Seezens (seasons)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
27 Jan 2009 - 8:03 pm

"बाबा मी एक कविता म्हणून दाखवू?"काल रात्री आमच्या चिरंजिवांनी (वय वर्षे ७) एक विचारणा केली. मी विचारले की शाळेत शिकवली का तर म्हणाला, "नाही, मीच केली."
मी चकित! त्याला म्हणालो लिहून काढ.
"मला कोणीही स्पेलिंग सांगू नका मला येईल तसे मी लिहीन नंतर सांगा." अशी आज्ञा करुन चिरंजीव लिहायला बसले.
आता हा काय लिहिणार अशा आश्चर्यात मी होतो. त्याने झटपट लिहून ती मला दाखवलीन.
"बाबा त्यांची कविता 'मिपा'वर (होय त्याला 'मिपा' चांगले माहीत आहे!) टाकतात तर माझीही कविता त्यांनी टाकायला पाहिजे." असा आग्रहवजा हुकूम शिरसावंद्य मानून त्याची कविता इथे देतोय.
(त्याला सुचतील तशी 'फोनेटिक स्पेलिंग्ज' त्याने केली आहेत कंसातल्या 'दुरुस्त्या(?)' ह्या माझ्या आहेत. शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याचे त्याने एवढ्या लवकर मनावर घेतले असेल असे मला वाटले नव्हते! ;) पण गमतीची गोष्ट अशी की त्याने लिहिलेली मूळ स्पेलिंग्ज तशीच ठेवली तरी अर्थ समजण्यात काही कमी होत नाही! )

Seezens (seasons)

In summer the sunshine is hot, we go to the beach
and swim in the swiming (swimming) pools.

In fall the leaves chaeng (change) colors, and they fall
of the trees, the mother lets the children out.
वरच्या कडव्यातल्या अधोरेखित ओळीचा अर्थ मला समजला नाही. त्याला विचारले तेव्हा म्हणाला "आई जशी मुलांना जन्म देते, त्यांना आपल्या शरीरापासून वेगळे होऊन जाऊ देते, तसे झाड पानांना जाऊ देते. त्यामुळे झाडाला आई आणि पानांना मुले असं म्हटलं आहे!" मी ऐकत राहिलो. दंग झालो. अशा कल्पना मुलांना सुचू शकतात ह्या कल्पनेने क्षणभर थरारून गेलो!

In winter snow falls down to the ground
you need to waer (wear) snow boots.

In spring all the snow melts flowers grow
its the rainee seezen (season).

चतुरंग

कवितामुक्तकप्रकटनविचारअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 2:54 pm | शंकरराव

कमाल केली मुकुल ने

शाब्बास पट्ठ्या !!!

लिखाळ's picture

27 Jan 2009 - 8:33 pm | लिखाळ

In fall the leaves chaeng (change) colors, and they fall
of the trees, the mother lets the children out.
वरच्या कडव्यातल्या अधोरेखित ओळीचा अर्थ मला समजला नाही. त्याला विचारले तेव्हा म्हणाला "आई जशी मुलांना जन्म देते, त्यांना आपल्या शरीरापासून वेगळे होऊन जाऊ देते, तसे झाड पानांना जाऊ देते. त्यामुळे झाडाला आई आणि पानांना मुले असं म्हटलं आहे!" मी ऐकत राहिलो. दंग झालो.

वा वा .. तुमच्या मुलाची काव्य प्रतिभा अशीच फुलुदे ! त्याला शुभेच्छा !
-- लिखाळ.

एकलव्य's picture

27 Jan 2009 - 8:36 pm | एकलव्य

चांगला खुराक आहे (आणि असावा हे उत्तमच!) तुमच्या डोक्याला!!

मुक्तसुनीत's picture

27 Jan 2009 - 8:40 pm | मुक्तसुनीत

the mother lets the children out.
मजा आली चतुरंगराव ! तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा ! :-)

प्राजु's picture

27 Jan 2009 - 8:48 pm | प्राजु

प्रचंड कल्पना शक्ती आहे मुकुलकडे. अभिनंदन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनस्वी's picture

27 Jan 2009 - 8:58 pm | मनस्वी

मस्त!

वल्लरी's picture

27 Jan 2009 - 9:01 pm | वल्लरी

अगदी मस्तचं....
अभिनंदन

---वल्लरी

सहज's picture

27 Jan 2009 - 8:51 pm | सहज

धी ऍपील डज नॉट फॉल फार फ्राम द ट्री!!!

