विश्वाचे आर्त - भाग ९ - अनैसर्गिक निवड

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
28 Dec 2015 - 5:41 am

भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत, भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत

आपण तऱ्हेतऱ्हेचे कुत्रे पाहातो. पांढरे गुबगुबीत केसाळ पॉमेरियन; काळे हिंस्र वेगवान डॉबरमन; कुरळ्या केसांचे खेळण्यासारखे वाटणारे पूडल; लांडग्यासारखे दिसणारे निष्ठावान आल्सेशियन... शेकडो जाती आहेत त्यांच्यात. प्रत्येकाचं रूप वेगळं, प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे. सहा इंचांचा चिव्हाव्हा आणि जवळपास पाच फूट उंच ग्रेट डेन इतकी प्रचंड रेंज दिसते. या वेगवेगळ्या जाती माणसाने तयार केलेल्या आहेत. काही हजार वर्षांपूर्वी तुम्हाला लांडगा किंवा जंगली कुत्र्याच्या जातीचा काही प्राणी सापडला असता.

आपण सध्या खातो तो मका काही शतकांपूर्वी एका अगदी छोट्याशा रूपात होता. म्हणजे आत्ता आपल्याला जी कणसं दिसतात, त्याऐवजी एकेकाळी बंद बिया असलेल्या शेंगा असायच्या. आकार आणि बियांचा उघडेपणा निवडत निवडत आता त्यात प्रचंड बदल झालेला दिसतो. आपण खात असलेली सगळीच धान्यं ही अशाच छोट्याशा पूर्वजापासून तयार झालेली आहे.
मक्यात झालेला बदल
हे बदल आपल्या डोळ्यासमोर म्हणावे इतक्या वेगाने, म्हणजे काही शतकांत घडलेले आहेत. हे कसे घडले? तर वेगवेगळ्या लोकांनी आपल्याला हवे ते गुणधर्म असलेल्या प्राण्यांची किंवा वनस्पतींची पैदास केली. बाकीच्यांची पैदास न करता ते टाकून दिले अगर वापरून टाकले. एक काहीसं सोपं उदाहरण घेऊ. समजा आपल्या शेतात येणारी मक्याची कणसं चार ते सहा इंच लांबीची होती. अर्थातच आपल्याला सर्वच कणसं सहा इंच लांबीची असलेली आवडतील. आता आपल्याला सर्वसाधारण निरीक्षणाने माहीत आहे, की आईवडिलांचे गुणधर्म मुलांच्यात उतरतात. तेव्हा पुढच्या वर्षी पेरणी करू ती फक्त सहा इंच लांबीच्या कणसांचीच करू. आणि खरोखरच पुढच्या वर्षी येणारी कणसं ही लांब असतात. पुन्हा, सगळीच अचूक सहा इंची असतील असं नाही. कारण कणसांची वाढ ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पण निदान यावेळी दिसणारी कणसं ही पाच ते सहा इंच लांबीची असतील. म्हणजे आपल्या कणसांची सरासरी लांबी वाढली. आता यातली सगळ्यात लांब कणसं घेतली, तर आपल्याला कदाचित काही कणसं साडेसहा इंचांची असलेली सापडतील. पुन्हा पुढच्या वर्षी त्यांपासून पीक घ्यायचं. आता आपल्याला मिळणारी कणसं सर्वसाधारणपणे साडेपाच ते साडेसहा इंचांची असतील. ही प्रक्रिया पुढे चालू ठेवली तर आपल्याला कणसांचा आकार वाढत जाताना दिसेल. लवकरच आपली कणसं फुटभर लांब झालेली दिसतील.

या उदाहरणात थोडं सुलभीकरण आहे. वापरलेले आकडे सोयीसाठी चार इंच, पाच इंच, सहा इंच असे घेतलेले आहेत. कदाचित एका पिढीत अर्ध्या इंचाचा बदल होत नसेल. कदाचित फक्त दशांश इंचाचा फरक पडत असेल. म्हणजे या प्रक्रियेने चारपाच वर्षांत प्रचंड फरक दिसणार नाही. सहा इंचांपासून फुटभरापर्यंत जायला कदाचित अनेक दशकं लागतील. त्याने अर्थातच मुद्दा बदलत नाही.

मात्र एक गोष्ट मी फारशी न समजावता गृहित धरली. आणि ती जर व्यवस्थित समजून घेतली नाही तर वरचा युक्तिवाद वाचकांची फसवणूक करणारा वाटू शकतो. त्यामुळे नक्की काय घडतं हे नीट तपासून पाहायला हवं. 'पहिल्या पिढीत हजारो कणसं होती. त्यातलं सगळ्यात लांब सहा इंची होतं. म्हणजे त्या जातीची क्षमता जास्तीत जास्त सहा इंच लांब कणीस तयार करण्याची होती. मग पुढच्या काही पिढ्यात निव्वळ जास्तीत जास्त लांब कणीस निवडल्यामुळे ती सात किंवा आठ इंच लांबीची कणसं तयार कशी करू शकेल?'

हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जर मूलभूत क्षमता बदलत नसेल, तर कितीही निवड करा, तुम्हाला विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे जाताच येणार नाही. जर चार ते सहा इंच इतकी रेंज असेल तर सहा इंचांची मर्यादा ओलांडता येणार नाही. पण आपल्याला हे घडताना दिसलेलं आहे. पेन्सिलला टोक काढावं तशी अधिकाधिक निमुळत्या नाकांचे कुत्रे पिढ्यानपिढ्या अशी निवड करून घडवले गेलेले आहेत. हे कसं होतं?

याचं कारण म्हणजे आपोआप होणारे जनुकीय बदल, (किंवा थोडक्यात 'आजब'). यांनाच जेनेटिक म्यूटेशन्स म्हणतात. पुनरुत्पादनाची प्रक्रिया ही शंभर टक्के अचूक नसते. हजारात एक, लाखात एक वगैरे प्रमाणात तीत चुका होतात. बहुतेक वेळा या चुका हानिकारकच असतात. पण काही वेळा या चुका 'चांगल्या' असतात. आता चांगल्या चुका म्हणजे काय? आपण झेरॉक्स कॉपीचं उदाहरण घेऊ. समजा एखाद्या तरुणीच्या चेहेऱ्याच्या चित्राच्या आपण अनेक झेरॉक्स कॉपी काढतो आहोत. बहुतेक सगळी चित्रं हुबेहुब म्हणावीत अशीच येतील. पण काही चित्रांमध्ये कदाचित शाईचे डाग येतील. आता ज्या चित्रांत डाग येतील त्यांपैकी बहुतेकांत चेहेऱ्याचं सौंदर्य कमी होईल. पण एखादा डाग बरोब्बर हनुवटीवर आला तर कदाचित तो तीळ म्हणून चेहेरा जास्त गोड दिसू शकेल. या अर्थाने चुका या दरवेळी वाईटच असतील असं नाही. म्हणून त्यांना बदल म्हणणं जास्त योग्य ठरेल.

