काय दुखलंय...?

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
5 May 2015 - 6:38 am

एका प्रश्नाचे उत्तरः

प्रसंग एकः
बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे. च्यायला, हे पोरगं आई-बापापासून हजार किमी दूर. ह्याला काय झालं अन काय नाही. डॉकने गोळी दिली. सकाळी परत बोलावले. रात्रभर आम्ही चिंतेत. तो चिंतेत. सकाळी पेशंट आणि मी मस्त चालत हॉस्पीटलला गेलो. सगळे रीपोर्ट्स नॉर्मल. डॉक म्हणतो. अरे बीअर भरपूर प्यायला, जेवला नाही. अ‍ॅसिडीटी झाली होती. बाकी काळजीचं काही कारण नाही.

सर्व खर्चः २,५०० रुपये. सन २००४.

प्रश्नः अ‍ॅसिडीटी होती हे कळायला एक्स-रे लागतो? काय खायला प्यायला हे रात्रीच सांगितले मग एवढ्या टेस्ट्स का?
उत्तरः डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. ते बरोबर आपल्याला कापतात.

प्रसंग दुसरा:
आयपीएलमधे असतांना रात्रंदिवस बसून काम केल्याने उष्णता वाढून 'योग्य ठिकाणी' चांगले ७-८ गळू झाले. भयंकर वेदना. उठण्या-बसण्याची बोंब. काहीच उपाय सुचेना. जवळच्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटलमधे गेलो. बायकोची आजी तिथली कायमची पेशंट असल्याने बरीच ओळख वैगेरे. प्रथितयश सर्जन डॉकने तपासले. निदान: ऑपरेशन करावे लागेल. खर्च १५ ते २० हजार वैगेरे. लगेच करून घ्या किंवा परिस्थिती हाताबाहेर जाईल. थोडे संशयास्पद वाटले.

बायको म्हणाली, आमच्या जुन्या फॅमिली डॉकचे मत घेऊया. ते योग्य काय ते सांगतील. हे ठाण्यातलेच एक वयोवृद्ध डॉक्टर, मोठं पण जुनं हॉस्पीटल. काही गुणवान, नावाजलेल्या, चांगल्या डॉक्टरांपैकी एक. त्यांच्याकडे गेलो. तपासले. म्हणाले, "अरे काय नाही, साधं गळू आहे. ४ दिवसांत ठीक होईल. गरम पाण्यात डेटॉल टाकून बस. चांगला तासभर शेक घे. गळू दाबून पू व रक्त काढून टाक. ह्या अँटीबायोटीक घे. बास. आराम कर आठ दिवस."

सर्व खर्चः ३०० रुपये. सन २००९.

प्रश्नः एकाच पेशंटच्या एकाच रोगाचे एकाच अवस्थेबद्दल एकसारखे शिक्षण घेतलेल्या दोन डॉक्टरांचे निदान एकच पण उपचार पद्धती वेगळ्या का? दुसर्‍या डॉकनी खर्चिक उपाय का सांगितला? त्याला खर्चिक उपायच शिकवला होता का?
उत्तरः काही डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. ते बरोबर आपल्याला कापतात. काही डॉक्टर आपल्याला खरंच वाचवतात, खर्च आणि रोग दोघांपासून.

प्रसंग तीसरा:
ठाण्यातले प्रसिद्ध असे नर्सिंगहोम. बापाने सुरू केलेले, आता आई, मुलगा, सून सांभाळते. खुप लोकांकडे चौकशी करून इकडे नाव नोंदवले.
सातव्या महिन्यात रेगुलर चेक-अप ला गेलो असता. डॉक-आईनी नेहमीप्रमाणे तपासले. तपासून झाल्यावर नेहमीच्या डिस्कशन-क्वेरीज ला बसलो. बायको म्हणाली, की तीला दोन-तीन दिवसांपासून बाळाची हालचाल, ठोके, खालच्या दिशेला जाणवतायत, खुप दुखतंय. कपाळावर काळजीच्या आठ्या आणत डॉक म्हणाल्या, जरा परत एकदा तपासू. मग हात घालून नीट तपासले. बायकोचे म्हणणे खरे निघाले. बाळ गर्भ-पिशवीच्या तोंडावर धडक मारायच्या तयारीत होते. ताबडतोब बेड-रेस्ट सांगितली. आणीबाणीची परिस्थिती असल्याने तिथेच लगेच अ‍ॅडमिट केले. ३-४ दिवस निरिक्षणाखाली होती. बाळ परत पुर्ववत झाले. आम्ही घरी आलो.

सर्व खर्चः दोनदा टेबलवर घेतले म्हणून दुप्पट तपासणी फी, (हॉस्पीटलायझेशनचा खर्च वेगळा) सन २०१०.

प्रश्नः पहिल्यांदाच चेक-अप ला टेबलवर घेतल्यावर ही आणीबाणीची परिस्थिती एवढ्या अनुभवी डॉकला का जाणवली नाही? मग नक्की रेगुलर-टेबल-चेक-अप काय असतो? गर्भवती 'डॉकला कळतं, तेच सांगतील काय असेल ते' असे म्हणून घरी गेली असती आणि काही कमी-जास्त झाले असते तर जबाबदारी कुणाची?
उत्तरः काही डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. पण त्यांना पेशंटशी काही घेणे-देणे नसते.

ठाण्यात पहिल्या बाळाच्या वेळेस ९ सोनोग्राफी झाल्यात एकूण खर्चः११,३००. नाशिकमधे दुसर्‍या बाळाच्या वेळी एकूण काळात ४ सोनोग्राफी झाल्यात. एकूण खर्चः२४००. असे का? तुम्ही कुठल्या गावात आहात यावर किती सोनोज ठरतात का?

प्रसंग चौथा:

नऊ महीने पुर्ण झाले. आता बाळ योग्य पद्धतीने वाढतंय. ठोके व्यवस्थित आहेत. डोके खाली आहे. आगमनाची वेळ जवळ आली आहे. कुठल्याही क्षणी कळा सुरु होतील. होणारी माता-पिता वेगवेगळ्या भावनांच्या सागरलहरींमधे हिंदकळतायत. मातेची प्रकृती उत्तम आहे. बाळाची प्रकृती उत्तम आहे. सर्व चिन्हे उत्कृष्ट बाळंतपण होईल अशीच आहेत. नववा संपल्यावर रेगुलर चेक-अप ला गेलो. डॉक-आईच्या डॉक-मुलाने तपासणी केली. पहिल्यांदाच क्लिनिकमधले सोनोग्राफी मशिन पोटावर फिरवून तपासणी केली. शांतपणे आम्ही डॉकसमोर बसलोय. आता काय काळजी घ्यावी आणि कळा सुरु झाल्यावर काय करावे याचे मार्गदर्शनाची वाट पाहू लागलो. तेव्हाच त्या थंड डॉकच्या थंड आवाजाने आमची मनं चिरली. "सिझर करावं लागेल, बाळ पायाळु आहे." त्याचे वाक्य संपायच्या आत मातेचे अश्रू सुरु. मी हजार प्रश्न विचारतोय, त्याचे एकच उत्तर. सोनोग्राफीत बाळ पायाळु दिसतंय, आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. नाळ गळ्यात अडकेल, मुल डिस्ट्रेस होईल. डेट ठरवा. सिझर उत्तम राहील.

आम्ही नखशिखांत हादरलो. बायकोने नॉर्मल डीलीवरीसाठी सर्व काळजी घेतली होती. तीला पोट कापून घ्यायचेच नव्हते. पण नशिबापुढे काय चालते म्हणून आम्ही सिझर साठी तयार झालो. दुसर्‍या मतासाठी कुणाला विचारावे अशी परिस्थितीच नव्हती, बायको विचार करते आहेच की मला ठोके खाली जाणवतायत. बाळाच्या ठोके मोजायचं मशीनही खालच्या बाजूलाच फायनेस्ट रिस्पॉन्स देतंय. मग बाळ पायाळू कसं?

सर्व खर्चः १ लाख २५ हजार रुपये. (नॉर्मल डीलीवरी: ६५ हजार) सन २०१०

प्रश्नः ५० हजारासाठी गळे कापणारे आणि ५० हजारासाठी पोट कापणारे यांच्यात फरक काय? तो आपण ठरवणारे कोण?
उत्तरः काही डॉक्टर... जाऊ दे.

प्रसंग पाचवा:

डीलीवरीनंतर काही महिन्यांत बायकोच्या दोन्ही तळव्यांवर सूज यायला लागली, भयंकर कळा यायच्या. तिच्या खांद्याजवळ जन्मापासूनची एक बोराएवढी छोटी गाठ होती. तीही अचानक मोठी होऊ लागली. आता आम्ही अगदी ओळखीच्या व २५-३० वर्ष अनुभवी सर्जनला दाखवले. मनगटांमधे सिस्ट आहेत, ते काढल्यावर सूज यायची थांबेल असे त्याने निदान केले. खांद्याजवळच्या गाठीला ताबडतोब काढून टाकायचे ठरवले. कॉम्प्लीकेशन्स बद्दल विचारले असता काही होणार नाही असे सांगितले. दोन्ही हात व खांदा इथली ऑप्स एकाच वेळेस केली. गाठ काढल्यावर लॅबटेस्ट नुसार कॅन्सरवाली नाही असे निदान झाले.

ऑप्स नंतर सूज कमी झालीच नाही. त्याबद्दल विचारले असता होईल ३-४ आठवड्यात कमी असे सांगितले. ३-४ आठवड्यांनीही कमी झाली नाही. मूळ त्रास तसाच आहे. फक्त थोडा कमी झाला, की बायकोने त्याची सवय करून घेतली माहित नाही. खांद्याजवळचे काही मज्जातंतूंना डॅमेज झालाय. थोड्या भागात नम्बनेस आहे. तोही सहा महिन्यात निघून जाईल असे सांगितले. तीन वर्षे झाली. सगळ्या समस्या तशाच आहेत. आता कुणाकडेही काहीही दाखवायची हिंमत राहीली नाही. नवा सर्जन पैसे उकळायला परत चिरफाड करेल, आराम मिळणार नाहीच अशी भीती खोलवर रुजून बसलीये.

सर्व खर्चः ३५ हजार रुपये. सन २०१२.
प्रश्नः आपली फसवणूक झाली हे सिद्ध कसे करायचे? कुठे? न्याय काय मिळेल? न्यायदानात शरीर ठीक होईल, एकदम ठणठणीत?
उत्तरः?????

प्रसंग सहावा:
बहीणीला मूल नाही. लग्नाला सहा वर्षे झाली. अ‍ॅलोपॅथी डॉक्स फक्त प्रयोग करतायत असे कालांतराने लक्षात आले. त्याचे पुर्ण डीटेल्स माहित नाहीत. मी एका नामांकित सर्वोपचार डॉकला ओळखतो. प्रजननविषयक त्याचे फार कार्यक्रम टीव्हीवर येत असतात. महाराष्ट्रात किमान ३० शाखा आहेत. बहिणीला म्हटले बघ प्रयत्न करून. योग्य उपचार होतील अशी आशा आहे. त्यात त्यांनी एक अ‍ॅलोपॅथी इंजेक्शन वापरले. अजून काय काय न काय काय? जवळपास एक लाख रुपये घालवून काहीच उपयोग होत नाही म्हटल्यावर मी त्या डॉकला फैलावर घ्यायचे ठरवले. तर तो बहिणीला म्हणाला, तुम्ही सांगितलेली योगासने केलीत का? योगासने करा, फायदा होईल. लाखभर रुपयाची निरर्थक पंचकर्म ट्रीटमेंट, औषधी पचवून जर हा सांगतोय योगसनं करा, फायदा होईल. तर त्याचे डोके का फोडू नये असा विचार तिथेच आला. पण आपण त्याला कुठल्याही प्रकारे कायद्याच्या कचाट्यात पकडू शकत नाही हे ध्यानात आले. मुकाट घरी आलो.

