"येडाय का तु?"

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
6 Sep 2015 - 1:17 pm

कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली.
हरीतालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला.
तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला.
कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला.
कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन.
पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या. पुरोहितांची दिंडी राजमार्गावर दुमदुमत निघाली.
वैरागी प्रसन्न मुद्रेनं महाद्वाराकडे निघाला.
द्वापारयुगात इंद्रप्रस्थाचे सिंहासन क्षणभर हेंदकाळले. होमहवनात साधुसंत मंतरले होते.
तलवारबाज शुरांची कसरत चालु होती.
वैराग्याचे भिक्षापात्र सखोल होते. त्याच्या तळाशी गतजन्मीचे वैफल्य साचले होते. प्रधानाकडं सहस्त्रमुद्रांची तो आळवणी करणार होता.
शेजारुन अश्वमेघांचा एक रथ सजुन मार्गस्थ झाला.राजवाडा त्याच्या दृष्टीक्षेपात आला. द्वारावरच्या पहारेकऱ्याने चमकुन त्याच्याकडे पहात आरोळी ठोकली.
"आरं कोण प्रधान? आण कुठला राजवाडा? हि मुन्शीपाल्टी हाय,
येडाय का तु? कुठल्या जगात जगतुय?"
लोंबकाळण्याऱ्या माणसांना वाहणारी सिटीबस रस्त्यावर पाहुन वैरागी काळाठिक्कर पडला.

- जव्हेरगंज

संस्कृतीइतिहासकथासाहित्यिकलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

जेपी's picture

6 Sep 2015 - 1:20 pm | जेपी

=))

नाव आडनाव's picture

6 Sep 2015 - 1:33 pm | नाव आडनाव

:)

प्यारे१'s picture

6 Sep 2015 - 1:44 pm | प्यारे१

खिक्क्क!
आवडली.

एक एकटा एकटाच's picture

6 Sep 2015 - 2:30 pm | एक एकटा एकटाच

जबरी

बाबा योगिराज's picture

6 Sep 2015 - 3:06 pm | बाबा योगिराज

हा हा हा...... वा
आवड्यास..

द-बाहुबली's picture

6 Sep 2015 - 4:23 pm | द-बाहुबली

सणसणीत चपराक. ये हुइ ना बात.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 4:35 pm | जव्हेरगंज

अगदी मनातले ओळखलेत.
धन्यवाद.

खटपट्या's picture

6 Sep 2015 - 4:28 pm | खटपट्या

आवडली..

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2015 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट ! उत्तम शशक सुद्धा बनेल याच्यातून :)

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 6:46 pm | जव्हेरगंज

धन्यवाद,
मी 'मटण' ही कथासुद्धा शशक करायचा प्रयत्न केला होता. पण शब्द मोजण्याचा जाम कंटाळा आला.
त्यामुळे त्या नादाला पुन्हा लागलोच नाही.

द-बाहुबली's picture

6 Sep 2015 - 7:27 pm | द-बाहुबली

शब्द मोजायचे एक छोटेसे वेबसॉफ्टवेर बनवुन देउ काय ?

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 7:44 pm | जव्हेरगंज

खरेच काय? कि गंमत करताय..!
तसे असेलच कुठेतरी आंजावर म्हणा, माझ्या नजरेस अजुन पडले नसावे.

द-बाहुबली's picture

6 Sep 2015 - 7:46 pm | द-बाहुबली

एकदम फडतुस कोड होता. लिन्क देतो डाउनलोडसाठी.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 8:00 pm | जव्हेरगंज

हो जरूर...

द-बाहुबली's picture

6 Sep 2015 - 8:03 pm | द-बाहुबली

ही घ्या लिंक

http://www.mediafire.com/view/4hbunmguv4kadtq/ShashakCounter.html

या लिंकवर क्लिक केले की जे पेज उघडेल तिठे आपल्याला वरबाजुला उजव्या कोपर्‍यात डाउनलोड ऑप्शन दिसेल त्याव॑र क्लिक करा. मग डाउनलोड पेज ओपन होइल तेथे पुन्हा डाउनलोडवर क्लिक करा.

कसे वापरायचे

१) सदरील कोड वेब-अ‍ॅप वा पेब पेज असल्याने डेस्क्टॉपला डाउनलोड केले की क्लिक केल्यावर आपोआप ब्राउअजरमधे ओपन होइल. मी फायफॉक्स ब्राउजर वापरतो त्यात हे व्यवस्थीत चालते.

२) हे मराठी टाइप करायला बनवले नाही म्हणून आधीच टाइप केलेला मजकुर यात तपासणीसाठी कॉपी पेस्ट करावा लागेल.

३) हे अ‍ॅप तुम्ही कितीवेळा स्पेस्बार दाबला आहे त्याची मोजणी करुन शब्द संख्या ठरवते म्हणून दोन श्ब्दात/ ओळीत शक्यतो एकदाच स्पेस्बार टाइअप केला जाइल याची काळ्जी घ्या परंतु घाइत तसे जमले नाही तर ते स्वतः एकच्या जागी दोन अथवा तिन वेळा जरी स्पेस्बार दाबला गेला असेल तरी सांभाळुन घेते :) त्यापेक्षा जास्त चुका ते खपवुन घेत नाही मग नवख्यांना प्रोत्साहन द्यायची कितीही बोंब मारा ;)

४) हे अ‍ॅप तुम्ही कितीवेळा स्पेस्बार दाबला आहे त्याची मोजणी करुन शब्द संख्या ठरवते म्हणून शेवटची ओळ लिहुन झाल्यावर मात्र कटाक्षाने (बोलेतो नो एक्स्क्युज) एखादा स्पेसबार (टाइप झालेला) राहीलेला नाही याची खातरजमा करा अन्यथा शेवटची ओळ संपल्यावर जितके स्पेसबार द्याल तेवढ्याने शब्द संख्या वाढलेली दिसु शकते

५) वापरायची स्वय होइलच मिपानेही हा कोड जसाच्या तसा वा बदलुन रेफरन्स घेउन हे मिपावर उपलब्ध केले तरी आनंदच आहे. हा कोड संपुर्णपणे मिपाकरांच्याच मालकीचा आहे कोणा एकाचे नाव त्याला चिकटलेले नाही :)

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 8:10 pm | जव्हेरगंज

माहितपुर्ण प्रतिसादासाठी अत्यंत आभारी आहे.
प्रस्तुत कोडचा संगणकावर जरूर उपयोग करीन.
सध्या मोबाईलवर जास्त करून टंकत असल्याने किती उपयोग होईल सांगता येत नाही.
मोबाईलसाठीही असे उत्तम सॉफ्टवेअर असल्यास किती बरे होईल.

द-बाहुबली's picture

6 Sep 2015 - 8:23 pm | द-बाहुबली

मोबाईलसाठीही असे उत्तम सॉफ्टवेअर असल्यास किती बरे होईल.

फार बरे होइल. पण फक्त एवड्याश्या फिचरसाठी आख्खे अ‍ॅप इन्स्टॉल करणार ? नोप.

मृत्युन्जय's picture

7 Sep 2015 - 1:27 pm | मृत्युन्जय

अ‍ॅप किंवा सॉफ्ट्वेयर कशाला लागतय? सरळ वर्ड मध्ये चोप्य पस्ते करा आणि मजकूर सिलेक्ट करा. नंबर काउंट खालच्या बाजुला दिसेलच.

हेहेहे .. मस्त जमलीये, तुमचं नाव वाचलं की आवर्जुन लेख उघडते आणि कधीच निराशा होत नाही.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 7:07 pm | जव्हेरगंज

धन्यवाद स्रुजा,
तुमच्या प्रतिसादानं तर काळजातच घर केलं..!

अजया's picture

6 Sep 2015 - 7:23 pm | अजया

सुपर्ब!!

चाणक्य's picture

6 Sep 2015 - 7:51 pm | चाणक्य

मला का कळली नाही?? काही रेफरंस आहे का जुना?

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 8:04 pm | जव्हेरगंज

चाणक्य साहेब व्यनी केलाय.

मलादेखील कळली नाही. कृपया व्य.नि. करा.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 8:22 pm | जव्हेरगंज

मांत्रिक साहेब तुम्हालापण व्यनी केलाय.
न समजल्यास आणखी उलगडून सांगतो.

आता व्यनी टंकलाच आहे तर कृपया मलाही फॉरवड करा.

