आरक्षणाची गरज

अन्नू's picture
अन्नू in जनातलं, मनातलं
16 Jan 2016 - 10:36 pm

आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने?
मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी? फक्त आर्थिक दुर्बलांना किंवा मागासलेल्या जातींना सधन करण्यासाठी?
आत्ता मिपावर कित्येक कायदेतज्ञ असतील. काहींना याबाबतीतली राज्यघटनेतील काही कलमेही माहीत असतील. त्यांनाही या युक्तीमागचा अर्थ समजु नये?

आश्चर्य वाटतं- पण तितक्याच वेदना होतात! जर हे आरक्षण आर्थिक दुर्बलांना सधन करण्यासाठी असतं तर मग सरकार गरीबांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी किंवा दारिद्ररेषेखालील लोकांसाठी जे विविध उपाय-योजना आखत असतं ते कुठल्या नियमानं करत असतं?
आणि मुळात आरक्षण हे जातीवरच भर देणारं का आहे?
कोण विचार करतं याचा? कोणीच नाही!
फक्त प्रश्न आला कि एकच उत्तर- आरक्षण बंद करा! बस्स.
संपलं?
आपण फँड्री सिनेमा बघतो, चार दिवस चुचकारतो, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आणि नंतर?... सगळं शांत!
का बरं असं?
का तो सिनेमा फक्त आपल्या मनोरंजनासाठीइतकाच मर्यादित असतो का?

एक किस्सा सांगतो- काल्पनिक नाही कालचाच घडलेला आहे. कोणाचं नाव इथं सांगत नाही मी, फक्त चौघा मित्रांत झालेली चर्चा मी इथे देतो. कदाचित मी हा मुद्दा का सांगतोय हे अधिक स्पष्ट होईल.

"अरे उसमें तो ९५ मे आडमिशन हो जाता है|"
"ह्यॅ! किसने कहाँ?"
"सच में, अगर तू कास्टवाला रहेगा ना तो तेरा अ‍ॅडमिश आराम से हो जाएगा.."
"अच्छा- उसके लिए ना? मुझे लगा अपनी बात कर रहा है तू|"
"अरे SC के लिए तो ८५% है! पता है?"
"कौन वो भंगी?"
"नही SC वाला"
"वही- भंगी! साला यहाँ पे हमें अ‍ॅडमिशन मिलता नहीं और इन भिखारी को मुफ्त का मिल जाता है!"
"कुछ भी बोल- लेकीन जो है- वो है|"
"क्या फालतू में, इनको सर चढाती है गवर्नमेंट? हर जगह इनको रिझर्वेशन चाहीए होता है|"
(तिसरा) "हर जगह नही होता- XXXXX कॉलेज में तो SC हो, तो भी ९० का कट ऑफ है|"
"वो एक जगह हुई, लेकिन बाकीके जगह पे तो ये भिखमंगे आते ही है ना?"
"देख तू कास्ट के बारें में ऐसा नही बोल सकता"
"क्यु- मुझे क्या किसी का डर है क्या? मै तो कॉलेजमें और बाहर भी उनको भंगी ही बुलाता हूँ"
"देख ***** तू यहीं बात किसी कास्टवाले के सामने कहेगा ना, तो वो सीधे तुम्हारे उपर केस कर देगा|"
"तू क्यु इतना डर रहा है?"
"डरने का सवाल नहीं- मेरे साथ ऐसा हुआ है, इसलिए मै बोल रहा हूँ|"
"मुझे तो इतना गुस्सा आता है ना इनके उपर"
"गुस्सा तो मुझे भी आता है- लेकीन हम कुछ नही कर सकते, लॉ ही ऐसा है| तू बाकी जगह पें उनकों कितनी भी गालियाँ दे, तुझे कोई नही रोकेगा, पर पब्लिक प्लेस में तू ऐसा नही बोल सकता|"
"लेकीन इनको रिझर्वेशन देते क्यु है?"
"देख- असली रिझन तो मुझे भी नही पता, लेकीन इसी वजह से वो आगे निकल जाते है|"
"साला, इनका रिझर्वेशनही पुरा बंद करना चाहीए| जरुरत ही क्या है इनकों रिझर्वेशन देने कि?"
"जाने दे नं, वैसे भी करेंगे क्या वो रिझर्वेशन लेके? गाँव जाके हल ही चलाऐंगे!"
या वाक्यावर सगळेजळ हसायला लागले.

थोड्या वेळानंतर पहिला मुलगा निघून गेला. जाताना पुन्हा त्याने तसं ओपनली बोलू नको म्हणून त्या मुलाला बजावलं. पण त्या मुलाला मात्र त्याचं बोलणं पटलं नाही. तो त्याच मुद्द्यावर आपल्या दुसर्‍या मित्राबरोबर बोलायला लागला..

"क्या डरता है रे ये? भंगी को भंगी नही बोलेंगे तो क्या बोलेंगे?"
"वो बहोत डरपोक है|"
"नहीं तो क्या? हमारे गाँव में तो ये लोग पहले कचरा उठाते थे, पता है? कोई भाव नहीं देता इन्हें"
त्याचा मित्र नुसताच कुचेष्टेने हसला-
"कभी आओगे तो देखना हमारे गाँव- वहाँ बहोत चलता है ऐसा. मै तो मुँह पर बोलता हूँ उनके! आज भी इनको हमारे सामने बैठने कि परमिशन नहीं है- हिम्मतही नहीं होती इनको सामने बैठने कि...
अरे बैठना तो दूर ये लोक- यही एस सी वाले- हमारे सामने से जाते वक्त चप्पल भी पहनके नही जा सकते!"

ही संपुर्ण चर्चा ऐकल्यावरही समाजातून जात हा प्रकार कायमचा नष्ट झाला आहे असं वाटतं का?

आंम्हाला कॉलेजच्या फर्स्ट इअरला अभ्यासाला एक नाटक होतं त्यात एक डायलॉग होता-"जात नाही ती जात!"

जात
दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द आंबेडकरांनी अनुभवल्याने त्यांनी घटनेत तरतुद करुन या घटकाला प्रत्येक क्षेत्रात मुद्दाम राखीव जागा करुन दिल्या- आणि त्याच आरक्षणाच्या आज आपण इतक्या प्रचंड विरोधात बोलत असतो!

पण आर्थिक घटकच आंबेडकरांना आरक्षणासाठी गृहीत धरायचा असता तर त्यांना जात हा मुद्दा घटनेत नमुद करण्याची गरजच काय होती?
याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.

एक वेळ तुंम्ही कष्ट करुन पैसा मिळवून शकता- श्रीमंत होऊ शकता, स्वतःची गरीबी दुर करु शकता- पण जात?
अहं- कितीही प्रयत्न करा, ती तुंम्हाला कधीच बदलता येत नाही!

आणि हीच गोष्ट आंबेडकरांना कळून चुकली होती, त्याबाबत त्यांनी एक प्रसंगही सांगितला आहे, ऑफिसात काम करत असताना ते एका चपराश्याला पाणी द्यायला सांगतात तर तो ते देण्यास नाकारतो. का? तर तो एका उच्च जातीचा असतो! यावेळी आंबेडकरांचं पद- त्यांचं शिक्षण त्याच्या दृष्टीने काहीच किंमतीचं नसतं! तो तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवतो.
असा एकच नाही- अनेक प्रसंग आंबेडरांच्या बाबतीत घडत गेले आणि त्यातूनच आरक्षणाची कल्पना मुळ धरत गेली.
पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिल्यास आंबेडकरांनी आरक्षणातून काय साध्य केलं असा प्रश्न पडतो.
कारण-
त्या विशिष्ट घटकाविषयी समाजाची मानसिकता आजही तिच आहे- पुर्वी होती तशीच!
बदल झाला तो ती उत्कट करण्याच्या पद्धतीत!
त्यांचा धर्म बदल झाला. जात मात्र प्रत्येक ठिकाणी जिवंतच राहीली....

समाजप्रकटनविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

माहितगार's picture

6 Feb 2016 - 12:33 pm | माहितगार

९९.९९% वेळा कोणीच आपली मते बदलत नसतो.

बरोबर आहे, विकिपीडियावर अशा चर्चा करण्याची सोय नसते, परस्पर दृष्टीकोणांशी आजिबात ओळख नसलेल्या डायरेक्ट येणारी मंडळी जास्त अवघड जातात. येथेही दृष्टीकोण बदलत नाहीत पण विरोधी दृष्टीकोणाला उत्तरे देताना सॉर्ट ऑफ परिचय होतो हि अशा चर्चांची जमेची बाजू. तेच ते दळण मात्र कंटाळवाणे होते.

