परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा)

दिनु गवळी जनातलं, मनातलं
सुसाट वेगाने अभी आणि मयुर त्या यांत्रिक तबकडी (ufo)यानातुन जात होते.अंतराळात सगळीकडे निरव शांतता होती. दोघेही जपान मधे एका युफोलॉजी च्या केंद्रात शास्रज्ञ म्हणून कामाला होते. आज सकाळीच अभी ला त्याच्या सुपर कंम्प्युटरवर एक संदेश आला होता. तो संदेश अंतराळातुन आला होता. मयुर ने खुप प्रयत्न करुन अखेर तो संदेश आला होता. त्या दिशेचा शोध लावला होता.अभी आणि मयुर ने ३ वर्ष खुप मेहनत करुन एक तबकडी यान बनविले होते.ईतर यानापेक्षा ते एक सुपर यान होते. त्याने अंतराळात कमी खर्चात आणि अतिशय वेगात भ्रमण करता येत होते. खुप वेळ झाला तरी त्यांना संदेश कुठुन आला ते ठिकाण किंवा ग्रह अजुन दिसत नव्हता... अभी तबकडी तीव्र गतीने पुढे नेत होता. मयुर सुपर कंम्प्युटर वर स्कँन करक होता.. अचानक अभी ला दुरवर एक निळसर रंगाचा ग्रह दिसला त्याने आच्छर्याने डोळे विस्फारले.. त्याने मयुर ला आवाज दिला. मयुरसुद्धा तो ग्रह बघुन चकित झाला कारण तो ग्रह हूबेहुब पृथ्वी सारखा च दिसत होता. हळु हळु अभी ने यान त्या ग्रहाच्या दिशेने वळवले.. पन जवळ आल्यावर त्यांना समजले की या ग्रहावर जमिन खुपच कमी प्रमाणात आहे.. अभी ने यान अलगद त्या ग्रहावर ऊतरवले. दोघांनी ऑक्सिजन मास्क च्या बँग्स घेतल्या व खाली ऊतरले. आजुबाजुला निराळ्याच जातीची झाडे दिसत होती. पानांचा रंग मात्र हिरवाच होता.पन एकही प्राणी त्यांना तिथे दिसत नव्हता.. अचानक सोसाट्याचा वारा सुटला अभी ने मयुरला एकमेकांचे हात पकडायला सांगितले. अभी आणि मयुर ने ऑक्सिजन मास्क काढले कारण हवा आहे म्हनजे ऑक्सिजन पन असणार . आणि खरोखरच ते सहजपने श्वास घेऊ शकत होते. पन अजुनही संदेश कुनी पाठवला हे गुढ कायम होते.. पन नियतीने पुढे वेगळेच वाढुन ठेवले होते.. पुन्हा जोरात हवा वाहु लागली आणि एका यांत्रिक यानाचा आवाज येऊ लागला. दोघांनीही वर ती बघितले एक चौकोनी आकाराचे यान अवकाशातुन त्यांच्या दिशेने येत होते. दोघांनीही आपल्या जवळ च्या सुपर गन्स हातात घेतल्या. ते यान त्यांच्या समोर येऊन ऊतरले आणि यानाचा दरवाजा ऊघडला गेला. एक वेगळ्याच पोशाखातील व्यक्ती खाली ऊतरली पन तो चेहरा बघुन अभी आणि मयुर त्या व्यक्ती ला बघतच राहिले कोण असेल ती व्यक्ती ...? हे दोघे त्या व्यक्तीला ओळखत असतील... ? बघुया पुढील भागात. क्रमश:
वर्गीकरण

43 टिप्पण्या 10,163 दृश्ये

Comments

अत्रे नवीन

In reply to by आदूबाळ

हाहा! सूर्याच्या जवळ गेल्यावर ओम असा काही आवाज ऐकू येतो म्हणे. . नासावाल्यानी शोधलय.

अभ्या.. नवीन

पण कथा भारीय, नुसत्या डोळ्यांनी अभिला ग्रह दिसला, सुपर कंप्यूटर च्या स्कैनर वर मयूरला दिसला नाही म्हणजे भरिच. कमी खर्चात बनवला की असे होते बघा.

चिनार नवीन

लय भारी त्या दुसऱ्या यानात अभी आणि मयूरच्या बायका असनारे...नवरे कुठे शेन खायला जातात ते बघायला... आमचा एक अंदाज

अभ्या.. नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

ते बिचारं उचक्या लागून जीव देईल एक दिवस. कीती ते पांडू पांडू पांडू पांडू पांडू पांडू पांडू पांडू. . पूर्ण पांडूरंग तरी म्हणा, हरीनामस्मरणाचे पुण्यतरी लागेल.

खेडूत नवीन

कारण हवा आहे म्हनजे ऑक्सिजन पन असणार ...आणि पन जवळ आल्यावर त्यांना समजले की या ग्रहावर जमिन खुपच कमी प्रमाणात आहे.. शास्त्रज्ञ अश्या प्रकारे विचार करत असल्याने जपानी शास्त्रज्ञांनी वैतागून त्यांचा गेम केला...दिलं पाठवून दोघांनाच!

चित्रगुप्त नवीन

पन तो चेहरा बघुन अभी आणि मयुर त्या व्यक्ती ला बघतच राहिले....कोण असेल ती व्यक्ती ...? .

खेडूत नवीन

In reply to by सस्नेह

नसतेच. पण म्हणून तर त्यांनी शीर्षकात लिहीलेय. तुम्ही एक मिनिमम टेनसन घेऊन वाचा..नैतर लगेच कश्याचं विडंबन_.. म्हणून प्रेरणा शोधायला धावाल...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

कोण असेल ती व्यक्ती ...?
मला वाटतं आणखी कोणत्या तरी ग्रहावरची माधुरी दिक्षित असेल. मोठ्या कष्टाने तिही या ग्रहावर पोहोचली असेल ? :) "उसने पुछा, मुहब्बत क्या है ? हमने भी कह दिया, शौक तुम्हारा, जुनून हमारा..!" -दिलीप बिरुटे (पृथ्वीवरचा एक वेडा) :)

अद्द्या नवीन

यांत्रिक तबकडी = पिवळे पितांबर , मेलेलं मडं , आणि वाकडं वळण .. हाहाहाहाहा सुपर कथा आहे .. अगदीच सुपर .. सुपर म्हणजे.. सुपरच सुपर .. पुढचा भाग सुपर लवकर टाका

amit१२३ नवीन

गोष्टी पेक्षा प्रतिसाद वाचायलाच जास्त मजा येतेय