मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एयर फ्रायर पाककृती- मसाला मटार

केडी · · पाककृती
Masala green Peas एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा इथे वाचा साहित्य २ कप मटार दाणे (मिळाले तर ताजे, नाहीतर फ्रोझन) १ मोठा चमचा मिरची पावडर १ मोठा चमचा हळद १ चमचा धने पावडर १/२ चमचा जिरे पावडर १/२ चमचा काळीमिरी पावडर १ चमचा चाट मसाला १ चमचा मीठ १ चिमूट साखर १ मोठा चमचा तेल (किंवा ऑईल स्प्रे) कृती ताजे मटार वापरात असल्यास, मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात, ते २ ते ३ मिनिटे उकळून घ्या (ब्लांच). लगेच बाहेर काढून गार पाण्यात, किंवा नळाखाली धरून गार करा. फ्रोझन वापरात असलात तर ते सध्या पाण्यात ठेवून साफ करून घ्या. मटार दाणे, एक टॉवेल वर टाकून कोरडे करून घ्या. एयर फ्रायर १८० डिग्री वर ५ मिनिटे लावून प्रि-हिट करून घ्या. सर्व मसाले, मीठ आणि साखर एकत्र करून घ्या. मटार दाणे कोरडे झाले की त्याच्यावर तेलाचा स्प्रे मारून (किंवा १ चमचा तेल टाकून) सगळ्या दाण्यांना नीट लागेल असेल लावून घ्या. मसाला पावडर चे २ ते ३ मोठे चमचे वरून भुरभुरून मटाराला सगळीकडून लागेल असे एकत्र करून घ्या. मसाला लावलेले दाणे एयर फ्रायर च्या बास्केट मध्ये टाका. २० ते २५ मिनिटे चा टायमर सेट करून मटार दाणे भाजून घ्या. अधून मधून बास्केट हलवून दाणे कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्या. बाहेर काढून, पुन्हा थोडा मसाला वरून भुरभुरावा. खायला घेताना एक लिंबाची फोड वरून पिळून मग खायला घ्या! अर्थात हा प्रकार चकणा सदरात मोडत असल्यामुळे, इतर तयारी आधीच करून ठेवा! हे मसाला मटार कोरड्या हवाबंद काचेच्या बाटलीत भरून ठेवल्यास सहज १० ते १५ दिवस टिकतात. एयर फ्रायर नसेल तर मटार ओवन मध्ये बेक करून घेऊ शकता. अधून मधून हलवून सगळ्या बाजूने नीट भाजले जातायत की नाही हे बघत राहणे.

वाचने 26159 वाचनखूण प्रतिक्रिया 41

In reply to by मुक्त विहारि

केडी Wed, 07/13/2016 - 09:18
आकाराने लहान असल्यामुळे बास्केट मध्ये ठेवता येणार नाही, पण फॉईल लावून त्यावर ठेवून करून बघायला हरकत नाही. प्रयत्न करून बघतो, आणि जमलं तर इथे अपडेट नक्की टाकेन. तुमच्या अभिप्राया आणि सुचने बद्दल धन्यवाद!

In reply to by केडी

मुक्त विहारि Wed, 07/13/2016 - 11:03
वांग्याचे काप, हराभरा कबाब, व्हेज कटलेट हे पण ह्या पद्धतीने करता आल्यास उत्तम. बियर बरोबर व्हेज फ्राय पदार्थ उत्तम लागतात. हे पदार्थ जर ह्या पद्धतीने जमले तर हे उपकरण नक्कीच घरात आणले जाईल.

In reply to by केडी

सप्तरंगी गुरुवार, 07/14/2016 - 16:17
मस्त, हे airfryer फार आकर्षित करते आहे मला. अंदाजे किती frequently वापरता तुम्ही हे सांगू शकाल का ? विकत घ्यावेसे वाटते आहे, पण उगीच पडून नको राहायला म्हणुन विचारते आहे.

In reply to by सप्तरंगी

केडी गुरुवार, 07/14/2016 - 16:41
हा मुद्दा योग्य आहे. एयर फ्रायर चा वापर हा सवयी चा भाग आहे। आमच्याकडे महिन्यातून दोनदा किंवा जास्ती वेळा मच्छी/चिकन असं काही न काही होत असतं. मासे श्यालो फ्राय करायच्या ऐवजी मी शक्यतो एयर फ्राय करतो। तसेच मुलांसाठी मकेन चे फ्राईस किंवा इतर फ्रोझन पदार्थ आणले जातात, ते शक्यतो ह्यातच बनवतो.

