एयर फ्रायर पाककृती - पिझ्झा क्रस्ट कृटॉन्स

केडी's picture
केडी in पाककृती
6 Jul 2016 - 7:24 am

step2

एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा इथे वाचा. ह्या लेखा पासून आपण काही एयर फ्रायर पाककृती बद्दल जाणून घेऊ. सुरुवात एका अगदी सोप्प्या पाककृतीने करतोय.

पिझ्झा हल्ली घराघरात येऊन पोचलाय. मुलांना आणि मोठ्यांना आवडणारा हा पदार्थ हल्ली बर्थडे पार्टी पासून ते अगदी छोट्या मोठ्या ऑफिस मिटींग्स किंवा गेट टुगेदर ला हमखास दिसून येतो.

बऱ्याच वेळेला मात्र डीप डिश, किंवा जाड क्रस्टचाच पिझ्झा मागवला जातो. ह्या पिझ्झाच्या बाहेरील जाड कडा मात्र खाल्ल्या जात नाहीत आणि वाया जातात. महागातला पिझ्झा असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ह्याच कडांचा वापर करून आपण दोन अश्या अतिशय सोप्प्या पाककृती बनवू शकता.

पिझ्झा सर्व्ह करण्या आधी ह्या बाजूच्या जाड कडा कापून घ्या.

Step1

त्याचे छोटे तुकडे करून, त्यावर ऑलिव्ह तेलाचा स्प्रे मारून घ्या. ( आवडत असेल तर तूप किंवा बटर वापरलत तर अजून चव येईल). ४ ते ६ लसूण पाकळ्या बारीक किसून त्या तुकड्यांना लावून घ्या. पिझ्झा बरोबर आलेला मसाला, चिल्ली फ्लेक्स ची १ ते २ पाकिटे टाका. चव घेऊन वाटलं तर मीठ टाका.

Step2

एयर फ्रायर १८० डिग्री ला ३ ते ४ मिनिटे प्रि-हिट करून घ्या. १० मिनिटांचा टायमर सेट करून तुकडे एयर फ्रायर मध्ये लावा. (मध्ये एकदा बास्केट हलवून घ्या).

बाहेर काढून,हवा असल्यास चिज किसून पुन्हा एयर फ्रायर मध्ये २ ते ३ मिनिटे (चिज वितळे पर्येंत) लावा. बाहेर काढून चिझी गार्लिक ब्रेड बाईट्स म्हणून सर्व्ह करू शकता!

सलाड किंवा सूप मध्ये घालायला कृटॉन्स करायचे असल्यास एयर फ्रायर मध्ये साधारण १५ ते २० मिनिटे ब्रेड चे तुकडे ठेवा. (चीज लावायचं नाहीये). ब्रेड एकदम कडक आणि कुरकुरीत व्हायला पाहिजे. बाहेर काढून थंड करून घ्या. हवाबंद डब्यात ठेवा.

सूप किंवा सलाड मध्ये कृटॉन्स म्हणून वापरा!

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Jul 2016 - 11:45 am | मुक्त विहारि

एयर फ्रायर घेतला तर नक्कीच करून बघीन.

केडी's picture

8 Jul 2016 - 1:26 pm | केडी

एकदम सोप्पी पाकृ आहे

सुबोध खरे's picture

6 Jul 2016 - 8:29 pm | सुबोध खरे

टाकाऊतून टिकाऊ चे उत्तम उदाहरण.

अरे वा! हा प्रकार बरा आहे. वाया गेलेलं पाहवत नाही पण सर्रास टाकाटाकी होते.

जागु's picture

8 Jul 2016 - 2:46 pm | जागु

फोटो पाहुन तोपासु.

म्हणजे अनेक लोक या कडा टाकून देतात ?!!

नमकिन's picture

11 Jul 2016 - 8:40 pm | नमकिन

ओलिव तेल जास्त तापमानास वापरु नये असे सांगतात, तरी तुम्ही तेच वापरताय.