मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

गवि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी. ************************************************** मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले. "सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अ‍ॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे. तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती. मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का? लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं, ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं. कोणाला अशाच इतर अडचणी येतात का? चला ...लिटरली चला... चाला..... कीप वॉकिंग... चियर्स... A

वाचन 45985 वाचनखूण प्रतिक्रिया 135

तेजस आठवले Sun, 01/15/2017 - 20:00
पायऱ्या चढणे हा कितपत चांगला व्यायाम आहे ? विशेष करून हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वगैरे ? घर सहावा मजला आणि कार्यालय दहाव्या मजल्यावर आहे. पूर्वी सोळा मजले चढत असे.(वेगवेगळ्या वेळी, एकत्र नाही). हा चांगल्या प्रतीचा व्यायाम म्हणावा का ?

In reply to by अनिल मोरे

बाळ सप्रे Mon, 01/16/2017 - 12:28
हि पोस्ट दिसत नाहिये पण http://www.timingindia.com/result.html इथे तुम्ही ४:१० वेळेत मॅरॅथॉन पूर्ण केल्याच दिसतय !! जबरदस्त कामगिरीबद्दल अभिनंदन !!

बाळ सप्रे Mon, 01/16/2017 - 12:31
मुंबई मॅरॅथॉनसाठी जोरदार तयारी करुनही यावर्षी मनासारखी वेळ आली नाही.. ४:२९ गेल्यावर्षीपेक्षा ६ मिनिटं जास्ती लागली. पण कुठलाही त्रास न होता संपवल्याबद्दल समाधान मानतोय!!

शलभ Mon, 01/16/2017 - 14:04
बाळ सप्रे आणि आनिल मोरे..अभिनंदन..खूप मस्त वेळ आहे तुम्हा दोघांचा..४.१०, ४.२९..रियली हॅट्स ऑफ.. माझी पहिलीच पुर्ण मॅरेथॉन..५.४१ वेळ आहे..मी ४.३० तासाखाली पुढच्या वर्षीसाठी टार्गेट ठेवतो आता.. तुम्ही दोघांनी आता लेख लिहा पुर्ण मॅरेथॉन च्या तयारीसाठी..

In reply to by शलभ

हकु Tue, 01/17/2017 - 00:31
अनिल मोरे, बाळ सप्रे आणि शलभ, तुम्हा तिघांचंही हार्दिक अभिनंदन! हाफ मॅरेथॉन धावल्यावर फुल मॅरेथॉन धावायला काय कष्टं करावे लागत असतील याचा पुरेपूर अंदाज आला. प्रचंड प्रचंड विल पॉवर लागत असणार, नक्कीच!

सूड Mon, 01/16/2017 - 14:34
गेल्या आठवड्यापासून माझं काहीतरी गंडतंय ब्रेस्ट स्ट्रोक करताना, मध्यापर्यंत व्यवस्थित जातोय. शेवटपर्यंत जाऊ की नाही ही भीती म्हणा की आणखी काही, नंतर किक नीट होत नाही. कोणाला असा अनुभव आलाय? असल्यास काय केलं परत रुळावर यायला?

हकु Tue, 01/17/2017 - 00:26
कालची माझी पहिलीच हाफ मॅरेथॉन. २तास १४ मिनिटे लागली.

In reply to by बाळ सप्रे

माझीही शॅम्पेन गुरुवार, 01/19/2017 - 15:31
सर्व मॅरेथॉन पटु नच मनःपूर्वक अभिनंदन __/\__ सलग २१ / ४२ किमी पळणे म्हणजे काय हे फक्त पळलेले लोकच सांगू शकतात , हा असा प्रकार आहे जो तुम्ही सुरु करू शकता पण माघार घेऊ शकत नाही मी घोट्याची दुखापत घेऊन हाफ मॅरेथॉन यशस्वी पूर्ण केली आणि आता पूर्ण बरा आहे , ह्या वर्षी राहिलेली कसर भरून काढण्यात येईल , सातत्याने पळत असताना जो शरीर बरोबर सवांद साधला जातो तो खरंच अप्रतिम असतो जसा सायकल वाल्यांचा व्हाट्सअँप ग्रुप आहे तसा लॉन्गरनर्स चा करूया का ( भ्रमण ध्वनी व्यनि करावा)

In reply to by माझीही शॅम्पेन

अप्पा जोगळेकर Tue, 01/24/2017 - 12:34
साहेब, मला अअ‍ॅडवाल का या ग्रुप मधे. नंबर व्यनि करतो. या रविवारी हाफ मॅरेथॉन धावणार आहे. पाहू काय होत ते. पहिलीच हाफ मॅरेथॉन आहे.

