एक्सेल एक्सेल - भाग १७ - पिव्हट टेबल ऑप्शन्स

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
9 Jan 2017 - 1:28 pm

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १०

भाग ११ - भाग १२ - भाग १३ - भाग १४ - भाग १५ - भाग १६ - भाग १७

पिव्हट टेबल ऑप्शन्स - पिव्हट टेबल मधेही डीझाईनचा टॅब तुम्हाला कॉस्मेटिक स्वरुपाचे बदल करू देतो. त्याशिवाय इतर बदल करण्याच्या पर्यायांसाठी ऑप्शन्स हा टॅब आहे. यातील पर्याय खालीलप्रमाणे आहेत.

a

पिव्हट टेबल नेम - यात तुम्ही पिव्हट टेबलला नाव देऊ शकता.
ऑप्शन्स - या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून त्यात पुन्हा ऑप्शन्स च्या पर्यायावर क्लिक केलं असता एक विंडो उघडते ज्यात अनेक पर्याय आपल्याला दिसतात. ज्यांचं वर्गीकरण लेआउट अँड फॉर्मॅट, टोटल्स अँड फिल्टर्स, डिस्प्ले, प्रिंटिंग व डेटा अशा पाच प्रकारात केलेलं आहे. यातील बहुतांश पर्याय समजायला अतिशय सोपे आहेत ज्यांचा वापर करून ते आपल्याला योग्य प्रकारे समजू शकतील.

b

अ‍ॅक्टिव्ह फील्ड - आपला माऊसचा कर्सर ज्या सेलमधे असेल तो अ‍ॅक्टिव्ह सेल असतो आणि पिव्हट टेबलमधल्या एखाद्या सेलमधे जर कर्सर असेल तर तो ज्या फील्डमधे आहे ते असतं पिव्हट टेबलचं अ‍ॅक्टिव्ह फील्ड. उदाहरणार्थ प्रॉडक्टच्या एखाद्या नावावर आपण क्लिक केलेलं असेल तर प्रॉडक्ट फील्ड आपलं अ‍ॅक्टिव्ह फील्ड असतं. या अ‍ॅक्टिव्ह फील्डच्या बाबतीतले पर्याय आपल्याला सदर मेनूत मिळतात. ज्यात ते फील्ड एक्स्पांड करणं, कोलॅप्स करणं म्हणजेच त्याखालोखाल असलेली फील्ड्स बंद होऊन फक्त एका ओळीत त्या फील्ड्स ची बेरीज किंवा निर्धारित केलेलं उत्तर दिसणं, आणि फील्ड सेटिंग्स हे पर्याय असतात. फील्ड सेटिंग्स मधे आपल्याला त्या फील्डची टोटल हवी आहे किंवा नाही हे ठरवता येतं. इथे टोटल म्हणजे केवळ बेरीज नसून त्यासाठी काउंट, अ‍ॅव्हरेज, मॅक्स, मिन, प्रॉडक्ट हेही पर्याय आहेत. पिव्हट टेबल ऑप्शनसपैकी लेआउट अँड प्रिंट प्रकारातले पर्याय स्वतंत्र फील्ड्स साठीही उपलब्ध असतात.

ग्रूप - यात आपल्याला निवडक ओळी एकत्रित करता येतात, एकत्रित केलेल्या ओळी पूर्ववत करता येतात तसेच फील्ड्स ग्रूप करता येतात.
सॉर्ट - नावाप्रमाणेच यात ज्या फील्ड वर आपला कर्सर असेल ते फील्ड सॉर्ट करता येतं, म्हणजेच त्यातल्या डेटाची क्रमवारी ठरवता येते. यात व्हॅल्यू फील्ड चा सॉर्ट मेनू इतर डेटा फील्ड च्या सॉर्ट मेनूपेक्षा वेगळा असतो.

c
d

डेटा - हा अतिशय महत्वाचा मेनू आहे. पिव्हट टेबल च्य मागे एक माहितीसंच किंवा डेटा असतो. ज्या डेटापासून पिव्हट टेबल बनलेलं आहे तो डेटा रिफ्रेश करण्याचा किंवा बदलण्याचा पर्याय या मेनूत आहे.
अ‍ॅक्शन्स - अ‍ॅक्शन्स मेनूमधे क्लिअर, सिलेक्ट व मूव्ह असे तीन पर्याय आहेत. पैकी क्लिअर च्या पर्यायाने आपल्याला पिव्हट टेबलमधे लावलेले फिल्टर्स किंवा संपूर्ण पिव्हट टेबल घालवण्याचा पर्याय आहे. सिलेक्ट च्या मेनूत आपण पिव्हट टेबलमधील ठराविक भाग/ठराविक फील्ड्स किंवा संपूर्ण पिव्हट टेबल सिलेक्ट करू शकतो. पुढे ते कॉपी पेस्ट करण्याच्या दृष्टीने हे सिलेक्शन असू शकतं. मूव्ह पिव्हट टेबलच्या मेनूत आपण पिव्हट टेबल दुसर्या निर्धारित जागी हलवू शकतो.
शो/हाईड - या मेनूत दिलेल्या गोष्टी आपण व्हिजिबल किंवा हिडन करू शकतो. जसं की हेडर्स, फील्ड लिस्ट व एक्सपांड/कोलॅप्स बटन्स

f

टूल्स - ऑप्शन्स पर्यायातला हा मेनू सर्वात महत्वाचा म्हटला पाहिजे. यातील पहिल्या पर्यायात पिव्हट टेबलवरून आपल्याला पिव्हट चार्ट बनवता येतो. पिव्हट चार्ट म्हणजे थोडक्यात चार्ट व पिव्हट टेबलचं संयुक्तिक रूप आहे ज्याबद्दल विस्तृतपणे सांगावं लागेल. याशिवाय फॉर्म्युलाज नावाचा एक मेनू आहे. या मेनूत आपण कॅल्क्युलेटेड फील्ड आपल्या पिव्हट टेबलमधे समाविष्ट करू शकतो. उदाहरणार्थ प्रॉडक्ट्स, सेल व्हॅल्यू व प्रॉफिट अशा डेटापासून बनवलेल्या पिव्हट टेबलमधे प्रॉफिट पर्सेंटेज हे फील्ड मॅन्युअली अ‍ॅड करता येऊ शकतं. खालील चित्रात दिल्याप्रमाणे त्याची प्रक्रिया असेल. याचप्रमाणे कॅल्क्युलेटेड आयटेम म्हणजेच एका फील्डमधील एकापेक्षा जास्त निर्धारित ओळींची केलेली बेरीज. याशिवाय एकापेक्षा जास्त कॅल्क्युलेटेड आयटेम्स असतील तर त्यांच्या कॅल्क्युलेशनचा क्रम आपण यात ठरवू शकतो. लिस्ट फॉर्म्युला या फीचरने पिव्हटमधे वापरलेले सर्व फॉर्म्युले एका स्वतंत्र शीटमधे दिसतात. ओएलएपी टूल्स असा जो मेनू दिसतो ते एक एक्सेलचं अ‍ॅड ऑन फीचर आहे ज्यात बाह्य डेटाबेस व क्यूब्स च्या वापरातून पिव्हट टेबल्स बनवलं जातं, जो एक वेगळा व व्यापक विषय आहे त्यामुळे तो इथे सांगत नाही.
तर आता वेगवेगळ्या डेटापासून पिव्हट टेबल बनवायचा, त्यात खेळायचा सराव करायला हरकत नाही. इथे दिलेल्यापेक्षा अनेक गोष्टी प्रत्यक्ष वापरातून कळत जातात. एक्सेलची मजाच ती आहे. त्याला अंतच नाही.