मी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
9 Feb 2016 - 12:20 pm

भाग १
भाग २
भाग ३
_________________________________________________
सकाळी अलार्म व्हायच्या आधी उठू लागलो. अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. एक नवीन कारण मिळाले होते. जिमला जाण्यासाठी. घाम गाळण्यासाठी. ट्रेडमिलवर धावण्यासाठी. जास्तीची वजने उचलण्यासाठी. सिट अप्स मारण्यासाठी. Reunion - फुलराणी. जिममधून बाहेर पडून समोरच्या कबुतरखान्याजवळ लावलेल्या अॅक्टीव्हाला किक मारताना जेंव्हा कबुतरे उडायची तेंव्हा मला मी बाहुबली असल्याचा भास होऊ लागला. आणि कानात “धीवरा” गाणे घुमू लागले.

एकता कपूर ने बनवली असावी असे म्हणत मी हिणवत असलेल्या खंडोबाच्या सिरिअल बद्दल मला उगाच ममत्व वाटू लागले. बानूबाई थोड्याश्या फुलराणी सारख्या दिसताहेत असे वाटू लागले. मी जिम मधून आल्यावर जेंव्हा माझी म्हाळसा दार उघडत असे तेंव्हा ती कधीही,

रुसला का मजवरी मल्हारी
रुसला का मजवरी जी
बानू नार आणली घरी मल्हारी
रुसला का मजवरी जी

असे काहीतरी म्हणायला सुरवात करेल असे वाटू लागले.

अजून आपण वयापेक्षा लहान दिसतो, आपले केस अजून सुद्धा रुपेरी न होता आणि मैदान सोडून माघार न घेता टिकून आहेत याचा अभिमान वाटू लागला. आरशासमोर उभे राहून मी कुठल्या कोनातून गोजिरवाणा रविकर वाटू शकतो त्याचा अंदाज घेऊ लागलो. आपण साधारण भारतीय माणसाच्या उंचीला टेकलो पण त्याला ओलांडू शकलो नाही याचा अत्यंत त्रास होऊ लागला. आणि मग मी उंच टाचांचे बूट घेतले. मग नवीन मोजे घेतले. मग नवीन शर्ट आणि मग नवीन जीन्स. सगळी खरेदी करून मी Reunion ची वाट पाहू लागलो. एकंच गाणं सारखं आळवत होतो, 'भेटी लागी जीवा … लागलीसे आस"

अजून Reunion ला चार पाच दिवस होते. मग केस जरा नीट कापून घ्यायचे मनात आले. संध्याकाळी टिप टॉप हेअर कटिंग सलून वाल्याकडे गेलो. गेली जवळपास वीस वर्षे मी इथेच जातो दर महिन्याच्या पीकाची कापणी करून घ्यायाला. तिथे बसल्या बसल्या पेपरामधली शब्दकोडी सोडवून टाकायच्या माझ्या सवयीमुळे तिथल्या मालकाला, संतोषला मागे बक्षीसे देखील मिळाली होती. त्यामुळे त्याला मी फार आवडतो. नेहमी शनिवारी केस कापायला येणारं गिऱ्हाईक असं आडवारी आलेलं पाहून तो खूष झाला. "काय मोरे सर? आज काय विशेष वाटतं?" त्याच्या खुशीमुळे खूष होऊन मी खरे कारण सांगितले. म्हणालो, "अरे, शाळेचं Reunion आहे या रविवारी. जरा चकाचक करूया म्हणून आलो तुझ्याकडे." मग संतोषच्या हातात माझे डोके देऊन मी शांतपणे आरशात माझे हसरे प्रतिबिंब पहात बसलो. आता संतोषच्या कृपेने वळणदार दिसणारे माझे केस, शाळेत असताना मात्र असे नव्हते. भुरभुरे जावळ काढताना काय घोटाळा झाला होता कुणास ठाऊक पण नंतर कायम माझे केस भारतातील असंख्य वेगवेगळ्या संस्थानांप्रमाणे एकमेकांशी फटकून स्वतंत्रपणे उभे रहात होते. आणि माझ्या शाळकरी वयाच्या वेळचे सलूनवाले अगदी बारीक कटिंग करून त्या सर्व केसांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यास मदत करीत होते.

