मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एयर फ्रायर पाककृती- मसाला मटार

केडी · · पाककृती
Masala green Peas एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा इथे वाचा साहित्य २ कप मटार दाणे (मिळाले तर ताजे, नाहीतर फ्रोझन) १ मोठा चमचा मिरची पावडर १ मोठा चमचा हळद १ चमचा धने पावडर १/२ चमचा जिरे पावडर १/२ चमचा काळीमिरी पावडर १ चमचा चाट मसाला १ चमचा मीठ १ चिमूट साखर १ मोठा चमचा तेल (किंवा ऑईल स्प्रे) कृती ताजे मटार वापरात असल्यास, मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात, ते २ ते ३ मिनिटे उकळून घ्या (ब्लांच). लगेच बाहेर काढून गार पाण्यात, किंवा नळाखाली धरून गार करा. फ्रोझन वापरात असलात तर ते सध्या पाण्यात ठेवून साफ करून घ्या. मटार दाणे, एक टॉवेल वर टाकून कोरडे करून घ्या. एयर फ्रायर १८० डिग्री वर ५ मिनिटे लावून प्रि-हिट करून घ्या. सर्व मसाले, मीठ आणि साखर एकत्र करून घ्या. मटार दाणे कोरडे झाले की त्याच्यावर तेलाचा स्प्रे मारून (किंवा १ चमचा तेल टाकून) सगळ्या दाण्यांना नीट लागेल असेल लावून घ्या. मसाला पावडर चे २ ते ३ मोठे चमचे वरून भुरभुरून मटाराला सगळीकडून लागेल असे एकत्र करून घ्या. मसाला लावलेले दाणे एयर फ्रायर च्या बास्केट मध्ये टाका. २० ते २५ मिनिटे चा टायमर सेट करून मटार दाणे भाजून घ्या. अधून मधून बास्केट हलवून दाणे कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्या. बाहेर काढून, पुन्हा थोडा मसाला वरून भुरभुरावा. खायला घेताना एक लिंबाची फोड वरून पिळून मग खायला घ्या! अर्थात हा प्रकार चकणा सदरात मोडत असल्यामुळे, इतर तयारी आधीच करून ठेवा! हे मसाला मटार कोरड्या हवाबंद काचेच्या बाटलीत भरून ठेवल्यास सहज १० ते १५ दिवस टिकतात. एयर फ्रायर नसेल तर मटार ओवन मध्ये बेक करून घेऊ शकता. अधून मधून हलवून सगळ्या बाजूने नीट भाजले जातायत की नाही हे बघत राहणे.

वाचन 26156 प्रतिक्रिया 0