मित्रमंडळांची नावे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Sep 2025 - 6:13 pm

ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली.
त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा.
पुढचे शब्द गविं आहेत.

मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता.

संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ...

एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते. रक्तगट नव्हे, मंडळ.

दुचाकी वाहने, विशेषत: बुलेट, हिच्यावर तर खूनखराबा किंवा टोळीयुद्ध हवेच.

माफिया असा इंग्रजी स्टिकर, कवटी चिन्ह, उगारलेला चाकू आणि त्यातून रक्ताच्या थेंबाची धार. एकमेकांना क्रॉस करणाऱ्या बंदुका वगैरे अशी प्रतीके.

हे सर्व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील निरीक्षण, पुण्यापर्यंत.

सांगलीहून कोल्हापूरला जायच्या रस्त्यावर अतिशय देवस्थान म्हणून पाटी बघितली होती.
मुंबईत चेंबूरला वाघोबा मित्रमंडळ म्हणून एक नवरात्रीचा मांडव बघितला होता ( चं सु कु)

“अचानक” मित्र मंडळ! अशी दोन मंडळे मी पाहिली, मित्रमंडळाचे नाव “ अचानक” का असावे? अचानक असे नाव असते? की अचानक ठरले मंडळ स्थापावे? म्हणून मंडळाचे नाव अचानक? :) ( अ बा.)

अ नगरला एक पाटी " अचानक तरुण मंडळ " अशी पाहिली होती.
तुम्ही पाहिली असलेली एखादी मजेशीर पाटी ( मित्र मंडळाचे नाव) सांगा.

वावरप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

15 Sep 2025 - 6:37 pm | विजुभाऊ

अहमदनगरला एक बोर्ड पाहिला होता " अचानक तरुण मंडळ"
वाचून खूप हसलो होतो. कदचित ज्या तरुणाना आपण तरुण झाल्याची जाणीव अचानक झाली असेल असे तरुण यात असतील
यावरून एक शेर आठवला
जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा
हया यकलख़्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता

कानडाऊ योगेशु's picture

16 Sep 2025 - 10:03 am | कानडाऊ योगेशु

अचानक सारखेच मी सोलापुरात चक्क एकाएकी तरुण मंडळ असे नाव वाचले आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Sep 2025 - 9:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुण्यात "प्रतिष्ठाण" चे पेव फुटले आहे. गोल्डन ग्रुप, वाय एस ग्रुप, एस पी ग्रुप वगैरे आहेतच. गोल्डन बॉईज, यंग सर्कल वगैरेही दिसतात. पण प्रतिष्ठाण म्हटले की कसे भारदस्त वाटते. काहीतरी मोठे समाजकार्य करतोय वगैरेसे वाटुन रस्ते अडवायला, मोठयाने डी जे लावायला, मोकळीक मिळते. त्यात अजुन पिवळे , निळे, भगवे झेंडे लावले की झालेच. मग कोणी आक्षेप घ्यायलाच येत नाही आणि आलाच तर........

प्रसाद गोडबोले's picture

16 Sep 2025 - 10:41 am | प्रसाद गोडबोले

प्रतिष्ठान

एकेठिकाणी असेच काहीतरी अमुक तमुक प्रतिष्ठान असे लिहिले होते . तेही इंग्रजीत , त्यात योगायोगाने जागा कमी पडल्याने काही अक्षरे वर काही खाली असे लिहिले होते.

P

Ratishthan.

"रतिस्थान"... ते वाचून एकदम LOL झाले . =))))

विजुभाऊ's picture

16 Sep 2025 - 11:56 am | विजुभाऊ

लैच खत्तरनाक.................

सौंदाळा's picture

16 Sep 2025 - 10:17 am | सौंदाळा

झिरो बॉईज चौक आहे पिंपरीत

नचिकेत जवखेडकर's picture

16 Sep 2025 - 1:19 pm | नचिकेत जवखेडकर

मीही `अचानक` लिहायला आलो होतो जे अबा यांनी आधीच लिहिले आहे. परंतु नंतर त्याच्या पुढच्या वर्षी `अचानक आणि भयानक मित्र मंडळ` असे बघितले होते.

सिरुसेरि's picture

16 Sep 2025 - 5:24 pm | सिरुसेरि

पाटाकडील तालिम मंडळ , स्टार टेक्सास ओलि भेळ अशीही नावे वाचली आहेत .

अभ्या..'s picture

16 Sep 2025 - 5:30 pm | अभ्या..

स्टार टेक्सास
गविराज येतेत आता.
त्यांची सांगली, लै लै चांगली.
.
पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.

रामचंद्र's picture

16 Sep 2025 - 6:38 pm | रामचंद्र

पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ), टीटीएम (तटाकडील तालीम मंडळ), केटीएम (खंडोबा तालीम मंडळ), टीएमटीएम (तुकाराम माळी तरुण मंडळ)... सर्व कोल्हापूर!

गवि's picture

17 Sep 2025 - 12:16 pm | गवि

स्टार टेक्सास
गविराज येतेत आता.

तुमने पुकारा और..

आलोच.

टेक्सास ओली भेळ. वाह.. मुंबईचे लोक भेळ बनवण्यात एकदम कंडम. चपटे भाजक्या पोह्यासारखे ते कुरमुरे आणि मुख्यतः शेव. फरसाण नाही.. पापडी नाही. मजा नाही.

पण सांगली चांगली असली तरी आमची फारशी नव्हे. काही काळ तिथे उष्टे सांडले हे खरे आहे. पण तसे खूप इतर गावांत देखील सांडले. आमचे मूळ ठिकाण आणि ऋणानुबंध कोंकणाशी...

तिकडे मित्र मंडळ प्रस्थ मी असेपर्यंत तरी जाणवले नव्हते.

श्वेता२४'s picture

16 Sep 2025 - 6:33 pm | श्वेता२४

आबा कावत्यात असे एक मित्रमंडळ आहे...

श्वेता व्यास's picture

18 Sep 2025 - 10:10 am | श्वेता व्यास

खिक्क, पुण्यामध्ये या धर्तीवर 'बाबा ओरडतात' काढायला हरकत नाही :D

संजय पाटिल's picture

18 Sep 2025 - 12:27 pm | संजय पाटिल

आमचच ते...
गावभाग नदिवेस...

श्वेता२४'s picture

20 Sep 2025 - 10:57 pm | श्वेता२४

तुम्ही गावभागातले का?

संजय पाटिल's picture

8 Oct 2025 - 3:00 pm | संजय पाटिल

हो!
माफ करा पण आजच बघितला प्रतिसाद.
नाईक वाड्याजवळ घर आमचं... नरसोबा कट्टा...
पण सध्या कोल्हापूरला असतो.
आपण पण इचलकरंजी कर का?

विजुभाऊ's picture

16 Sep 2025 - 6:40 pm | विजुभाऊ

नगर मधे " खुंट" असा काहीतरी प्रकार आहे.
रामचंद्र खुंट हे एका चौकाचे नाव आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2025 - 7:29 pm | अमरेंद्र बाहुबली

धुळ्यातही चौकांना खुंट असे नाव आहे, किसन बत्तीवाला खुंट असे एक चौकाचे नाव आहे. कुणाला तरी विचारले होते खुंट हा काय प्रकार तर कळले की चौकात मोकळ्या जागेत जनावरे बांधली जायची त्यांचे खुंट तिथे होत्र म्हणून!

Bhakti's picture

17 Sep 2025 - 10:43 am | Bhakti

+१

युयुत्सु's picture

17 Sep 2025 - 8:05 am | युयुत्सु

अचानक तरूण मंडळ पुण्यात पण आहे. पौडफाट्याला त्यांचा गणपती असतो.

एका जिमचं नाव होतं "यश बॉडी टेम्पल" आता मन नाही शरीरही एक मंदिर!

अनन्त्_यात्री's picture

18 Sep 2025 - 11:38 am | अनन्त्_यात्री

वॉशिंग मशीन भाजपेयी + सिंचन घोटाळी राष्ट्रवादी + खोकेसेना यांत विखुरलेल्या माझ्या काही मित्रांना एकत्र करून सर्व धर्मीय सण - समारंभ धूम धडाक्यात साजरे करण्याच्या सद् हेतूने दसऱ्याला "तीन तिगाडा मित्र मंडळ" स्थापन करीत आहे. सर्वांनी समारंभाला यायचं हं. ("हो - बहिरा डी जे मंडळाचा" डी जे अभ्यागतांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ठेवलाय)

सुधीर कांदळकर's picture

21 Sep 2025 - 9:49 am | सुधीर कांदळकर

मस्त करमणूक.

कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली नीट पत्ता सांगेना म्हणून पत्ता विचारायला गाडीतून खाली उतरले.. पत्ता विचारल्यावर सहज बेकरीचे नाव वाचले..ते होते 'अदृश्य बेकरी!'

आमच्या इथे सार्वजनिक स्वच्छता गृहाचं नाव.. आकांक्षी स्वच्छता गृह......