त्यातला एक वृद्ध कारागीर तर अजून लक्षात आहे. त्याला डोळ्यांनी थोडे कमी दिसत असे. त्यामुळे मोठी माणसे त्याच्याकडे जात नसत. आणि आमच्या सारख्या चिल्ल्या पिल्ल्यांची त्याच्याकडे रवानगी होत असे. डोळ्याने अंमळ अधू असलेल्या या कारागिराला मी गेलो की फार चेव चढायचा आणि गेल्या जन्मी "दोन बोके, माकड आणि लोण्याचा गोळा" या गोष्टीतला त्याने केलेल्या माकडाच्या रोलचा कैफ अजून उतरला नसल्यासारखा तो कायम आधी उजवीकडचे कापायचा मग डावीकडचे थोडे जास्त…. मग पुन्हा सारखे करण्यासाठी, थोडे अजून उजवीकडचे… मग पुन्हा डावीकडचे…. असे करता करता साळिंदराच्या काट्याने भरलेले डोके दिसू लागले की तो थांबायचा कारण, अधू दृष्टीमुळे न दिसणारे सत्य त्याच्या हाताला बोचू लागायचे आणि मग तो त्या कैफातून भानावर यायचा.…. त्याचा एक फायदा झाला की एन सी सी च्या शिंपी सरांनी मला केसांसाठी कधी फटके मारले नाहीत.

आता त्या कारागीराच्या तावडीतून सुटलो आहे याचा आनंद होऊन मी स्मितहास्य करीत बसलो असताना संतोष म्हणाला, "मोरे सर, थोडे काळवंडलात. असे गेलात Reunion ला तर चांगले दिसणार नाही. माझं ऐका. फेशिअल आणि ब्लिचिंग करून घ्या. जरा चेहरा फ्रेश वाटेल." मी नाही म्हणणार होतो. पण उदास हसू असलेल्या, कडक इस्त्रीच्या कपड्यातल्या तिचा चेहरा डोळ्यासमोर आला. आणि लग्नाच्या नंतर पंधरा वर्षांनी पुन्हा एकदा फेशिअल आणि ब्लिचिंगचे सोपस्कार करून घ्यायला तयार झालो.दोन तीन तास शेहनाझ हुसेन नावाच्या बाईने स्वतःच्या चेहऱ्यावर न वापरता केवळ जनकल्याणासाठी बनवलेल्या मलमांचा, लेपांचा आणि इतर द्रव्यांचा मारा माझ्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर करून मी सुहास्य वदनाने घरी आलो. फ़ेशिअल चा परिणाम तीन दिवसांनी दिसतो म्हणे. त्यामुळे घरी आल्यावर माझी चेहऱ्याची डागडुजी हिच्या ध्यानात आली नाही आणि मी केजीबी व मोसादच्या चौकशी सत्रातून वाचलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जिम मध्ये गेलो. तेथील सहाय्यकाने आज मापे घेऊया असे सांगितले. मी देखील खूष होऊन तयार झालो. गेल्या दीड एक महिन्याच्या मेहनतीने काय फळ दिले ते जाणण्याची उत्सुकता मला देखील होती. कपडे बदलून मापे द्यायला उभा राहिलो. जिममध्ये घुमणारे "अभी तो पार्टी शुरू हुई है " हे गाणे मला माझ्या मनस्थितीचे निदर्शक वाटले. माझा सहाय्यक आला. मापे घेऊ लागला. नोंदवून ठेऊ लागला. मान, छाती, दंड, फोर आर्मस, मांड्या, पोटऱ्या सगळ्यांची मापे इंच दोन इंचांनी कमी झाली होती. म्हणजे अनावश्यक चरबी जाऊ लागली आहे या कल्पनेने मी खूष झालो.

जिम मध्ये घुमणारे गाणे बदलले. कोरस सुरु झाला. "ओ ओ होय … ओ ओ होय … ओ ओ होय …" बाजीरावाचा भूमिकेतील रणवीर सिंघ गाणे म्हणत नाचू लागला.

