भाग १ - काळाचा आवाका
ऋग्वेद १०.१२९ । ऋषिः परमेष्ठी प्रजापतिः । छन्दः त्रिष्टुप् । देवता भाववृत्तम् ।
नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥
न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः ।
आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥
सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही. धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं. काही झाकलेलं नव्हतं, की लपलेलं नव्हतं. त्या क्षणी ना मृत्यू होता, ना मृत्यूपासून सुटका. एका निर्वात, निरावकाशाने स्वतःला जेव्हा आणलं, आणखी काही काही तिथे नव्हतं.
----
कुठल्यातरी तप्त वायूंची एक तबकडी स्वतःभोवती भिरभिरली. त्यातला मुख्य भाग गुरुत्वाकर्षणाने केंद्राकडे खेचला गेला. हा आपला सूर्य. त्या तबकडीच्या काही भागांत इतर वायू गोळा झाले. त्यांचे जागोजागी गोळे झाले. ते अव्याहतपणे गुरुत्वाकर्षणाने सूर्याभोवती फिरत राहिले. पोटात कमीजास्ती आग राखून ठेवून थिजले. आपापल्या परीने घट्ट-विरळ, ओले-कोरडे, थंड-गरम झाले. हे आपले सूर्यमालेतले ग्रह. त्यातलीच एक आपली पृथ्वी. पृथ्वीच्या उकळत्या लाव्ह्यावर थंड सायी आल्या, त्यांची जमीन झाली. पोटातून निसटणारी वाफ पाणी होऊन जमिनीवर स्थिरावली आणि वातावरणाचं पांघरुण टिकून राहिलं. त्यातच आपल्याला दिसणारी सर्व जीवसृष्टी फुलली. ही गेल्या साडेचार अब्ज वर्षांची कथा आहे. पण मुळात ही तप्त वायूची तबकडी आली कुठून?
त्यासाठी आपल्याला अजून मागे जावं लागतं. गेल्या लेखात आपण पृथ्वीच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी एक वाव पसरून उभा राहिलेल्या माणसाची प्रतिमा डोळ्यांसमोर आणली. पण संपूर्ण विश्वाचा उगम बघायचा झाला तर त्या माणसाच्या अलिकडे अजून दोघांना वाव पसरून उभं राहावं लागेल. कारण विश्वाचं वय पृथ्वीच्या वयाच्या जवळपास तिप्पट आहे - १३.८ अब्ज वर्षं. हे वय आपल्याला अगदी अचूकपणे माहीत आहे - त्यातली संभाव्य त्रुटी हजारात पाच इतकीच आहे. आता हे वय कसं मोजलं? हे समजावून घेण्यासाठी आपल्याला महास्फोटाचा सिद्धांत (ज्याला सामान्यपणे बिग बॅंग असं नाव आहे) थोडासा समजावून घ्यावा लागेल.
दूरदूरच्या दीर्घिकांचा (आपल्या आकाशगंगेप्रमाणेच इतर तारकासमूहांचा) अभ्यास करताना शास्त्रज्ञांना हे लक्षात आलं की प्रत्येक तारकासमूह आपल्या आकाशगंगेपासून दूर दूर चाललेला आहे. हे काहीसं चक्रावून टाकणारं होतं. कारण पृथ्वी हे विश्वाचं केंद्रस्थान नाही, तो एका साध्यासुध्या दीर्घिकेतल्या साध्यासुध्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आहे हे उघड होऊनही शतकं लोटली होती. मग आता बरोब्बर आपणच केंद्रस्थानी असल्याप्रमाणे विश्व का वागत होतं? थोडी गणितं केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे तारकासमूह नुसतेच दूर जात आहेत असं नाही, तर जितके लांबचे तितके अधिक वेगाने दूर जात आहेत. याची सांगड कशी लावायची? लवकरच त्यांना उत्तर सापडलं. हे तारकापुंज फक्त आपल्यापासून दूर जात नसून, सगळेच सगळ्यांपासूनच दूर जात आहेत. किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर हे विश्वच प्रसरण पावतं आहे. अवकाशाची व्याप्तीच वाढते आहे.