In reply to by केडी

सप्तरंगी गुरुवार, 07/14/2016 - 18:32
आभार, पटकन सांगितल्याबद्दल, विचार करतेच, दुकाने अजून बंद व्हायची आहेत:) btw फोटू पण मस्त आहे, आधी मला brussels sprouts च वाटले होते. ब्लॉग आहे हा तुमचा eat , लिव्ह कूक?

In reply to by सप्तरंगी

केडी गुरुवार, 07/14/2016 - 19:03
ला अवश्य भेट द्या. आणि घेणार असाल उपकरण तर amazon. in वर सर्वात स्वस्त पडेल। इतर ओनलाईन दुकाने पण एकदा बघून मगच घ्या.

In reply to by रुस्तम

केडी गुरुवार, 07/14/2016 - 22:19
दिले तर चालतात असं गृहीत धरून माझ्या ब्लॉग चा दुवा देतोय www.EatLiveCook.com हा प्रतिसाद नियमांना धरून नसेल तर उडवला तरी चालेल.

पैसा Wed, 07/13/2016 - 18:58
http://www.misalpav.com/node/33408 इथे स्वाती दिनेश, सानिका यांनीही एअर फ्रायरमधल्या अशा छान पाकृ दिल्या आहेत.

शिद गुरुवार, 07/14/2016 - 14:35
मस्त आलाय फोटो. पाकृ देखील देखील व सहज आहे. अवांतरः एफ्रा घेवू की मायक्रोवेव्ह (मावे) घेवू ह्या द्वदांत शेवटी मावे घ्यायचा विचार पक्का केला व घेतला. म्हणून विचारतोय ही पाकृ मावेमध्ये होईल का?

In reply to by शिद

केडी गुरुवार, 07/14/2016 - 16:45
कॉन्व्हेक्शन (Convection) मोड असेल तर ही पाकृ त्यात करू शकता. अधून मधून ट्रे हलवून मटार एकाच बाजूने लागणार नाहीत ह्याची काळजी घ्या. शक्यतो तापमान कमी ठेवा (१७० ते १८० च्या वर नको)

स्वाती दिनेश गुरुवार, 07/14/2016 - 21:53
मसाला मटारचा चकणा मस्तच. @ मु वि- मूग डाळ किवा चणाडाळ बास्केटमध्ये बेकिंग पेपर किवा अ‍ॅल्युमिनियम फॉइल घालून करता येईल किवा मग केकपॅन ए फ्रा मध्ये ठेवून करता येईल. स्वाती

विवेकपटाईत Fri, 07/15/2016 - 17:41
च्यायला, फोटू मस्त दिसतो. एक विचारू का, airfryerचे विज्ञापन तर नाही ना? आमच्या घरी नाही. कढईत कसे करता येईल ते सांगा. तसे हि पावसाळ्यात frozen मटारच घ्यावे लागतील. आज एकादशी, सकाळी एक केल, दोन नाशपाती, साबुदाणा उसळ आणि एक गिलास दूध एवढेच घेतले. आता सहा वाजता. कुत्तुच्या आट्याचे दोन थालीपीठ शेंगदाणे आणि दह्याच्या चटणी सोबत खाल्ले. रात्री अर्थात ८.३० वाजता. बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी या दोन वस्तू तैयार झालेल्या आहे. खोली दूर असली तरी स्वैपाक घरातून वास येतो आहे. असा आमचा हा उपवास.

In reply to by विवेकपटाईत

केडी Fri, 07/15/2016 - 20:31
मटार तळून (डीप फ्राय) काढायचीच आहे. भजी तळतात तसे मध्यम आचे वर तळून घ्या.मी तळलेले नको म्हणून एयर फ्रायर वापरतो.

केडी Mon, 07/18/2016 - 09:52
बघितले ह्याच पद्धतीने. फक्त शेवटी ३ ते ४ चमचे लिंबाचा रस टाकून मिक्स केलें। बाकी पाकृ वर दिल्या प्रमाणे. अर्थातच छोले रात्रभर भिजत घालून मग कोरडे करून घेतले. Chole