एक्सेल एक्सेल - भाग १५ - टर्न आणि ट्विस्ट

Primary tabs

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
5 Dec 2016 - 12:52 pm

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १०

भाग ११ - भाग १२ - भाग १३ - भाग १४ - भाग १५

a

मागील लेखाच्या प्रतिसादात आलेल्या सुचवणीनुसार लेख इथे टंकत आहे.

पिव्हट या शब्दाचा शब्दकोषातला अर्थ › to turn or twist असा होतो. एक्सेलमधे 'टेबल' या शब्दाच्या मागे 'पिव्हट' शब्द लावला की नेमकं याच अर्थानुसार डेटाला टर्न आणि ट्विस्ट करणारं एक जबरदस्त फंक्शन तयार होतं, पिव्हट टेबल. कल्पना करा की डेटा म्हणजे एखादी वस्तू आहे. ती वस्तू निरखून बघण्यासाठी आपण जशी वेगवेगळ्या बाजूने बघू, वेगवेगळ्या कोनातून बघू, त्याचप्रमाणे डेटा अॅनलाईज करण्याची क्षमता पिव्हट टेबल आपल्याला देतं. विशेषतः मोठा डेटा, खूप माहिती अभ्यासण्यासाठी पिव्हट टेबलचा प्रचंड उपयोग होतो.

insert

पिव्हट टेबल नेमकं काय करतं? तर आपला जो डेटा असेल, त्यातील आपण जे नेमके निकष निवडू त्यानुसार डेटाचं संक्षिप्त किंवा विस्तारित रूप आपल्याला दाखवतं. समजा आपल्याकडे एका महिन्यात झालेल्या चार ग्राहकांच्या
विक्रीचा डेटा आहे. हा डेटा वेगवेगळ्या पद्धतीने पिव्हट टेबल वापरून कसा अभ्यासावा ते आपण बघू.

new

पिव्हट टेबल तयार करण्याची पहिली पायरी ही 'टेबल' सारखीच आहे. डेटा रेंज सिलेक्ट करून इन्सर्ट मेनू मधील डावीकडून पहिलाच पिव्हट टेबलचा पर्याय क्लिक करावा. असं केल्यावर एक छोटी विंडो उघडते. ज्यात १. पिव्हट टेबल कुठल्या डेटापासून बनवायचे आहे, व २. ते टेबल कुठे बनवायचे आहे हे दोन पर्याय निवडायचे असतात. मूलतः त्यामधे आपण सिलेक्ट केलेला डेटा हा पहिला पर्याय म्हणून आपल्याला निवडलेला दिसतो आणि 'न्यू वर्कशीट' म्हणजेच तयार होणारं पिव्हट टेबल हे एक्सेलच्या उघडलेल्या फाईलमधल्या स्वतंत्र वर्कशीटवर बनवायचा पर्याय निवडलेला दिसतो. या ऐवजी आपण उघडलेल्या फाईलव्यतिरिक्त दुसर्या डेटापासूनही पिव्हट टेबल बनवू शकतो, तसेच आहे त्याच शीट वर आपल्याला हव्या त्या जागी त्या नवीन पिव्हट टेबलची जागा निर्धारित करू शकतो.

pt1

या मेनूतील पर्याय निवडून ओके वर क्लिक केल्यावर नवीन शीटमधे एक रिकामे पिव्हट टेबल (डिफॉल्ट नाव - पिव्हट टेबल १) दिसते. इथे आपल्या निवडीनुसार आपल्याला डेटा दिसतो. स्क्रीनच्या उजव्या हाताला फील्ड लिस्ट शीर्षक असलेली एक विंडो दिसते. फील्ड लिस्ट मधे आपल्या मूळ डेटा मधल्या कॉलम्स ची हेडिंग्स म्हणजेच शीर्षकं आपल्याला दिसतात. त्याखालोखाल रिपोर्ट फिल्टर, कॉलम लेबल्स, रो लेबल्स आणि व्हॅल्यूज असे चार रकाने दिसतात. या फील्ड लिस्ट विंडोमधूनच आपण पिव्हट टेबलची बहुतेक ऑपरेशन्स करतो.

pt3

आता पिव्हट टेबलवर अगदी प्राथमिक स्वरूपाचं एक ऑपरेशन करू. ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतीने फील्ड लिस्ट मधलं एखादं फील्ड रो लेबल्स च्या रकान्यात आणू. रिकाम्या पिव्हट टेबलच्या जागेत आता ऑर्डर डेट कॉलम मधले महिने दिसू लागतील. याच पद्धतीने सेल्समन चं फील्ड, कॉलम लेबल्स मधे आणू आणि टोटल चं फील्ड व्हॅल्यूज मधे आणू. आता आपल्याला महिन्यानुसार प्रत्येक सेल्समन ने केलेली विक्री एका संक्षिप्त स्वरूपात दिसेल.

पिव्हट टेबल विषय सोपा असला तरी मोठा असल्याने त्याची उरवरित फीचर्स पुढील भागांत बघू.

प्रतिक्रिया

साधा मुलगा's picture

5 Dec 2016 - 5:18 pm | साधा मुलगा

धन्यवाद साहेब, चित्रे टाकून स्पष्टीकरण दिल्याबद्दल आणि आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल, थोडी प्रॅक्टिस करतो आता.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

सुधांशुनूलकर's picture

5 Dec 2016 - 8:37 pm | सुधांशुनूलकर

खूप वापरलंय. गुंतागुंतीची माहिती सोप्या आणि नेमक्या स्वरूपात समोर येते.

विस्तृत लेखासाठी विशेष आभार.

अल्पिनिस्ते's picture

6 Dec 2016 - 7:56 pm | अल्पिनिस्ते

खुपच माहितीप:)_/\_