एयर फ्रायर पाककृती- मसाला मटार

केडी's picture
केडी in पाककृती
12 Jul 2016 - 9:35 pm

Masala green Peas

एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा इथे वाचा

साहित्य

२ कप मटार दाणे (मिळाले तर ताजे, नाहीतर फ्रोझन)

१ मोठा चमचा मिरची पावडर

१ मोठा चमचा हळद

१ चमचा धने पावडर

१/२ चमचा जिरे पावडर

१/२ चमचा काळीमिरी पावडर

१ चमचा चाट मसाला

१ चमचा मीठ

१ चिमूट साखर

१ मोठा चमचा तेल (किंवा ऑईल स्प्रे)

कृती

ताजे मटार वापरात असल्यास, मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात, ते २ ते ३ मिनिटे उकळून घ्या (ब्लांच). लगेच बाहेर काढून गार पाण्यात, किंवा नळाखाली धरून गार करा. फ्रोझन वापरात असलात तर ते सध्या पाण्यात ठेवून साफ करून घ्या.

मटार दाणे, एक टॉवेल वर टाकून कोरडे करून घ्या. एयर फ्रायर १८० डिग्री वर ५ मिनिटे लावून प्रि-हिट करून घ्या. सर्व मसाले, मीठ आणि साखर एकत्र करून घ्या. मटार दाणे कोरडे झाले की त्याच्यावर तेलाचा स्प्रे मारून (किंवा १ चमचा तेल टाकून) सगळ्या दाण्यांना नीट लागेल असेल लावून घ्या.

मसाला पावडर चे २ ते ३ मोठे चमचे वरून भुरभुरून मटाराला सगळीकडून लागेल असे एकत्र करून घ्या.

मसाला लावलेले दाणे एयर फ्रायर च्या बास्केट मध्ये टाका. २० ते २५ मिनिटे चा टायमर सेट करून मटार दाणे भाजून घ्या. अधून मधून बास्केट हलवून दाणे कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्या.

बाहेर काढून, पुन्हा थोडा मसाला वरून भुरभुरावा. खायला घेताना एक लिंबाची फोड वरून पिळून मग खायला घ्या! अर्थात हा प्रकार चकणा सदरात मोडत असल्यामुळे, इतर तयारी आधीच करून ठेवा!

हे मसाला मटार कोरड्या हवाबंद काचेच्या बाटलीत भरून ठेवल्यास सहज १० ते १५ दिवस टिकतात.

एयर फ्रायर नसेल तर मटार ओवन मध्ये बेक करून घेऊ शकता. अधून मधून हलवून सगळ्या बाजूने नीट भाजले जातायत की नाही हे बघत राहणे.

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

12 Jul 2016 - 9:44 pm | नूतन सावंत

मी पयली.
झकास.फोटो जबरा.

बहुगुणी's picture

12 Jul 2016 - 11:24 pm | बहुगुणी

मस्त फोटो! (भूक चाळवली!)

पिंगू's picture

12 Jul 2016 - 10:07 pm | पिंगू

जबरी बनले आहेत मटार..

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2016 - 6:44 am | अत्रुप्त आत्मा

टरटरित मटार !

स्मिता_१३'s picture

13 Jul 2016 - 6:46 am | स्मिता_१३

मस्तच !

मुक्त विहारि's picture

13 Jul 2016 - 7:26 am | मुक्त विहारि

"मसाला मटार" सारखीच, "मसाला मूग डाळ" पण ह्या एयर फ्रायर मध्ये, करता येईल का?

केडी's picture

13 Jul 2016 - 9:18 am | केडी

आकाराने लहान असल्यामुळे बास्केट मध्ये ठेवता येणार नाही, पण फॉईल लावून त्यावर ठेवून करून बघायला हरकत नाही. प्रयत्न करून बघतो, आणि जमलं तर इथे अपडेट नक्की टाकेन. तुमच्या अभिप्राया आणि सुचने बद्दल धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

13 Jul 2016 - 11:03 am | मुक्त विहारि

वांग्याचे काप, हराभरा कबाब, व्हेज कटलेट हे पण ह्या पद्धतीने करता आल्यास उत्तम.

