माझ्या मुलीने मागील वर्षी केलेली एक कविता. मी जास्त वेळ ऑफिस मधे घालवतो आणि सुट्टिच्या दिवशी खेळायला जातो ह्याची तक्रार आहे इथे -
एक होते बाबा
ते रोज जातात ऑफिसला
आणि त्यांना असली सुट्टि कि
ते जातात खेळायला
आणि येत नाहि लवकर
येत नाहि लवकर....
-- श्रेया उर्फ कुकी (वय वर्षे ५)
---
कवितेमुळे डोक्यात प्रकाश लवकर पडला :) - वर पोरीच्या वाटेला कवतिकाचे बोलहि आले. तुमच्या चिमण्यांची अशीच बडबडगीते/किस्से/शहाणपणाचे बोल... इथे शेअर करणार का?
प्रतिक्रिया
5 Sep 2008 - 3:13 pm | प्रियाली
वय वर्षे पाचच्या मानाने चांगलीच आहे कविता. खालील कविता आमच्या मुलीची. वय वर्षे ६-७ (१ली तून २रीत जाताना) शाळेच्या शेवटच्या दिवशी बाईंना दिली होती.
Its the last day of the school
I will miss you, I will miss my friends too.
I will be sad but I'm happy for
I am going to Second grade.
I am proud of you and first grade too,
For all the things we did and
For all the fun we had.
More kids are coming....
You'll have fun, won't you?
I just want to say
Thank you!
Thank you!
Thank you!
सध्या कवितांचे वेड मागे पडलेले आहे.
5 Sep 2008 - 4:41 pm | पांथस्थ
आता हि कविता आम्ही पण पोरिच्या बाईंना देनार... टिंग टिंग...
मस्त भावपुर्णं आहे कविता...मला वाटते आपण त्यांना आपल्या अपेक्षांच्या (राक्षसी???) ओझ्याखाली दाबु पर्यंत लहान मुले अतिशय प्रतिभावान असतात...
5 Sep 2008 - 7:59 pm | चतुरंग
वेगवेगळी वेडे वयाप्रमाणे बदलत जातात. त्यातलेच काही जास्त टिकणारे पुढे चालू रहाते. तिच्या कविता चालू राहूदेत. शुभेच्छा!
चतुरंग
5 Sep 2008 - 7:30 pm | श्रीनिवास सुतार
छान कविता केली आहे.
5 Sep 2008 - 7:34 pm | प्राजु
प्रियाली,
आई मधली साहित्यिका लेकीत पण आली वाटतं... सुंदर आहे कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Sep 2008 - 8:02 pm | चतुरंग
मुलं त्यांच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करतात, त्याकडे लक्ष देणे मात्र जमायला हवे.
तुम्ही मुलीच्या तक्रारीकडे लक्ष देऊन तिला जास्त वेळ द्यायला सुरुवात केलीत ह्यातच त्या कवितेचे, मुलीचे आणि तुमचे यश आहे! :)
चतुरंग
6 Sep 2008 - 8:29 am | विसोबा खेचर
पांथस्थराव, आपल्या लेकीचं कौतुक वाटलं. उत्तम कविता केली आहे! तिला माझे अनेकानेक शुभाशीर्वाद! :)
भयालीदेवींची लेकदेखील इतकं छान लिहिते हे माहीत नव्हतं! चला, बरं आहे! मुलीचं मन कवीमनाचं आहे, आईसारखं कजाग अन् भांडखोर नाही! :)
आपला,
कुकीचा अन् भयालीदेवीच्या लेकीचा - तात्यामामा! :)
बाय द वे, पांथस्थकाका हापिसला सुट्टी असली की नक्की कुठे, अन् काय खेळायला जातात ह्याबद्दल अंमळ उत्सुकता आहे! :)
6 Sep 2008 - 12:30 pm | पांथस्थ
कवतिका बद्दल धन्यवाद!
बंगळुरला आमच्या सोसायटिमधे एक मस्त खेळसंकुल आहे....स्वारी तिथे फुल-फळी (बॅडमिंटन ला योग्य मराठी शब्द सुचवणार का?) खेळायला जाते! ऊद्दिष्ट - मनाला तणाव आणि शरीराला चरबी मुक्त करणे ;) इतर मिपाकर ह्यासाठी काय करतात हा चर्चेचा चांगला विषय होउ शकेल!
(कवितेत हरवुन जाणारा) पांथस्थ...
7 Sep 2008 - 8:48 am | llपुण्याचे पेशवेll
फुल-फळी ऐवजी फुल -जाळी कसा वाटतो?
पुण्याचे पेशवे
7 Sep 2008 - 9:45 am | पांथस्थ
एकदम झकास!!!
(मराठमोळा) पांथस्थ
6 Sep 2008 - 8:01 pm | प्रियाली
धन्यवाद हो!
आपली (कजाग) ;)
प्रियाली.
6 Sep 2008 - 12:35 pm | प्रमोद देव
पुलं ह्या खेळाला "फुले थोपटणे" म्हणतात.
(संदर्भ: असा मी असामी)
6 Sep 2008 - 2:05 pm | राघव
छानच की! दोन्ही कविता सुंदर आहेत. दोघींनाही मनापासून आशीर्वाद!
बाकी मस्त कल्पना आहे तुमची पांथस्थ :) (मला तरी सध्या याचा अनुभव नाही बुवा :D. त्यामुळे इथे विषयाला धरून जास्त काही लिहिणे शक्य होणार नाही.. त्याबद्दल क्षमस्व!)
माझी पुतणी, वैष्णवी - वय वर्षे ३, मात्र अतिशय लळा लावून आहे! लहान मुले निरागस, सरळ मनाची असतात हे तर खरेच.. पण काही स्वभावत:च निखळ खळाळत्या झर्यासारखी असतात. ही गुंजा (मी तिला लाडाने अशी हाक मारतो :X ) त्यातलीच एक..
साधारणपणे बाहेरगावी जायला निघालो की आई-काकू म्हणतात "सांभाळून जा"! हे तिने कधीतरी ऐकलेले असणार.. मागे मी एकदा असाच बंगलोरला परत यायला निघालो त्यावेळी काकूने असे नेहमीप्रमाणे म्हटले नाही.. ते बघून गुंजा अचानक म्हणाली, "लाऊलकाका शांबालून जा हां..". तिने इतक्या सहजपणे अन् ध्यानीमनी नसतांना म्हटले ना ते की अगदी विसरूच शकत नाही!! अजूनही काकूच्या मागून हळूच डोकावणारा तिचा चेहेरा आठवतो तसे म्हणतांनाचा.. पटकन उचलून एक मुका घेतला तिचा तेव्हा कुठे जरा बरे वाटले :)
खूप गोड आठवण जागवल्याबद्दल धन्यवाद!
मुमुक्षू