त्यापेक्षा मिपा बायका पॉपकॉर्न घेऊन झाडांवर चढून बसतात ते आपलं बेष्ट!! मिपाला ट्यार्पी देणार्‍या सर्व मित्रांचे हाबार्स! =))

=))

गामा पैलवान's picture

7 Feb 2016 - 1:38 am | गामा पैलवान

संदीप डांगे,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.
>> तुम्हाला कितीही अमान्य असले तरी इथे शासक जनताच आहे हे एकच कायम लक्षात ठेवा.

हे वाक्य पुस्तकात वाचायला म्हणून छान आहे. प्रत्यक्षात सत्ताधारी वर्तुळ ( = सत्ताधारी पक्ष + विरोधी पक्ष) बऱ्यापैकी मर्यादित असतं. या वर्तुळातले लोकंच सत्तेच्या आसपास वावरत असतात.

२.
>> त्यामुळे भ्रष्ट असो वा प्रामाणिक इथे निर्णय जनताच घेते.

बरोबर. म्हणून जनतेने सत्ताधीशांवर दबाव टाकायला हवा. हा दबाव नैतिक स्वरूपाचा असतो. आता जे लोकं सत्ताधाऱ्यांकडून आरक्षणाच्या सवलती उपटतात ते काय डोंबल्याचा दबाव टाकणारेत?

३.
>> दलितांबद्दलचा फुकाचा पुळका तुम्ही दाखवताय पण प्रत्यक्षात दुखणे वेगळेच आहे.

माझ्या पुळक्याची दलितांना गरज नाही. मलाही नाही. मी फक्त आंबेडकरांचं मत सांगतोय. जे मला पटतं.

४.
>> मे़कॉलेशिक्षणपद्धतीवैगरेचा तुच्छतापुर्ण उल्लेख करुन तर तुम्ही स्वतःला उघडं पाडलंय.

नाहीतर मग मे़कॉलेछाप शिक्षणाभोवती दिवे ओवाळायचे का? बोरूबहाद्दर कारकूनांची पैदास करणारी ही पद्धती आहे.

५.
>> मेकॉले नसते तर कोणत्या शिक्षणपद्धतीने स्त्री-शुद्रादि लोकांना योग्य-शिक्षण मिळाले असते?
>> मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीचा पर्यात म्हणून काय होते भारतात ज्यात सर्वंकष शिक्षणाची व्यवस्था होती
>> व व्यक्तीला स्वतःचा सामाजिक-आर्थिक उद्धार करण्याची संधी होती?

यांची उत्तरं इथे (परिच्छेद ४ व ५) मिळतील (इंग्रजी दुवा) : http://ifihhome.tripod.com/articles/kbn001.html

आ.न.,
-गा.पै.

मोगा's picture

7 Feb 2016 - 8:52 am | मोगा

तुम्हाला आंबेडकरांचे मत पटले !

वा ! वा !

रामाला देव मानू नका , त्याची पूजा करु नका , हेही त्यांचेच मत होते. त्याचं काय करणार ?

मोगा, पूजाप्रार्थना वैयक्तिक निवड आहे. त्याकरिता आंबेडकरांना विचारायची जरुरी नाही. असं माझं मत आहे.
आ.न.,
-गा.पै.

मोगा's picture

8 Feb 2016 - 1:12 am | मोगा

आरक्षण घ्यायचे की नाकारायचे हाही ' त्यांचा' वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याला घ्यायचा आहे ते घेतात , ज्याना घ्यायचा नाही , ते घेत नाहीत.

तुम्ही विनाकारण दिशाभूल करु नये.

आरक्षण दिले म्हणुन कुणी सरकार / पक्ष / पुढारी यांचे मिंधे होत नाही.

गामा पैलवान's picture

8 Feb 2016 - 11:33 pm | गामा पैलवान

मोगाश्री,

आरक्षण घ्यावे की नाकारावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे तुमचं विधान अगदी बरोबर आहे. मात्र या धाग्याचा विषय शासनाने आरक्षण द्यावे का, असा आहे. हा कुणाचाही वैयक्तिक प्रश्न नाही.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

8 Feb 2016 - 11:38 pm | संदीप डांगे

या धाग्याचा विषय शासनाने आरक्षण द्यावे का, असा आहे.

एग्झॅक्टली, म्हणुनच "आंबेडकरांचं स्वतःचं मत काय" हे इथे अप्रस्तुत आहे. घटनेला सार्वभौम जनतेने, संसदेने मान्यता दिली आहे. तिथे आंबेडकरांचा रोल संपतो. एकदाचं लक्षात घ्या बॉ.

