✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी आणि शाळेचे Reunion - (भाग २)

A
Anand More यांनी
Sun, 02/07/2016 - 14:41  ·  लेख
लेख
भाग १ ___________________________________________________ मी शाळेत असताना मैत्रीण असणे ब्रम्हह्त्येइतके महापातक होते. आणि मी पापभीरू असल्याने माझ्यातील कुमारसुलभ भावनांना मुरड घालण्यात तत्कालिन समाजपुरुषाला यश आले होते. अनेक मुली मैत्रीण होण्याची क्षमता बाळगून आहेत आणि काही तर त्याहून अधिक क्षमतेच्या आहेत हे कळत असून देखील मी ब्रम्हहत्या न करताच शाळेतून बाहेर पडलो होतो. त्याशिवाय मला शाळेत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मित्र होते. म्हणजे पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी प्रत्येक वेळी मी नवीन मित्रांच्या घोळक्यात असे. घोळका पण छोटासा, मी धरून चार मित्र. दहावीनंतर ते पण सुटले. याचा अर्थ प्रत्येक वेळी मी आधीच्या मित्रांपेक्षा जास्त वेगाने सजाण होत होतो असा काढून मी स्वतःला समजावीत असलो तरी याचा अजून एक अर्थ दर तीन वर्षात माझे मित्र मला कंटाळत असतील असाही होऊ शकतो हे सत्य मी नाकारू शकत नव्हतो. त्यामुळे मित्रांच्या गोड आठवणींपेक्षा मित्र सुटल्याच्या हुरहुर लावणाऱ्या आठवणी जास्त असल्याने, Reunion ला जावून कुणाशी काय बोलणार? कुणाला आपल्याशी बोलण्यात रस असणार? आणि आता तर एक गांधीबाबा पण गेले, अश्या विचाराने खिन्न होऊन घरी पोहोचलो. पाच प्लेट पाणीपुऱ्या पोटात होडी होडी खेळत होत्या. ते हिला कळू देणे महागात पडेल इतके कळण्याइतपत माझे लग्न जुने झाले आहे, म्हणून मग मी जेवणार नसल्याचे जाहीर केले. माझा उतरलेला चेहरा पाहून आणि न जेवण्याचा जाहीरनामा ऐकून, माझं काहीतरी बिनसलंय ते हिला लगेच कळलं. आणि काय झालं? ते तिने खोदून खोदून विचारायला सुरवात केली. ती जेंव्हा अशी चौकशी करू लागते तेंव्हा तिच्या नजरेत एक वेगळीच चमक असते. आवाजात जरब आणून, देहबोली आक्रमक करून, डोळ्याची पापणी न लवता, एकटक रोखून पहात जेंव्हा ती चौकशी सुरु करते तेंव्हा मागल्या जन्मी ती केजीबी किंवा मोसादची चौकशीप्रमुख असावी याची मला खात्री पटते. पण मी देखील खूंखार माफियाच्या टोळीतील अमली पदार्थ चोरून लपवून आणणाऱ्या कट्टर सदस्याप्रमाणे पाणीपुरीची बातमी शिताफीने लपवीत फक्त Reunion बद्दलच बोललो. तिला न सांगता मी पैसे भरले आहेत यावर तिचा अगोदर विश्वासच बसेना. पण मग जेंव्हा तिला मी सगळा हिशोब दाखवला तेंव्हा ती आनंदाने गिरक्या घेत उडी मारत "अय्या! कित्ती छान. नक्की जा Reunion ला" असे म्हणाली. माझ्याकडून घडलेल्या कृतीचा इतक्या चटकन स्वीकार आणि इतके उत्साही स्वागत झाल्याने, खूंखार माफिया टोळी सोडून केजीबी किंवा मोसादमध्ये भरती व्हायची पाळी आता माझी होती. सर्व चौकशीअंती असे कळले की माझ्या Reunion च्याच दिवशी ही मुलांना घेऊन एका सहलीला जाणार होती आणि पुढच्या आठवड्यात तिच्या शाळेचे देखील Reunion होणार होते. तिला न सांगता Reunion ला जाण्याच्या माझ्या निर्णयाला अनुमोदन देण्याच्या बदल्यात तिच्या दोन्ही कार्यक्रमांना संमती असा सगळा सौदा होता. त्यामुळे मग मी त्या तिघांच्या सहलीचे चार गांधीजी, तिच्या Reunion चे एक गांधीजी आणि पुन्हा ब्युटी पार्लरचे, वरखर्चाचे पाच सहा गांधीजी देऊन, लक्ष्मी गांधीजींच्या रूपात आली तरी चंचलच असा निष्कर्ष काढून हताश का कायसा होत्सासा झालो होतो. स्वतःच्या ब्लॉगवर, फेसबुकवर आणि मिपावर थोडे लिखाण प्रसिद्ध झाल्याने आणि सध्या एकंदरीतच “निघाली कॉमेडी एक्स्प्रेस” मधल्या परीक्षकांसारखे सगळ्यांनी सगळ्यांच्या सगळ्याच गोष्टीचे कौतुक करण्याचे दिवस असल्याने चार दोन कौतुकाचे थेंब माझ्यावरही पडले होते. शाळेतल्या त्या काळच्या काही सुंदर खाश्या सुबक ठेंगण्यांचे (सुंखासुठें चे) फेसबुक, मिपावरचे अभिप्राय वाचून, मनातल्या मनात त्यांच्याशी खालील प्रकारे संवाद करत होतो सुंखासुठें : कित्ती छान लिहितोस रे तू अस्मादिक : धन्यवाद. विशेष काही नाही गं. उगाच आपलं काहीतरी लिहितोय इतकंच (मनातल्या मनातील संवादातील स्वगत : मग ! वाटलं काय तुला? शाळेत असताना कधी एखादं स्मितहास्य दिलं असतंस तर आज एखादा लेख तुला अर्पण केला असता) सुंखासुठें : वा वा असं कसं ! छानंच आहे. मी तर माझ्या मैत्रिणींना पण सांगितलं की तो जो आनंद आहे ना तो माझ्या वर्गात होता शाळेत. त्यांना पण फार आवडतं तुझं लिखाण. आम्ही सगळ्याजणी मिळून वाचतो आणि खूप खूप हसतो. अस्मादिक : अरे वा. धन्यवाद. (मनातल्या मनातील संवादातील स्वगत : कुठली मैत्रीण? फेसबुकवर आहे का? प्रोफाईल पिक वगैरे…. ह्म्म्म्म ) सुंखासुठें : शाळेत असताना कधी वाटलं नाही तू इतका हुशार असशील म्हणून. अस्मादिक : ऑ …….. (मनातल्या मनातील संवादातील स्वगत : हे असं बोललंच पाहिजे का गं तुला?) घरगुती ऋजुता, मुले आणि आई, सगळेजण बाहेरच्या खोलीत जेवत होते आणि मी पलंगावर पडल्या पडल्या ह्या संवादाची उजळणी करत होतो. कितीही वेळेला उजळणी केली तरी त्याचा शेवट कायम असाच होत होता. आणि एकाएकी नववीतली एक आठवण झाली. क्रमश

