मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषा

चिवताई आणि कावळ्याची गोष्ट : मराठी भाषेत ???

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(भाषा एका नदी सारखी आहे, सोबतीचे नदी, नाले समाहित करून सतत पुढे जाणारी- दिल्लीतली एक आई आपल्या बाळाला गोष्ट सांगत आहे) एक होती चिव. तिचे काय नाव होते, स्पैरो. एक होता काऊ त्याचे नाव होते क्रो. एकदा काय झाले. काऊचा बंगलो पाऊसात डेमज झाला. काऊ चिवताईच्या घरी गेला आणि दार वाजवले, "स्पैरो स्पैरो ओपन द डोर". स्पैरो म्हणाली, "थांब मी आपल्या बाळाची मालीशी-मालीशी करते", प्लीज वेट. थोड्या वेळानी क्रो पुन्हा दार वाजविले, "स्पैरो स्पैरो ओपन द डोर". "थांब मी आपल्या बाळाची न्हाई न्हाई करते", प्लीज वेट.

भारतातील भाषासमृध्दी

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे 2011 च्या जनगणनेच्या अहवालानुसार भाषिक आकडेवारी तब्बल सात वर्षांनी म्हणजे आत्ताच जून 2018 च्या शेवटी प्रकाशित करण्यात आली. भारतात एकूण बोलल्या जाणार्‍या भाषा 19,569 असल्याचं उघड झालं. (आताचे भाषाशास्त्र बोली आणि भाषा असा फरक करत नाही. जी बोली बोलली जाते ती भाषाच असते.) भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात ही इतर देशांच्या तुलनेने डोळे दिपावणारीच बाब आहे. (अनेक लहान भाषा दिवसागणिक नामशेष होताहेत या पार्श्वभूमीवर ही एक चांगली बातमी.

प्रवाहीत ती भाषा...

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे मराठी भाषा म्हणजे शेतीप्रधान ग्रामीण पायाभूत शब्दांची आणि बारा बलुतेदारांची सहज पारंपरिक मौखिक संपदा, जी काही शतकांपासून ग्रांथिक आणि प्रमाणभाषा झाली. मराठी भाषेचा हा पट्टा म्हणजे शेतवाडी आणि शेतीसाठी लागणार्‍या वस्तूंच्या उपयोजनाची भाषा. शेतीबाडीची आणि ग्रामीण राहणी साहणीची भाषा जेव्हा समजण्यापलीकडे जाईल तेव्हा कृषी प्रधान मूळ लोकसंस्कृती आणि पर्यायाने मराठी भाषेचा प्रवाह नवे वळण घेऊ लागेल. विशिष्ट परिसरात बोलली जाणारी भाषा एकच असते. ती विशिष्ट नावाने ओळखली जाते. जशी मराठी.

मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक! मी: "एक कणीस भाजून दे!" मला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, "फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको!" पण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती.

बागेतले आवाज

जेडी ·
लेखनविषय:
रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते .

माझा आजोळ बेळगाव २

स्वप्निल रेडकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेळगाव म्हटलं कि खूप साऱ्या गोष्टी माझ्या मनाभोवती रुंजी घालू लागतात. कॅलिडोस्कोप सारखा वेगवेगळ्या आठवणी,माणसं ,जागा ,चवी नॉस्टॅल्जिक बनवतात .

गणपत वाणी, सतत मागणी

शिव कन्या ·
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

"चव नै न ढंव नै सोंगाडी"

आर्या१२३ ·
लेखनप्रकार
"चव नै न ढंव नै सोंगाडी" - २०१६च्या युनिक फिचर्सच्या 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली अस्मादिकांची अहिराणी कथा ******** शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां. पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड.

मराठी दिन २०१८: धुयानी होयी नी धुयवड (अहिराणी)

आर्या१२३ ·
धुयानी होयी नि धुयवड लोकेसहो! धुयवड खेयनात ना! आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस. मन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये. आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे इशेष शे. म्हंजे पाहा, हाई माशाना काटा र्हास ना तसा धुयाना मझार पारोया रोड जास. त्याले लागून काटकोनमा पह्यली गल्ली, २री गल्ली(तेली गल्ली) ४थी, ५वी, ६वी, ७वी गल्ली शेतस. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजेत. सहावी गल्लीना एक साईडले माधवपुरा. बठठा.... काय म्हंतस त्याले संवेदनशील भाग बरं!! गल्लींन एक टोकले सुभाषनगर. म्हणजे जुन धुळे. जुन धुयामा खुनी मस्जिद.

मराठी दिन २०१८: मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू!!

सूड ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू!!

इथे मिपावर मराठी भाषादिनानिमित्त लिहायचं निघालं आणि कधी नव्हे तो माझ्या मेंदूने बंद पुकारला. का विचारावं तर कारणं सतराशे साठ आहेत. पण याआधी असं कधी झालेलं आठवत नाही. आता पण लिहायला बसलोय खरा पण शेवट कसा होणाराय माहित नाही. त्यात इथे पुण्यात राहणं म्हणजे सगळीकडे एकतर साजूक तुपातलं शुद्ध पुणेरी मराठी किंवा मावळी बोली! अध्ये मध्ये काहीच नाही. इथे प्रत्यक्ष विचारल्याशिवाय फक्त लग्नपत्रिकेतल्या मुक्काम पोस्टावरून कळतं माणूस कुठल्या गावचा आहे. एरवी भाषा वर म्हटल्यासारखी दोन टोकाची.