बजने दे धड़क धड़क
ढोल ताशे धड़क धड़क
भंडारा झिड़क झिड़क मल्हारी

सहाय्यकाने पोटाचे माप घ्यायला सुरवात केली. त्याचा चेहरा पडला. त्याने वर खाली करून दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा माप घेतले. काहीतरी चुकले आहे ते मला कळले. भंसाळीचे बाजीराव नाचत होते. म्हणत होते,

खड़क तड़क भड़क साली
चटक मटक फटक साली
दुश्मन की देखो जो वाट लावली
वाट लावली
वाट लावली
वाट लावली

सहाय्यक म्हणाला, "सर, काही कळत नाही, पण तुमचे पोट दोन इंच वाढले आहे." त्या वाक्याने मला क्षणार्धात तडिताघात या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवता आला. मी पिंगा गाणे जास्त आपुलकीने पाहिले आणि दिपिकारूपी सांप्रतकालीन मस्तानीकडे आणि प्रियांकाकडे प्रेमपूर्ण नजरेने पाहिले म्हणून मी पेशवाई चा दुश्मन कसा काय झालो? अटकेपार लावायचे झेंडे माझ्या पोटावर का बरे खुपसले गेले असावेत? असे प्रश्न मला पडले. माझे पोट वाढले कसे? याचा विचार करताना सर्व सहाय्यकांचे मत झाले की प्रवेश घेतानाचे वेळी माझी मापे घेण्यात चूक झाली असावी.

आणि मग मी वजन काट्याकडे गेलो. उत्साह तर ओसरालाच होता. मग खांदे पाडून वजन काट्यावर उभा राहिलो. सहाय्यकाचा चेहरा कसनुसा झाला. फक्त शंभर ग्रॅम ने वजन कमी झाले होते. तो गप्पच राहिला. म्हणजे दीड महिने मी केलेल्या अंग मेहनतीचे फळ दोन इंच वाढलेले पोट आणि शंभर ग्रॅम कमी झालेले वजन असे होते तर. आणि ते कमी झालेले वजनदेखील मी आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कापलेल्या केसांमुळे असावे अशी मला दाट शंका येऊन मी अजूनच दु:खी झालो.भंसाळीचे बाजीराव माझी वाट लावून नाचायचे थांबले होते. आता "ओ तू भाग मिल्खा" हे माझे आवडते गाणे लागले पण माझ्या हरलेल्या मनाला ते उभारी देऊ शकत नव्हते. माझा सहाय्यक पण कान कोंडला झाला होता. शेवटी मीच त्याला म्हणालो, बहुतेक माझ्या हाडांचे वजन जास्त असेल. तो हसला. माझा फक्त चेहरा हसला. मी घरी आलो. शाळेतील मुले "हात पाय काडी अन पोट वाढी" असे चिडवतात म्हणून टिळकांनी व्यायाम करून शरीर कमावले त्याची गोष्ट माहित होती. पण त्यांच्याच नावाच्या शाळेतल्या मी, व्यायाम करून हात पाय काडी अन पोट वाढी करून घेतले हे कळल्याने मी हताश झालो होतो. लोकमान्यांना हे कळले तर "मोरेंचे पोट ठिकाणावर आहे काय?" असा काही नवा अग्रलेख लिहितील अशी शंका येउन त्या उद्विग्न मनस्थितीत्तदेखील मला थोडे हसू आले.

