अमेरीकेत होणार्या साहित्य संमेलनाशी निगडीत मिपावर या आधीच बराच काथ्याकूट झाल्यामुळे खालील मजकूर कदाचित कुणाला मस्करी वाटू शकेल. परंतु तसे नाही. जरी मौजमजा, विरंगुळा सदरात टाकली असली तरी ही सत्यघटना आहे. देवकुळेकाकांचा नंबर आता आमच्या भ्रमणध्वनिवर आहे खरा परंतु घाईगडबडीत त्यांना मिपावर चाललेली चर्चा वाचा आणि जमल्यास खुलासा करा असे सांगायला विसरलो..! पुन्हा फोन करून सांगू की काय?! :)
राम राम मिपाकरहो,
आत्ताच आम्हाला आमच्या भ्रमणध्वनीवर, अमेरीकेत होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या संदीप देवकुळेंचा दूरध्वनि आला होता. आमच्या एका हितचिंतकानी त्यांना आमचा नंबर दिला.
"तुम्ही तात्या अभ्यंकर का?"
"हो..."
"तुम्ही मराठी संकेतस्थळ बनवता का? आम्हाला संमेलनाशी निगडीत मराठी संस्थळ बनवायचे आहे!"
"नाही, मी नाही बनवत. परंतु माझा नीलकांत नावाचा मित्र आहे, तो बनवतो.."
"बरं मग त्यांचा नंबर देता का?"
आणि आम्ही त्यांना नीलकांताचा नंबर दिला..
आता काय बाबा, आमचा नीलकांत इंटरनॅशणल झाला! :)
बाबारे नीलकांता, अरे मेल्या अमेरीकेतल्या साहित्य संमेलनाची साईट तुला बनवायच्ये हो! ती बनव आणि बक्कळ पैका कमव. नायतरी आपल्याच महाराष्ट्र सरकारचे २५ लाख रुपये त्यांनी घेतलेत. मग महाराष्ट्रातीलच एखाद्या मराठी तरुणाला संमेलनाच्या कामनिमित्त त्यापैकी चार पैशे भेटले तर चांगलंच आहे की!
चांगली साईट बनवून दे हो देवकुळेसाहेबांना! हो, पण ते करताना आपल्या गरीबाच्या भारतीय मिपाला नको हो विसरूस! :)
तुझा,
तात्या.
प्रतिक्रिया
5 Feb 2009 - 1:33 pm | यशोधरा
अभिनंदन नीलकांत!
5 Feb 2009 - 1:37 pm | सखाराम_गटणे™
+१
5 Feb 2009 - 1:49 pm | घाशीराम कोतवाल १.२
हाबिनंदन
आमास्नी बी नव संकेतस्थळ बनवायच हाय नाव भुर्जीपाव डॉट कॉम
किति पैसे पडत्याल ते जरा सांगाल का वो
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
5 Feb 2009 - 1:39 pm | बिपिन कार्यकर्ते
नीलकांताचे हाबिणंदण!!!!!!!!!!!!
बिपिन कार्यकर्ते
5 Feb 2009 - 1:45 pm | छोटा डॉन
निलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...!
पुढच्या वेळी पुण्यात आल्यावर पार्टीचे विसरु नकोस रे बाबा.
------
छोटा डॉन
5 Feb 2009 - 2:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नीलकांतचे अभिनंदन ... पार्टी नाही दिलीस तरी चालेल, पण आम्हाला विसरू नकोस.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
5 Feb 2009 - 2:06 pm | घाटावरचे भट
असेच म्हणतो!!
5 Feb 2009 - 2:24 pm | अवलिया
हेच बोलतो
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
5 Feb 2009 - 3:28 pm | बिपिन कार्यकर्ते
माझ्यासकट ६ जण सहमत...
आपल्या कंपूतले आले का रे सगळे? धम्याने वेगळी चूल मांडलेली दिसतेय. ह्म्म्म...
बिपिन कार्यकर्ते
5 Feb 2009 - 4:52 pm | मनस्वी
नीलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...!
5 Feb 2009 - 5:28 pm | धमाल मुलगा
निळ्या... हाबिणंदण रे!!!
ए बिपीनदा, च्यायला, ह्या आनंदाच्या भरात वाईच वेगळा प्रतिसाद पडाला म्हणुन लगेच आस्सं नाय म्हणायचं हां! आलो का नाय परत (तिरप्या) लायनीत :)
-(कंपूबाज) ध मा ल.
