आरक्षणाची गरज

अन्नू's picture
अन्नू in जनातलं, मनातलं
16 Jan 2016 - 10:36 pm

आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने?
मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी? फक्त आर्थिक दुर्बलांना किंवा मागासलेल्या जातींना सधन करण्यासाठी?
आत्ता मिपावर कित्येक कायदेतज्ञ असतील. काहींना याबाबतीतली राज्यघटनेतील काही कलमेही माहीत असतील. त्यांनाही या युक्तीमागचा अर्थ समजु नये?

आश्चर्य वाटतं- पण तितक्याच वेदना होतात! जर हे आरक्षण आर्थिक दुर्बलांना सधन करण्यासाठी असतं तर मग सरकार गरीबांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी किंवा दारिद्ररेषेखालील लोकांसाठी जे विविध उपाय-योजना आखत असतं ते कुठल्या नियमानं करत असतं?
आणि मुळात आरक्षण हे जातीवरच भर देणारं का आहे?
कोण विचार करतं याचा? कोणीच नाही!
फक्त प्रश्न आला कि एकच उत्तर- आरक्षण बंद करा! बस्स.
संपलं?
आपण फँड्री सिनेमा बघतो, चार दिवस चुचकारतो, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आणि नंतर?... सगळं शांत!
का बरं असं?
का तो सिनेमा फक्त आपल्या मनोरंजनासाठीइतकाच मर्यादित असतो का?

एक किस्सा सांगतो- काल्पनिक नाही कालचाच घडलेला आहे. कोणाचं नाव इथं सांगत नाही मी, फक्त चौघा मित्रांत झालेली चर्चा मी इथे देतो. कदाचित मी हा मुद्दा का सांगतोय हे अधिक स्पष्ट होईल.

"अरे उसमें तो ९५ मे आडमिशन हो जाता है|"
"ह्यॅ! किसने कहाँ?"
"सच में, अगर तू कास्टवाला रहेगा ना तो तेरा अ‍ॅडमिश आराम से हो जाएगा.."
"अच्छा- उसके लिए ना? मुझे लगा अपनी बात कर रहा है तू|"
"अरे SC के लिए तो ८५% है! पता है?"
"कौन वो भंगी?"
"नही SC वाला"
"वही- भंगी! साला यहाँ पे हमें अ‍ॅडमिशन मिलता नहीं और इन भिखारी को मुफ्त का मिल जाता है!"
"कुछ भी बोल- लेकीन जो है- वो है|"
"क्या फालतू में, इनको सर चढाती है गवर्नमेंट? हर जगह इनको रिझर्वेशन चाहीए होता है|"
(तिसरा) "हर जगह नही होता- XXXXX कॉलेज में तो SC हो, तो भी ९० का कट ऑफ है|"
"वो एक जगह हुई, लेकिन बाकीके जगह पे तो ये भिखमंगे आते ही है ना?"
"देख तू कास्ट के बारें में ऐसा नही बोल सकता"
"क्यु- मुझे क्या किसी का डर है क्या? मै तो कॉलेजमें और बाहर भी उनको भंगी ही बुलाता हूँ"
"देख ***** तू यहीं बात किसी कास्टवाले के सामने कहेगा ना, तो वो सीधे तुम्हारे उपर केस कर देगा|"
"तू क्यु इतना डर रहा है?"
"डरने का सवाल नहीं- मेरे साथ ऐसा हुआ है, इसलिए मै बोल रहा हूँ|"
"मुझे तो इतना गुस्सा आता है ना इनके उपर"
"गुस्सा तो मुझे भी आता है- लेकीन हम कुछ नही कर सकते, लॉ ही ऐसा है| तू बाकी जगह पें उनकों कितनी भी गालियाँ दे, तुझे कोई नही रोकेगा, पर पब्लिक प्लेस में तू ऐसा नही बोल सकता|"
"लेकीन इनको रिझर्वेशन देते क्यु है?"
"देख- असली रिझन तो मुझे भी नही पता, लेकीन इसी वजह से वो आगे निकल जाते है|"
"साला, इनका रिझर्वेशनही पुरा बंद करना चाहीए| जरुरत ही क्या है इनकों रिझर्वेशन देने कि?"
"जाने दे नं, वैसे भी करेंगे क्या वो रिझर्वेशन लेके? गाँव जाके हल ही चलाऐंगे!"
या वाक्यावर सगळेजळ हसायला लागले.

थोड्या वेळानंतर पहिला मुलगा निघून गेला. जाताना पुन्हा त्याने तसं ओपनली बोलू नको म्हणून त्या मुलाला बजावलं. पण त्या मुलाला मात्र त्याचं बोलणं पटलं नाही. तो त्याच मुद्द्यावर आपल्या दुसर्‍या मित्राबरोबर बोलायला लागला..

"क्या डरता है रे ये? भंगी को भंगी नही बोलेंगे तो क्या बोलेंगे?"
"वो बहोत डरपोक है|"
"नहीं तो क्या? हमारे गाँव में तो ये लोग पहले कचरा उठाते थे, पता है? कोई भाव नहीं देता इन्हें"
त्याचा मित्र नुसताच कुचेष्टेने हसला-
"कभी आओगे तो देखना हमारे गाँव- वहाँ बहोत चलता है ऐसा. मै तो मुँह पर बोलता हूँ उनके! आज भी इनको हमारे सामने बैठने कि परमिशन नहीं है- हिम्मतही नहीं होती इनको सामने बैठने कि...
अरे बैठना तो दूर ये लोक- यही एस सी वाले- हमारे सामने से जाते वक्त चप्पल भी पहनके नही जा सकते!"

ही संपुर्ण चर्चा ऐकल्यावरही समाजातून जात हा प्रकार कायमचा नष्ट झाला आहे असं वाटतं का?

आंम्हाला कॉलेजच्या फर्स्ट इअरला अभ्यासाला एक नाटक होतं त्यात एक डायलॉग होता-"जात नाही ती जात!"

जात
दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द आंबेडकरांनी अनुभवल्याने त्यांनी घटनेत तरतुद करुन या घटकाला प्रत्येक क्षेत्रात मुद्दाम राखीव जागा करुन दिल्या- आणि त्याच आरक्षणाच्या आज आपण इतक्या प्रचंड विरोधात बोलत असतो!

पण आर्थिक घटकच आंबेडकरांना आरक्षणासाठी गृहीत धरायचा असता तर त्यांना जात हा मुद्दा घटनेत नमुद करण्याची गरजच काय होती?
याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.

एक वेळ तुंम्ही कष्ट करुन पैसा मिळवून शकता- श्रीमंत होऊ शकता, स्वतःची गरीबी दुर करु शकता- पण जात?
अहं- कितीही प्रयत्न करा, ती तुंम्हाला कधीच बदलता येत नाही!

आणि हीच गोष्ट आंबेडकरांना कळून चुकली होती, त्याबाबत त्यांनी एक प्रसंगही सांगितला आहे, ऑफिसात काम करत असताना ते एका चपराश्याला पाणी द्यायला सांगतात तर तो ते देण्यास नाकारतो. का? तर तो एका उच्च जातीचा असतो! यावेळी आंबेडकरांचं पद- त्यांचं शिक्षण त्याच्या दृष्टीने काहीच किंमतीचं नसतं! तो तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवतो.
असा एकच नाही- अनेक प्रसंग आंबेडरांच्या बाबतीत घडत गेले आणि त्यातूनच आरक्षणाची कल्पना मुळ धरत गेली.
पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिल्यास आंबेडकरांनी आरक्षणातून काय साध्य केलं असा प्रश्न पडतो.
कारण-
त्या विशिष्ट घटकाविषयी समाजाची मानसिकता आजही तिच आहे- पुर्वी होती तशीच!
बदल झाला तो ती उत्कट करण्याच्या पद्धतीत!
त्यांचा धर्म बदल झाला. जात मात्र प्रत्येक ठिकाणी जिवंतच राहीली....

समाजप्रकटनविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

आज काल सगळे रोहीत शर्मा झाले आहेत. प्रत्येक जण येतो आणि १०० मारुन जातो. चला पाटा पीच आहे. करा स्लॉग.

माहितगार's picture

16 Jan 2016 - 11:37 pm | माहितगार

आत्ता मिपावर कित्येक कायदेतज्ञ असतील. काहींना याबाबतीतली राज्यघटनेतील काही कलमेही माहीत असतील. त्यांनाही या युक्तीमागचा अर्थ समजु नये?

साहेब हे विधान (उपरोधाने लिहिले असेल तर ठिक आहे) जरा पडताळून पहाण्याची आवश्यकता असावी, केवळ मिपाच अथवा मराठीच नव्हे, वकील मंडळींचा आंतरजाल सहभाग तुलनेने कमी असतो (नाही म्हणायला व्हॉट्प फेसबुकवरील टैमपास वगैरे अलिकडील बाब झाली) त्यातला भारतीय वकीलांचा कमी त्या पेक्षा मराठी वकीलांचा कमी आणि त्यात मिपा सारख्या संस्थळांवरचा अजून कमी असतो. ऑनलाईन मंडळींना वकील मंडळींचे मार्गदर्शन होणे चांगले असू शकते पण वास्तवात अनुभव याच्या अत्यंत विरुद्ध असावा.

बाकी चर्चा चालू द्यात

अन्नू's picture

17 Jan 2016 - 12:28 am | अन्नू

उपरोधाने नाही, मी खरंच सांगितलंय. कारण, काही मंडळीना त्यातले काही मुद्दे माहीतही असतील. त्यासाठी ते वकिलच असावेत असं काही नाही. घरातला एखादा किंवा जवळचा कोणी मित्र त्या क्षेत्राशी संबंधीत असेल तर त्यांना ती माहीती सहजरित्या होते.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2016 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा

मागे मी टाकलेल्या या धाग्याची आठवण झाली.

अन्नू's picture

17 Jan 2016 - 12:20 am | अन्नू

पण हा वाद नाही. त्यात ब्राम्हण-ब्राम्हणेत्तर तर मुळीच नाही. ही एक सत्य स्थिती आहे, जी आज सगळीकडे पहायला मिळते.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2016 - 5:25 am | अत्रुप्त आत्मा

नाही कसं अन्नूशेट? आहो नाण्याची पहिली बाजू आहे ती!

अन्नू's picture

17 Jan 2016 - 10:54 am | अन्नू

मला एक समजत नाही. आरक्षण म्हटलं कि त्याला विरोध करणारे फक्त ब्राम्हणच कसे असतील? इतरही विरोध दर्शवणारा वर्ग आहेच कि! आणि पुर्वी जरी म्हटलं तरी ब्राम्हणांची संख्या एकूण समाजाच्या नव्वद टक्के होती का? मग ही चर्चा ब्राम्हणांच्याच विरोधात बोलली जाते असं का वाटतं?
शिवाय एक गोष्ट इथे आवर्जुन सांगाविशी वाटतेय ती म्हणजे वर ज्या मुलांचं संभाषण मी दिलंय त्यातला एकही ब्राम्हण नाही.