पूजेला बसलो. फ्रीजमधून फुलांचा डबा घेतला. कालच्या फुलांचे निर्माल्य काढले. देवांना अंघोळ घातली. गंध लावले. फुले वाहण्यासाठी डबा उघडला. आणि एकदम मनात विचार आला. कालचे निर्माल्य आणि आजची फुले यात फरक फक्त फ्रीजच्या थंड हवेचा होता. कालच्या निर्माल्यात टाकलेल्या आणि आजच्या हातात असलेल्या दोन्ही प्रकारच्या फुलांचा फुलण्याचा उत्सव कधीच होऊन गेला होता. जेंव्हा ती झाडावर फुलली तेंव्हाच तो जीवनाचा प्रफुल्ल आनंदोत्सव संपूर्ण झाला होता. ज्याक्षणी त्यांना झाडावरून काढले होते त्याक्षणी त्यांचे निर्माल्य झाले होते. जीवनाच्या उत्सवातील त्यांचा फुलण्याचा भाग संपला होता. निर्माल्य झाले होते पण इतरांना आणि कदाचित त्या फुलांना देखील अजून ते कळले नव्हते. पाणी मारत, फ्रीज मध्ये ठेवत त्यांचे ताजेपण टिकवले होते. माझ्या जिम सारखे, माझ्या फेशिअल ब्लिचिंग सारखे कृत्रिम ताजेपण. आपण निर्माल्य झालो आहोत हे न कळलेल्या फुलांचे ताजेपण. मग मला Reunion म्हणजे निर्माल्याने निर्माल्याचा मांडलेला उत्सव वाटू लागला, आणि Reunion ला जायचा मूड पूर्णपणे गेला.

दुपारी निरंजनचा फोन आला. मी येणार आहे त्याची खात्री करून घेण्यासाठी. मी त्याला थातूर मातूर कारण देऊन, नाही येणार म्हणालो. तो चपापला. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलला. मग तू ये रे असे बोलून त्याने फोन ठेवला. मग थोड्या वेळाने सारंगचा फोन आला. आणि मग अनघाचा मेसेज आला. हे तिघे Reunion च्या कार्यकारी टीमचे सदस्य होते. सगळ्यांनी मला यायला सांगितले. थोडा वैतागलो. पण मग वाटले, की मी कोण इतका लाटसाहेब लागून गेलो आहे की या सर्वांनी इतकी आपुलकी दाखवावी? कशासाठी राबत आहेत हे सगळे? काय वैयक्तिक फायदा त्यांचा यात? निर्माल्य झालो आहोतच पण अजून देवावर वाहून घ्यायचे बाकी आहे. स्वतःच्या नकळत जसे फुललो तसेच योग्य वेळ आली की आपली परवानगी देखील न घेता आपली रवानगी निर्माल्यात करण्यास निसर्ग कुचराई करणार नाही. मग आत्त्ताच कशाला उदास व्हा? आला क्षण आपला, असे वाटू लागले. मन पुन्हा ताळ्यावर येऊ लागले. आणि मी Reunion ला जायला पुन्हा तयार झालो.

क्रमश

विनोदमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

9 Feb 2016 - 12:23 pm | सुबोध खरे

मी पहिला

सुबोध खरे's picture

9 Feb 2016 - 12:30 pm | सुबोध खरे

आताच चौथा हि भाग वाचला.
आज काल मिपावर उडणार्या धुरळ्यात आपले लेखन एखाद्या नुकत्याच उमललेल्या सोनचाफ्याच्या फुलासारखे टवटवीत आहे. लिहिते राहा.

Anand More's picture

9 Feb 2016 - 12:37 pm | Anand More

आणि दुसरे देखील.
माझ्या लिखाणाबद्दल, तुम्ही खरे बोलताय असे गृहीत धरून,प्रतिसादाबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. :-)

सुबोध खरे's picture

9 Feb 2016 - 1:09 pm | सुबोध खरे

मोरे साहेब
उगाच कुणाची खोटी स्तुती करावी असा माझा स्वभाव नाही किंवा त्यासाठी खोटं बोलावं असा मला मुळीच वाटत नाही.
त्यामुळे प्रत्येक धाग्यावर वा वा छान छान असे मी अजिबात लिहित नाही.आपण इतर धागे पाहू शकता.
कंपूबाजी हा माझा स्वभाव नाही. पण जे आवडलं तेथे तसं आवर्जून लिहितो. बस एवढंच.

