'वार कुणावर...' झालेले बघून मला अगदी कसेसेच झाले आणि मग आम्हाला उमाळा आला! ;)
प्यार कुणावर माझ्याच्याने करवत नाही
खूप शेकलो म्हणून आता मिरवत नाही...
'सल्लू'सारखे बनणे नाही जमले मजला
उगीच नंबर कुणाचेच मी फिरवत नाही...
हातभट्टिचे सेवन करतो, 'हिमेश' सुनतो
हट्ट 'बिपाशा'चे मी आता पुरवत नाही...
चलन मागणारे मी बहुदा टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मजला अठवत नाही...
ब्रँड धुराचा का बदलत जातो असा तुझा?
सवाल असले उत्तरण्याचे ठरवत नाही...
गप्प जाहलो म्हणून कविजन करती थट्टा?
विडंबनाने खोड सारखी जिरवत नाही...
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू
धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही...
चतुरंग
प्रतिक्रिया
8 Jan 2009 - 12:48 am | विकास
एकदम मस्त आहे!
8 Jan 2009 - 1:00 am | विसोबा खेचर
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू
धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही...
हे मात्र खरे...! :)
तात्या.
8 Jan 2009 - 2:14 am | संदीप चित्रे
असेच म्हणतो तात्या
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
8 Jan 2009 - 9:17 pm | विनायक प्रभू
धीर - लय भारी
8 Jan 2009 - 2:16 am | संदीप चित्रे
चलन आणि ब्रँड धुराचा हे शेर विशेष आवडले :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
8 Jan 2009 - 3:02 am | प्राजु
सह्ही.. :)
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू
धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही...
बाय द वे, कोण हो ही 'कविता' ?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Jan 2009 - 3:04 am | चतुरंग
चतुरंग
8 Jan 2009 - 3:12 am | पिवळा डांबिस
गप्प जाहलो म्हणून कविजन करती थट्टा?
विडंबनाने खोड सारखी जिरवत नाही...
ते कविजन का कोण ते गेले उडत!
तुम्ही करा हो विडंबनं, आवडतात आम्हाला!!!!
:)
8 Jan 2009 - 3:43 am | लिखाळ
मस्त विडंबन ! मूळ गजलेतली ही व्दिपदी आवडली होती. आणि विडंबनसुद्धा.
मजा आली.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
8 Jan 2009 - 1:13 pm | श्रावण मोडक
:) :) :)
8 Jan 2009 - 3:02 pm | झेल्या
च्या मारी धरून फट्टॅक्..!
तुमची 'कविता' चांगली आहे...
सर्वांनाच आवडलेली दिसतेय...
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
8 Jan 2009 - 3:04 pm | आनंदयात्री
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू
धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही...
सह्ही ... दादा कोंडक्यांची आठवण झाली ;)
खरेच एवढी सुंदर आहे कविता ?
8 Jan 2009 - 6:54 pm | दत्ता काळे
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू
धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही...
काव्यस्फुर्ति उबळेसारखी असते, शांत झोपू देत नाही.
9 Jan 2009 - 7:28 am | चतुरंग
चतुरंग