मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्यार कुणावर...

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
'वार कुणावर...' झालेले बघून मला अगदी कसेसेच झाले आणि मग आम्हाला उमाळा आला! ;) प्यार कुणावर माझ्याच्याने करवत नाही खूप शेकलो म्हणून आता मिरवत नाही... 'सल्लू'सारखे बनणे नाही जमले मजला उगीच नंबर कुणाचेच मी फिरवत नाही... हातभट्टिचे सेवन करतो, 'हिमेश' सुनतो हट्ट 'बिपाशा'चे मी आता पुरवत नाही... चलन मागणारे मी बहुदा टाळत असतो शब्द दिलेला कधीच मजला अठवत नाही... ब्रँड धुराचा का बदलत जातो असा तुझा? सवाल असले उत्तरण्याचे ठरवत नाही... गप्प जाहलो म्हणून कविजन करती थट्टा? विडंबनाने खोड सारखी जिरवत नाही... दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही... चतुरंग

वाचने 3650 वाचनखूण प्रतिक्रिया 14

विसोबा खेचर गुरुवार, 01/08/2009 - 01:00
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही... हे मात्र खरे...! :) तात्या.

प्राजु गुरुवार, 01/08/2009 - 03:02
सह्ही.. :) दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही... बाय द वे, कोण हो ही 'कविता' ? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस गुरुवार, 01/08/2009 - 03:12
गप्प जाहलो म्हणून कविजन करती थट्टा? विडंबनाने खोड सारखी जिरवत नाही... ते कविजन का कोण ते गेले उडत! तुम्ही करा हो विडंबनं, आवडतात आम्हाला!!!! :)

लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 03:43
गप्प जाहलो म्हणून कविजन करती थट्टा? विडंबनाने खोड सारखी जिरवत नाही...
मस्त विडंबन ! मूळ गजलेतली ही व्दिपदी आवडली होती. आणि विडंबनसुद्धा. मजा आली. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

झेल्या गुरुवार, 01/08/2009 - 15:02
च्या मारी धरून फट्टॅक्..! तुमची 'कविता' चांगली आहे... सर्वांनाच आवडलेली दिसतेय... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

आनंदयात्री गुरुवार, 01/08/2009 - 15:04
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही... सह्ही ... दादा कोंडक्यांची आठवण झाली ;) खरेच एवढी सुंदर आहे कविता ?

दत्ता काळे गुरुवार, 01/08/2009 - 18:54
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही... काव्यस्फुर्ति उबळेसारखी असते, शांत झोपू देत नाही.