अकबर बिरबल (मोत्यांची शेती)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
28 Sep 2015 - 7:44 pm

याआधीचा भाग: अकबर बिरबल (मेहुण्याची शिफारस)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अकबर बिरबल (मोत्यांची शेती)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

[दृश्य: अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष. अकबर पलंगावर असलेल्या लोड आणि तक्क्यांवर रेलून पाय लांब करून निवांतपणे बेगमबरोबर जी समोरच पलंगावर दोन्ही पाय एका बाजूला दुमडून बसली आहे, बुद्धीबळ खेळत आहे. पलंगाच्या बाजूला एका मेजावर फळफळावांचे सजलेले ताट आहे व त्याच्या बाजूला अकबराच्या पायाजवळ एका आरामखुर्चीत बिरबलही त्यांचा खेळ पाहत निवांत बसला आहे.]

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्थळ: बेगमचा शयनकक्ष.
काळ: निवांतपणे घालवण्याचा.
वेळ: लवकरच कुणावर तरी येईल अस वाटणारी!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पात्रे:
१) अकबर
२) बेगम
३) बिरबल
४) शिपाई नंबर १
५) शिपाई नंबर २
६) प्रधान

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(अकबर आणि बेगम यांच्यात बुद्धीबळाचा डाव सुरू आहे. पण अकबर आणि बेगम दोघंही खेळाला कंटाळल्यासारखी दिसत आहे. आणि बिरबल आपलं विनाकारण दोघांनाही प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे)

बेगम: मी काय म्हण्ते, बास करायचा का आपण खेल. मांजा हात, खेलून खेलून दुकाया लागलाय.
अकबर: हां... आवरे, असा बी मांज्याकरं येक घोरा, येक हती आन दोनच प्यादे आन तुज्याकर तर नुसतेच तीन प्यादे राह्यलेत.
बेगम: हां, राजा आन वजीर मेल्यावर काय मजा नाय ह्या खेलात! काय बोलतो बोल बिरबल?
बिरबल: आवरराक्का (अकबर आणि बेगम दोघेही दचकल्याचे बघून बिरबल लगेच सावरतो) स्वारी... बेगमसर्कार तुम्हाना बोर झालाय का? मंग आस करा, तुमी नी बादशा एका बाजूसनी खेला आन मी एकटा दुस-या बाजूसनी खेलतो, बोला चालतय का?
अकबर: (नकारार्थी मान हालवीत) नक्को! तू जल्ला केवरा हुशार हायेस! दोन मिंटात आम्हाना हरवशील.
बिरबल: बादशानु, तुम्ही म्हण्ताव त जरा वेलाने हरवतो. आवर काय तेच्यात?
बेगम: ठीके...पण तू डाव-या हातान खेलाच काय चाब-या! आम्ही दोघ उजव्या हातानीच खेलणार!
बिरबल: मना चालेल! (तेवढ्यात बेगमला वारा सरतो).
अकबर: ( अकबर एकदम कावराबावरा होतो व सगळा डाव उधळून लावत बेगमकडे रागाने पाहत म्हणतो) जल्ला, आवरे तुना आवरी छोटी गोष्ट आवरता येत नाय. चारचौघात सारखी विज्जत घालवते माजी.
बिरबल: (प्रसंग ओळखून घाईघाईने बोलतो) बादशानु व्हतय आस कंदीमंदी लय भेलपुरी, पाणीपुरी, सकाल दुपारी खाल्ल्याव!
अकबर: (उठून उभा राहत) बिरबल, तुना माहीत नाय. हिचा बापूस येक नंबरचा पादरा हाये. जल्ला दिवसभर किराण्याच्या दुकानात एका बाजूस तराजूत वजंनं टाकतयं आन दुसरे बाजूस भोंगा वाजवतय. सारा गाव त त्याला 'पादरा पावशा' म्हणतय बोल! (बिरबल आणि बेगम चिडीचूप खाली मान घालून उभे राहतात) त्ये काय नाय बिरबल. हिला आता कायमची माहेरालाच धारून देतो. (टाळी वाजवत) जल्ला, कोण हाये काय तिकरं. लवकर ये हिकरं!
शिपाई नं १: बादशहानु मी हाये. बनकर... सुरेश बनकर!
अकबर: सुरेश, तू नया हय काय? बादशहाचा इजय कोण म्हणणार र खोकरा?
शिपाई नंबर १: बादशाचा इजय दिनानाथ चव्हाण असो.
अकबर: (खूश होऊन) ह्यो नवा हाये का? मंग ठिके. एक काम करं (बेगमकडे बोट दाखवत) ह्या आवरीला घेऊन फाट्याव जा. आन टमटममधी बसवून ये. बिना हार्नाच्या. ही वाजवतीय सगरीकरं! (एवढ बोलून तो तडक कक्षातून बाहेर निघून जातो)
शिपाई नंबर १: बेगमसाईबा, पिशवी घेऊन बाहेर या मी तवंर त रिक्षा आणतो. ('फाट्याव जायला उशीर झायला, बगतोय रिक्षावाला न वाट हिची बगतोय रिक्षावाला' अस काहीस गाण बेगमकडे पाहत आचरटपणे म्हणत म्हणत बाहेर जातो!)
बेगम: (शिपाई नंबर १ बाहेर गेल्यावर एकदम धाडकन पलंगावर कोसळते आणि फुंदुन रडू लागते) बिरबल, सांग, काय चुकल मांज? माणसाला चुकून एखादे वेली सरतो वारा. म्हणून काय आसा घालून-पारून बोलायचा.
बिरबल: आवराक्का (परत जीभ चावतो बेगमला दचकलेलं पाहून) स्वारी...बेगमसर्कार, कंदीमंदी सणावाराला... आपल ते, आसच एखादे वेली चालल अस्त वो. पण, मांज्या समोरच चौतीस येला झालय आन तो आपला परधान, 'कदमाचा नान्या' मना सांगत व्ह्ता, तुमच्या महालाक सारका सारका येऊन त्याचा अगरबत्तीचा खर्च लय व्हारलाय म्हणूनं.
बेगम: मंग... तूच सांग बिरबल मी काय करू. मना तर रोज हात दुकूस्तोवर बुद्धीबल खेलाय पायजे. मंग माहेर्ला गेल्याव कुणासंग खेलू?
बिरबल: (थोडा विचार करून) आवरे...(आता बेगमने चप्पल काढलेली बघून तोंडासमोर हात धरून मार चुकवण्याच्या पोजमध्ये उभा राहून पटपट बोलतो) बेगमसर्कार… मी कायतरी युक्ती लरवतो. तुम्ही एकदम निवांत जावा माहेर्ला. बादशाच तुम्हांना घेया येतीन. (एवढ बोलून मार चुकवत तिथून पळून जातो आणि पडदा पडतो)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(दृश्य दुसरे: पडदा उघडतो तेव्हा अकबर ऑफ मूडमध्ये दरबारात बसलेला आहे. समोर प्रधान आणि दरबारातली इतर मंडळी बसली आहेत)