गुलाबजाम तळायला टाकला की तो मोठा होतो हे आपण अनुभवलेलं आहे. आता कल्पना करूया की त्या गुलाबजामच्या आतमध्ये सगळीकडे पसरलेले बरेचसे वेलचीचे दाणे आहेत. आपण कुठच्यातरी वेलचीच्या दाण्यावर बसून इतर दाण्यांकडे बघत आहोत अशीही कल्पना करू. जसजसा गुलाबजाम मोठा होत जाईल, तसतसे तुमच्या मागचे पुढचे, वरचे खालचे सर्वच दाणे आपल्यापासून दूर जाताना दिसतील. कारण आख्खा गुलाबजाम फुलतो आहे. आता हा गुलाबजाम म्हणजे संपूर्ण विश्व, त्यातला खवा म्हणजे अवकाश, आणि वेलचीचे दाणे म्हणजे तारकासमूह हे समजून घेतलं की सर्वच तारकासमूह आपल्यापासून दूर का जात आहेत याचं कोडं सुटतं. किंवा हीच कल्पना एका फुग्याचं उदाहरण घेऊनही सांगता येते. समजा, एका फुग्यावर अनेक ठिपके काढलेले आहेत. यापैकी कुठल्याही दोन ठिपक्यांमधलं अंतर फुग्याच्या पृष्ठभागावर रेषा काढून मोजता येतं. आपण जसजसा फुगा फुगवू तसं प्रत्येकच ठिपक्यांच्या जोडीतलं अंतर वाढताना दिसेल.
तर विश्व विस्तारतं आहे. याचा अर्थ आपण जसजसं इतिहासात जाऊ तसतसं ते लहान होत जाणार. आणि एक क्षण असा येईल की ते एका बिंदूमध्ये सामावलं असेल. तिथपासून ते आत्तापर्यंतच्या विस्ताराची कथा भौतिकीच्या (फिजिक्सच्या) नियमांच्या आधारे सांगणारा सिद्धांत म्हणजे महास्फोट सिद्धांत - बिग बॅंग थियरी. या सिद्धांताच्या आधारे या स्फोटानंतरच्या अगदी काही मिलीसेकंदांपासून पुढे काय झालं याचं अगदी स्पष्ट टप्प्याटप्प्याचं चित्र मांडण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरलेले आहेत. या मांडणीमुळे अर्थातच 'इतक्या अब्ज वर्षांनी अमुक अमुक गोष्टी दिसतील इतक्या इतक्या प्रमाणात दिसतील' अशा प्रकारची काही भाकितं करता येतात. त्यातली एक म्हणजे विस्ताराचा वेग. एका विशिष्ट प्रकारच्या सुपरनोव्हांचा - अत्यंत प्रखर ताऱ्यांचा - अभ्यास करून हा वेग मोजला. तो बरोब्बर १३.८ अब्ज वर्षांनी जितका असायला हवा तितका आला. कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड रेडिएशन वापरून तापमानात होणारे चढउतार मोजले. तेही त्याच सिद्धांताच्या गणितानुसार १३.८ अब्ज वर्षांनी जितके असायला हवे तितकेच आहेत हे दिसून आलं. तसंच तारकासमूहांचं एकमेकांपासूनचं सरासरी अंतर किती असेल याचंही महास्फोट सिद्धांतानुसारचं गणित आणि सध्याचं निरीक्षण यामधूनही १३.८ अब्ज वर्षांचाच आकडा मिळतो.