कणसांच्या बाबतीत पुन्हा पुन्हा नवीन कणसं घेताना एखादा आजब घडतो. ज्याने त्या झाडापुरती कणसांची लांबी किंचित वाढते. म्हणजे एरवी सहा इंच लांबीचीच मर्यादा असलेल्या झाडापेक्षा किंचित वेगळे गुणधर्म असलेलं झाड तयार होतं - कदाचित या झाडाची कणसं साडेसहा इंच लांब असतील. आणि पुढच्या पेरणीसाठी जर आपण सर्वात लांब कणसं निवडणार असू तर अर्थातच या झाडाची निवड होते. आणि काही वर्षांनी - हजारो, लाखो कणसं लावल्यावर पुन्हा एखादा आजब घडतो. पण जेव्हा जेव्हा कणसांची लांबी वाढवणारे आजब घडतात तेव्हा लांब कणसं निवडल्याने ते टिकून राहातात. आणि काही दशकं असंच करत राहिलं तर एकेकाळी चार ते सहा इंच असलेल्या कणसांपासून आपल्याल आठ ते दहा इंच लांबीची कणसं असलेली जात मिळते.

ही निवड करून जात 'सुधारण्या'साठी काय काय आवश्यक असतं? सर्वप्रथम म्हणजे मुळात काहीतरी चांगला अथवा वाईट गुणधर्म असावा लागतो. इथे कणसाची लांबी हा तसा गुणधर्म आहे. यात अधिक लांबी चांगली, कमी लांबी वाईट असा निकष आहे. तसंच या निकषानुसार एक विशिष्ट प्रमाणात वैविध्य असावं लागतं. म्हणजे मुळात जर सगळीच कणसं अचूकपणे पाच इंच लांब असती, तर त्यात निवड कशी करणार? चार ते सहा इंच असं वैविध्य असल्यामुळे आपल्याला असा विचार करता येतो की सहा इंची कणसात कदाचित काहीतरी वेगळं असेल जे त्यांच्या संततीत उतरू शकेल. या वैविध्यापलिकडे वर म्हटल्याप्रमाणे होणारी आजबं असायला हवी. जर जनुकांमध्ये कधीच बदल होत नसतील - म्हणजे पालकांचे गुणधर्म हुबेहुब संततीत येत असतील तर कुठचंच कणीस सहा इंचापेक्षा मोठं होणार नाही. पण असे बदल अधूनमधून होत असतील तर त्यात होणारे सोयीस्कर बदल निवडत निवडत आपल्याला हव्या त्या दिशेने बदल घडवून आणतात. कारण दरवेळी झालेले 'चांगले बदल' आपण टिकवून ठेवतो, आणि पुढच्या पिढीत येतील अशी खात्री करून घेतो. त्यामुळे आज दिसणारं पीक हे काही दशकांपूर्वीच्या पिकापेक्षा पूर्णपणे वेगळं दिसू शकतं.

या प्रक्रियेला मी 'अनैसर्गिक निवड' किंवा 'कृत्रिम निवड' असं म्हटलेलं आहे. याचं कारण म्हणजे निवड करणारी कोणी व्यक्ती असते. एक सुजाण पैदासक आत्ताच्या पिकातल्या कणसांच्या लांबींची तुलना करतो आणि त्यातली सर्वात लांब निवडून पुढच्या पेरणीसाठी वापरतो. त्यासाठीचा निकष हा त्या पैदासकाच्या मनात असतो. त्याला एका विशिष्ट दिशेने बदल घडवण्याची इच्छा असते, आणि उद्देशपूर्वक तो ही निवड करतो.

नैसर्गिक निवड ही याच तत्त्वावर चालते. मात्र इथे निवड करणारी कोणी डोळस व्यक्ती नसते. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे कुठचे गुणधर्म चांगले आणि कुठचे चांगले नाहीत हे ठरतं. कणसं मानवी निवडीमुळे मोठी झाली हे उघड आहे. पण जिराफाची मान लांब झाली तेव्हा 'लांब मान असणं चांगलं' असा निकष लावणारी कोणी व्यक्ती नव्हती. तरीही ती लांब झाली. आणि तिच्यामागची प्रक्रिया तीच आहे. हजारो पिढ्यांपूर्वीच्या पिढीतल्या चार ते सहा फूट मान असलेल्या जिराफांपैकी अधिक उंच जिराफांना उंचपर्यंतचा पाला खाता आला. त्यामुळे त्यांना अधिक पिलांना जन्म देता आला, अधिक पिलांना पोसता आलं. त्यामुळे पुढच्या पिढीत पाहिलं तर सहा फुटी जिराफ किंचित काही प्रमाणात जास्त झाले. हेच पिढ्यानपिढ्या चालू राहिलं तर एक वेळ अशी येते की चार फूट लांब मानेचे जिराफ नाहीसे होतात. कणसांप्रमाणेच आजब घडत राहिल्यामुळे ही चढाओढ सहा फुटांपलिकडेही चालूच राहाते. आणि शेकडो, हजारो पिढ्यांनंतर सर्वच जिराफ आठ ते दहा फूट मानेचे दिसून येतात. मूळ पिढीतले सर्वात उंच जिराफदेखील त्यांच्या इतक्या पिढ्यांनंतरच्या संततीच्या बुटक्या जिराफांपुढे खुजे दिसतात.

निसर्गाला 'अमुक व्हावं' किंवा 'प्राणीसृष्टीचा या दिशेने विकास व्हावा' अशी इच्छा नसते. निसर्ग केवळ असतो. उंच झाडं असतात. त्यांच्या पानांवर जगणारे जिराफ असतात. आणि त्यांच्या मानेच्या लांबीत वैविध्य असतं. त्यांची मानेची लांबी त्यांच्या संततीत उतरते. आणि आसपासच्या उंच झाडांपोटी अधिक लांबी उपयुक्त ठरते. एवढंच पुरेसं असतं. लांब कणसं पुढच्या पिढीत अधिक प्रमाणात जायची प्रक्रिया जशी माणूस घडवून आणतो, तशी लांब मानेचे जिराफ पुढच्या पिढीत जाण्याची प्रक्रिया आपोआपच घडते. त्यासाठी कोणी मार्गदर्शक लागत नाही.

(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

राही's picture

28 Dec 2015 - 6:49 am | राही

भाग ८ आणि भाग ९ दोन्ही आवडले. हा भाग सोप्या भाषेमुळे आवडले. 'पैदास', 'पैदासक' हे शब्द 'उत्पाद'न, 'उत्पादक' या शब्दांच्या जागी वापरलेले आवडले. त्यामुळे एक देशीपणाची छटा आली आहे.
बाकीचेही लेख आवडले होतेच.

sagarpdy's picture

28 Dec 2015 - 9:56 am | sagarpdy

पु भा प्र

संदीप डांगे's picture

28 Dec 2015 - 5:22 pm | संदीप डांगे

वाचतोय...