शुचि Tue, 01/17/2017 - 04:48
आज ४६ मिनिटांचा व्हिडीओ सुरु केला पण १८ मिनिटात घामाघुम झाल्याने आणि मुख्य धाप लागल्याने, थांबले. गेले काही दिवस १२ सूर्यम्नमस्कार घातले. डॉक्टर म्हणाले वजन कमी होण्याकरता कार्डिओ व्यायाम हवा. खालील व्यायामपटुचे व्हिडीओ जे की पहात एकाच जागी चालता येते, अए डॉक्टरांनी सुचविले. पाहू यात. . या वर्षी तरी फिट होण्याचे सिरीअस ध्येय ठेवले आहे. https://www.youtube.com/user/walkathomemedia .

पिरतम Wed, 01/18/2017 - 13:23
सारखे धावल्यानंतर उत्साहित वाटणे, थकवा येण्याऐवजी जास्त पाळावे असे वाटणे याला runners high असे म्हणतात....विकी वर आणखी माहिती आहे https://en.m.wikipedia.org/wiki/Neurobiological_effects_of_physical_exercise

पिरतम Wed, 01/18/2017 - 13:37
khup वेळ धावल्यानंतर sukhad वाटणे याला runners high म्हणतात https://en.m.wikipedia.org/wiki/Neurobiological_effects_of_physical_exercise

In reply to by पिरतम

अप्पा जोगळेकर Tue, 01/24/2017 - 12:37
हॅ. रनर्स हाय हा एक वेगळाच प्रकार आहे. सुखद वाटणे म्हणजे रनर्स हाय नव्हे. बहुधा लॅक्टिक अ‍ॅसिडच पुन्हा लॅक्टोज बनते आणि अगणित काळ धावत राहता येईल असे वाटते त्याला रनर हाय म्हणतात. ते फक्त अल्ट्रा मॅरेथॉनलाच अनुभवता येते असे वाचले आहे.

अनरँडम Wed, 01/18/2017 - 23:30
रोज साधारण पावणे चार मैल पळालो. सातत्य हा पळणार्‍याचा सर्वात मोठा मित्र आहे असे माझे मत झाले आहे. गुडघे, मांड्या, पोटर्‍या प्रत्येक भागाने अनेकदा चालता न येण्या इतपत असहकार पुकारलेला असतांनाही मी सातत्याशी मैत्री बाळगल्याने आता फारसा त्रास होत नाही.

प्रशांत Mon, 01/23/2017 - 13:03
मागच्या आठवड्यात एकुन २६४ किमि सायकलिंग झाली. त्यातली १ मोठी राईड भुलेश्वर ची १३५ किमि या राईड्ला मोदक आणि सागर सोबत होता.

In reply to by प्रशांत

मोदक Mon, 01/23/2017 - 13:16
येस्स.. भुलेश्वरला मजा आली. येताना हॉटेल कांचनला व्हेज बिर्याणी आणि दालतडका जिरा राईस चांगले मिळाले. माझे मागच्या आठवड्याचे एकूण सायकलिंग - ३८२ किमी.

अमर विश्वास Tue, 01/24/2017 - 11:02
दोन महिन्यांच्या खंडानंतर आज परत व्यायामाला सुरवात केली प्रभात रोडच्या नालपार्क मध्ये ४ किमी धावलो. २६ मिनिटे लागली. त्यानंतर माफक स्ट्रेचिंग ...

वेल्लाभट Tue, 01/24/2017 - 11:34
वॉर्म अप १५ जोर १५ + १५ बैठका (बॉडीवेट) १५ पुश अप्स १५ सिट अप्स १५ हॅमर कर्ल्स आणि ५-६ बुलवर्कर चे व्यायामप्रकार हे सगळं अजिबात न थांबता