ती विशिष्ट इंजेक्शने विशिष्ट कालावधीत घ्यायची असल्याने बहिण परत सासरी निघून गेली. या आयुर्वेदिक डॉक्सनी लिहून दिलेल्या प्रीस्कवर तीचा अ‍ॅलोपॅथी डॉक तेच अ‍ॅलोपॅथी इंजेक्शन देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला मी माझी प्रोसीजर वापरणार आणि नंतर ठरवणार हे कधी द्यायचे ते. इतर बर्‍याच जिवघेण्या गमती-जमती कळल्या या प्रवासात. आपलं गिर्हाईक दुसरीकडे उपाय शोधतंय म्हटल्यावर तीच्या सासरकडच्या डॉकला नवे प्रयोग करायचा उमाळा आला. दोन-तीन सर्जरी करून टाकल्या त्या भरात त्याने.

एक वर्ष झाल्ंय या सगळ्या गोष्टींना. कुणीही काहीच खरं सांगत नाही आहे. कसलीही हमी देत नाही आहे. सर्वांचे उत्तर आम्ही प्रयत्न करतो, होईलच काहीतरी (तुम्ही फक्त पैसे मोजत राहा)

सर्व खर्चः ५ लाख रुपये आतापर्यंत. उपयोग शून्य.

प्रश्नः अशा धादांत क्वॅक्सना अशी अडलेल्या लोकांना फसवणारे धंदे करण्याची मोकळीक कशी मिळते? आम्ही अमुक इतक्या हजार घरांमधे हास्य फुलवलं अशी पेजपेजभर नियमबाह्य जाहिरात सरकारी व्यवस्था कशी खपवून घेते? अ‍ॅलोपॅथी वा आयुर्वेद किंवा अजून कोणी, यांना अशा सर्फ एक्सेलछाप जाहिराती करण्याची अजिबात लाज वाटत नाही?
उत्तरः?????

प्रसंग सातवा:
दोघांच्याही डोळ्यात कसले तरी इन्फेक्शन झालेले. ओळखीच्या एक फॅमिली फिजीशियन बाईंचा मुलगा नुकताच आय-स्पेशालिस्ट एम.डी झालेला त्याच्या कडे गेलो. त्याने डोळे तपासून सांगितले तुम्हाला चश्मा आहे. आपण जरा व्यवस्थित टेस्ट करून योग्य नंबर काढू. पुढचे तीन दिवस त्याने रोज संध्याकाळी डोळ्यात वेगवेगळे ड्रॉप्स टाकून नंबराची ट्रायल घेतली. प्रत्येक वेळेस नंबर वेगवेगळा येत होता. प्रत्येक विझिटची फी ५०० रुपये. १५०० घालवल्यावर अक्कल आली. त्याच्याच बाजूच्या मेडीकलवरून ओटीसी आय-ड्रॉप घेतलं, दुसर्‍या दिवशी सकाळी डोळे ठीक एकदम. मग स्वच्छ दिसू लागले. तीन दिवस आम्ही दोघे आणि एक २०-२२ वर्षिय मुलगी जिला रांजणवडी झालेली अशा तिघांवर साहेबांचे मनसोक्त प्रयोग सुरु होते. फक्त १५ दिवसांआधी मी डोळे तपासून घेतले होते कंपनी आय-चेक-अप कँपमधे. कुठलाही नंबर नव्हता. आणि हा मला -१.५ ते ३.५ असे भन्नाट आकडे रोज देत होता. देवकृपेने रोज १२ ते १४ तास कॉम्पवर काम करूनही गेल्या दहा वर्षात चश्मा नाही लागला.

(आठ दिवसांनी ती रांजणवडी वाली तरुणी दिसली. तीची अवस्था भयंकर झाली होती. साध्या गरम शेकाने आणि थंड मातीच्या लेपाने दोन दिवसात बरी होणारी रांजणवडी डोळाभर झाली होती.)

सर्व खर्चः १५५० रुपये.

प्रश्नः जीवंत माणसांना, आपल्याकडे आलेल्या रुग्णांना गिनीपिग म्हणून वापरतांना अशा डॉक्टरांना लाज लज्जा शरम काहीच वाटत नसेल काय? तेही धादांत खोटे बोलून?
उत्तरः?????

हे फक्त माझे अनुभव आहेत. प्रातिनिधिक आहेत. यांचे डिसेक्शन करायची काहीच गरज नाही. समाजात फिरलात तर हजारोंनी सापडतील. सुर्य उगवतोच. कोंबडं झाकून उपयोग नाही. हे सगळे रुग्णांचे गैरसमज आहेत असे म्हणाल तर यापेक्षा निर्लज्ज प्रतिसाद नसेल.

इतर अनेक धाग्यांवर अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. तीच परत परत इथे मांडून माझ्याच दिमागचं दही करून घेत नाही. बर्‍याच धाग्यांवर मी डॉक्टरांच्या समर्थनार्थ लिहिलंय कारण चांगले डॉक्स बघितले आहेत. सगळे बेड रिकामे पडले असून, गरज नसल्याने मुलाला अ‍ॅडमिट न करता धीर देऊन घरी परत पाठवणारा डॉक बघितलाय, एका झटक्यात तापातून उठवणारा डॉक बघितलाय, महिना दहा-वीस हजार रुपयेच मिळवणारा डॉ़क बघितलाय. कुठलाही मानसन्मान न घेता गरिबांसाठी फुकट औषधपाणी देणारा डॉक बघितलाय. पण 'डॉक्टर लोक फसवतात' हे आता 'सरकारी कर्मचारी भ्रष्ट असतो' इतके सामान्य झालेलं आहे. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने डोके ठेवावे त्यानेच गळा कापावा अशी वेळ आली आहे. यात काही डॉ़क्स चांगले काही वाईट अशी सफाई नकोय. जर सगळे एकच शिक्षण घेतात, एकच प्रतिज्ञा घेतात तर हे चांगले-वाईट कुठून येतात? चांगला की वाईट, मला नेमका कुठला डॉक्टर वाट्याला येईल हे कसे सांगता येईल? माझं निदान, उपचार खात्रीपुर्वक योग्यच झाले आहेत याची कोण हमी देईल? नाही देता येत तर मग पैसे कसे खणखणीत वाजवून घेतले जातात? तुमचा रुग्ण मेला/ रोग बरा नाही झाला म्हणून आम्ही पैसे घेणार नाही असे कुणी डॉक्टर म्हणेल काय?

सगळे मुसलमान अतिरेकी नसतात पण सगळे अतिरेकी मुसलमान असतात याच धर्तीवर वैद्यकक्षेत्रातले सगळे डॉक्स वाईट नसतात पण सगळे वाईट डॉक्स वैद्यकक्षेत्रातच असतात हे भयानक सत्य आहे. मला कुणा ईंशुरन्स वाल्याने कापले, माझे कुणी पाकिट मारले, कुणी घरात चोरी केली, अगदी पद्धतशीर उल्लू बनवून लुबाडले तर मला जेवढे दु:ख होणार नाही त्यापेक्षा हजारो पटीने असले डॉक्स नशिबात आले की होतं. पैसे जातात त्याचं दु:ख नाही. चुकीच्या निदान/उपचारांनी जीव जातो, माणूस आयुष्यभर कुणा दुसर्‍याच्या हलगर्जीपणा, अर्धवट ज्ञान, पैशाची लालुच याचे फळ भोगत राहतो. याचं दु:ख मोठं आहे.

डॉक्टर लोकांच्या अनीती व्यवहारांवर कुणी काहीही बोलले की अंगावर धावून जाणार्‍या, मुजोरीची भाषा करणार्‍या, असल्या डॉक्टरांचे सगळे व्यवहार चुकीचे असले तरी योग्यच आहेत असे भासवणार्‍या तथाकथित उच्चशिक्षित उच्चभ्रू डॉक्टरांना माझा साधा प्रश्न. रुग्णांचे रक्त पिणारे हरामखोर डॉक्टर खरंच अस्तित्वात नाहीत असा तुमचा दावा आहे काय? ते आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही व्यवसायाला कलंक ठरणार्‍या व्यवसायबंधूंच्या विरूद्ध प्रत्यक्ष मैदानात षड्डू ठोकण्याऐवजी नागवल्या गेलेल्या रुग्णांच्या/नातेवाईकांच्या विरूद्ध मिपावर युद्ध पुकारून तुम्हाला काय मिळतं? १ ट्क्का असो वा ९९ टक्के, अशा हरामखोर डॉक्टरांना हाकलून लावणं चांगल्या डॉक्टरांचं कर्तव्य नाही काय?

आपापल्या व्यवसायात नाव कमवण्यासाठी फक्त डॉक्टरच नाही, यच्चयावत सगळ्यांनाच ढोरमेहनत करावी लागते. डॉक्टर जी मेहनत करतात ती रुग्णांचे प्राण वाचावे त्यांचे रोग बरे व्हावे म्हणून. त्यांच्या मेहनतीचं, खर्चाचं, घालवलेल्या वर्षांचं, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाचं, हल्ल्यांचं भांडवल करून कुणाही नडलेल्या, अज्ञानी रुग्णाला लुबाडण्याचा परवाना मिळतो काय? तुमच्या ज्ञानाला कुणी आव्हान देऊ शकत नाही म्हणून वाट्टेल तसे वागण्याचा परवाना मिळतो काय? मग कुणी काळजीने अथवा कशानेही तुम्हाला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर इगो दुखावतो का?

पैसे कितीही घ्या, पैशाचा आणि उपचाराच्या खात्रीचा काय संबंध? उपचार, निदान यांची खात्री वादातीत असावी. तरच ते शास्त्र म्हणवून घेण्याच्या लायकीचं ठरतं. अन्यथा 'आम्ही तुमच्या वर फक्त प्रयोग करतो' असं मान्य करून मोकळं व्हावे सगळ्या डॉक्टर्सनी. मग आमचे तेच शास्त्रीय, बाकीच्या भाकडकथा असं तुणंतुणं वाजवत फिरू नये.

वैद्यकक्षेत्रात शं भ र टक्के पारदर्शकता पाहिजेच पाहिजे. देअर इज नो अदर वे अराउंड.

(मी आजारी पडल्यावर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांकडे जाऊ नये असे सुचवणार्‍यांना एक निरोप. कृपया वैद्यकक्षेत्रातले सगळे वाईट डॉक्टर हटवण्याची हिंमत आधी दाखवावी नंतर लोकांना सल्ले देत फिरावे.)

समाजजीवनमानराहणीऔषधोपचारअर्थकारणप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2015 - 7:18 am | श्रीरंग_जोशी

एकाहून एक धक्कादायक अनुभव आहेत. विचारात पाडणारे अनुभवकथन.
तुमच्या यापुढील आयुष्यात असे अनुभव न येवोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

पॉइंट ब्लँक's picture

6 May 2015 - 9:36 am | पॉइंट ब्लँक

+१

>>>>रुग्णांचे रक्त पिणारे हरामखोर डॉक्टर खरंच अस्तित्वात नाहीत असा तुमचा दावा आहे काय? ते आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही व्यवसायाला कलंक ठरणार्‍या व्यवसायबंधूंच्या विरूद्ध प्रत्यक्ष मैदानात षड्डू ठोकण्याऐवजी नागवल्या गेलेल्या रुग्णांच्या/नातेवाईकांच्या विरूद्ध मिपावर युद्ध पुकारून तुम्हाला काय मिळतं? १ ट्क्का असो वा ९९ टक्के, अशा हरामखोर डॉक्टरांना हाकलून लावणं चांगल्या डॉक्टरांचं कर्तव्य नाही काय?

कोणत्या मार्गाने आणि कसे हाकलून लावणार??

तुमच्या व्यवसायातील अपप्रवृत्तींचे निर्मुलन / निर्दालन तुम्ही केले आहे का?

हा प्रश्न कदाचित चुकीचा असेल परंतु धाग्यात मांडलेल्या अपेक्षा अवास्तव आणि भाबड्या वाटत आहेत.

संदीप डांगे's picture

5 May 2015 - 8:17 am | संदीप डांगे

माझ्या अपेक्षा भाबड्या असतीलही मग रुग्णांच्या नातेवाईकांनी आपणास बदडू नये ही अपेक्षाही भाबडी म्हणायला लागेल.

होरपळलेल्या लोकांनी आपले अनुभव मांडले की रुग्णच कसे चुकीचे वागतात अशी पाल्हाळं लावतांना डॉक्टरांना बघितले आहे.
रुग्ण आणि वैद्य यांचे परस्पर विश्वास आणि प्रेमाचे नाते असलेच पाहिजे. पारदर्शकतेशिवाय ते शक्य नाही.

