उडु - उडी उड्डाण ते पाणी आणि वनस्पती नाम
महाराष्ट्रीय गुढी परंपरेच्या अभ्यासाच्या निमीत्ताने प्राचीन काठीपुजांच्या दुव्यांचा अधून मधून धांडोळा घेत असतो. गुढी या शब्दाचा मुळ अर्थ काठी कसा आहे आणि कुडी शब्दाशी असलेला संबंध मी माझ्या मागील गुढी उभारनी या लेखाच्या माध्यमातून करुन दिला होता. कर्नाटक आणि ओडीशा या दोन्ही ठिकाणी मंदिर आणि देवालयांसाठी 'गुढी' शब्द बर्यापैकी प्रचलीत आहे. याचा अर्थ दगड वीटांच्या मंदिरांचा विकास होण्यापुर्वी उघड्यावर दिसणारे सर्व साधारण दगड , वृक्ष तसेच काठी यांची पुजा होत असणार.