प्रसाद१९७१'s picture

19 Jan 2016 - 9:44 am | प्रसाद१९७१

शिवाय एक गोष्ट इथे आवर्जुन सांगाविशी वाटतेय ती म्हणजे वर ज्या मुलांचं संभाषण मी दिलंय त्यातला एकही ब्राम्हण नाही.

ब्राह्मण १९४८ सालीच शहाणे झाले. आता ते स्वतापुरते बघतात आणि मस्त रहातात. समाजाच्या उस्तवार्‍या करणे त्यांनी सोडुन दिले.

नया है वह's picture

20 Jan 2016 - 12:01 pm | नया है वह

ते स्वतापुरते बघतात आणि मस्त रहातात आणि स्वतःची प्रगती पण साध्य करतात आरक्षणाशिवाय.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2016 - 12:58 pm | श्रीगुरुजी

+१

नाखु's picture

20 Jan 2016 - 12:59 pm | नाखु

येता जाता मिपावर (जातीवाचक)टोमणेही खातात !!!!

करणार काय ब्रीगेड काय फक्त मिपाबाहेरच आहे काय???

गरळी धाग्यांचा साक्षीदार नाखु

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2016 - 12:58 pm | श्रीगुरुजी

ब्राह्मण १९४८ सालीच शहाणे झाले. आता ते स्वतापुरते बघतात आणि मस्त रहातात. समाजाच्या उस्तवार्‍या करणे त्यांनी सोडुन दिले.

+ १

अस्वस्थामा's picture

17 Jan 2016 - 7:23 am | अस्वस्थामा

बंधो, परत एकदा आरक्षण! तेव्हा यावर बोलण्यासारखे खूप काही असले तरी आमचा हा एक धागा पहावास आणि त्यातल्या किमान विचारार्ह वाटलेल्या मुद्द्यांवर (वाटल्यास इथे किंवा तिथे) बोलावंस अथवा किमान विचार करावा.

बादवे, तिथे सुरुवातीसच एक वाक्य आहे,

असं वाटतं की बर्‍याचदा ही बाब भावनिक पद्धतीने मांडली जाते. म्हणजे असं की आरक्षणाचे हेतू तर नाकारता येत नाहीत, त्याचबरोबर त्या ध्येयाकडे जाताना थोडी दिशा भरकटलेली आहे हे ही तितकंच खरं आहे.

इथेही एक महत्त्वाचा मुद्दा पण भावनिक तर्‍हेने मांडला आहेस असे नमूद करतो.

उर्वरित चर्चेसाठी तोवर पॉपकॉर्न घेवून बसतोय. परत बोलूच. :)

उगा काहितरीच's picture

17 Jan 2016 - 10:01 am | उगा काहितरीच

लेखक वा संपादक मंडळाला विनंती आहे की , या लेखातील जातीवाचक उल्लेख वगळावा. जातीवाचक उल्लेख वगळूनही योग्य ती चर्चा करता येईल .

अन्नू's picture

17 Jan 2016 - 10:40 am | अन्नू

मी इथे कुठेही एका विशिष्ट जातीचा उल्लेख केलेला नाही. SC (शेड्युल कास्ट) मध्ये अनेक जाती समाविष्ट होतात. त्याचप्रमाणे ओपन मध्येही विविध कास्ट येतात.

सत्याचे प्रयोग's picture

17 Jan 2016 - 10:57 am | सत्याचे प्रयोग

संयतपणे मांडलेत मुद्दे. आरक्षणच्या नावाने बरे ऊलट सुलट बोलले जात आहे. पण सर्व जातीच बंद कराव्यात असे कोणी बोलताना नाही दिसत. जातीचे मुळ शाळेत बिंबवले जाते. शाळेच्या दाखल्यावर जात ऐवजी भारतीय असा ऊल्लेख केला तर???

ख चांगला आहे. समाजात वावरताना मला पण असे अनेक अनुभव आलेत. आणि सोशल मीडीयावर तर या विषयावर खुप काही बोलले जाते. आपण वरती जो प्रसंग संागीतला आहे त्यापेक्शा खालच्या शब्दात बोलले जाते

विटेकर's picture

19 Jan 2016 - 10:48 am | विटेकर

जात ही समाजातून घालवायला हवी आणि ती समाजाने !
प्रशासकीय सुधारणा करून जात जात नसते ! उलट आरक्षणामुळे जाती अधिक बळकट झाल्या , राजकारण्यांना आपली पोळी भाजून घेण्यासाठी एक आयता तापलेला तवा मिळाला, अन्यथा आरक्षणाने काहीही साध्य होत नाही हे कळायला तुम्ही आईनस्टाईन असायला हवे का ?

समाजातून आणि दैनंदीन व्यवहारातून जात हद्दपार करायची असेल तर शासनाच्या कुबड्या फेकून देऊन सामाजिक बदल घडवायला हवेत ! कायदा करून जात जात नाही त्यासाठी समाजाने मानसिकता बदलायला हवी, त्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात अनेक चळवळी झाल्या , त्याला मर्यादित यश देखील आले पण मंडल आयोगाने त्यावर पाणी फेरले, शिवाय यापैकी काही चळवळी तर मूलतः द्वेषमूलक होत्या, त्यातील सत्तेचे गणित स्पष्ट होते, त्यामुळे जातीद्वेष आणखी खोलवर नेला ! त्यावर राजकारण्यांनी केन्द्रिय सत्तांतर घडवून आणले ,पण जाती संस्थेचे बळी जागेवरच आहेत, नव्हे अधिक खोल जात आहेत !

सामाजिक बदल शासनाने घडवून होत नाहीत , त्यासाठी समाजाने आपला पुरुषार्थ जागृत करावा लागतो, अन्यथा कायद्याच्या बडग्याने केलेले बदल सत्तांतर झाले की पुन्हा जागेवर येऊ शकतात. आणि समाजाची मानसिकता बदलायची असेल तर जे सामाजिक अभिसरण व्हायला हवे, ते होण्यासाठी शासन तटस्थ असले तरी चालेल, पण किमान शासनाची विरोधी भूमिका नको !

मा.बाबासाहेबांनी खांद्यावर वाहून आणलेला दलित समाज आरक्षणाने कैक योजने मागे ढकलला गेला आहे ! थ्यान्क्स टू अवर लिडर !

आरक्षणाचे भूत उतरवल्याशिवाय जाती नष्ट होणार नाहीत !

अविनाश लोंढे.'s picture

19 Jan 2016 - 12:34 pm | अविनाश लोंढे.

आरक्षणाने काहीही साध्य होत नाही हे कळायला तुम्ही आईनस्टाईन असायला हवे का ?
- असं कसं काय ? काहीच्या काय ...म्हणजे आरक्षणान काहीच फरक पडला नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला ?

विटेकर's picture

20 Jan 2016 - 10:00 am | विटेकर

आरक्षणाने काय फरक पडणे अपेक्षित होते ?
मागास वर्गीय लोकांची सामाजिक पातळी उंचावणे ! ते घडले का ?
जातीय उतरंड नष्ट होणे अपेक्षित आहे , ते झाले का ?
काही मागासवर्गीय लोकांची अर्थिक उन्नती झाली पण त्यायोगे सर्व ज्ञाती बांधवांची उन्नती झाली असे म्हणता येईल का ?
आरक्षणाने जो थोडा-फार फायदा झाला त्यापेक्षा अधिक नुकसान झाले असे माझे स्पष्ट मत आहे !

म्हणूनच तर मी वर म्हटले आहे ना- आरक्षणाने आंबेडकरांनी नक्की काय साध्य केले? काहीच नाही. समाजाची विचारसरणी होती तीच राहीली.

अविनाश लोंढे.'s picture

23 Jan 2016 - 10:13 pm | अविनाश लोंढे.

मनूने केलेल्या 'आरक्षणामुळे' फरक पडला नाही असं कसं ? आरक्षण हे पहिल्यापासून होत ,आंबेडकरांनी ते फक्त Revise केलं ….

गामा पैलवान's picture

24 Jan 2016 - 1:21 am | गामा पैलवान

अविनाश लोंढे,

मनूने आरक्षणाची नेमकी काय तरतूद केली ते सांगणार का? श्लोकासकट बरंका.

आ.न.,
-गा.पै.

अन्नू's picture

20 Jan 2016 - 10:21 am | अन्नू

कायदा करून जात जात नाही त्यासाठी समाजाने मानसिकता बदलायला हवी

अगदी नेमकं बोललात विटेकरजी, नेमकं हेच मला सांगायचं होतं. जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कोणताही उपाय हा फोलच ठरणार आहे.

पंतश्री's picture

20 Jan 2016 - 7:12 pm | पंतश्री

समाजाने मानसिकता बदलायला हवी

हे अगदि खर आहे. पण जेव्हा आरक्षणाने उच्च जातितील योग्य माणसे मागे धकलुन आरक्षणा वाले पुढे जात असतील, तर
मानसिकता कशी बदलनार ??

आरक्षणाने उच्च जातितील योग्य माणसे मागे धकलुन आरक्षणा वाले पुढे जात असतील, तर
मानसिकता कशी बदलनार ??

मनात मूळ धरुन असलेल्या 'जातींच्या' मानसिकतेबद्दल मी म्हणत आहे, आरक्षणाबद्दलच्या नव्हे. त्या बदलल्याशिवाय जाती नष्ट होणार नाहीत.
आता- आरक्षणाने उच्च जातीतली माणसे मागे पडत आहेत असं जर तुंम्हाला वाटत असेल ; तर हे साफ चुकीचे आहे, कारण आरक्षणाचा फायदा घेणारे काही उच्च जातींचे लोकही माझ्या पाहण्यात आहेत, जे खोटे जातप्रमाणपत्र दाखवून सवलती घेत, उच्च पदावर गेले आहेत.
पण सापडला तो अपराधी, बाकी साधू अशातली ही गत झालेली आहे.
शिवाय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुंम्ही म्हणालात तसं-
"आरक्षणाने उच्च जातीतली योग्य माणसे मागे टाकून आरक्षणवाले पुढे जात आहेत!" हाच मुद्दा घेऊन लोक आरक्षणाचा विरोध करताना दिसतात, जरी बोलणार्‍याला आरक्षणवाल्यापेक्षा फक्त एका टक्क्याने जरी जास्त मार्क असले तरी तोही मग, 'आपणच योग्य होतो आणि हा आरक्षणवाला फुकटात पुढे गेला' असे बोलायला लागतो- आणि इथेच आरक्षणाबद्दल द्वेष वाढायला खरी सुरवात होते.