पॉइंट ब्लँक's picture

28 Dec 2015 - 5:41 pm | पॉइंट ब्लँक

लेखमालेतील बर्याच गोष्टी पटल्या नाहीत. तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि वाचकांना त्यांचे ( कौतुक आणि टिकाही). तरीही तुम्हाला एक विनंती आहे, अर्थात ती मान्य करायची की नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. खालील काही शंका आहेत, त्याचं निरसण करता आलं तर बघा.
१. लेखमाला टप्प्या ट्प्प्यान येत आहे (विषय अवघड आहे त्यामुळे हे साहजिक आहे) पण नक्की कुठल्या दिशेने वाटचाल चालू आहे ह्याचा अंदाज येत नाही. एक preamble ( लेखमालेचा उद्देश, त्यातील ठोबळ टप्पे आणि नक्की कुठे सांगता होईल ) जर लिहिलत तर बरेच वाद टाळता येतील.
२. माझं अस वैयक्तिक मत ( हवं तर गैरसमज म्हणूयात) आहे की, लेखामध्ये वि़ज्ञानच्या मर्यादा टाळाण्याचा प्रयत्न झालाय उदा. बिग बंगची सुरुवात - प्रचंड गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अति सुक्ष्म (क्वाँटम) स्केलवर मॉडेल करण्याइतकं सध्याचं भौतिक शास्त्र सक्षम नाही. हे लेखात सांगितलं नाही. तसच जीवशास्त्राच्या मर्यादा ( ज्या मागे एकदा प्रतिसादात लिहिल्या होत्या) त्यांचाही कुठे उल्लेख नाही. हे मुलभत प्रश्न आहेत, त्यांच्या उत्तराप्रमाणे सध्याच्या अंदाजाचे ( सिद्धांत हा शब्द योग्य वाटत नाही) भवितव्य बदलू शकते. ह्या मर्यादांचा उल्लेख टाळण्यामागे काही उद्देश आहे किंवा ह्यावर सविस्तर चर्चा पुढे होणार आहे का?
३. काही वेळा विज्ञानाच्या व्याख्येवर बराच स्वैराचार झाल्यासारखा वाटतो. Most convenient theory at this moment आणि Complete theory ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फार अंतर आहे, पण लेखमालेत हा फरक पुसला गेला आहे. तो फरक तुमच्या द्रूष्टीकोनातून आहे कि नाही? ( त्याचा उपयोग काय हा तात्विक प्रश्न बाजुला ठेवून ह्याच उत्तर देता आल्यस उत्तम)
4. If randomness explains everything, are there any calculations available? eg. What is probability that a useful mutation happen, what is the probability it will propagate in next generation and how much time does it take to see a new species? ( Though the transition is smooth by ur theory, monkeys and humans coexist,. Can probability explain broadly how much time would take for monkey to human transformation (if it has happened. If this is a wrong example, please ignore this and take other appropriate example ).

sagarpdy's picture

28 Dec 2015 - 6:51 pm | sagarpdy

+1

राजेश घासकडवी's picture

28 Dec 2015 - 7:16 pm | राजेश घासकडवी

एक preamble ( लेखमालेचा उद्देश, त्यातील ठोबळ टप्पे आणि नक्की कुठे सांगता होईल ) जर लिहिलत तर बरेच वाद टाळता येतील.

लेखमालेचा उद्देश 'सोप्या भाषेत महत्त्वाच्या वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणं' असा फारच व्यापक आणि ओपन एंडेड आहे. अमुक एक लिहून झालं की संपलं असं म्हणणं खरोखरच कठीण आहे. त्यामुळे सध्यातरी पुढच्या दहा लेखांत काय येईल तेवढंच सांगता येईल. त्यात सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे नक्की काय, उत्क्रांती आणि हरितक्रांती, जीएमओ आणि डीएनएची तोंडओळख, आणि उत्क्रांतीसाठी असलेले मजबूत पुरावे यांवर लेखन करणार आहे. एके काळी प्रीअॅंबल लिहिली होती, ती लवकरच प्रसिद्ध करतो.

लेखामध्ये वि़ज्ञानच्या मर्यादा टाळाण्याचा प्रयत्न झालाय

विज्ञानाच्या मर्यादांपर्यंत जाण्यापेक्षा त्या मर्यादांच्या आतच घट्ट उभं राहून आपल्याला काय समजून घेेता येतं यावर ऊहापोह चालू आहे. मला खरोखर सांगा, अतिसूक्ष्म क्वांटम लेव्हलवर काय चालतं, तिथे स्ट्रिंग थियरीची स्थिती काय आहे वगैरेवर चर्चा करण्यापेक्षा 'आपण कसे निर्माण झालो' हा प्रश्न जास्त जवळिकीचा वाटणार नाही का?

तसच जीवशास्त्राच्या मर्यादा ( ज्या मागे एकदा प्रतिसादात लिहिल्या होत्या)

'जीवशास्त्राचा पायाच पूर्णपणे डळमळीत' वगैरे बातम्या वाचायला छान सनसनाटी वगैरे असतात, पण प्रत्यक्षात तसं काही नाही. तुम्हाला जर तसं खरोखरच पटलेलं असेल तर तुम्ही त्यावर लिहा.

काही वेळा विज्ञानाच्या व्याख्येवर बराच स्वैराचार झाल्यासारखा वाटतो. Most convenient theory at this moment आणि Complete theory ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फार अंतर आहे, पण लेखमालेत हा फरक पुसला गेला आहे. तो फरक तुमच्या द्रूष्टीकोनातून आहे कि नाही?

स्वैराचार? कन्व्हिनियंट थियरी? आता यावर काय बोलणार? उत्क्रांतीसाठी असलेल्या पुराव्यांचे लेख येण्याची वाट पाहा इतकंच म्हणेन. अनेकवेळा 'इनकंप्लीट' या शब्दाचा गैर अर्थ काढला जातो. सर्व अंगाला व्यवस्थित फिट बसणारा पण एखाददोन भोकं असलेला स्वेटर हा कन्व्हिनियंट किंवा इनकंप्लीट नसतो. तो स्वेटरच असतो. अजून पुराव्यांची पुरेशी लोकर मिळाली की ती भोकं बुजवत जाता येतं. म्हणून तो स्वेटरच नाही किंवा उपयुक्तच नाही असं म्हणता येत नाही.