थोडक्यात या सिद्धांताच्या तीन अंगांचा अभ्यास केला तर तिन्हींमधून उत्तर एकच येतं - आणि सत्याशी मिळतंजुळतं ठरतं. यापलिकडे अवकाशात प्रत्यक्षात दिसणाऱ्या अनेक गोष्टींची संगती लागते. महास्फोटाच्या सिद्धांतानुसार हायड्रोजन आणि हेलियम विश्वात प्रचंड प्रमाणात असतील आणि तसेच ते दिसतात. 'कॉस्मिक मायक्रोवेव्ह रेडिएशन दिसायला हवं' हेही महास्फोट सिद्धांताचं - आता खरं ठरलेलं भाकित आहे. म्हणजे आरोपीच्या हाताचे ठसे शस्त्रावर मिळणं, मृत व्यक्तीच्या कपड्याचे तंतू आरोपीच्या अंगावर सापडणं, शस्त्र विकत घेतल्याची पावती त्याच्याकडे सापडणं असे तीन स्वतंत्र पुरावे सापडले तर आरोपीच खुनी आहे हे ओळखू येतं. त्याहीपलिकडे त्याच्याकडे खून करण्यासाठी सबळ कारण असणं, आधी त्याने धमकी दिलेली असणं, त्या वेळेसाठी त्याच्याकडे दुसरीकडे असण्याचा पुरावा नसणं हेही दिसून आलं तर त्यावर शिक्कामोर्तबच होतं. इतकेच किंवा त्याहूनही अधिक भक्कम पुरावे महास्फोट सिद्धांतासाठी आहेत. याचा अर्थ सगळेच बारीकसारीक प्रश्न सुटलेले आहेत असं नाही. पण म्हणून आत्तापर्यंत सापडलेलं उत्तर टाकून देण्याची पाळी येणार नाही इतकं चांगलं सर्वसाधारण उत्तर सापडलेलं आहे हे निश्चित.
पण मग १३.८ अब्ज वर्षांपूर्वी काय होतं? हा महास्फोट का झाला? तो कोणी घडवून आणला का? हे प्रश्न थोडे फसवे आहेत. कारण काळ आणि अवकाशच सुरू होण्याचा तो 'क्षण' आहे. अवकाश म्हणजे काही खरोखरचा गुलाबजाम नाही, जो आधी कोणीतरी तयार करावा लागतो. आख्खं विश्वच त्या एका बिंदूत सामावलेलं होतं. तिथपासून वेळेची मोजणी सुरू झाली. असं असताना 'त्याआधी काय होतं?' हा प्रश्नच निरर्थक ठरतो - शून्याने भाग देण्यासारखा.
वर उद्धृत केलेल्या नासदीय सूक्तात म्हटलेलं आहे - 'सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही.' ही न-असण्याची स्थिती आपल्याला डोळ्यासमोर आणता येत नाही. 'धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं.' या वस्तुमान अवकाश नसण्याच्या स्थितीची कल्पनाही आपल्याला करता येत नाही. नासदीय सूक्ताच्या कर्त्याला अर्थातच महास्फोट सिद्धांताचं ज्ञान नव्हतं. कारण या कळसापर्यंत पोचण्यासाठी आधी न्यूटन, नंतर आइन्स्टाइन आणि त्यानंतर आलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी बांधलेल्या पाया, पायऱ्या आणि खांबांचा आधार लागतो. जर कोणीतरी काढलेल्या चित्रात आजच्या देवळाच्या कळसासारखा आकार दिसत असेल तर त्यावरून त्याकाळी आख्खं देऊळ होतं असं म्हणणं योग्य ठरत नाही. नासदीय सूक्तातलं वर्णन हे काव्यात्म वर्णन आहे. सत्य परिस्थितीच्या जवळ जाणारं आहे इतकंच. शब्दांच्या, भाषेच्या मर्यादा या सूक्तातही जाणवतात - कारण काळच सुरू झालेला नसतानाही तिथे-तेव्हा असे स्थितीकालदर्शक शब्द वापरल्यावाचून त्या परिस्थितीचं वर्णन करता येत नाही. त्यामुळे हा महास्फोट कोणी केला, कधी केला, कुठे केला हे प्रश्नच काहीसे निरर्थक बनून जातात. तो झाला हेच निश्चितपणे म्हणता येतं.
(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)
वाचने
29544
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोप्या भाषेतला छान लेख.
छान मालिका.
अजून...
"त्यामुळे हा महास्फोट कोणी
हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक
In reply to "त्यामुळे हा महास्फोट कोणी by रामपुरी
तुमचे विचार जर वेगळे असतील,
In reply to हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक by राजेश घासकडवी
ही लेखमाला प्रस्थापित विज्ञान
In reply to हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक by राजेश घासकडवी
अतिशय हास्यास्पद विधान
In reply to हे पटलं नाही. प्रश्न निरर्थक by राजेश घासकडवी
आवडला लेख.
मस्त. पु भा प्र
मस्त. पु भा प्र
नासदासीन्नोसदासीत्तादानीं
भारत एक खोज वा भारत की खोज
In reply to नासदासीन्नोसदासीत्तादानीं by मिलिंद
हो.
In reply to भारत एक खोज वा भारत की खोज by असंका
भारत एक खोज
In reply to भारत एक खोज वा भारत की खोज by असंका
धनंजयने या संपूर्ण सूत्राचं
In reply to नासदासीन्नोसदासीत्तादानीं by मिलिंद
धन्यवाद हो घासुगुर्जि.. हे
In reply to धनंजयने या संपूर्ण सूत्राचं by राजेश घासकडवी
नासदीय सूक्त-शब्दांतरिताचे
In reply to धन्यवाद हो घासुगुर्जि.. हे by अत्रुप्त आत्मा
या संदर्भातले कार्यक्रम नेहरु
त्यामुळे हा महास्फोट कोणी
त्यामुळे हा महास्फोट कोणी केला, कधी केला, कुठे केला हे प्रश्नच काहीसे निरर्थक बनून जातात.शास्त्रिय जगतात असे म्हटले जाते की, "प्रत्येक उत्तर त्याच्या बरोबर शंभर प्रश्न घेऊन येते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्याच प्रयत्न होत गेल्यानेच शास्त्राची इथपर्यंत प्रगती होत गेली आहे." मग, कोणताही प्रश्न निरर्थक कसा होईल ? आणि प्रश्न असे निरर्थक म्हणुन सोडून दिले तर शस्त्राची प्रगती कशी होईल ?तो झाला हेच निश्चितपणे म्हणता येतं.The Big Bang Theory is the leading explanation about how the universe began. Because current instruments don't allow astronomers to peer back at the universe's birth, much of what we understand about the Big Bang Theory comes from mathematical theory and models. विश्वाच्या उत्पत्तीसंबंधात सद्या उपलब्ध असलेल्या सिध्दांतांपैकी बिग बँग हा सर्वात जास्त मान्यताप्राप्त "सिध्दांत आहे (निश्चितपणे सिध्द झालेले सत्य नाही)"इतक्या उत्तम विषयावरच्या व
In reply to त्यामुळे हा महास्फोट कोणी by डॉ सुहास म्हात्रे
- बिग बॅंग झाला हे निश्चित का
In reply to इतक्या उत्तम विषयावरच्या व by डॉ सुहास म्हात्रे
"शास्त्राच्या दृष्टीने कोणताच
In reply to - बिग बॅंग झाला हे निश्चित का by राजेश घासकडवी
अरे हो...
In reply to "शास्त्राच्या दृष्टीने कोणताच by डॉ सुहास म्हात्रे
अहो, तुम्हाला साधा प्रश्न
In reply to "शास्त्राच्या दृष्टीने कोणताच by डॉ सुहास म्हात्रे
चला, म्हणजे बिग बँग थियरी
In reply to अहो, तुम्हाला साधा प्रश्न by राजेश घासकडवी
धन्यवाद हो घासुगुर्जि.. हे
पुभाप्र. नासदीय सूक्त अनुवाद
सार्थक आणि निरर्थक
निरर्थक या शब्दावरून उगीच
In reply to सार्थक आणि निरर्थक by चित्रगुप्त
उत्तरे
In reply to निरर्थक या शब्दावरून उगीच by राजेश घासकडवी
अहो ते फारच गहन प्रश्न आहेत.
In reply to उत्तरे by चित्रगुप्त
पहीला इंग्रज
हे बाकी खरं हां....
In reply to पहीला इंग्रज by मारवा
अहो तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे.
In reply to हे बाकी खरं हां.... by संदीप डांगे
मारवा, लै त्रागा नका करुन घेऊ
In reply to अहो तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे. by मारवा
एवढी बडबड करण्यापेक्षा देव
In reply to मारवा, लै त्रागा नका करुन घेऊ by संदीप डांगे
मी कधी म्हटलंय की देव आहे
In reply to एवढी बडबड करण्यापेक्षा देव by नगरीनिरंजन
तुम्हाला देव नाकारायला कोणी
In reply to मी कधी म्हटलंय की देव आहे by संदीप डांगे
म्हणूनच म्हटलं, आगापिछा माहित
In reply to तुम्हाला देव नाकारायला कोणी by नगरीनिरंजन
+1
In reply to हे बाकी खरं हां.... by संदीप डांगे
शतशः दंडवत
In reply to पहीला इंग्रज by मारवा
छान मालिका
""अतिशय हास्यास्पद विधान
"विज्ञानात अजून बरेच (पूर्ण)
In reply to ""अतिशय हास्यास्पद विधान by कंजूस
पहीला इंग्रज महत्वाचा बास.
विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले
In reply to पहीला इंग्रज महत्वाचा बास. by ३_१४ विक्षिप्त अदिती
विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले फाटे येऊदेत. ते मला विनोदासाठी वापरून घेता येतील.वा, वा ! "मलाच्च सगळे म्हायतेय, इतरांना काय कळतेय ?"... असे समजणे शास्त्रिय विचाराला मारक असते... असे ऐकले आहे. आणि "जेव्हा शास्त्रिय प्रतिवाद करणे शक्य नसते आणि/किंवा आपली चूक स्विकारण्याचे घैर्य नसते (जे शास्त्रिय विचारसरणीत आवश्यक समजले जाते), तेव्हा दुसर्यांना बुद्दू ठरवून वेळ मारून नेण्याची पाळी येते"... असेही ऐकले आहे ;) :)खिक्क
In reply to विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले by डॉ सुहास म्हात्रे
मला काय कळत नाही हे मला कळतं.
In reply to विकीपीडीयाछाप आकलनावर फाडलेले by डॉ सुहास म्हात्रे
आपल्या ज्ञानाच्या क्षमता आणि
In reply to मला काय कळत नाही हे मला कळतं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
???
In reply to मला काय कळत नाही हे मला कळतं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
अय्या, अदि तिने लेख वाचलेले
In reply to पहीला इंग्रज महत्वाचा बास. by ३_१४ विक्षिप्त अदिती
खिक्क!
In reply to अय्या, अदि तिने लेख वाचलेले by pacificready
मानवाचा, पृथ्वीचा आणि विश्वाचा निर्माता कोण
"स्फोट होण्यापुर्वी" असे
ननि मार्मिक प्रतिसाद !
In reply to "स्फोट होण्यापुर्वी" असे by नगरीनिरंजन
"स्फोट होण्यापुर्वी" असे
In reply to "स्फोट होण्यापुर्वी" असे by नगरीनिरंजन
सिंग्युलॅरिटी हा शब्द तुम्ही
In reply to "स्फोट होण्यापुर्वी" असे by दत्ता जोशी
सहमत.
In reply to सिंग्युलॅरिटी हा शब्द तुम्ही by नगरीनिरंजन
डांगे साहेब चहा प्यायचा का?
In reply to सहमत. by संदीप डांगे
कॉफी घेऊ. थंड किंवा गरम न
In reply to डांगे साहेब चहा प्यायचा का? by pacificready
वरचा माझा प्रतिसाद चुकलाय.
In reply to सहमत. by संदीप डांगे
काळजी नसावी. कारण जो क्रमांक
In reply to वरचा माझा प्रतिसाद चुकलाय. by संदीप डांगे
या लेखात विवेचन आहे थोडंसं.
In reply to सहमत. by संदीप डांगे
लिंकसाठी धन्यवाद!
In reply to या लेखात विवेचन आहे थोडंसं. by नगरीनिरंजन
धन्यवाद. लेखात स्टीफन होकिन्स
In reply to या लेखात विवेचन आहे थोडंसं. by नगरीनिरंजन
त्यालाच विज्ञान म्हणतात हो!
In reply to धन्यवाद. लेखात स्टीफन होकिन्स by दत्ता जोशी
हायपोथिसिस आहे ते मान्य आहेच.
In reply to त्यालाच विज्ञान म्हणतात हो! by नगरीनिरंजन
"हायपोथिसिस आहे म्हणजे ते
In reply to हायपोथिसिस आहे ते मान्य आहेच. by नगरीनिरंजन
वैयक्तिक घेतलेले नाही आणि
In reply to "हायपोथिसिस आहे म्हणजे ते by दत्ता जोशी