सायकलीशी जडले नाते २८: परत नवीन सुरुवात

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
26 Apr 2016 - 6:01 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .

सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक

सायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी

सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .

परत नवीन सुरुवात

जून २०१५ मध्ये लदाख़मध्ये सायकल चालवल्यानंतर मोठी गॅप पडली. ह्या मोहीमेमुळे उत्साह खूप वाढला होता, पण परत लगेच मोठी राईड करण्याचा योग आला नाही. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये टायफॉईड झाल्यामुळे सायकल थांबवावी लागली. खूप इच्छा असूनही आजारपणामुळे सायकलीपासून लांब राहावं लागलं. टायफॉईडपासून पूर्ण बरं व्हायला दोन महिने लागले. त्यामुळे जून ते सप्टेंबरमध्ये फार कमी सायकल चालवली. सप्टेंबरमध्येही ज्या छोट्या राईडस केल्या, तेव्हा वाटलं की, शरीर अजून थोडं अशक्त आहे. त्यामुळे परत काही दिवस जाऊ दिले. ऑक्टोबरमध्ये मात्र सायकल परत सुरू केली. तेव्हा जाणवलं की, ह्या तीन- चार महिन्यांच्या गॅपने माझा स्टॅमिना पूर्ण घालवला आहे. तो आता नव्यानेच बनवावा लागेल. परत एकदा लय मिळवावी लागेल.

जीवनात हेच तर असतं. सतत नव्याने सुरुवात करावी लागते. एका वेळची कितीही मोठी असलेली खेळी पुढे लागू ठरत नाही. जेव्हा सायकलिंग करत नव्हतो, तेव्हा तब्येतीने जशी साथ दिली, तसे योगासन करत राहिलो. प्राणायामही सुरू राहिले. आणि पूर्वी स्टॅमिना कसा वाढवत नेला होता, हे माहिती असल्यामुळे पुन: काय करत जायचं हे माहिती होतं. त्यामुळे मन अशांत नाहीय. फक्त काही आठवड्यांचा प्रश्न आहे. सायकल चालवत जाईन, तसा फिटनेस वाढेल. परत लय मिळेल.

१५ ऑक्टोबरला सायकल चाकणला आणली. ट्रॅव्हल्स स्टॉपपासून चाकणपर्यंत ३३ किलोमीटर अंतर चालवली. खरं तर इतक्या आठवड्यांची गॅप असल्यामुळे सुरुवातीला १०- १५ किलोमीटर चालवायला हवी होती. पण हे अंतर मोठंच असल्यामुळे टाळता आलं नाही. आणि अपेक्षेप्रमाणे ह्या ३३ किलोमीटरसाठी तीन तास लागले. शरीराच्या सायकलिंगशी संबंधित अवयवांवर व स्नायुंवर गंज चढलाय जणू! हळु हळु तो काढावा लागेल. ह्या राईडमध्ये पंक्चरनेही त्रास दिला. पंक्चर अनपेक्षित होतं. कारण ह्या ट्युब्ज आणि टायर्सने जेमतेम सहाशे किलोमीटर चाललो असेन. तरीही पंक्चर! चला, त्या निमित्ताने पंक्चर दुरुस्तीचीही उजळणी होईल. पंक्चर काढताना पहिल्यांदा ट्युब आतमध्ये फिट करताना स्क्रू ड्रायव्हरच्या ऐवजी हाताचा वापर केला. पूर्वी स्क्रू ड्रायव्हरने ट्युब फिट करताना स्क्रू ड्रायवरमुळेच पंक्चर होण्याचा धोका असायचा (नवशिक्या असल्यामुळे). पण आता हे हातानेच केल्यामुळे तसं होणार नाही.

पुढच्याच दिवशी भंडारा डोंगरावर ३ ग्रेडच्या घाटात सायकल चालवली. चालवता आली, पण जास्त थांबावं लागलं. येतानाही जास्त वेळ लागला. पण थोडा गंजही कमी झाला. हेच पुढे करत राहायचं आहे. थोडी थोडी पण नियमित सायकल चालवत राहायची. एका महिन्यामध्ये स्टॅमिना परत येईल. पण तोपर्यंत शरीराच्या कलाने घ्यावं लागेल. आणि हेच अवघड जातोय. मी- लदाख़मध्ये सायकल चालवलेला मी- इतका हळू कसा काय चालवू शकतो? पण सगळं नव्यानेच करावं लागेल ज्याला मन फार तयार नाहीय.

सायकल चालवणं सुरू राहिलं. मोठ्या राईडची घाई करायची नाहीय. छोट्या २०- ३० किलोमीटरच्याच राईडस करायच्या आहेत. ह्या वेळेस अजून एक चूक केली. नवीन रस्त्यांवर सायकल चालवायला गेलो आणि थोड्या साधारण रस्त्यावर सायकल चालवली. सुंदर परिसर बघायला मिळाला, पण अशा राईडचा उत्साह वाढवायला उपयोग होत नाही. किंबहुना अशा रस्त्यांवर जास्त वेळ लागतो व मॉरलही डाऊन होतं. त्यामुळे नवीन लय प्राप्त करत असताना अशा राईडस चांगल्या व नेहमीच्या रस्त्यांवरच करायला हव्यात. असो.

आजारपणात अनेक दिवस गेल्यामुळे आता सायकल चालवताना आळस करत नाहीय. एकही दिवस गॅप पडू न देता सायकल चालवतोय. रोज छोटी राईड करतोय. लवकरच लय मिळेल व शरीरही एडजस्ट होईल. पण त्यातही एक तांत्रिक चूक अशी झाली की, शरीराला आराम द्यायला विसरलो. आठवड्यात सातही दिवस सायकलिंग चालवणं योग्य नाही. कमीत कमी एक- दोन दिवस तरी शरीराला ब्रेक हवा. पण लवकर स्टॅमिना मिळवण्याच्या नादात ते लक्षात आलं नाही. हळु हळु शरीर लयीत येतं आहे. किती वेगात चालवतोय, कोणत्या गेअर्सवर चालवतोय ह्याकडे लक्ष न देता चालवत राहिलो. उत्साहही वाढतोय. रोज हे बघून छान वाटतंय की, गेल्या आठ- दहा दिवसांमध्ये रोज सरासरी १८ किलोमीटर अशी सायकल चालवतोय. आता पुढच्या मोठ्या एक्सपिडिशनचं प्लॅनिंगही सुरू आहे. एक मोठी मोहीम करायची आहे ज्यामध्ये सलग आठ- दहा दिवस सायकल चालवेन. अर्थात् त्यासाठी स्टॅमिना फारच वाढवावा लागेल. बघूया.

पुढील भाग २९: नवीन मोहिमेच्या प्रॅक्टिस राईडस

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रवासक्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

नवीन इनिंग्जला खूप साऱ्या शुभेच्छा

मार्गी's picture

28 Apr 2016 - 5:18 pm | मार्गी

धन्यवाद! :)

स्टॅमिना सतत टिकवून धरावा लागतो. पुभाप्र.

पैसा's picture

1 May 2016 - 8:47 pm | पैसा

मस्त चालू आहे सफर! आम्ही आपले वाचून समाधान मानतो!