रॅंडमनेस एक्स्प्लेन्स एव्हरीथिंग - हा उत्क्रांतीबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तो निवारण्यासाठी जंबोजेट सिद्धांत आणि याच धाग्यावर मी प्रयत्न केलेला आहे. नैसर्गिक निवडीची प्रक्रिया ही रॅंडम आउटकममधून स्पेसिफिक आउटकम निवडून पुढच्या पिढीत तो पाठवण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी वाढवत नेण्याची प्रक्रिया.
तुम्ही जे म्यूटेशनच्या रॅंडमनेसबद्दल प्रश्न विचारले आहेत ते अर्थातच रास्त आहेत. म्यूटेशन रेट्स काय असतात, किती पॉप्युलेशनमध्ये किती काळात विशिष्ट म्यूटेशन दिसण्याची शक्यता याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला आहे. त्यानुसार काही मॉडेल्स तयार करून गणितंही करता येतात.

मंकी टु ह्यूमन ट्रान्स्फॉर्मेशन झालेलं नाही, आपण आणि चिंपांझी यांचा बऱ्याच पूर्वी कॉमन अॅन्सेस्टर होता. मला या विशिष्ट उदाहरणांचं माहीत नाही, पण इतर काही जनुकांमध्ये बदल होऊन प्रजाती वेगळ्या होतात, त्याबद्दल गणितं करता येतात.

पॉइंट ब्लँक's picture

28 Dec 2015 - 10:13 pm | पॉइंट ब्लँक

'जीवशास्त्राचा पायाच पूर्णपणे डळमळीत' वगैरे बातम्या वाचायला छान सनसनाटी वगैरे असतात

हे मत बातम्या किंवा कादंबर्या वाचून नक्कीच बनवले नाही. बाकी चालू द्या!

पॉइंट ब्लँक's picture

29 Dec 2015 - 8:14 am | पॉइंट ब्लँक

प्रस्तावनेची वाट पाहून प्रतिसाद द्यावा ह्या विचारात होतो. पण असो ती कधी येइल माहित नाही.

त्यानुसार काही मॉडेल्स तयार करून गणितंही करता येतात.

हे तुम्ही लिहिलय तितक सोपं नाही. काही उदाहरणं खाली देतो. पुन्हा एकद सर्वांची क्षमा मागून इंग्रजीत लिहितो.
१. Mutation rate can not be established easily for three reasons. - a. Not all parts of genome can be sequenced ( for time being lets ignore the accuracy issues of sequencing or assays themselves ) eg. very high and low GC percent regions. b. The assembly of the genome itself is not complete. there around 20 iterations of published human genome so far and there are still gaps in these assembly. The differences in successive iterations can be upto 100s of millions of locations. This has profound consequences on what is called a SNP or not a SNP. c. Scientific community has mostly invested their energy in studying 2% of the DNA which codes for proteins, this can not be good enough sample to extrapolate the rate to whole genome as there is no evidence to suggest random/uniform distribution of mutations across genome.
2. DNA mutations (though they are important) alone are not responsible for evolutionary changes. Environmental factors too play a role in evolution, therefore contribution of epigentic changes (These can be transferred to next generation) can not be ignored. And this rate is not well established.
3. Lets look at chimp to human transition. Chimps have an extra pair of chromosome. Human chromosome 2 is supposed to be fusion of two chimp chromosomes. Establishing this rate of chromosome fusions is no easy task as there is not enough data to track past evolution of this type. This is a low probability but high impact event. And therefore accurately establishing this probability is essential which is not feasible.
4. The very definition of mutation impact has hole ( big enough to tear your sweater analogy apart). Lets look at couple of misconceptions that were prevalent until 5 years back in biology community - a. This was the biggest joke of all - only mutations in coding region ie exons matter, mutations at all other locations don't count. b. Synonymous mutation ( mutations that do not change the encoded protein) have no impact. There are great deal of counter examples to this theory. One of them could be the impact on gene expression. c. Mutations/SNP alone is responsible for disease - muscular distrophy was similarly attributed to a single mutation. Recent study suggest that of all the people with this mutation only one percent has disease. The telomere length plays an important role in deciding the role of the mutation. d There is not enough study to account post-transcrptional and post-translation changes ( Though not very sure of this, too early to discard these from calculation.)

Most of this is from human genome which is studied RELATIVELY widely compared other organisms. We do not yet know what surprises are on the way to hit us through study of other organisms.

गेल्या पाच दहा वर्षात पब्लिश झालेले पेपर्स जर बघितले तर एक पुस्तक लिहिता येईल ह्या विषयावर, पण इतका क्लिष्ट विषय हाताळण्यासाठी मिपा योग्य जागा वाटत नाही. असो माझ्या परीने जितकी स्पेसिफिक उदाहरणे देता येतील तितकी दिली आहेत. तुमच्याकडून ही तिच अपेक्षा होती, पण तुमचा भर अ‍ॅनालोजीवर जास्त दिसतोय.
जाता जाता एक लोडेड डायलॉग.
Correlations and associations are important for science but biology tends to mistake it as cause and effect.
आणि हा सहा वर्षांचा फस्ट हँड अनुभव आहे, बातम्या वाचून बनवलेले मत नाही.
आता तुम्ही जो क्लीष्ट विषय इथं मिपावार हाताळायचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल. इथे बरेच प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत तर वाचकाकडून काय अपेक्षा आहे - पदरी पडेल तेवढं गोड (प्रसादा सारखं) मानून घ्याव. ( हे जरा विचित्र आहे, कारण लेखमाला वैज्ञानिक स्वरुपाची आणि वाचक देवभोळे) किंवा ह्यातून प्रेरणा घेवून पुढे अभ्यास करावा. ( हे ही विचित्र आहे, मिपा ह्यासाठी योग्य फोरम नाही त्यासाठी वेगळा इच्छुक लोकांचा कट्टा करता येईल आणि दुसरा म्ह्णजे लेखात विज्ञानाच्या मर्यादा मुख्यत्वे टाळल्या गेल्याने वर प्रतिसादात ही त्यावर चर्चा टाळल्याने ह्याला प्रेरणा मिळेल असं वाटत नाही).

राजेश घासकडवी's picture

29 Dec 2015 - 9:09 am | राजेश घासकडवी

तुम्ही जे लिहिलेलं आहे त्यावर फार तांत्रिक चर्चा करत बसत नाही. कारण त्यातून 'जीवशास्त्राचा पाया डळमळीत झालेला आहे' वगैरे निश्चितच सिद्ध होत नाही. कुठच्याच तीन परिच्छेदात ते सिद्ध होईल असं वाटत नाही. जर गेल्या सहा वर्षात जे सापडलेलं आहे त्याने आधीचं सगळंच संशोधन फुकट गेलेलं असेल, किंवा मी लिहिलेलं खोडून निघत असेल तर निदान ते कसं होतं याबद्दल एखाददुसरा लेख लिहावा ही विनंती.

