सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
17 Mar 2016 - 5:29 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

एक छोटा सव्वा किलोमीटरचा चढ-

१. सायकल चालवत जाणं जवळजवळ अशक्य आहे. कसंबसं एक चतुर्थांश अंतर सायकलवर जाऊ शकतोय आणि मग पायी पायी जावं लागतंय. . .
२. सायकल चालवत जाऊ शकतोय, पण तीन मोठे ब्रेक घ्यावे लागत आहेत. . .
३. न थांबता पूर्ण चढ तर चढतोय, पण एकदम धाप लागते आहे. . .
४. आता न थांबता सलग चार वेळेस हा चढ पार होतोय. . .
५. आता हा चढ सगळ्यात लोअर (१-१) गेअरच्या ऐवजी २-१ गेअर वरसुद्धा अनेकदा चढता येतोय. . .
६. हा चढ चढताना २-१ गेअर वर चालवत आणि तोंड बंद ठेवून सामान्य श्वसन करूनही सायकल चालवता येते आहे. . .

. . .२०१५ वर्षाच्या सुरुवातीला छोट्या राईडस सुरू राहिल्या. सायकल चालवणं सुरू राहिलं. छोट्या राईडसमध्ये मजा तर येते, पण आपलं मन संतुष्ट होत नाही. मनाला काही तरी भव्य- दिव्य हवं! परत परत २०१५ मध्ये लदाख़ला सायकल चालवण्याची इच्छा होते आहे. परत परत तेच स्वप्न पडतंय. ह्या स्वप्नाने इतकं पछाडलं आहे की, हळु हळु त्या दिशेने पाऊल पडायला लागलं. लदाख़मध्ये सायकल चालवायची असेल तर अगदी पहिली गोष्ट म्हणजे चढावर सायकल चालवता यायला हवी. अगदी प्राथमिक पात्रता. म्हणून आता चढावर सायकल चालवण्याची सवय करायची आहे. आणि तसा योगही आला.

पुण्यातल्या धायरी जवळचं डिएसके विश्व ही एक टेकडीवरची छोटीशी कॉलनी! इथे मला सरावासाठी सुंदर चढाचा रस्ता मिळाला. चढ आहे छोटाच- सव्वा किलोमीटरमध्ये ६० मीटर क्लाइंब. सगळ्यात छोट्या ग्रेडचा घाट. इथे सायकलिंग नियमित सुरू केलं. काही काळापूर्वी तर इथे सायकल आणताही येत नव्हती. पण आता खूप सवय झाली आहे, नियमितताही वाढली आहे, त्यामुळे आता आरामात चढू शकतोय. पण एकदा चढून सराव होणार नाही. म्हणून सलग अनेक राउंडसचा क्रम सुरू केला. सकाळी दोन- तीनदा आणि संध्याकाळी दोन- तीनदा. ही टेकडी छोटीच आहे. त्यामुळे पाच राउंड केले तरी फक्त १२ किलोमीटर होतात. पण ह्या १२ किलोमीटरमधले ६ किलोमीटर चढाचे असतात. त्यामुळे उपयोग होतोय. पूर्ण फेब्रुवारी महिन्यात सतत ह्या चढाचे राउंडस करत राहिलो. त्याशिवाय दूरच्या राईडस फारच थोड्या केल्या. हळु हळु हा चढ अगदीच सोपा होऊन गेला. मग तर सलग तीन- चार वेळेस करतानाही काहीच अडचण वाटेनाशी झाली.


