मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
30 Nov 2016 - 10:58 pm

.

नमस्कार मंडळी.

मी आज केलेला व्यायाम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

नोव्हेंबर महिन्यात मिपाकरांनी केलेला एकूण व्यायाम पुढीलप्रमाणे
सायकलिंग - ८०१० किमी

रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.

(वरील अंतर धाग्यावर दिलेली माहिती आणि मिपाकरांचा स्ट्रावा ग्रूप यावरून काढली आहे - पोहण्याचे अंतर कळवल्यास ट्रॅक करणे सोपे जाईल.)

सर्व व्यायामपटू मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..!!!

डिसेंबर महिन्यातील व्यायाम या धाग्यावर टाकत राहूया..

क्रीडाविचार

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

30 Nov 2016 - 11:57 pm | खटपट्या

स्ट्रावा धाग्यावर जाउ शकत नाही. घरी जाउन बघतो.

खेडूत's picture

1 Dec 2016 - 9:44 am | खेडूत

छान!
पण रनिंग/ वॉकिंग २४८ किमी हे काय झेपलं नाही.या ग्रुपात किती लोक्स आहेत?
मी एकटाच दरमहा दोनशे किमी चालतो.

हे पूर्वीच्या धाग्यात दिलेले + मिपाकरांच्या ग्रूपवरचे आकडे आहेत.

तुम्ही नियमितपणे मिपावर दिलेत तर आम्हाला ट्रॅक ठेवणे सोपे जाईल.

सामान्य वाचक's picture

1 Dec 2016 - 10:03 am | सामान्य वाचक

आणि 40 मिनिटे सट्रेंग्थ ट्रैनिंग

मी strava नाही वापरत
त्यामुळं माझे किमी ऍड होत नाहीयेत

मोदक's picture

1 Dec 2016 - 10:21 am | मोदक

इथे देत रहा, मी एकूण व्यायामात मोजतो.

:)

साधा मुलगा's picture

1 Dec 2016 - 11:04 am | साधा मुलगा

धन्यवाद एवढे कष्ट घेतल्याबद्दल,उत्तम उपक्रम आहे हा. एखादी मॅरेथॉन / स्पर्धा असेल ज्यात मिपाकर सहभागी होऊ शकतात, त्याचे रेजिस्ट्रेशन वगैरेंच्या लिंक हि द्याव्यात या धाग्यावर.

हेच म्हणतो, स्थानिक मॅरेथॉन स्पर्धांची माहिती मिळाली तर सहभाग घ्यायला सोपं जात, बहुतेक वेळा असल्या स्पर्धा झाल्या नंतर कळतं.

पुढच्या महिन्यात स्टॅंडर्ड चार्टर्ड मॅरेथॉन आहेत मुंबईत, पण तिचा ६ किलोमीटर रन केव्हाच फुल्ल झाला.

आणि २१ किलोमीटर साठी अगोदरच अनुभव हवा होता.

यासाठी वेगळा धागा काढावा का..? हा धागा ३१ डिसेंबरला वाचनमात्र होईल.

देशपांडेमामा's picture

1 Dec 2016 - 10:29 am | देशपांडेमामा

30 किमी सायकलिंग ऑफिसला येताना

देश

तुषार काळभोर's picture

1 Dec 2016 - 12:10 pm | तुषार काळभोर

चरबी जाळा, इंधन नको.. +१

डॉ श्रीहास's picture

1 Dec 2016 - 2:47 pm | डॉ श्रीहास

६०७ किमी सायकलींग आणि ७४ किमी चालणे + पळणे ...... असा चांगला व्यायाम झालाय..

आनंदराव's picture

1 Dec 2016 - 3:07 pm | आनंदराव

डिसेंबर ची सुरूवात 105 किमी सायकलिंग.

आनंदराव's picture

1 Dec 2016 - 3:07 pm | आनंदराव

डिसेंबर ची सुरूवात 105 किमी सायकलिंग.

मोदक's picture

1 Dec 2016 - 3:10 pm | मोदक

झक्कास..!!!!

आनंदराव's picture

1 Dec 2016 - 3:13 pm | आनंदराव

तुमची प्रेरणा

त्रिवेणी's picture

1 Dec 2016 - 3:54 pm | त्रिवेणी

सध्या सगळाच व्यायाम बंद आहे.पण तरी वाचून जाते सगळ्यांचा व्यायाम.तेवढाच माझ्या डोळ्यांचा व्यायाम होतो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Dec 2016 - 4:52 pm | अनिरुद्ध.वैद्य

सायकलींग धराल काय? ;)

आज ५ किमी स्टेशनरी साकलींग, अपर बॉडी अन मग १० मिनिटे एलिप्टीकल (३०० कॅलरीज हे मशिन १० मिनिटात खातं त्यामुळं माझ लैच जीव!!! ) अन हो, ५० जोर.

हा हा.. धरूया की. आपल्याला कुठे मिपाकरांच्यात स्पर्धा लावायची आहे. एकमेकांना प्रोत्साहन देवून शक्य होईल तितका व्यायाम करायचा आहे बस्स..! :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Dec 2016 - 10:47 am | अनिरुद्ध.वैद्य

काल कार्डिओ होता ... जवळजवळ ६०० कॅलरीज खाल्ले. आज शनवार असल्याने दुपारी जाइल.

नितीन पाठक's picture

1 Dec 2016 - 5:20 pm | नितीन पाठक

दररोज चे चालणे ६.५ किमी X ३० दिवस = १९५ किमी
सायकलींग स्ट्रावा वर अपडेट होत नाही, पण सायकलींग होतेच.

इतके नेमके अंतर रोज ठरवून चालता का..?

नितीन पाठक's picture

3 Dec 2016 - 3:10 pm | नितीन पाठक

सर्व प्रथम उत्तर द्यायला उशीर झालाय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
होय. आमच्या ग्रुपचा एक ठराविक मार्ग ठरला आहे. वेळ सुध्दा ठरलेली आहे. आम्ही सर्व जण त्याच मार्गावर दररोज फिरत असतो.
त्यामुळे माझे घर टू घर एकूण अंतर ६.५ किमी निश्चितच (स्ट्रावा वर मोजले आहे). कधीतरी काही कारणास्तव जाणे जमत नाही, उदा. गावी जाणे, प्रकृती बरी नसणे.

साधा मुलगा's picture

1 Dec 2016 - 9:14 pm | साधा मुलगा

आज 4 किमी चाललो

सामान्य वाचक's picture

2 Dec 2016 - 9:56 am | सामान्य वाचक

जॉग
थोडा स्पीड वाढवायचा प्रयत्न केला
टेम्पो रन
त्यात फारसे यश नाही आले

विशाल कुलकर्णी's picture

2 Dec 2016 - 10:57 am | विशाल कुलकर्णी

हा उपक्रम मस्त आहे राव. माझं रोजचं १२ किमी चालणं होतं (मॉर्निंग वॉक - टू अँड फ्रो - नेरेगाव ते लोणिवली वाडी )
शनिवार - रविवार सुटी असते त्यामुळे त्या दिवशी मुडवर अवलंबून असतं. मुड असेल तर कधी १५-१६ किमीसुद्धा होते. शनिवार - रविवार शक्यतो चालण्यापेक्षा पळण्याचा प्रयत्न करतो. अगदी संपूर्ण नाही जमले तरी ८-९ किमी पळणे होतेच. अर्थात गॅप घेत-घेतच.

एक कल्पना सुचली आहे, सर्व मिपाकरांनी एकाच दिवशी एक मॅरेथॉन पूर्ण करायची. ज्यांना जितके शक्य होईल तितके. मॅरेथॉन घ्या किंवा सायकलिंग किंवा चालणे किंवा पोहणे; काहीही. इथे किंवा स्वतंत्र धाग्यावर सर्वांनी येऊन अपडेट द्यायचे आणि शक्य झाल्यास फोटो डकवायचे. एकाच दिवशी टार्गेट ठेवून.

मोदक's picture

2 Dec 2016 - 1:38 pm | मोदक

भारी कल्पना...!

तुम्हाला व्यनी केला आहे..!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Dec 2016 - 11:08 am | अनिरुद्ध.वैद्य

४२ किमी चालण / धावणं शक्य नाहिये हो ... १० किमीच कसे बसे होतात.

साधा मुलगा's picture

2 Dec 2016 - 8:54 pm | साधा मुलगा

4 किमी धावणे आणि साधारण 2 किमी चालणे.

अभिदेश's picture

3 Dec 2016 - 1:12 am | अभिदेश

मी रोज ४ कि. मी चालतो.

सामान्य वाचक's picture

3 Dec 2016 - 11:19 am | सामान्य वाचक

सट्रेंग्थ ट्रैनिंग

सामान्य वाचक's picture

4 Dec 2016 - 10:53 am | सामान्य वाचक

10 किमी

साधा मुलगा's picture

4 Dec 2016 - 8:29 pm | साधा मुलगा

आज 3 किमी धावलो.

प्रशांत's picture

4 Dec 2016 - 8:52 pm | प्रशांत

आज लोणावळा जाऊन आलो ९२.२ किमि सायकलिंग झाले

स्थितप्रज्ञ's picture

4 Dec 2016 - 11:00 pm | स्थितप्रज्ञ

आज ५.१ किमी पळालो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Dec 2016 - 10:27 am | अनिरुद्ध.वैद्य

आजपासुन थ्री डे स्प्लीट सुरु केलंय. आज लेग्स होते. बॉडी वेट स्क्वॅट्स, बारबेल स्क्वॅट्स, डंबेल लंजेस, लेग प्रेस, एक्स्टेंशन, कर्ल, काफ रेझ, अ‍ॅडक्टर, अ‍ॅब्ड्क्टर सगळ सग्ळ करवुन घेतलंय.

त्यामुळे पायांना मस्त रग लागलीय!

३८ ते ४० किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो. स्ट्रावा ने फक्त ३१.५ किमी रेकॉर्ड केले.

प्रशांत's picture

5 Dec 2016 - 1:57 pm | प्रशांत

मागच्या आठवड्यात स्ट्रावा वापरल नाही म्हणुन हि शिक्षा.

तुला आज ५० किमि करायचे ना? घरी जाताना ७ किमि जास्त चालवा.. हा का ना का

मोदक's picture

5 Dec 2016 - 2:23 pm | मोदक

आज ८० चे टार्गेट होते.

प्रशांत's picture

5 Dec 2016 - 7:38 pm | प्रशांत

ऑल दि बेस्ट
आज १०० केल्यास गितांजली ची बिर्याणी पुढच्या विकांतला.

आज २० किमि सायकलींग ( ऑफिस - घर - ऑफिस)

मोदक's picture

5 Dec 2016 - 7:40 pm | मोदक

उद्या करतो १००...!

प्रशांत's picture

7 Dec 2016 - 12:59 pm | प्रशांत

झाले का १००?

काल १०० किमीचा कंटाळा आला म्हणून ४० किमीच झाले.

..आणि आज कंटाळ्याचा हँगओव्हर झाल्याने ० किमी. :'(

बिर्याणीची ऑफर किती दिवस आहे..? ;)

गणामास्तर's picture

7 Dec 2016 - 5:53 pm | गणामास्तर

व्यायामात जरी सहभागी होऊ शकत नसलो तरी बिर्याणी खाण्यात होऊ शकतो.
कुठशीक आहे हे गीतांजली ?

अवांतर : मी गेल्याच्या गेल्या आठवड्यात रोज पोहण्याचा नियम करून सलग ३ दिवस पोहायला गेलो.
परत आल्यावर सपाटून भूक लागायची म्हणून सकाळी डब्बल का नाश्ता झाला, ३ दिवसात १ किलो वाढले.
पोहणे बंद झाले आता वजन स्थिर आहे :)

सातारा रोड, ट्रेजर पार्क जवळ. लै भारी बिर्याणी असते.

(खूप पॉश हॉटेल नाही त्यामुळे वातावरणाकडे बघून जाणार असाल तर एकदा चक्कर मारून ठरवा.)

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Dec 2016 - 11:52 am | अनिरुद्ध.वैद्य

कुठ आलं ;)

शलभ's picture

5 Dec 2016 - 2:18 pm | शलभ

आज १५ किमी पळालो.