कोणत्या मार्गाने आणि कसे हाकलून लावणार??

त्याच पद्धतीने ज्या पद्धतीत कट न देणार्‍या डॉक्स, क्लिनिक्स, इत्यादींना हाकलून लावले जाते. ज्याच्या त्याच्या व्यवसायाचा प्रश्न आहे, त्याने तो सोडवावा. लोकांनी आपल्या अंगावर चिखल उडवू नये अशी अपेक्षा असणार्‍यांना घाण साफ करावी लागेल.

लष्करात कामात कुचराई, फितुरीसाठी कोर्ट मार्शल होते. डॉक्टरांचेही तसेच करावे.

डांगेसाहेब, तुमचे अनुभव नक्कीच दुर्दैवी आणि भयानक आहेत. असे अनुभव भविष्यात तुम्हाला किंवा कुणालाही न येवोत.

पण काही डॉक्टर चुकीचे वागतात म्हणून एखाद्या सचोटीने व्यवसाय करणार्‍या डॉक्टरला बडवणे समर्थनीय कसे? कितीतरी अशाही घटना आहेत जेव्हा डॉक्टरांनी सर्वोतोपरी उपाय करुनही पेशंट नाही वाचत. याच बाबीचा दुसर्‍या बाजूने विचार करा. समजा उद्या तुमचे कुणी नातेवाईक/ अपत्य डॉक्टर झाले आणि कुणाच्या चुकीच्या रागाचे निशाण झाले तर? आणि समजा नाहीही झाले तर चुकीच्या वागणार्‍या डॉक्टरांना हाकलायची जबाबदारी त्यांची कशी?

माझ्या क्षेत्रातही लोक खोटे टाईमशीट्स भरुन, खोटी बिले लावून जास्त पैसे कमवतात. हाताखाली गरजेपेक्षा जास्त लोक घेऊन त्यांच्या कमाईतून वाटा घेतात. अशा लोकांवर कारवाई करायची जबाबदारी मी घ्यावी अशी अपेक्षा माझ्याकडून कुणी केली तर ते रास्त नाही. पण त्याचवेळी सरसकट कुणी त्या क्षेत्रातल्या लोकांना नावे ठेवली, गऱज पडली तर मी माझ्या क्षेत्रातल्या लोकांची बाजू मांडणार.

दुसरा मुद्दा पारदर्शकतेचा. रुग्णदेखील काहीवेळा वैद्यांपासून माहिती लपवून ठेवतात, किंवा सगळी पथ्ये पाळत नाहीत. त्यातून कधी काही चुकीचे निदान/ उपाय झाले तर दोष कुणाचा? इथे मिपावरच डॉ. खरे आणि आधी विनायक प्रभू (? चु. भू. दे. घे.) यांनी असे अनुभवही लिहिलेत. काही जण आणखी पुढे जाऊन वैद्यांनी एकदा लिहून दिलेली औषधे पुढच्या वेळी मनानेच घेतात. (माझ्या नात्यातल्या एक महिला अशी औषधे वरचेवर घेत राहिल्याने साईड-इफेक्टस होऊन गेल्या.) दुसर्‍या एका महिलेने दारावर आलेल्या माणसाकडून वजन कमी करण्यासाठीच्या गोळ्या घेतल्या. त्याचे भयंकर परिणाम झाल्यावर त्यांना नातेवाईकांनी दुसर्‍या डॉक्टरकडे नेले. नशीबाने काही वाईट झाले नाही. समजा झाले असते आणि हा दुसरा डॉक्टर त्यांना नाही वाचवू शकला म्हणून दोषी धरला गेला असता तर? त्या महिलेच्या घरच्यांनी त्याला बदडले तर ते बरोबर काय?

पेशंटच्या जीवाशी खेळणार्‍या, पैसे लुबाडणार्‍या डॉक्टरांवर कारवाई नक्कीच व्हावी. पण तुम्हीच खाली लिहिलंय तसं जनजागृती करुन किंवा रीतसर तक्रार करुन. आदूबाळ यांनी म्हटलंय तसा जवळचा मित्र / नातेवाईक डॉक्टर असेल तर निदान त्यांचा सल्ला तरी घेता येतो, पण ते सर्वांनाच शक्य नाही. मला वाटते निदान सरकार/ वैद्यकशास्त्र प्रमाणपत्र देणार्‍या संस्था यांनी वरचे वर पर्यवेक्षण करुन अशा डॉक्टरांना आळा घातला पाहिजे.

तुम्ही लिहिलंय तसं सी-सेक्शनचं प्रमाण भारतात खूप वाढलंय हे मात्र मान्य. कॅलिफोर्नियामध्ये खूप क्वचित ते होतं आणि डॉक्टरही ते टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. नाहीतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं ऐकलं आहे. अर्थात त्यासाठी इंशुरन्स कंपन्यांचे नियमही कारणीभूत असतात. भारतातही असे काहीतरी उपाय लवकर लागू होवोत.

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 2:26 am | संदीप डांगे

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मुद्दा पारदर्शकतेचा. रुग्णदेखील काहीवेळा वैद्यांपासून माहिती लपवून ठेवतात, किंवा सगळी पथ्ये पाळत नाहीत. त्यातून कधी काही चुकीचे निदान/ उपाय झाले तर दोष कुणाचा?

मी लिहिलेल्या सर्व प्रसंगामधे रुग्णांकडून कुठलीही हलगर्जी, लपवाछपवी झालेली नाही. ह्या प्रसंगामधे डॉक्टर धडधडीत चुकीचे वागत आहेत हे दिसतंय. ते मी कुठल्याच प्रकरणात कागदोपत्री सिद्ध करू शकत नाही म्हणून नाही तर हे उपरोल्लिखीत सगळे डॉक्टर आज गजाआड असते.

डॉक्टरांना कोंडीत पकडायला लागले की रुग्णांकडे बोट दाखवून संशयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोच. ते काही आता नविन राहीले नाही. हे संशयाचे धुके तयार केले की झाले. रुग्णांच्या चुका दाखवणे फार सोपे असते, डॉक्टरांच्या सिद्ध करणे महाकठीण आहे. एखाद्या डॉक्टरने केलेली चूक रुग्णाच्या नावावर ढकलली तर कसे सिद्ध करणार? हे तद्दन बुवाबाजीसारखे आहे. परिणाम चांगले आले तर 'बाबा का चमत्कार', नाही आले तर 'तुमने व्रत ठीकसे नही किया होगा.'

ज्या पद्धतीने आजवर डॉक्टरलोकांनी आपल्या व्यवसायबंधूंना डीफेंड केले आहे त्याच पद्धतीचा वापर करून मी म्हणेन की रुग्णाच्या चुका ह्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणात का मोडू नये? मेडीकल कौंसीलने किती डॉक्टरांचे धंदे बंद केलेत आजपर्यंत?

उठसूठ कुणी कुणालाही बदडत नाही. बरेच लोकांना कुणाची चूक आहे असे वाटतंच नसते, ते दैवावर सोडून मोकळे होतात. डॉक्टरांच्या चुकांच्या प्रमाणात डॉक्टरांना बदडले गेल्याच्या किती घटना घडल्यात? मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. आज आत्ता सर्व भारतात उपलब्ध असलेल्या सर्व खाजगी दवाखान्यांतल्या आयसीयु कक्षात भरती असलेल्या रुग्णांपैकी किती रुग्णांना खरंच आयसीयुची आवश्यकता आहे त्याचे आकडे मिळवले तर डॉक्टरलोकांचा गोरखधंदा उघडकीस येईल. त्या प्रमाणात डॉक्टरांना मार-हाणीच्या किती घटना घडल्यात तेही मोजून पहा.

शस्त्रक्रियेदरम्यान पोटात फॉरेन-ऑब्जेक्ट राहणे, औषधांचे विशिष्ट ब्रँड्सचाच आग्रह धरणे, मेलेल्या पेशंटवर शस्त्रक्रिया करून त्याचे बील लावणे, जीवंत राहण्याची अजिबात खात्री नसलेला पेशंट आपल्याकडे मरून आपल्या हॉस्पीटलला बट्टा लागू नये म्हणून आहे त्या अत्यवस्थ स्थितीत बाहेर हाकलणे (नाशिक वोकहार्ट), ह्या आणि इतर बर्‍याच भयावह घटना घडतात ज्यात रुग्णांची तुम्ही उल्लेखली तशी चूक नसते. पण ह्याही घटना घडतातच, ह्या कविकल्पना नाहीत.

माझ्या कुणा डॉक्टर नातेवाईकाला/मित्राला फटके पडू नये म्हणून तो जर काही चुकीचे करत असेल तर मी त्याला उघडा पाडेन. कारण त्याला कुणी मारू नये म्हणून त्याच्या चुकांवर मी पांघरूण घालू शकत नाही. त्याच्या चुकांमुळे कित्येक लोक आयुष्यातून उठू शकतात. त्यापेक्षा तो एक उठला तर चांगलंच आहे.

डॉक्टर लोकांना व्यवसायातल्या खाचाखोचा, लबाड्या, फसवेगिरी जास्त चांगली माहिती असते. त्यांच्यापैकी कुणीही इथे याबाबतीत कसलीही जनजागृती केली आहे का याचे धागे शोधून द्यावे.

(ठाण्यातल्या एका मोठ्या हॉस्पीटलचे ब्रँडींग करत असतांना तिथल्या मार्केटींग डायरेक्टर ने मला एक गंमत सांगितली. हार्टपेशंटसाठी कुठलीशी एक गोळी असते म्हणे. त्याचे दोन ब्रँड आहेत. गोळीच्या दर्जात काहीही फरक नाही. एक ५० पैशाची आहे, दुसरी ५० रुपयांची. मोठी हॉस्पीटलं पेशंटना ही ५० रु.वाली गोळी देतात. याला कुणी धंदा म्हणत असेल तर म्हणू देत.)

तुम्हाला आलेले अनुभव वाईट आहेत असं मी आधीच नमूद केलंय. आणि रुग्णांकडून लपवाछपवीबद्दलही माझे म्हणणे तुमच्याबद्दल नाही. सिद्ध करु शकत नसल्यास निदान कौन्सिल कडे तक्रार करुन कदाचित मी आधी म्हटलंय तसं अशा डॉक्टरांवर पाळत ठेवण्याचा पर्याय असल्यास असे अनुभव असणार्यांनी करावे. पण तशी सुविधा आहे की नाही हे मला माहित नाही.

स्वतःच्या मनाने उपाय करुन होणार्‍या बाळाच्या आणि स्वतःच्या जीवावर बेतेल अशा परिस्थितीपर्यंत काही महिला जातात किंवा घरचे त्यांना जाण्यास भाग पाडतात. या महाभागांनी असे कुटाणे केलेले असतात की अगदी घरात राहणार्‍या लोकांनाही कळू देत नाहीत, ते परक्या डॉक्टरांना कशावरुन सांगणार?

उठसूठ कुणी कुणालाही बदडत नाही. >> एस. टी. चे रिझर्वेशन केलेले असताना त्या जागेवर आधी बसलेल्या लोकांना उठवले म्हणून मारहाण, दुकानात येउन ग्राहकाने सतरा गोष्टी दाखवायला सांगितल्यावर "तुम्हाला नक्की काय हवंय?" हे विचारल्यावर दुकानदाराला मारहाण - हे प्रसंग माझ्या जवळच्या नातेवाईकांबाबत घडले. या गोष्टींपेक्षा रुग्णालयात/ इस्पितळात माणूस नक्कीच अवघड मनस्थितीत असतो. अशा वेळी तो नेहमीच सारासारविवेकबुद्धीने वागेल याची खात्री काय?

ज्या घटनांचा तुम्ही उल्लेख केला आहे त्या खरंच भयावह आहेत आणि कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत. तरीही अशांना प्रमाणपत्रे/ परवाना मिळणे आणि तो रद्द न होणे ही चूक वैद्यकीय संस्थांची आहे. याबाबतीत दुसर्‍या डॉक्टरांचा काय दोष?