बियर बरोबर व्हेज फ्राय पदार्थ उत्तम लागतात.

हे पदार्थ जर ह्या पद्धतीने जमले तर हे उपकरण नक्कीच घरात आणले जाईल.

केडी's picture

13 Jul 2016 - 2:40 pm | केडी

पदार्थ हे नक्की ह्यात उत्तम होतात. उपकरण आणून श्रीगणेशा करा.

मस्त, हे airfryer फार आकर्षित करते आहे मला. अंदाजे किती frequently वापरता तुम्ही हे सांगू शकाल का ? विकत घ्यावेसे वाटते आहे, पण उगीच पडून नको राहायला म्हणुन विचारते आहे.

केडी's picture

14 Jul 2016 - 4:41 pm | केडी

हा मुद्दा योग्य आहे. एयर फ्रायर चा वापर हा सवयी चा भाग आहे। आमच्याकडे महिन्यातून दोनदा किंवा जास्ती वेळा मच्छी/चिकन असं काही न काही होत असतं. मासे श्यालो फ्राय करायच्या ऐवजी मी शक्यतो एयर फ्राय करतो।
तसेच मुलांसाठी मकेन चे फ्राईस किंवा इतर फ्रोझन पदार्थ आणले जातात, ते शक्यतो ह्यातच बनवतो.

सप्तरंगी's picture

14 Jul 2016 - 6:32 pm | सप्तरंगी

आभार, पटकन सांगितल्याबद्दल, विचार करतेच, दुकाने अजून बंद व्हायची आहेत:) btw फोटू पण मस्त आहे, आधी मला brussels sprouts च वाटले होते. ब्लॉग आहे हा तुमचा eat , लिव्ह कूक?

केडी's picture

14 Jul 2016 - 7:03 pm | केडी

ला अवश्य भेट द्या. आणि घेणार असाल उपकरण तर amazon. in वर सर्वात स्वस्त पडेल। इतर ओनलाईन दुकाने पण एकदा बघून मगच घ्या.

केडी's picture

14 Jul 2016 - 7:06 pm | केडी

amazon. in वर सर्वात स्वस्त पडेल

हे भारतात असाल हे गृहीत धरून लिहिलंय.

रुस्तम's picture

14 Jul 2016 - 9:49 pm | रुस्तम

राव ब्लॉगची लिंक द्या की

केडी's picture

14 Jul 2016 - 10:19 pm | केडी

दिले तर चालतात असं गृहीत धरून माझ्या ब्लॉग चा दुवा देतोय
www.EatLiveCook.com

हा प्रतिसाद नियमांना धरून नसेल तर उडवला तरी चालेल.

रुस्तम's picture

14 Jul 2016 - 11:16 pm | रुस्तम

धन्यवाद

सप्तरंगी's picture

15 Jul 2016 - 5:45 pm | सप्तरंगी

छान फोटो आणि पाककृती दिसत आहेत केदार, fb वर लायकेन.

केडी's picture

15 Jul 2016 - 8:34 pm | केडी

लाइक केल्या बद्दल!

पियुशा's picture

13 Jul 2016 - 12:37 pm | पियुशा

झ्क्कास्स !!!

डश's picture

13 Jul 2016 - 2:54 pm | डश

चविष्ट

सूड's picture

13 Jul 2016 - 6:40 pm | सूड

वाह!!

पैसा's picture

13 Jul 2016 - 6:56 pm | पैसा

पाकृ आणि फोटो सुंदर आहे.

पैसा's picture

13 Jul 2016 - 6:58 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/33408 इथे स्वाती दिनेश, सानिका यांनीही एअर फ्रायरमधल्या अशा छान पाकृ दिल्या आहेत.

पगला गजोधर's picture

14 Jul 2016 - 11:54 am | पगला गजोधर

या सुंदर पाकृ मधे, मला चिकन-खिमा टाकून, (मटार+खिमा)पाकृ बनवायची असेल,
तर एअर-फ्रायर वापरून ती कशी करू ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Jul 2016 - 12:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

अर्थात हा प्रकार चकणा सदरात मोडत असल्यामुळे, इतर तयारी आधीच करून ठेवा!

थोडक्यात महत्वाचे !

मुक्त विहारि's picture

14 Jul 2016 - 5:31 pm | मुक्त विहारि

+ १

रेवती's picture

14 Jul 2016 - 12:33 pm | रेवती

वेगळा पदार्थ आहे. आवडला.

मस्त आलाय फोटो. पाकृ देखील देखील व सहज आहे.

अवांतरः एफ्रा घेवू की मायक्रोवेव्ह (मावे) घेवू ह्या द्वदांत शेवटी मावे घ्यायचा विचार पक्का केला व घेतला. म्हणून विचारतोय ही पाकृ मावेमध्ये होईल का?

पाकृ देखील देखील सोपी व सहज आहे.

केडी's picture

14 Jul 2016 - 4:45 pm | केडी

कॉन्व्हेक्शन (Convection) मोड असेल तर ही पाकृ त्यात करू शकता. अधून मधून ट्रे हलवून मटार एकाच बाजूने लागणार नाहीत ह्याची काळजी घ्या. शक्यतो तापमान कमी ठेवा (१७० ते १८० च्या वर नको)

शिद's picture

14 Jul 2016 - 5:43 pm | शिद

धन्यवाद!

तुम्ही सुचवल्याप्रमाणं करून पाहीन व चांगले लागले तर खाऊन ही. :)

स्वाती दिनेश's picture

14 Jul 2016 - 9:53 pm | स्वाती दिनेश

मसाला मटारचा चकणा मस्तच.
@ मु वि- मूग डाळ किवा चणाडाळ बास्केटमध्ये बेकिंग पेपर किवा अ‍ॅल्युमिनियम फॉइल घालून करता येईल किवा मग केकपॅन ए फ्रा मध्ये ठेवून करता येईल.
स्वाती

मुक्त विहारि's picture

14 Jul 2016 - 9:57 pm | मुक्त विहारि

माहितीबद्दल धन्यवाद.

विवेकपटाईत's picture

15 Jul 2016 - 5:41 pm | विवेकपटाईत

च्यायला, फोटू मस्त दिसतो. एक विचारू का, airfryerचे विज्ञापन तर नाही ना? आमच्या घरी नाही. कढईत कसे करता येईल ते सांगा. तसे हि पावसाळ्यात frozen मटारच घ्यावे लागतील. आज एकादशी, सकाळी एक केल, दोन नाशपाती, साबुदाणा उसळ आणि एक गिलास दूध एवढेच घेतले. आता सहा वाजता. कुत्तुच्या आट्याचे दोन थालीपीठ शेंगदाणे आणि दह्याच्या चटणी सोबत खाल्ले. रात्री अर्थात ८.३० वाजता. बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी या दोन वस्तू तैयार झालेल्या आहे. खोली दूर असली तरी स्वैपाक घरातून वास येतो आहे. असा आमचा हा उपवास.

विवेकपटाईत's picture

15 Jul 2016 - 5:41 pm | विवेकपटाईत

केळ लिहायचे होते. साबुदाण्याचे वडे करते आहे, वाटते.

केडी's picture

15 Jul 2016 - 8:31 pm | केडी

मटार तळून (डीप फ्राय) काढायचीच आहे. भजी तळतात तसे मध्यम आचे वर तळून घ्या.मी तळलेले नको म्हणून एयर फ्रायर वापरतो.

केडी's picture

18 Jul 2016 - 9:52 am | केडी

बघितले ह्याच पद्धतीने. फक्त शेवटी ३ ते ४ चमचे लिंबाचा रस टाकून मिक्स केलें। बाकी पाकृ वर दिल्या प्रमाणे. अर्थातच छोले रात्रभर भिजत घालून मग कोरडे करून घेतले.

Chole

स्वाती दिनेश's picture

18 Jul 2016 - 9:24 pm | स्वाती दिनेश

मसाला छोले मस्त ! एक सुचवण- लिंबाच्या रसाऐवजी आमचूर वापरून पहा.
स्वाती

रॉजरमूर's picture

27 Dec 2016 - 1:38 pm | रॉजरमूर

वा...........!
काय फोटो घेतलाय राव .....
एकदम जबराट .

सविता००१'s picture

29 Dec 2016 - 3:29 pm | सविता००१

कसले कातिल फोटो आहेत...........