अरे… तुम्हाला माझा विनोद आवडला नाही वाटतं … मी थोडा जास्तीच अवखळ पणा करतो रंगात आलो की असे माझे सगळेच मित्र म्हणतात. … माझा प्रतिसाद सोडून द्या … पण येत राहा । कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही. प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. :-)

अगम्य's picture

10 Feb 2016 - 1:37 am | अगम्य

खरे साहेबांच्या Financial planner ने त्यांना निवृत्ती नंतरच्या नियोजनासाठी असा सल्ला दिला आहे की जो कोणी त्यांच्या आडनावावरून विनोद करेल त्याला शंभर रुपये आकारायचे. त्या स्रोतातून फार नाही, पण स्वित्झर्लंड मध्ये एक ranch आणि भूमध्य समुद्रात एक याट ह्यामध्ये त्यांना निवृत्त आयुष्य घालवता येइल असा Financial planner चा अंदाज आहे. मोरे साहेब, हलके घ्या. तुमचे लेखन खूप आवडते हे वेगळे सांगायला नको.

अरेच्या... एकंदरीत माझ्या गोष्टीपेक्षा माझा प्रतिसादच जास्त गाजला म्हणायचं की... इथे डिलिट ची सोय नाही, म्हणून... नाहीतर मी तो डिलिट पण केला असता... कुणाला दुखवून काही खास मजा येत नाही अश्या मताचा मी आहे... एकाच गोष्टीवर जास्त वेळ थांबले की आनंद संपतो हे मला नावानिशी आणि स्वानुभवाने माहिती आहे... म्हणून माझ्या गोष्टीला खऱ्यांची दाद तिला माझा अवखळ प्रतिसाद त्याला त्यांचा तीव्र प्रतिसाद आणि मग त्याला माझे सौम्य स्पष्टीकरण अश्या प्रकारे हा साद - पडसाद खेळ विरला असेल असे मी समजत होतो... आणि ते तसेच राहू द्या.. मी आज पुढला भाग टाकतोय... तिथे हसायला या...वाटलं तर थोडं कौतुक करा... मलातर आता तितकी योग्यता मिळवायच्या आधीच, "मोरे तुम्ही स्वतःला काय समजता?" अशी पत्रे येऊ लागण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.. :-)

सुबोध खरे's picture

10 Feb 2016 - 9:49 am | सुबोध खरे

मोरे साहेब
काय एवढा मनावर घेताय?
लेकी बोले सुने लागे असं लिहिला होतं त्यात. नको तितके कचकोळ आणि भिकार लेख कुत्र्याच्या छ्त्र्यांसारखे येतात आणि जातात. त्यातल्या एकालाही काही प्रतिक्रिया लिहावी असे वाटत नाही. आपलं लेखन सुंदर आहे म्हणून लिहिलं आहे. त्यातील तिरकस भाव आपल्यासाठी नाही.
लिहिते राहा.
एकदा प्रत्यक्षच भेटू.

धन्यवाद. "तुटे वाद संवाद तो हीतकारी" या समर्थांच्या वचनावर माझे फार प्रेम आहे. मिसळपावची लज्जत लेखनाने वाढवूया. :-)

अगम्य's picture

10 Feb 2016 - 9:50 am | अगम्य

तुम्ही अगदी सोनचाफ्याच्या टवटवीत फुलासारखं छान लिहिता. आणि जर तुम्हाला कोणी "मोरे तुम्ही स्वःतःला काय समजता?" असे विचारले की स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप आधी मारून घ्या. कारण साक्षात पु ल देशपांडेंना सुद्धा ह्या प्रश्न बऱ्याचदा विचारला गेला होता आणि त्यावर त्यांनी "तुम्ही स्वःतःला काय समजता?" असा सुंदर लेख लिहिला होता.
अहो, ज्याच्या नावातच आनंद "more" आहे तो संपेल कसा? :-) पुढल्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहोत. ये दिल मांगे more!

