशः अर्थच घ्यायचा तर केवळ इतरांच्याच विधानाचा का? तुमच्याही विधानाचा घेऊयात की. https://www.misalpav.com/comment/1137120#comment-1137120 या प्रतिसादात तुम्ही लिहिलंय
फुंकर मारली तरी उडून जातील असे टिनपाट तरुण सुद्धा बुलेट चालवताना दिसतात.
आता तुम्ही फुंकर मारुन एखाद्या व्यक्तिला उडवून दाखवा आणि मग त्या व्यक्तिलाच पुन्हा बुलेटही चालवायला लावा हे जमत नसेल तर माझ्यावर असत्य विधाने मांडल्याचा आरोप करताना तुम्हालाच लाज वाटायला हवी.

In reply to by कपिलमुनी

चेतन सुभाष गुगळे लिहिते झाले याचा आनंद झाला आहे, त्यांनी केवळ प्रतिसादात्मक न लिहिता बाई़क बद्दल स्वतंत्र धागा काढावा ही विनंती
हेच म्हणतो. चेसुगु, बाइक्स वर एक चांगला माहितीपूर्ण धागा येऊ द्याच. बाइकांवर माझेही मनःपूर्वक प्रेम आहे, बाइकिंगमधून मस्त कळसबिंदु प्राप्त होतो! त्यातले अजून बारकावे समजून घ्यायला मदत होईल. --- भिन्न मताच्या आणि अनुभवाच्या आदरासहित प्रस्तुत चर्चेबद्धल माझे मत आणि अनुभव - वेगवेगळ्या बाइक्स चालण्याची पद्धत आणि हेतू वेगवेगळे असतात. योग्य बाइकवर सुरक्षितपणे वेगाची शंभरी गाठणे व ती पुरेश्या दीर्घकाळ टिकवून ठेवणे अवघड नाही.

In reply to by वामन देशमुख

चेसुगु, बाइक्स वर एक चांगला माहितीपूर्ण धागा येऊ द्याच.
धन्यवाद. पण मी ऑ.१९९७ - फे.२०११ या कालावधीत बुलेट ३५० चालविली मग दहा वर्षांहून अधिक काळ बाईकला अजिबात हात लावला नाहीये आणि त्यानंतर आता थेट दिवाळी २०२१ पासून होण्डा सीबी ३५० हायनेस, येझदी रोडस्टर, रेनेगेडे, डॉमिनॉर ४०० या बाईक्स फक्त टेस्ट राईड पुरत्याच चालविल्यात. डिस्क ब्रेकची सवय नाही त्यामुळे त्याच्यावर विसंबून राह्यचं धाडस होत नाही. त्यामुळेच अगदीच चिटकून बाईक न चालविता जरा जास्तच अंतर राखल्याने येझदीच्या टेस्ट राईडला (चिंचवड - भक्ती शक्ती - चिंचवड या १० किमी च्या टप्प्यात) ९२ पेक्षा जास्त वेग घेता आला नाही. इतर राईडर्सनी याच टप्प्यात ११०+ वेग जमविला होता. इतर अनेक बाईक्सचा फक्त वेबसाईट व यूट्यूब व्हीडीओज् पाहून अभ्यास चालू आहे. गेल्या महिन्यात तर्कवादींनी रिटायर्ड केलेली त्यांची पंधरा वर्षे जुनी सीडी डॉन एकाच दिवसात चारशे एकतीस किमी चालविली आणि असं वाटलं की जरा अधिक शक्तीची बाईक असती तर एकूण प्रवासाचा वेळ तीन चार तासांनी कमी झाला असता. तेव्हा एखादी जास्त शक्तीची बाईक घ्यावी असा विचार चालू आहे पण इतरांप्रमाणे मला चालवायला जमेल का? ही शंका असल्याने अंतिम निर्णय होत नाहीये. नव्या बाईकला अडीच लाख खर्च करणे थोडे अवघड वाटतेय. त्यापेक्षा ६० / ७० हजार खर्चून गाजराची पुंगी वाजवावी का असा एक विचार आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आता १५० सीसीच्या वरील सर्वच बाईक्स डिस्क ब्रेक विथ abs येतात त्यामुळे बिनधास्त घ्या, abs मुळे बाईक न घसरता जागच्या जागी उभी राहते.

In reply to by प्रचेतस

ते ठाऊक आहे पण मला सवय* नाही ना? इतर चालक जसे पुढच्या वाहनाच्या अगदी जवळ गेल्यावर ब्रेक मारतात तसे करायला मला प्रचंड भीती वाटते. मी आपला पन्नास फूट अलीकडीच ब्रेक मारतो (खरे तर तेही क्वचितच, बहुतेकदा थ्रोटलच कमी करतो त्यामुळे ब्रेकिंग फारसे करतच नाही) आणि पिक स्पीड लवकर गाठू शकत नाही. त्यामुळे जास्त ताकदीची बाईक घेतल्यावरही तीची संपूर्ण ताकद वापरली जाईल का? हा प्रश्न पडला आहे. *मधल्या काळात मी जवळपास १ लाख किमी अंतर प्रवास आणि त्यातही एक वर्षे रोज निगडी-शिरूर--निगडी असा रोजचा १६० किमी प्रवास एल एम एल सिलेक्ट टू या स्कुटरवर (१९९८ मॉडेल) केला आहे. या वाहनाचे ब्रेक अतिशय साधे आहेत आणि त्यांच्या भरोशावर किसिंग डिस्टन्स मेंटेन करुन वाहन चालविणे शक्य नाही. त्यामुळेच मला आता अचानक एबीएस डिस्क ब्रेक याची सवय स्वतःला लावताच येत नाहीये.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

सहमत. ज्या लोकांना अडथळ्याच्या आधी काही मिटर ब्रेक वापरण्याची सवय असते त्यांना डिस्क ब्रेकचे कचाकच दाबणे त्यामुळे पुढे तोल जाणे हे अडचणीचेच. मी ही त्यातलाच एक. डिस्क ब्रेकची दुचाकी अधूनमधून चालवत असल्याने त्या ब्रेकिंगची सवय व्ह्यायला वेळ लागतो !

In reply to by चौथा कोनाडा

हात कापला तर ती चूक धारदार सुरीची नसून वापरणार्यांची आहे. डिस्क ब्रेक हे ड्रम ब्रेक पेक्षा जास्त परिणामकारक असतात म्हणूनच एकाच गाडीचे डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक व्हर्जन पण असते आणि अर्थात डिस्क ब्रेक साठी जास्त पैसे मोजावे लागतात. ए बी एस हि त्याच्या पुढची पायरी आहे ( antilock braking system) मुळे जीव वाचतात हि वस्तुस्थिती आहे. https://www.cartoq.com/abs-saves-lives-5-times-motorcycle-abs-saved-the… डिस्क ब्रेक कचाकच लावणारे चूक आहेत म्हणून ते खापर डिस्क ब्रेकवर फोडणे हीच मूलभूत चूक आहे.

In reply to by सुबोध खरे

डिस्क ब्रेक कचाकच लावणारे चूक आहेत म्हणून ते खापर डिस्क ब्रेकवर फोडणे हीच मूलभूत चूक आहे.
हे खापर कोणी फोडलंय?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

याचं कारण असं की मी डिस्क ब्रेकच्या भरोशावर फारसा विसंबून राहत नाही डिस्क ब्रेकची सवय नाही त्यामुळे त्याच्यावर विसंबून राह्यचं धाडस होत नाही. इतर चालक जसे पुढच्या वाहनाच्या अगदी जवळ गेल्यावर ब्रेक मारतात तसे करायला मला प्रचंड भीती वाटते. मी आपला पन्नास फूट अलीकडीच ब्रेक मारतो पुण्यात पन्नास फूट अगोदर ब्रेक लावला तर तुमच्या आणि पुढच्याच्या मध्ये ७-८ वाहने तरी घुसतील आणि तुम्हाला दोन्ही पाय बाजूला ठेवूनच स्कुटर चालवायला लागेल एल एम एल सिलेक्ट टू या स्कुटरवर (१९९८ मॉडेल) केला आहे. या वाहनाचे ब्रेक अतिशय साधे आहेत आणि त्यांच्या भरोशावर किसिंग डिस्टन्स मेंटेन करुन वाहन चालविणे शक्य नाही. त्यामुळेच मला आता अचानक एबीएस डिस्क ब्रेक याची सवय स्वतःला लावताच येत नाहीये. हि सर्व आपलीच विधाने आहेत ना? मग उगाच कचाकच हा शब्द नाही म्हणून छिद्रान्वेषी पण कशाला करताय? आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला झेपत तर नाही परंतु मीच हुशार

In reply to by सुबोध खरे

स्वतःला सवय नाही हे मी मान्य केलं तर मी आधुनिक तंत्रज्ञानावर खापर फोडल्याचं कसं सिद्ध होतं? मला सवय नाही कारण असे वाहन अजून मी खरेदीच केलेले नाही. इतरांचं वाहन ट्रायल / टेस्ट राईड करिता चालवताना मला जपूनच चालवावं लागणार. स्वतः खरेदी करुन चालवेल तेव्हा कदाचित वेगळी परिस्थिती असू शकेल.

मुंबई पुण्यात वाहन चला ग्रीन सिग्नल होण्याची पण वाट बघत नाहीत.अगदी उतावीळ झालेले असतात. त्या मुळे सर्व गाड्यांचा 0 ते 30 पर्यंत जो pickup असतो.तो खूप कमी करून 1km per hour ह्या हिशोबात च ठेवावा. खूप बेशिस्त पण वाढला आहे.

सुबोध खरे आणि चेतन खरे साहेबांच्या जुगलबंदीत मुळ विषय काय हेच विसरायला झाले :) मग पुन्हा लेखाचे शीर्षक वाचले.

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे आणि चेतन खरे साहेबांच्या
नाही हो खरे ते एकटेच (त्यांच्यामते जगात एकटेच) मी मात्र चेतन सुभाष गुगळे. चेतन खरे नव्हे.

क्लासिक लिजेंड्स ची येझदी रोडस्टर ही ३३४ सीसीची बाईक घेतली आहे. बाईक सोबत २४ महिने / २४००० किमी अशी वॉरंटी आहे. त्याचप्रमाणे मी एक्स्टेंडेट वॉरंटी घेतली असल्याने आता एकूण वॉरंटी ही ४८ महिने / ५०००० किमी आहे. सात महिन्यांमध्ये बाईक चार हजार किमी चालवून झाली आहे. कालावधी आणि अंतर फारसे नसल्याने उत्पादक कंपनी, बाईक आणि वितरक व त्यांची सेवा दुरुस्ती इत्यादींबद्दल इतक्यातच कोणताही अभिप्राय देणे मला उचित वाटत नाही. वाठार तर्फ वडगाव (कोल्हापूर) ते रावेत (पिंचिं - पुणे) हा प्रवास तीन तासांत सलग पूर्ण केला. सरासरी वेग ताशी ऐंशी किमी इतका राहिला. यात धोकादायक आणि खोटे असे काहीच नाही हे यावेळी कॅप्चर केलेल्या व्हिडीओ क्लिप्समधून सहज सिद्ध होईल. https://www.youtube.com/@velocityverified309/videos

In reply to by चेतन सुभाष गुगळे

ग्रेट! +१ आपली आणि आपल्या बाईकची कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे ! या प्रवासावर वेगळा धागा काढावा ही विनंती.

In reply to by चौथा कोनाडा

पण स्वतंत्र धागा काढावा इतका काही हा प्रवास उल्लेखनीय नव्हता. तेव्हा पुन्हा कधीतरी...

In reply to by चेतन सुभाष गुगळे

ठीक आहे. तुमचा "कोल्हापूर-पुणे, ३ तासात" हा येझदी रोडस्टर बाईक वरून हा व्हिडिओ यू ट्यूब वर नुकताच पाहिला,.... भारी आहे !

डिस्क ब्रेक आणि ए बी एस वाली गाडी चालवून आता कसं वाटतंय ते सांगा. एल एम एल आणि येझदी रोडस्टर मधला फरक किती जास्त आहे हे आता तुम्हाला जाणवले असावे. अचानक दगड / खड्डा/ माणूस आलेला असता पटकन ब्रेक मारल्यावर गाडी घसरत नाही कि तशी भीती वाटत नाही हे आता आपल्याला जाणवले असावे. येझदी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायक गाडी आहे आणि रस्त्यावर स्थिर राहते. अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद. हा फरक अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. पण चटकन या तंत्रज्ञानावर भरोसा ठेवत केवळ चाचणीच्या पाच दहा किमी अंतरात वाहनाचा वेग जास्त ठेवायची हिंमत होत नव्हती. आता सराव झाल्यावर ऐंशी - नव्वद चा वेग सहज पकडता येतो आणि त्यावर सलग वाहन चालविता देखील येते आहे. अर्थात एक महत्त्वाचा जाणवलेला फरक आणि ज्यांना ठाऊक नसेल त्यांच्या करिता सावधगिरी म्हणून हा माझा अनुभव - पार्किंगमध्ये गाडी लावताना मी इंजिन कधीच सुरू ठेवत नाही. ते जे काही दहा पंधरा मीटर अंतर वाहन मागे पुढे / डावी - उजवीकडे करायचे असेल ते वाहनावर न बसता वाहनाच्या डाव्या बाजूने ते धरत हाताने ढकलूनच करतो. अशा वेळी अनेकदा पुढचा ब्रेक मारावा लागतो कारण तो उजव्या हातात असतो. मागचा ब्रेक पायाने वापरायचा असल्याने तो वापरता येत नाही. हे जेव्हा मी माझ्या जुन्या बुलेट किंवा एलएमएल स्कूटर बाबत करायचो तेव्हा काहीच अडचण यायची नाही. येझदी रोडस्टर सोबत हे करताना चुकून जरी पुढचा ब्रेक जास्त जोरात दाबला गेला तर गाडी घसरुन पडायची शक्यता असते कारण डिस्क ब्रेक हा चटकन लागतो (शिवाय पार्किंगमध्ये सिरॅमिकची फरशी आहे) आणि वाहन हाताने ढकलताना आपण लावलेल्या बलामुळे वाहनाचा जो काही पाच दहाचा वेग असतो तो त्वरीत शून्यावर येतो कारण या वेगाला डिस्क ब्रेक जरी काम करीत असले तरी एबीएस बंद असते त्यामुळे वाहन कमी वेगात असताना पुढचा ब्रेक लिवर दाबू नये तर त्याला दोन बोटांनी केवळ अलगद स्पर्श करावा.

https://youtu.be/XBVEbS1pnxw Counter Steering Technique Details in Marathi काउंटर स्टीअरिंग तंत्रज्ञान मराठीत सविस्तर Counter Steering Technique Details in Marathi Hope understanding this technique will help in improving driving skills and minimising the chances of accidents. काउंटर स्टीअरिंग तंत्र मराठीत सविस्तर हे तंत्र समजून घेणे वाहन चालविण्यातील कौशल्य सुधारण्यास आणि त्यायोगे अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदतीच ठरेल अशी आशा आहे