चिल्ड्रन ऑफ हेवन

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
30 Jun 2009 - 11:48 am

जागतीक चित्रपटांमध्ये एक मानाचे स्थान पटकावुन असलेला हा इराणी चित्रपट. सुंदर ह्या शब्दाशिवाय अन्य उपमाच ह्याला शोभणार नाही.

बहिण भावाच्या प्रेमाची एक निर्व्याज कथा आणी त्याच्या आजुबाजुने येणारे भावनीक प्रसंग, त्या त्या काळचे सामाजीक संदर्भ हा ह्या चित्रपटाचा आत्मा. दिग्दर्शक माजिद माजीदी सारखा ताकदवान माणुस. चित्रपटाची भाषा पर्शीयन आहे पण खरे सांगायचे तर ह्या चित्रपटाला बघताना भाषेची गरजच जाणवत नाही इतकी प्रत्येक फ्रेम हृदयाचा ठाव घेते.

अली आणी झारा हे दोघे भाउ बहीण. अली ९ वर्षाचा तर धाकटी झार ७ वर्षाची.

सुरुवातीच्या दृष्यातच अली आपल्या बहिणीचे दुरुस्तीला नेलेले बुट परत घेउन येत असताना दिसतो, बाजारात तो एका दुकानात काही सामान खरेदी करायला थांबतो. दुकाना बाहेर त्याने ठेवलेले बुट तो खरेदी करुन येइपर्यंत गायब झालेले असतात. तो खुप शोध घेतो पण हाती लागते शुन्य. हि बातमी कळल्यावर झारा रडवेली होते कारण तिच्यापाशी शाळेत जायला दुसरे बुटच नसतात. आई बाबांना काही सांगु नको मी शोधतो तुझे बुट असे सांगुन अली पुन्हा शोध मोहिम राबवतो.

ह्या प्रसंगात दोरीवरचे वाळत घातलेले कपडे घरात नेत असताना झाराला सगळ्यांचे बुट दिसतात पण त्यात आपले बुट नाहीत हे बघुन तिच्या चेहर्‍यावर जे भाव उमटतात ते त्या क्षणी आपल्याला तिच्या भुमीकेत शिरवतात, आता आपल्याला आपलेच बुट हरवल्यासारखे वाटायला लागते.

आपल्या गरीबीची जाणीव असलेला अली झाराला म्हणतो की "तुझे बुट हरवले हे आई बाबांना सांगु नको ते मला मारतील, खरतर मी माराला भिउन हे सांगत नाहिये पण ते खुप गरीब आहेत ग, त्यांच्याकडे नवीन बुट घ्यायला पैसे नाहीत हे तुझ्या लक्षात येतय का?" खरच सांगतो त्या ९ वर्षाच्या मुलाचा हा समजुतदारपणा खाडकन कुठेतरी माझ्या मुस्काडीत मारुन गेला. त्याच्या ह्या वाक्यानंतर संमती दर्शक भाव आणत गप्प बसलेल्या चेहर्‍याचा झाराचा क्लोज अप तर निव्वळ अ प्र ती म.

आता अली ह्या अडचणीवरही उपाय शोधुन काढतो, झाराची सकाळची शाळा आहे तर अलीची दुपारची. झाराने अलीचे बुट घालुन शाळेत जायचे, मग शाळा सुटल्या सुटल्या झाराने पळत पळत यायचे आणी गल्लीच्या तोंडापाशी तिची वाट बघत असलेल्या अलीने आपले बुट घालुन शाळेकडे निघायचे. आता आपणही त्यांच्यात येव्हडे रंगुन गेलेलो असतो की झाराबरोबर आपणही सुसाट धावत असतो. ती पळताना कुठे पडु नये, तो ही शाळेत वेळेत पोचावा अशी आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो, अक्षरश: आपण त्या बहिण भावांबरोबर एकरुप होउन जातो. हेच आहे माजीदीच्या चित्रपटाचे खरे यश.

एका प्रसंगात तो फुटबॉल खेळुन दोन्ही बुट चिखलानी अगदी बरबटुन आणतो, ते बुट मग दोघेही स्वच्छ धुतात पाण्याचे फुगे करुन उडवतात तेंव्हा आपणही तो अनंद मनसोक्त लुटुन घेतो.

शाळेतल्या झाराच्या एका मैत्रीणीचे बुट तीला खुप आवडत असतात, आता ती मैत्रीण नवे बुट घेते, "जुन्या बुटाचे काय केले ग ?" ह्या झाराच्या प्रश्नावर ती मैत्रीण सहजपणे भंगारवाल्याला दिले असे सांगते, तेंव्हा ज्या रागारागात झारा "का?' असे विचारते ते दृष्य बघण्यासारखेच. मला का नाही दिले ते जुने बुट ? असा विचार भावाचे बुट घालुन धावणार्‍या झाराला नक्की पडला असणार.

शाळेच्या चाचणी परिक्षेत भावाला वेळ मिळावा म्हणुन वेळे आधीच पेपर देउन झारा घराकडे पळत सुटते, मात्र दुर्दैवाने तिच्या पायातला एक बुट ओढ्यात पडतो आणी त्याक्षणी आपले मन घाबरते, आता काय ??
ओढ्यात वाहणार्‍या बुटामागे झारा धावते आणी तिच्या मागे आपण. अडक बाबा कुठेतरी, नको तिचा अंत बघु ! आपण रागारागानी त्या बुटाला ठणकावतो. जणु आपले ऐकल्यासारखा तो बुट एका ठिकाणी अडकुन पडतो. आता मात्र झाराबाईंना रडु कोसळते. आपल्यामुळे भावाची परिक्षा बुडणार हे तीला अस्वस्थ करते. तेव्हड्यात तीचे रडे ऐकुन बाजुचा दुकानदार येउन तीला तो बुट काढुन देतो. कोण कुठला दुकानदार पण त्या क्षणी मी त्याला अगदी मनापासुन थॅंक्यु म्हणालो.

नंतरच्या एका प्रसंगात अली वडीलांबरोबर काम मिळवण्यासाठी शहरात जातो, मनासारखे कामही मिळते. सायकलवरुन येताना दोघेही पुढच्या खरेदीचे स्वप्न रंगवायला लगतात. त्यावेळीही "आपण सगळ्यात आधी झाराला नवीन बुट आणु" म्हणणारा अली पटकन डोळ्यातुन पाणी काढुन जातो.

आता अली एका धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतो. का ? तर त्या स्पर्धेचे तिसरे बक्षीस म्हणजे एक बुटांची जोडी असते. "पण तु तिसराच येशील कशावरुन?" ह्या झाराच्या प्रश्नाला तो "मला खात्री आहे म्हणुन" असे अगदी आत्मविश्वासाने उत्तर देतो.

शर्यत चालु होते... आपले बुट घालुन धावणारी, अडखळणारी झारा डोळ्यासमोर येते आणी अली अजुन जिवाच्या आकांताने धावत सुटतो. तो येव्हडा जोरात धावतो की पहिलाच येतो आणी अंतीम रेषेवर येउन कोसळतो. सगळे शिक्षक अलीला उचलुन घेतात, पण अलीला मात्र आपण तीसरा आलोय का नाही हे जाणुन घ्यायची उत्सुकता असते. आपण पहिले आलोय कळल्यावर तर त्याच्या दु:खाला पारावार राहात नाही. तो फोटोसाठी सुद्धा मान वर करत नाही.

दु:खी अली कसातरी घरी पोचतो, पायातले फाटलेले बुट तो फेकुन देतो. त्याच्या संपुर्ण पायावर फोड आले आहेत, रडत रडत तो ते पाय पाण्यात सोडुन बसतो. रडणार्‍या भावासाठी झारा त्याच्याकडे धावते.

त्याच क्षणी कॅमेरा फिरतो आणी आपल्याला सायकलला बुटांचे दोन नविन जोड लावुन घराकडे परतणारे त्या दोघांचे वडील दिसतात.

ह्या इथेच चित्रपट संपतो.

खरेतर ह्या चित्रपटावर काय बोलु ? तुम्ही हा बघावा आणी एक नितांत सुंदर वेगळा अनुभव घ्यावात ही इच्छा.