सुबोध खरे's picture

10 Feb 2016 - 9:52 am | सुबोध खरे

+१

<<<कारण साक्षात पु ल देशपांडेंना सुद्धा ह्या प्रश्न बऱ्याचदा विचारला गेला होता>>> मी त्याच संदर्भात "मलातर आता तितकी योग्यता मिळवायच्या आधीच" अशी पुस्ती आधी जोडून मग तो प्रश्न लिहिला होता :-)

कौतुकाबद्दल आणि प्रेमाबद्दल आभारी आहे. :-)

मयुरMK's picture

9 Feb 2016 - 12:36 pm | मयुरMK

+++१ :) पु. भा. प्र.

नीलमोहर's picture

9 Feb 2016 - 12:39 pm | नीलमोहर

मोरेंचे पोट ठिकाणावर आहे काय?
:)

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 12:40 pm | उगा काहितरीच

छान झाला हा पण भाग ! तो शेवटचा पॕरा थोडा सेंटी ... पण ठीक आहे . पुभाप्र ...

साहेब,......

कसलं लिहिता राव

निर्माल्य!
वाचतेय.पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 12:52 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

विवेक ठाकूर's picture

9 Feb 2016 - 12:54 pm | विवेक ठाकूर

सुरेख शैली आणि उत्तम मांडणी !

खेडूत's picture

9 Feb 2016 - 1:02 pm | खेडूत

जियो!
जब्बर्दस्त भाग झालाय.
"अभी तो पार्टी शुरू हुई है ..असं वाट्लं

मृत्युन्जय's picture

9 Feb 2016 - 1:18 pm | मृत्युन्जय

मस्त लिहिले आहे एकदम. खुशखुशीत लिहायची कला तुम्हाला अवगत आहेच. लेख रंगवलाय सुंदर. आता तर मला पण तुमच्या रियुनियन ची उत्स्तुकता लागुन राहिली आहे.

एस's picture

9 Feb 2016 - 1:18 pm | एस

वाचतोय. पुभाप्र!

कविता१९७८'s picture

9 Feb 2016 - 1:24 pm | कविता१९७८

छान

कविता१९७८'s picture

9 Feb 2016 - 1:25 pm | कविता१९७८

फुलराणीला भेटायची उत्सुकता अजुन वाढलीये, नाहीतर फुलराणीचाच घेरा अवाढव्य वाढलेला असेल अस चित्र डोळ्यासमोर येउ लागलय.

तुम्ही आजसुद्धा धक्कादायक कविता आहात ;-) :D

यशोधरा's picture

9 Feb 2016 - 1:31 pm | यशोधरा

वाचतेय..

पिलीयन रायडर's picture

9 Feb 2016 - 1:35 pm | पिलीयन रायडर

दोन तीन तास शेहनाझ हुसेन नावाच्या बाईने स्वतःच्या चेहऱ्यावर न वापरता केवळ जनकल्याणासाठी बनवलेल्या मलमांचा, लेपांचा आणि इतर द्रव्यांचा मारा

अगदी बरोब्बर!!!

हा ही भाग मस्तच!

साती's picture

9 Feb 2016 - 1:36 pm | साती

छान लिहिलेत.
आवडले.

स्वाती दिनेश's picture

9 Feb 2016 - 1:58 pm | स्वाती दिनेश

हा भागही आवडला, पुभाप्र.
स्वाती

डॉ. साहेबांशी १००% सहमत . खरच अतिशय टवटवीत लिखाण. लिहीत रहा.

मीता's picture

9 Feb 2016 - 3:25 pm | मीता

खूप खुसखुशीत लिहिलंय.

दोन तीन तास शेहनाझ हुसेन नावाच्या बाईने स्वतःच्या चेहऱ्यावर न वापरता केवळ जनकल्याणासाठी बनवलेल्या मलमांचा, लेपांचा आणि इतर द्रव्यांचा मारा- ह्याबद्दल सहमत

जे लिहिता ते सुंदरच लिहिता.
पण जरा एक खुसपट काढू का?

तिसरा भाग जरा गंभीर - इंटेन्स होता. त्या मानानी चौथ्याची सुरुवात जरा खुसखुशित असली तरी इंटेंसिटी मॅच झाली नाही...

