मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७
नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -
नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी.
**************************************************
मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले.
"सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे.
तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती.
मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का?
लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं,
ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं.
कोणाला अशाच इतर अडचणी येतात का?
चला ...लिटरली चला... चाला.....
कीप वॉकिंग... चियर्स...
In reply to चार किमी वाढीव वेगाने चाललो. by गवि

In reply to स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन by अनिल मोरे
In reply to हि पोस्ट दिसत नाहिये पण http: by बाळ सप्रे
In reply to हि पोस्ट दिसत नाहिये पण http: by बाळ सप्रे
In reply to मुंबई मॅरॅथॉनसाठी जोरदार by बाळ सप्रे
In reply to २१ किमी सायकलिंग करून हाफिसात by मोदक
In reply to बाळ सप्रे आणि आनिल मोरे. by शलभ
In reply to बाळ सप्रे आणि आनिल मोरे. by शलभ
In reply to बाळ सप्रे आणि आनिल मोरे. by शलभ
In reply to गेल्या आठवड्यापासून माझं by सूड
In reply to ३-४ लॅप्स फक्त किकची प्रक्टिस by बाळ सप्रे
In reply to हाफ मॅरेथॉन by हकु
In reply to हाफ मॅरेथॉन by हकु
In reply to पहिल्याच प्रयत्नात २:१४.. by बाळ सप्रे
In reply to सर्व मॅरेथॉन पटु नच मनःपूर्वक by माझीही शॅम्पेन
In reply to २२ किमी - घर ते हाफिस. by मोदक
In reply to रुंनर्स high by पिरतम
In reply to पुढची पाने दिसतच नाहीत. किती by एस
In reply to ह्या आठवड्यात.... by डॉ श्रीहास
In reply to मागच्या आठवड्यात by प्रशांत
पायऱ्या चढणे