जनातलं, मनातलं

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Sep 2017 - 17:25

बाबा-बुवांचे सामाजिक काम

- डॉ. सुधीर रा. देवरे

उपेक्षित's picture
उपेक्षित in जनातलं, मनातलं
15 Sep 2017 - 13:22

पाऊस, भूमी आणि मैथिली


पाऊस, भूमी आणि मैथिली


विस्कळीतपणे मांडले आहे गोड मानून घ्या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

कधीपासून पावसाची झड लागलीये, *हा कोकणातला पाऊस सुद्धा इथल्या माणसांसारखाच वेडा, एकदा जीव टाकला कि पूर्ण बरसूनच जाणार*..

Naval's picture
Naval in जनातलं, मनातलं
14 Sep 2017 - 19:55

फासले ऐसे भी होंगे...

आमचा ग्रॅफोलॉजीचा (हस्ताक्षर व सही याचा अभ्यास ) क्लास चालू होता . सरांनी आम्हाला प्रत्येकाला एक कोरा कागद दिला आणि काहीही मुक्तपणे लिहायला सांगितलं त्यावर आपलं नांव न टाकण्याचीही सूचना दिली . नंतर ते पेपर्स गोळा करून त्यांनी मधूनच कुठलाही पेपर काढून त्याचं अनालिसिस कसं करायच हे समजवायला सुरुवात केली.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
14 Sep 2017 - 19:53

मान गए पंतवैद्य...

काल रात्री युट्युब वर नेहमीप्रमाणे कथाकथनांचे व्हिडीओज बघत असताना Up next मध्ये व.पु.काळेंचा 'पंतवैद्य' हा व्हिडीओ दिसला.

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
14 Sep 2017 - 17:52

उदय कॉर्लिग्झम्सचा भाग २

भाग 1( http://www.misalpav.com/node/40857)

आपल्या परिवाराला आपण धर्मामुळेच गमवावे लागले अशी भावना मायकलमदधे मुळ धरु लागली होती. त्या दिवशी आपण त्या धर्मस्थळी जायला नको होते हा विचार त्याला पोखरुन टाके.

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
14 Sep 2017 - 16:25

गच्ची वरुन...

Epppie.... चिनी गुलाबाचे सीड्स मागवली होती अम्माजानकडुन. पावली नुकतीच. आता ५० बीयापासुन किती रोपं बनताय बघुयात. लगे हातो नर्सरीत चक्कर टाकुन आलो. तर तिथंही त्यानं चिगुची रोप लावलीयेत नुकतीच. अचानक मागणी वाढली म्हणे.

आमच्या गच्चीवरील बाग प्रेमी मंडळाची देखिल तुफान चर्चा सत्र होतायेत. फुलांचे नवनवे रंग तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संवाद, संपर्क , समन्वय सुरु झालाय.

प्रतिक कुलकर्णी's picture
प्रतिक कुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Sep 2017 - 14:16

निरोपाची आठवण

फायनल इयर हा कॉलेजलाईफ मधला एक वेगळाच काळ असतो. सीनियर्सना फेयरवेल देऊन झाली कि, आपलाही शेवट जवळ आल्याची जाणीव होऊ लागते. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी पटापट जमा करण्याचा असा का काळ. सगळ्यांना मैत्रीचचं भरत येत असत. गेल्या तीन वर्षांमध्ये निर्माण झालेल्या ऋणानुबंधांची खास काळजी घेतली जाते. लांब गेलं तरी तुटू नये म्हणून त्यांना अगदी घट्ट करण्याचा प्रयत्न नकळतपणे चालू असतो. वर्गात अभूतपूर्व एकी निर्माण होऊ लागते. सगळे वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येऊन, एकच मोठ्ठा ग्रुप तयार होतो. कॉलेजच्या पार्किंगमध्ये रेंगाळण वाढत. दर चार दिवसाआड कुठेना कुठे जायचे प्लॅन्स ठरत असतात.

दिपक लोखंडे's picture
दिपक लोखंडे in जनातलं, मनातलं
13 Sep 2017 - 22:15

संघर्ष : भाग ०२

भाग ०१ पासून पुढे.

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
13 Sep 2017 - 16:23

सोने : चकाकती प्रतिष्ठा !

सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.

दिपक लोखंडे's picture
दिपक लोखंडे in जनातलं, मनातलं
12 Sep 2017 - 23:31

संघर्ष : सुरुवात.

०५ ऑगस्ट
सकाळी : ७ वा.

mayu4u's picture
mayu4u in जनातलं, मनातलं
12 Sep 2017 - 15:21

एका वेडाला पुनश्च सुरुवात!

