एक्सेल एक्सेल - भाग २४ ० मॅक्रो

Primary tabs

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
7 Mar 2017 - 12:42 pm

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १०

भाग ११ - भाग १२ - भाग १३ - भाग १४ - भाग १५ - भाग १६ - भाग १७ - भाग १८ - भाग १९ - भाग २०

भाग २१ - भाग २२ - भाग २३ - भाग २४

मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील बरीच फीचर्स जी सामान्यतः वापरली जातात ती आपण पाहिली. आता एक असं फीचर बघू जे खरं म्हटलं तर फार किचकट आहे परंतु त्याचाही सोपा वापर करण्याची सोय एक्सेलमधेच आपल्याला दिलेली आहे. ते फीचर म्हणजे मॅक्रो.

मॅक्रो हा एक छोटासा प्रोग्रॅम असतो ज्यात आपण आपल्याला हवी ती ऑपरेशन्स आपल्याला हव्या त्या क्रमाने करण्यासाठी ठरवू शकतो. व तो प्रोग्रॅम रन केल्यास त्या गोष्टी आपोआप होतात. एक्सेल मॅक्रोसाठी वापरली जाणारी प्रोग्रॅमिंग भाषा ही व्हिजुअल बेसिक असते. आता मॅक्रो वापरायचं म्हणजे व्हिजुअल बेसिक आलंच पाहिजे असं काही नाही. अधिक क्लिष्ट व लांबलचक प्रोग्रॅम करण्यासाठी नक्कीच तुम्हाला ती भाषा येणं गरजेचं आहे पण सोपे सुटसुटीत मॅक्रो करण्यासाठी त्याची गरज नाही. कारण एक्सेलमधे मॅक्रो रेकॉर्ड करण्याची सोय आहे.

एक्सेलच्या व्ह्यू टॅबमधे उजवीकडे शेवटचा पर्याय आपल्याला दिसतो तो म्हणजे मॅक्रोज. त्यावर क्लिक केलं असता रेकॉर्ड मॅक्रोज किंवा व्ह्यू मॅक्रोज असे पर्याय दिसतात. त्यापैकी रेकॉर्ड मॅक्रोज वर क्लिक केलं असता त्यापुढे आपण करत जाऊ ती प्रत्येक अॅक्शन प्रोग्रॅमच्या स्वरूपात साठवली जाते. समजा एखाद्या डेटावर आपण वारंवार काम करत असू किंवा एखादं टेबल आपल्याला वारंवार बनवावं लागत असेल तर आपण नेहमी करत असलेल्या अॅक्शन्स, ऑपरेशन्स त्याच क्रमाने मॅक्रो म्हणून रेकॉर्ड केल्या तर पुढे फक्त एका क्लिकवर आपण त्या सगळ्या अॅक्शन्स करू शकतो. याने वेळेची कमालीची बचत होते.

a

परंतु मॅक्रो रेकॉर्ड करताना डेटा चा फॉर्मॅट, तुमच्या ऑपरेशन्स चा क्रम याकडे अतिशय बारीक लक्ष असलं पाहिजे. कारण शेवटी हा प्रोग्रॅम तयार होतो आणि त्यात तुमची छोट्यात छोटी चूकही प्रोग्रॅम इन्स्ट्रक्शन म्हणून साठवली जाते. एका सेल ला रंग देण्याचा एक छोटासा मॅक्रो सोबतच्या चित्रात दिसेल. याचंही एक्सेलच्या इतर फीचर्स सारखंच आहे, प्रत्यक्ष सराव करून बघितल्यावर अधिक चांगलं कळेल आणि मजाही येईल. तेंव्हा जरूर वापरून बघा, मॅक्रोज.

प्रतिक्रिया

साधा मुलगा's picture

7 Mar 2017 - 2:27 pm | साधा मुलगा

Interesting, वापरून पाहतो.

सुधांशुनूलकर's picture

8 Mar 2017 - 6:28 pm | सुधांशुनूलकर

मॅक्रो हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे. एक्सेलमध्ये काही वेळा वापरलंय.
वर्डमध्ये जास्त वापरलंय.

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2017 - 2:49 am | पिलीयन रायडर

एक्सेलमध्ये वापरलं आहे. वर्ड मध्ये मॅक्रो असतात हेच माहिती नव्हतं! कधी जमलं तर उदाहरण दाखवाल का?