(च्यायला, हितंबी '+८'च? ही आठ्ठी काय जीव सोडंना बॉ! ओपनला आट्टी, क्लोजला आट्टी, चक्रीला आट्टी, ज्याकपॉटला आट्टी...साला प्रतिसादालाबी आट्टीच? )
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
5 Feb 2009 - 5:48 pm | ब्रिटिश टिंग्या
नीलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...!
- टिंग्या
5 Feb 2009 - 5:56 pm | दशानन
आरं मी बी हाय रं लायनीत !
निलकांत दोस्ता अभिनंदन रे तुझं !
आता कसं कुंपुचं सरकल पुर्ण झाल्यवानी वाटतं बघ !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
5 Feb 2009 - 9:08 pm | भास्कर केन्डे
आता हे बरं हाय राजे... तुमच्या मागं बी लोकं हुभे हायता नीकांताला हाबिणंदण द्यायला.
कांता, ह्यो हीतं हाय मी लायनीत... लय मागं हाय.. शुभेच्छा ऐकू आल्या की कळव. अंमळ बरं वाटल.
5 Feb 2009 - 11:54 pm | मुक्ता
लय झ्याक
5 Feb 2009 - 1:44 pm | शेखर
अभिनंदन नीलकांत!
5 Feb 2009 - 1:37 pm | नंदन
'विश्व' मराठी साहित्य संमेलन आणि विश्वकर्मा हा योगायोग मस्त आहे :)
अभिनंदन, नीलकांत!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
5 Feb 2009 - 1:38 pm | आपला अभिजित
अभिनंदन!!
तात्या, तुम्हीही त्या निमित्ताने श्यान होजे का काय तिथे जायचा चान्स मारा की!!
5 Feb 2009 - 1:42 pm | विसोबा खेचर
तात्या, तुम्हीही त्या निमित्ताने श्यान होजे का काय तिथे जायचा चान्स मारा की!!
चालेल. आणि उद्घाटन समारंभाला सिंडीलाही सोबत घेऊन येईन. देवकुळेसाहेबांना आमच्याकरता दोन शिटा राखीव ठेवायला सांगितलं पायजेल! :)
आपला,
(जोडीने!) तात्या.
5 Feb 2009 - 1:38 pm | सहज
नीलकांत अभिनंदन.
5 Feb 2009 - 1:41 pm | दशानन
हेच म्हणतो !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
5 Feb 2009 - 1:54 pm | मृगनयनी
नीलकांत जी, हार्दिक अभिनंदन!
अशीच प्रगती होत राहो..
:)
पुढील सुवर्णमय वाटचालीसाठी शुभेच्छा!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
5 Feb 2009 - 1:56 pm | दशानन
नयनीची चित्रकला चालू झाली ;)
*
शुभेच्छा देण्याची पध्दत आवडली.
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
5 Feb 2009 - 1:42 pm | मधु मलुष्टे ज्य...
नीलकांत, अभिनंदन आणि साईट बनवण्यासाठी शुभेच्छा. :)
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
5 Feb 2009 - 1:49 pm | भिडू
हेच म्हणतो !
5 Feb 2009 - 1:48 pm | सुनील
नीलकांत यांचे अभिनंदन!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Feb 2009 - 1:51 pm | शंकरराव
आनंदाची बातमी ..
निलाकांतचे अभिनंदन
शंकरराव
5 Feb 2009 - 1:55 pm | निखिल देशपांडे
अभिनंदण निलकांत
5 Feb 2009 - 2:04 pm | मनिष
आमचेबी अभिणंदण स्वीकारा बर का सायेब!!
चला, विकांताच्या पार्टिची सोय झाली म्हणायची! :)
5 Feb 2009 - 2:09 pm | झेल्या
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
5 Feb 2009 - 2:14 pm | महेश हतोळकर
हार्दीक अभिनंदन नीलकांत. आणि कामासाठी शुभेच्छा.
5 Feb 2009 - 2:17 pm | प्रभाकर पेठकर
अभिनंदन निलकांत.
तुझे चार्जेस ऍडव्हान्स मध्ये घे. जमल्यास एल्. सी. काढायला सांग. (बँक चार्जेस टू ओपनर).
७०% ऍडव्हान्स हाती पडला की(च) कळफलकाला हात लाव. नाहितर इन्टरनॅशनली फसशील.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
5 Feb 2009 - 9:07 pm | मानस
हे मात्र नक्की ..... अमेरिकेत लोकं जितकी श्रीमंत असतात, तितकीच मानसिक गरीब असतात
पैसे आधी ... मग काम ....
5 Feb 2009 - 9:14 pm | भास्कर केन्डे
अमेरिकेत लोकं जितकी श्रीमंत असतात, तितकीच मानसिक गरीब असतात
-- अच्छा म्हणजे बूम मधून इकडं उतरलं की लगेच हृदय परिवर्तन का काय म्हणतेत ते होत असावं. बाकी भारतातली श्रीमंत लोकं फार मोठ्या मनाची असतात असा साक्षात्कार करुन दिल्याबद्दल आभार! आम्ही आपले उगीच मनाला सीमा नसतात अशा खुळ्या समजुतीत होतो. ;)
आपला,
(आपल्यावरुन जग ओळखाणारा) भास्कर
5 Feb 2009 - 2:21 pm | ढ
तात्या म्हणतात तसे चार पैशे नको,
चांगले बक्कळ पैशे वाजवून घ्या.
5 Feb 2009 - 3:10 pm | जयवी
अभिनंदन नीलकांत :)
5 Feb 2009 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार
नीलकांत यांचे अभिनंदन !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
5 Feb 2009 - 3:24 pm | धमाल मुलगा
निळुभाऊ.....
काँग्रेस आधिवेशन बरं का! (काँग्रॅच्युलेशन्सचा मराठी उच्चार हाय त्यो...)
वा वा! आता काय ब्बाब्बा, आधीच विंटरनॅशनल असलेले निळुभाऊ आता विंटरनॅशनल साहित्यिक वर्तुळात शिरले :P
निळ्या, भावा, आपल्याला तुझा अभिमान वाटतो. नुसत्या माऊथ-पब्लिसिटीवर (म्हणजे कोणतंही सो-कॉल्ड मार्केटिंग न करता) तुझ्या कामाची किर्ती सगळीकडे पसरते आहे.
स्काय इज द लिमिट फॉर यु :)
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
5 Feb 2009 - 3:32 pm | नीलकांत
माफ करा परंतु मला अद्याप अश्या संबंधी कुणाचाही फोन आलेला नाही. त्यामुळे कृपया मित्रांनी फोन करून शिव्या (ह्याला ते हभिनंदनाचा कॉल म्हणतात) घालू नये. :(
तात्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर फोन आला तर पुढील बाबी येथे देईलच. तुर्तास असे काही नाही.
नीलकांत
5 Feb 2009 - 3:36 pm | आनंदयात्री
तोबा तेरा जलवा .... तोबा तेरा प्यार .. तेsssssssssssssssरा इमोसनल अत्याचार !!!!!!!!
नीलकांत तात्यासाठी हे गाणे गुणगुणत असावा :D
5 Feb 2009 - 4:02 pm | बिपिन कार्यकर्ते
खल्लास्स!!!
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
5 Feb 2009 - 4:51 pm | छोटा डॉन
>>तोबा तेरा जलवा .... तोबा तेरा प्यार .. तेsssssssssssssssरा इमोसनल अत्याचार !!!!!!!!
=)) =)) =)) =))
आयच्च्या गावात पाय ..!
( संपादकांनो, ही शिवी नाही असे मी इथे स्पष्टपणे नमुद करु इच्छितो ...)
खत्तरनाक रे यात्री, लै लै हसलो, यु मेड माय डे ...
चालु द्यात ..!
------
( इमोशनल अत्याचार करणारा ) छोटा डॉन
5 Feb 2009 - 4:53 pm | सखाराम_गटणे™
+१
5 Feb 2009 - 3:51 pm | अनंत छंदी
=D> नीलकांत अभिनंदन.
5 Feb 2009 - 5:49 pm | प्रमोद देव
मिपावर बे-एरियातल्या जामसासं बद्दल ज्या हरकती वगैरे श्रीपाद जोशींनी उपस्थित केलेल्या आहेत त्यापासून मिपाकरांचे आणि मुख्य म्हणजे तात्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मराठीतून संकेतस्थळ बनवण्यासंबंधीची विचारणा करणारा हा गुगली की 'दुसरा' देवकुळेंनी टाकलाय असे मला वाटतंय.
सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!
5 Feb 2009 - 6:36 pm | विसोबा खेचर
प्रमोदकाका,
यू सेड इट! :)
अगदी माझ्या मनातलं बोललात. मला हा फोन आला तेव्हाच मी डाऊट खाल्ला होता, शिवाय फोन करणारा इसम देवकुळेही नसावा असाही मला डाऊट आहे! :) तरीही मी नीकलांतचा नंबर दिला पण अपेक्षेप्रमाणे अद्याप नीलकांतला कुणाचाही फोन आलेला नाही. आणि माझा डाऊट पक्का होण्याचे हेच कारण आहे..
बाय द वे, +४०८ हे कोड मात्र सॅन होजेचेच आहे ना?
त्यापासून मिपाकरांचे आणि मुख्य म्हणजे तात्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मराठीतून संकेतस्थळ बनवण्यासंबंधीची विचारणा करणारा
सहमत आहे. आणि जर हे खरं असेल तर मिपाचा आंतरजालीय दबदबा जबरदस्तच म्हणायला हवा! :)
मला काही सुहृदांच्या हा धागा अप्रकाशित करण्याबद्दल खरडी आल्या आहेत. त्यांचा आदर करून मी एवढंच सांगू इच्छितो की तूर्तास तरी हा धागा इथेच राहील. जगाला कळू तरी देत की लोकं काय काय हरकती करत असतात ते!
येत्या दोनेक दिवसात हा धागा निश्चितच अप्रकाशित करण्यात येईल...
तात्या.
5 Feb 2009 - 10:30 pm | सर्किट (not verified)
तात्या,
+१ - ४०८ - *** - **** असा नंबर असेल तर तो सॅन होजे परिसरातलाच आहे. व्यनितून मला नंबर कळव, म्हणजे नक्की सांगू शकेल कुणाचा आहे ते. (कारण कार्यकारिणीतल्या सर्वांचे नंबर माझ्याकडे आहेत.)
दरम्यान, "श्रीपाद कुलकर्णींच्या" लेखावर "ग्यानेश्वर" नावाने कुणी लिहिले, तेव्हाच मिपाची कीर्ती किती खोलवर गेली आहे, ते लक्षात येईल.
-- सर्किट
5 Feb 2009 - 11:01 pm | सर्किट (not verified)
तात्याला आलेला फोन बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीतूनच आला होता, ह्याची खातरजमा केलेली आहे.
-- सर्किट
6 Feb 2009 - 10:01 am | घाटावरचे भट
पन त्या लोकान्ला तात्यांचा लंबर भेटला कुनीकडून?
6 Feb 2009 - 11:06 am | सर्किट (not verified)
तेही कळले आहे, पण ही वेळ ते सांगायची नाही. लवकरच सगळे पब्लिक होईलच.
-- सर्किट
5 Feb 2009 - 11:24 pm | मुक्ता
यू सेड इट!
अगदी माझ्या मनातलं बोललात. मला हा फोन आला तेव्हाच मी डाऊट खाल्ला होता, शिवाय फोन करणारा इसम देवकुळेही नसावा असाही मला डाऊट आहे! Smile तरीही मी नीकलांतचा नंबर दिला पण अपेक्षेप्रमाणे अद्याप नीलकांतला कुणाचाही फोन आलेला नाही. आणि माझा डाऊट पक्का होण्याचे हेच कारण आहे..
विरोधकांना अशाच प्रकारे संदीप देवकुळे गप्प करतो. त्याच ब्रीदच आहे "खोट्याने होत आहे रे .....". त्याच्या पाताळयंत्रीपणाची कमाल आहे. असो.
मंडळाच्या संकेतस्थळाच मराठीकरण करायच ही कल्पना २००१ सालीच मांडली गेली होती. आम्ही त्यावर कामही करत होतो. पण ज्यांना मराठीतले ओ की ठो ही कळत नाही त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून ते काम बंद पाडले. त्या नंतर २००६ साली देखील त्या वेळेच्या अध्यक्षांनी त्यावेळेस स्वतः त्यावर काम करायला सुरूवात केली होती परंतू त्यानंतर मंडळात चार लोकांनी जे काही राजकारण केले आणि अध्यक्षांनाच अवैधरितीने रातोरात बाजूला केले.
निलकांत रावांना त्यांच्या कौशल्यामुळे हे काम मिळाले असते तर त्याचा मलाही खुप आनंद झाला असता, पण दुर्दैवाने तसे नसून हे एक गाजर दाखवले आहे. तेव्हा "जागा हो राजा..."
बाकी कुलकर्णींच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया मी लवकरच टाकीन.
मुक्ता
5 Feb 2009 - 7:08 pm | सोनम
नीलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...!
:) :) :)
5 Feb 2009 - 7:24 pm | पाषाणभेद
नीलकांत अभिनंदन !
मराठी सं.स्थळ साठी जास्त मेहेनत लागते. पैसे घेण्यात कुचराई करु नका. (नाही आपण शेवटी मराठी माणूस आहोत ना.)
-( सणकी )पाषाणभेद
5 Feb 2009 - 7:40 pm | स्वाती राजेश
निलकांत,
अभिनंदन आणि पुढील कार्याला शुभेच्छा!!!!!!!
5 Feb 2009 - 7:43 pm | प्राजु
अभिनंदन नीलकांत..
अमेरिकेस आलास तर माझ्या गरिबाच्या घरी ये बरं ... ब्रेड बटर खायला! ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Feb 2009 - 7:45 pm | आचरट कार्टा
अरे मस्त..........
अभिनंदन नीलकांतजी :)
अवांतर : ए पोर्या... डोकी मोज... प्रत्येकाला एक चहा, आणि ऑप्शनल सिगारेट... बिल नीलकांत देतील :)
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
5 Feb 2009 - 7:55 pm | सर्वसाक्षी
नीलकांतचे आणि तात्याचेही:)
5 Feb 2009 - 8:25 pm | केदार
अरेरे. त्यात्या तुम्हाला कोणीतरी बनवले वा तुम्ही इथल्या लोकांना बनवत आहात. :)
http://www.sfsahityasammelan.org/mr/ ही साहीत्य संमेलनाची साईट आहे. आणि ती गेल्या ६ महिन्यांपासून व्यवस्तिथ कार्यरत आहे.
5 Feb 2009 - 10:31 pm | सर्किट (not verified)
परंतु मंडळाची साईट अजूनही इंग्रजीत आहे, ह्याबद्दल मीच अनेकदा तक्रार केलेली आहे मंडळाकडे.
-- सर्किट
5 Feb 2009 - 9:14 pm | कलंत्री
आपल्या लेखाची बजबजपुरीयावर नोंद घेतली आहे.
http://www.bajbajpuri.com/node/154
5 Feb 2009 - 9:20 pm | प्रकाश घाटपांडे
आता अदुगरच काही लोकांनी "संकेत" देउन नीलकांतच "स्थळ" पक्क केल्याचा संशय मला येतोय. सावध रे ! अंगाव त्येच बील टाकून तुझा बीलकांत व्हायचा.
प्रकाश घाटपांडे
5 Feb 2009 - 9:33 pm | llपुण्याचे पेशवेll
मला वाटते तात्याला मराठी संकेतस्थळाचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचे आमिष दाखवून देवकुळे साहेब तात्याला मिपावरील संमेलनविरोधी सूर बदलायला लावू पहात होते. पण तात्या संकेतस्थळे स्वतः तयार करत नाही हे बघून देवकुळे साहेबानी पळ काढला. आता साहेब दुसरा कुठला तरी मार्ग शोधत असतील तात्याला पटवायचा.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
5 Feb 2009 - 11:33 pm | भडकमकर मास्तर
तात्याला मिपावरील संमेलनविरोधी सूर बदलायला लावू पहात होते.
तात्या असल्या आमिषाने सूर बदलणार होय?? @)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
6 Feb 2009 - 11:23 am | महेंद्र
तात्या
जरा सांभाळुन म्हणतो मी. हे लेखक , वगैरे मंडळी सगळं काम करुन घेतिल अन पैसे मात्र स्वतहा ठेवुन घेतिल ..
फुकटे तर आहेतच, आणि मध्यंतरी मटा ला पण आलं होतं रेसिशन मुळे जरा जड जातंय हे सगळं संभाळणं,अशी प्रतिक्रिया दिली होती देवकुळँनी..
6 Feb 2009 - 11:38 am | आम्हाघरीधन
मित्रहो,
वेब साईट तर आधिचीच तयार आहे.
http://www.sfsahityasammelan.org/mr/
तात्यांनी सर्वान्ची फिरकी घेतली. सहिच आहे वेबसाईट आणि फिरकी सुद्धा. :)
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
6 Feb 2009 - 12:15 pm | आचरट कार्टा
तात्यानू, वायच शंका इली...
कांताशेट बनवतले ती नवीन, तं मं ह्या कोंचा?
http://www.sfsahityasammelan.org/mr/
काय ह्याच कांताशेटनी बनवलिला हा?
माका काय? वाटला काय चल!
6 Feb 2009 - 12:19 pm | आचरट कार्टा
हाँ... तरीच...
आता हयसून फुडे सगळां वाचल्यारच लिवूक व्हया. ह्या दुसरा पान... वरचा वाचूकच नाय मां मी...!
माका काय? वाटला काय चल!