वाचकाकडून काय अपेक्षा आहे - पदरी पडेल तेवढं गोड (प्रसादा सारखं) मानून घ्याव. ( हे जरा विचित्र आहे, कारण लेखमाला वैज्ञानिक स्वरुपाची आणि वाचक देवभोळे)

मिपाच्या वाचकांबद्दल असं सरसकटीकरण करू नये हीही एक विनंती. अनेकांना या लेखमालेतून काही ना काही हाती लागतं आहे याबद्दल मला शंका नाही. बाकी चर्चा टाळणं हा माझा हेतू नाही. विज्ञानाच्या मर्यादांमुळे या लेखमालेत मांडलेलं काय चुकीचं आहे हे जरूर दाखवून द्या. मात्र मी जे लिहितो आहे त्यासाठी मिपा हा योग्य फोरम नाही हे पटत नाही.

पॉइंट ब्लँक's picture

29 Dec 2015 - 9:34 am | पॉइंट ब्लँक

कारण त्यातून 'जीवशास्त्राचा पाया डळमळीत झालेला आहे' वगैरे निश्चितच सिद्ध होत नाही.

मग अजून काय झाले म्हणजे पाया डळमळित होईल? विज्ञानात, एखादी गोष्ट बरोबर ठरवायला ती तत बरोबर सिद्ध होत राहीली पाहिजे, एक जरी अपवाद सापडला की पुन्हा तपासणी करणे गरजेचे असते. इथे तर रोज एक नवीन अपवाद सापडतोय आणि तरीही त्याची दखल न घेने ही अवैज्ञानिक नाही का?

जर गेल्या सहा वर्षात जे सापडलेलं आहे त्याने आधीचं सगळंच संशोधन फुकट गेलेलं असेल, किंवा मी लिहिलेलं खोडून निघत असेल तर निदान ते कसं होतं याबद्दल एखाददुसरा लेख लिहावा ही विनंती

पुन्हा गफलत होती आहे. प्रश्न खोडून काढायचा नाहीच आहे. काही भक्कम नाही तिथे काय खोडून काढणार? पण नवीन संशोधन झाल्यावर जुन्या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह लावायला नको का? शहानिशा करायला विरोध का? असो एकंदर तांत्रिक चर्चा खोलवर जात नाही त्यामुळे पुढे काय बोलनार.

मात्र मी जे लिहितो आहे त्यासाठी मिपा हा योग्य फोरम नाही हे पटत नाही.

मागच्या प्रतिसादात सांगतिल्याप्रमाणे दोघांनाही आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. मी माझे मत व्यक्त केले एवढेच. तुम्ही लिहित रहा.

राजेश घासकडवी's picture

29 Dec 2015 - 10:48 am | राजेश घासकडवी

एक जरी अपवाद सापडला की पुन्हा तपासणी करणे गरजेचे असते. इथे तर रोज एक नवीन अपवाद सापडतोय

तुम्ही कसल्याही संदर्भाशिवाय तीन परिच्छेद लिहिले आहेत. त्यात मुख्यत्वे 'म्यूटेशन रेटचं गणित करणं' यात येणारे अडथळे सांगितले आहेत. त्यात कुठल्या नियमाला अपवाद आला आहे? आणि त्याने 'जीवशास्त्राचा पायाच डळमळीत होतो' असं तुमचं म्हणणं आहे. हे तुम्ही ह्यूमन जीनोम प्रोजेक्टबद्दल लिहित आहात की इ. कोलायच्या जीनोमबद्दल?

काही भक्कम नाही तिथे काय खोडून काढणार?

उत्क्रांतीची थियरी भक्कम नाही असं म्हणत असाल तर, माफ करा, तुम्हाला एक स्वतंत्र लेख (शक्यतो मराठीत) लिहावा लागेल. तुम्ही एपिजेनेटिक बदलांबद्दल लिहिलं होतं, तिथे त्याला उत्तर दिलं होतं. हा व्यवस्थित अभ्यास केला जाणारा विषय आहे. पण एपिजेनेटिक बदलांमुळे प्रजाती बदलत नाहीत. त्यासाठी म्यूटेशन्सच हव्या.

असो. माझे मुद्दे समजावून सांगण्यासाठी मी व्यवस्थित लेखमाला लिहितो आहे. त्यावर तीन परिच्छेद खरडून, गेल्या पाच वर्षांच्या संशोधनाचा हवाला देऊन 'हे सगळं चुकीचंच आहे' असं म्हणण्याऐवजी सर्वांना समजेल अशा शब्दात एक किंवा दोन लेख का लिहीत नाही? आता त्यावर तुमचं उत्तर असं आहे की मिपा ही त्यासाठी योग्य जागा नाही. हे सगळं फारच सोयीस्कर आहे.

पॉइंट ब्लँक's picture

29 Dec 2015 - 12:20 pm | पॉइंट ब्लँक

तुम्ही कसल्याही संदर्भाशिवाय तीन परिच्छेद लिहिले आहेत.

काय बोलताय. तुम्हीही संदर्भाशिवायच गणित मांडता येतं हे लिहिलं होत. वर कसं मांडता येतं तेही सांगितलं नाहीत. आता मी त्यात काय अडथळे काय आहेत आणि ते गणित का बरोबर मांडता येत नाही ते सांगितलं तर त्यालाही धड उत्तर नाही. जर तुम्हाला संदर्भ वाचकांकडून अपेक्षित असतील, तुम्हीही तुमच्या सर्व लेखांमध्ये संदर्भ देणे आवश्यक आहे. तुम्ही ते दिलेले नाहीत. माझी संदर्भ द्यायची तय्यारी आहे. तुम्ही आत्ता पर्यंत लेख्माले मध्ये केलेल्या सर्व दाव्यांचे पियर रिव्ह्यूड जरनल्स मधील संदर्भ (ब्लॉग नकोत) द्या, मीही देतो.

खास करून

एपिजेनेटिक बदलांमुळे प्रजाती बदलत नाहीत. त्यासाठी म्यूटेशन्सच हव्या.

ह्याचा संदर्भ जरूर द्या.

गेल्या पाच वर्षांच्या संशोधनाचा हवाला देऊन 'हे सगळं चुकीचंच आहे' असं म्हणण्याऐवजी सर्वांना समजेल अशा शब्दात एक किंवा दोन लेख का लिहीत नाही?

मिपावार लेख लिहिण्याइतका सोपा विषय आहे का? ह्याची शब्दावाली शिकायलाच तीन-चार महिने लागतात. आज शिकलेलं उद्या मोडित निघतं आणि सोपं करण्याच्या नादात गैरसमज पसरले जातात त्याची जबाबदारी कोण घेणार?

हे सगळं फारच सोयीस्कर आहे.

नेमक हेच मला तुमच्या लेखमाले विषयी म्हणायचं आहे. सगळे अवघड प्रश्न सोईस्कर रित्या निरर्थक ठरवले जातात किंवा एखादी अ‍ॅनॉलॉजी देवून टाळले जातात. उदा द्यायचं झालं तर

विज्ञानाच्या मर्यादांपर्यंत जाण्यापेक्षा त्या मर्यादांच्या आतच घट्ट उभं राहून आपल्याला काय समजून घेेता येतं यावर ऊहापोह चालू आहे

जर मर्यादाच माहिती नसतील तर आत आहोत की बाहेर भरकटले गेलोत हे वाचकांना कसं समजनार. एखादा सिद्धांत सांगताना तो कुठे लागू पडतो अथवा पडत नाही हे सांगणे गरजेचं आहे. मर्यादा लपवून ठेवणं काही पटत नाही.

असो चर्चा विज्ञान - तत्त्वज्ञान - वैयक्तिक टिका ह्या प्रवासातून गेली आहे. आवरतो आता.

सोत्रि's picture

29 Dec 2015 - 12:09 pm | सोत्रि

पण इतका क्लिष्ट विषय हाताळण्यासाठी मिपा योग्य जागा वाटत नाही.

मिपाचे व्यासपीठ कोणताही विषय हाताळण्याइतके परिपक्व नक्कीच आहे!
अर्थात तुमच्या मिपाविषयीच्या मताचा आदर आहेच.

तुमचा भर अ‍ॅनालोजीवर जास्त दिसतोय.

व्चरच भर जास्त हवा! तांत्रिक आणि क्लिष्ट बाबी अ‍ॅनालोजीने समजन्यास सोप्या पडतात. लेखकाने म्हटलेच आहे की काही संकल्पना सर्वसामान्यांना समजतील अशी स्वरूपात मांडणे हा ह्या लेखमालेचा हेतू आहे.

खुप क्लिष्ट आणि तांत्रिक लेखन झाले तर तर ते बोजड होते. बोजड तांत्रिक चर्चा करून काहीतरी प्रुव्ह करण्याच व्यासपीठ मिपा खचितच नव्हे!

अर्थात हे माझे वैयक्तिक आणि खाजगीतलं ओपन मत आहे :)

- (अ‍ॅनालोजीवजी भर देणारा) सोकाजी

पॉइंट ब्लँक's picture

29 Dec 2015 - 1:03 pm | पॉइंट ब्लँक

व्चरच भर जास्त हवा! तांत्रिक आणि क्लिष्ट बाबी अ‍ॅनालोजीने समजन्यास सोप्या पडतात. लेखकाने म्हटलेच आहे की काही संकल्पना सर्वसामान्यांना समजतील अशी स्वरूपात मांडणे हा ह्या लेखमालेचा हेतू आहे.

जी गोष्ट व्यवस्थित माहीती आहे त्याला अ‍ॅनालॉजी देता येते. ज्या गोष्टीवर अजून विज्ञानाने प्रकाश टाकला नाही त्याला अ‍ॅनालॉजी देवू नये असं म्ह्णणं आहे. किर्तन आणि वि़ज्ञानातील फरक इथच आहे, किर्तनात थोडा स्वत:ला आवडेल तसा अर्थ लावण्याची आणि त्याला दुसर्या सोप्या भाषेत सांगण्याची मुभा आहे. विज्ञानात ती मुभा उदाहरणांच्या पलिकडे नाही. त्यामुळे स्वेटरची भोकं आणि क्वाँटम ग्रॅव्हिटीची मर्यादा ही अ‍ॅनालॉजी काही पचनी पडत नाही. बाकी ती मान्य करायची की नाही ह्याचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण त्यासाठी विज्ञान आपला मार्ग सोडू शकत नाही.

राजेश घासकडवी's picture

29 Dec 2015 - 10:24 pm | राजेश घासकडवी

क्वाँटम ग्रॅव्हिटीची मर्यादा

या लेखमालेचा उद्देश क्वांटम ग्रॅव्हिटीची चर्चा करणं हा नाहीये. वरच्या लेखात 'मानवाने अनैसर्गिक निवडीतून प्रजाती बदलल्या आहेत. नैसर्गिक निवड याच पद्धतीने होते, फक्त निवडीचे निकष ठरवणारी कोणी व्यक्ती नसते.' हा संदेश दिलेला आहे. आता हे विधान करण्यासाठी क्वांटम ग्रॅव्हिटीत कितीही भोकं असली तरी काय फरक पडतो? 'विज्ञानाच्या मर्यादा सांगितल्या नाहीत तर आपण जे लिहितो आहोत ते आत की बाहेर हे वाचकांना कसं कळणार?' असं तुम्ही विचारता. मला वाटतं कुठचं आत आहे, कुठचं बाहेर आहे, आणि कुठचं मर्यादेवर आहे हे वाचकांना व्यवस्थित समजतं आहे. मिपाच्या वाचकांच्या बुद्धीवर इतका संशय घेऊ नका. या लेखमालेत जर ज्ञाताची मर्यादा ओलांडत असेन तर ते दाखवून द्या. उगाच 'मानवी जीनोममध्ये म्यूटेशनचे दर निश्चितपणे अजूनतरी सांगता येत नाहीत' असे आक्षेप घेण्यात काय अर्थ आहे? या लेखापुरतं - मानवाने प्रयत्नपूर्वक मक्याची छोटीशी शेंग पैदास करून बदलत बदलत आत्ताचं मोठं कणीस निर्माण केलं - हे सत्य या आक्षेपाने कसं बदलतं हे सांगा.

पॉइंट ब्लँक's picture

29 Dec 2015 - 11:09 pm | पॉइंट ब्लँक

इथं चर्चा नंतर करूच. आधी जमल्यास माझ्या वरील प्रतिसादाकडे या. जरा मुद्दा अवघड झाला की पळवाट काढू नका. तसाही हा प्रतिसाद तुमच्यासाठी नव्हताच.

राजेश घासकडवी's picture

29 Dec 2015 - 11:30 pm | राजेश घासकडवी

तुमच्या प्रश्नावर माझं उत्तर सोपं आहे.
१. बहुतेक आक्षेप अवांतर आहेत, आणि ते सुसंबद्ध कसे हे समजावून सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.
२. 'जीवशास्त्राचा पायाच डळमळीत झाला आहे' वगैरे विधानं अतिरंजित आहेत, आणि ती का नाहीत हे समजावून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे.
३. मी इथून पळ वगैरे काढत नाहीये, लेखमालेचे अजून बरेच भाग येणार आहेत. त्यावर साधकबाधक सविस्तर चर्चा शक्य तिथे केलेली आहे.

तेव्हा पुन्हा एकदा सांगतो, स्वतंत्र लेखन करा. या लेखमालेवर येणाऱ्या प्रश्नांपैकी मला ज्या प्रश्नांवर चर्चा करून लोकांच्या आणि माझ्या ज्ञानात भर पडेल, विषयाचा योग्य विस्तार होईल अशा प्रश्नांना उत्तरं देणं मी अधिक पसंद करतो.

पॉइंट ब्लँक's picture

29 Dec 2015 - 11:58 pm | पॉइंट ब्लँक

बहुतेक आक्षेप अवांतर आहेत, आणि ते सुसंबद्ध कसे हे समजावून सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.

चुक. जर म्युटेशन्समुळे उत्क्रांती होत असेल आणि त्यासाठी अब्जावधी वर्ष पुरेसे आहेत असं तुमचं म्हणन असेल तर ते सिद्ध करता आले पाहिजे. म्हणुन त्याचं गणित मांडता येत का हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला. त्यात आवांतर काही नाही. त्यावर तुम्ही गणित मांडता येतं अस उत्तर दिलत. ना त्याचा संदर्भ दिलात ना कसं मांडता येईल ह्यावर काही प्रकाश टाकलात. गणित मांडता येतं हा जर तुमचा दावा असेल तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. गणित मांडण्यात काय अडचणी आहेत हे मी व्यवस्थित लिहिलं आहे. आणि प्रत्येक अडचणीचा संदर्भ देण्याची ही तय्यारी आहे. तुम्ही ती ठेवावी कारण तशी मागणी तुम्ही आधी केलीत.

'जीवशास्त्राचा पायाच डळमळीत झाला आहे' वगैरे विधानं अतिरंजित आहेत, आणि ती का नाहीत हे समजावून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे

वर इतके अपवाद आणि कमतरता दाखवऊनही तुमचं मत बदलत नसेल तर अवघड आहे. सेंट्रल डोग्मा हा जुनक शास्त्राच्या मुलभुत सिदधांतापैकी एक, त्याला तडे जावून ही तुम्ही हा प्रश्न विचारत असाल तर विज्ञानाची नवीन व्याख्या बनवावी लागेल.

या लेखमालेवर येणाऱ्या प्रश्नांपैकी मला ज्या प्रश्नांवर चर्चा करून लोकांच्या आणि माझ्या ज्ञानात भर पडेल, विषयाचा योग्य विस्तार होईल अशा प्रश्नांना उत्तरं देणं मी अधिक पसंद करतो.

चांगला उद्देश आहे. तुम्ही लोकांच्या ज्ञानात भर घालण्यचा वसा घेतला आहेत तर मी लोकांमध्ये गैरसमज पसरू नयेत ह्यासाठी प्रयत्न केले म्हणून कुठ बिघडलं. आणि त्यानिमित्तान काही गोष्टी (नकरात्मक का असेनात, त्या वैज्ञानिक आहेत) वाचकांपर्यंत पोचतात. गैरसमज न करून घेण्यास मिपावरील वाचक सक्षम आहेत असा प्रतिवाद करू नका कारण जर तसं असेल तर ते तुमच्या लेखमालेशिवाय स्वत:च्या ज्ञानात भर घालाण्यास सक्षम असतील. असो इथून पुढे तुम्ही स्वतःच्या मागणिला जागून संदर्भ दयाल आणि जमल्यास पुरावा सोपा करून सांगाल अशी अपेक्षा बाळगतो.

राजेश घासकडवी's picture

30 Dec 2015 - 12:40 am | राजेश घासकडवी

म्यूटेशन रेटचं अचूक गणित मांडता आलं नाही तरीही म्यूटेशन्स होतात हे सत्य कसं बदलतं? या लेखाच्या बाबतीत 'म्यूटेशन्समुळे सहा इंचाच्या कणसापासून काही पिढ्यांनी एक फुटाच्या कणसाची निर्मिती होते' हे सत्य कसं बदलतं?

माझ्या लेखनामध्ये सेंट्रल डॉग्मा कुठे वापरलेला आहे?

तुम्ही स्वतंत्र लेखन करावं ही कळकळीची विनंती पुन्हा एकदा करतो.

पॉइंट ब्लँक's picture

30 Dec 2015 - 6:23 am | पॉइंट ब्लँक

म्यूटेशन रेटचं अचूक गणित मांडता आलं नाही तरीही म्यूटेशन्स होतात हे सत्य कसं बदलतं?

म्युटेशन होतात हे सत्य कोण नाकरातय? "ते होण्याची गती उत्क्रांतीसाठी पुरेशी आहे" ह्यावर प्रश्नचिन्ह लावले आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर अचुक गणित मांडता आलं पाहिजे. आणि हा प्रश्न फक्त ह्या लेखाला
लागू नसून पुर्ण लेख मालेला लागु होतो. अनिसर्गिक निवडीलाही विरोध नाही पण ते ही आपल्याला हवे असणारे म्युटेशन येण्याच्या गतीवर अवलंबून आहे. तुमच्या म्हणण्यानुसार प्रोबॅबिलिटी वाढवात नेता असली तरी ती "किती" वेगाने वाढवता येते आणि तो वेग पुरेसा आहे का हे पाहणे गरजेच आहे असं मला वाटत.

माझ्या लेखनामध्ये सेंट्रल डॉग्मा कुठे वापरलेला आहे?

तुम्ही सेंट्रल डोग्माचा प्रत्यक्षात वापर(उल्लेख जास्ती योग्य शब्द होइल) केला नसला तरीही म्यूटेशन्स चा पेशींवर आणि त्या अनुसंगाने जीवांवर परिणाम कसा होतो हे स्पष्ट करायला सेंट्रल डोग्माच बहुदा वापरला जातो. दुसरा पर्याय होता असं आठवत नाही.

तुम्ही स्वतंत्र लेखन करावं ही कळकळीची विनंती पुन्हा एकदा करतो.

मिपावार मराठीत हे लेखन करण्यास मी सक्षम नाही. तुमच्या लेखमालेच्या अनुसंगाने ज्या गोष्टी पटल्या नाहीत ते प्रश्न मराठीत लिहनं कठिण जातय. तिथं लेख काय लिहिणार.

राजेश घासकडवी's picture

30 Dec 2015 - 7:16 am | राजेश घासकडवी

आता कसं बोललात. म्हणजे म्यूटेशन्स होतात, आणि त्यामुळे बदल होतो, हे तुम्हाला मान्य आहे तर. तुमचा आक्षेप असा आहे की 'प्रवास होतो आहे, पण जर वेगच मोजता येत नसेल तर प्रवास होतो आहे हे कसं म्हणता येईल?' मग फॉसिल रेकॉर्डविषयी तुमचं काय मत आहे? तिथे बदल होताना दिसतो की नाही? अनेक वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये उत्क्रांती घडताना दिसलेली आहे - तिथे बदल होत आहेत की नाहीत? ते म्यूटेशन्समुळे होतात की चमत्कारांमुळे? की त्या सर्व म्यूटेशन्सचा रेट प्रेडिक्ट करता आला नाही तर सगळंच निरर्थक ठरतं?

तुम्ही सेंट्रल डोग्माचा प्रत्यक्षात वापर(उल्लेख जास्ती योग्य शब्द होइल) केला नसला तरीही म्यूटेशन्स चा पेशींवर आणि त्या अनुसंगाने जीवांवर परिणाम कसा होतो हे स्पष्ट करायला सेंट्रल डोग्माच बहुदा वापरला जातो.