Book traversal links for मी आणि शाळेचे Reunion - (भाग २)

  • ‹ मी आणि शाळेचे Reunion - (भाग १)
  • Up
  • मी आणि शाळेचे Reunion - (भाग ३) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7017 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

आणि मी पापभीरू असल्याने

उगा काहितरीच
Sun, 02/07/2016 - 14:50 नवीन
आणि मी पापभीरू असल्याने माझ्यातील कुमारसुलभ भावनांना मुरड घालण्यात तत्कालिन समाजपुरुषाला यश आले होते. अनेक मुली मैत्रीण होण्याची क्षमता बाळगून आहेत आणि काही तर त्याहून अधिक क्षमतेच्या आहेत हे कळत असून देखील मी ब्रम्हहत्या न करताच शाळेतून बाहेर पडलो होतो.
बाबौ !
पाच प्लेट पाणीपुऱ्या पोटात होडी होडी खेळत होत्या.
हाहाहाहा हे लै जब्राट. थोडासा लहान वाटला भाग पण मस्त आहे. पुभाप्र ...
  • Log in or register to post comments

हा हा हा … थोडा छोटा झालाय

Anand More
Sun, 02/07/2016 - 15:13 नवीन
हा हा हा … थोडा छोटा झालाय खरं … पण पुढचा भाग लांबलाय… तेंव्हा धीर धरून नेटाने शेवटपर्यंत पूर्ण वाचा ही विनंती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

विनंती काय राव , वाचनारच !

उगा काहितरीच
Sun, 02/07/2016 - 17:14 नवीन
विनंती काय राव , वाचनारच ! रच्याकने माझे पण नाव आनंद आहे बरं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

अरे व्वा... म्हणजे अगदी

Anand More
Sun, 02/07/2016 - 21:35 नवीन
अरे व्वा... म्हणजे अगदी आनंदाचे डोही.... आनंद तरंग.... हे आपलं उगा काहीतरीच :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

=))

चांदणे संदीप
Mon, 02/08/2016 - 12:23 नवीन
मस्त..... छानच लिहिता तुम्ही! पुभाप्र! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

=))

अजया
Sun, 02/07/2016 - 15:24 नवीन
मस्त झालाय भाग! बाकी रियुनियनबद्दल बाडिस आहेच ;)
  • Log in or register to post comments

लक्ष्मी गांधीजीं

संजय खांडेकर
Sun, 02/07/2016 - 15:26 नवीन
"लक्ष्मी गांधीजींच्या रूपात आली तरी चंचलच" आणि "कितीही वेळेला उजळणी केली तरी त्याचा शेवट कायम असाच होत होता" अप्रतिमच
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Sun, 02/07/2016 - 16:22 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

छान. १ गांधीजी म्हणजे किती.

