मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
2 Jan 2017 - 1:03 pm

.

नमस्कार मंडळी.

"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -

नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी.

**************************************************


मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६
या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले.

"सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अ‍ॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे.

तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती.

मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का?

लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं,

ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं.

कोणाला अशाच इतर अडचणी येतात का?

चला ...लिटरली चला... चाला.....

कीप वॉकिंग... चियर्स...

A

वावरआरोग्यप्रकटनआरोग्य

प्रतिक्रिया

तेजस आठवले's picture

15 Jan 2017 - 8:00 pm | तेजस आठवले

पायऱ्या चढणे हा कितपत चांगला व्यायाम आहे ? विशेष करून हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वगैरे ?
घर सहावा मजला आणि कार्यालय दहाव्या मजल्यावर आहे. पूर्वी सोळा मजले चढत असे.(वेगवेगळ्या वेळी, एकत्र नाही).
हा चांगल्या प्रतीचा व्यायाम म्हणावा का ?

अनिल मोरे's picture

15 Jan 2017 - 8:06 pm | अनिल मोरे

फोटो कसा अपलोड करायचा?

चार किमी वाढीव वेगाने चाललो.

मोदक's picture

15 Jan 2017 - 9:51 pm | मोदक

टाळ्या!!!

बाळ सप्रे's picture

16 Jan 2017 - 12:28 pm | बाळ सप्रे

हि पोस्ट दिसत नाहिये पण http://www.timingindia.com/result.html इथे तुम्ही ४:१० वेळेत मॅरॅथॉन पूर्ण केल्याच दिसतय !!
जबरदस्त कामगिरीबद्दल अभिनंदन !!

अनिल मोरे's picture

16 Jan 2017 - 1:30 pm | अनिल मोरे

result-details
Split timings

अनिल मोरे's picture

16 Jan 2017 - 1:32 pm | अनिल मोरे

मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन !!!

बाळ सप्रे's picture

16 Jan 2017 - 12:31 pm | बाळ सप्रे

मुंबई मॅरॅथॉनसाठी जोरदार तयारी करुनही यावर्षी मनासारखी वेळ आली नाही.. ४:२९
गेल्यावर्षीपेक्षा ६ मिनिटं जास्ती लागली. पण कुठलाही त्रास न होता संपवल्याबद्दल समाधान मानतोय!!

सर्व मॅरेथॉन धावकांचे हार्दिक अभिनंदन..!!

२१ किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो.

मोदक's picture

16 Jan 2017 - 11:27 pm | मोदक

२१ किमी - हाफिस ते घर.

बाळ सप्रे आणि आनिल मोरे..अभिनंदन..खूप मस्त वेळ आहे तुम्हा दोघांचा..४.१०, ४.२९..रियली हॅट्स ऑफ..

माझी पहिलीच पुर्ण मॅरेथॉन..५.४१ वेळ आहे..मी ४.३० तासाखाली पुढच्या वर्षीसाठी टार्गेट ठेवतो आता..
तुम्ही दोघांनी आता लेख लिहा पुर्ण मॅरेथॉन च्या तयारीसाठी..

अनिल मोरे's picture

16 Jan 2017 - 3:33 pm | अनिल मोरे

शलभदादा, मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन !!!

हकु's picture

17 Jan 2017 - 12:31 am | हकु

अनिल मोरे, बाळ सप्रे आणि शलभ, तुम्हा तिघांचंही हार्दिक अभिनंदन! हाफ मॅरेथॉन धावल्यावर फुल मॅरेथॉन धावायला काय कष्टं करावे लागत असतील याचा पुरेपूर अंदाज आला. प्रचंड प्रचंड विल पॉवर लागत असणार, नक्कीच!

डॉ श्रीहास's picture

17 Jan 2017 - 6:23 pm | डॉ श्रीहास

पहीली फुल मॅरेथाॅन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन...

