
एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा
इथे वाचा
साहित्य
२ कप मटार दाणे (मिळाले तर ताजे, नाहीतर फ्रोझन)
१ मोठा चमचा मिरची पावडर
१ मोठा चमचा हळद
१ चमचा धने पावडर
१/२ चमचा जिरे पावडर
१/२ चमचा काळीमिरी पावडर
१ चमचा चाट मसाला
१ चमचा मीठ
१ चिमूट साखर
१ मोठा चमचा तेल (किंवा ऑईल स्प्रे)
कृती
ताजे मटार वापरात असल्यास, मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात, ते २ ते ३ मिनिटे उकळून घ्या (ब्लांच). लगेच बाहेर काढून गार पाण्यात, किंवा नळाखाली धरून गार करा. फ्रोझन वापरात असलात तर ते सध्या पाण्यात ठेवून साफ करून घ्या.
मटार दाणे, एक टॉवेल वर टाकून कोरडे करून घ्या. एयर फ्रायर १८० डिग्री वर ५ मिनिटे लावून प्रि-हिट करून घ्या. सर्व मसाले, मीठ आणि साखर एकत्र करून घ्या. मटार दाणे कोरडे झाले की त्याच्यावर तेलाचा स्प्रे मारून (किंवा १ चमचा तेल टाकून) सगळ्या दाण्यांना नीट लागेल असेल लावून घ्या.
मसाला पावडर चे २ ते ३ मोठे चमचे वरून भुरभुरून मटाराला सगळीकडून लागेल असे एकत्र करून घ्या.
मसाला लावलेले दाणे एयर फ्रायर च्या बास्केट मध्ये टाका. २० ते २५ मिनिटे चा टायमर सेट करून मटार दाणे भाजून घ्या. अधून मधून बास्केट हलवून दाणे कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्या.
बाहेर काढून, पुन्हा थोडा मसाला वरून भुरभुरावा. खायला घेताना एक लिंबाची फोड वरून पिळून मग खायला घ्या! अर्थात हा प्रकार चकणा सदरात मोडत असल्यामुळे, इतर तयारी आधीच करून ठेवा!
हे मसाला मटार कोरड्या हवाबंद काचेच्या बाटलीत भरून ठेवल्यास सहज १० ते १५ दिवस टिकतात.
एयर फ्रायर नसेल तर मटार ओवन मध्ये बेक करून घेऊ शकता. अधून मधून हलवून सगळ्या बाजूने नीट भाजले जातायत की नाही हे बघत राहणे.
मी पयली. झकास.फोटो जबरा.
In reply to मी पयली. झकास.फोटो जबरा. by नूतन सावंत
+१
जबरी बनले आहेत मटार..
टरटरित मटार !
मस्तच !
मस्त पा.कृ.
In reply to मस्त पा.कृ. by मुक्त विहारि
मूग डाळ
In reply to मूग डाळ by केडी
मसाला छोले...
In reply to मसाला छोले... by मुक्त विहारि
आपण लिहिलेले
In reply to आपण लिहिलेले by केडी
मस्त, हे airfryer फार आकर्षित करते आहे मला
In reply to मस्त, हे airfryer फार आकर्षित करते आहे मला by सप्तरंगी
वापर
In reply to वापर by केडी
आभार, पटकन सांगितल्याबद्दल,
In reply to आभार, पटकन सांगितल्याबद्दल, by सप्तरंगी
हो ब्लॉग
In reply to हो ब्लॉग by केडी
amazon. in वर सर्वात स्वस्त
In reply to amazon. in वर सर्वात स्वस्त by केडी
ब्लॉगची लिंक
In reply to ब्लॉगची लिंक by रुस्तम
इथे इतर दुवे
In reply to इथे इतर दुवे by केडी
धन्यवाद
In reply to इथे इतर दुवे by केडी
छान फोटो आणि पाककृती दिसत
In reply to छान फोटो आणि पाककृती दिसत by सप्तरंगी
धन्यवाद!
झ्क्कास्स !!!
स्लर्प
वाह!!
वा!
एअर फ्रायर
पाकृ सुंदर आहे..
अर्थात हा प्रकार चकणा सदरात
In reply to अर्थात हा प्रकार चकणा सदरात by कैलासवासी सोन्याबापु
+ १
वेगळा पदार्थ आहे. आवडला.
मस्त आलाय फोटो. पाकृ देखील
In reply to मस्त आलाय फोटो. पाकृ देखील by शिद
पाकृ देखील देखील सोपी व सहज
देखीलसोपी व सहज आहे.In reply to मस्त आलाय फोटो. पाकृ देखील by शिद
मावे मध्ये
In reply to मावे मध्ये by केडी
धन्यवाद!
मस्त
In reply to मस्त by स्वाती दिनेश
ओके
च्यायला, फोटू मस्त दिसतो. एक
In reply to च्यायला, फोटू मस्त दिसतो. एक by विवेकपटाईत
केळ लिहायचे होते.
In reply to च्यायला, फोटू मस्त दिसतो. एक by विवेकपटाईत
मूळ पाककृती हि
छोले करून
In reply to छोले करून by केडी
मस्त!
In reply to छोले करून by केडी
वा...........!
आईग्ग