एयर फ्रायर पाककृती - बरिस्ता (तळलेला कांदा)

Primary tabs

केडी's picture
केडी in पाककृती
24 Mar 2017 - 5:50 am

FO1

साहित्य
४ मोठे कांदे
२ चमचे तूप किंवा तेल

कृती
बरिस्ता, किंवा तळलेला कांदा हा बिर्याणी किंवा मोगलाई पाककृतींची लज्जत वाढवणारा. तसेच तो बऱ्याच फ्रेंच, अमेरिकन आणि युरोपियन पाककृतीन मध्ये एक गार्निश म्हणून देखील वापरला जातो. डीप फ्राय करण्यापेक्षा, आता आपण हाच कांदा एयर फ्रायर मध्ये अगदी कमी तेलात तेवढाच चविष्ट आणि रुचकर बनवू शकता! हा असा कुरकुरीत तळलेला कांदा एका हवाबंद डब्यात भरून फ्रिज मध्ये ठेवल्यास अगदी एक महिना सुद्धा सहज टिकतो.

कांदे शक्य तेवढे पातळ उभे चिरून घ्या. चिरून झाले कि ते काप सुटे करून, ताट चांगले तास ते दोन तास कडक उन्हात ठेवा. [अधून मधून कांदे वर खाली करून घ्या. ह्याने ते थोडे वाळतील, आणि एयर फ्रायर मध्ये पटकन तळून होतील].

Step1 Step2

Step3 Step4


एयर फ्रायर १४० डिग्री C वर ५ मिनिटे प्री-हिट करून घ्या. कांद्याच्या कापां मध्ये २ चमचे तूप अथवा तेल घालून, ते सगळीकडून कांद्याच्या कापांना लागेल असे हाताने अलगद हलवून घ्या.

Step5 Step6


एयर फ्रायर च्या बास्केट ला तेल/तूप लावून, कांदे त्यात टाकून साधारण २० ते २५ मिनिटे कांदे तळून घ्या. दर ५ मिनिटांनी एकदा उघडून कांदे वर-खाली करून घ्या. खमंग बदामी रंगाचे झाले कि बाहेर काढून गार करत ठेवा. गार झाले कि डब्यात भरून फ्रिज मध्ये ठेवा, आणि लागतील तसे वापरा!

Step7 Step8 Step9


हे असे तळलेले कांदे (आणि लसूण) पोह्याच्या चिवड्यात सुद्धा छान लागतात. पण आता असे एयर फ्रायर मध्ये तळून गिल्टफ्री एन्जॉय करता येतील!
शौकीन लोकांनी, ह्या अश्या तळलेल्या कांद्या मध्ये थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून, एकदा बियर सोबत घेऊन बघा, एक उत्तम चकणा होऊ शकतो! [हे मसाले आणि मीठ, कांदे गरम असतानाच वरून भुरभुरावे, म्हणजे ते कांद्याला नीट लागतील]

FO2

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

24 Mar 2017 - 6:01 am | पिलीयन रायडर

घ्यावाच लागणारे हा एयर फ्रायर.. तुम्ही लोक असे जादुचे प्रयोग केल्यासारखे काय काय दाखवताय.. सहन होत नाही आता!!

एस's picture

24 Mar 2017 - 6:39 am | एस

+

+११११११११११११११११११११११११११११११…!

भयंकर अत्याचार आहे हा!

तुम्ही लोक असे जादुचे प्रयोग केल्यासारखे काय काय दाखवताय..

जादूचे प्रयोग....:-)) :-))...लोल.....

प्रीत-मोहर's picture

24 Mar 2017 - 3:24 pm | प्रीत-मोहर

+११

विनटूविन's picture

2 Apr 2017 - 9:03 pm | विनटूविन

फोटो इतके आकर्षक आहेत ना की बस!

पैसा's picture

24 Mar 2017 - 11:47 am | पैसा

भारी!

सुरेख फोटू व मस्त प्रयोग.

स्वाती दिनेश's picture

24 Mar 2017 - 11:36 pm | स्वाती दिनेश

असा कांदा ए फ्रा मध्ये करून ठेवते मी सुध्दा , पटकन वापरता येतो.
स्वाती

प्राची वैशंपायन's picture

25 Mar 2017 - 7:48 am | प्राची वैशंपायन

काय अफलातुन दिसतोय कांदा हात घालुन काढुन घ्यावासा वाटतोय .

बाबा योगिराज's picture

26 Mar 2017 - 8:58 pm | बाबा योगिराज

क्या बात केडी भौ, तुमच सगळच भारी असतय.

केडी's picture

26 Mar 2017 - 9:37 pm | केडी

_/\_
_/\_

सप्तरंगी's picture

30 Mar 2017 - 6:57 pm | सप्तरंगी

तुमच्या पाककृती आणि फोटोज मस्त असतात..

केडी's picture

31 Mar 2017 - 8:40 am | केडी

_/\_ थोडा प्रयत्न करतो, तरी अजून बरंच शिकायचं राहिलाय.....अन्न हे चवीला आणि डोळ्याला देखील उत्तम असले पाहिजे....

सप्तरंगी's picture

6 Apr 2017 - 6:28 pm | सप्तरंगी

चायनीज भेळ

अन्न हे चवीला आणि डोळ्याला देखील उत्तम असले पाहिजे

मान्य... मी एअर फ्रायर मध्ये बरेच काही बनवले त्यातलीच एक मस्त चटपटी चायनीज भेळ . एरवी तेलाचे प्रमाण पाहता मी कधीच तळून करायचा उहापोह केला नसता. हे शक्य झाले एअर फ्रायर मुळेच. पाककृती अगदीच सोपी पण लिहिण्याचे काम मला फार कंटाळवाणे वाटते त्यापेक्षा बनवणे आणि बनवून खाऊ घालणे सोपे !!

काय सुंदर आलाय फोटो भेळेचा...ह्याची पाककृती लिहाच तुम्ही....

सप्तरंगी's picture

21 Apr 2017 - 6:32 pm | सप्तरंगी

लिहिते ..

अत्रन्गि पाउस's picture

5 Apr 2017 - 3:05 pm | अत्रन्गि पाउस

वाचली नाहीये आणि फोटो तर अजिबात बघितले नाहीयेत ....

नाही नाही नाही

केडी's picture

6 Apr 2017 - 10:41 am | केडी

:-)) :-)) :-))

रुपी's picture

6 Apr 2017 - 1:01 am | रुपी

भारीच दिसत आहे! मस्त!

सत्याचे प्रयोग's picture

8 Apr 2017 - 7:24 pm | सत्याचे प्रयोग

मावेत करता येईल का

सुरन्गी's picture

19 Apr 2017 - 6:44 pm | सुरन्गी

एअर फ्रायर घेलच पाहिजे आता,केडी.तुमच्या फोटोन श्रेय द्यायला विसरणार नाही

मितान's picture

21 Apr 2017 - 6:51 pm | मितान

मस्त मस्त मस्त !
मुरमुऱ्याचा साधा चिवडा आणि त्यावर असे कांदे !! अहाहा !