“मी पुन्हा सायकलिंग सुरु करणार आहे!" (भीत भीत) अस्मादिक.

“उत्तम कल्पना! चांगलीशी सायकल घे आणि सुरु कर.” तीर्थरूप. (चेहऱ्यावर sadist हसू)

“शाळेत पण नाव घालूया का?” सौ.

“किती पैसे उडवणार आहेस?” मातोश्री.

“साधारण १५ - २० हजार" (पडलेल्या आवाजात) मी.

“एवढे? त्यापेक्षा बँकेत ठेव!” (अर्थातच) मातोश्री.

“त्यापेक्षा घरी टीव्ही घे!” (फणकाऱ्याने) सौ.

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
12 Sep 2017 - 11:17

निरभ्र आकाशातील ' मृग नक्षत्र'

'ओरायन ' म्हणजे खगोलीय भाषेत काय ?

आपणांस माहित असेल कि जागतिक मान्यतेनुसार एकूण ८८ तारकासमूह (Constellation)आहेत.
जगात वेगवगेळ्या पुरातन संस्कृतीमध्ये, (जसे ग्रीक, प्राचीन सुमेरियन, चिनी, भारतीय) अनेक तारकांचा बनलेल्या समूहाला वेगवेगळी नावे आहेत. तसेच त्यांची संख्या वेगवेगळी आहे. शिवाय तारकासमूहांतील ताऱ्यांची संख्या पण कमीअधिक आहे. आपल्याकडे नाही कां २७ नक्षत्रे आहेत ?

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Sep 2017 - 23:01

नाल !

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नाल….

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
11 Sep 2017 - 17:09

अमर फोटो स्टुडियो

एकाच मराठी नाटकांत दोन सत्रात , वर्तमानकाळ - भूतकाळ - भविष्यकाळ आणि डबल रोल ला फोडणी दिलेलं एक नाटक ज्यात "प्रेम" नाही.

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Sep 2017 - 12:45

१/१/२१०२, स.न.वि.वि.

बापरे ! काय धूळ पडली आहे या पेटीवर. सुमारे एक चौरस फूट आकारमान असलेली ही लोखंडी पेटी मागच्या शतकात कधी तरी या भिंतीत ठोकून बसवली होती. आता ती प्रचंड गंजली आहे आणि तिला बरीच भोकेही पडली आहेत. ती कुलूपबंद आहे खरी पण तिच्या किल्लीने ती उघडेल की नाही याची शंका आहे. एके काळी तिच्यावर तिच्या घरमालकाचे नाव रंगवलेले होते. आता ते नाव वाचण्यालायक राहिलेले नाही.

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in जनातलं, मनातलं
11 Sep 2017 - 06:30

दिवाळी अंक २०१७ - दृकश्राव्य विभाग - आवाहन

नमस्कार मिपाकरहो!

"गोष्ट तशी छोटी.." आणि मिपा दिवाळी अंकाचे काही तरी ऋणानुबंध असले पाहिजेत. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात "गोष्ट.."ची घोषणा झाली होती. यंदा सुद्धा दिवाळी अंकासाठी सासं आणि "गोष्ट ..." टीम पुन्हा एकत्र आले आहेत.

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
10 Sep 2017 - 20:25

हाफ चड्डी गँग (पार्ट -२)

हाफ चड्डी गँग (पार्ट -१)

संध्याकाळचे सात-साडेसात झाले असतील. देवापुढे दिवा लावून आज दिवसभरात लावलेल्या दिव्यांची उजळणी करत होतो. मला अगदी स्पष्ट आठवतंय शुभंकरोतीच्या एकूण शृंखलेतील शेवटचा श्लोक गात(वाचा रेकत) होतो. मी म्हणत होतो की,

"सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो"

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
9 Sep 2017 - 13:50

विचारांतील सातत्य

हे आताशा नेहेमीचेच झाले आहे. गणेशोत्सवाच्या अगोदर अगदी मधाळ लेखणीने लिहिल्यासारखे काही ठराविक वर्तमानपत्रातून येणारे लेख. सुख आणि मांगल्याचे प्रतीक असणारा उत्सव. उत्सवाच्या अगोदर बाजारपेठेचा कानोसा. मागील वर्षापेक्षा १० ते १५% भाववाढ. रोषणाईचे कोणते नवे प्रकार बाजारात आले आहेत त्याची माहिती. प्रतिष्ठित मंडळांच्या आरशींची माहिती आणि पदाधिकारांच्या मुलाखती.

दिपक लोखंडे's picture
दिपक लोखंडे in जनातलं, मनातलं
9 Sep 2017 - 08:53

पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).

भाग ०१ पासून पुढे.....

( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली )