दिवाळी अंक 2017

बोबो's picture
बोबो in जनातलं, मनातलं
3 Nov 2017 - 11:16 am

नमस्कार मंडळी !!
कळविण्यास आनंद होतो की, यावर्षी खालील आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.

१. आवाज - 'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' ही हलकीफुलकी कथा
२. जत्रा - 'मिसळ खाणारी मुलगी' ही खुसखुशीत प्रेमकथा
३. धनंजय - 'पॉईंग' ही मनोरंजक विज्ञान कथा
४. मेहता मराठी ग्रंथजगत - 'सूड नावाची डिश' ही रहस्यकथा
५. सा. वार्तासूत्र (मराठी साहित्य परिषदेच्या कथास्पर्धेतील पारितोषिक विजेती कथा) - 'देखी जमाने की यारी' ही प्रेमकथा
६. वर्ल्ड सामना - 'नियतीचा संकेत' ही हलकीफुलकी प्रेमकथा
७. साहित्य सहयोग (कथास्पर्धेतील द्वितीय पारितोषिक विजेती कथा) - 'प्रत्येकाचे अरमान' ही सामाजिक कथा
८. प्रतिलिपी ऑनलाईन दिवाळी अंक - 'शेवटची चोरी' ही थरारक कथा (अनुक्रमणिकेत Chapter ४४ ला आहे)

कृपया वाचा आणि आपले अमूल्य अभिप्राय कळवा. :P :P
ई-मेल - nilesh.malv@gmail.com

मिपा परिवारात एकापेक्षा एक दिगग्ज लेखक आहेत. त्यांच्यापैकी कुणाकुणाचं साहित्य कोणकोणत्या दिवाळी अंकांमध्ये आलं आहेत, ते प्रतिसादात कळवता येईल.

तसेच यावर्षी दिवाळी अंकातल्या आवडलेल्या साहित्याबद्दलही कळवा. म्हणजे त्या कथा/कविता/लेखदेखील मिळवून वाचता येतील.

वाङ्मयकथाविनोदसाहित्यिकkathaaलेख

प्रतिक्रिया

नरेन.'s picture

3 Nov 2017 - 12:25 pm | नरेन.

३. धनंजय - 'पॉईंग' ही मनोरंजक विज्ञान कथा >> नावाच्या वेगळेपणा मुळे हीच पहिली वाचली. छान आहे. पुलेशु.

त्वरित अभिप्रायाबद्दल धन्यवाद नरेन. एखादा अंक उपलब्ध नसेल, तर मला कळवा

त्वरित अभिप्रायाबद्दल धन्यवाद नरेन. एखादा अंक उपलब्ध नसेल, तर मला कळवा

जागु's picture

3 Nov 2017 - 12:44 pm | जागु

अभिनंदन. नक्की वाचणार.

बोबो's picture

3 Nov 2017 - 12:50 pm | बोबो

धन्यवाद जागु

पुंबा's picture

3 Nov 2017 - 12:44 pm | पुंबा

लोकसत्तेचा अंक कसा आहे?
लोकसत्ता, अक्षरमैफल या दोन अंकांची अनुक्रमणिका वाचून अंक वाचावेसे वाटताहेत. आणि नेहमीचे यशस्वी मौज, कानि वगैरे कसे आहेत?
बाकी, झी मराठीचा गचाळ, महाबथ्थड अंक कुणी वाचलाय का?

झी चा अंक 'स्व आरती ओवाळ' प्रकारातला आहे, असं मित्राकडून कळलं.

Rahul D's picture

5 Nov 2017 - 9:52 pm | Rahul D

म्हागुरू बी हाय त्यात.

आणि हो. तुमचे अभिनंदन. कथा वाचण्याचा नक्की प्रयत्न करेन.

बोबो's picture

3 Nov 2017 - 12:55 pm | बोबो

धन्यवाद पुम्बा

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2017 - 5:14 pm | चौथा कोनाडा

दिवाळी अंकाचे मानकरी बनल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तुमचे !
वेळेनुसार कथा वाचण्याचा प्रयत्न करेन.
इथं एकेका कथेचा प्रोमो टाकून तुमच्या प्रतिभेची मिपाकरांना (आणखी) चूणुक दाखवता येईल.
जाहिरात देखिल होईल !

सुचनेबद्दल मनापासून आभार चौथा कोनाडा. ती आवडल्या गेली आहे. प्रतिभा हा फार मोठा शब्द आहे. तो थोरामोठ्यांच्या लिखाणाला शोभून दिसतो.
लवकरच कथेतला एखादा उतारा येथे टाकेन :-)

मी सध्या लोकमत चा दिवाळी अंक वाचतेय. मला आवडला. माहीतीपूर्ण अंक आहे. आपल्याला पतांजली म्हणजे रामदेवबाबा एवढच नाव माहित आहे. पण औषध निर्मितीचे बादशाह खरे बल्लवाचार्य आहेत. त्यांच्या पार्टनरशिपचा तो लेख आहे.

आता मी वाचतेय ती इसरोची माहीती. लोकमतच्या संपादीकेनेच लिहीली आहे. ती पण वाचनीय आहे. रॉकेट बनवताना तिथल वातावरणही अवकाशातील वातावरणासारख बनवून तेथे त्याची निर्मीती होते अशा प्रकारची माहित नसलेली माहीती वाचायला मिळाली.

"चला तर सदाशेठ. तुम्हाला अजिबात ताटकळत न ठेवता लवकरात लवकर तुमची इच्छा मी पूर्ण करून टाकतो."

आपल्या छातीचे ठोके जोरजोरात पडताहेत हे सदाला जाणवलं.

सनी दिवानी - मादक सौंदर्याचा ऍटमबॉम्ब, मदनिका, पूर्वाश्रमीची मादकपटांची नायिका व आताची चित्रपट अभिनेत्री.  सनी दिवानी, जिने संपूर्ण जगभरातील तरुणांची हृदयं आणि जिच्या मादक व्हिडीओजनी त्यांच्या मोबाईलमधली मेमरी आणि कॉप्युटर्समधली हार्ड डिस्क व्यापली होती, ती सनी दिवानी.  तिला भेटण्याच्या कल्पनेने सदाची अशी अवस्था झाली होती, त्यात नवल ते काय?

जादूगाराने सदाला पुरुषभर उंचीच्या बंदिस्त अशा एका लाकडी खोक्याजवळ नेलं. त्याचा दरवाजा उघडून त्याने सदाला आत जायला सांगितलं. जादूगाराने डोळे मिटले आणि तो मंत्र पुटपुटणार एवढ्यात सदाने दरवाजा उघडला आणि त्याला अडवलं.

"जादूगारसाहेब मंत्र व्यवस्थित म्हणा. नाहीतर सनी दिवानीऐवजी मी सनी देवल नामक मल्ल अभिनेत्याच्या बाहुपाशात जाऊन पोहोचायचो."
***********
यंदाच्या आवाज दिवाळी अंकातील 'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' या माझ्या कथेतील एक अंश.