बिरबल: (अकबराला मुजरा करत दरबारात प्रवेश करतो) बादशहाचा ईजय कदम असो! बादशानु मना जरा पर्सनल काम आसल्याने जर्रा आज हाप डे पायजेल व्हता.
अकबर: (वैतागून) बिरबल, जल्ला तुजा काय चालून राहिलाय आजकाल मना करना झालायं? मांगच्या एक महिन्यात तू २९ दिस हाप डे घीतलाय!
बिरबल: बादशानु, मी जरा शेतीकामात बिजी हाये.
अकबर: (विस्मयाने) शेतीकाम! बिरबल पगार तुना पुरत नाय काय? जल्ला शेतीकामाची तुना गरज काय हाय?
बिरबल: बादशानु, साधीसुधी शेती नाय करत आपण. मोत्यांची शेती करतय मी आता.
अकबर: मोती तर समिंदरात मिलतात ना रे पण? जल्ला मना काय येरा समजला का काय?
बिरबल: ही येगरी शेती हाये बादशानु... माझ्या म्हाता-याच्या म्हाता-यानी मना शिकवलीय. जर्रा जादूबिदू करावं लागते ह्येच्यात! तुम्हांना खोट वाटत आसल त परतेक्ष येवूनच बगा!
अकबर: (विचार करत) ठीके बिरबल. मना पण बगायचीच हाये मोत्यांची शेती. तवा मांजा पण आज हाप डे!
बिरबल: (घाईघाईने) बादशानु आज नका यिवू! आज तुम्हांना कायबी नाय दिसायाचा! उद्या सकाळी सारेसहाला टच व्हा मांज्या शेतात. मंगच दिसतेन तुम्हांना मोती लागल्याले.
(मुजरा करतो आणि जातो. इथेच पडदा पडतो.)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(दृश्य तिसरे: पडदा उघडतो तेव्हा अकबर आणि त्याच्याबरोबर प्रधान, शिपाई नंबर १ आणि २ आणि बिरबल असा लवाजमा आहे. सगळेजण बिरबलाच्या शेताकडे चालत येत आहेत. जसजसे जवळ येत आहेत तसतसे अकबरचे डोळे आश्चर्याने उजळून निघत आहेत! खर म्हणजे बिरबलाने त्याच्या शेतात फक्त अळूच अळू लावला आहे आणि त्यांवर पडलेल्या दवाच्या थेंबाने सकाळच्या कोवळ्या किरणाबरोबर मिळून अशी काही जादू केली आहे की दुरून अळवांच्या प्रत्येक पानावर बरेचसे टपोरे मोती लगडल्यासारखे दिसत आहेत.)

अकबर: (शेताकडे पाहत) बा…बा…बा बिरबल! काय र ह्ये? आवरे मोती! आता तू पण पुण्यात मोत्यांच् दुसर दुकान टाकणार का काय? मना आत्ता लगेच दोन-चार मोठाले मोती पायजेल, घेऊ का बोल?
बिरबल: बादशानु काय इचारताव गरिबाला? मांज जे हाये ते सगर तुमचंच हाये!
अकबर: (प्रचंड खूष होऊन मोत्यांकडे सरसावतो. पण जसा अळवाच्या पानाला त्याचा स्पर्श होतो, ते मोती भासणारे दव ओघळून खाली पडतात) अरे...रे..रे..रे बिरबल, आस का होतंय र? ह्यांच तर जल्ला पानीच व्हाया लागलंय!
बिरबल: म्हंजे बादशानु (आश्चर्याने तोंडाचा 'आ' वासून अकबराकडे पाहतो) तुम्ही पन??
अकबर: जल्ला, काय तू पन?? आस कोरयात बोलू नको. सरल बोल काय ता!
बिरबल: बादशानु मांजा आज्जा मना बोल्ला होता, (आता चाचरत) ज्यो कधीच आयुक्शात पादला नसंल त्यालाच हे मोती मिलतेन!
अकबर: (चेह-यावर खिन्नता आणीत) आलाय बिरबल, मांज्या ध्यानात आलाय तुना काय म्हणायच ता! मांज चुकलंच! मी आवरीला लय बोल्लो, आता काय करू बिरबल? आवरी मना माफ करन का र? कोन्च्या तोंडानं तिच्याक जाऊ र?
बिरबल: (टाळी वाजवतो तशी दुस-या शेताच्या कडेला असलेल्या झाडामागून बेगम समोर येते) बादशानु, मी पयलेच आवरीला (जीभ चावत!) आपलं ते बेगमसर्कारांना थांबवून ठिवलं व्हत. मना माहिती व्हता तुम्ही रागात कायबाय बोलून टाकताव पण जरा इचार कराया लावल्यावन बराबर करताव काय ता!
अकबर: (बेगमच्या जवळ जाउन लाडाने तिला जवळ घेतो) आवरे! मना माफ कर! आता मी तुना कायबी बोलणार नाय. तू कितीबी भेलपुरी, पाणीपुरी, सकाल दुपारी खाल्ली तरीबी!

(अकबर आणि बेगम एकमेकांच्या डोळ्यात पाहून हसतात आणि पडदा पडतो!)

नाट्यकथाविडंबनविनोदमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

28 Sep 2015 - 8:00 pm | मांत्रिक

हा हा हा!!!
जीओ सँडी जीओ!!!
भन्नाटच लिवतोस बे रे तू!!!
फुलटू धमाल!!!

चांदणे संदीप's picture

28 Sep 2015 - 8:24 pm | चांदणे संदीप

मांत्रीकजी धन्यवाद!

अशीच आपुलकी राहूद्या! ___/\____

देवाघराचा पावा. वाजतय कवा कवा.
संदीपभौ अगेन रॉक्स.

चाणक्य's picture

28 Sep 2015 - 9:07 pm | चाणक्य

सँडी भारीये हे. हहपुवा. फुल आवरलं बाल्या.

हाहाहा! बुद्धीबळ मस्त रंगवलं आहे!

बोका-ए-आझम's picture

28 Sep 2015 - 11:02 pm | बोका-ए-आझम

स्थळ: बेगमचा शयनकक्ष.
काळ: निवांतपणे घालवण्याचा.
वेळ: लवकरच कुणावर तरी येईल अस वाटणारी!
>>>
आणि
अकबर: (नकारार्थी मान हालवीत) नक्को! तू जल्ला केवरा हुशार हायेस! दोन मिंटात आम्हाना हरवशील.
बिरबल: बादशानु, तुम्ही म्हण्ताव त जरा वेलाने हरवतो. आवर काय तेच्यात?
>>>
हे दोन्ही भारी पंचरस आहेत!

बाबा योगिराज's picture

28 Sep 2015 - 11:14 pm | बाबा योगिराज

पॉट दुकल ना, हसून हसून. निस्ता धिंगाना.
अजुन बी येऊंद्या.

उगा काहितरीच's picture

29 Sep 2015 - 1:18 am | उगा काहितरीच

खल्लास !

एकदम मस्त जमलिये. लिहिते रहा

नाखु's picture

29 Sep 2015 - 9:46 am | नाखु

भावड्या!!!!

काही लायनी जबर्या आहेत.

चांदणे संदीप's picture

29 Sep 2015 - 10:53 am | चांदणे संदीप

धन्यवाद मंडळी!

नाव आडनाव's picture

29 Sep 2015 - 11:37 am | नाव आडनाव

संदीप भाऊ, लिहा अजून. मस्त लिहिता :)