गेल्या आठवड्यापासून माझं काहीतरी गंडतंय ब्रेस्ट स्ट्रोक करताना, मध्यापर्यंत व्यवस्थित जातोय. शेवटपर्यंत जाऊ की नाही ही भीती म्हणा की आणखी काही, नंतर किक नीट होत नाही. कोणाला असा अनुभव आलाय? असल्यास काय केलं परत रुळावर यायला?

बाळ सप्रे's picture

16 Jan 2017 - 2:39 pm | बाळ सप्रे

३-४ लॅप्स फक्त किकची प्रक्टिस करा.. बोर्ड घेउन. ..
तसे केल्याने मसल मेमरी बिल्ड होते.. सगळं ताळ्यावर येतं !!

ह्म्म, करुन बघतो उद्या.

हकु's picture

17 Jan 2017 - 12:26 am | हकु

कालची माझी पहिलीच हाफ मॅरेथॉन. २तास १४ मिनिटे लागली.

अनिल मोरे's picture

17 Jan 2017 - 9:42 am | अनिल मोरे

हार्दिक अभिनंदन!

बाळ सप्रे's picture

17 Jan 2017 - 10:20 am | बाळ सप्रे

पहिल्याच प्रयत्नात २:१४.. खूपच छान!! अभिनंदन..

माझीही शॅम्पेन's picture

19 Jan 2017 - 3:31 pm | माझीही शॅम्पेन

सर्व मॅरेथॉन पटु नच मनःपूर्वक अभिनंदन __/\__ सलग २१ / ४२ किमी पळणे म्हणजे काय हे फक्त पळलेले लोकच सांगू शकतात , हा असा प्रकार आहे जो तुम्ही सुरु करू शकता पण माघार घेऊ शकत नाही

मी घोट्याची दुखापत घेऊन हाफ मॅरेथॉन यशस्वी पूर्ण केली आणि आता पूर्ण बरा आहे , ह्या वर्षी राहिलेली कसर भरून काढण्यात येईल , सातत्याने पळत असताना जो शरीर बरोबर सवांद साधला जातो तो खरंच अप्रतिम असतो

जसा सायकल वाल्यांचा व्हाट्सअँप ग्रुप आहे तसा लॉन्गरनर्स चा करूया का ( भ्रमण ध्वनी व्यनि करावा)

अप्पा जोगळेकर's picture

24 Jan 2017 - 12:34 pm | अप्पा जोगळेकर

साहेब, मला अअ‍ॅडवाल का या ग्रुप मधे. नंबर व्यनि करतो.
या रविवारी हाफ मॅरेथॉन धावणार आहे. पाहू काय होत ते. पहिलीच हाफ मॅरेथॉन आहे.

आज ४६ मिनिटांचा व्हिडीओ सुरु केला पण १८ मिनिटात घामाघुम झाल्याने आणि मुख्य धाप लागल्याने, थांबले. गेले काही दिवस १२ सूर्यम्नमस्कार घातले. डॉक्टर म्हणाले वजन कमी होण्याकरता कार्डिओ व्यायाम हवा. खालील व्यायामपटुचे व्हिडीओ जे की पहात एकाच जागी चालता येते, अए डॉक्टरांनी सुचविले. पाहू यात.
.
या वर्षी तरी फिट होण्याचे सिरीअस ध्येय ठेवले आहे.

https://www.youtube.com/user/walkathomemedia
.

मोदक's picture

17 Jan 2017 - 3:45 pm | मोदक

२२ किमी - घर ते हाफिस.

डॉ श्रीहास's picture

17 Jan 2017 - 6:32 pm | डॉ श्रीहास

घर ते ओपिडी हे अंतर २२ पावले असल्यानी सकाळी उठून ३५.४६ किमी सायकलींग (MTB) केली.

फुल आणि हाफ मॅरेथाॅन (स्वप्नवत वेळात ) पूर्ण केल्याबद्दल परत एकदा अभिनंदन _/\_.

पिरतम's picture

18 Jan 2017 - 1:23 pm | पिरतम

सारखे धावल्यानंतर उत्साहित वाटणे, थकवा येण्याऐवजी जास्त पाळावे असे वाटणे याला runners high असे म्हणतात....विकी वर आणखी माहिती आहे

https://en.m.wikipedia.org/wiki/Neurobiological_effects_of_physical_exer...

पिरतम's picture

18 Jan 2017 - 1:37 pm | पिरतम

khup वेळ धावल्यानंतर sukhad वाटणे याला runners high म्हणतात

https://en.m.wikipedia.org/wiki/Neurobiological_effects_of_physical_exer...

अप्पा जोगळेकर's picture

24 Jan 2017 - 12:37 pm | अप्पा जोगळेकर

हॅ. रनर्स हाय हा एक वेगळाच प्रकार आहे.
सुखद वाटणे म्हणजे रनर्स हाय नव्हे.
बहुधा लॅक्टिक अ‍ॅसिडच पुन्हा लॅक्टोज बनते आणि अगणित काळ धावत राहता येईल असे वाटते त्याला रनर हाय म्हणतात. ते फक्त अल्ट्रा मॅरेथॉनलाच अनुभवता येते असे वाचले आहे.

मोदक's picture

18 Jan 2017 - 11:25 pm | मोदक

आजचे सायकलिंग - 42 किमी

अनरँडम's picture

18 Jan 2017 - 11:30 pm | अनरँडम

रोज साधारण पावणे चार मैल पळालो. सातत्य हा पळणार्‍याचा सर्वात मोठा मित्र आहे असे माझे मत झाले आहे. गुडघे, मांड्या, पोटर्‍या प्रत्येक भागाने अनेकदा चालता न येण्या इतपत असहकार पुकारलेला असतांनाही मी सातत्याशी मैत्री बाळगल्याने आता फारसा त्रास होत नाही.

सध्या पोहणं पुन्हा ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न चालू आहे.

पुढची पाने दिसतच नाहीत. किती आहेत पाने? मला फक्त एकच पान दिसत आहे.

हा प्रतिसाद दिल्यानंतर मधले प्रतिसाद दिसू लागलेत. काहीतरी गडबड आहे.

डॉ श्रीहास's picture

20 Jan 2017 - 6:57 pm | डॉ श्रीहास

सोमवार ते शुक्रवार मिळून १६१ किमी सायकलींग झालयं .

ओके, तसे माझे १८५ किमी झाले आहेत.

उद्या सरपंच धुव्वा करणारेत म्हणे. ;)

मोदक's picture

21 Jan 2017 - 11:49 pm | मोदक

आज 133 किमी सायकल चालवली

प्रशांत's picture

23 Jan 2017 - 1:03 pm | प्रशांत

मागच्या आठवड्यात एकुन २६४ किमि सायकलिंग झाली.

त्यातली १ मोठी राईड भुलेश्वर ची १३५ किमि या राईड्ला मोदक आणि सागर सोबत होता.

येस्स.. भुलेश्वरला मजा आली. येताना हॉटेल कांचनला व्हेज बिर्याणी आणि दालतडका जिरा राईस चांगले मिळाले.

माझे मागच्या आठवड्याचे एकूण सायकलिंग - ३८२ किमी.

अमर विश्वास's picture

24 Jan 2017 - 11:02 am | अमर विश्वास

दोन महिन्यांच्या खंडानंतर आज परत व्यायामाला सुरवात केली

प्रभात रोडच्या नालपार्क मध्ये ४ किमी धावलो. २६ मिनिटे लागली.

त्यानंतर माफक स्ट्रेचिंग ...

वेल्लाभट's picture

24 Jan 2017 - 11:34 am | वेल्लाभट

वॉर्म अप
१५ जोर
१५ + १५ बैठका (बॉडीवेट)
१५ पुश अप्स
१५ सिट अप्स
१५ हॅमर कर्ल्स
आणि ५-६ बुलवर्कर चे व्यायामप्रकार

हे सगळं अजिबात न थांबता

मंडळी, जानेवारीमध्ये केलेला व्यायाम येथे नोंदला गेला नसल्यास जरूर नोंदवा.

या महिन्याचा धागा काढत आहे.

प्रशांत's picture

1 Feb 2017 - 10:52 pm | प्रशांत

या महिन्यात एकुन ५०५ किमि सायकल चालवली.