हेमंत लाटकर
Sun, 02/07/2016 - 17:05 नवीन
छान. १ गांधीजी म्हणजे किती.
  • Log in or register to post comments

अरेरे....लेखकाने केला तरी

टवाळ कार्टा
Sun, 02/07/2016 - 19:45 नवीन
अरेरे....लेखकाने केला तरी तुम्हीसुध्धा गांधीजींचा असा उल्लेख केलेला पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे का काय ते वाट्ली....तुम्हीच असे वागलात तर संस्कृतीला कोण वाचवणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

कोण नाय

पैसा
Sun, 02/07/2016 - 20:02 नवीन
सगळे मिपाकर तिला बुडवायला टपलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

एक मिनिट. सगळ्या मिपाबायका

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 02/07/2016 - 22:29 नवीन
एक मिनिट. सगळ्या मिपाबायका अधिक बायका संस्कृतीला बुडवायला निघाल्यात असं गेल्या वेळी ऐकलं का वाचलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माझ्या सांपत्तिक स्थितीचा

Anand More
Sun, 02/07/2016 - 21:41 नवीन
माझ्या सांपत्तिक स्थितीचा अंदाज येऊ नये म्हणून जाणून बुजून मुग्ध राहिलोय... बाकी गांधीजी 10 पासून 1000 पर्यंत सगळीकडे आहेत... आमच्या कडच्या नव्या व्यापाराच्या नोटांवर पण आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

:) Aavdala!

पिलीयन रायडर
Sun, 02/07/2016 - 17:11 नवीन
:) Aavdala!
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Sun, 02/07/2016 - 18:40 नवीन
हा भागही मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments

;-)

एस
Sun, 02/07/2016 - 19:16 नवीन
;-)
  • Log in or register to post comments

मस्त!

बोका-ए-आझम
Sun, 02/07/2016 - 19:43 नवीन
रियुनियनबद्दल उत्कंठा वाढली आहे. रच्याकने कोणत्या शाळेचं reunion होतं हो डोंबिवलीतल्या?
  • Log in or register to post comments

इन सब सनसनीखेज सवालोंका राज

Anand More
Sun, 02/07/2016 - 21:43 नवीन
इन सब सनसनीखेज सवालोंका राज जानने के लिये पढते रहिये आनंद कॉमिक्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बोक्याला फार चौकश्या =))

अजया
Sun, 02/07/2016 - 20:43 नवीन
बोक्याला फार चौकश्या =))
  • Log in or register to post comments

वाचतोय.

भाते
Sun, 02/07/2016 - 22:39 नवीन
हा भाग सुध्दा आवडला. रीयुनियन म्हणाल्यावर किमान एक लाल नोट तरी आलीच. (स्वानुभव)
  • Log in or register to post comments

हा पण भाग मस्त...

मुक्त विहारि
Mon, 02/08/2016 - 07:52 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मोरे साहेब

सुबोध खरे
Mon, 02/08/2016 - 10:30 नवीन
मोरे साहेब बरेच लेखक विनोद करण्याचा प्रयत्न करतात पण सर्वाना ते चांगले जमतेच असे नाही. पण आपली लेखन शैली खरोखरच कौतुकास्पद आहे आणि लेखन सुद्धा उच्च दर्जाचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे बरेच लोक विनोद करण्यासाठी ओढून ताणून प्रयत्न करतात पण तो जमत नाही म्हणून मग दर्जा घसरतो किंवा कमरेखालील विनोद होतात. आपले लेखन कोणावरही हीन टीका न करता उच्च पातळी टिकवून सतत हे आवर्जून म्हणावेसे वाटते. सुरेख. लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

प्रत्येक वाक्याला सहमत...

मुक्त विहारि
Mon, 02/08/2016 - 10:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मनापासून धन्यवाद.

Anand More
Mon, 02/08/2016 - 11:39 नवीन
मनापासून धन्यवाद. इतके गोड कौतुक केले आहेत की हा शर्करा मिश्रीत क्षीरसागर असावा अशी दाट शंका आहे. माझे पुढचे लेखन तुमचे मत परिवर्तन करू शकणार नाही अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वा काय सुंदर मांडलंत!!

असंका
Tue, 02/09/2016 - 16:54 नवीन
वा काय सुंदर मांडलंत!! हे एवढं भारी लिहायची काय कॅपॅसिटी नाही, पण भावनेशी पूर्णपणे सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा