एक्सेल एक्सेल - भाग २२ - सॉर्ट आणि फिल्टर

Primary tabs

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
1 Mar 2017 - 4:32 pm

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १०

भाग ११ - भाग १२ - भाग १३ - भाग १४ - भाग १५ - भाग १६ - भाग १७ - भाग १८ - भाग १९ - भाग २०

भाग २१ - भाग २२

डेटा नीटनेटका करण्यासाठी, प्रेझेंट करण्यासाठी असलेले अनेक पर्याय आपण आत्तापर्यंत बघितले. त्याच कामासाठी असलेला दोन अतिशय महत्वाचे पर्याय किंवा फीचर्स आता आपण जाणून घेऊ. ती फीचर म्हणजे सॉर्ट अँड फिल्टर. मुख्य मेनूतील डेटा या टॅबवर क्लिक केल्यास आपल्यासमोर काही बटन्स दिसतात. ज्यात डावीकडे बाह्य स्त्रोतातून डेटा इंपोर्ट करण्यासाठीचे काही पर्याय आहेत. त्यापुढे डेटा, त्यातल्या लिंक्स रिफ्रेश किंवा अपडेट करण्याचे पर्याय आहेत. त्याच्या उजवीकडे सॉर्ट अँड फिल्टर हा एक संच दिसतो ज्यातील फीचर आता आपण बघू.

सॉर्ट - नावातच याचा अर्थ आहे. आपल्याकडे असलेला डेटा, ठराविक क्रमाने मांडण्यासाठी सॉर्ट हा पर्याय वापरला जातो. परंतु त्याचे अनेक आयाम आहेत. त्याची प्राथमिक प्रक्रिया खालील इमेजमधे आपल्याला दिसेल. आपला डेटा किंवा ठराविक डेटा रेंज सिलेक्ट करावी. जितकी सिलेक्टेड डेटारेंज असेल तितकीच सॉर्ट पर्यायाने पुढे सॉर्ट केली जाते. सिलेक्ट केल्यावर सॉर्ट या बटनवर क्लिक करावं. (शॉर्टकट की Alt+A+S+S). यामुळे एक विंडो उघडते. त्यात, कुठल्या कॉलमनुसार सॉर्ट करणे, त्या कॉलमच्या कुठल्या निकषावर सॉर्ट करणे वर चढत्या, उतरत्या किंवा त्याव्यतिरिक्त वेगळ्या क्रमाने सॉर्ट करणे हे पर्याय आपल्याला ठरवता येतात. एकापेक्षा जास्त निकषांवरही आपण डेटा सॉर्ट करू शकतो.

sort

सॉर्ट बटनाच्या बाजूलाच ए-झेड व झेड-ए लिहिलेली दोन छोटी बटनं असतात. जी सिंपल असेंडिंग वा डिसेंडिंग म्हणजेच चढत्या वा उतरत्या क्रमाने डेटा (टेक्स्ट) पटकन सॉर्ट करण्यासाठी आहेत. (शॉर्टकट की Alt+A+S+A किंवा Alt+A+S+D)

फिल्टर - फिल्टर या पर्यायात आपल्या डेटाच्या शीर्षकांच्या ठिकाणी एक ड्रॉप डाऊन लिस्ट आपल्याला मिळते ज्यात असलेल्या विविध ऑप्शन्सना वापरून आपण आपला डेटा निवडक तेवढाच बघू शकतो. यात एक एक ओळ सिलेक्ट करून निवडक ओळी बघणे, अक्षरानुसार, अंकानुसार, सेलच्या किंवा अक्षराच्या रंगानुसार डेटा क्रमित करणे किंवा वगळणे या गोष्टी आपण निर्धारित करू शकतो. आपण गाडी, कंपनी, किंमत व आसनक्षमता यांच्या एका डेटावर वापरलेले वरील पर्याय सोबतच्या चित्रात बघू शकता.

filter1

filter2

मोठ्या आकारात असलेली माहिती, डेटा बघण्यासाठी, तपासण्यासाठी सॉर्ट व फिल्टर हे पर्याय सर्रास वापरले जातात. त्यांची उपयुक्तता खूप आहे आणि त्यामुळे पिव्हट, टेबल्स, चार्टस सोबतच फिल्टर व सॉर्ट हे पर्याय वापरल्याने एक्सेलवरची आपली कार्यक्षमता नक्कीच वाढते.

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

1 Mar 2017 - 11:17 pm | जयंत कुलकर्णी

छान !