परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा)
सुसाट वेगाने अभी आणि मयुर त्या यांत्रिक तबकडी (ufo)यानातुन जात होते.अंतराळात सगळीकडे निरव शांतता होती. दोघेही जपान मधे एका युफोलॉजी च्या केंद्रात शास्रज्ञ म्हणून कामाला होते.
आज सकाळीच अभी ला त्याच्या सुपर कंम्प्युटरवर एक संदेश आला होता.
तो संदेश अंतराळातुन आला होता. मयुर ने खुप प्रयत्न करुन अखेर तो संदेश आला होता. त्या दिशेचा शोध लावला होता.अभी आणि मयुर ने ३ वर्ष खुप मेहनत करुन एक तबकडी यान बनविले होते.ईतर यानापेक्षा ते एक सुपर यान होते. त्याने अंतराळात कमी खर्चात आणि अतिशय वेगात भ्रमण करता येत होते.
खुप वेळ झाला तरी त्यांना संदेश कुठुन आला ते ठिकाण किंवा ग्रह अजुन दिसत नव्हता...
अभी तबकडी तीव्र गतीने पुढे नेत होता. मयुर सुपर कंम्प्युटर वर स्कँन करक होता..
अचानक अभी ला दुरवर एक निळसर रंगाचा ग्रह दिसला त्याने आच्छर्याने डोळे विस्फारले..
त्याने मयुर ला आवाज दिला.
मयुरसुद्धा तो ग्रह बघुन चकित झाला कारण तो ग्रह हूबेहुब पृथ्वी सारखा च दिसत होता.
हळु हळु अभी ने यान त्या ग्रहाच्या दिशेने वळवले..
पन जवळ आल्यावर त्यांना समजले की या ग्रहावर जमिन खुपच कमी प्रमाणात आहे..
अभी ने यान अलगद त्या ग्रहावर ऊतरवले.
दोघांनी ऑक्सिजन मास्क च्या बँग्स घेतल्या व खाली ऊतरले.
आजुबाजुला निराळ्याच जातीची झाडे दिसत होती.
पानांचा रंग मात्र हिरवाच होता.पन एकही प्राणी त्यांना तिथे दिसत नव्हता..
अचानक सोसाट्याचा वारा सुटला अभी ने मयुरला एकमेकांचे हात पकडायला सांगितले.
अभी आणि मयुर ने ऑक्सिजन मास्क काढले कारण हवा आहे म्हनजे ऑक्सिजन पन असणार .
आणि खरोखरच ते सहजपने श्वास घेऊ शकत होते.
पन अजुनही संदेश कुनी पाठवला हे गुढ कायम होते..
पन नियतीने पुढे वेगळेच वाढुन ठेवले होते..
पुन्हा जोरात हवा वाहु लागली आणि एका यांत्रिक यानाचा आवाज येऊ लागला. दोघांनीही वर ती बघितले
एक चौकोनी आकाराचे
यान अवकाशातुन त्यांच्या दिशेने येत होते.
दोघांनीही आपल्या जवळ च्या सुपर गन्स हातात घेतल्या.
ते यान त्यांच्या समोर येऊन ऊतरले आणि यानाचा दरवाजा ऊघडला गेला. एक वेगळ्याच पोशाखातील व्यक्ती खाली ऊतरली
पन तो चेहरा बघुन अभी आणि मयुर त्या व्यक्ती ला बघतच राहिले
कोण असेल ती व्यक्ती ...?
हे दोघे त्या व्यक्तीला ओळखत असतील... ? बघुया पुढील भागात.
क्रमश:
वाचन
10162
प्रतिक्रिया
0