माझ्या लेखमालेत केवळ 'डीएनएत बदल होतात, त्यातून पेशींमध्ये बदल होतात' इतकंच म्हटलेलं आहे. सेंट्रल डॉग्मामध्ये असलेली आरेनएची पायरी वापरलेली नाही. डीएनएमधले बदल पेशींमध्ये कसे ट्रान्सलेट होतात याविषयी एक अक्षरही बोललेलो नाही. मी फक्त टॉप लेव्हलवर रेणंपासून पेशी कशा उद्भवू शकतात, नैसर्गिक निवड कशी होऊ शकते, त्यातून प्रजाती कशा बदलू शकतात एवढंच लिहिलेलं आहे. सेंट्रल डॉग्मानुसारची इन्फर्मेशन ट्रान्स्फर कशी होते आणि प्रोटीन सिंथेसिस कसं होतं हे किंचित कोडं असेलही, पण त्याने माझ्या कुठच्या युक्तिवादावर फरक पडतो? कृपया लेखमाला नीट वाचा आणि त्यातले आक्षेपार्ह भाग दाखवून द्या.

मिपावार मराठीत हे लेखन करण्यास मी सक्षम नाही.

हे फारच सोयीस्कर आहे. पण तुम्ही आत्तापर्यंत प्रतिसाद लिहिण्यात जितकी शक्ती खर्च केलीत तितकी युक्तिवाद मांडण्यासाठी खर्च केली असतीत तर दोन लेख नक्की झाले असते.

असो. इथे मी थांबतो, कारण अवांतरापलिकडे काही हाती लागत नाही. यापुढची चर्चा व्यनित किंवा खरडवहीत करू.

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2015 - 12:30 am | पॉइंट ब्लँक

पण तुम्ही आत्तापर्यंत प्रतिसाद लिहिण्यात जितकी शक्ती खर्च केलीत

त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. त्याची दोन कारणं असू शकतात, नक्की आक्षेप कुठल्या गोष्टीला घेतलाय हे सुद्धा तुम्हाला समजलेल दिसत नाही आणि तेही ते आक्षेप का महत्वाचे आणि योग्य आहेत ह्याचं पुरेपुर स्पष्टीकरण देवून.

अवांतरापलिकडे काही हाती लागत नाही. यापुढची चर्चा व्यनित किंवा खरडवहीत करू.

तिथेही कुणाच्या हाती काही लागेल असं वाटण्याचं कारण नाही. त्यामुळे चर्चा इथून तिथं नेण्यात काही अर्थ नाही. प्रतिसादांमध्ये प्रश्न विचारायचा माझा अधिकार आहे तो मी मला योग्य वाटेल तेव्हा वापरेन. माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहेच, तुम्ही तो तुम्हाला योग्य वाटेल तसा वापरा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Dec 2015 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान माहिती. काव्यात्मिक व अध्यात्मिक सूट घेण्याचा आणि अतीसुलभीकरण करण्याचा मोह टाळलेला असल्याने हा लेख आवडला. पुभाप्र.

मारवा's picture

28 Dec 2015 - 9:20 pm | मारवा

हा भाग अगोदरच वाचलेला आहे फार आवडलेला आहे इथे नविन प्रतिसाद व चर्चेसाठी वाचतो. मात्र त्यात ठाकुर गुरुजी नसल्याने अजिबात रोचक वाटला नाही. ठाकुर गुरुजी व तुमच्या मधील चर्चेने मला एन्डींग ऑफ टाइम झाल्याचा अप्रतिम फिल येतो अर्थात तुम्ही डेव्हीड बोहम नाहीतच मात्र ठाकुर साब हमे जे.कृष्णमुर्तींची आठवण करुन देतात म्हणजे एन्डिंग ऑफ टाइम जणु माझ्यासमोरच आलाय अस वाटत.
असो

सोत्रि's picture

28 Dec 2015 - 9:33 pm | सोत्रि

तंतोतंत!

- (ठाकूर गुर्जींची वाट पाहणारा) सोकाजी

जेनेटिक म्युटेशन मधून कृत्रिम निवड हा क्लिष्ट होउ शकणारा उहापोह अतिशय सोप्या भाषेत आला आहे!

पु भा प्र!

- (कृत्रिम निवड झालेला) सोकाजी

अर्धवटराव's picture

29 Dec 2015 - 7:13 am | अर्धवटराव

=)) =))
सोकाजीराव... ३१ येतेय लवकरच. तुमच्यासोबत ओला कट्टा जमवायची तीव्र इच्छा आहे =))

विवेक ठाकूर's picture

29 Dec 2015 - 11:21 am | विवेक ठाकूर

'आपण कसे निर्माण झालो' हा प्रश्न जास्त जवळिकीचा वाटणार नाही का?

तेच तर पहिल्या लेखापासनं विचारतोयं, `निर्जीवातून सजीव कसा निर्माण झाला ?'

आणि नेमकं तेवढं सोडून बाकी कसल्या कसल्या थियरीज फक्त इंग्रजीतून मराठीत लिहीणं चालू आहे.

एकदा `इतकी अब्ज वर्ष' म्हटलं की वाचक गार आणि लेखक नवी ठोकाठोकी करायला तयार.

आरोह's picture

29 Dec 2015 - 3:50 pm | आरोह

ह्याचे उत्तर "सेल्फ replicating molecules " , असे आहे ...असे लेखकाला म्हणायचे आहे असे वाटते...माझ्या माहिती नुसार self replicating molecules वर अजून संशोधन सुरु आहे

विवेक ठाकूर's picture

29 Dec 2015 - 6:27 pm | विवेक ठाकूर

लेखकाचं भन्नाट स्टेटमंट पाहा :

एकदा पुनरुत्पादनावर लक्ष केंद्रित केले की मग आपल्याला अचेतन आणि सचेतन यांच्यातली दरी नाहीशी करता येते. कारण या प्रकारचे 'पुनरुत्पादन' अगदी सोप्या स्वरूपात आपल्याला निर्जीवांमध्येही दिसते.

लेखकाला रुपांतरण आणि पुनरुप्तादन या एकच प्रक्रिया वाटतात!

आणि हाईट म्हणजे, सजीवांचं एकमेव लक्षण `प्राण' आहे, तोच नसेल तर पुनरुप्तादन कसं करणार?

त्यामुळे निर्जिवातून सजीव कसा निर्माण झाला हे न सोडवता लेखक `विश्वाची उत्पत्ती' कशी झाली आणि उत्क्रांती कशी झाली याच्या स्टोर्‍या लावताहेत.

एकदा `इतकी अब्ज वर्ष' म्हटलं की वाचक गार आणि लेखक नवी ठोकाठोकी करायला तयार.

=)) जियो थाकुर