माझ्या कुणा डॉक्टर नातेवाईकाला/मित्राला फटके पडू नये म्हणून तो जर काही चुकीचे करत असेल तर मी त्याला उघडा पाडेन. कारण त्याला कुणी मारू नये म्हणून त्याच्या चुकांवर मी पांघरूण घालू शकत नाही. त्याच्या चुकांमुळे कित्येक लोक आयुष्यातून उठू शकतात. त्यापेक्षा तो एक उठला तर चांगलंच आहे. >> माझा प्रश्न सचीटीने वागणार्‍या डॉक्टरांना मारहाणीबद्दल आहे. पण एकंदरीत तुमचा रोख "मारहाण करणं बरोबर आहे" अशा प्रकारचा असल्यामुळे ... असो.

धागे शोधून द्यायला मला वेळ नाही. मला फक्त दोन्ही बाजूंनी विचार करायलाच सुचवायचे होते. तुम्ही हा धागा काढलाय ते चांगलंच आहे. तुम्ही असा धागा का काढताय वगैरेही मी म्हटलं नाही, उलट अशी जनजागृती होण्यासाठी तुम्ही त्या डॉक्टरांची नावेही कळू द्या.

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 5:31 am | संदीप डांगे

मान्य.

जगात बर्‍याच ठिकाणी मारहाण चालू असते, त्याचा या धाग्याशी काही संबंध नाही. माझा विषय फक्त डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीचा होता. खूप लोक हॉस्पीटल्स मधे मरत आहेत, त्या तुलनेत मारहाण किती? म्हणजे ती झाली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. प्रत्येक मरणार्‍या रुग्णाचे नातेवाईक मारहाण करत नाहियेत. म्हणजे मेला रुग्ण की हाण डॉक्टरला असं चित्र आहे का सगळीकडे? माझ्यासाठीतरी डॉक्टरांना मारहाण हा तुलनेने खूप छोटा आणि सर्वस्वी वेगळा विषय आहे. डॉक्टरांच्या चुका आणि पैसेकाढू प्रवृत्ती त्यापेक्षा कैक पटीने जास्त प्रमाणात आणि जास्त घातक आहे. त्याचेच पर्यवसान लोक ज्यांच्यासमोर हात जोडत होते, त्यांच्यावर हात उगारण्यापर्यंत झाले आहे.

डॉक्टरांच्या चुका चव्हाट्यावर मांडल्या की रुग्णाचे नातेवाईक मारहाण करतात, रुग्ण चुका करतात असे नेहमीचे प्रतिवाद केले जातात. त्यानुषंगाने हा मारहाण विषय आला आहे. डॉक्टरांना मारहाण करणे मला पटत नाही. त्याचे अजिबात समर्थन नाही.

चांगले डॉक्टर वाईट डॉक्टरांमुळे भरडले जात असतील तर कुणाची जबाबदारी? वैद्यकिय संस्था नीट काम करत नसेल तर जबाबदारी कुणाची? वाईट डॉक्टरांच्या अनुभवामुळे सचोटीने काम करणार्‍यांकडे संशयाने पाहिले जाते तर ती पाहणार्‍याची चूक कशी ठरते? इथल्या चर्चा वाचतांना तर मला असे जाणवले की चांगल्या डॉक्टरांना त्रास होईल म्हणून वैद्यकियक्षेत्रातल्या बंडलबाजीबद्दल सामान्य जनतेने ब्रसुद्धा काढू नये अशी इथल्या काही डॉक्सची इच्छा दिसली. उलट जनताच मूर्ख आहे, वेडीपीशी झाली आहे असे चित्र उभे करण्यात येते.

मी इथे गंडवणार्‍या डॉक्टर्सचे अनुभव सांगतोय. त्याचे कारण 'असे काही नसतेच' असे बेंबीच्या देठापासून जोर लावून ओरडणारे काही डॉक्टर्स आहेत.

तुम्ही दोन्ही बाजू विचारात घ्यायला सांगताय ते काही पटत नाही. म्हणजे रुग्ण मुर्खपणा करतात म्हणून डॉक्टरांनाही सूट असली पाहिजे असा काहिसा सूर लागतोय. रुग्णांच्या चुका समजण्यासारख्या आहेत, डॉक्टरांच्या नाहीत हा फरक तुम्ही लक्षात घेतला तर?

कुठलीही एकच बाजू चर्चेला असेल तर फायद्याचे, अन्यथा वातावरण गढूळ होते असा मागच्या धाग्यांचा अनुभव आहे.

इथे ती नावे टाकून उपयोग नाही. कारण नावांपेक्षा वृत्तीचा साक्षात्कार जास्त आवश्यक आहे. इथे मी ठाण्यातल्या डॉकचे नाव टाकले तर सोलापुरचे डॉ़क्टर धुतल्या तांदळाचे आहेत असं होणार नाही. ठाण्यातलेच इतर डॉक चांगलेच आहेत, हाच त्यात किडका आहे असेही होत नसते. कोण कुठे तुमचा गैरफायदा घेऊ शकतो आणि त्यापासून कसे सावध राहावे एवढी जनजागृती आपण आपल्याला आलेल्या अनुभवांवरून करू शकतो. नाही तर कुठल्या डॉ़क्टरच्या दोन क्षणांच्या बदनामीव्यतिरिक्त काही हशील होणार नाही.

मोदक's picture

6 May 2015 - 7:56 am | मोदक

>>>>मी इथे गंडवणार्‍या डॉक्टर्सचे अनुभव सांगतोय. त्याचे कारण 'असे काही नसतेच' असे बेंबीच्या देठापासून जोर लावून ओरडणारे काही डॉक्टर्स आहेत.

विदा आहे का?

Link

त्या धाग्यावर काही डॉक्टर्सचा आवेश तसाच आहे.

त्या धाग्यावर उपस्थित असलेले सगळे डॉक्टर्स "यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक आहे" असे कुठे म्हणत आहेत का.?

रच्याकने खाली पैसाताईंनी म्हणलेले "डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. पेशंटही सर्व प्रकारचे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणून कोणीच कोणाला सरसकट झोडपू नये." हे तरी मान्य आहे का..?

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 6:09 pm | संदीप डांगे

"यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक नाहीत" असे मी तरी कुठे म्हटले आहे?

डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात.

हे 'चांगले डॉक्टर वाईट डॉक्टर, खरे डॉक्टर्स, खोटे डॉक्टर्स' ओळखायची काही टेस्ट आहे का? असल्यास कळवा. कारण आत्तातरी फसवल्या गेल्यावरच कळतंय डॉक्टर चांगला का वाईट ते.

नेत्रेश यांनी दिलेल्या लिंकमधे प्रस्तुत डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीवाल्यांनाच खरे डॉक्टर मानले पाहिजे असे ठणकावून सुचवले आहे. त्यांच्यासाठीच मी लेखात अ‍ॅलोपॅथीवाल्या खर्‍याखुर्‍या डॉक्टरांचे अनुभव दिले आहेत.

बरं तुर्तास ते राहू दे बाजूला. मी लेखात उल्लेखल्या प्रमाणे 'मला उपचार/निदान याबद्दल खात्रीशीर आणि पारदर्शक मार्गदर्शन मिळतंय हे मी आधीच कसं ओळखायचं' या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे. तेच जास्त महत्त्वाचे आहे. आत्ता तरी मागच्या ठेचांवरून शहाणे होऊन असा मार्ग काढलाय की किमान चार ठिकाणी दाखवायचं पण एकाचं दुसर्‍याला अजिबात सांगायचं नाही. ही परिस्थिती शोचनीय आहे मॉडर्न मेडिसीन म्हणवून घेणार्‍या क्षेत्रासाठी असे तुम्हाला नाही वाटत काय? हे असं होण्याची दोन कारणे १. डॉक्टरवर, त्यांच्या निदानावर विश्वास राहिला नाही. २. कोण आपल्याला चुकीचं सांगतंय याची खात्री करायला.

इतर फसवणुकीच्या प्रकरणांमधे फक्त पैसे जातात, थोडावेळ मनस्ताप होतो. इथे त्यासोबतच एखाद्याचं शरीर, आयुष्य पणाला लागलेलं असतं. डॉक्टर लोकांना हे समजूनच घ्यायचे नाहीये असे दिसतंय.

ही परिस्थिती कशी बदलता येईल यावर काही उपाय सुचवाल का? या धाग्यावर तरी मला नेहमीचे ब्लेमगेम नकोच आहेत. काही तरी सामान्य रुग्णांना मदत होईल असे डॉक्टर्स इथे सांगण्याची हिंमत ठेवतील की नेहमीप्रमाणे चिखलफेक करण्यात धन्यता मानतील? लेखात उल्लेखलेल्या प्रश्नांची काही तरी उत्तरे देण्याची धमक आहे?

मोदक's picture

8 May 2015 - 3:39 pm | मोदक

"यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक नाहीत" असे मी तरी कुठे म्हटले आहे? डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात.

माझा हाच मुद्दा आहे त्यामुळे (या वाक्याशी) सहमत.

सगळे वाईट डॉक्स वैद्यकक्षेत्रातच असतात

हे कळाले नाही. नक्की काय म्हणायचे आहे..?

बाबा पाटील's picture

6 May 2015 - 9:04 pm | बाबा पाटील

मागच्या आठवड्यात एका रुग्नेची पंचकर्म ट्रिटमेंट सुरु केली.मध्येच रुग्नेची मासिक पाळी आली.म्हणुन ५ दिवस प्रोसेस बंद होत्या.माझ्या कडे ज्यावेळेस कुठलीही प्रोसेस चालु होते त्यावेळेस रुग्नाला सर्व गोष्टींची माहिती,त्यात प्रोसेस,आहारिय पथ्य ,बिल, अंदाजे किती दिवसांची विश्रांती हवी त्याचे सर्टीफिकेट या सर्व बाबींची प्रिंट आउट दिली जाते.
आता या रुग्नेने या मधल्या दिवसात दनकुन सगळी अपथ्ये केली.अगदी मांसाहार व फलाहार जि बिल्कुल बंद सांगितला होता तो देखिल.(सदर रुग्ना उच्च पदस्थ पोलिस अधिकारी आहे.) आज त्या आल्या मला ड्युटीला रुजु व्ह्यायच आहे.तुम्ही माझे ५ दिवस वाया घालवले.आता यांना अनियमित रजप्रवृत्ती होती व प्रोसेस चालु केल्यास अचानक पाळी येवु शकते,याची लिखित कल्पना दिली होती तरीही.यांना मध्येच जर असे घडल्यास त्याचा दोष हा डॉक्टरचाच का बर दुसर अस की परत पंचकर्म सुरु केले.आज विरेचनाची गोळी दिली .त्यानंनतर रुग्नाला अचानक पोटात जास्त दुखायला लागले,त्यावर डॉक्टर मी तुम्हाला आता सांगते मी जरा दोन दिवस नॉनव्हेज खालय आहे बर का त्यामुळे जास्त पोट दुखतय का ?
आता सांगा डॉक्टरने काय करायच,तो एक पेशंट सेटल करता करता आख्खा दिवस गेला.नशिब तत्पश्चात जास्त कॉप्लिकेशन्स झाले नाही. नाहीतर या पोलिसबाईंचा आज आमच्या गळ्याला फासच होता.
संध्याकाळी सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यावर म्हणतायेत आता इथुन पुढे तुम्ही सांगितलेली सगळी पथ्ये पाळेन.
मी एकच वाक्य म्हटल ," बाई, आता हाणा माझ्या तोंडात.तुम्हाला कोपरापासुन दंडवत."

ब़जरबट्टू's picture

7 May 2015 - 9:13 am | ब़जरबट्टू

पहिले "रुग्ण" हा शव्द लिहून बघा १० वेळा.... :)

काळा पहाड's picture

7 May 2015 - 12:16 pm | काळा पहाड

जपून.. डाँच्या कडे दंबूक आहे.

बाबा पाटील's picture

8 May 2015 - 12:26 pm | बाबा पाटील

तु येडा हायस का रे भाउ ?

बाबा पाटील's picture

8 May 2015 - 12:26 pm | बाबा पाटील

रुग्ण रुग्ण रुग्ण रुग्ण रुग्ण रुग्ण रुग्ण रुग्ण रुग्ण रुग्ण

ब़जरबट्टू's picture

8 May 2015 - 3:14 pm | ब़जरबट्टू

आता नाय चुकायचे परत... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2015 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाय, नाय, नाय ! तुमी यक्दा रुग्ण असं लिहून नौदा चोप्य पस्ते केल्याचा सौंशय येतोय ;) :)

प्यारे१'s picture

9 May 2015 - 10:55 pm | प्यारे१

एकदा एक रुग्ण चोप्य पस्ते करुन २ रुग्णांना आणखी ४ वेळा किंवा चार रुग्णांना अडीच वेळा किंवा कसंही....

प्राची अश्विनी's picture

5 May 2015 - 7:57 am | प्राची अश्विनी

असे अनुभव कुणाला ही येउ नयेत हे खरे,
पण काही प्रश्न
१ अशा घटनांचे प्रमाण १९९५ च्या सुमारास ( नक्की कुठचे वर्ष याबद्दल खात्री नाही ) जेव्हा खाजगी वैद्यकीय महाविद्यालये चालु झाली त्यानंतर वाढलेय का?
२ अशा महाविद्यालयात एका एम डी किंवा एम एस डॉक्टरच्या शिक्षणाचा खर्च एक कोटी किंवा त्याहुनही अधिक असतो . त्याशिवाय शहरातील जागांचे भाव, व इतर खर्च. हे सर्व वसूल करण्यासाठी आणि त्यानंतर नफा(योग्य शब्द सुचला नाही )कमावण्यासाठी डॉक्टरांना असे चार्जेस ठेवणे गरजेचे वाटत असेल ़का?
३ कुठच्याही कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये ,जेव्हा एखद्या डॉक्टरला प्रवेश मिळतो, तेव्हा तो फक्त तो किती चांगला डॉक्टर आहे यावर किंवा फक्त यावरच नाही तर त्याच्याकडुन दरमहा काही लाख ( आता कदाचित कोटी असतील) रुपयांची प्राप्ती त्या हॉस्पिटलला होइल याची त्याला हमी द्यावी लागते .
याचा आणि या घटनांचा संबंध असावा असे वाटते.

संदीप डांगे's picture

5 May 2015 - 8:03 am | संदीप डांगे

वरील २ आणि ३ क्रमांकाचे मुद्दे परत चर्चेला येतील अशी आशा होतीच.

माझ्या मते आपल्या शिक्षणाचा खर्च वसूल करायला अनावश्यक बाबी करून लुबाडणूक करायची याला तसा नैतिक तर्क नाही. कुठल्याही डॉक्टरला दरमहा ची सक्ती होत असेल तर वैद्यकक्षेत्र हे वाटमारी करणार्‍या रामोशांचे नवे क्षेत्र आहे असे मानायला लागेल.

एखाद्या व्यावसायिकाला पुरेसा धंदा मिळावा, पैसा मिळावा म्हणून वाट्टेल ते करण्याची मुभा कशी काय असू शकते. तेही लोकांचे जीवन-मरणाच्या प्रसंगात?

प्रमाणाबाहेर इंजिनीअर तयार होणे आणि प्रमाणाबाहेर डॉक्टर तयार होणे यात प्रचंड फरक आहे. लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे डॉक्टर कमी आहेत असे म्हटले जाते. मग लुबाडून खोटे बोलून व्यवसाय मिळवण्याची सक्ती का?

टवाळ कार्टा's picture

5 May 2015 - 12:02 pm | टवाळ कार्टा

कुठच्याही कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये ,जेव्हा एखद्या डॉक्टरला प्रवेश मिळतो, तेव्हा तो फक्त तो किती चांगला डॉक्टर आहे यावर किंवा फक्त यावरच नाही तर त्याच्याकडुन दरमहा काही लाख ( आता कदाचित कोटी असतील) रुपयांची प्राप्ती त्या हॉस्पिटलला होइल याची त्याला हमी द्यावी लागते .

हे असे असते????? असे असेल तर कसले नोबल प्रोफेशन?
माझ्या अल्पबुध्धी नुसार आजपर्यंत कधीच डॉक्टरांची संख्या गरजेपेक्षा जास्त नव्हती (जीतकी गरज आहे तितकीसुध्धा नै) अश्यावेळी गरज जास्त पुरवठा कमी या तत्वानुसार डॉक्टरांना रुग्णांची कमतरता पडू नये...त्यामुळे डॉक्टरांसाठी तरी "टार्गेट" नसावे

झंम्प्या's picture

5 May 2015 - 8:14 am | झंम्प्या

वैद्यकीय सेवा आता खूप मोठ व्यवसाय केंद्र झालंय, मी ही माझ्या आयुष्यात अशाच एका भयंकर प्रकाराला बळी पडता पडता वाचलोय. डोळे झाकून आपण ज्याच्या सांगण्यावरून आपलं पोट फाडायला तयार होतो, तीच लोकं अशी करायला लागल्यावर कस होणार काळत नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 May 2015 - 8:21 am | माईसाहेब कुरसूंदीकर

असे अनुभव कोणाला येऊ नयेत.
बाबा रे संदीप,बाळंतपणाचे म्हणशील तर ५०-६० वर्षांपूर्वी बाळंतपणे ह्या तथाकथित तज्ञ गाय्नॅक डॉक्टरांशिवायच व्हायची हो. तुझा तो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट(मराठी शब्द तूच सूचव रे बाबा) अर्थातच जास्त असायचा हे मान्य.

उडदा माजी काळे-गोरे, निवडने आपल्या हातात..

एक्क्यांणवनंतर म्हणा किंवा खाऊजानंतर म्हणा - भांडवलशाही हे सर्वोच्च मूल्य झालं आहे. ते भांडवल पैशांच्या स्वरूपातच असलं पाहिजे असं नाही - ओळख, जात, अशा काहीही स्वरूपात ते असू शकतं.

वैद्यकीय सेवांबाबतही ज्याच्याकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं भांडवल आहे तोच उत्तम सेवा मिळवू शकतो. जवळचा मित्र किंवा नातेवाईक डॉक्टर असणे हा एक भांडवलाचा प्रकार आहे, किंवा ऑफिसच्या कॅशलेस विमा पॉलिसीतून उपचार मिळवणे हाही.

पगला गजोधर's picture

5 May 2015 - 1:09 pm | पगला गजोधर

जवळचा मित्र किंवा नातेवाईक डॉक्टर असणे हा एक भांडवलाचा प्रकार आहे

जवळचा मित्र किंवा नातेवाईक चांगला डॉक्टर असणे हा एक Asset चा प्रकार आहे

आदूबाळ's picture

5 May 2015 - 2:15 pm | आदूबाळ

येस. कॅपिटल अ‍ॅसेट.

नेत्रेश's picture

5 May 2015 - 11:52 am | नेत्रेश

ईतर धाग्यांबर गोंधळ घालणारे या धाग्यावर शेपुट घालणार असे दीसते.

बाकी तुमचे अनुभव खरच दुर्दैवी आहेत. न लुबाडणारा डॉक्टर आणी पैसे न खाणारा पोलीस भेटायला नशीब लागत असेच म्हणावे लागेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2015 - 1:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी तुमचे अनुभव खरच दुर्दैवी आहेत. न लुबाडणारा डॉक्टर आणि पैसे न खाणारा पोलीस भेटायला नशीब लागत असेच म्हणावे लागेल.

सहमत.

-दिलीप बिरुटे

खंडेराव's picture

5 May 2015 - 12:21 pm | खंडेराव

मी स्वताच्या बाबतीत शक्यतो डॉक्टरकडे जायचे टाळतोच. चुकीचे आहे पण काय करणार.. कवडीचाही विश्वास राहीला नाहिये सध्या.
लहाणपणी गावाकडे बरे होते. फॅमिली डॉक्टर अस्तित्वात होते, अगदी देवमाणुस. चांगला डॉक्टर मिळणे हा नशीबाचा भाग झालाय आता.

पण जो पर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील खाजगी महाविद्यालये आणी आरोग्य व्यवस्था यांची मक्तेदारी मोडुन काढली जात नाही तो पर्यंत याला पर्याय नाही.

सर्व खर्चः १ लाख २५ हजार रुपये. (नॉर्मल डीलीवरी: ६५ हजार) सन २०१०

हे करण्यापेक्षा जवळच्या सरकारी डॉक्टरवर विश्वास ठेवला असता,तर....

जे.पी.मॉर्गन's picture

5 May 2015 - 8:13 pm | जे.पी.मॉर्गन

असे अनुभव ओळखीच्या अनेकांच्या बाबतीत आलेले जवळून बघितले आहेत.

कोथरूडमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ७ वर्षीय मुलीच्या हनुवटीला ५ टाके घालताना तिथल्या डॉक्टरने "कायमचा मार्क राहील... मुलगी आहे... पुढे (लग्नाला) वगैरे अडचण येऊ शकेल. तर प्लॅस्टिक सर्जरी करून टाका, २४ तासाच्या प्रोसीजरचे फक्त ५० हजार होतील" असं तिच्या आई-बापाला सांगितलं. तिच्या बापाने हट्टाने लावून धरून प्लॅस्टिक सर्जरी करू दिली नाही. पोरीची जखम १५ दिवसांत भरली न वर एक ओरखडा सुद्धा राहिला नाही.

बेकार झालंय!

जे.पी.

चिगो's picture

5 May 2015 - 8:45 pm | चिगो

कोथरूडमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ७ वर्षीय मुलीच्या हनुवटीला ५ टाके घालताना तिथल्या डॉक्टरने "कायमचा मार्क राहील... मुलगी आहे... पुढे (लग्नाला) वगैरे अडचण येऊ शकेल. तर प्लॅस्टिक सर्जरी करून टाका,

अरे देवा..

बाबा पाटील's picture

5 May 2015 - 8:42 pm | बाबा पाटील

खाजगी डॉक्टरांकडे जावुन फसवणुक करुन घेण्यापेक्षा स्वतःच्या फॅमिली डॉक्टरच थोड ऐका,आणी तिथे विलाज होत नसेल तर सरकारी डॉक्टरकडे जा. केस पेपर सोडला तर एक नया पैसा खर्च होत नाही,सरळ साधा विचार करा,तुमच्या हायजिन आणी सार्वजनिक अस्पृश्यतेच्या कल्पना थोड्या सोडल्या तर सरकारी सरकारी दवाखांन्यासारखा स्वस्त आणी विश्वासु उपचार कुठेही होत नाही.मी स्वतः काही महिने सरकारी रुग्नालयात काम केले आहे,माझ्या पेशंटलाही हाच सल्ला देतो आणी इमर्जन्सीमध्ये माझ्या घरातले पेशंट देखिल मी ससुनलाच हलवले आहेत.जिथे खाजगी रुग्नालयाने माझ्या आत्याला साडेतिन लाख रुपये खर्च सांगितला होता तिथे तीला साडेतिन हजार ही नाही लागले. सार्वजनिक आरोग्यसेवेवर जरा विश्वास ठेवला तर हे असे मनःस्तापाचे प्रसंग तरी टळतील.

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 12:18 am | संदीप डांगे

पाटीलसाहेब,

सिवील सोडून खाजगीकडे जाण्याच्या निर्णयाला आपण दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहात असे वाटते.

लेखाचा रोख 'पैसे किती मोजावे लागले' हा नाही आहे. उपचार निदान यांच्यात पारदर्शकता हवी असा आहे. खर्चाचा उल्लेख फक्त त्या प्रसंगाचा आर्थिक पैलू मांडण्यापुरता आहे. तो एकमेव निकष नव्हे.

ज्या नर्सिंग होम ने १.२५ घेतले तेवढेच त्यांनी नॉर्मल डीलीवरीचे मागितले असते तरी मी दिले असते कारण एक सीझर सोडले तर तिथली इतर व्यवस्था, स्टाफ, रूम्स, सोयीसुविधा अगदी मला हव्या तशा होत्या. पाच दिवस आम्हाला कुठल्या हॉस्पीटलमधे नसून जणू स्वत:च्या घरीच आहोत असे वाटत होते. हे सर्व मला सिवीलमधे मिळाले असते का? सिवीलपेक्षा मला उत्कृष्ट सुखसोयी व सर्वोत्तम उपचार हवेत, त्यासाठी मी कितीही पैसे मोजायला तयार आहे. म्हणून मला अंधारात ठेवून, फसवून, माझ्याच शरिराचे बारा वाजवून पैसे कमवण्याचा हक्क खाजगीवाल्यांना मिळतो काय?

रुग्णाला खरे काय ते सांगावे. तो रुग्णाचा मूलभूत हक्क आणि डॉक्टरचे सर्वोच्च कर्तव्य आहे. सीझर करण्यामागे फक्त पैसे हाच एकमेव हेतू नसतो डॉक्टरांचा. इतर अनेक गोष्टी आहेत. स्वतःचा त्रास, टेंशन्स, जबाबदारी कमी करणे किंवा टाळणे यासाठी सुद्धा सीझर होतात. सीझरमध्ये डॉक्टरकडे पुर्ण नियंत्रण असतं, नॉर्मलमधे वेळ आणि कॉम्प्लीकेशन्स ची काही खात्री नसते. ते टाळण्यासाठी हे सर्व होत असावं असं वाटतं.

जिथे अविश्वास, भय, शंका या भावनांचे अजिबात स्थान नसावे तिथे आज ह्या भावना सर्वात आधी उभ्या ठाकतात, हे किती भयानक आहे याचा आपण विचार करत आहोत का?

प्रश्न पैसे वाचवण्याचा नाहीये, फेयर ट्रीटमेंटचा आहे. जर मला उपचार/निदानाबद्दल शंका राहत असेल तर तिथे मी साडेतीन लाख मोजतोय का साडेतीन हजार या गोष्टीला महत्त्व राहत नाही.

खाजगी डॉक्टरांना मंथली टार्गेट, हॉस्पीटल लोन्स वैगेरे साठी लोकांच्या प्राणाशी खेळावे लागत असेल तर ते करण्यापेक्षा इतकीच उत्तम बुद्धी वापरून इतर हमखास पैसा देणारी पण लोकांचे जीव न घेणारी कामे/व्यवसाय करावीत. रुग्णांना चांगल्या डॉक्टरांच्या हवाली सोडा. अन्यथा डॉक्टर जमातीचे जीणे येत्या काळात कठीण होणार हे निश्चित.

बाबा पाटील's picture

6 May 2015 - 7:44 pm | बाबा पाटील

मी पैसे फेकतोय म्हणजे मी परमेश्वरालाही विकत घेतोय ही प्रवॄत्ती याच्या मुळाशी कारण आहे अस नाही तुम्हाला वाटत.ज्यावेळी तुम्ही पंचतारांकित रुग्नालयाची पायरी ओलंडता तेव्हांच तुम्ही डॉक्टरकडुन रुग्नसेवा ही अपेक्षा सोडुन द्या.जेंव्हा तुम्ही धंदेवाइक झाले तेंव्हाच डॉक्टरही धंदेवाइक झाले हे कस विसरताय.त्याने पंचतारांकित सोई दिल्या त्याच वेळा तो ते वसुल करण्याचे मार्ग शोधणार हे कधी लक्षात नाही आल का ? का बँकांचे हप्ते स्वतःला विकुन भरणार आहे.
त्यामुळेच म्हटल होत,जेथे बांळतपण नॉर्मल होणार असत तिथे तुम्ही अशा ठिकाणी जावुन तुम्ही सिझरच्या शक्यता २००% ने वाढवता.एव्हडा समज नसेल तर अवघड आहे.
नशिब सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अजुनही चांगल काम करते आहे,त्याबाबत माय बाप सरकारचे आभार माना. आणी या पुढे तरी असल्या भपकेबाजपणाला बळी पडु नका.

जेथे बांळतपण नॉर्मल होणार असत तिथे तुम्ही अशा ठिकाणी जावुन तुम्ही सिझरच्या शक्यता २००% ने वाढवता.एव्हडा समज नसेल तर अवघड आहे.

बरोबर आहे, चांगल्या सुविधांची अपेक्षा ठेवून अशा ठिकाणी नाव नोंदवणं ही रुग्णांचीच चूक आहे.

सूड's picture

6 May 2015 - 8:37 pm | सूड

मी म्हटलं ना, टापटीप हास्पिटलं बघून आपल्याला चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा ठेवणे ही रुग्णांची चूक आहे.

बाबा पाटील's picture

6 May 2015 - 8:45 pm | बाबा पाटील

भपका बघु नका, विश्वासाहार्यता बघा. आपल्या फॅमिली डॉक्टरच ऐका.

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 9:13 pm | संदीप डांगे

तुम्ही काय बोलत आहात हे तुमच्या तरी नक्की लक्षात येतंय का? तुम्ही काहीतरी भयंकर मांडत आहात असे नाही वाटत?

परमेरशवराला विकत घेतोय वैगेरे माज अजून तरी माझ्यात आला नाहीये. पण पंचतारांकित सुविधांचे पैसे मोजतोय म्हणून उपचारात खोटेपणा करावा ह्यामागे नक्की काय लॉजिक आहे?

'सेवाभाव, निरपेक्ष सेवा' वैगेरे हा माझा मुद्दाच नाहीये. रुग्णसेवा म्हणजे नेमकं काय? ज्या कारणासाठी मी एखाद्या डॉक्टरला पैसे मोजतोय त्यात त्याला त्याच्या मनाने कुचराई करण्याचा, फसवण्याचा अधिकार कसा मिळतो?

ताजमधे मी जेवायला गेलो तर तिथे जगातल्या सगळ्या सुखसोयींचे पैसे मोजतोय तेव्हा ज्यासाठी गेलो ते जेवणच नि़कृष्ट दर्जाचे मिळेल काय, त्यात उंदीर, झुरळ असतील काय? टाटा असे म्हणतात का "अरे बाबा, आम्हाला एवढ्या सुखसोयी देण्यात एवढा पैसा खर्च होतो की चांगले जेवण देऊ शकत नाही. जरी त्याचे पैसे बिलात लावले असतील तरी, हे उंदीर, झुरळ खावे लागणे ह्यात तुझीच चूक आहे."

मॅक्डीमधे एका बर्गरचे १२५ रुपये लावतात, रस्त्यावरचा वडापाव १२ रुपयाला मिळतो. मॅक्डीमधे १२५ रुपये खर्चून रस्त्याच्या वडापावपेक्षाही नि़कृष्ट दर्जाचा बर्गर मिळाला तर कुणी खपवून घेईल काय?

जेवढे जास्त पैसे मोजाल तेवढा उपचारांचा दर्जा खालावेल?

पंचतारांकित रुग्णालये दिलेल्या सुविधांचे खणकून पैसे लावतात, ते द्यायलाही लोक तयार आहेत. हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याचा उपचारांच्या दर्जाशी नक्की काय संबंध आहे? लोन काढून हॉस्पीटलं बांधा मग हफ्ते फेडायला लोकांना आयुष्यातून उठवा असं करण्याची डॉक्टरांची काय मजबूरी आहे बरं?

तुमचं काहीतरी जाम चुकतंय डॉक्टरसाहेब. तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती.

आपल्या व्यवसायबंधूंना कोणत्याही पातळीवर जाऊन डीफेंड करणे आणि गिरे तो भी टांग उपर या न्यायाने काही झाले तरी रुग्णांचीच चूक आहे असे दाखवणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे असे इथे खेदाने नमूद करावेसे वाटते.

डांगे साहेब म्हणा चूक रुग्णांची आहे, काय फरक पडतो. माझ्या आयशीला पंचवीस दिवस तडफडताना बघितलंय मी अशाच एका नामांकित रुग्णालयात!! असो. एवढे निबंध लिहायला वेळ वाया घालवू नका राव.

इति लेखनसीमा

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 9:36 pm | संदीप डांगे

तसंच आहे सूडभाऊ,

आजारी पडणे हीच आपली खरी आणि मोठी चूक आहे. आपला गैरफायदा घ्यायला त्यांना आपण चान्स देतो ना...

मृत्यूंजय यांनी म्हटल्याप्रमाणे 'बलात्कार ही जशी स्त्रीचीच चूक आहे असे लोक म्हणतात तसेच हे आहे.'

बाबा पाटील's picture

8 May 2015 - 12:55 pm | बाबा पाटील

तुम्ही व्यवसायीकरण आणी नितिमत्ता यांची गल्लत करता आहात. म्हणुन मी परत परत एकच गोष्ट सांगतोय्,अगोदर आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या. त्यांनतर जर ऑपरेशन आवश्यक जर सांगितले तर एकदा तरी सरकारी डॉक्टरांचा सल्ला घ्या भले उपचार प्राव्हेटलाच करा,पण सरकारी डॉक्टरांचा अनुभव हा तुमचा प्लस राहिल.अथवा पुण्यासारख्या ठिकाणी कमांड हॉस्पिटल आहे तेथे सल्ला घेवु शकता,हा तिथले प्राणी जरा सनकी असतात पण चुकीचा सल्ला कधीच मिळणार नाही.अथवा पर्यायी पॅथींचा विचार केला जावु शकतो.साधे मुतखड्याचे उदाहरण घ्या,साधारण १० ते १२ मिमी चे खडे आयुर्वेदाने सहज पडतात , तर अ‍ॅलोपॅथीवाले ६-७ मिलीला ऑपरेशन सांगतात मग याठिकाणी २ हजाराची आयुर्वेदीक औषधे खायची का २५ हजाराचे ऑपरेशन करायचे याचा सारासार विचार केलाच पाहिजे.का आहे इन्शुअरन्स मग डॉक्टर सांगतोय म्हणुन घे कापुन हा प्रकार टाळला पाहिजे.आमचे व्यवसाय बंधु चुका करतायेत,एकदम मान्य पण त्याला तुम्ही खतपाणी घालता आहात हे का समजावुन घेत नाही साहेब.सेकंड ओपिनियन का घेतल जात नाही. आणखी एक गंमत फेसियल पाल्सी अथवा चेहर्‍याचा झटका यात तोंड वाकडे होते,यात शक्यतो मेंदुमध्ये काही जास्त घडले नसेल तर फक्त फिजिओथेरपीने १० दिवसात सर्व काही पुर्ववत होते,इथे पेशंट फुकट आय सी वु पडलेला असतो,आणी नातेवाइक घाबरुन आणखी गोंधळ घालत असतात्,आणी फुकटचे बिल वाढवुन घेतात.
अशा वेळी नैतिकतेच्या आधारावर डॉक्टरांची जेव्हडी चुक तेव्हडीच पेशंटचीही नाही का ?

नाखु's picture

8 May 2015 - 2:10 pm | नाखु

बरेच काही आणी मूळ धाग्याला धरून प्रतीसाद.

कपिलमुनी's picture

8 May 2015 - 2:37 pm | कपिलमुनी

हा आयुर्वेदिक आणि अ‍ॅलोपथिक डॉक्टराम्च्या मधला प्रचंड वादाचा विषय आहे.

जिथे लोक धंदा करयला बसलेली असतात, तिकडे नितीमत्तेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. तुमच्या लेखचा मुळ उद्देश, लोकांच्या प्राणाशी खेळु नये हा आहे, पण असे तुम्ही कुणाकुणाल पकडणार ?
दुधात भेसळ करण्यार्‍याला, की जेवणात सोडा टा़कण्यार्‍या हॉटेल/कॅटररला, की अनैसर्गिक रित्या फळे पिकवण्यार्‍या फळवाल्याला, की कॅन्सरला कारणीभूत होण्यार्‍या शेती कीटकनाशके विकण्यार्‍या कंपन्याना?
हे सगळेच लोकांच्या आरोग्यशी खेळतात.
ही "की" ची यादी खूप आहे.

क्लिंटन's picture

5 May 2015 - 8:54 pm | क्लिंटन

भयानक...

इथे येऊन लिहीण्यापलीकडे आपण काही करु शकतो का? मी तरी काही करु शकत नाही.

त्यामुळे आहे हे असं आहे!! चालवून घ्यायचं.

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 12:15 am | संदीप डांगे

माझ्यामते, आपण फसवणार्‍या डॉक्टरांपेक्षा जास्त शहाणे होऊ शकतो. असे अनुभव नियमीत वाचनात येत राहिले तर किमान तसाच प्रसंग कुणासोबत दुर्दैवाने घडत असेल तर रुग्ण्/नातेवाईक जास्त सतर्क आणि जागरूक राहू शकतात.

शेवटी कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीविरूद्ध जनजागृती आणि लोकशिक्षण हीच प्रभावी आयुधे आहेत.

ब़जरबट्टू's picture

6 May 2015 - 4:50 pm | ब़जरबट्टू

असे अनुभवच जणजागरण करतात.. सध्या डॉक्टरांवर खरच विश्वास नाहिये..
अगदी ताजा किस्सा..
बायडिला गळ्यात दुखते म्हणून जवळच्या डाक्टरला दाखवला.. त्याने पि.चिं. मधील नामवंत (?) हास्पिटलच्या अजुन एका नामजंत डाक्टरला दाखवायला सांगितले.. भेटलो तर पोर वाटत होता तो.. २ मिनिटात आजच अडमिट करा असा फरमार्न आला..शंका आली, म्हटंले आज शक्य नाही, २ दिवस वाट बघतो, त्याहिशोबाने द्या औषधे.. खुप पटवायचा प्रयत्न केला त्याने.. लिहून घेतले, आम्ही जवाबदार नाही म्हणून. आपली तर मग टरकली.. म्हंटले, हो बाई अडमिट, बायडी नाही म्हंजे नाहीच.. त्याने घाबरवत दिले प्रिस्क्रिपशन.. पण एकच चुक केली.. काय झाले हे पण लिहीले..
झाले, आमचा गुगुलु अवतार सुरु झाला.. वाचले, तर लय पाणचट आजार.. फक्त बेड रेस्ट घ्यायची होती.. जबरदस्ती आराम घ्यायला लावला... २ दिवसात टुनटुनित... :)
तिस-या दिवशी बायडीने.. हास्पिटलचा खर्च वाचवला, म्हणत वाचलेले सगळे पैसे खरेदीत उडवले (स्वता:च्या हो) .. :(
आता खरच वाटते, डाक्टरांची पत खाली जातेय..हास्पिटलचे प्रचंड प्रेशर असते, जास्तीत जास्त मार्गाने पैसा काढायचा..नविन डाक्टरला पण उपाय नसेल... सेकंड ओपीनियन ईज मस्ट म्हणतो मी...

damn's picture

6 May 2015 - 12:37 am | damn

अशी कृत्ये करणाऱ्या ड़ॉक्टराना उघडे पाडा. ईथे काही लोकांनी आपले ऎसे फंसवणुकीचे अनुभव डॉक्टरांचे नाव न लिहिता लिहिले आहेत. त्यांनी अशा डॉक्टरांचे, त्यांच्या क्लीनिक किंवा हॉस्पिटलचे नाव लिहून त्यांना उघाड़े पाडावे म्हणजे यापुढे कमिटी कमी मिपाकर तरी अशा कसायानकडून कापाली जाणार नाहीत.
मोबाइल वरुन लिहित असल्यामुळे शुद्धलेखन पारच गंडलय. तेवढे संभाळून घ्या. संभालूंअंषुद्धवासविचेजन्नन्नीप्रतिस्ठारा

भीक नको पण कुत्रा आवरा एवढेच या प्रतिसादावर म्हणू शकतो.

डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं प्रामाणिकपणाचं, विश्वासाचं असतं. तरीही नीतिमत्ता सर्वच डॉक्टर्स पाळत असतील याची खात्री देता येत नाही हे ही तितकेच खरे असावे असे अनुभवांवरून वाटते. वैद्यक शास्त्रातले फारसं ज्ञानही नाही आणि अनुभवही (सुदैवाने) फार तोकडे आहेत त्यामुळे काय चुकीचं काय बरोबर ते अधिकारवाणीने सांगता यायचे नाही.

आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत नीतिमत्तेचे सर्वसाधारण नियम असतात. त्याची वर्गवारी, यादी, नवीनीकरण बर्‍याच संस्थां करत असतात. कदाचित तशाच स्वरुपाची नियमावली वैद्यक क्षेत्रात असायला हवी (किंवा असेलही. ethics standards and code of conduct for medical) त्याबद्धल डॉक्टर्स आणि रुग्णांमध्येही जनजागृती व्हायला हवी. हा एक मार्ग असू शकतो असे मला वाटते.

जसे जर डॉक्टर्स एमुक एक औषध (ब्रँड) वा अमुक एका हॉस्पिटलचाच आग्रह धरत असतील वा खर्चिक उपाय सुचवत असतील तर त्यांनी त्यात त्यांचा आर्थिक फायदा (वा भेटवस्तू वा अन्य स्वरूपातला फायदा) आहे वा नाही याची माहिती रुग्णांना दिली पाहिजे. शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार पद्धती बदलू शकते (independent judgment) त्यामुळे महागडा उपाय सुचविणार्‍या डॉक्टरांना सरसकट बोल लावण्यात अर्थ नाही असे मला वाटते.

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 12:06 am | संदीप डांगे

शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार पद्धती बदलू शकते (independent judgment) त्यामुळे महागडा उपाय सुचविणार्‍या डॉक्टरांना सरसकट बोल लावण्यात अर्थ नाही असे मला वाटते.

हे जरा वादग्रस्त विधान होऊ शकते. डॉक्टरांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी रुग्णांच्या अनावश्यक शस्त्रक्रिया होत असतील तर ते बरोबरच आहे असा अर्थ निघतो आहे.

डॉक्टरांचे independent judgment हा ही एक घातक प्रकार आहे. एकिकडे आपलं ज्ञान, अनुभव शेकडो प्रयोगांवर आधारित आहे असे म्हणायचे आणि 'मला त्यावेळी तसे करणे योग्य आहे असे वाटले' असा ज्योतिषीछाप बचाव करायचा हे जरा विसंगत आहे. 'एकाच रोग्याच्या एकाच रोग-अवस्थेचे एकच निदान पण उपचारपद्धती दोन, त्यात एक फुकट दुसरी महाखर्चिक' या परिस्थितीची पाठराखण शास्त्रीय, प्रयोगसिद्ध असा अहंकार बाळगणार्‍या मॉडर्न मेडीसीनने करावी आणि इतरांना क्वॅक्स म्हणावे यात काहीच चुकीचे वाटत नाही का?

रेवती's picture

5 May 2015 - 11:53 pm | रेवती

वाईट.
असे प्रसंग कोणावर येऊ नयेत.

काळा पहाड's picture

6 May 2015 - 12:04 am | काळा पहाड

मला हे सगळं डेजा-वू सारखं का वाटतंय? ही चर्चा आधीच झालीय आणि त्या धाग्यावर डॉक्टर लोकांनी ज्या प्रकारे हल्ले केले होते तसे तर राजकारणीसुद्धा करत नाहीत. त्या आधीच्या धाग्यावर एका सुशिक्षित डॉक्टरांकडून मला परवडत नसेल तर ससून ला जा असा सल्ला मिळाला होता (थोडक्यात, परवडत नसेल तर खड्ड्यात जा अशा टोनमध्ये). तेव्हा अव्वाच्या सव्वा पैसे लुबाडणारे डॉक्टर आणि पेशंट बरा झाला नाही तर तोडफोड करणारे पेशंटचे नातेवाईक आपापसात पाहून घेतील. या बाबतीत मी २ सूचना केल्या होत्या. त्या अजूनही खर्‍या आहेत असं मी मानतो.
१. प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स ची पैदास करा (म्हणजे काँपिटिशन वाढेल)
२. सवलतीतलं शिक्षण फक्त सरकारी काम करणार्‍या डॉक्टरांना द्या (खाजगी प्रॅक्टीस केली तर परवाना रद्द). खाजगी प्रॅक्टीस करणार्‍यांना विना-अनुदानीत फी भरू दे.

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 12:11 am | संदीप डांगे

आप बिल्कुल सही है सर.. ये देजा-वू ही है.

त्या सुशिक्षित डॉक्टरांच्या सगळ्या अभिजात आणि उत्तुंग विचारी प्रतिसादांवरच हा लेख आधारित आहे.

पैसा's picture

6 May 2015 - 9:18 am | पैसा

तुमच्यावर खूप वाईट प्रसंग आले. अए कोणावर येऊ नयेत.

इथल्या चर्चेत मला कळलेल्या आणि पटलेल्या गोष्टी

डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. पेशंटही सर्व प्रकारचे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणून कोणीच कोणाला सरसकट झोडपू नये.

सरकारी हॉस्पिटल्सचा अनुभव डायग्नोसिस, खर्च इ. बाबतीत खूप चांगला आहे मात्र ओपीडीला खूप वेळ थांबावे लागते. तिथेही उडदामाजी काळेगोरे आहेच.

शिक्षकांना मेडिकल रिएम्बर्समेंट मिळते म्हणून माझ्या आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या बिलावर सही करण्यासाठी १०% मागणारे सिव्हिल सर्जन याची देही याची डोळा पाहिले आहेत. मग आईने ते बिल पुढे पाठवले नाही. आणि तो डॉक्टर असला तरी सरकारी नोकर आहे असे म्हणून प्रकरण सोडून दिले. त्याचवेळी तिच्यावर ऑपरेशन करणारे सर्जन देवमाणूस होते हे नमूद करणेही आवश्यक आहे.

तात्पर्य काय, अशा चर्चांमधे आपण कधीही कोणतेही ठाम निष्कर्ष काढू शकणार नाही! मात्र एकूणच आरोग्याबद्दल जनजागृती अत्यंत आवश्यक आहे.

काळा पहाड's picture

6 May 2015 - 10:48 am | काळा पहाड

माझ्या आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या बिलावर सही करण्यासाठी १०% मागणारे सिव्हिल सर्जन याची देही याची डोळा पाहिले आहेत.

त्याचवेळी तिच्यावर ऑपरेशन करणारे सर्जन देवमाणूस होते हे नमूद करणेही आवश्यक आहे.

हे कसं काय ब्वॉ? लास्ट टाईम मी चेक केलं तेव्हा देव लाच घेत नव्हता.

मृत्युन्जय's picture

6 May 2015 - 10:54 am | मृत्युन्जय

ऑपरेशन करणारे सर्जन आणि बिलावर सही करणारे सिव्हिल सर्जन हे दोन वेगवेगळे असतील.

काळा पहाड's picture

6 May 2015 - 11:09 am | काळा पहाड

अच्छा अच्छा. आय माय स्वारी.

प्रसाद१९७१'s picture

6 May 2015 - 10:34 am | प्रसाद१९७१

@ संदीप डांगे - माझे तुमच्या साठी ३ प्रश्न. उत्तर दिले नाहीत तरी चालेल पण स्वताच्या मनाशी विचार करा.

१. हे असे वाईट अनुभव आणि ते सुद्धा इतक्या जास्त संख्येने तुम्हालाच कसे आले? मी बरीच आजारपणे बघितली आहेत वडीलांची आणि मेव्हण्याचे अपघात मुळे. पण फक्त १ वेळा आर्थोपिडीक हॉस्पिटल चा अनुभव वाईट आला आणि एकदा आयसीयु मधला. पण ते प्रमाण ३-४ टक्के असेल. बाकी जवळ जवळ सर्व वेळेला डॉक्टरांचा अनुभव चांगला आला. कोणी लुटले असे पण वाटले नाही. वडलांच्या पायाच्या अँप्युटेशन ( गुढग्याच्या खाली ) चे सर्जन नी फक्त ६००० रुपये लावले ( २००७ साली ). तेंव्हा मलाच लाज वाटली. बिचारा अ‍ॅक्टीव्हा वरुन भर दुपारी आला, ३ तास ऑपरेशन केले आणि निघुन गेला. अनेक वेळेला डॉक्टरांनी, उगाच पैसे खर्च करु नका हा मोलाचा सल्ला दिला आहे.
तुमच्या साठी प्रश्न - असे सातत्यानी अनुभव तुम्हालाच येण्याचे कारण तुम्ही शोधुन बघता का? तुम्हाला डॉक्टर बद्दल काही अंदाज येत नाही का? तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळी यांना विचारुन डॉक्टर कडे जात नाही का?

२. एकुणच तुम्हाला डॉक्टर मंडळींचा अनुभव चांगला दिसत नाही. मग डॉक्टर कडे जाणे बंद का करत नाही तुम्ही. तसेही तुम्ही डॉक्टर कडे गेलात की तुम्हाला डॉक्टर लुटणार्/कापणार हे नक्कीच आहे. मग डॉक्टर कडे जाणे बंद करा.

३. असेच लेख तुम्ही बिल्डर, क्लास चालवणारे शिक्षक, नगरसेवक, किंवा तुमच्या स्वताबद्दल कधी लिहीणार?

नेत्रेश's picture

6 May 2015 - 10:56 am | नेत्रेश

डॉक्टरकडे जाणे बंद करा सांगणे सोपे आहे, पण पर्याय काय?

पोलिसांचा वाईट अनुभव आला म्हणुन कुणाला कायदा हातात घेता येत नाही. तसेच डॉक्टरचा वाईट अनुभव आला म्हणुन स्वतःला औषधे प्रिस्क्राईब करता येत नाहीत. इथे कायद्याने त्यांना मोनोपॉली दीली आहे. सर्जरीची पदवी नसताना सर्जरी करणे गुन्हा आहे याची आपल्याला कल्पना असेलच. असे असताना पर्याय न सुचवता डॉक्टरकडे जाणे बंद करा सांगणे पोरकटपणाचे वाटते.

प्रसाद१९७१'s picture

6 May 2015 - 10:58 am | प्रसाद१९७१

बाकीच्या २ प्रश्नांची उत्तरे द्या की

नेत्रेश's picture

6 May 2015 - 11:16 am | नेत्रेश

बाकीचे प्रश्न तर उल्लेख कराच्याही योग्यतेचे नाहीत हो.

मृत्युन्जय's picture

6 May 2015 - 11:07 am | मृत्युन्जय

१. तुम्हाला २ वाईट अनुभव आले. त्यांना ६ आले. तरी एकुण तुमच्यापेक्षा प्रचड जास्त नाहित. असे अनुभव इतक्या संख्येने तुम्हालाच का आले हे म्हणजे २ वेळा पाकीट मारले गेलेल्या माणसाला कधीच पाकीट मारले गेले नसलेल्या माणसाने तुझेच पाकीट कसे काय रे हरवते अस्से विचारण्यासारखे झाले. किंवा एखाद्या विनयभंग झालेल्या मुलीला संस्कृतीरक्षकांनी तुझाच कसा काय ग विनयभंग झाला. आम्हीही कॉलेजात जातो आमचा नाही झाला कधी ते असे विचारण्यासारखे आहे.

२. कालच आजोबाचा धागा वाचला. पाणी मिळाले नाही तेव्हा लेखकाने म्हशींना उठवुन डबक्यातले पाणी प्यायले. ते खराब असणार हे जाणूनही त्यांनी प्यायले. त्यांचा नाइलाज असणार. डॉक्टरांच्या बाबतीतही थोडेफार तसेच होते.

अर्थात बरेच डॉक्टर चांगलेच असतात. इथेच कित्येकांनी चांगल्या डॉक्टरांची उदाहरणे दिलीच आहेत. मलाही डॉक्टरांचे बरेच चांगले अनुभव आहेतच. तसेच वाईट डॉक्टरही असतात हे काही डॉक्टरांना मान्य करायचे नसते म्हणुन कदाचित डांग्यांनी हा धागा काढला असावा.

अवांतरः कधीकधी चांगले डॉक्टर सुद्धा चुकीचे वागतात. सध्या त्याचाही अनुभव घेतो आहे. पण ती वन ऑफ केस म्हणून सोडुन दिली.

३. माणूस बिल्डर कडे रोज रोज जात नाही. साधारण आयुष्यात एका किंवा दोने बिल्डरचाच अनुभव येतो. १०० पैक्की ९९ लोकांना तो वाईटच येतो. पण अजुन बिल्डरवर तसा धागा आला नसल्याने आणि कुठला बिल्डर वस्सकन इतरांच्या अंगावर धाउन गेला नसल्याने आणि सगळे बिल्डर सज्जनच असतात आमचे ग्राहकच एक एक नमुने येतात असे म्हणाला नसल्याने इतक्या धाग्यांची गरज पडली नसावी. दुसरी गोष्ट अशी की बिल्डर, क्लासवाले, नगरसेवक यांच्यामुळे कधीकधी मनस्ताप होतो पण शारीरिक नुकसान अथवा हानी होत नाही. शिवाय या सगळ्यांच्या कामामधले सगळे सगळ्यांना माहिती असते असे सगळ्यांना वाटत असते पण डॉक्टरच्या बाबत तसे नसल्याने फसवले गेल्यास फसवणूक जास्त जिव्हारी लागते.

असो. या विषयावर खुप लिहिले गेले आहे. अजुन कशाला उगाच त्रास करुन घ्यायचा?

प्रसाद१९७१'s picture

6 May 2015 - 11:11 am | प्रसाद१९७१

तुम्हाला २ वाईट अनुभव आले.

मला ५० मधले २ वाईट अनुभव आले.

संदीप डांग्यांना सगळेच डॉक्टर कापतात्/लुटतात.

मृत्युन्जय's picture

6 May 2015 - 11:25 am | मृत्युन्जय

डांगे त्यांच्यासाठी आणि नातेवाईकांसाठी मिळुन केवळ ७ वेळा दवाखान्यात गेले असे म्हणणे आहे का तुमचे?

काळा पहाड's picture

6 May 2015 - 11:16 am | काळा पहाड

बिल्डर, नगरसेवक आणि राजकारण्यांना तर इकडे तिकडे बघून कोण बघत नसेल तर संपवून टाकावं असा मतप्रवाह आहे. डॉक्टरांसाठी (ते बहुतांशी चांगले असल्याकारणानेच!) असं टोकाचं मत नाहीये. पण वकील आणि पोलिसांची पायरी चढू नये अशी एक म्हण आहे, त्यात हॉस्पिटलांचं नाव घातलं तर ते डॉक्टर समाजाला फारसं अभिमानाचं ठरणार नाही. बाकीच्या दोघांना समाज कशा प्रकारे टाळतो ते पाहिलं तर डॉक्टर आले तर पळापळ होणं थोडंसं विचित्र दिसेल ना?

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 5:33 pm | संदीप डांगे

@प्रसाद१९७१

कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला: काहीही प्रतिसाद देण्याआधी तुम्ही निदान लेख काळजीपुर्वक वाचण्याचे कष्ट घेता का?

असे सातत्यानी अनुभव तुम्हालाच येण्याचे कारण तुम्ही शोधुन बघता का?
>> हो. मी निवडून निवडून मला कोण जास्त कापेल, माझ्यावर चुकीचे उपचार करेल अशाच डॉक्टर्स कडे जातो.


तुम्हाला डॉक्टर बद्दल काही अंदाज येत नाही का?

>> नाही ना. तुम्हाला काही टेक्निक, विद्या, सिद्धी माहित असेल तर मलाही सांगा.


तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळी यांना विचारुन डॉक्टर कडे जात नाही का?

>> नाही. ते नेहमी मला चांगल्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. मला तसे अजिबात नकोय.

देव करो, तुमच्या १०० अनुभवांमधला एकच अनुभव (डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, लोभामुळे) आयुष्यातून उठवणारा नसो. तुमचे, तुमच्या सगळ्या नातेवाईक मित्रांचे मी खरोखर मनापासून या बाबती अभिष्ट चिंततो. यात कुठलाही सॅरकॅजम नाहीये.

काळा पहाड's picture

6 May 2015 - 10:58 am | काळा पहाड

मग डॉक्टर कडे जाणे बंद करा.

असेच लेख तुम्ही बिल्डर, क्लास चालवणारे शिक्षक, नगरसेवक, किंवा तुमच्या स्वताबद्दल कधी लिहीणार?

असले चंपक प्रतिसाद वाचल्यानंतर तुम्ही डॉक्टर नसाल अशी आशा करतो.

नेत्रेश's picture

6 May 2015 - 11:17 am | नेत्रेश

सहमत

ब़जरबट्टू's picture

6 May 2015 - 5:12 pm | ब़जरबट्टू

असले चंपक प्रतिसाद वाचल्यानंतर तुम्ही डॉक्टर नसाल अशी आशा करतो.

अगदी...

संदीप डांगे's picture

6 May 2015 - 6:22 pm | संदीप डांगे

सही बोले :)

मिपाच्या महान परंपरेला जागुन, विषयाशी संबंधीत नसलेला लेख

काळा पहाड's picture

6 May 2015 - 11:36 am | काळा पहाड

हे आत्तापर्यंत लक्षातच आलं नव्हतं. मी पण डॉक्टर साहेबांना पैशे देवून निघायचो. बाकी त्यांची फी कमी असल्यानं पावती मागणं सुद्धा विचित्रच दिसेल.

हाफशेंच्युरी निमीत्त तमाम लोकांचा सत्कार एक एक पेनकिलर आणी एक एक किलो उडीद दाळ* देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक -जेपी आणी तमाम पॅनिक कार्यकर्ते.

*अटी लागु

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2015 - 7:28 pm | अत्रन्गि पाउस

??

उडदामाजी काळेगोरे,काय निवडावे निवडणारे..
प्रत्येक व्यवसायात चांगले वाईट लोक असतात..निवडणे आपल्या हातात आहे..

(गोरा)जेपी

शब्दबम्बाळ's picture

6 May 2015 - 7:13 pm | शब्दबम्बाळ

qikwell किंवा Practo App कोणी वापरलं आहे का?
याचा थोडाफार फायदा होऊ शकतो ना?

आजानुकर्ण's picture

6 May 2015 - 7:21 pm | आजानुकर्ण

डांगेसाहेब,

तुमचे अनुभव हे प्रातिनिधिक आहेत. कुठल्याही दवाखान्यात, किंवा हॉस्पिटलात पाहिले तर हे आणि याच स्वरुपाचे अनुभव येतात. असेच अनुभव मलाही आले आहेत. वाईट डॉक्टर भेटले तसे चांगले डॉक्टरही भेटले आहे. कितीदा तेच तेच लिहीत बसणार.

मूळ मुद्दा किती डॉक्टर चांगले आणि किती वाईट असा नाही. एखादाच वाईट डॉक्टर भेटला तर त्याचा फटका आयुष्यभरासाठी कायमचा बसतो.

दवाखान्यात किंवा हॉस्पिटलात जायचे म्हटल्यावर पैसे मोजूनही खात्रीशीर, प्रामाणिक सेवा मिळेल की नाही याबाबत आजकाल मनात नेहमी शंका येते.

सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, फोर्थ ओपिनियन आणि अनेकानेक चाचण्या करुनही आजकाल अनेक डॉक्टरांना रोगाचे नेमके निदान करता येत नाही. त्यामुळे बाजारात बसणारे वैदू (आयुर्वेदिक) आणि वैद्यकपदवी घेऊन रुग्णावर प्रयोग करत दवाखान्यात बसणारे डॉक्टर यांच्यात डावेउजवे कोण हा प्रश्न पडावा हे एक दुर्दैवच आहे.

शिवाय नेमके निदान करता आले न आले तरी व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी समोर आलेला रुग्ण ही एक संधी आहे असे मानून त्याप्रमाणे वागणे हाही एक नॉर्म झाला आहे.

उपचारांचा आर्थिक पैलू हा वेगळा भाग झाला. विमा वगैरे काढून आर्थिक अडचण सोडवता येऊ शकते. मात्र नैतिक जबाबदारी न पाळणाऱ्या डॉक्टरांचे काय करायचे यासाठी सोपे उत्तर उपलब्ध नाही.

एस's picture

6 May 2015 - 10:58 pm | एस

उत्तम प्रतिसाद.

सूड's picture

6 May 2015 - 11:00 pm | सूड

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2015 - 1:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुद्दा किती डॉक्टर चांगले आणि किती वाईट असा नाही. एखादाच वाईट डॉक्टर भेटला तर त्याचा फटका आयुष्यभरासाठी कायमचा बसतो.

अगदी बरोबर

-दिलीप बिरुटे

स्वधर्म's picture

7 May 2015 - 12:38 pm | स्वधर्म

या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय इतर कोणीच डाॅक्टर फिरकलेले नाहीत. तसे तर ते अनेक धाग्यांवर (वैद्यकीय नसलेल्यासुध्दा) भरपूर प्रतिक्रीया देत असतात.

या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय इतर कोणीच डाॅक्टर फिरकलेले नाहीत. तसे तर ते अनेक धाग्यांवर (वैद्यकीय नसलेल्यासुध्दा) भरपूर प्रतिक्रीया देत असतात.

असंच असेल तर तुम्ही पण शांततेत चाललेल्या धाग्यांवर प्रतिक्रिया देताना दिसत नाही, अशा ठिकाणी बरे टपकता?