(संपादकांना विनंती, धागा वाचनमात्र करा.)

मोगा's picture

9 Feb 2016 - 8:17 am | मोगा

सहमत ...

अन्नू's picture

9 Feb 2016 - 8:49 am | अन्नू

संपादकांना विनंती, धागा वाचनमात्र करा.

विटेकर's picture

9 Feb 2016 - 9:06 am | विटेकर

पै-ताईशी शत प्रतिशत सहमत !
इथे हिरीरीने वाद घालणार्‍यापैकी किती लोकांना प्रत्यक्ष समाजात काम करण्याचा अनुभव आहे? हे सारे पुस्तकी पंडीत !
बरे यापैकी कुणालाही काहीही करायचे नाही , नुस्ता कळफलक बडवायचा आहे, कुठलेतरी अर्थहीन संदर्भ उकरुन काढायचे आणि निरर्थक वाद घालत बसायचे ! आणि कुठल्याही परिस्थितीत "मी शाणा" ही भूमिका सोडायची नाही आणि मेगाबायटी प्रतिसाद हाणात बसायचे ! त्यात कुठूनतरी संघ, ब्राह्मण्य आणायचे मग वादाला आणि आणखी फोडणी मिळते ! असल्या बाष़्कळ चर्चानी जातीनिर्मूलन सोडाच, पण एखादी गल्लीतील नंपुसक चळचळ, शष्पभर पुढे सरकणार नाही !

अटकेपार झेंडा लावणार्‍या मराठ्यांचे राष्ट्रीय चारित्र्य असेच राहणार असेल तर माझ्या दृष्टीने हा अधःपात ही खर्‍याखुर्‍या चिंतेची आनि चिंतनाची बाब आहे, मिपावरील आणखी एका धाग्याची नव्हे !

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 9:19 am | संदीप डांगे

इतर कुठल्याही प्रांतीयांपेक्षा, बाष्कळ चर्चा करणार्‍या मराठ्यांची आंतरजातीय, धर्मिय विवाहांमधे टक्केवारी जास्त असावी असा अंदाज आहे. हे अधःपतनच असावे नै का विटेकरसर?

मृत्युन्जय's picture

9 Feb 2016 - 12:11 pm | मृत्युन्जय

सहमत आहे

गामा पैलवान's picture

9 Feb 2016 - 6:46 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

>> घटनेला सार्वभौम जनतेने, संसदेने मान्यता दिली आहे. तिथे आंबेडकरांचा रोल संपतो.

हे बरंय! गरज सरो आणि वैद्य मरो. तुम्ही असा विचार करणार नाही याची खात्री आहे. पण नेमका असाच युक्तिवाद करून आपल्या दिव्य राज्यकर्त्यांनी दहा वर्षांचं आरक्षण सत्तर वर्षांवर नेऊन ठेवलंय. (अवांतर : इथे मिपावर 'आईबाप हे उपयुक्त पशू आहेत' अशी कोणाचीतरी स्वाक्षरी वाचल्याचं स्मरतं.)

एखादा केमिकल प्लांट उभा केला की डिझाईन इंजिनियरचं काम संपतं. मग तो सुरू करावा लागतो. त्यासाठी कमिशनिंग टीम असते. प्लांट यथोचित रीतीने चालू झाला की कमिशनिंग इंजिनियरचं काम संपतं. आणि प्लांटची जबाबदारी ऑपरेशन / प्रॉडक्शन इंजिनियरकडे येते.

आंबेडकर घटनेचे डिझाईन आणि कमिशनिंग इंजिनियर होते. आज या घटकेला घटनेच्या प्रॉडक्क्शन इंजिनियरची भूमिका कोण निभावतंय? याचं उत्तर 'घटना नक्की कसलं उत्पादन करतेय' या प्रश्नाशी निगडीत आहे. विचार आणि चर्चा व्हावी.

आ.न.,
-गा.पै.

खरच ?
पण बिचारे ते जेव्हा उपयुक्त पशू ह्या अवस्थेपर्यंत पोचतात तोपर्यंत त्यानि त्यांच्या पिलांना ह्या "उपयुक्त" जगात जगायचे कसे हे शिकवलेले असते. खस्ता खाउन त्या पिलांचा सांभाळ केलेला असतो, त्यांच्या भविष्यासाठि आपल्या इच्छा मारुन टाकलेल्या असतात.