अरिंजय's picture

5 Dec 2016 - 8:24 pm | अरिंजय

एक आठवडयाच्या विश्रांती नंतर आज ३२ किमी सायकलींग

साधा मुलगा's picture

5 Dec 2016 - 9:21 pm | साधा मुलगा

6 किमी चाललो

मोदक's picture

5 Dec 2016 - 11:28 pm | मोदक

21 किमी सायकलिंग करून हाफिसातून परत!!

आज नेहमीच्या रूटचा कंटाळा आला म्हणून शॉर्टकटने 24 किमी सायकल चालवून हाफिसात पोहोचलो ;)

बाबा योगीराज ढेपाळले का? का संध्याकाळी सायकल हाणताय? :D

बाबा योगिराज's picture

7 Dec 2016 - 6:43 pm | बाबा योगिराज

काल जरी ढेपाळलो, तरी आज परत धमाका करण्यात यशस्वी झालेलो आहे. आजची सायकल 34 किलोमीटर.

ह्या रविवार पर्यंत 225 चा आकडा जरूर पार होणार.

अरिंजय's picture

6 Dec 2016 - 8:44 pm | अरिंजय

आज ५१ किमी सायकल चालवली.

सामान्य वाचक's picture

7 Dec 2016 - 9:10 am | सामान्य वाचक

Interval ट्रैनिंग
एकूण 4 किमी धरा

एकमेकांच्या नादाने चांगल्या आरोग्यदायक सवयी लावणारे असे धागे हे सर्वात सुंदर ऑनलाईन कट्टे आहेत. असेच सर्वांना मनाची उभारी, निर्धार आणि मानसिक सोबत देणारे धागे येऊन मिपा आणखी समृद्ध होत चाललंय.

बाळ सप्रे's picture

7 Dec 2016 - 11:19 am | बाळ सप्रे

बर्‍याच दिवसांनी उगवलात गविराज :-)

मोदक's picture

7 Dec 2016 - 1:48 pm | मोदक

धन्यवाद गवि.. :)

अरिंजय's picture

7 Dec 2016 - 5:43 pm | अरिंजय

आज आमच्या विवाहदिना निमित्त शतकी सायकल फेरी मारली.

बाबा योगिराज's picture

7 Dec 2016 - 5:52 pm | बाबा योगिराज

लगे रहो.
मानसराव चंद्रात्रेसाह्येब,
तुम्हाला आणि वाहिणीसाहेबांना लग्नाच्या वाड्डदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बाबा योगीराज.

अरिंजय's picture

7 Dec 2016 - 9:29 pm | अरिंजय

धन्यवाद, बाबा योगीराज. तुमच्या १०० ची वाट बघतोय.

प्रशांत's picture

7 Dec 2016 - 9:56 pm | प्रशांत

११ डिसेंबरला डॉ. सोबत शतक मारणार अशी माहिती मिळाली आहे

अरिंजय's picture

7 Dec 2016 - 10:58 pm | अरिंजय

डॉक ला प्रोत्साहन देण्यासाठी.

अरे वा! तुम्हां उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अरिंजय's picture

7 Dec 2016 - 10:57 pm | अरिंजय

धन्यवाद एसजी

कुंदन's picture

7 Dec 2016 - 10:50 pm | कुंदन

१० की मी.

कुंदन's picture

7 Dec 2016 - 10:50 pm | कुंदन

१० की मी. चाललो

साधा मुलगा's picture

8 Dec 2016 - 9:49 am | साधा मुलगा

काल 4 किमी चाललो

अल्पिनिस्ते's picture

8 Dec 2016 - 11:34 am | अल्पिनिस्ते

व्हाया पंढरपुर रोड १७ किमी सायकलिंग

५७ किमी सायकलिंग करून हाफिसात पोचलो. संध्याकाळी ४० किमी करून १०० चे लक्ष्य पार करण्याचा प्रयत्न केला जाईल.

त्रिवेणी's picture

8 Dec 2016 - 3:55 pm | त्रिवेणी

आजचा व्यायाम

सहा सूर्यनमस्कार. हळूहळू लक्ष्य वाढवण्यात येईल.

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2016 - 9:39 am | पिलीयन रायडर

१ तास योगासने. त्यात ८ सुर्यनमस्कार.