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 12:24 pm | प्रसाद१९७१

जरी बोलणार्‍याला आरक्षणवाल्यापेक्षा फक्त एका टक्क्याने जरी जास्त मार्क असले तरी तोही मग, 'आपणच योग्य होतो आणि हा आरक्षणवाला फुकटात पुढे गेला'

ठीक आहे. एक टक्क्या ची केस सोडुन देऊ. १० टक्यानी कमी असलेला पुढे गेला तर काय?
बरे १० टक्के पण सोडा, २० टक्क्यानी कमी असलेला प्रवेश घेउन गेला तर काय म्हणायचे?
असे काही करता येणार नाही का की ओपन चा प्रवेश ९५% ला बंद झाला तर राखीव प्रवेश ७५ टक्क्याच्या खाली मिळणार नाही.

तसेच पालकांनी राखीव जागेतुन नोकरी मिळवली असेल तर त्या पाल्याच्या घरची आर्थिक, शैक्षणीक परीस्थिती ही ओपन मधल्या मुलाच्या घरच्या परिस्थितीपेक्षा वाईट कशी असु शकते?

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 12:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

असे काही करता येणार नाही का की ओपन चा प्रवेश ९५% ला बंद झाला तर राखीव प्रवेश ७५ टक्क्याच्या खाली मिळणार नाही.

माझ्यामते हे CGPA पद्धतीमुळे अस्तित्वात आहे प्रसादभाऊ, हाईएस्ट कटऑफ मार्क्स मिळवणारा हा १००% कंसीडर होऊन (परफेक्ट सीजीपीए) बाकी कटऑफ त्याला बेसलाइन ठेऊन काढतात असे काहीसे असते न त्यात?? शिवाय जिथे ओपन चा कटऑफ उच्च असतो तिथे केटेगरीचा सुद्धा बराच वर जातो, उदाहरणार्थ, IIM-A किंवा DRDO वगैरे, रिजर्वेशन स्कीम लागु करून सुद्धा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी चांगले परफॉर्म करतातच न?

असे काही करता येणार नाही का की ओपन चा प्रवेश ९५% ला बंद झाला तर राखीव प्रवेश ७५ टक्क्याच्या खाली मिळणार नाही.

पुर्वीपेक्षा आत्ता टक्केवारीच्या क्रायटेरियात बरीच सुधारणा झाली आहे. कॉलेजेसही आपली डोकी वापरायला लागली आहेत. सरकारने अमुक एवढे टक्के "जागेचे" आरक्षण सांगितले आहे, त्यामुळे टॉपची कॉलेजेस तेवढ्या जागेसाठी आरक्षण ठेवतात- पण त्यांच्या टक्केवारी मात्र वाढवाताना दिसतात.

पालकांनी राखीव जागेतुन नोकरी मिळवली असेल तर त्या पाल्याच्या घरची आर्थिक, शैक्षणीक परीस्थिती ही ओपन मधल्या मुलाच्या घरच्या परिस्थितीपेक्षा वाईट कशी असु शकते?

नक्कीच नाही. म्हणूनच तर त्यांना फक्त जागांचे आरक्षण सरकार करुन देते. पण जर त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली असेल तर त्यांना मिळणार्‍या सुविधाही सरकार मर्यादित किंवा काही परिस्थितीत बंद करते. याबाबत रेशनिंग कार्डाबाबतचे उदाहरण आपल्या जवळचे आहे.

"आमच्या वेळी गरीब विद्यार्थ्यांना जर एखादी मदत आली आणि मदत घेणारे एकाच घरातले दोन विद्यार्थी असतील तर ती मदत फक्त एकासाठीच मिळत होती"

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 2:47 pm | प्रसाद१९७१

पण जर त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली असेल तर त्यांना मिळणार्‍या सुविधाही सरकार मर्यादित किंवा काही परिस्थितीत बंद करते. याबाबत रेशनिंग कार्डाबाबतचे उदाहरण आपल्या जवळचे आहे.

क्रीमी लेयर ची मर्यादा इतकी मोठी आहे की आर्थिक स्थिती सुधारलेली असुन सुद्धा सर्व सुबिधा मिळतात.

अविनाश लोंढे.'s picture

19 Jan 2016 - 12:29 pm | अविनाश लोंढे.

आरक्षणाचा मूळ उद्देश 'आर्थिक' तत्वावर नव्हताच मुळी , तो होता ' मानसिक गुलामगिरीतून ' मुक्तता !

१. आत्ता ही मानसिक गुलामगिरी काय ? तुमच्या लेखाप्रमाणे ' "कभी आओगे तो देखना हमारे गाँव- वहाँ बहोत चलता है ऐसा. मै तो मुँह पर बोलता हूँ उनके! आज भी इनको हमारे सामने बैठने कि परमिशन नहीं है- हिम्मतही नहीं होती इनको सामने बैठने कि...' ही आहे मानसीक गुलामगिरी …. त्यांना कुणासमोर बसायला ही परवानगी का घ्यावी लागत असेल ?
२. अजून एक दुसरा उदाहरण , का डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षण आर्थिक तत्वावर न करता सामाजिक तत्वावर केले ? - समजा ओपेन वर्गातील एक माणूस महिना ० रुपये कमवत असेल अन SC वर्गातील एक माणूस महिना ० रुपये कमवत असेल , तर त्यांच्या वागणुकीत ,त्यांचा समाजातील वावर अन आत्मविश्वासात प्रचंड तफावत आढळेल . कशामुळे ? ओपेन वाल्यांना एवढी ' घमेंड' का ? कारण 'मानसिक जखमा' शारीरिक जखमापेक्षा जास्त वेळ टिकतात . अन इथं तर SC वर शेकडो वर्षाचं मनावर ट्रेनिंग , तर मग एक दोन पिढीत कसा बंद होणार हे सगळा ? DNA नावाची ही गोष्ठ असते .
३.माझ्या ' वर्ण अन आज ' ह्या लेखात आरक्षणा चा तोडगा दिला आहे . अजून एक तोडगा आहे - जर कोणी ओपेन SC ला अभद्र बोलत असेल तर तर तिथेच त्या SC ने त्याला 'फोडायला' सुरुवात केली म्हणजे तो 'मानसिक गुलामगिरीतून ' मुक्त झाला अन त्याला आत्ता आरक्षणाची गरज नाही , अन जर का तो अजूनही ओपेन च्या समोर बसायला घाबरत असेल तर त्याला मात्र १०० % आरक्षणाची गरज आहे ….

... ही आहे मानसीक गुलामगिरी

नाही ही त्यांची मानसिक गुलामगिरी नव्हती, कारण तिथे तसं केल्यास त्यांचा पाणऊतारा केला जात होता, काही वेळा आक्रमक पवित्राही घेतला जात होता, त्यामुळे समाजाच्या भितीने ते तसं वागत होते.
आता तुंम्ही म्हणताय तसं १०० % आरक्षणाने हा प्रश्न सुटेल. पण तसं काहीच होणार नाही. कारण हे आरक्षण फक्त त्या वर्गाला उच्च वर्गाच्या बरोबरीने बसायला मदत करेल, ते उच्च वर्गाची विचारसरणी बदलणार नाही, उलट अशा आरक्षणाने ती आणखीनच तिखट होऊन जातीयतेचा प्रश्न आणखीन चिघळेल!

अविनाश लोंढे.'s picture

23 Jan 2016 - 10:07 pm | अविनाश लोंढे.

उच्च अन नीच वर्गांची मानसिकता बदलण्यासाठीच 'आरक्षणाची गरज' आहे

सुबोध खरे's picture

23 Jan 2016 - 11:04 pm | सुबोध खरे

क्रीमी लेयर सर्व आरक्षीत जागांना लावण्या बद्दल आपले काय मत आहे?

अविनाश लोंढे.'s picture

24 Jan 2016 - 12:43 am | अविनाश लोंढे.

माझ्या मते 'क्रिमी लेयर 'ना आरक्षणाची गरज नाही , पैसा आला की स्वाभिमान येतो (being practical )

क्रिमी लेयरची योग्य मर्यादा ठेऊन ते सर्वांनाच लागू करावे. माझी काहीही हरकत नाही. पण त्याने फक्त समाजातील आर्थिक घडी व्यवस्थित बसेल, पण मनातल्या जातींबद्दल काय? मुख्य प्रश्न तोच आहे. त्या मनात बसलेल्या जाती मेन म्हणजे जायला हव्यात, तरच असं विशिष्ट जातींना आरक्षण देण्याची भविष्यात गरज उरणार नाही.

गामा पैलवान's picture

19 Jan 2016 - 7:42 pm | गामा पैलवान

अन्नू,

तुमच्या लेखातलं हे गृहीतक साफ चुकीचं आहे :

>> कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी?

आंबेडकरांचा आरक्षणाला कडाडून विरोध होता. आरक्षण म्हणजे कुबड्या आहेत हे त्यांचं स्पष्ट मत होतं. घटनेत आरक्षणाची तरतूद त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध करावी लागली.

आ.न.,
-गा.पै.

घटनेत आरक्षणाची तरतूद त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध करावी लागली.

नाही- तसं काही नाही, उलट त्यांनी या वर्गासाठी वेगळ्या मतदारसंघाचीही मागणी केली होती, पण गांधींच्या उपोषणामुळे ती मागे घेण्यात आली.
शिवाय आरक्षण म्हणजे जो समाज धर्म-जातीच्या नावाने या वर्गाची हेटाळणी करत होता तो निदान कायद्यामुळे तरी यांना समान संधी देईल, असे आंबेडकरांना वाटत होते. पण प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही. या कायद्याने या वर्गाला संधी तर उपलब्ध करुन दिली पण समाजाची मानसिकता मात्र तो बदलवू शकला नाही.

अन्नू,

वेगळ्या मतदारसंघांची आणि वेगळ्या वसाहतींची मागणी १९२५ च्या आधीची होती. हा तोडगा फारसा परिणामकारक नाही हे उमगल्यावर त्यांनी मागणी बदलली. पुढे घटना लिहितांना (१९४७ ते १९५०) ते आरक्षणाच्या पार विरोधात होते. तरीही काँग्रेसच्या हट्टाखातर आरक्षणाची तरतूद करावी लागली. म्हणून ही तरतूद केवळ १० वर्षांसाठी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची होती. नंतर आयुष्याच्या अखेरपर्यंत म्हणजे १९५६ सालापर्यंत त्यांनी आरक्षणास विरोधच केला आहे.

अधिक माहितीकरिता :
१. http://www.merinews.com/article/ambedkar-opposed-reservation-for-depress...
२. http://www.ambedkar.org/Babasaheb/Neglected%20Message.htm

आ.न.,
-गा.पै.

पुढे घटना लिहितांना (१९४७ ते १९५०) ते आरक्षणाच्या पार विरोधात होते

आंबेडकरांच्या कोणत्याही लेखनात मला तसे कुठे लिहिल्याचे आढळले नाही, बाकी एका टेक्निकल शिक्षण देणार्‍या संस्थेत काही पदे रिझर्व्ह ठेवण्यासाठी तसेच रेल्वेच्या ठिकाणी नवशिकावू म्हणून डिप्रेस क्लासच्या मुलांना संधी द्यावी असे त्यांनी सांगितले होते.
त्याचप्रमाणे फक्त गांधींमुळेच त्यांनी आपल्या मागण्या मागे घेऊन पुणे करार केला होता.

(संदर्भः- डॉ. बाबासाहेब राईटींग अ‍ॅण्ड स्पीचेस- "व्हॉट काँग्रेस अ‍ॅण्ड गांधी डन टू द अनटचेबल्स")

-चूभूदेघे

अन्नू,

आरक्षणाचा प्रश्न स्वातंत्र्योत्तर काळात ऐरणीवर आला. त्यापैकी १९५० सालापर्यंत बाबासाहेब घटनेच्या कामात व्यग्र होते. नंतर सुमारे सातेक वर्षे जगले. त्या काळातलं लेखन बघायला पाहिजे. माझ्या मते ते लेखन उर्वरित संपदेच्या तुलनेने अत्यल्प असावं. अर्थात हा केवळ अंदाज आहे.

बाबासाहेबांना दहा वर्षांनी आरक्षणाच्या धोरणाचा फेरआढावा घ्यायला हवा होता, यात शंका नाही. मात्र तसा आढावा आजतागायत घेतला गेलेला नाही हे कटू सत्य आहे. तो घेतला जावा इतकंच माझं म्हणणं आहे. या अढाव्याच्या निमित्ताने का होईना बाबासाहेबांचे विचार समाजात परत एकदा ताजेपणाने खेळू लागतील.

आ.न.,
-गा.पै.

अन्नू's picture

26 Jan 2016 - 10:43 am | अन्नू

१९५० सालापर्यंत... त्या काळातलं लेखन बघायला पाहिजे.

अजुन तरी माझ्या वाचनात अलेलं नाही. पण तसं असेल आणि त्याबाबत काही पुरावे असतील, तर ते मी इथे नक्की शेअर करेन.

बाबासाहेबांना दहा वर्षांनी आरक्षणाच्या धोरणाचा फेरआढावा घ्यायला हवा होता, यात शंका नाही. मात्र तसा आढावा आजतागायत घेतला गेलेला नाही हे कटू सत्य आहे. तो घेतला जावा इतकंच माझं म्हणणं आहे. या अढाव्याच्या निमित्ताने का होईना बाबासाहेबांचे विचार समाजात परत एकदा ताजेपणाने खेळू लागतील.,

याच्याशी पुर्णपणे सहमत. तसेच यात थोडी भर घालतो-
या फेरआढाव्याबरोबरच जातिविषयक मानसिकतेचे सर्वेक्षण करुन ती समाजातून समूळ नष्ट करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात; जेणेकरुन भविष्यात जात-पंथ कालबाह्य होऊन जातीय आरक्षणाचा प्रश्नच उद्भवणार नाही.

(अवांतर- अवास्तव वाटेल पण- तसे सर्वेक्षण धर्म-जात-लिंग या सर्वच बाबतीत करुन, त्याचे कायमस्वरुपी उच्चाटन केले तर, कोणत्याच आरक्षणाची गरज उरणार नाही!)

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jan 2016 - 10:00 am | कैलासवासी सोन्याबापु

आरक्षण अजुनही गरजेचे आहे! खुप जास्त फ़क्त ते टार्गेटेड असावे अन ज्याला खरेच गरज आहे त्याच्या पर्यंत पोचावे असे वाटते, प्रॉब्लेम पॉलिसी नाही इम्प्लीमेंटेशन आहे , मुळात क्रीमी लेयर ला न देणे अन खरेच गरजू लोकांना देणे ही खरी गरज वाटते strictness in implementation is necessitated here in my humble opinion.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2016 - 1:05 pm | श्रीगुरुजी

दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द आंबेडकरांनी अनुभवल्याने त्यांनी घटनेत तरतुद करुन या घटकाला प्रत्येक क्षेत्रात मुद्दाम राखीव जागा करुन दिल्या- आणि त्याच आरक्षणाच्या आज आपण इतक्या प्रचंड विरोधात बोलत असतो!

पण आर्थिक घटकच आंबेडकरांना आरक्षणासाठी गृहीत धरायचा असता तर त्यांना जात हा मुद्दा घटनेत नमुद करण्याची गरजच काय होती?
याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.

एक वेळ तुंम्ही कष्ट करुन पैसा मिळवून शकता- श्रीमंत होऊ शकता, स्वतःची गरीबी दुर करु शकता- पण जात?
अहं- कितीही प्रयत्न करा, ती तुंम्हाला कधीच बदलता येत नाही!

पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिल्यास आंबेडकरांनी आरक्षणातून काय साध्य केलं असा प्रश्न पडतो.
कारण-
त्या विशिष्ट घटकाविषयी समाजाची मानसिकता आजही तिच आहे- पुर्वी होती तशीच!
बदल झाला तो ती उत्कट करण्याच्या पद्धतीत!
त्यांचा धर्म बदल झाला. जात मात्र प्रत्येक ठिकाणी जिवंतच राहीली....

बरोबर आहे. जातीवर आधारी राखीव जागा ठेवल्यामुळे जातीयवाद अजिबात कमी झाला नाही. एका अर्थाने राखीव जागांचे धोरण बहुतांशी अपयशी ठरले असेच दिसत आहे.

अर्थात राखीव जागा ठेवल्याचा सर्वात जास्त फायदा दलितांना न होता ब्राह्मणांना झाला. राखीव जागांमुळे सरकारी नोकरीत, शिक्षण क्षेत्रात, राजकारणात आपली संधी कमी झाली आहे हे वेळीच ओळखून ब्राह्मणांनी इतर खासगी क्षेत्रात शिरकाव केला व यश मिळविले. राखीव जागा नसत्या तर ब्राह्मण शेती सांभाळत पौरोहित्य करीत किंवा शाळांतून शिक्षकाची नोकरी करून किंवा फार तर सरकारी कचेरीत कारकुनाचे काम करीत राहिले असते व फार पुढे गेले नसते. हे बाबासाहेबांचेच उपकार मानले पाहिजेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jan 2016 - 1:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

संधी कमी झाल्या असे कोण बोलले हो गुरुजी?? :D :D

नाही कॉर्पोरेट मधे यशस्वी ब्राह्मणांचे कौतिक आहेच पण संधी वगैरे काहीही कमी झालेल्या नाहीत इतके किमान मी माझ्या स्वानुभवावरुन हमखास सांगू शकतो! मेहनत थोड़ी जास्त लागते पण त्याला संधी कमी होणे मी तरी म्हणणार नाही. तस्मात् कृपया संधी कमी झाल्यात वगैरे भ्रम पसरवु नका इतकी विनंती करतो,

जाता जाता

जरा एक नजर भारताच्या ब्यूरोक्रेसी वर घाला, उच्चपदस्थ लोक बहुतांशी ओपन केटेगरीचे आहेत/ होते म्हणूनच "सुप्रीम कोर्ट चे पहिले अनुसूचित जातीतून आलेले न्यायाधीश" ही न्यूज हैडलाइन होते. तेव्हा किमान माहीतीवर आधारीत मते देताना मनःपूर्वक मेहनत करून यंत्रणेचा भाग होऊ इच्छित असलेल्या तरुणांचा (मग ते ओपन असो वा केटेगरी) अधिक्षेप करणे टाळा इतकी विनंती करतो.

__/\__

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2016 - 11:06 pm | श्रीगुरुजी

नाही कॉर्पोरेट मधे यशस्वी ब्राह्मणांचे कौतिक आहेच पण संधी वगैरे काहीही कमी झालेल्या नाहीत इतके किमान मी माझ्या स्वानुभवावरुन हमखास सांगू शकतो!

राखीव जागांची संख्या वाढल्याने ज्यांना फक्त खुल्या जागेतूनच प्रवेश मिळू शकतो त्यांना आता कमी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे संधी निश्चितच कमी झाली आहे.

आता कमी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे संधी निश्चितच कमी झाली आहे.

घटनेत आरक्षण ९० टक्के तर दिलेले नाही, मग जागा आणि संधी कशा काय कमी होणार? त्यांच्या जागा या एका ठराविक मर्यादेपर्यंत केलेल्या आहेत इतकेच.
आता हेच तुंम्ही उलटे काऊंट करा- जवळजवळ ४०-४५% जागा या ओपनच्या निघतील. मग इथे संधी कशा कमी होतील?

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2016 - 1:11 pm | श्रीगुरुजी

घटनेत आरक्षण ९० टक्के तर दिलेले नाही, मग जागा आणि संधी कशा काय कमी होणार? त्यांच्या जागा या एका ठराविक मर्यादेपर्यंत केलेल्या आहेत इतकेच.
आता हेच तुंम्ही उलटे काऊंट करा- जवळजवळ ४०-४५% जागा या ओपनच्या निघतील. मग इथे संधी कशा कमी होतील?

९०% टक्के नसले तरी महाराष्ट्रात ते ५२% आहे. म्हणजे सवर्णांना १०० जागातील जास्तीत जास्त ४८ जागांवरच प्रवेश मिळू शकतो. आरक्षणाचा हक्क मिळालेल्यांना या ५२% टक्क्यांमधून प्रवेश आहेत, त्याबरोबरीने खुल्या असलेल्या ४८% मधून सुद्धा त्यांना गुणांच्या आधारावर प्रवेश मिळू शकतो. म्हणूनच सवर्णांना

जास्तीत जास्त

४८ जागा असे मी लिहिले.

इतर मागासवर्गियांवे उदाहरण घेऊ. त्यांच्यासाठी २७.५% टक्के जागा राखीव व त्यामुळे इतर कोणालाही त्या दाराने प्रवेश नाही. त्याव्यतिरिक्त उर्वरीत ४८% टक्क्यांच्या दारातूनही ते आत येऊ शकतात. म्हणजे १०० पैकी ७५.५% जागांवर त्यांना संधी आहे. मागासवर्गियांना हीच संधी ७०% जागांवर आहे. सवर्णांना मात्र ही संधी फक्त ४८% जागांवर आहे. त्यात मुलींसाठी ३०% राखीव आणि व्यवस्थापन कोटा २०% पाहिला तर सवर्ण मुलांना १०० पैकी जास्तीत जास्त २४ जागांवर प्रवेश मिळू शकतो.

अन्नू's picture

21 Jan 2016 - 1:21 pm | अन्नू

बर्‍याच वेळा, 'जागा भरल्या नाहीत' या कारणास्तव अनेक ठिकाणी रिझर्व कोटा, खुलाही केल्याचे चित्र दिसते. याचं खरं कारण एकच असतं- त्यांना हवी ती टक्केवारी रिझर्व कोट्यामध्ये मिळत नाही, पण सहसा हे कारण ते स्पष्ट बोलून दाखवत नाहीत.

संदीप डांगे's picture

20 Jan 2016 - 1:52 pm | संदीप डांगे

अर्थात राखीव जागा ठेवल्याचा सर्वात जास्त फायदा दलितांना न होता ब्राह्मणांना झाला. राखीव जागांमुळे सरकारी नोकरीत, शिक्षण क्षेत्रात, राजकारणात आपली संधी कमी झाली आहे हे वेळीच ओळखून ब्राह्मणांनी इतर खासगी क्षेत्रात शिरकाव केला व यश मिळविले. राखीव जागा नसत्या तर ब्राह्मण शेती सांभाळत पौरोहित्य करीत किंवा शाळांतून शिक्षकाची नोकरी करून किंवा फार तर सरकारी कचेरीत कारकुनाचे काम करीत राहिले असते व फार पुढे गेले नसते. हे बाबासाहेबांचेच उपकार मानले पाहिजेत.

४०-४५ टक्के आरक्षणामुळे तीन-साडेतीन टक्के ब्राह्मणांची संधी कमी झाली, हे कसे? म्हणजे उरलेले ५० टक्केही ब्राह्मणांना अपुरे पडते असे समजावे काय? तसेच खाजगी क्षेत्रात ब्राह्मणेतरांनी काहीच कर्तृत्व गाजवले नाही असे काही म्हणायचे आहे काय? सरकारी कुबड्या मिळाल्या तरच ब्राह्मणेतर प्रगती करू शकतात अन्यथा त्यांच्यात गुणवत्ता नाही असे काही तुम्हाला म्हणायचे आहे का?

तुमच्या दोन वाक्यात परत विसंगती आहेच. राखीव जागा नसत्या तर ब्राह्मण शेती, पौरोहित्य, शिक्षकी, कारकुनी हेच करत राहिले असते व पुढे गेले नसते. म्हणजे शेती, पौरोहित्य यात आरक्षणाने काय घोडे मारले ते समजले नाहीच. परत शिक्षकी, कारकुनी यातच ब्राह्मणांना खरंच राहायचे होते काय हाही प्रश्न झाला त्यासोबत आरक्षणाने त्यांच्या संधींवर काय परिणाम झाला तेही कळले नाही.

गुरुजी, तुम्ही आरक्षित जागांवर शिक्षण घेणार्‍यांबद्दल आकस ठेवून सदर प्रतिसाद लिहित आहात हे दिसते आहेच. पण कुणाचा नैसर्गिक हक्क डावलून आरक्षित-जागावाले शिक्षण घेत नाहीत हेही लक्षात घ्यावे. बहुजन-दलितांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे ब्राह्मणी वर्चस्व संपुष्टात आले व खालची लोकं (लायकी नसतांना) आज डोक्यावर अधिकारी म्हणून बसलीत याचे वैषम्य तुम्हाला वाटते हे तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट जाणवते.

ब्राह्मणांनी आमच्यावर अन्याय केला अशी रडारड दलित-बहुजन नेहमीच करत आले आहेत. आता ब्राह्मणांनी रडारड सुरु केली असे दिसते. 'आरक्षणामुळे मला संधी मिळाली नाही' असे म्हणणारा सवर्ण स्वतःच्या कमकुवतपणाचे खापर बाह्यव्यवस्थेवर फोडतो, हे चमत्कारिक आहे. दलितांना अशी रडारड करण्यासाठी समर्थ पार्श्वभूमी असली तरी ब्राह्मणांना नाही हे लक्षात आणून देऊ इच्छितो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jan 2016 - 2:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

+१

चैतन्य ईन्या's picture

20 Jan 2016 - 4:06 pm | चैतन्य ईन्या

संधी कमी होणे ह्याला कारणीभूत लोक्संख्याच्या प्रमाणत नसणाऱ्या चांगल्या शाळा आणि कॉलेजेस. हि गोष्ट लोकांना का पटत नाही हेच कळत नाहीये. झालय काय कि आहेत लाखो मुले आणि फारतर हजारभर चांगल्या जागा उपलब्ध. १-२ चांगली कॉलेजेस सोडली तर बाकीची म्हणजे नाव घेण्याच्या लायकीची नाहीत. मग सगळ्यांची खाली बसा असला सगळा कारभार चालू आहे. ह्याचे परिणाम पुढील काही वर्षात दिसू लागतील. राखीव जागा आवश्यकच होत्या पण कुठपर्यंत ह्याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. पार वरपर्यंत जेंव्हा राखीव जागा होतात तेंव्हा कुठेतरी चुकते आहे हे कळले पाहिजेल. जेंव्हा सहज जागा उपलब्ध होतील तेंव्हा हा प्रश्न आपसूक सुटेल पण आता त्याची जागा खाजगी संस्थांनी घेतली आहे आणि त्याच्या फिया आणि मिळणारे शिक्षण ह्याचे व्यस्त प्रमाण आहे. सगळे प्रश्न फक्त राखीव जागांनी सुटतील असे काहीसे चित्र तयार झाले आहे. ह्यातून फक्त जाती घट्ट होता आहेत आणि बाकी काही नाही.

संदीप डांगे's picture

20 Jan 2016 - 8:22 pm | संदीप डांगे

लोकसंख्येच्या प्रमाणात चांगली कॉलेजेस नाहीत यात राखीव जागावाल्यांचा नक्की कसा दोष? राखीव जागांचा उपयुक्तपणा समजलेला नसल्याने असे लॉजिक फार पुढे केले जाते आहे. तरी जास्त चांगली कॉलेजेस काढण्याची मागणी करणारी चळवळ संधी डावलल्या गेलेल्यांनी आतापावेतो काही सुरु केलेली दिसत नाही. म्हणजेच खरे कारण ते आहे असे वाटत तर नाही.

चैतन्य ईन्या's picture

20 Jan 2016 - 8:34 pm | चैतन्य ईन्या

हे थोडं पेडगाव ट्रीप झाली. सरळ सरळ जागा कमीच होतात ना? मुले वाढणार पण जागा न वाढणे ह्याला कुठल्या अर्थाने तुम्ही कारण नाही म्हणत आहात? सुरवातीला विरोध हा जातीवरून होताच ते कोणीही नाकारत नाहीये. पण मला असलेले मार्क आणि मिळू शकणारे कॉलेज ह्याचे प्रमाण व्यस्त आहे. आता हेच मान्य नसेल तर मग बोलणेच खुंटले. जिथे जागा सहज उपलब्ध होतात तिकडे हा प्रश्न येणार नाही. पण मुदलात ते न करता फक्त एकाच गोष्ट करतोय हे सरकारी कारभार्यांच्या लक्षात येत नाही आणि तुमच्या सारख्या विचारी लोकांच्या पण लक्षात येवू नये?

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jan 2016 - 8:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

चैतन्य साहेब,

नेमक्या कुठल्या सीट्स कमी पडल्या म्हणे? कारण महाराष्ट्रभरात मागच्यावर्षीच्या एडमिशन मधे ६०,००० सीट्स फ़क्त इंजीनियरिंगच्या रिकाम्या राहिल्या होत्या, त्याचा हा दुवा आहे, माझ्या माहीती प्रमाणे मेडिकल सीईटी मधे कटऑफ़ अजुन एज वर असतो

हे झाले महाराष्ट्राची अन इथल्या मेधावी मुलांच्या इतिकर्तव्यतेबद्दल कारण आयुष्य म्हणजे इंजीनियरिंग अन मेडिकल हे महाराष्ट्रातले फिक्स equation आहे, ते एक असो

बाकी, बीए बीकॉम बीएशश्शी वगैरे शिकवणारी अन आम्हाला "सुशिक्षित" असा शिक्का देणारी कॉलेज तर पैश्याला पासरी आहेत त्यांच्यात सीट्स कमी पडतील का हा प्रश्न अप्रस्तुत आहे कारण आजकाल तालुक्याला टिनशेड मधे का होइना आमचे एखाद बापुड़वाणे "कला वाणिज्य विज्ञान,महाविद्यालय" सापड़तेच सापड़ते!!

कट थ्रोट कम्पटीशन असलेल्या कॉलेज मधे ओपनची पोरे अजिबात नसतात असे काही नाही न?

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2016 - 11:17 pm | श्रीगुरुजी

नेमक्या कुठल्या सीट्स कमी पडल्या म्हणे? कारण महाराष्ट्रभरात मागच्यावर्षीच्या एडमिशन मधे ६०,००० सीट्स फ़क्त इंजीनियरिंगच्या रिकाम्या राहिल्या होत्या, त्याचा हा दुवा आहे,

या ६०,००० रिकाम्या जागातील किती जागा चांगल्या समजल्या जाणार्‍या महाविद्यालयातील होत्या याचा विदा आहे का? पुण्याचाच विचार केला तर सीओईपी, एमआयटी, पीआयसीटी यासारख्या महाविद्यालयातील किती जागा रिकाम्या होत्या व ससेवाडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, ग्यानबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय अशासारख्या महाविद्यालयातील किती जागा रिकाम्या होत्या?

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 12:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

नुसते महाविद्यालय उत्तम असुन भागते का गुरूजी? आमच्या मित्रमंडळात ओपन केटेगरीचा असुन सीओईपी मधे शिकुन (मैकेनिकल इंजीनियरिंग विथ डिस्टिंक्शन) सुद्धा स्टेट बँक ऑफ़ इंडिया मधे क्लेरिकल कैडर मधे काम करणारा मित्र सुद्धा आहे अन कोपरगावच्या इंजीनियरिंग कॉलेज मधुन जेमतेम फर्स्टक्लास घेऊन नंतर नेटाने जीआरई देऊन अमेरिकेत आज स्वतःची स्टार्टअप असणारा एक दलित मित्र सुद्धा आहे, त्या दलित मित्राने हल्लीच आमच्या गावातल्या बीएससी कॉलेज सोबत टाईअप करून ५० पोरांना कस्टमर सपोर्ट प्रोसेस मधे खुद्द नागपुरात नोकरी दिली आहे अन आता स्टार्टअप इंडिया चा सुद्धा लाभ घ्यायचा म्हणतो आहे इकडे expansion करायला,

मग त्या सिओईपी वाल्या मित्राने सुद्धा एक मैकेनिकल ची सीट बर्बाद केली असे आता तुम्ही म्हणाल की तो फ़क्त ओपन होता म्हणून बिचार्याला क्लर्कची नोकरी करावी लागते आहे असे म्हणाल? शिवाय आहे ती सिस्टम अशी आहे त्यातही टफ फाइट देऊन सीईटी किंवा जेईई अन एआयईईई टॉप करून तुम्ही म्हणता तश्या टॉप कॉलेज ला जाणारी ओपन मुले सुद्धा आहेत, माझ्यामते संधी म्हणजे प्रवेश मिळणे होय इंजीनियरिंगला मग ते चांगले प्रोफेसर असणारे एखादे तालुक्याचे इंजीनियरिंग कॉलेज का असना, त्या संधीचे सोने करणे हे विद्यार्थ्याच्या हातात आहे असे प्रमाणिकपणे वाटते, ती संधी नाकारायचा किंवा कमी व्हायचा प्रश्नच नाही कारण ६०,००० सीट्स बद्दल मी आधीच स्पष्ट बोललोय , पुढे तुमची मर्जी :)

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 12:33 pm | प्रसाद१९७१

बाप्पु - तुमची उदाहरणे ही अपवाद आहेत. त्यातुन काही सिद्ध होत नाही. ओपन मधला सीओइपीत ले बरेच लोक नंतर बँकात कारकुनी करतात आणि कोपरगावातुन पास होऊन बरेच लोक स्वताची कंपनी काढतात असा काही डाटा असला तर ठीक आहे.

ह्या अश्या आउटलायर डाटा-पॉइंट वरुन काहीच सिद्ध होत नाही. अशी उदाहरणे प्रत्येक क्शेत्रात असतात.

आत्त्ता निवृत्त झालेले सरन्यायाधिश कापडीया म्हणे थोडे दिवस शिपायाचे ( कदाचित न्यायालयातच ) काम करत होते म्हणुन सर्व च शिपायांची बुद्धी, क्षमता , लायकी सरन्यायाधीश होण्याची असते का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 1:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

अपवाद उदाहरण होऊ शकत नाही हे मान्य पण अपवाद उदाहरण सिद्ध करायला वापरले जाऊ शकते न?

शिवाय,

संधीचे सोने करणे हे विद्यार्थ्याच्या हातात आहे असे प्रमाणिकपणे वाटते,

हा सुद्धा आपणाला अपवाद वाटतोय का? असल्यास माझे स्वतःचे अन माझ्या बॅचमेट्सचे उदाहरण मी देऊ शकतो

चैतन्य ईन्या's picture

21 Jan 2016 - 3:49 pm | चैतन्य ईन्या

बापु आणि डांगे, तुम्ही मुद्दाम साहेब म्हणालात तेंव्हा त्यात असलेला हेटाळणीचा सूर मी बाजूला सारतो. तुम्हाला पेडगाव पसंत आहे. असू द्यात. तुम्ही दिलेली उदाहरणे हे म्हणजे लोक बफे आणि बिल गेट्सची उदाहरणे देतात तसे आहेत. मुळातच एक उपजत बुद्धी असते आणि त्याच्या जोरावर लोक काय वाटेल ते करतात. तो खूप वेगळा भाग आहे. तेंव्हा त्याचा वापर करून मूळ मुद्दा बाजूला सरू नका. खरा प्रश्न चांगले शिक्षण देण्याचा आहे. आधीच हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या क्वालिटी शाळा कोलेजस आहेत. तिथे जागा मिळवण्यासाठी सगळ्यांच समान संधी असली पाहिजेल. पण जेंव्हा तारतम्य सोडून होतंय तेंव्हा समोरचा बोलातोय त्याचा गाभा समजून घ्या.

माझे म्हणणे आहे कि सगळ्यांचा चांगले शिक्षण मिळेल ह्याची सोय काय? तुम्ही दोघे जण उगाचच ब्राह्मणांवर घसरतंय. तुमचा राग असेल ठीक आहे पण निदान विचार करून बोलावे. पण तुम्हाला हवे असेल तर घ्या जागा वाढवून करा आंदोलने वगैर हे काही चांगले लक्षण नाही. सध्याच्या विचित्र धोरणाने दरी अजून वाढत चालली आहे. उलट अजून अजून फुट पडते आहे. प्रत्येक जण आता माझी जात तुझी जाता करतो आहे. असो तुमचा सगळा रोख आमच्या वर अन्याय झाला आता आह्मी तुम्हाला सोडत नाही. जास्त बोलायचे नाही असाच आहे.

भारती आणि डी वाय ह्यांची लायकी काय आहे हे एकदा बघाच. शासकीय कोलेजस मध्ये पूर्वी मिळणारे आणि आत्ता मिळणारे शिक्षण ह्याच्यात फरक आहे. जागा ६०,००० काय १ लाख असून देत पण जर का फार तर १०,००० जागाच ठीक असतील तर कोणत्या अर्थाने तुम्ही म्हणताय आणि मी कोणत्या अर्थाने म्हणतोय ह्याचा विचार करा. झोपलेल्या जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्या नाही. जाता जाता ते इंजिनियरिंग आणि मेडिकल सोडून ह्या. बाकीच्याची काय अवस्था आहे? ते काय उत्तम शिक्षण देतात का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 4:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

बापु आणि डांगे, तुम्ही मुद्दाम साहेब म्हणालात तेंव्हा त्यात असलेला हेटाळणीचा सूर मी बाजूला सारतो.

मी माझ्यापुरते बोलतो चैतन्य साहेब,

कदाचित तुम्हाला माझ्या प्रतिसादांची सवय किंवा माहीती नसावी, मी नेहमीच प्रत्येकाला आदरार्थी संबोधन वापरतो, त्यात हेटाळणी नाही, कोणाचीही हेटाळणी करणे हे माझ्या शिस्तीत अन स्वभावात बसत नाही अन रुचतही नाही, तेव्हा कृपया वाकडे अर्थ काढू नये ही विनंती, आता तुमचा स्वभावच तिरसट असल्यास तो तुमचा प्रश्न असेल माझा नाही,

दूसरे म्हणजे माझा ब्राह्मण समाजावर राग असायचे काही एक कारण नाही कारण की मी स्वतः एक ब्राह्मण आहे,ज्याची मला लाजही नाही अन माजही नाही. उलटपक्षी दरवेळी पेड़गाव पेड़गाव म्हणत आपण चक्क एडहोमिनिस्टिक प्रतिसाद देत आहात!

मी काय बोलतो करतो हे आपण मिपावर कोणालाही विचारून घ्या फक्त एकच विनंती करतो एडहोमिनिस्टिक होऊ नका! हे संवाद इतके मनावर घ्यायचे नसतात

त्या ऊपर जर तुमचा स्वभावच तिरसट असेल तर हा आमचा तुम्हांस शेवटचा प्रतिसाद समजा!

जयहिंद

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 4:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

एक ता.क.

तुम्ही दोघे जण उगाचच ब्राह्मणांवर घसरतंय.

परत एकदा,

डांगे साहेब त्यांचे सांगतील (त्यांना गरज वाटल्यास) पण मी ब्राह्मण समाजावर घसरलोय हा शुद्ध आरोप आहे ज्याच्यात तथ्य नाही, तुम्ही कुठलाही प्रतिसाद वाचुन घ्या त्यात मी "ओपन" असा उल्लेख केलाय ओपन मधे ब्राह्मण सोडुन इतरही जाती असतात हे कदाचित आपणांस नीट ठाऊक असेलच.

तरीही कृपया बेसलेस आरोप करू नये हे बरे पडेल!

चैतन्य ईन्या's picture

21 Jan 2016 - 8:52 pm | चैतन्य ईन्या

तुम्ही तुमचा किल्ला सोडणार नाही आणि मी म्हणतोये ते मला सोडता येणार नाही. बाकी प्रतिसादात तुम्ही साहेब म्हणाला नहीत आणि इथे म्हणताय. हे तुम्हालाच जाणवत असेल तर बघा. सभ्य भाषा आहे तुमची आणि मी हि तुम्हाला कुठेही वाकडे बोललो नाहीये. पण हा साहेब असा शब्द आहे ते मान्य करणे थोडे अवघड जात असेल तर ठीक आहे. मी मुद्दामच पेडगाव म्हणतोये कारण तुम्ही चांगल्या शाळा/कोलेजसचा विषय सोडून बाकीचे म्हणताय. त्यावर एकमत होताना दिसत नाहीये. मी असे म्हणालो नाहीये कि राखीव जागा बंद करा. तुम्ही म्हणताय तेच मी वेगळ्या भाषेत/शब्दात म्हणतोये कि इम्पलीमेंट करताना चुकतय. ते काय करताना राहतंय ते संगतोये तर बाकीचे विषय येत आहेत.

ब्राह्मण सोडुन इतरही जाती असतात हे कदाचित आपणांस नीट ठाऊक असेलच.>> त्या जातींनी आता स्वतःसाठी राखीव जागा मागितल्या आहेत. भारतात त्याच जाती सत्तेवर आहेत आणि त्या पूर्वीपासूनच सत्तेवर होत्या. त्यांना पण झळ पोहोचते आहे. म्हणूनच म्हटले तारतम्य सुटले आहे आणि सगळे आता रेस टू बोट्म ह्याकडे धावताना दिसत आहेत. लेट्स आग्री टू दीसआग्री. कारण आपण काय भांडून मिळवणार.

मृत्युन्जय's picture

1 Feb 2016 - 3:24 pm | मृत्युन्जय

मुद्दा मांडलाच आहे तर सांगतो. १९९८ साली बी एम सी सी, पुणे मध्ये ओपन कॅटेगरी मध्ये ८०% + मिळुनही मला अ‍ॅडमिशन मिळु शकत नव्हती. त्याचवेळेस ओबीसी कोट्यात ६०% ला आणि एससी / एसटी ला ४०% ला अ‍ॅडमिशन मिळत होती. ऐनवेळेस काही अ‍ॅडमिशन्स कॅन्सल झाल्यामुळे शेवटची अ‍ॅडमिशन मला मिळाली होती. प्रश्न या तफावतीचा आहे. अ‍ॅडमिशन काय कुठेतरी मिळालीच असती पण करीयर घडण्यासाठी जे पोषक वातावरण बी एम मध्ये होते ते इतरत्र असलेच असते असे नाही.

असो. जातिनिहाय आरक्षणाचा मुद्दा तरीही मान्य करता येइल पण जातिनिहाय आरक्षण देताना एका ठराविक रेषेपेक्षा ज्यांची आर्थिक स्थिती वर आहे त्यांना यापुढे कायमचे वगळावे असे वाटते. यापुढच्या त्या लोकांच्या पिढ्या जर स्वतःची उन्नती करुन घेउ शकत नसतील तर त्याची शिक्षा ओपन कॅटेगरीला नको.

संदीप डांगे's picture

20 Jan 2016 - 10:22 pm | संदीप डांगे

मला असलेले मार्क आणि मिळू शकणारे कॉलेज ह्याचे प्रमाण व्यस्त आहे.

एवढाच प्रश्न असेल तर त्याचा राखिव जागेशी काहीही संबंध नाही. कारण हेच प्रश्न राखिव जागेवाल्या मुलांनाही भेडसावतात.

बाकी बापुसाहेबांनी उत्तर दिलंय..

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 11:00 am | प्रसाद१९७१

डांगे साहेब - ब्राम्हणांनी ( किंवा कोणीही )जरी सरकारची काडीची मदत किंवा अनुदान वगैरे घेऊन कॉलेज काढायचे ठरवले आणि त्यात फक्त मेरीट वर प्रवेश द्यायचा असे ठरवले तर हे सरकार परवानगी देत नाही, बेकायदेशीर ठरवते असले कॉलेज.

मग दर्जेदार शिक्षण देणार्‍या जागा कश्या वाढणार? एकुणच ह्या देशातल धोरण मुबलक पण टाकाऊ अशी निर्मीती करण्याचे आहे.

चैतन्य ईन्या's picture

21 Jan 2016 - 3:55 pm | चैतन्य ईन्या

उलट आहे. आता ब्राम्हणांनी कुठेही येवू नये अशी सुप्त इच्छा आहे. इन फ्यकट बाहेर घालवले तर उत्तम असाच रोख आहे. जरा शहरात असलेले नवीन लागलेले शिक्षक ह्यांची भाषा आणि विचार तपासावेत. हा माझा हक्क आहे. इथे मी पैसे घ्यायला येतो असा नूर आहे. अजूनही गावात शिक्षण प्रामाणिक पणे शिकवत आहेत कारण मुळातच असलेली पुढे जायची इच्छा. पण हेच शहरात आले कि चित्र बदलतंय. पण प्रामाणिकपणे मान्य करण्याची इच्छा नाहीये. माझे असे स्पष्ट मत आहे कि काही क्षेत्रातून आता राखीव जागा कमीच कराव्यात. शिक्षक किंवा मुख्याध्यापक वगैरे पदांसाठी हे कमीच करावे. ह्याच मुळे मराठी शाळांचे नुकसान झालेले आहे आणि इंग्रजीचे स्तोम जास्त माजले आहे.

sagarpdy's picture

20 Jan 2016 - 5:15 pm | sagarpdy

+1

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2016 - 11:12 pm | श्रीगुरुजी

४०-४५ टक्के आरक्षणामुळे तीन-साडेतीन टक्के ब्राह्मणांची संधी कमी झाली, हे कसे? म्हणजे उरलेले ५० टक्केही ब्राह्मणांना अपुरे पडते असे समजावे काय?

हे लॉजिक चुकीचे आहे. ब्राह्मणांची संख्या तीन-साडेतीन टक्के आहे म्हणजे त्याच प्रमाणात त्यांनी प्रत्येक क्षेत्रात येणे अपेक्षित आहे का? उदाहरणार्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात १००० जागा असतील तर संख्येच्या प्रमाणात फक्त ३०-३५ ब्राह्मण विद्यार्थ्यांनीच तिथे प्रवेश घ्यावा व इतरांनी दुसरीकडे जावे अशी अपेक्षा आहे का?

संदीप डांगे's picture

20 Jan 2016 - 11:33 pm | संदीप डांगे

अशी अपेक्षा कशाला हवी? संधी कमी झालेल्यांची तक्रार आहे म्हणून तो दाखला दिला.

मुद्दा जागांचा आहे की संधींचा तेवढं आधी क्लियर करा मग पुढे बोलू.

उदा: महाराष्ट्रात १ लाख कॉलेजं आहेत. प्रवेशोत्सुक १० लाख विद्यार्थी आहेत. या १ लाख कॉलेजपैकी फक्त पन्नास कॉलेज उत्तम आहेत. आता ही दहा लाख मुले ह्या पन्नास कॉलेजातल्याच जागांसाठी झुंजणार. साहजिक आहे त्यातली जी टॉप रँकिगची मुले आहेत तीच प्रवेश मिळवू शकणार. यात राखीव-खुले दोन्ही आलेत. टॉपच्या कॉलेजमधे राखीवमध्ये अगदी कुणी पस्तीस टक्क्यावाला घेतला जात नसेल. मग रडारड कशासाठी? इथे सरळ मेरीटची झुंज आहे. चांगली कॉलेजेस कमी असणे हे संधीच्या आड येणारे सत्य आहे. राखीव जागा नव्हे. त्यामुळे साप सोडून भुइला धोपाटणे गैर आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2016 - 11:38 pm | श्रीगुरुजी

या १ लाख कॉलेजपैकी फक्त पन्नास कॉलेज उत्तम आहेत. आता ही दहा लाख मुले ह्या पन्नास कॉलेजातल्याच जागांसाठी झुंजणार. साहजिक आहे त्यातली जी टॉप रँकिगची मुले आहेत तीच प्रवेश मिळवू शकणार. यात राखीव-खुले दोन्ही आलेत. टॉपच्या कॉलेजमधे राखीवमध्ये अगदी कुणी पस्तीस टक्क्यावाला घेतला जात नसेल. मग रडारड कशासाठी?

याच टॉप ५० महाविद्यालयात खुल्या वर्गातून येणार्‍या विद्यार्थ्यांच्या जागा कमी केल्या या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची त्यांची संधी आपोआपच कमी होणार ना?

संदीप डांगे's picture

21 Jan 2016 - 12:30 am | संदीप डांगे

जागांचाच प्रश्न आहे ना? मग वाढवून घ्या. हाय काय नाय काय.

आता १०० जागा आहेत. ५० राखीव आहेत. ५० खुल्या. तुम्ही आंदोलन करून ह्या २०० करून घ्या, १०० राखीव १०० खुल्या. मग तर कुणाच्या संधी कमी होणार नाहीत ना?

तुम्हाला सुरुवातपासून सांगतोय मुद्दा चांगली कॉलेजे कमी असण्याचा आहे त्याचे खापर उगाच आरक्षणावर फोडू नका. ते आरक्षण काही कारणाने दिले आहे. कुणा शेड्युल्ड ट्राइबला दोन जागा दिल्याने दोन ब्राहमणांच्या संधींवर गदा येत असेल तर असु देत. शेकडो वर्षे वारसा हक्काने मोक्याच्या जागा पकडून बसतांना गुणवत्तेचे निकष लावायला जमले नसेल त्याचे पांग आता फेडायची संधी आहे.

हे सर्व नको असेल तर तुमच्या लाडक्या संघाला जरा हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवून जाती मोडायचा धंदा हाती घ्या म्हणावं. लोकांची घरवापसी करण्याआधी आपल्यातले जातीभेद मिटवण्याचा काही ठोस कार्यक्रम राबवा. तेवढं केलं तर सगळंच नीट होऊन जाईल, ते हिंदुत्वाचंही. बघा जमतंय का? रडारडसे कुच्च नै होनेवाला..

विटेकर's picture

21 Jan 2016 - 12:32 pm | विटेकर

हे सर्व नको असेल तर तुमच्या लाडक्या संघाला जरा हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवून जाती मोडायचा धंदा हाती घ्या म्हणावं. लोकांची घरवापसी करण्याआधी आपल्यातले जातीभेद मिटवण्याचा काही ठोस कार्यक्रम राबवा. तेवढं केलं तर सगळंच नीट होऊन जाईल, ते हिंदुत्वाचंही. बघा जमतंय का? रडारडसे कुच्च नै होनेवाला..

संदिपसाहेब , काय कारण आहे का संघाला मध्ये घ्यायची ? का उगाच खोडी काढायची ? उचलली जीभ लावली टाळयाला !
तुम्ही कधी गेलाय का संघात ? कधी बघितले आहे का तिथे जातीयवाद आहे की नाही ? कशाच्या आधारावर हे तुम्ही विधान केले ?आणि जातीभेद मिटवण्याचा कार्यक्रम संघात आहे की नाही याची तुम्ही काय खात्री केली आहे ?

मा. संपादक महाशय,
काही सदस्याना खोडसाळपणे संघाला मध्ये घेण्याची वाईट सवय आहे, याचा मी एक सामान्य सदस्य म्हणून तीव्र निषेध करतो. कृपया अशा खोडसाळ सदस्यांना मिपापासून दूर करावे तेच आपल्या सार्‍यांच्या हिताचे आहे!
आपण योग्य ती कारवाई करावी अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 12:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

मा. संपादक महाशय,
काही सदस्याना खोडसाळपणे संघाला मध्ये घेण्याची वाईट सवय आहे, याचा मी एक सामान्य सदस्य म्हणून तीव्र निषेध करतो. कृपया अशा खोडसाळ सदस्यांना मिपापासून दूर करावे तेच आपल्या सार्‍यांच्या हिताचे आहे!
आपण योग्य ती कारवाई करावी अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे.

अशीच काही लोकांना उठसुठ काँग्रेस मधे आणायची (साधक बाधक दोन्ही) सवय आहे! त्यांना पण काढायला सांगायचे काय?? :P

अन म्हणे देशात असहिष्णुता नाही अजिबात! मताचे मटाने खंडन करा की राव, इतके बोलूनही तुम्ही संघ जात्युच्छेदन करायला नेमके काय करतोय ही माहीती तुम्ही शेवटी नाहीच दिली विटेकर साहेब, संघाच्या साधक कार्याबद्दल मला नितांत आदर आहे, पण जर एखाद्याला काही शंका असली तर ती दूर करायचा प्रयत्न न करता फ़क्त एक तुच्छ कटाक्ष टाकून "असं नसतं ते तुला नाही कळणार" म्हणायची रीत फार आधीपासुन संघाच्या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या कार्यकर्त्यांस आहे जे माझ्यामते खुद्द गुरूजी किंवा डॉक्टरांना सुद्धा पटले नसते!

एकेकाळी मी बालशाखेत स्वतः गेलो होतो महिनाभर फ़क्त वयानुसार असावे त्यापेक्षा जास्त वाचन असल्यामुळे उद्भवलेले प्रश्न विचारल्यावर "सांगितले तितके कर प्रश्न विचारू नको" असे उत्तर मिळणे हा माझा स्वानुभव आहे. अर्थात संघाने काही माझी एस्टेट लुटलेली नाही का माझा संघाशी उभा दावा ही नाही फ़क्त "आम्हीच काय ते देशभक्त उरलेले कचरापट्टी" ही वृत्ती डोक्यात जाते,

नथिंग पर्सनल, जे जाणवले अन अनुभवले ते मांडले

___/\___

विटेकर's picture

21 Jan 2016 - 12:55 pm | विटेकर

अशीच काही लोकांना उठसुठ काँग्रेस मधे आणायची (साधक बाधक दोन्ही) सवय आहे! त्यांना पण काढायला सांगायचे काय?? :P

त्यांनाही बाहेर जायला जरुर सांगावे.

जर एखाद्याला काही शंका असली तर ती दूर करायचा प्रयत्न न करता फ़क्त एक तुच्छ कटाक्ष टाकून "असं नसतं ते तुला नाही कळणार" म्हणायची रीत फार आधीपासुन संघाच्या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या कार्यकर्त्यांस आहे

गुळाची गोडी सांगून कळत नाही , त्यासाठी कितीही शब्दवर्णन केले तरी ते अपुरे आहे , त्याची गोडी चाखल्याशिवाय कळ्त नाही! तुमची खर् चं वेळ द्यायची तयारी असेल आणि पूर्वानुभव टाळून नव्याने जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपण जरुर भेटु या . तुम्हालाच काय सर्वांना ओपन इन्विटेशन आहे! उद्यापासून शाखेत या आणि जाति विच्छेदाचा अनुभव घ्या ! संघाचे काम सर्वेषां अविरोधेषु आहे !
माझा दूरध्वनी क्रमांक तुम्हाला व्य नि करत आहे , नककी भेटु या आणि बोलु या !

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 9:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

ही बघा एक न्यूज़

ते गुळ गोडी गोडवा वगैरे ऱ्हेटॉरीक वगैरे ठीक आहे सगळे, अन मी आधीच मेंशन केल्या प्रमाणे चांगले ते चांगले असेलच, पण एक सच्चे कार्यकर्ते गुळाचे पारखी म्हणुन वगैरे आपले काय मत असेल म्हणे ह्या प्रकारवर?

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 9:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

ही बघा एक न्यूज़

ते गुळ गोडी गोडवा वगैरे ऱ्हेटॉरीक वगैरे ठीक आहे सगळे, अन मी आधीच मेंशन केल्या प्रमाणे चांगले ते चांगले असेलच, पण एक सच्चे कार्यकर्ते गुळाचे पारखी म्हणुन वगैरे आपले काय मत असेल म्हणे ह्या प्रकारवर?

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Feb 2016 - 10:54 am | अनिरुद्ध.वैद्य

ह्या बातमीत निव्वळ कपड्यांहून कसेकाय ओळखले ते संघवाले आहेत, हे नाही कळल.
बाकी संघाच्या कार्यालयासमोर प्रकार झाला असे असेल तर आपला पास.

संदीप डांगे's picture

22 Jan 2016 - 3:10 pm | संदीप डांगे

जातीभेद मिटवण्याचा कार्यक्रम संघात आहे की नाही याची तुम्ही काय खात्री केली आहे ?

नक्क्की काय कार्यक्रम आहे ते सांगाल काय? म्हणजे इतक्या छुप्या पद्धतीने चालणारा आहे की मला माहित नाही. त्याचे अस्तित्व दर्शवणार्‍या काही घटना-विदा आहेत काय?

बरे मी संघात जातीयवाद आहे असे म्हटलेच नसतांना आपणास हा शोध कुठून लागला. त्यातूनही संघाचा हिंदुत्वाचा मुद्दा ज्याचा मी उल्लेख केला तो आपण सोयिस्कर डावलला. आपल्या आवडत्या व्यक्ति-संस्थांच्या विरोधात एखादे जरी वाक्य आढळले तरी प्रस्तुत व्यक्ति-संस्थेच्या विरोधात उपलब्ध असलेल्या सर्वच्या सर्व नकारात्मक भावना प्रतिसादकर्त्याच्या ठायी आहेतच असा समज करून हल्ला का होतो? माझे एखाद्याच बाबतीत विरोधी मत नसू शकते का/नसावे का?

स्पष्टीकरण देत नाही सहसा पण इथे द्यावे वाटत आहे. संघ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढतो. (कि हेही खोटे आहे?) संघाने जर जातीभेद-उच्चाटनावर काम केले तर 'हिंदुसंघटन' जे अपेक्षित आहे ते आपोआप अ‍ॅज ए साइड-इफेक्ट होऊन जाईल. आणि ज्या पद्धतीने संघवाले आपल्या संघटनेच्या प्रेझेंसबद्दल बोलत असतात त्यायोगे ही एक मोठी व समाजात प्रतिष्ठा राखून असलेली संस्था आहे. ह्या संस्थेचे असे कार्य झटपट व विनातक्रार होईल असे वाटते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदुसाठी काम करणारी दुसरी संस्था दिसत नाही. मी संघविरोधी आहे हेही तितके खरे नाही. देशकल्याणासाठी उपयोगात येऊ शकणार्‍या कुठल्याच गोष्टीच्या मी सरसकट विरोधात नसतो.

बाकी राहिले खोडसाळ सदस्यांना मिपापासून दूर करण्याच्या तुमच्या विनंतीबद्दल. तर मला ही विनंतीच खोडसाळ वाटते. संघाविरूद्ध चकार काढू नये अशी व्यवस्था आपणास मिपावर राबवायची आहे का? मिपा म्हणजे संघप्रिय लोकांचे नंदनवन असावे असे काही आपल्या मनात आहे काय? किंवा मिपा ही संघाची ऑनलाईन शाखा आहे असे काही घोषित करायचे मनसुबे आहेत काय?

विटेकर's picture

25 Jan 2016 - 11:48 am | विटेकर

त्याचे अस्तित्व दर्शवणार्‍या काही घटना-विदा आहेत काय?

चष्मा काढून डोळे उघडून नीट पाहील्यास वेगळा विदा देण्याची आवश्यकता नाही.

संघाने जर जातीभेद-उच्चाटनावर काम केले तर 'हिंदुसंघटन' जे अपेक्षित आहे ते आपोआप अ‍ॅज ए साइड-इफेक्ट होऊन जाईल.

कित्ती कित्ती सोप्प आहे ना ? या संघवाल्याना कसं काय कळत नाही बुवा ?
गेल्या ९० वर्षात संघ नेमके हेच करतो आहे, त्यासाठी स्वानुभाव घ्यायला हवा.

माझे एखाद्याच बाबतीत विरोधी मत नसू शकते का/नसावे का?

जरूर असावे पण आपले मत हेटाळणीयुक्त स्वरात मांडणे याला खोड्साळपणा म्हणतात! आपला अनुभव शून्य पण उगाच लांबून दगड मारायचे याची मनस्वी चीड आहे ! रचनात्मक विरोध असेल तर मोस्ट वेलकम! हेटाळणी आणि पूर्वग्रहदूषित मत मांडून उगाच उचकावचे असेल आणि शब्द्च्छल करून शब्दाचे बुडबुडे फोडायचे असेल तर कृपया आपण आपल्या नंदनवनात सुखनैव रहावे, शुभेच्छा !

संघाविरूद्ध चकार काढू नये अशी व्यवस्था आपणास मिपावर राबवायची आहे का? मिपा म्हणजे संघप्रिय लोकांचे नंदनवन असावे असे काही आपल्या मनात आहे काय? किंवा मिपा ही संघाची ऑनलाईन शाखा आहे असे काही घोषित करायचे मनसुबे आहेत काय?

संघाला विरोधाची इतकी सवय आहे की असली एखादी व्यवस्था राबवून काही करावे याची अजिबात आवश्यकता नाही. आणि असे करता येईल असे आपल्याला वाटत असेल तर आपला मिपा व्यवस्थापन आणि संपादक मंडळ यांच्यावर आपला विश्वास नाही असे स्पष्ट होते ,नाही का ?

याउप्पर , तुमची खरोखरच जाणून घ्यायची इच्छा असेल तर जे वरती सोन्याबापूना सांगितले तेच तुम्हाला आणि इतर सर्व विरोधकांना आवाहन आहे , शाखेत या आणि अनुभव घ्या. यू आर मोस्ट वेलकम. साप - साप म्हणून भुई धोपटणे आता ९० वर्षानंतर थांबवा !

माझ्याकडून ह विषय आता थांबवण्यात आला आहे,या वादापेक्षा माझा वेळ अधिक सत्कारणी लागू शकेल असे मला प्रामाणिकपणाने वाटते.

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 12:22 pm | संदीप डांगे

माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा होती. आमची तेवढी पात्रता नसेल म्हणून तुम्ही उत्तर दिले नसेल बहुतेक.

काही संघवाले मित्र आहेत. त्यांचे विचार बघता संघ म्हणजे काय हे समजण्यासाठी शाखेत गेलेच पाहिजे ह्याची आवश्यकता नाही. नेमका प्रश्न विचारल्यावर मूळ मुद्द्याला सोयिस्कर बगल देणे व 'संघविरोध होतो' ह्याबद्दलच रडारड करणे संघवाल्यांनी आता थांबवायला पाहिजे.

आणि तुमच्यातर्फे विषय थांबवण्याबद्दल असे की आपण तिरीमिरीत प्रतिसाद दिला नसता तर पुढे काही घडले नसते. दोघांचाही वेळ आधीच वाचला असता. आता मुद्देसूद बोलायची वेळ आली तर आपण पळ काढताय असे वाटत आहे. फक्त संघा'विरूद्ध' कुणी टिप्पणी करु नये अशा अर्थाचे विचार मांडून पण संघाची बाजू न मांडता विषय थांबवतो असे जाहिर करणे पटत नाही.

बाकी तुमची मर्जी!

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jan 2016 - 1:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

डांगे ब्वा ले +१

मृत्युन्जय's picture

2 Feb 2016 - 10:20 pm | मृत्युन्जय

बाकी चालु द्यात पण उद्या अमेरिकेत भूकंप झाला तर त्यातही तुम्ही संघाला मध्ये आणाला. विषय काय बोलताय काय? आणि इतरांना मुद्देसूद बोलायला सांगताय म्हणजे धन्य आहे.बा की चालू द्यात.

संदीप डांगे's picture

2 Feb 2016 - 11:18 pm | संदीप डांगे

आयला हो की. संघाचा आणि आरक्षणाचा खरंच काही संबंध नै, सॉरी काका!

मृत्युन्जय's picture

3 Feb 2016 - 12:01 pm | मृत्युन्जय

इत्स ओके कोम्रेद

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2016 - 1:16 pm | श्रीगुरुजी

याउप्पर , तुमची खरोखरच जाणून घ्यायची इच्छा असेल तर जे वरती सोन्याबापूना सांगितले तेच तुम्हाला आणि इतर सर्व विरोधकांना आवाहन आहे , शाखेत या आणि अनुभव घ्या. यू आर मोस्ट वेलकम. साप - साप म्हणून भुई धोपटणे आता ९० वर्षानंतर थांबवा !

विटेकर साहेब,

उत्तम प्रतिसाद! संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. संघाचा वैयक्तिक अनुभव असल्याने वर लिहिलेले अनुभवलेले आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Feb 2016 - 10:56 am | अनिरुद्ध.वैद्य

उद्या संघाने जाती निर्मूलनाचा कार्यक्रम अग्रभागी ठेवला तर मदत करायला आपण संघात जाणार का?

संदीप डांगे's picture

5 Feb 2016 - 11:43 am | संदीप डांगे

कार्यक्रम काय आहे हेच कळले नाही अजून. तो कळवण्याची तसदी न घेता लोक इतर अनेक गोष्टी बोलत आहेत. तुमच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे बरे?

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2016 - 2:14 pm | श्रीगुरुजी

आता १०० जागा आहेत. ५० राखीव आहेत. ५० खुल्या. तुम्ही आंदोलन करून ह्या २०० करून घ्या, १०० राखीव १०० खुल्या. मग तर कुणाच्या संधी कमी होणार नाहीत ना?

हे म्हणजे आजारापेक्षा उपचार हानिकारक असा प्रकार आहे.

संदीप डांगे's picture

22 Jan 2016 - 3:09 pm | संदीप डांगे

नक्की आजार काय आहे हो? खरंच नाही समजले.

आज हजारो कॉलेजेसपैकी ५० चांगली आहेत तर त्यांची संख्या २००-३०० पर्यंत न्यावी हा प्रकार आपणास हानीकारक वाटतो का?