अभिनंदन! चिरंजीवांना सांगा मिपावरच्या काका लोकांनी कौतुक केले आहे.

अवांतर - वय वर्ष ७ पर्यंत स्पेलिंग वरुन चिडायचे नाही ह्या धड्याबद्दल धन्यु.

लिखाळ's picture

27 Jan 2009 - 8:54 pm | लिखाळ

अभिनंदन! चिरंजीवांना सांगा मिपावरच्या काका लोकांनी कौतुक केले आहे.

का हो का?
काका, दादा सर्वांनी ..असे म्हणा :)
-- लिखाळ.

चित्रा's picture

28 Jan 2009 - 6:21 am | चित्रा

आणि काक्या-मावश्यांनी देखील..

मुकुलने मस्त केली आहे कविता. अभिनंदन!

सर्किट's picture

28 Jan 2009 - 8:44 am | सर्किट (not verified)

चित्रताई,

लिखाळदादा मुकुलला लहान भावंड समजताहेत. मग तुम्ही मुकुलची ताई व्हायला काहीच हरकत नाही.

-- (वयाने मुकुलचा काका, पण मनाने त्याचा लहान भाऊ) सर्किट

संदीप चित्रे's picture

27 Jan 2009 - 9:08 pm | संदीप चित्रे

>> "आई जशी मुलांना जन्म देते, त्यांना आपल्या शरीरापासून वेगळे होऊन जाऊ देते, तसे झाड पानांना जाऊ देते. त्यामुळे झाडाला आई आणि पानांना मुले असं म्हटलं आहे!"

काय भन्नाट कल्पनाशक्ती आहे मुकुलची... जियो ! त्याला खूप खूप शुभेच्छा सांग :)

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Jan 2009 - 9:32 pm | ब्रिटिश टिंग्या

काय भन्नाट कल्पनाशक्ती आहे मुकुलची... जियो ! त्याला खूप खूप शुभेच्छा सांगा :)

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

विनायक प्रभू's picture

27 Jan 2009 - 9:48 pm | विनायक प्रभू

Chip of the old Block and bloke

धनंजय's picture

27 Jan 2009 - 10:37 pm | धनंजय

अफलातून उपमा!

कलंत्री's picture

27 Jan 2009 - 10:00 pm | कलंत्री

७ वर्षाच्या मुलाकडुन इतकी सुंदर कविता. अभिनंदन. रसास्वाद घेत रहा, अनेक भन्नाट कल्पना सांगेल तो. पुढच्या मिपा कट्ट्यावर त्याचे काव्यवाचन ठेवता येईल.

बढे रहो.

पिवळा डांबिस's picture

27 Jan 2009 - 11:47 pm | पिवळा डांबिस

In fall the leaves chaeng (change) colors, and they fall
of the trees, the mother lets the children out.
सुंदर कल्पना!!!
तुमच्या मुलाचे अभिनंदन आणि शाबासकी!!

(खुद के साथ बातां: विडंबनं न करता एकदम ओरिजिनल कविता? मुलगा आईच्या वळणावर गेलाय तर!!!!!:))

घाटावरचे भट's picture

28 Jan 2009 - 12:17 am | घाटावरचे भट

>>(खुद के साथ बातां: विडंबनं न करता एकदम ओरिजिनल कविता? मुलगा आईच्या वळणावर गेलाय तर!!!!!)
=))

बाकी छोट्याची कविता छानच!!

दशानन's picture

28 Jan 2009 - 10:56 am | दशानन

तुमच्या मुलाचे अभिनंदन आणि शाबासकी!!

हेच म्हणतो

(खुद के साथ बातां: विडंबनं न करता एकदम ओरिजिनल कविता? मुलगा आईच्या वळणावर गेलाय तर!!!!!)

=))

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

सर्किट's picture

28 Jan 2009 - 12:49 am | सर्किट (not verified)

रंगा, कविता मस्तच आहे !!!

(आता ह्याचे विडंबन करू नकोस, म्हणजे झाले :-))

-- सर्किट

विकास's picture

28 Jan 2009 - 9:12 pm | विकास

कविता एकदम मस्त आहे आणि कौतुकास्पद आहे.

आता ह्याचे विडंबन करू नकोस, म्हणजे झाले

नाहीतर, 'बच्चे तो बच्चे बाप रे बाप,' म्हणावे लागेल :-)

कोलबेर's picture

28 Jan 2009 - 6:41 am | कोलबेर

मस्तच कविता!

In fall the leaves chaeng (change) colors, and they fall
of the trees, the mother lets the children out.

हे वाचुन मला फॉल मध्ये पानं गळतात आणि आई मुलांना खेळायला बाहेर जाऊ देते असा काहीतरी अर्थ वाटला.

पण तुमचे चिरंजीव भन्नाटच निघाले की.

रसग्रहण केल्यावरच समजली कविता. (तुमच्या मुलाचे नावही धनंजय आहे का? .. ह.घ्या)

रामदास's picture

28 Jan 2009 - 8:20 am | रामदास

अशा भन्नाट कल्पना मुलांनाच सुचू शकतात.आपण त्याला प्रोत्साहन द्यावे.(तो प्रोत्साहनाला फाट्यावर मारण्याच्या वयाचा होईपर्यंत)ह.घ्या.सां.न.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2009 - 8:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोट्या दोस्ताचे अभिनंदन !!!कविता आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन's picture

28 Jan 2009 - 11:26 am | नंदन

कविता आणि त्यातली कल्पना भन्नाटच!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

28 Jan 2009 - 12:32 pm | विसोबा खेचर

झाड आणि पानाची उपमा जबराच! क्या केहेने भैय्या!

रंगा, तुझ्या लेकाचं कौतुक वाटलं!

शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याचे त्याने एवढ्या लवकर मनावर घेतले असेल असे मला वाटले नव्हते!

ये हुऊ ना बात! जियो..! या बाबतीत त्याला आमचा फुल्लसपोर्ट! :)

तात्यामामा.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

28 Jan 2009 - 12:37 pm | मधु मलुष्टे ज्य...

क्या बात है.. माझ्या कडून त्याला आवडणारे चॉकलेट द्या. :)

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

मिपाकरांनो मी आपले आभार मानत नाही कारण ते योग्य वाटत नाही. आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा मात्र मुकुलपर्यंत पोचवीन.
त्याला काल सांगितले की तुझी कविता मिपावर आली आहे आणि त्याला हेही सांगितले की मिपावरच्या काका-काकू, दादा-ताई, मामा-मामी (ह्यात प्रत्येकाने आपापला क्लास ओळखावा! ;) ) ह्या सगळ्यांची शाबासकी तुला आहे!

चतुरंग

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2009 - 3:05 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर कविता. मुक्त कल्पनाशक्तीचा धाडसी अविष्कार्.
मुकुलला माझा, अर्थात त्याच्या मित्राचा, कौतुकभरा सलाम...

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

प्रमोद देव's picture

28 Jan 2009 - 8:51 pm | प्रमोद देव

बापसे बेटा सवाई निघाला.
In fall the leaves chaeng (change) colors, and they fall
of the trees, the mother lets the children out.
नाविन्यपूर्ण कल्पना. वाचून कौतुक वाटले.
छोट्याला म्हणावं असेच लिहीत राहा.

शितल's picture

28 Jan 2009 - 8:51 pm | शितल

मुकुलची सही आताच घेऊन ठेवली पाहिजे लेकराला चांगलीच प्रतिभा लाभलेली आहे. :)
चतुरंगजी मुकुलला सांगा शितल काकुला कविता आवडली. :)
मुकुलशी बोलेनच.

राघव's picture

29 Jan 2009 - 2:49 pm | राघव

उत्तम कल्पना. बापसे बेटा सवाई असे म्हणायची वेळ आली तर तुम्हालाही आनंदच होईल!! :)
बाकी,
काका, दादा सर्वांनी ..असे म्हणा
लिखाळदादांशी सहमत!
मुमुक्षु

(रंगा स्टाईल) खुद के साथ बातां: लेका तुला "कविता म्हंजे काय?" हे तरी समजत होते काय रे धा वर्षापर्यंत?? :? :SS

जयवी's picture

31 Jan 2009 - 10:46 am | जयवी

सात वर्षाच्या मुलाच्या कल्पनेची भरारी इतकी उंच..... क्या बात है....!! तुमच्या मुलाचं खूप कौतुक :)

समिधा's picture

31 Jan 2009 - 11:50 am | समिधा

तुमच्या मुलाचे खरच कौतुक आहे. त्याला सांगा खुप सुंदर झालीय कविता

साती's picture

31 Jan 2009 - 3:44 pm | साती

छान कविता, उत्तम कल्पनाशक्ती
तुमच्या मुलाचे अभिनंदन.
साती