असंका? बरं… :-) शक्य आहे. तिसऱ्या भागात मी नववी तला मुलगा होतो. या भागात मी बानूच्या संभाव्य भेटीने सुखावलेला पण त्यानंतरच्या वादळाच्या शंकेने काळवंडलेला माणूस आहे. :P

असंका's picture

9 Feb 2016 - 5:35 pm | असंका

-))

बरोबर! ओक्के!!

हेमंत लाटकर's picture

9 Feb 2016 - 6:13 pm | हेमंत लाटकर

छान लेख!

खुसखुशीत लेख. पाहिला तसा लगेच वाचुन काढला.

मी-सौरभ's picture

9 Feb 2016 - 7:41 pm | मी-सौरभ

पुढच्या वेळेला वजन कमी नाहीतर पैसे परत स्कीम असलेल्या जिम् ला जा. फायदा होईल

बाकि तुमच्या रियुनियनची वाट बघतोय

तुमचा पंखा-
सौरभ

एक एकटा एकटाच's picture

9 Feb 2016 - 10:00 pm | एक एकटा एकटाच

मजा आली
वाचायला

मस्त ! चारहि भाग आवडले.छानच लिहिता तुम्हि.
पु भा प्र.

बाबा योगिराज's picture

10 Feb 2016 - 12:03 am | बाबा योगिराज

मस्त, आवड्यास.
और भी आने दो.

सही रे सई's picture

10 Feb 2016 - 12:58 am | सही रे सई

आनंद सर, तुमच्या लेखनाचा बाज खूपच छान आहे. असेच लिहीत राहा.

पैसा's picture

10 Feb 2016 - 9:33 am | पैसा

छान लिहिताय

विभावरी's picture

10 Feb 2016 - 11:19 am | विभावरी

मस्तच ! मजा येतीय वाचताना ..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Feb 2016 - 12:59 pm | निनाद मुक्काम प...

आवर्जुन वाचत आहेत लेखमाला
आमचे रियुनियन २००१ ला म्हणजे शाळा सोडून ५ वर्षांनी झाले त्या आधी माझी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेतील मित्रांशी संपर्क होता किंबहुना तेथे वर्ग भगिनी आता वर्ग मैत्रिणीच्या सारख्या वागत होत्या मोकळेपणे बोलत होत्या हा काळासोबत
कॉलेज चा जादुई वातावरणाचा सुद्धा परिणाम होता.
आता आमच्या हुशार अ वर्गाचा काय आप्पा वर समूह आहे बरेच जन अनिवासी आहेत तेव्हा रियुनियन ची शक्यता धुसर असते मात्र ते करायचे ह्या बाबाबत चर्चा दर महिन्याआड घडते,
डोंबिवलीत माझ्या आईच्या शाळेचे टिळकनगर चे नियमित वर्षाकाठी रियुनियन होते व माझ्या मामाचे सुद्धा आले
आमचे समकालीन ब आणि क वर्ग संयुक्तपणे एकत्र रियुनियन करतात त्यांचा सुद्धा काय अप्पावर समूह आहे
मात्र अ वर्गातील मुले त्यांच्या समूह व रियुनियन पासून चार हात लांब असतात.
रियुनियन च्या निमित्ताने आठवणीना उजाळा मिळाला ,
ह्या लेखाची लिंक आमच्या काय आप्पावर देत आहे .
सरतशेवटी
रियुनियन च्या संयोजकांचे खरे आभार
अनेकांचे रुसवे फुगवे अहं आणि कितीतरी वेळा नैसर्गिक कौटुंबिक कारणे ह्यामुळे जेव्हा एखादा वर्ग मित्र येण्याचे टाळतो तेव्हा हे आयोजक त्यंची मनधरणी करतात, हे खरे कौतुकास्पद आहे

सुमीत भातखंडे's picture

10 Feb 2016 - 6:46 pm | सुमीत भातखंडे

मस्त झालाय हाही भाग.
वाचतोय

अर्धवटराव's picture

11 Feb 2016 - 12:54 am | अर्धवटराव

गुलाबाचं निर्माल्य न होता गुलकंद देखील होऊ शकतं साहेब :)
खुप मस्त चालली आहे रियुनीयन तयारी :)
पुभाप्र.