तुषार काळभोर's picture

7 Sep 2015 - 6:38 am | तुषार काळभोर

व्यनि
(खालचा साहित्यिकाचा खुलासा वाचून पण नाय कळलं)

नाखु's picture

7 Sep 2015 - 8:57 am | नाखु

कळाली आहे असं वाट्णं वेगळे आणि खरेच कळाली आहे हे वेगळे.

सदागोंधळी नाखु

मी-सौरभ's picture

7 Sep 2015 - 2:03 pm | मी-सौरभ

मलापण व्यनी करा..

जव्हेरगंज's picture

7 Sep 2015 - 6:48 pm | जव्हेरगंज

व्यनी करण्याऐवजी ईथेच लिहीतो.
एक साहित्यिक जेव्हा सकाळी ऊठतो ते मुन्सिपाल्टीच्या गेट पर्यंत येईपर्यंतचा प्रवास कथेत आहे.
साहित्यिकाला प्रवासात जे काही दिसते त्याचे वर्णन तो मनातल्या मनात त्याच्या भावी पौराणिक कादंबरीच्या अनुशंगाने करतो.
शेवटी तो वॉचमन त्याला या धुंद कल्पनेतुन बाहेर काढतो....

असो ही झाली लिखानामागची प्रेरणा.
ईतरांना जर काही वेगळा अर्थ गवसत असेल व त्यांनी सांगितल्यास स्वागतच आहे.

साहित्यिकाला प्रवासात जे काही दिसते त्याचे वर्णन तो मनातल्या मनात त्याच्या भावी पौराणिक कादंबरीच्या अनुशंगाने करतो.
शेवटी तो वॉचमन त्याला या धुंद कल्पनेतुन बाहेर काढतो....

अगदी नेमके मला हेच अभिप्रेत होते. एक पौराणीक विचार करणारा वास्तवात येतो. खणखणीत चपराक बसते त्याला जेंव्हा तो लोंबकळणारे जिव वाहणार्‍या भव्य चारचाक्या बघतो. कथा आणी वास्तव याचे खतरा सांगड घातली आहे. आवडली.

चाणक्य's picture

7 Sep 2015 - 8:47 pm | चाणक्य

आणि आवडलं पण

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2015 - 9:10 pm | बोका-ए-आझम

क्रमशः आहे का? याच्यापुढे काय घडतं ते वाचायला आवडेल.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 9:41 pm | जव्हेरगंज

धन्यवाद,
क्रमश: नाहिये, इथेच कथा संपलीये.
पुढे-मागे कधी विचार आला तर एक सिक्वल अवश्य टाकेन.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 9:58 pm | जव्हेरगंज

सर्व प्रतिसादकांचे आभार..
प्रस्तुत लेखणाच्या शेवटाविषशी अनेकांना प्रश्न पडला.
तसा संदर्भ रोचक वगैरे मुळीच नाही.
एक साहित्यिक जो आपल्याच विश्वात सदैव दंग असतो, ज्याला जळीस्थळी आपल्याच लिखानातील पात्रे, प्रसंग, वर्णन दिसत असते, त्याला वास्तविकतेची एक चपराक दिली आहे एवढेच.
लिखानामागील मुळ प्रेरणा हिच होती.
धन्यवाद.

जव्हेरगंज's picture

6 Sep 2015 - 10:58 pm | जव्हेरगंज

एका सदस्याने 'चपराक' या शब्दाविषयी आक्षेप नोंदवलाय.
त्याठिकाणी विरोधाभास (वगैरे) दाखवायचा होता असे समजावे.
तसेही वैराग्याच्या भुमिकेत मी स्व:तलाच कल्पिले होते.
चु.भु.द्या.घ्या.

द-बाहुबली's picture

7 Sep 2015 - 2:23 pm | द-बाहुबली

एका सदस्याने 'चपराक' या शब्दाविषयी आक्षेप नोंदवलाय.

खिक्क... कोण कशाला आक्षेप घेइल याचा कलियुगात नेम नाही.

सस्नेह's picture

7 Sep 2015 - 11:43 am | सस्नेह

मजा आली !

बबन ताम्बे's picture

7 Sep 2015 - 11:56 am | बबन ताम्बे

आवडली.

माझीही शॅम्पेन's picture

7 Sep 2015 - 12:26 pm | माझीही शॅम्पेन

काही शश्प कळले नाही .. काही पेशल लोकांसाठी हा धागा काढला आहे का ?

कविता१९७८'s picture

7 Sep 2015 - 12:31 pm | कविता१९७८

मस्त