चकल्या….. ३४२५

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
23 Apr 2017 - 2:41 pm

नमस्कार मंडळी.
यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे.
तिसरी कथा मजेदार आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता? …

१) १२३४५६७८९……

मी माझ्या बायकोच्या दबावा मूळे या प्रयोगात सामिल झालो होतो.

माझ्या कवटीला भोक पाडताना सुध्दा ती डॉक्टरांना अखंड सूचना देत होती.

माझे डोके बधिर असल्यामुळे परत बधिर करायची गरज नाही असे तिनेच डॉक्टरांना सांगीतले होते,

ऑपरेशन सक्सेसफुल, डॉक्टरांनी जाहिर केले, आणि हिच्या चेहर्यावर आन्ंदाचा महापुर उसळला,

लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला.

आणि आन्ंदाने म्हणाली “ बरं झाल! कांदे बटाटे ठेवण्यासाठी सारखी बास्केट विकत घ्यायचा खर्च आता करावा लागणार नाही."

२) पितांबरी…

बायको गावाला गेल्यावर त्याने लगेच मित्रांना घरी बोलावले.

सगळे जण जय्यात तयारीतच आले होते. सगळे आल्यावर त्याने घराचे सगळे दरवाजे बंद केले आणि खिडक्याही लावल्या.

नंतर आतल्या खोलीतुन एक एक सामान बाहेर आणुन ठेवायला त्याने सुरुवात केली. त्यातल्या प्रत्येक वस्तुकडे पाहिल्यावर त्याचे मित्र समाधानाने मान हलवत आनंद व्यक्त करत होते.

त्यांच्यातला प्रत्येक जण कार्यक्रम सुरु करण्यासाठी अधिर झाला होता.

पण त्याच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे आज कार्यक्रम सुरु करायचा मान त्याचा होता. त्याच्या मंद हलचालीं मुळे सगळे जण कंटाळायला लागले होते.

शेवटी त्याने एक मोठी जडशी पेटी बाहेर आणली. एका फडक्याने ती स्वच्छ पुसून घेउन मग हळूच ती उघडली.

सगळ्यांची उत्सुकता आता ताणली गेली होती.

त्यालाही ते माहित होते.

जमलेल्या सगळ्यांकडे हलकेच एक नजर टाकत त्याने पेटी ओढत भजन म्हणायला सुरुवात केली,

“विठु माउली तु माउली जगाची, माउलीत मुर्ती विठ्ठलाची”,

त्याचा सुरेल आवाज कानी पडताच ढोलकी वाल्याने अचूक सम पकडली आणि सगळ्यांनी टाळाचा ठेका धरला.

३) फिल्मी कोडे…..

“मालक मालक धाकले मालक बघा वेड्यासारखे करायला लागले आहेत. त्या वेताळे गुर्जींना ते सोडतच नाहीयेत.”

“किरकीरे तुम्ही उगाच किरकीर करु नका, त्या बाब्याला पकडुन इकडे आणा, आम्ही समजावतो त्याला. आणि हो तिकडे बघा त्या दुर्गीची नात घराबाहेर पडते आहे.
एकदा का ती दुर्गीच्या रेंज मधुन बाहेर पडली की तिचा ताबा घ्या.”

“ ए बाब्या, निट वागायचं बघ डोळे बघ डोळे बघ….” इनामदारंनी चिरुट धरलेल्या हातानेच डोळे ओढून अजुन मोठे केले.

आणि बाब्या ओरडायला लागला ………….

बाब्या कार ओरडला असेल ते एक ते पाच शब्द कितीही शब्द टाका अन अर्थपुर्ण कथा बनवा.

आहे की नाही सोपं????

(अर्थात हे ऑप्शनल आहे. शेवट नाही सांगितला तरी पहिल्या दोन कथा कशा वाटल्या याबद्दल मात्र जरूर सांगा)

पाणबुड्या पैजारबुवा,

इतिहासबालकथाऔषधोपचारकृष्णमुर्तीविचारआस्वाद

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

23 Apr 2017 - 3:26 pm | जव्हेरगंज

Bb

सिरुसेरि's picture

23 Apr 2017 - 8:57 pm | सिरुसेरि

+१००

अॅस्ट्रोनाट विनय's picture

23 Apr 2017 - 3:54 pm | अॅस्ट्रोनाट विनय

=)) लय भारी.
दिवाळी नसतांना चकल्या खायला मिळाल्या

पद्मावति's picture

23 Apr 2017 - 3:55 pm | पद्मावति

लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला.

अगागागा.....=)))
दुसर्या कथेचा क्लायमॅक्स =))

अभ्या..'s picture

23 Apr 2017 - 4:17 pm | अभ्या..

पाणबुड्या. अगागागागा.
माऊली धन्य आहात.
.
- छोटा हत्ती ड्राइव्हर अभ्या.

पैसा's picture

23 Apr 2017 - 4:35 pm | पैसा

=)) =))

Rahul D's picture

23 Apr 2017 - 4:39 pm | Rahul D

चकल्या....

स्रुजा's picture

23 Apr 2017 - 6:14 pm | स्रुजा

महालोल

संजय पाटिल's picture

24 Apr 2017 - 11:34 am | संजय पाटिल

_/\_

खेडूत's picture

24 Apr 2017 - 12:24 pm | खेडूत

:):)
लोलच लोल!
सोत्ता पाणडुब्बीत बसून आमाला भिजिवलंत हास्यरसात! लै भारी.

मोहन's picture

24 Apr 2017 - 1:09 pm | मोहन

जबरदस्त विडंबन.
माऊली दंडवत स्विकारावा.

अजया's picture

24 Apr 2017 - 4:57 pm | अजया

=))))

प्राची अश्विनी's picture

24 Apr 2017 - 6:36 pm | प्राची अश्विनी

:):):)

नीलमोहर's picture

25 Apr 2017 - 3:22 pm | नीलमोहर

एक नंबर भारी !!

रातराणी's picture

1 May 2017 - 10:16 am | रातराणी

हा हा! पैजारबुवा रॉक्स!

गामा पैलवान's picture

1 May 2017 - 1:08 pm | गामा पैलवान

हा हा हा पैजारबुवा! ज्याम मजा आली. विशेषत: भजन गाण्यासाठी दारंखिडक्या बंद करण्याची वेळ आली यावरून बराच हसलो.
आ.न.,
-गा.पै.

रुपी's picture

10 May 2017 - 5:57 am | रुपी

फारच जबरी! =)

एमी's picture

10 May 2017 - 1:26 pm | एमी

=))