डिएसकेचा रस्ता


डिएसकेचा चढ- सुमारे १.३७ किमीमध्ये ६० मीटर गेन


हा सर्वांत छोट्या ग्रेडचा घाट आहे

कधी कधी खरं वाटत नाही, की एका वेळेस जो चढ अगदी अवघड वाटायचा, तो आता सहजपणे जमतोय! चढून वर आल्यावर खूप मस्त वाटतं. ही शरीराची क्षमता! आपल्या शरीरात क्षमता प्रचंड असते, पण आपण त्याचा योग्य वापर करत नाही. हळु हळु जर आपण शरीराला सवय करत गेलो, तर शरीर आश्चर्यकारक एडजेस्टमेंट करतं. समजा एकदम कोणाला पाचव्या मजल्यावर पाय-यांवरून चढायला सांगितलं, तर भिती वाटेल. पण हळु हळु शरीराच्या कलाने सराव केला- एक आठवडा फक्त सहज जमेल तितकेच मजले चढायचे- मग पुढच्या आठवड्यात हळु हळु वाढवायचं- तर फार वेळ लागणार नाही. किंवा जर फक्त दहा मिनिटं चालायची सवय असेल, तर हळु हळु ती वाढवायची. सूत्र एकच की, एकदम शरीरावर ताण नाही आणायचा. दहा मिनिटं चालायची सवय असेल, तर एकदम दोन तास चालायचं नाही. दहा मिनिटांपासून पंधरा मिनिटं, मग पुढच्या आठवड्यात वीस मिनिटं आणि जर सहज जमत असेल तर पुढच्या आठवड्यात पंचवीस मिनिटं असं. शरीर आपोआप जुळवून घेतं. . .

हा छोटा चढ तर आता जमला आहे. पण तो फार लहान आहे. मला खरोखर लदाख़मध्ये सायकल चालवता येईल का, ह्याची खरी परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. आता सिंहगडावर जाईन. तसं मी ह्या छोट्या चढाचे पाच राउंड दिवसात करतो म्हणजे अर्धा सिंहगड झाल्यासारखं आहे. पण तिथे गेल्यावरच कळेल. पहिल्यांदा सिंहगडाच्या नऊ किलोमीटरच्या क्लाइंबमध्ये फक्त दिड किलोमीटर सायकलवर चालवू शकलो. दुस-या वेळी गेलो तेव्हा फरक पडला होता, पण तरी सात किलोमीटर चालवल्यानंतर पायी पायी जावं लागलं. आता ह्या वेळी काय होईल. . .

पुढील भाग २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रवासक्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

हे कोणते अ‍ॅप तुम्ही लोक वापरता?

मस्त, अतिशय आशादायी लेख :D

मित्रहो's picture

17 Mar 2016 - 10:53 pm | मित्रहो

मस्त लेख.
हैद्राबादला विप्रो ते मायक्रोसॉफ्ट असाच कठीण चढ आहे. मी गंमतीने म्हणायचो कुण्या विप्रोवाल्याला विप्रो सोडून मायक्रोसॉफ्ट जॉइन करने हा चढ चढण्यापेक्षा सोपे वाटेल.

अॅप- वरील अॅप कुठले ते माहीती नाही परंतु मी मॅप माय राइड आणि राइड विथ जीपीस या अॅप वापरल्या आहेत. हीच माहीती असते.

विंजिनेर's picture

18 Mar 2016 - 12:18 am | विंजिनेर

अजून काही -
स्ट्रावा
रनकीपर
एंडामोंडो

त्यातल्या त्यात स्ट्रावा अ‍ॅप सायकलिंग करणार्‍या हौशी आणि व्यावसायिक दोन्ही गटांमध्ये जास्त वापर होताना दिसतो.

मित्रहो's picture

28 Mar 2016 - 6:53 pm | मित्रहो

विंजिनेर साहेब आपण सांगितल्यानंतर मी स्ट्रावा वापरायला सुरवात केली. नेटवर्क जबरदस्त आहे. बहुतेक सारे स्ट्रावा वर असतात.

पैसा's picture

18 Mar 2016 - 12:33 pm | पैसा

सुरेख निवांत लिखाण! वाचताना अन फोटो बघताना मेडिटेशन केल्याचा अनुभव येतो!

मार्गी's picture

19 Mar 2016 - 12:24 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद व हॅपी सायकलिंग!

@ एस जी, हे अॅप नाहीय, www.mapmyride.com साईटवरून घेतलेला क्लाइंबचा मॅप आहे. आवर्जून देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :)