सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

यारों मैने पंगा ले लिया...

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
18 Jan 2021 - 12:44 pm

यारों मैने पंगा ले लिया...

पेरणा
चिनारसेठ चा हा लेख वाचून मलाही माझ्या मनात खोलवर दडून बसलेल्या गाण्याविषयी लिहावे असे वाटले आमचे परममित्र चिनारशेठ किंवा इतर कोणत्याही रसिकाच्या भावना दुखावण्याचा आमचा कदापी उद्देश नाही

अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद अजिज, साधनाताई, अनुराधा ताई, अलका ताई, कुमारदा, उदित नारायण ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्या. त्या वयात ह्या प्रभुतींचं गाणं ऐकल्यामुळे 'पब्लिक डिमांड म्हणजे' काय असतं ह्याची उमज येऊ लागली.

कॅसेट्च्या त्याच संचात अल्ताफ राजा ह्यांच्या गाण्यांची एक कॅसेट होती. ती कॅसेट कंपनीच्या बस मध्ये आणि कॅन्टीन मध्येही वारंवार लागायची.
- आवारा हवा का झोका हु...
- तुम तो ठहेरे परदेसी ..
- दोनो ही मोहोब्बत के !
- मेरी याद आयेगी ..
- पंगा ले लिया..

अशी एक से एक गाणी त्यात होती. गाण्याचा अर्थ फारसा महत्वाचा होता असं नव्हतं. पण तरीही किती वेळा ऐकल्या असतील याची मोजदाद नाहीये. ती सगळी गाणी, सोबतच मध्ये मध्ये अल्ताफजींची अफलातून शायरी, मधातच चालू गाण्याची चाल एकदम बदलणे हे अगदी तसंच्या तसं पॉझेससहित मला आजही पाठ आहे. आमच्या बस मधल्या सगळ्या सहप्रवाशांना ही ते तसंच लक्षात असेल ह्याची खात्री आहे. आज जेंव्हा ही गाणी कुठे ऐकतो तेंव्हा आपण हे ऐकत मोठं झालोय ह्याचा एक अभिमान आपसूकच दाटून येतो.

त्याशेवटी अल्ताफजींनी 'पंगा ले लिया' हे गाणं सादर केलं होतं. माझ्यासाठी आजही हे गाणं म्हणजे संगीताची सर्वोच्च सीमा आहे. आणि तिथं अल्ताफजीं विराजमान आहेत !

फिर अचानक ही एक हादसा हो गया
जिसके सपनों में मैं थाअ खोया हुआ
उसने देखा इधर और न देखा उधर
और उसी darling ने मेरे गाल पर भरपूर थप्पड़ दिया
यारों मैने पंगा …

हे ज्या उत्कटतेने अल्ताफजी गायले आहेत त्यासमोर कोणतेही गाणे फिकं वाटावे. (हे लिहिण्याआधी स्वतःची पाठ थोपटण्यात आलेली आहे त्यामुळे काळजी नसावी). कदाचित अल्ताफजींच हे गाणं मी अनेक वेळा ऐकल्यामुळेही हे घडत असेल. हे गाणे ज्या नोटवर संपते तिथं आपणही एका वेगळ्या विश्वात पोहोचलो असतो. हे गाणं सादर करण्याची हिंमत दाखवणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे.म्हणून आजही एखादा गायक जेंव्हा हे गाणं म्हणायचा प्रयत्न करतो तेंव्हा मी त्याला एक वैयक्तिक 'ग्रॅमी' देऊन टाकतो.

ह्यात एक गंमत अशी आहे की, अल्ताफजींचा एक प्रोग्राम दूरदर्शनवर नव वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमात झाला होता. त्यावेळी एका दर्दी मित्राने हा पूर्ण प्रोग्रॅम रेकॉर्ड केला. आणि मी त्या कॅसेटची एक कॉपी करवून घेतली. मित्रांचे जे अनंत उपकार माझ्यावर आहेत त्यातला हा एक पहिल्या पाचमध्ये येतो. ओरीजनल पेक्षा भारी गाणे अल्फाजींनी तेव्हा गायले होते असे माझे वैयक्तीक मत आहे. कालांतराने कॅसेटच सीडीमध्ये रूपांतर झालं. नंतर पेनड्राइव्ह, मेमरीकार्ड वगैरे प्रकारातून ते पूर्ण रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आलं. आजही आहे.पण अल्ताफजींना लाईव्ह ऐकण्याची इच्छा होती. ती मात्र काही पूर्ण झाली नाही. आताशा सरांचे कार्यक्रम होत नाहीत.

आता एक आणखी इच्छा आहे.... थोडी गमतीशीर !!

“चंडाल” सिनेमा ज्यांनी पाहिला असेल ते अल्ताफभाईं ना विसरू शकत नाहीत. ' करलो प्यार” हे गाणे सगळ्यांच्याच प्लेलिस्टमध्ये असेल. (अजून ऐकले नसेल तर तुमच्या सारखे दुर्दैवी तुम्हीच आणि पाहिले नसेल तर खरोखर तुम्ही कमनशिबी आहात असे समजा), ऐकण्या पेक्षा ते गाणे बघण्यात जास्त मजा आहे...
नाही तुम्ही पहाच हे गाणे आणि मगच पुढचा लेख वाचा...

या गाण्यात मेन गायिकेच्या मागे पांढऱ्या फुलांचे डिझाईन असलेला लाल फ्रॉक घातलेली एक मुलगी नाचत असते. ती मेन हिरवीणी पेक्षा जास्त चांगली नाचते. नीट लक्षपूर्वक पहा.

चंडाल हा एक क्राईम थ्रिलर म्हणून जितका अप्रतिम सिनेमा आहे तेव्हढंच त्याची सांगीतिक बाजूसुद्धा अप्रतिम आहे. दुर्जन सिंग (रामी रेड्डी) आणि इन्स्पेक्टर इंद्रजीत (मिठून) यांची जुगलबंदी फार सुंदर रंगवली आहे. त्यात दुर्जन सिंग इंद्रजीतला हाताला बांधून स्विमिंग पुला मध्ये बुडवतो. जिथे पुलीस ऑफिसर खुराना ची लाश पण बुडवलेली असते. मिठून पाण्याखाली आपले हात सोडवून घेतो ऑफिसरच्या कमरेला पिस्तुल तशीच असते, ती घेऊन तो सगळ्या गुंडाचा खातमा करतो

आता अल्ताफभाईं चे जे गाणे माझ्यामनात आहे ते इतरही कोणाच्याही मनात असू शकेल. पण पूर्ण जगात मी एकटाच अल्ताफजींचा पंखा आहे असा एक समज मी करून घेतलेला आहे. न जाणो कुठेतरी, कधीतरी अल्ताफजी भेटतील आणि त्यांना मी हे रेकॉर्डिंग ऐकवेन आणि मग एखादे गाणे ऐकवायची फर्माईश करेन. मग कदाचित तेही गायला लागतील ,

"अश्क़ों में हुस्न-ओ-रंग समोता रहा हूँ मैं, आंचल किसी का थाम के रोता रहा हूँ मैं,
निखरा है जा के अब कहीं चेहरा शऊर का, बहकी हुई बहार ने पीना सिखा दिया
पीता हूँ इस गरज़ से के जीना है चार दिन , मरने के इंतज़ार में पीना सीख लिया

परमेश्वरा...हे एकदा तरी घडावं !!

आणि कधीतरी घडेल ह्या आशेवर मी मोबाईलमधून दुनिया डिलीट करेल पण ते रेकॉर्डिंग डिलीट करणार नाही !!

समाप्त

(ता.क. : चंडाल मध्ये काम करताना मिठून साधारण पन्नाशीच्या आसपास असेल आणि त्याची हिरवीण स्नेहा साधारण १७ ते १८ वर्षांची असेल. आता मी जरी ५० च्या पुढे गेलो असलो तरी आता एखादी स्नेहा भेटली तरी माझी हरकत नाही. तेवढ्या वेळापुरतं बायकोला म्हणेन .... अरे हम गरीब हूवे तो क्या हूवा दिल के अमीर है !!)

--पैजाराबुवा,

जीवनमानइंदुरीउपहाराचे पदार्थऔषधोपचारकृष्णमुर्तीविचारआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

चिनार's picture

18 Jan 2021 - 1:06 pm | चिनार

अगागा माऊली!!
लय म्हणजे लयचं जबरा!!
अल्ताफ भाऊंच गाणं म्हणजे एक समांतर विश्व आहे...
आम्हाला पण खूप आवडते..
शाळेत एकदा तुम तो ठेहरे परदेसी सादर करून टाळ्या घेतल्या आहेत..

प्राची अश्विनी's picture

18 Jan 2021 - 1:07 pm | प्राची अश्विनी

:):):):):):):):):):):):):):):):):):):):)

कुमार१'s picture

18 Jan 2021 - 1:13 pm | कुमार१

आवडले

गवि's picture

18 Jan 2021 - 1:26 pm | गवि

हा हा हा..

"तुम तो ठहरे परदेसी" या गाण्याने खालील मालिकेतील गाण्यांना रिप्लेस करत त्यात स्थान मिळवले.

मई तेरी दुशिमनी दुशिमन तू मेरा, मई नागिन तू सपैरा..

आणि

परीदेसी पर्रीदेसी जाना नही.

टक टक टक टक ...

(बाकी काही बोलत नाही...)

जगप्रवासी's picture

18 Jan 2021 - 2:48 pm | जगप्रवासी

ओरिजिनल धागा जितका वाचनीय तितकाच तुमचा धागा पण धमाल आहे. मजा आली वाचायला.
चिनार यांनी मनातल्या मनात गाणी गुणगुणायला लावली तुम्ही ती गाणी ते सिन आठवायला लावून पोट धरून हसायला लावलात.

टवाळ कार्टा's picture

18 Jan 2021 - 3:14 pm | टवाळ कार्टा

कहर =))

Bhakti's picture

18 Jan 2021 - 8:32 pm | Bhakti

:):):)

दुर्गविहारी's picture

18 Jan 2021 - 11:08 pm | दुर्गविहारी

बेक्कार हसतोय. आज दगदगीचा दिवस ,कंटाळा आलेला.पण मुड एकदम ताजातवाना केलात . :-))))))

प्रचेतस's picture

19 Jan 2021 - 6:05 am | प्रचेतस

खल्लास झालोय माऊली =))