अवांतर :- ह्या चित्रपटाचे सिंगापुरमध्ये "होम रन" नावाने केलेले रुपांतरही अप्रतीम.

कलासंस्कृतीसमाजजीवनमानचित्रपटप्रतिभा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2009 - 11:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर चित्रपटपरीक्षण. :-)
परा, कुठून मिळवायचे रे हे विदेशी चित्रपट?

टारझन's picture

1 Jul 2009 - 10:51 pm | टारझन

क्लासिक !!! लय भारी लिवलास भो १!! येवडा भारी की आता पिक्चर पहायची गरज नाय .. पाहिला तरी पिक्चर दुसर्‍यांदा पाहातोय असं वाटेल !!!

- दंतकथेतील टाराजकुमार

यशोधरा's picture

30 Jun 2009 - 12:02 pm | यशोधरा

ह्या चित्रपटाच्या कथेविषयी आधीही वाचले होते. चित्रपट बघायला आवडेल, पण अदितीसारखाच प्रश्न पडला आहे, की कुठून मिळेल पहायला? :?

नंदन's picture

30 Jun 2009 - 12:07 pm | नंदन

चित्रपट आहे हा. कुठेही उगाच हळवा किंवा बायकांच्या ऑड्यन्सला रडवण्याचा प्रयत्न न करताही प्रेक्षकाला कथानकात सामील करून घेणारा. लेखात लिहिल्याप्रमाणे सबटायटल्सची अजिबात गरज भासू नये असा. (उलट अधूनमधून ओळखीचे फारसी शब्द कानावर पडतात.) परारावांचे परीक्षणही चित्रपटाला न्याय देणारे. अतिशय उत्तम!

गूगल व्हिडिओवर हा चित्रपट पाहता येईल - भाग १ आणि भाग २. याच दिग्दर्शकाचा 'कलर ऑफ पॅराडाईज'ही सुरेख आहे, असं ऐकून आहे. मिपाकरांपैकी कुणी पाहिला असल्यास त्याबद्दल वाचायला आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्राची's picture

30 Jun 2009 - 12:07 pm | प्राची

सुंदर परीक्षण.चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.
पण वर विचारल्याप्रमाणे प्रश्न आहे,कुठून मिळवायचा?

सहज's picture

30 Jun 2009 - 12:09 pm | सहज

खूपच छान सिनेमा आहे. उगाच रडवायचे म्हणून केलेला सिनेमा वाटत नाही त्यामुलाच्या नजरेतुन घेतला आहे.

धन्यु परा.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jun 2009 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

युट्युबवर आहे ना उपलब्ध :)

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

30 Jun 2009 - 12:10 pm | घाशीराम कोतवाल १.२

>>परा, कुठून मिळवायचे रे हे विदेशी चित्रपट?

http://www.mininova.org/tor/1638491
हि घ्य लिन्क करा डाउनलोड मिनिनोव्हा टॉरण्टवरुन विथ ईग्लीश सबटायटल

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

विजुभाऊ's picture

30 Jun 2009 - 12:10 pm | विजुभाऊ

छान लिहिले आहेस रे परीक्षण परा.

गणा मास्तर's picture

30 Jun 2009 - 12:12 pm | गणा मास्तर

मी हा चित्रपट बहुतेक तुनळीवर पाहिला होता.
पहावाच असा चित्रपट आहे.
अली आणि त्याचे बाबा शहरातुन परत येताना त्यांच्या सायकलचा ब्रेक नादुरस्त होतात. त्यावेळी उतारावरुन जोरात जाणार्‍या सायकलवर आपणच बसलो आहोत असे वाटते.

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

विनायक प्रभू's picture

30 Jun 2009 - 12:17 pm | विनायक प्रभू

परा आणि परिक्षण मस्त
मला वाटले की परी निरिक्षणातुन पराला वेळच मिळत नाही.

विनायक प्रभू's picture

30 Jun 2009 - 12:18 pm | विनायक प्रभू

परा आणि परिक्षण मस्त
मला वाटले की परी निरिक्षणातुन पराला वेळच मिळत नाही.

निखिल देशपांडे's picture

30 Jun 2009 - 12:19 pm | निखिल देशपांडे

छान परिक्षण.....
पहायच्या यादित लिहुन ठेवतो.
==निखिल

भाग्यश्री's picture

30 Jun 2009 - 12:24 pm | भाग्यश्री

अतिशय सुरेख चित्रपट आहे हा! सर्वांनी पाहावा नक्की!
मी इथे लिहीले होते यावर..
त्याच दिग्दर्शकाचा, माजिद माजिदीचा 'बरान' देखील छान आहे म्हणे. अजुन नाही पाहीला..

http://www.bhagyashree.co.cc/

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2009 - 12:25 pm | स्वाती दिनेश

परा, परिक्षण आवडले.
नंदन आणि कोतवालानी लिंक दिल्या आहेत त्यामुळे लवकरच चित्रपट पाहणार.
स्वाती

दिपक's picture

30 Jun 2009 - 12:47 pm | दिपक

निरिक्षण अत्यंत आवडले. पाहण्यास उत्सुक आहे.. लवकरच मिळवुन पाहिला पाहिजे. धन्यवाद परा :)

सुरुवातीचा काही भाग वाचल्यावर भावाबहिणीच्या नात्यावर असलेल्या ह्या अप्रतिम चित्रपटाची आठवण झाली.

जर मला कुणी माझ्या आवडत्या चित्रपटांबद्द्ल विचारलं.... तर पहिली तीन स्थानं नक्की आहेत...
१. बंदिनी.... [नूतन..... एस. डी.... नि ओ रे माझी.... जीव ओवाळून टाकावा यावरून...]
२. चिल्ड्रेन ऑफ हेवन...
३. परस्युट ऑफ हॅपिनेस...

मी पहिल्यांदा चिल्ड्रेन ऑफ हेवन बद्दल वर्तमानपत्रात वाचलं... नंतर कधीतरी स्टार मुव्हीज वर लागला तेव्हा सहजच मधल्या कुठल्यातरी दृष्यापासून पाहिला... इतका आवडला.. की पटकन त्याची DVD घेतली.. नि आतापर्यंत त्याची अक्षरशः पारायणे झाली... भाषा परकी असली तरी subtitles ची गरज क्वचित भासते.... मोठे प्रथितयश नायक-नायिका नाहीत.. मारधाड.. टोळीयुद्धच काय पण खलनायकही नाही..पण चित्रपट आपल्याला अली अन झारा यांच्या विश्वात नेतो नि खिळवून ठेवतो....

बाकी पराने वर्णिलेला एक प्रसंग:
शाळेतल्या झाराच्या एका मैत्रीणीचे बुट तीला खुप आवडत असतात, आता ती मैत्रीण नवे बुट घेते, "जुन्या बुटाचे काय केले ग ?"

इथे त्या मैत्रिणीचे जुने बूट खरेतर झाराचेच हरवलेले बूट असतात... एकदा शाळॅतल्या मुलीच्या पायात आपलेच बूट पाहून झारा त्या मुलीच्या पाठोपाठ जाऊन तिचे घर पाहून ठेवते.... नंतर अली अन ती त्या घरी जातात तेव्हा त्याना कळते की त्या मुलीचे बाबा अंध आहेत.. म्हणून दोघेही बूट त्यांना न मागता परत येतात... एकतर झाराकडे बूट नाहीत नि हरवलेले बूट कुठे आहेत हे कळूनही ते न मागण्याचा समंजसपणा त्या दोघांना परिस्थितीने शिकवलाय.. विना संवादाच्या या प्रसंगातून दिग्दर्शक हवा तो परिणाम साधून जातो... [कल्पना करा....आपल्या बॉलीवूड किंवा टॉलीवूड मध्ये अशा प्रसंगाचे काय भजं केलं असतं!!! :) ]

अवांतरः बिका आतातरी "चिल्ड्रेन ऑफ हेवन" पहा...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अवलिया's picture

30 Jun 2009 - 1:03 pm | अवलिया

लेख वाचल्यावर परत लेखकाचे नाव पाहिले.
स्वतःला चारवेळा चिमटा काढुन पाहिला, मग विश्वास ठेवला.
निरिक्षण अत्यंत आवडले.
पाहण्यास उत्सुक आहे..

जियो पराशेट ! जियो !!

--अवलिया

अवलिया's picture

30 Jun 2009 - 1:03 pm | अवलिया

लेख वाचल्यावर परत लेखकाचे नाव पाहिले.
स्वतःला चारवेळा चिमटा काढुन पाहिला, मग विश्वास ठेवला.
निरिक्षण अत्यंत आवडले.
पाहण्यास उत्सुक आहे..

जियो पराशेट ! जियो !!

--अवलिया

अनिल हटेला's picture

30 Jun 2009 - 1:28 pm | अनिल हटेला

सहमत.
परीक्षण आवडले.....

बघायलाच हवा असा चित्रपट....
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

घाटावरचे भट's picture

30 Jun 2009 - 1:21 pm | घाटावरचे भट

बघितलाच पाहिजे.

सुचेल तसं's picture

1 Jul 2009 - 9:37 pm | सुचेल तसं

उत्तम परीक्षण...

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jun 2009 - 1:36 pm | बिपिन कार्यकर्ते

परा, हा चित्रपट उतरवून बरेच दिवस झाले. मस्तकलंदरताईंनी स्ट्राँग रेकमेंडेशन दिले होते. पण बघायची हिंमत होत नव्हती. कुठ उगाच रडारड वगैरे बघा... त्यापेक्षा नकोच ते. मधून मधून काही दृष्यं बघितली. पण पूर्ण नाहीच. सुखांत आहे असे कळले... आता नक्की बघेन.

माझ्या 'चित्रपट ओळख'च्या यादीतून एक नाव कमी झाले. खूपच मस्त ओळख करून दिलीस. धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

30 Jun 2009 - 1:47 pm | यशोधरा

>> पण बघायची हिंमत होत नव्हती. कुठ उगाच रडारड वगैरे बघा. >>

बिपिनदा, तुमच्या श्टोरीचे पुढचे भाग लिहिताना हे वाक्य लक्षात ठेवालच! :)

दिपाली पाटिल's picture

30 Jun 2009 - 1:57 pm | दिपाली पाटिल

ते मैत्रिणी चे आधी चे गुलाबी रंगाचे झारा चे च जुने बुट असतात, ती आणि अली ते बुट आणायला पण जातात तेव्हा त्या मैत्रिणी चे वडिल आंधळे असतात हे कळल्यावर ते दोघे घरी परत येतात पण जेव्हा झारा ला समजतं की त्या मुलीने ते गुलाबी बुट फेकले आणि नविन घेतले तेव्हा ती ओरडते. त्या प्रसंगा चं वर्णन परा ने अगदी चपखल केलं आहे.

खुप छान चित्रपट आहे.

दिपाली :)

पाषाणभेद's picture

30 Jun 2009 - 2:14 pm | पाषाणभेद

खुपच छान चित्रपट दिसतो. समिक्षण पण मस्त.
मन हेलावणारा चित्रपट.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

सूहास's picture

30 Jun 2009 - 4:18 pm | सूहास (not verified)

१९९७ ला रिलीज झालेला हा चित्रपट, व त्याच वर्षी रिलीज"लाईफ ईज ब्युटीफुल" मुळे अ‍ॅकडमी अवार्ड हुकलेला हा चित्रपट . चित्रपटाचा पुर्वार्ध पहाताना "बायसिकल थिफ"(ईटालियन,१९४८)ची आठवण आल्या शिवाय रहात नाही , अर्थात हा पहिले पाहीला तर येणार ही नाही
" गणा मास्तरा॑ने " सा॑गीतल्या प्रमाणे शेवटच्या सीन कि॑वा अली ची धावण्याची स्पर्धा बघताना अक्षरश : जिवाची ऊलथा पालथ होते...

सुहास

फारएन्ड's picture

1 Jul 2009 - 5:31 am | फारएन्ड

चांगले परीक्षण केले आहे. सुंदर चित्रपट आहे हा. 'बरन' ही चांगला आहे, पण हा जास्त आवडला.

सुनील's picture

1 Jul 2009 - 6:48 am | सुनील

थोडक्यात चांगले परीक्षण केले आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

1 Jul 2009 - 8:40 am | विसोबा खेचर

तुम्ही हा बघावा आणी एक नितांत सुंदर वेगळा अनुभव घ्यावात ही इच्छा.

नक्की!

सुंदर ओळख करून दिली आहे...

तात्या.

ऋषिकेश's picture

1 Jul 2009 - 9:44 am | ऋषिकेश

मस्त "पराक्षण" :)
विकांताला बघतो चित्रपट.

बाकी, लहानग्यांचं अनुभवविश्व लहान असतं मात्र म्हणून त्यांचे प्रश्न/अडचणी लहान असतात असे नव्हे. त्यातही विविध चित्रपट पाहून जाणवतं की बदलत्या वातावरणात बालविश्व इतकं गुंतागुंतीचं झालंय की (काहि चित्रपट पाहून वाटते की )
एकतर ही पिढी निर्ढावलेली भावनाशुन्य जीवन जगतील नाहीतर वरच्यासारखे चित्रपट पाहून वाटु लागते ते सुजाण- मात्र जरा संवेदनशील होतील.. अर्थात हल्लीच्या होरपळाणार्‍या जगात विलक्षण संवेदनशीलता आणि ठार भावनारहितपणा हातात हात घालून चालतात हा विरोधाभास म्हणावा का नैसर्गिक अभिव्यक्ती?

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

अभिज्ञ's picture

1 Jul 2009 - 11:35 am | अभिज्ञ

सुंदर परिक्षण. निश्चितच पहायला हवा.
इराणी चित्रपट व एका बहिण भावाची कथा हे वाचून क्षणभर हाच चित्रपट आठवला.
१९९५ सालचा "द व्हाईट बलुन" हा चित्रपट हि तितकाच सुंदर आहे.
ह्यातहि चित्रपटाची कथा एक लहान मुलगी व तिचा भाउ ह्यांच्या भोवतीच गूफलेली आहे. अर्थात इथेहि दिग्दर्शक इराणीच आहे.
अधिक माहितीसाठी इथे वाचा.
http://www.imdb.com/title/tt0112445/

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jul 2009 - 1:21 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार.

आभारी
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्राजु's picture

1 Jul 2009 - 9:35 pm | प्राजु

परा..
सुरेख लिहिलं आहेस रे!!! नक्की बघेन.
अप्रतिम!! इतकं सुंदर परिक्षण आहे हे.. चित्रपट पहायलाच हवा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मिसळ's picture

1 Jul 2009 - 10:09 pm | मिसळ

परा, छान परिक्षण.
माजिद माजिदी चे 'बरान', 'कलर ऑफ पॅराडाईज' आणि 'द विलो ट्री' हे चित्रपट देखिल अप्रतिम आहेत. आवर्जून पहा.

छोटा डॉन's picture

1 Jul 2009 - 11:12 pm | छोटा डॉन

जबरदस्त परिक्षण रे परा, आवडले.
खास करुन तु कथानकात शिरुन त्याच्या नजरेने परिक्षण लिहले आहेस ते आवडले.
उदा : कोण कुठला दुकानदार पण त्या क्षणी मी त्याला अगदी मनापासुन थॅंक्यु म्हणालो. वगैरे

सुरेख लेखन.
चित्रपट बघावाच लागेल असे म्हणतो.

असेच अजुन येऊद्यात ...!!!

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

क्रान्ति's picture

2 Jul 2009 - 7:55 am | क्रान्ति

छानच लिहिलंस परा. एकदा सकाळ्मध्ये परिक्षण वाचून हा चित्रपट पाहिला. आता तुझा लेख वाचून पुन्हा पहायची इच्छा होतेय.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

शाहरुख's picture

2 Jul 2009 - 8:03 am | शाहरुख

परिक्षण लिहायची पध्दत आवडली...ते वाचुन चित्रपट बघायची इच्छा झाली :-)

खुप आवडला चित्रपट..पोरगा झक्कास घेतलाय..माजिद माजिदीसाठी =D> =D>
सॉरी बॉस, आय सॉ पायरेटेड कॉपी ऑफ धिस..

यातील दोष काढायची माझी लायकी नाहीय, पण झाराकडे एकच चपलांचा जोड (जो हरवला तो) दाखवला असता तर अजुन परिणामकारक वाटले असते.